Skip to main content

sampadkiya of 18july2011

हट्टाग्रहात सत्य हवे
महाराष्ट्नत `अंधश्रद्धा' निर्मूलनासाठी भोंदूगिरी-विरुद्ध कायदा करावा यासाठी एकीकडे आंदोलन होत आहे, त्यास पाठिंबा असल्याचे सरकार भासवते. आपल्या पुरोगामित्त्वाचा टेंभा मिरवत राज्याचा मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा बांधून `वेळेवर पाऊस पाड, जनतेला सुखी ठेव' असे साकडे घालतो हीच तर भोंदूगिरी झाली. वास्तविक पाऊस पडत नाही त्या संकटाशी सामना करणारे सरकार गरजेचे आहे. पण `कर्म करोनी म्हणती साधू' असे लोकच सर्वत्र बोकाळले आहेत. त्यामुळे भोंदू अंधश्रद्धेविरुद्ध कायदा कसा होणार, आणि त्याचा कसचा उपयोग होणार, याबाबत सच्च्या पुरोगामींनी तरी विचार करायला हवा.
सत्य श्री साईबाबांचे निधन झाल्यावर त्यांच्या संपत्तीविषयी चमत्कार कथा प्रसृत होत आहेत. हातातून उदी, गुलाल निघणे किंवा बंद मुठीतून घड्याळ-अंगठी येणे असले मंतरखेळ छोट्या बालकांना अचंबित करतात. ज्यांची बालबुद्धीच आहे असे पब्लिक असल्या चमत्कृत अध्यात्मास भुलले. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून सगळया बड्या लोकांसही भुरळ पडल्याचे दिसले त्यात सत्यत्त्व किती आणि साईत्त्व किती असा प्रश्न आहे. नास्तिकांनी साई भक्तांच्या झालेल्या फसवणुकीवर टीका केलीच पण एकाने तर त्या बाबांवर खटला भरला. विज्ञान व प्रशासकीय कायद्यांचे काहीही न चालता बाबा मोठे मोठे होत गेले हाच तर्कदुष्ट चमत्कार आहे. काही जादूगार, काही समाजसुधारक, काही वैज्ञानिक अशांनी आव्हाने व विरोध करून त्यांनाच हतबल व्हावे लागले कारण गर्दीचे मानसशास्त्र त्यांना कळले नाही.
त्या गर्दीला अंगारे-अंगठ्या यांचे आकर्षण असते. ते ज्यांना नसते त्या बड्यांना सत्य-धर्म-प्रेम-अहिंसा-शांती-अनुभूती-%डॅद्ग-ढद्धॅम-त्त्ॅद्धेंम-ईर्ीींर्ं%ी-िंींडु-इण्ुदूडु- असल्या शब्दांचे आकर्षण असते. सामान्य पब्लिकला अंगठी-मोती हाती लागत नाहीत; आणि बड्या नेत्यांना आत्मशांतीची अनुभूती लाभत नाही. त्या दोहोंचे आकर्षण मात्र चलनात राहते. असे अनेक बुवा-बाबा सर्वकाळी सर्वस्थळी नांदत असतात. त्यांच्यावर श्रीकृष्ण, ज्ञानदेव, तुकाराम, सावरकर, फुले, दाभोळकर अशा छोट्या मोठ्या कुणाचीही मंत्र-मात्रा चालत नाही.
या प्रकरणातून वेगळा एक मुद्दा लक्षात घेणे आवश्यक वाटते. पुट्टपर्थी नावाच्या कोण्या खेडेगावात मागासवर्गीय सामान्य कुटुंबातील भट्टराजू जमातीच्या या मुलास शालीय शिक्षण नव्हते तरीही भल्याभल्यांच्या मनांवर तो कसे काय गारूड करू शकला? भले दांभिक असेल, पण काही गूढरम्य वाणी त्यांनी कशी, कुठे अवगत केली? या वास्तवातच दैवी चमत्कार मानायला हरकत नाही. शिवाय याच बाबाना शिक्षणाचे महत्त्व वाटत असल्यामुळे शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी बराच आटापिटा केला. रुग्णालये, शिक्षणसंस्था यांची भव्य मालिका उभारली. स्वत:कडे जमणाऱ्या अफाट संपत्तीचा ओघ त्यांनी सामाजिक कामांकडे वळविला. हा कदाचित् लोकानुनय ठरविता येईल, परंतु लोकनियुक्त सार्वभौम सरकारला साठ वर्षात जे करता आले नाही ते या बाबाने  करून दाखविले हे नाकारता येत नाही.
बाबांनी अनंतपूर पाणी योजना राबविली. मेडक व मेहबूबनगर या जिल्ह्यांपर्यंत पाणी नेले. पूर्व आणि पश्चिम गोदावरी पाणी योजना यशस्वी केली. ७३१ गावांची कायम-नियमित पाण्याची सोय केली. महाकाय कृष्णा कालव्याच्या दोन्ही तीरांवर बांधबंदिस्ती केली. बंगलोर, चेन्नई येथे अजस्त्र वैद्यकसंस्था उभारल्या. लोकांच्या अंगावर हात फिरवून आजार बरे करतात हे नाटक असल्याचा प्रवाद आहे. पण ते नाटकच असल्याचे बाबांना मान्य असणार म्हणून तर त्यांनी रुग्णालये उभारली. या माणसाने वयाच्या २८ व्या वर्षी रुग्णालय सुरू केले, हातचलाखी-जादू शिकविणारे कॉलेज तर काढले नाही. त्यांच्या `सुपर स्पेशल' रुग्णालयात हृदयाच्या २४ हजार, मज्जासंस्थेच्या ३० हजार, डोळयांच्या ३८ हजार, अस्थीरोपण १ हजार अशा शल्यक्रिया झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. २५ हजार विद्यार्थीसंख्या आहे. इतके भव्य काम करणाऱ्या मानवास अवतारपद द्यायचे की नाही हाच एक प्रश्न श्रद्धा-अंधश्रद्धेच्या वादात अडकून राहतो. त्यांना स्वत:ला चाळीसाव्या वर्षापासून शारीरिक व्याधी होत्या, हाडे मोडली. त्यांच्या भोंदूगिरीचा किंवा लंपटगिरीचा उल्लेख खरा असेल वा नसेल, पण त्या आक्षेपांवरून टीकेचा भडिमार करण्यातही अंधश्रद्धेचाच भाग जाणवतो.
सरकारकडे जमणाऱ्या पैशातून जी `महान कार्ये' चालतात ती तर आपण पाहतो आहोत. बाबांना आलेल्या पैशावर कर घेणे सरकारला शक्य आहे. त्या ट्न्स्टचा कारभार जे बघतात, त्यात आयएएस लोक आहेत, माजी केंद्रिय दक्षता आयोग असणारे उच्चपदस्थ आहेत. माजी सरन्यायाधीश आहेत. या सर्वांना एकत्र करून लोकोपयोगी कामे करणारी प्रचंड यंत्रणा अफाट आर्थिक शक्तीनिशी उभी राहिली असेल तर पुरोगामी वैज्ञानिकतेला साक्षी ठेवून त्यावर विश्वास ठेवावाच  लागेल.
हा पैसा जमा करण्यास भोंदूगिरीचा मार्ग अनुसरला असेल तर तो एकच मुद्दा टीका-विरोधाचा राहील. सरकार, साखर कारखानदार अथवा तथाकथित कारभारी यांच्याकडे तीच प्रथा असल्याचे प्रच्छन्न दर्शन आज घडते आहे. जकात असो वा टोलनाके, निवडणूक असो वा यात्रा - सर्वत्र भोंदूगिरीतून पैसा काढण्याचे तंत्र वापरले जात आहे. त्याचा वापर करूनच `लोकोपयोगी' कार्य होण्यास मान्यता द्यावी लागत असेल तर सत्यसाइंर्चा खजिना आणि अवतारी कार्य अंधश्रद्ध ठरविणे धाडसाचे ठरेल. म्हणूनच मनांमनांच्या श्रद्धाळू खेळांना पुरोगामी कायद्यांच्या चौकटीत बसविणे सोपे नाही.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन