Skip to main content

aathvani

आठवा तो काळ
`आपले जग' ३४ वर्षपूर्ती अंक मिळाला. एखादे औद्योगिक संस्थान, पक्ष किंवा पुढारी, संघटना पाठीशी नसतानाही प्रदीर्घ काळ दर्जेदार लिखाण घेऊन वाचकापुढे जाण्याचे अवघड काम, सर्वहिताचा विशाल दृष्टिकोन ठेवून हे व्रतपत्र तुम्ही चालू ठेवले आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील मुकुंदराव किर्लोस्कर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण, भरीव योगदान असताना त्यांच्या निधनाची वार्ता ठळक न देता कुठेतरी एका कोपऱ्यात इतर वृत्तपत्रांनी दिलेली पाहून, त्यांच्यावर संपादकीय लेख वगैरेही नाही हे पाहून खेद झाला.
`माझे शिक्षक आणि मी' हा श्री.नसीराबादकरांचा लेख आवडला. त्यांनी उल्लेखलेल्या शिक्षकांपैकी गुरुवर्य डॉ.शं.गो.तुळपुळे यांचाच लाभ मला झाला. दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विभागप्रमुख होते. त्यावेळी मी त्या कॉलेजात होते.
माझे वडील उच्च विद्याविभूषित, जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर - एम.ए. होते. पण सनातनी वृत्ती. स्नानसंध्या, सोवळेओवळे कडक पाळणारे होते. आमच्या घरी रोज चार-पाच माधुकरी, तसेच दोन-तीन वारकरी (म्हणजे गरीब मुले एकेक दिवस एकेक घरी जेऊन शिक्षण घेत त्यातील) जेवायला असत शिवाय आंधळे पांगळे भिकारीही यायचे. सणावारी घरी येणाऱ्या कामवाल्यांना ताटे वाढून देत असत. तर मेहेतर (भंगी) यालाही भरगच्च पान वाढून त्यावर दक्षिणा ठेवून आमचे वडील स्वत: उभे राहून हात जोडून, त्याच्याशी दोन शब्द बोलून त्याला पान देत असत. तो अगदी संकोचून म्हणायचा, ``अवो, तुमी बामणदेवता. मस नमस्कार करताव'' तर वडील म्हणायचे, ``अरे बाबा, तुझे ऋण कधी फिटणार नाही. आई जे लहानपणी करायची ते तू माझ्या मोठेपणी करतोस.'' हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. आमच्या आईची ही एक आठवण. (मागे तुम्ही `ऐसी कळवळयाची जाती' असा लेख लिहिला होता - तीच तऱ्हा) आमची आई स्वत: शिळी पोळी (म्हणजे आदल्या दिवशीचीच) घ्यायची आणि भिकाऱ्याला ताजी वाढायची आणि म्हणायची `शिळी खाऊन त्याचे पोट दुखले तर त्याला औषध कोण देईल?' `दया धर्म का मूल है ।', `पुण्य परउपकार' ही तत्त्वे त्यांनी आचरून शिकवली. वडीलांचा आणखी नियम म्हणजे स्वदेशीच वापरणे. सूत काढणे, खादी वापरणे इ. साखर विलायती असल्यामुळे कित्येक वर्षे आमच्या घरात साखर नव्हती. अशा तऱ्हेने देशभक्ती त्यांनी आम्हाला शिकवली.
`पानिपत संग्राम - हार से जीती बाजी' हे तुंबळ लढाईचे वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात. मराठ्यांची विजिगीषा अवर्णनीय आहे. धर्मापेक्षा देशाला मानणारे  आणि त्याउलट धर्मासाठी देशाला उध्वस्त करणारे! कुरुक्षेत्र, पानिपत हे दोन्ही भूप्रदेश जवळजवळच आहेत आणि ही भूमी रक्ताला चटावलेली आहे. एक कविता पुसटशी आठवते -
कौरव पांडव संगर तांडव द्वारकाली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत
लढले पानपती ।
पानिपतचे वैशिष्ट्य म्हणजे परकी आक्रमणापासून देश वाचवण्यासाठी मराठे शर्थीने लढले आणि त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी देशाला वाचवले म्हणून हा जयच म्हणायचा. आणखी एक गोष्ट, ब्राह्मण लोक इतके लढवय्येही असतात (पेशवे) आश्चर्य वाटते. पूर्वीही द्रोणाचार्य वगैरे होतेच. (ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्यांनी याचीही जाण ठेवावी.) पेशव्यांचे वंशज पुण्यात आहेत आणि मला आनंद वाटतो की ते माझ्या जावयांचे सख्खे मामा आहेत.
- सुधा आपटे,
`राधाई', कोर्टामागे, नृसिंह मंदिराजवळ,
किल्ला भाग, मिरज ४१६४१०

Comments

  1. Dear all It was known yo me that your Paper is 34 years old A great accomplishment.I had also organised a magazine KURLA SANCHAR was registered between 2002 to 2007 But after shifting fron Kurla to Thane I stopped its publication.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन