Skip to main content

28 Jan 2019

नवतेचा सांधा प्राचीनाशी जुळूदे!
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांचा, पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये सत्कार करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृतीत, विविधता असली तरीही तिच्यातील समन्वय आणि सर्वसमावेशकता, संशोधनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ संशोधक, अभ्यासकांनी नेहमीच केलेला आहे. हाच धागा पकडून, प्राचीन मौलिक साहित्याचा  नवतेशी सांधा जुळण्यासाठी, अभ्यासकांची सर्वसमावेशक भूमिकाच आधुनिक काळात महत्वाची ठरणार असल्याचे मत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. या भूमिकेची गरज लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिपादनाचा हा संपादित अंश -
महासमन्वय हे सर्वच विद्वत्जनांचे सूत्र असते. प्राचीन संचित लाभलेल्या आपल्या भूमीत अनेक विचारधारा, प्रवाह निर्माण झाले. विद्रोह झाला, चळवळी झाल्या, आक्रोश झाले. या सगळयांना समजून, सामावून घेत संस्कृतीचा प्रवाह पुढे जात राहतो. ही संस्कृती कल्याणकारी करणे, मानवकेंद्री करणे, आणि मानवतेला पोषक अशी मूल्ये अधोरेखित करीत जाणे; त्यांतून संस्कृतीचा विकास घडवणे हे काम आपल्या विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी आणि संशोधक अभ्यासकांनी नेहमीच केलेले आहे.
परंपरा आणि नवता यांचा संघर्ष नेहमीच होत आलेला आहे. काळानुरूप जुन्या गोष्टी मागे टाकाव्याच लागतात. संस्कृती जशी टिकाऊ असते तशी ती अनेकदा टाकाऊसुद्धा असते. काळाच्या संदर्भात जे निरुपयोगी आहे ते टाकून द्यावेच लागते, आणि काळाच्या संदर्भात जे टाकाऊ आहे त्याच्याशी नाळ जोडत पुढे जावे लागते. हा दुवा सांधण्याचे काम समाजातील जाणती, ज्ञानी, अनुभवी माणसे वेळोवेळी करीत असतात.
आपल्या संस्कृतीत विद्रोहालासुद्धा एक परंपरा आहे. गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी जे केले त्याची जातकुळी विद्रोहापेक्षा वेगळी कुठे होती? जुन्या परंपरांतील टाकाऊ गोष्टींना नाकारत नव्या विचारांशी सांधा जोडून, ही सारी माणसे वेगळयाच एका पातळीवरचा विद्रोह करीत होती. त्यांचा विद्रोहासाठी विद्रोह कधीच नव्हता; विद्रोहातून काय साधायचे हे त्यांच्यापुढे स्पष्ट होते.
अगदी चार्वाकापासून ते १९व्या शतकापर्यंत ही विद्रोहाची परंपरा दिसते. भक्तीचळवळ हा तर त्यातील सर्वांत मोठा विद्रोह होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी खूप मोठा विद्रोह केला होता. पूर्वीची ज्ञानव्यवस्था बदलून ज्ञानाच्या नवतेचे रूप सर्वांपर्यंत घेऊन जायचे होेते. सर्वांना सामावून घेऊ शकेल अशी आवश्यक नवी भाषा, त्यासाठी पूरक असे नवे साहित्य अशी प्रचंड निर्मिती त्यांनी केली. हे सारे त्यांनी, -रूढार्थाने विद्रोहाचा उच्चार न करता केले. एवढी मोठी परंपरा आपल्यामागे असली तरी आजच्या काळामध्ये या सगळयाचा विचार आपण नक्की कसा करणार आहोत, हा मोठा प्रश्न आहे!
महाराष्ट्नला आपण सारेजण `पुरोगामी महाराष्ट्न्' म्हणतो. इथे पुरोगामी विचारवंत पुष्कळ झाले; परंतु हे पुरोगामीत्व पचवून, महाराष्ट्न् पुढे आला आहे असे मात्र दुर्दैवाने दिसत नाही. तसे असते तर, आज ज्या टोकाच्या जातीय, वर्गीय अहंता उघडपणे दिसत आहेत त्या दिसल्याच नसत्या. आपापले तळ आणि आपापले झेंडे उभारून, लोक एकमेकांशी संवाद साधायलासुद्धा तयार नसतात! उलटपक्षी आपल्याच भूमिकांबाबत टोकाचे आग्रही राहून कडवेपणाने प्रतिकार करायला कायम सिद्ध असतात, त्यावरून आजच्या महाराष्ट्नला `पुरोगामी महाराष्ट्न्' कोणत्या आधारावर म्हणायचे? मोठमोठ्या माणसांचा आपण वारसा सांगतो, त्या माणसांनी नक्की काय केले हे लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. एकेक माणूस अक्षरश: डोंगराएवढे काम आपल्या हयातीत करून जातो; आणि ते काम विसरून आपण फक्त चालत राहतो. हे चांगले लक्षण आहे का?
ही मोठी माणसे किती मोठे काम उभे करतात? राहुल सांकृत्यायन यांचे एकच उदाहरण पुरेसे ठरावे. हे ज्ञानी व्यक्तिमत्व लेखनाच्या प्रेरणेने अक्षरश: झपाटलेले होते. असे झपाटून गेल्याशिवाय मोठी कामे हातून होत नाहीत. राहुल सांकृत्यायन हे त्या अर्थाने चमत्कार वाटतात.
१८९३मध्ये आझमगडमधल्या एका छोट्याशा घरात सांकृत्यायन यांचा जन्म झाला. त्यांना आयुष्य लाभले ७३ वर्षांचे. प्रचंड कामातून त्यांनी अवघ्या जगण्याचे सोने केले. ज्ञानसंपादनाच्या ओढीने वयाच्या नवव्या वर्षापासून घरातून दोन-तीनदा ते पळून गेले होते; मात्र १७व्या वर्षी त्यांनी घर सोडले ते पुन्हा परत न येण्यासाठीच. त्यांच्या रक्तातच भटकंती, भ्रमंती होती. ते कधी एका जागी स्थिर थांबायचेच नाहीत. चालत चालत ते बनारस, हरिद्वारला गेले. प्रवासात जे जे मिळत गेले ते ते अखंड वाचत गेले. लिहीत गेले. त्यांनी असंख्य विषयांवर कुणीही थक्क व्हावे असे लेखन केले. त्यांच्या विषयांचा आवाका अफाट होता. इस्लाम, िख्र्चाश्न, हिंदू अशा तिन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी `दर्शन तत्त्वज्ञान' या पुस्तकातून एक वेगळा दृष्टिकोण जगासमोर आणला. तब्बल ७२ ललितेतर पुस्तके लिहिली, ५५ पुस्तके ही कथा, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने या स्वरूपात लिहिली. ऐन तारुण्यामध्ये नवे जाणून घेण्याच्या ओढीने ते तीन वेळा तिबेटमध्ये जाऊन आले. या भेटीत नुसत्या रिकाम्या हाती न परतता तब्बल १६००हून अधिक हस्तलिखित बाडे खेचरांवर लादून त्यांनी भारतात आणली. अनेक उत्तमोत्तम अशी १३०हून अधिक चित्रेही सोबत आणली. हे सारे सांस्कृतिक संचित त्यांनी पुढे पाटण्याच्या संग्रहालयाला भेट दिले. आयुष्यभर ज्ञानाच्या शोधात असणारे हे ज्ञानी व्यक्तिमत्व विलक्षण होते.
अशा या असाधारण प्रतिभावंताच्या आयुष्याची अखेर स्मृतिभ्रंशाने झाली. ७३व्या वर्षाच्या आयुष्यात त्यांनी विविध विषयांचा शब्दश: डोंगर उचलला. लोकसाहित्य, पुरातत्व, मार्क्सवाद अशा नानाविध विषयांवर लेखन केले. मध्य आशियाचा इतिहास लेखनातून उलगडला. असे सांकृत्यायन हे एक उदाहरण झाले. अशी कितीतरी संशोधक, लेखक माणसे आपल्याकडे होऊन गेली. त्यांचे आपण पुढे काय केले, हा खरा कळीचा प्रश्न आहे.
आज संशोधनाच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या अभ्यासकांपुढे ही सारी आव्हाने आहेत. हे मोठे काम आपण पुढे कसे घेऊन जाणार याचा विचार आता होणे गरजेचे आहे. संशोधन संस्थांमध्ये नव्याने जोडल्या जाणाऱ्या उत्साही तरुणांसाठी अशा स्वरूपाची अनंत आव्हाने आणि नव्या संधी उभ्या आहेत. संशोधनक्षेत्रातील सृजनशीलतेची गजबज हेच सांस्कृतिक समृद्धीचे लक्षण आहे. नाना प्रकारची संशोधन क्षेत्रातील कामे तरुण मुले उत्साहाने करताहेत हे चित्रच विलक्षण आशादायी आहे. त्यामुळे नव्या उपक्रमांचे स्वागत, त्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार, तरुणाईला सामावून घेणे आणि या सर्वांसाठी एक भक्कम आर्थिक पाठबळ हे भांडारकर संस्थेने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे.
आपल्याकडील संशोधन संस्थांना वारसा तर खूप मोठा आहेच. परंतु, तो पुढे घेऊन जाण्यासाठी नव्या जगातील, नव्या विषयांना,नव्या ज्ञानाला आपण जोडले जाणार आहोत की नाही हा मोठा प्रश्न आहे. फक्त संस्कृत भाषा, प्राच्य विद्या यांपुरते मर्यादित न राहता एखाद्या महनीय विचारवंताच्या ज्ञानाचा आपण मोकळेपणाने स्वीकार करतो, तेव्हा तो नियमाला अपवाद असू नये, अनेकानेक विषय संशोधनसंस्थांतून अभ्यासले जावेत. जुन्या परंपरांच्या संदर्भात त्यांचा विचार व्हावा आणि नव्या ज्ञानाच्या प्रकाशात त्यांना पुढे नेता यायला हवे. नव्या तंत्रज्ञानाचा हात धरून त्यासाठी पुढे जायला हवे.
नवतेचा सांधा प्राचीनतेशी जुळणे फार महत्वाचे आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा ते त्या काळापुरते नसते. आजच्या काळाशी त्याची सांगड नीट घालता येणे गरजेचे आहे. शब्द या केवळ खुंट्या असतात. मात्र खरा आशय त्या पलीकडचा असतो. अर्थाचे तळे खूप खोल असते. त्याचे अवगाहन आपल्याला किती होते त्यावर साहित्याची खोली अवलंबून असते. त्यामुळे प्राचीनता आणि नवता यांचा सुरेख मिलाफ साहित्यात घडून आला तर साहित्यव्यवहाराचे भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल असेल यात शंका नाही!


 संपादकीय
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी असलेले राज्य असे लिंकन म्हणून गेला, त्यात सुधारणा करताना आंबेडकर म्हणाले की, लोकांनी आणि लोकांचे  -याहीपेक्षा ते राज्य लोकांसाठी असणे फार महत्वाचे आहे. आजकालची सरकारे कोणत्याही पक्षाची असली तरी ती  लोकांसाठी कसे वागतात हा विचार निराशा करणाराच ठरतो. कारण ती राज्ये केवळ (राजकारणी) लोकांची व त्याच लोकांनी चालविली आहेत. हेल्मेटची सक्ती, किंवा प्राण्यांच्या हत्या, किंवा स्थानिकांना नोकऱ्या देण्याची सक्ती, किंवा शिकवणीवाल्यांसाठी कठोर नियम.... अशी कितीतरी अुदाहरणे देता येतील. यात तर्कदुष्टता आितकी, की त्याबद्दल कुणाला जाब विचारायचे हेही जागरूक नागरिकांना कळेनासे होेते.

आिथे रस्त्यांची स्थिती अशी की, वाहने दहापेक्षा जास्त वेगाने नेता येत नाहीत. पण लोेकांच्या डोक्यांची काळजी सरकार वाहणार असल्याचे सांगायचे. शहरांत वावरतांना गर्दी, फेरीवाले यांना नियम नाहीत, त्यामुळे वाहन पाश्चात्य वेगाने चालणेच शक्य नाही. -पण हेल्मेटसाठी आदर्श मात्र तिथला. सिग्नल बंद पडल्याचे कित्येक चौकांतून दिसेल, ते चालते ठेवण्याची सक्ती नाही. सिग्नल बंद, म्हणून तिथले पोलीस कोपऱ्यांत चकाट्या पिटत अुभे. त्यांनी तितका वेळ पूर्वीप्रमाणे हाताने रहदारीचे नियंत्रण करण्याची सक्ती नाही, पण गोंधळया वाहनांस अपघात झाला तर शिर सलामत राहण्यासाठी हेल्मेट सक्तीचे. चौकातल्या पोलीस पोरी  तर सतत मोबाआीलवरच असतात. त्यांना सी सी टी क्रॅमेऱ्यांची नजर लागत नाही का? रस्त्यांत डोके फुटू नये याची काळजी सरकारला असेल तर फुटपाथ चांगले करण्याची सक्ती त्याच्यावर नाही काय?

पिकांवर हुमणी, टोळ व अन्य किडी आल्या तर विषे फवारण्याचे सल्ले शेतकऱ्यांना देतात; पण माकडांची, मोरांची, हरणांची, कोल्ह्यांची धाड पिकांवर आली तर त्यांना मारायचे नाही. संडास बांधण्याची सक्ती, घर बांधण्याला प्रोत्साहन, परंतु नदीतली वाळू अुपसायला बंदी. -मग बांधकामे करायची कशी? पर्यावरणवाल्यांनाही काम मिळावे, आणि बांधकाम क्षेत्रालाही काम मिळावे असा कदाचित लोक कल्याणकारी हेतू असेल.  प्रदूषण नियंत्रण मंडळ हे चराअू कुुरण जोपासायचे, तिथे तर संगणकाचा अुद्योग करणाऱ्यांसही, मी प्रदूषण करणार नाही म्हणून दाखला घेण्याची अुद्योग खात्याची रीत होती. स्वाआीन फ्ल्यू रोखण्यासाठी पोराटोरांनी लसी टोचून घेण्याची सक्ती. मग आितरांनी नाकाला फडकी बांधण्यासाठी ती दहा रुपये देअून विकत घ्यायची असतात. दुकानांतली निळी फडकी संपली की मग साधा रुमाल बांधला तरी चालतोे, असा त्यावर खुलासा आरोग्य खाते करते.
हेल्मेट सक्तीला विरोध हे तर खास पुणेरी अस्त्र आहे. देशभरात हेल्मेट सक्तीचा कायदा आहे. कर्नाटक वा दिल्लीत तो लागू आहे, बराचसा पाळलाही जातो. परंतु आतापर्यंत पुणे शहरांतील जागरुकांना त्या विरोधात ब्र काढण्यास सवड नव्हती. केवळ त्यांच्याच शहरात सक्ती होणार म्हटल्यावर त्यांचा कायदा, स्वाभिमान, अस्मिता सगळयाला खडबडून जाग आली. अेके काळी साऱ्या देशाला स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून देणारी केसरी गर्जना, आता आपल्याला त्रासाची ठरेपर्यंत कोंडलेली होती हा स्वराज्य-कालगतीचा दुष्परिणाम म्हणावा काय? निदान असल्या कायद्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेआीन असे अुद्याच्या निवडणुकीतील अुमेदवारांकडून लिहून घ्यायला हवे. आपल्या सोसायटीला त्यांच्याकडून कुंपण बांधून मागण्यापेक्षा ती जागरूकता साऱ्या देशाला अुपयोगाची ठरेल.

पण लोकांसाठी अशी लोकशाही यायची तर ती कोणी मागून देणार नाही. जिथे हे कायदे होतात तिथेच ते लोकशाही प्रणालीच्या संवाद समन्वयातून व्हायला हवेत. अेका समस्येचे अुत्तर म्हणजे पुढच्या समस्येची सुरुवात, असे होत असेल तर समग्र समाजाचा विचार आपण लोकशाही म्हणून कसा करणार आहोत? राज्य कुणाचे आणि कुणी चालविलेले यापेक्षा ते लोकांसाठीच चालले पाहिजे ही मूलभूत गरज असते.

मना सज्जना
स्वयं-प्रेरणा
स्टीफन हॉकिंग्ज एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. वैज्ञानिक क्षेत्रात त्यांचा गौरव `चमत्कार' म्हणून केला जातो. त्यांचे निधन नुकतेच झाले. वाचकांपैकी बहुतेकांना माहीत असेल की स्टीफन हॉकिंग्ज यांना वयाच्या २१व्या वर्षी मेंदूचा एक दुर्धर आजार झाला होता. त्यांच्या शरीराचे जवळजवळ सर्व भाग निकामी झाले. केवळ बोटाच्या आणि ओठांच्या काही हालचाली करता येतील, एवढ्या मर्यादा आल्या. या आजारामुळे त्यांचे आयुष्य यापुढे २ वर्षे असेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण सर्व शक्यतांना बाजूला सारत हॉकिंग्ज त्यानंतर ५५वर्षे -म्हणजेच ७६वर्षे जगले! केवळ ७६ वर्षे जगलेच नाहीत, तर जगातील आणि अंतराळातील अनेक समस्यांची, कुतुहलांची उकल त्यांनी केली, अनेक पुस्तकांचे लिखाण केले. आश्चर्याची बाब अशी, हे सर्व संशोधन करत असताना हॉकिंग्ज ५५वर्षे चाकाच्या खुर्ची (व्हीलचेअर)वर बसून होते. त्यांना लिखाण करण्यासाठी केवळ बोटांच्या मर्यादित हालचाली होत्या. बोलण्यासाठीसुद्धा त्यांना संगणकाची मदत घ्यावी लागे.
महत्वाचा मुद्दा असा, इतक्या शारीरिक मर्यादा असताना हॉकिंग्ज यांनी इतके मोठे काम केलं कसं? कोणत्या गोष्टीमुळे त्यांनी डॉक्टरांच्या भाकितांना खोटं ठरवलं? याचं उत्तर आहे स्वयं-प्रेरणा! केवळ स्वयं-प्रेरणेमुळेच ती असाध्य गोष्ट ते साध्य करू शकले.
प्रेरणा म्हणजेच मोटीव्हेशन, म्हणजे काय? प्रेरणा ही अशी गोष्ट आहे जी असाध्य गोष्टी साध्य करते. प्रेरणा म्हणजे अशी शक्ती, जी ध्येय, लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरित करते. आयुष्य अजून सुकर करते.
कोणत्याही प्राण्याला अथवा मनुष्याला प्रेरणा दोन प्रकारे असते. एक स्वयं-प्रेरणा आणि दुसरी बाह्यप्रेरणा. स्वयंप्रेरणेला जमेल तितकं जागृत करण्याचं किंवा जिवंत ठेवण्याचं मर्यादित काम बाह्यप्रेरणा करते. आपल्या मुलाला चांगले गुण मिळावेत असं प्रत्येक आईला वाटतं. मुलगा स्वत:हून अभ्यास करत असेल तर ठीक; नाहीतर त्याला ओरडण्यापासून मारण्यापर्यंत येनकेन प्रकारेण त्याला अभ्यासाला बसवलं जातं. आपल्या मुलाला चांगले गुण मिळावेत म्हणून त्याला अभ्यासाला बसवलं जातं. आईने त्याला अभ्यासाला बसवणं ही झाली आईची स्वयं-इच्छा म्हणजेच स्वयं-प्रेरणा. -आणि आईच्या ओरडण्यामुळे मुलगा जर अभ्यासाला बसतो; तर ती झाली मुलाची बाह्यप्रेरणा. मुलाला अभ्यासाला बसण्याची स्वयं-प्रेरणा निर्माण करण्याचे काम, आईच्या ओरड्याच्या बाह्यप्रेरणेने केलं. परंतु या ओरडण्या वा मारण्याचा उपयोग किती जणांवर यशस्वी होतो? फारच थोड्या.
बाह्य प्रेरणेचा अतीवापर झाला तर कदाचित त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. सुरुवातीला तो मुलगा घाबरून अभ्यास करेलही. पण त्या अभ्यासात सातत्य राहणार नाही. कारण मुलाला जोपर्यंत स्वत:हून अभ्यास करावा, किंवा चांगले गुण मिळावेत असं वाटत नाही, तोपर्यंत त्याचा अभ्यास गुणवत्तापूर्ण होत नाही. सामान्य भाषेत आपण असं म्हणू शकतो की मुलगा बाह्यप्रेरणेने पाट्या टाकण्याचंच काम करतो.
स्वत:हून अभ्यास करावा असं वाटणं, म्हणजेच स्वप्रेरित होणं, स्वयं-प्रेरणा मिळवणं. माणूस एखाादं काम करण्यासाठी स्वयं-प्रेरित झाला की त्याच्या कामाची गुणवत्ता वाढतेच, शिवाय त्याला पुन्हा पुन्हा बाह्य प्रेरणेची गरज पडत नाही. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासात, भावनिक बुद्ध्यांक विकासात स्वयं-प्रेरणेचं अनन्य महत्व आहे.
-अजिंक्य नि.गोडसे, इचलकरंजी    फोन- ९६३७७४१८६५

संवाद
गेल्या महिन्यात अेक निवेदन दिले होते, आणि या अंकाच्या धोरणात -विशेषत: प्रकाशन-कालावधीत काही बदल करावा काय, याबद्दल जाणकार वाचकांची मते विचारली होती. आजकाल अशा अुत्स्फूर्त प्रतिक्रिया देण्याविषयीच्या आवाहनास फारसा प्रतिसाद मिळत नाही असा अेक प्रवाद आहे, म्हणून आपल्या या अंकासाठी तरी तो किती मिळेल अशी शंका होती. पण ती खोटी ठरली हे फार आनंदाचे आहे. आितक्या संख्येने वाचक या अंकाविषयी जिव्हाळा दर्शवितात हे भाग्याचेच आहे.
त्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे नव्या परिस्थितीच्या काही मर्यादा आहेत, त्या लक्षात घेअून बहुतांश मान्यवरांनी प्रकाशनांतील अंतर वाढविण्यास अनुकूलता दाखविली आहे. अेका निकटच्या टीकाकाराने गंमतीने असेही म्हणून झाले की, `याचा अर्थ तुमची ही पीडा दर आठवड्याला मागे नको; म्हणून ती लांबवा असाही होतो...' -यातला टारगटपणा सोडून देअून, जाणकार वाचकांच्या मतांकडे गांभिर्याने पाहायचे  आहे.
अशेाक आफळे -हैदराबाद  यांनी गेल्या अनेक वर्षांतील नियतकालिकांच्या वाचनाचा त्यांचा अनुभव नमूद करून अशी चांगली नियतकालिके ढेपाळली, याचा अूहापोह केला आहे. तसाच तो देवगडच्या भा वा आठवले यांनीही केला आहे. ते तर त्या त्या नियतकालिकांत लिहीत असत. -तरीही कालानुसार बदलावे लागते हे स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आणि `...अशा साऱ्या नियतकालिकांनी अखेरचा श्वास घेतला आहे, आपले जग त्या वाटेने जाणार का, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे...' असेही म्हटले आहे. मिरजेच्या दासबोध अभ्यास मंडळाचे शाम साखरे यांनी म्हटले की, मी प्रारंभापासून आपले जग चा वाचक आहे, मूळ अुद्देशाला तत्वाला कुठे तडजोड न करता प्राप्त परिस्थितीचा विचार करावाच लागेल. हा अंक कधीही आला पोचला तरी त्याची अुत्सुकतेने वाट पाहिली जाआीलच.
`कराल ते मान्यच असेल, कारण आपले हेतू आणि प्रयत्न यांची जाणीव आहे' -या आशयाच्या, किंवा शब्दश: तसे  न म्हणताही अनुकूलता दाखविणाऱ्या प्रतिक्रिया बऱ्याच आहेत. शरद अभ्यंकर -वाआी, गजानन वामनाचार्य -घाटकोपर, अ ज भातखंडे -कांदिवली, विजय वा आपटे -मुंबआी १, र पां फडके -कर्वेनगर पुणे, मधुकर घारपुरे -सावंतवाडी, रवींद्र आपटे -मुुकंुदनगर पुणे, बी व्ही काळे -सावंतपूर वसाहत, प्रभा केळकर -पणजी गोवा, सी आर मराठे पलूस, भोरचे अेस के वाकणकर, वामन कृ कुलकर्णी -मिरज अशा कितींचा अुल्लेख केला पाहिजे? जरगनगर -कोल्हापूरचे अेन अे कुलकर्णी म्हणतात की, `याही बाबतीत वाचकांची मते विचारून दखल घेतलीत यातच सारे आले, कारण सध्या  आितर माध्यमांनी वाचक - प्रेक्षकांना कोपऱ्यांत फेकले आहे.
तालुक्याच्या गावातील अेका अुच्चशिक्षित प्राचार्याने फोनवरून आपले नाव  न  सांगता आधी या अेका अंकाचा अुत्पादनखर्च विचारून घेतला. आणि नंतर म्हटले की, `असे बाराजण सहज मिळतील, जे अेका महिन्याचा खर्च अेक रकमी देतील. मी त्यातला पहिला असेन, आणि माझ्याकडून आणखी अेकजण मिळवून देआीन. तुम्ही आवाहन करा, बघा तरी गंमत!!' -त्यांना नाव विचारल्यावर त्यांनी `आहे अेक वेडा माणूस' असे म्हटले, नंतर त्यांनी आपले नावही सांगितले, पण प्रसिद्ध करू नका असे म्हटले.
काही ठराविक वर्गणी ठेवा, असे काहींनी आवर्जून म्हटले आहे; त्यांत `अंतर्नाद'चे अनुभवी संपादक पुण्याचे भानू काळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासाठी वरील प्राचार्यांचे म्हणणे लक्षात घेण्यासारखे आहे. या अंकाची भूमिका अशीच आहे की, `ठराविक' म्हणजे किती हे ज्याने त्याने आपापले ठरविण्यास काहीच हरकत नाही. तसे मूल्यांकन करण्याचा वाचकांना तर अधिकारच आहे. आपल्याला जे काही वाचकांस द्यायचे आहे, ते आपण ठरवू त्या किंमतीस त्यांनी विकत घ्यावे असे काही नाही. त्याला ते हवे आहे तर आपण ते - आपल्याला शक्य असेल तिथंवर  द्यायला हवे. यात व्यवसाय आणि सेवाभाव यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न आहे. निव्वळ व्यवसाय म्हटला तर आितरांप्रमाणे `मार्केटिंग' आले; आणि केवळ सेवाभाव म्हटले तर आपला तुकाराम व्हायचा! म्हणून हा निर्णय जाणकारांवर सोपवून आपण अंक प्रकाशित करून तो लोकांपर्यंत पाठविण्याचे काम करत राहणे सोयीचे वाटते. चांगला खेळ दाखविला तर रस्त्यातल्या कसरतवाल्याच्या  थाळीतही लोक पैसे टाकतात. आपण शुद्ध होअून दुपारच्या पोटपूजेपुरती  माधुकरी मागावी, त्यास नकार मिळत नाही; त्यास `चतकोर की अर्धी' हे मोजमाप कशाला? कुणी झोळीच भरली  तर आपल्या गुरुकुलासाठी  त्याचाही अुपयोग होतो. असा हा सारा कारभार ठरतो. अर्थात हीच पद्धत बरोब्बर, असा काहीही दावा नाही. आपल्यापुरते आपण असे ठरवूया आितकेच!
यात अेक सणसणीत मत आले, ते शरद भोंडे -कोरेगाव(सातारा) यांचे. ते शासकीय पदावरून निवृत्त झाल्यावर गेली काही वर्षे अेक नियतकालिक चालवितात. ते म्हणाले की, `आता अुगीच कुणाला विचारत बसू नका; हजार मुखांनी हजार सल्ले मिळतील. तुमचे म्हणणे अचूक आहे. आपल्या मर्यादा, बाहेरची परिस्थिती, प्रकृतीमान, मनोभूमिका हे सारं पाहायलाच हवं. आपण टिकलो तर जग टिकलं! तुमचं म्हणणं रास्तच आहे, पुढच्याच अंकात तसं जाहीर करा आणि शंकाबिंका  न  काढता पुढच्या कामाला लागा..!'
तूर्त हे सल्ले आणि जिव्हाळयाच्या सूचना वाचून अैकून अेका लाटेवर तरंगण्याचा अनुभव आपले जग घेत आहे, आणि चाळीस वर्षपूर्तीच्या निमित्ताने विशेषांक काढल्यानंतर  आितर सारी पूर्तता करण्याचे ठरवीत आहे. हा अंक नव्या ठिकाणहून -म्हणजे विलिंग्डन कॉलेज(सांगली) पेास्टातून रवाना होत आहे, अेवढा बदल झाला. वाचकांची  आितकी आपुलकीच दिसल्यावर आभार तरी कुणाचे कसे मानायचे?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन