Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

28 Jan 2019

नवतेचा सांधा प्राचीनाशी जुळूदे ! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांचा, पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये सत्कार करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृतीत, विविधता असली तरीही तिच्यातील समन्वय आणि सर्वसमावेशकता, संशोधनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ संशोधक, अभ्यासकांनी नेहमीच केलेला आहे. हाच धागा पकडून, प्राचीन मौलिक साहित्याचा  नवतेशी सांधा जुळण्यासाठी, अभ्यासकांची सर्वसमावेशक भूमिकाच आधुनिक काळात महत्वाची ठरणार असल्याचे मत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. या भूमिकेची गरज लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिपादनाचा हा संपादित अंश - महासमन्वय हे सर्वच विद्वत्जनांचे सूत्र असते. प्राचीन संचित लाभलेल्या आपल्या भूमीत अनेक विचारधारा, प्रवाह निर्माण झाले. विद्रोह झाला, चळवळी झाल्या, आक्रोश झाले. या सगळयांना समजून, सामावून घेत संस्कृतीचा प्रवाह पुढे जात राहतो. ही संस्कृती कल्याणकारी करणे, मानवकेंद्री करणे, आणि मानवतेला पोषक अशी मूल्ये अधोरेखित करीत जाणे; त्यांतून संस्कृतीचा विकास घडवणे हे काम आपल्या विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी आणि संशोधक अभ्यास

21 Jan 2019

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज आपण कोण, कुठून आलो याबद्दलची अुत्सुकता प्रत्येकाला असते. लग्नाकार्यात किंवा वाडवडिलांच्या पुण्यकर्मावेळी पुरोहित, आधीच्या दोन तीन पिढ्यांची, पितामह-मातामहांची नावे विचारतात, त्यावेळी प्रत्येक कुटुंबात जराशी पळापळच अुठते. तेवढ्यापुरती कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती ती माहिती पुरविते परंतु नंतर मात्र आपली आपल्यालाच खंत वाटू लागते, `काय हे? आपल्या आधीच्या अेकदोन पिढ्यांतले नावही आपण सांगू शकत नाही!! पूर्वजांची कीर्ती कसली सांगावी?....' मग शोधाशोेध सुरू होते. आपले मूळ कुठले, मूळ स्थान कुठले, स्थलांतर कसे झाले, कशासाठी झाले,  आपण कुठून आिथे येअून पडलो... वगैरे. कुलदैवत खुणावू लागते, तिथे अेकदा जाअून यायला हवे असे वाटू लागते. धर्मक्षेत्री कुलोपाध्यायाकडे विचारले जाते, तिथल्या नोंदी पाहून कुलवृत्तांत घरी येतो, आपल्या आधीची नावे पाहून शेवटी अेकदाचे आपले नाव तिथे नोंदल्याचे समजले की तेच कुलावृत्तांताचे पुस्तक - बाड आपल्याला फारच पवित्र वाटू लागते. ब्राह्मण समाज लिहिता वाचता असला तरी, -`पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन...' अशाच वृत्तीचा असतो. त्यामुळे अशी वंश

14 Jan 2019

जन्मशताब्दीच्या निमित्ताने आठवणी बाबूजींच्या आयुष्यात काही भाग्ययोग जुळून येतात, मी भाग्यवान खरंच, पुणे आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना पंडित भीमसेन, जितेंद्र अभिषेकी, गजाननराव वाटवे, मणिक वर्मा, मालती पांडे, ज्योत्स्ना भोळे अशा नामवंतांच्या मुलाखती, निर्मितीची संधी मिळाली. परंतु सुवर्णसंधी म्हणावी अशी घटना म्हणजे बाबूजी सुधीर फडके यांच्या कार्यक्रमाची निर्मिती आणि त्या निमित्ताने त्यांच्या मयूरपंखी सहवासाची. २००२सालच्या फेब्रुवारी महिन्यात आकाशवाणीच्या सभागृहात हा योग जुळून आला. बाबूजी १५ मिनिटे आठवणी सांगणार होते. प्रत्यक्ष त्यांनी ९० मिनिटे आठवणींना उजाळा दिला माझे वडील पुण्यातील `ललकार' ध्वनिक्षेपण संस्थेचे नानासाहेब आपटे. बाबूजींशी त्यांचा स्नेह माझ्या जन्मापासून (साधारणपणे १९४२ नंतरचा). सदाशिव पेठेतील आमच्या घरासमोर गजाननराव वाटवे राहत असत, बाबूजी त्यांच्या घरी येत. त्यांच्यामुळे बाबूजी व नानांची मैत्री झाली, तिघांचे सूर जमले. ध्वनिमुद्रिकांची लायब्ररी हा अभिनव उपक्रम नानांनी `ललकार' नावाने सुरू केला. उद्घाटनाच्या दिवशी गजानन वाटवे, बबनराव नावडीकर, कुमु

7 Jan 2019

शून्य कचरा  कचऱ्याने आता `भेदिले सूर्यमंडळा' अशी स्थिती आली आहे. स्वच्छतेसाठी मोहिमा काढल्या तरी त्यांचा फार अुपयोग झाल्याचे जाणवत नाही. या प्रश्नाच्या मुळाशी जायचे तर कचरा निर्माणच होअू नये यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. असा प्रयत्न करणाऱ्या अेका प्रयोगशील गृहस्थाने `शून्य कचऱ्या'च्या दिशेने केलेला विचार, आणि त्याचे स्वत:चे प्रयत्न यांचे संकलन असलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. ती फार अुपयोगी आहे; तरी त्यात आपापल्या परीने काही नवे शेाधही लावता येतील. आपल्या विचारांना अेक दिशा मिळण्यासाठी या पुस्तिकेचा प्रसार व्हायला हवा. या पुस्तिकेची किंमत `आपल्याला योग्य वाटेल ती' अशी छापलेली आहे तरीही तिच्या १३ मराठीतील, आणि हिंदी गुजराती आिंग्रजीही आवृत्या निघालेल्या आहेत, यावरून बऱ्याच लोकांनी हे अुपाय समजून घेतले आहेत. त्या अुपायंाचे सहज सोपे आचरण सुरू झाले तर हा महान प्रश्न बराचसा सुटेल. त्यातील अेका प्रकरणाचा संक्षेप येथे दिला आहे - शून्य कचरा - अंतिम स्वच्छता - म्हणजेच वापरलेल्या वस्तूंचे किंवा नकोशा वस्तूंचे योग्य व्यवस्थापन. हे पुस्तक वाचून जे कोणी त्याप्रमाणे वागू लागती