Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015

August 2015 Editions

पालकांनी सर्जनशील व्हावे मुलांच्या अभ्यासाकरिता प्रयत्न जारी ठेवले, त्या प्रामाणिक भावनेला सर्वतोपरी सहकार्य मिळाले, तो माझा अनुभव.... नवनिर्मिती सहज होत नाही, त्यासाठी चिकाटी आणि परिश्रमही लागतात.  ते असतील तर शासकीय यंत्रणेतील भली माणसे पुढे येतात आणि पाठीशी कोणीतरी समर्थ उभा राहतो. त्या अनुभवाची कथा. १९७८सालची गोष्ट. माझा मुलगा पाचवीत होता. त्याच्या भूगोल विषयाच्या अभ्यासाला भारतातील घटकराज्ये, राजधान्या, लोहमार्ग, राजमार्ग, प्रमुख शहरे इत्यादी अनंत प्रकारची माहिती होती. हे सर्व पाठ करून लक्षात ठेवणे तसे पालकांनाही कठीणच होते. परंतु मुलांच्या वयाचा आणि चौकसपणाचा विचार केल्यास ही सर्व माहिती थोड्या रंजक पद्धतीने सांगावी लागेल असे मला वाटले. त्यावरून एक कल्पनाही सुचली. मोठ्या ड्नॅइंर्ग पेपरवर भारताचा नकाशा काढून मी त्यात ही सर्व माहिती दाखवली. राजधानीच्या ठिकाणी मोठा खजिना ठेवलेला असून तो मिळविण्यासाठी काही माणसे (खेळाडू) आपापली आगगाडी लोहमार्गावरून त्या त्या ठिकाणी नेतात अशी कल्पना केली. आगगाडीसाठी एक रंगीत टिकली वापरून हा खेळ मुलामुलांच्यात खेळता येण्यासारखा होता. गटातील मुल