Skip to main content

24 Feb & 4 March

उद्याच्या प्रशासकांना आव्हाने
अुत्तराखंडमधील मसुरी येथे लालबहादुर शास्त्री राष्ट्नीय प्रशासन अकादमी आहे. तेथे महाराष्ट्नचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका व जबाबदारी, प्रेरणास्रोत, भावी काळातील तंत्रज्ञान व त्याची आव्हाने आित्यादी विषयांवर त्यांनी भाष्य केले.
त्याचा स्वैर अनुवाद जयश्री देसाआी यांनी `लोकराज्य'साठी केला, तो संक्षिप्त रूपात सादर -

आिथं यायला मिळावं, शिकायला मिळावं अशी आिच्छा माझ्या मनात कायमच होती. तुम्हाला कल्पना असेलच की, प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थी, अेक ना अेक दिवस आिथं यायला मिळेल असं स्वप्न पाहात असतो. परंतु तुमच्यासारखे काही विद्यार्थीच आिथे प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. या प्रबोधिनी (अॅक्रॅडमी)च्या संचालक श्रीमती अुपमा चौधरी यांचे मी विशेष आभार मानू आिच्छितो, कारण त्यांनी मला या वेगळयाच निमित्तानं आिथं थेट प्रवेश दिला. वास्तविक मला तरी आिथं बराच काळ व्यतीत करायला आवडलं असतं, आणि आिथल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात राहायलाही आवडलं असतं. कदाचित त्यामुळं मी शारीरिक दृष्ट्याही तंदुरुस्त राहिलो असतो. ही वास्तूच अतिशय भव्य, अतिशय प्रेरणादायी आहे.
आिथं आज माझ्यासमोर बसलेले तुम्ही सारे, या देशाचे अुद्याचे प्रशासक आहात. मला आिथं आल्यावर माझाही आजवरचा प्रवास आठवतो आहे. मी सव्वीसाव्या वर्षी महापौर झालो तेही दिवस आठवतात. प्रशासक म्हणून ती माझी पहिली कारकीर्द होती, जिथे निर्णय घेणे भागच पडत असते. महापौर म्हणून माझे अधिकार तसे मर्यादितच होते; पण तीही जबाबदारी निभावताना मी अेक गोष्ट शिकलो. ती अशी की, तुमचा दृष्टिकोण सकारात्मक असेल तर तुम्ही सगळी परिस्थिती, तुमचे अवकाश बदलू शकता. तुम्हाला जे बदल घडवायचे आहेत ते घडवून आणू शकता.
नंतर मी दोन वेळेस आमदार झालो, पण मंत्रीमंडळात नव्हतो.  अचानक अेक दिवस मी थेट मुख्यमंत्री झालो, आणि साऱ्या राज्याचीच जबाबदारी  माझ्या खांद्यावर येअून पडली. बाहेरून अेखाद्या पदाकडं पाहाणं, आणि त्या पदाची जबाबदारी पेलणं यातला फरक त्या दिवशीच माझ्या लक्षात आला. आिथं प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची जबाबदारी या पदावरच्या व्यक्तीकडंच येते. अेखादी कृती छोट्याशा पंचायतीतील अत्यंत सामान्य सेवकाची असेल, किंवा अेखाद्या अुच्च अधिकाऱ्याची वा आपल्याच सहकाऱ्याची कृती असेल... प्रत्येक गोष्टीसाठी  तुम्हालाच जबाबदार धरलं जातं. या जबाबदारीनं मला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाची चार वर्षं पार पाडल्यानंतर मी आता हे निश्चितपणे सांगू शकतो की,  कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी मी तयार झालेलो आहे. खुलं मन व सकारात्मक दृष्टिकोण यांमुळं कोणत्याही वादळाचा मी  सामना करू शकतो. अनुभवांतून माझ्या हेही लक्षात आलं आहे की, बदल  ही अतिशय धीम्या गतीनं चालू होणारी प्रक्रिया असली तरी, ती अेकदा सुरू झाली की अतिशय वेगानं होते. -सगळा प्रश्ण तुमच्या मनोभूमिकेचा असतो. अेकदा आपली मनोभूमिका बदलायला लागली की आितर बदल आपोआप घडून येतात. आपल्या लोकशाही व्यवस्थेसाठी आितकी सुंदर राज्यघटना आहे की, त्यात लोकशाहीच्या चारही स्तंभांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं अुल्लंघन होअू नये यासाठी संरक्षक बांधही घालून ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या चौकटीत काम करण्यासाठी अमर्याद अधिकार आहेत; पण त्या सीमा कुणी ओलांडायच्या म्हटलं तर  मात्र ते अधिकार अत्यंत मर्यादित आहेत.
तुम्ही आजवरच्या आपल्या वाटचालीकडं पाहिलं तर असं लक्षात येआील की, जेव्हा जेव्हा आम्ही राजकारणी आणि नोकरशहा -म्हणजे सरकारी अधिकारी, यांनी  अेकत्र येअून अेकदिलानं काम केलं  तेव्हा तेव्हा बदल घडून आलेले आहेत. या संदर्भात असं म्हटलं गेलं  -आणि ते खरंही आहे, की तुम्हाला जर पारदर्शी, अुत्तरदायी, कर्तबगार, संवेदनशील आणि अत्युच्च निष्ठेचे शासकीय अधिकारी हवे असतील, तर आधी राजकारण्यांनी  त्या गुणांचं दर्शन घडवत आदर्श प्रस्थापित करायला हवा! जे आपल्याबरोबर आपल्यासाठी काम करतात, त्यांना जर आपण प्रेरित करू शकलो नाही तर आपण त्यांच्याकडून सर्वोत्कृष्ठ कामगिरीची अपेक्षा करू शकत नाही.
आपली कृती, आपले निर्णय, आपले नेतृत्व यांच्या माध्यमांतूनच आपले सहकारी आणि आपले कनिष्ठ यांना आपण प्रेरित करू शकतो. ते कौशल्य आपल्याकडं नसेल, तुम्ही त्यांना प्रेरित करू शकत नसाल, तर मग ते केवळ काहीतरी करायचं म्हणून करत राहतील!! अेक टीम म्हणून ते काम करणार नाहीत. या संदर्भात असं म्हटलं गेलंच आहे की,  हे दोन विश्वासार्ह घटक जर अेकत्र अेकदिलानं काम करायला अुभे ठाकले तर, विरोधक आणि खोटेपणा यांच्या विरोधात ते अभेद्य भिंत बनू शकतील. आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट खोलवर रुजायला हवी.
राजकारण्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, नोकरशहा म्हणजे त्यांचंच तर विस्तारित रूप आहे; राजकारण्यांनी घेतलेल्या निर्णयांची, लोकांमध्ये जाअून तेच अंमलबजावणी करणार आहेत. -नोकरशहांनीही हे समजून घेतलं पाहिजे की, राजकारणी हे, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आज दुर्दैवानं या भूमिकांची पुष्कळदा गल्लत झालेली दिसते. अनेक नोकरशहांना असं वाटायला लागलं आहे की, ते धोरणात्मक निर्णय घेणारेच आहेत; ... आणि राजकारण्यांमधल्या अनेकांचा असा गैरसमज झालेला दिसतो की प्रत्येक शब्दाची अंमलबजावणी करणं ही त्यांचीच जबाबदारी आहे! -मला असं वाटतं की, आपण आपापल्या भूमिका, जबाबदाऱ्या समजून घेअून, अेकत्र येअून काम केलं तर बदल घडेल याची खात्रीच बाळगली पाहिजे.
आज सगळयात मोठी समस्या किंवा सगळयात मोठं आव्हान कोणतं? आपल्यापुढं सगळयात मोठं आव्हान आहे ते  विश्वासार्हतेचं! आज यामुळं संपूर्ण व्यवस्थेपुढं प्रश्नचिन्ह अुभं ठाकलं आहे. मी `संपूर्ण व्यवस्था' असं म्हणतो, तेव्हा प्रेस अथवा  मीडिया यांच्यासह लोकशाहीच्या चारही स्तंभांपुढं मला तो विश्वासार्हतेचा प्रश्ण अुभा ठाकलेला दिसतो. त्याचा मुकाबला आपल्या केवळ कृतीनंच केला जाअू शकतो.
मी अेकदा अेका `स्टार्टअप'च्या अुद्घाटनासाठी  गेलो होतो. तिथे मी अेक यंत्र पाहिलं. अवघ्या काही सेकंदांत ते यंत्र आर्टिफिेशयल आिंटेलिजन्स च्या साहाय्याने दृष्टीपटलाचे -म्हणजे रेटिनाचे ५०हजार फोटो घेअू शकत होते. त्या सगळया फोटोंचे विश्लेषण करून ते डोळयांची स्थिती अचूक सांगू शकत होते. दृष्टीपटलाची स्थिती काय आहे, चष्मा घालण्याची वा शल्यक्रियेची गरज आहे का वगैरे निदान अचूक सांगत होते.
काळ बदलतो आहे, आणि तो आर्टिफिेशयल आिंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता)च्या दिशेने चालला आहे. त्याला आपण थोपवू शकत नाही. त्याच्यामुळे जे घडेल त्याचे अंदाज आता प्रगट होअू लागले आहेत. त्यापायी २३कोटि नोकऱ्या जातील म्हणतात, परंतु हीच कृत्रिम बुद्धिमत्ता २५कोटि नव्या नोकऱ्या निर्माण करेल!! तथापि हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्यातल्या ७५टक्के नव्या नोकऱ्या अशा असतील की, याआधी त्या प्रकारच्या नोकऱ्या कधी अस्तित्वातही नव्हत्या. नवे शिकणे, ते लवकरच विसरून जाणे, आणि पुन्हा नवे शिकणे हे आपल्याला करत राहावे लागणार आहे. अुद्याच्या प्रशासनात तंत्रज्ञान खूपच मोठी भूमिका बजावणार आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. तरीही माझं मत असं की, कोणतंही तंत्रज्ञान हे माणसाला पर्याय ठरू शकणार नाही.
  आर्टिफिेशयल आिंटेलिजन्स ही अशी चीज आहे की तुम्ही तिला प्रेम करायला `लावू' शकता. डेटा च्या माध्यमातून प्रेम ते करेलही, परंतु त्याच्यात संवेदना -सहवेदना असणे शक्यच नाही. तो फार तर आपल्याला अेवढे सांगू शकेल की, अमूक अेका परिस्थितीत आपण कसे वागावे!  परंतु मानवी संवेदना आपल्याला त्यापुढे जाअून हे सांगते की, आपण अेखाद्या परिस्थितीला संवेदनापूर्वक प्रतिक्रिया कशी द्यावी!!
त्यामुळेच, प्रदीर्घ अनुभव असून आजचं प्रगत प्रशिक्षण घेत असलेले अेकीकडेे; आणि दुसरीकडे नव्यानेच सेवेत दाखल होत असलेले  -अशांसाठी आव्हाने वेगवेगळी आहेत. त्यांचा मुकाबला तर करायला हवा. विशेषत: आपण जेव्हा भारताबद्दल बोलतो तेव्हा, अेकूण लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण खूप जास्त असणार आहे. ही जशी आपल्याला जमेची बाजू आहे, तसेच ते मोठे आव्हानही आहे. कारण पूर्वी आकांक्षांना गवसणी घालणे सोपे होते. आता तरुणांची संख्या प्रचंड आहे, आणि त्यांच्या महत्वाकांक्षा गगनाला भिडल्या आहेत. ही पिढी अशी आहे की, त्यांना सगळे  आत्ता आणि आिथ्थेच  हवे आहे. आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यायचे आहे, त्यांच्याबरोबर काम करायचे आहे.
काही दिवसांपूर्वी नंदुरबारच्या अेका आदिवासी पाड्यावरच्या  जमावाने सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला केला. झाले होते असे की, आश्रमशाळेतला अेक मुलगा विजेच्या धक्कयाने गेला. संतापून जमावाने हा हल्ला केला, ते अर्थात निषेधार्हच होते. त्यामुळे चिडलेले अस्वस्थ झालेले अधिकारी मला भेटायला आले. मी स्वाभाविकच त्यांना, आम्ही कशी काळजी घेअू -काय अुपाययोजना करू.... हे सांगत असतानाच अेक महिला अधिकारी अुभ्या राहिल्या; त्यांनी अशी मागणी केली की आम्हा सगळयांना सरकारने सुरक्षा पुरवली पाहिजे. मी त्यांना म्हटलं, `हे  बघा. अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी सुरक्षा पुरवली पाहिजे, हे बरोबर आहे. पण जर आपण अधिकारी नेहमीच्या परिस्थितीतही सुरक्षेखेरीज जनतेशी संवाद संपर्क साधू शकणार नसू तर त्यामुळे प्रशासन आणि लोक यांच्यामध्ये प्रचंड दरी निर्माण होआील. ती तर आपण कधीच भरून काढू शकणार नाही.
थोडक्यात म्हणजे, हा बदलता काळ अतिशय आव्हानात्मक, त्याचबरोबर अतिशय अुत्कंठावर्धक असणार आहे. आज जे प्रशिक्षण घेत आहात त्या तुम्हा सगळयांसाठीही हा काळ तसाच आव्हानात्मक आणि अुत्कंठेचा असणार आहे. मला अशी खात्री वाटते की, आिथे मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तुमच्यातील  `शिका - विसरा - परत शिका' ही क्षमता विकसित होआील. त्या जोेरावर तुम्ही कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आणि लोकांच्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी सज्ज व्हाल.

     ***

 संपादकीय
उतावीळी आवरावी
भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच्या आधीपासूनच पाकिस्तान नावाची पीडा आपल्या मागे चिकटली आहे. कै. वाजपयी यांनी म्हटले होते, त्याप्रमाणे आपला मित्र बदलता येतो, पण  नशीबाला आलेला शेजारी बदलता येत नाही. त्याबरोबरच हेही खरे आहे की, शेजारधर्माला जागणारा शेजारी दुर्मीळच असतो. शेजारी चारही दिशांना असतात, त्यातली अेक बाजू तरी आपले रक्त शोषत असते. पाकिस्तानचे दुखणे तसेच आहे. आतापर्यंतची सारी युद्धे आणि चकमकी पाकिस्तान हरले आहे, ते हरणारच होते. कारण त्याची ताकद तितकीच आहे. त्याची ताकद फारशी नाही हे खरे असले तरी त्याचा अुपद्रव आपल्याला होत असतो; आणि बहुतांशाने यापुढेही हेातच राहण्याची चिन्हे आहेत. आपल्याला हा अुपद्रवी शेजारी सहन करत राहावे लागणार आहे, मधुमेहासारखे हे अटळ दुखणे आहे. त्यावरती अक्सीर आिलाज नाही, पथ्ये सांभाळून राहिल्यास काळजी वाटण्याचे कारण नाही.

पहिले पथ्य असे की, पाकिस्तानविरुद्ध  एखादी लढाआी जिंकल्याचा आनंद मानणे आणि त्याचा अुन्माद चढणे यातला फरक लक्षात ठेवणे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानकडून अतिरेकी कागाळया वाढलेल्या होत्या, त्या सहन करीत राहण्याची  मर्यादा पुलवामाने ओलांडली, आणि आपल्या विमानदलाने अेक सणसणीत रट्टा अतिरेकी तळावर लगावला. हे करण्यासही नेतृत्व सच्चे हवे होते, ते मोदींच्या रूपाने लाभले आितकेच. याहीआधी तसे नेतृत्व शास्त्रीजी, आिंदिराजी, आणि वाजपयीजी यांच्या रूपाने लाभले होते. तसेच पाहू गेल्यास कारगिल युद्धाच्या आधी पाकिस्तानने आपल्यास सपशेल चकवा दिला हेही आपले चुकले होते; आणि त्याची मोठीच किंमत आपल्याला मोजावी लागली, याचा विसर नसावा. पण हे फार गंभीर नाही. विशाल देशाच्या विशाल सीमांचे रक्षण करताना रणक्षेत्रावर काय घडेल हे ठाम सांगता येत नसते. पुलवामाच्या हल्ल्यानंतरही आपल्या देशातल्या प्रतिक्रिया काहीवेळा वाट चुकत होत्या. तो हल्ला भ्याडांचा नव्हता, नीट योजनाबद्ध होता. आपले सैनिक धारातीर्थी नाही पडले, अेका अपघाती बेसावध क्षणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासाठी गावोगावी फलक झळकविणे वा मेणबत्त्या पेटविणे यांतून  प्रदर्शनाशिवाय काय साधले? त्यांच्या घरी योग्य ती मदत यापुढेही करत राहिले पाहिजे.

आजकालचा विचार करताना भारताची ताकत पाकिस्तानच्या तुलनेत सर्वार्थाने कितीतरी जास्त आहे. महाराष्ट्नचा अर्थव्यवहारसुद्धा पाकिस्तानपेक्षा मोठा असतो. अशा स्थितीत आपल्याशी पाकिस्तानची बरोबरी करत राहून त्याच त्या विजयगाथांची पारायणे करण्यात गुंतून राहण्याचे कारण नाही. सचिन तेंडुलकरने खेळताना अेखाद्या अुगवत्या रणजी-पोराला सिक्सर मारावी तितकेच त्याचे महत्व. त्याचाही आनंद जरूर आहे. विशेषत: अतिरेक्यांच्या बाबतीत त्यांची मस्ती अुतरवून टाकणारा प्रहार अेकदाच नाही तर वारंवार करीत राहावे लागणार आहे याचेही भान ठेवावे. आिस्रायलाचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्याचा सल्ला अनेक शहाजोग देत असतात; त्यांनी हेही पाहावे की, आिस्रायल अशा कित्येक झपाट्यांनी गाजत असला तरी आपले रोजचे व्यवहार दूर ठेवून साखर वाटत चौकात ढोल वाजवत नसतो.

अेकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, हे विधान असेच बालीश अुतावळेपण दाखविणारे आहे. सोक्षमोक्ष म्हणजे नेमका काय लावायचा? पाकिस्तान नकाशावरून पुसून टाकायचे म्हणतात, ते समजा जरी अगदी जाळून पोळून फस्त केले तरी दग्ध भूमी, मरुभूमी म्हणून नकाशावर राहणारच ना!! पाकिस्तानमधल्या कोट्यवधी लोकांची कत्ले आम करता येआील? छातीवर हात ठेवून याचे होकारार्थी अुत्तर देता येणार नाही. हा प्रदेश आजच आितका मागास  -आणि म्हणूनच आपल्याला अुपद्रवी आहे; तर तो जिंकून घेणे आपल्याला परवडेल का?  अेक कुठला तरी आपल्यातलाच मागास दुष्काळी भाग विकसित करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातल्या धरणातील पाणी सोडायचे तर त्यावर दंगे होतात. मग पाकिस्तानसारखा मनाने आणि शरीराने किडका राहिलेला आख्खा देश आपल्यात घेअून निस्तरत बसण्यात शहाणपणा कसला? त्यामुळे तीही गर्जना निकामी ठरते.

महायुद्धात पूर्णत: हरलेल्या नेस्तनाबूत शत्रूचाही आितका दुस्वास करून कायमचे राहता येत नाही. जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर वाटेल त्या अटी दोस्त राष्ट्नंनी घातल्या होत्या, त्या देशाचे आणि त्यांच्या राजधानीचेही विभाजन केले होते. पण आज सारा जर्मनी पुन्हा अेकसंध होअून त्याच आिंग्लंडपुढे आर्थिक आव्हान घेअून अुभा ठाकला आहे. जपानवर अणुबाँब टाकून त्यास जाळून टाकल्यावर त्याला पुन्हा अुभे करण्यासाठी अमेरिकेने भरपूर मदत ओतली. पुढच्या काळात प्रत्येक अमेरिकन अध्यक्षाने जपान दौऱ्यात  त्या दोन शहरांना भेट देअून श्रद्धांजली वाहिली आहे, आपली चूकही मान्य केल्यासारखेच आहे. पराभूतांबद्दल ही सहिष्णुता हाच मानवी व्यवहार असतो. अतिरेक्यांना दणका दिल्यापासून आपल्या वाचिवीरांनी अतिरेकी वाह्यात बडबड चालविली आहे तीही बंदच पाडली पाहिजे.

आपल्या देशातल्या अनेकांचे लागेबांधे आजही पाकिस्तानात आहेत. आपल्या सीमेवरचा अनुभव कथन करणारी जी वार्तापत्रे येतात त्यावरून हे दिसते की  नावाडी-कोळी, गुराखी, यात्रेकरू, आितकेच काय लग्नांची वऱ्हाडेही आिकडून तिकडे करत असतात, त्यांचे रोजचे व्यवहार  त्यात असतात. त्रिपुरा शहरात दररोज पोट भरण्यास बांगला देशातून रिक्षावाले येत असतात, आणि संध्याकाळी ते परत बांगला देशी जातात असे सांगण्यात येते. हे धोक्याचे आहे, तितकेच ते सरावाचे दैनंदिन आहे. आपल्याकडे  मध्य प्रदेशातून गायींचे तांडे महाराष्ट्नच्या वनक्षेत्रात घुसत असतात. खिद्रापूर हे लेण्यांचे गाव, नदीच्या पलीकडे कर्नाटक आहे. रोजच्या दळणासाठी कर्नाटकातून लोक महाराष्ट्नत  येत असतात. येताना तांदूळ वगैरे आणायचे, कारण अेके काळी  तांदळावर राज्यबंदी  होती. हे सीमाभंग चालू देता कामा नयेत, देशांच्या सीमा सील केल्याच पाहिजेत. आपल्या अंगणातून कोणी शेजारीही वाट पाडत असेल तर रोखायला हवे हे खरेच. विनोबा म्हणत की, शेजाऱ्यावर प्रेम करा... पण मध्ये कुंपण घालायला विसरू नका.

तात्पर्य असे की, पाकिस्तानातल्या साऱ्या सामान्य जनतेशी अुभे आडवे वैर मांडून चालणार नाही. आपल्याला पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राग येतो, तो स्वाभाविक आहे. त्याला मुत्सद्देगिरीने तोेंड द्यावे लागेल. आंतरराष्ट्नीय समुदाय कायम आपलीच बाजू घेतो असे नाही, कारण आपण मोठे झालेले त्या त्या राष्ट्नंनाही फारसे नको असते. त्यासाठी पाकिस्तानचा कोलदांडा आपल्या पायात घालण्याचे धोरण ते बडे देशही चालवतात. त्यांना भारत बरोबर की पाक, हे कळत नाही असे थोडेच आहे? -पण शेजाऱ्यांच्या भांडणांतही जसे `जाअूद्या हो, शेजारीच राहायचंय् तुम्हाला. घ्या की सांभाळून...' असे शांतिमंत्र सांगणारे सोदे असतात, तसेच ते जगभरातही असतात. त्यांचे राजकीय स्वार्थ पाहूनच ते कोणाच्या बाजूला ठाम अुभारायचं ते ठरवितात.अशा स्थितीत पाकवरती अणुबाँब टाकावा... असली मुक्त चिंतने प्रकट करण्यावर पथ्यच पाळावे लागेल. अणुबाँबचे दुष्परिणाम केवळ पाकिस्तानच भोगेल असे नाही, तर आपल्या सीमावरती राज्यांतही अनर्थ होतील. शिवाय आपण विवेकी असलो तरी पाक सारख्या आडदांड वेडाने तसेच बाँब भारतावर टाकले तर? -ते टाकू न देण्याला कसा आवर घालायचा?  `बाबा रे, तू वेडा नाहीस ना? -शहाणा आहेस ना?' असे चुचकारत त्याच्या हातातील घातक शस्त्र काढून घेण्यासाठी संयम हवा. त्या आचरट वेडाला फार चिडवून चालणार नाही.

कदाचित पाकिस्तानात जरा समंजस आणि प्रागतिक विचारांची राजवट कधीकाळी आली तर त्या शेजाऱ्याच्या घरांतील दारिद्रय कमी होण्यासाठी आपल्यालाच काहीतरी मदत करावी लागेल. आज त्याचे शत्रुत्व आहेच, पण त्याला जरब बसवून कधीतरी आपल्या पंखाखालीही घ्यावे लागणार आहे. कारण ते आपण केले नाही तर चीन ते करण्यास पुढे येत असतो, आणि ते तर आपल्याला आणखी कठीण होआील. म्हणून आपली प्राप्तकाळची लढाआी केवळ अतिरेक्यांपुरती आहे हे वास्तव ठरते. तसे भारतातही काही अतिरेकी त्रासदायक आहेत, त्यांच्याशी चकमक होते तेव्हा तो अुन्माद दिसत नसतो. काश्मिरात त्यांना पाकिस्तानची फूस व मदत तर आहे, म्हणून त्या देशावर मुत्सद्देगिरीचा दबाव आणि अतिरेक्यांचा संहार अेवढेच सध्याचे काम आहे. दोन देशात युद्ध पेटविण्याचा आततायीपणा पाक कडून झालाच तर त्याला आणखी चार रट्टे हाणावेच लागतील, परंतु हा शेजार आपल्या शेजारीच कायम  -बहुधा अशाच वृत्तीने, राहील हेही वास्तव आहे. त्याच्यात कधीकाळी बदल होआील यासाठी त्याच्याच अल्लाकडे दुवा मागायची पाळी आहे. कारण आमच्या देवांनाही त्याच स्थितीतून कित्येकदा जावे लागले आहे. ते तसा बदल करतील काय?

म्हणून अुद्याच्या काळात कोणताही प्रसंग येअून ठेपला तरी अविवेकी वागणे बोलणे टाळून गांभीर्याने आपली सभ्यता आणि सामर्थ्य यांचे दर्शन घडविण्याची जबाबदारी आपणा नागरिकांची आहे.

 ।।स्त्रियो मेध्यास्तु सर्वत: ।।

बृहदारण्यकोपनिषद् नावाचे उपनिषद् आहे. त्यात एक प्रसंग आहे. याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी आपल्या पतीस अमृतत्वाचा लाभ कसा होईल याविषयी प्रश्न विचारते आणि ब्रह्मवादिनी गार्गी याज्ञवल्क्यांना विश्वातील अंतिम सत्याविषयी पृच्छा करते. हा प्रसंग म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेतील वास्तव होते. विवाहित मैत्रेयी आणि ब्रह्मवादिनी गार्गी, यांचे उदाहरण, भारतीय संस्कृतीत स्त्रीला असणाऱ्या उच्च स्थानाचे निदर्शक आहे. विवाहित(सद्योद्वाहा) स्त्री आणि ब्रह्मवादिनी(अविवाहित) स्त्री या दोघी याज्ञवल्क्यांना अध्यात्म विद्येविषयी प्रश्न करत आहेत, आणि महायोगी याज्ञवल्क्य त्यांचे शंकासमाधान करीत आहेत, हे दृश्य केवढे मनोहर असेल? कित्येकांच्या मनातील  शेकडो वर्षांपासूनची स्त्री-पुरुष संकल्पनांविषयी सारी विवाद्य मतांची जळमटे काढून टाकण्यास हा प्रसंग पुरेसा आहे.
असे शेकडो प्रसंग भारतीय संस्कृतीतील वैभवशाली स्त्रीजीवनाचे वास्तवदर्शन घडवीत या संस्कृतीस प्रकाशमान करीत आहेत. भारतीय  गृहजीवनात आणि समाजजीवनात अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या, त्यांचा धगधगीत जीवनादर्श आम्ही आज प्रत्यक्षात आणावा! असे एकही क्षेत्र नव्हते की जे स्त्रीने अजरामर केलेले नाही.
न गृहं गृहमित्याहु: गृहिणी गृहमुच्यते ।(महा.१२/१४४/६) घर(इमारत) म्हणजे -घर नाही, तर गृहिणी हेच घर आहे असे म्हणतात. ही उदात्त शिकवण होती. हेही सांगितले आहे की `गृहिणी नसलेले घर हे अरण्यासमान आहे', `स्त्रिया नेहमीच पवित्र असतात', `ज्याला पत्नी नाही त्याला यज्ञाचा अधिकार नाही,' `सर्व स्त्रिया देवीस्वरूप आहेत' -अशी असंख्य स्त्रीस्तुतिपर वचने प्राचीन वाङ्मयात आहेत. मनुस्मृतीत वचन आहे,
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।(मनु ३/५६) जेथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथेच देवता रमतात. ही वचने म्हणजे केवळ तोंडच्या वाफा नसून तो जीवनादर्शाचा भाग होता. प्राचीन भारतीय स्त्रीजीवनाचे हे दर्शन आहे.
पत्नी पत्युर्नोयज्ञसंयोगे । (अष्टा ४-१-३३)
पाणिनी नावाचा महान व्याकरणकार होऊन गेला. त्याने पत्नी या शब्दाचा अर्थ सांगणारे हे सूत्र त्याच्या अष्टाध्यायी ग्रंथात दिले आहे. यज्ञात सहभागी होणारी स्त्री असा अर्थ स्थूलमानाने घेता येतो. याचा अर्थ पाणिनीच्या कालापर्यंत स्त्रियांना यज्ञसहभागाचा अधिकार होता. पाणिनीचा काळ इ.पू.५०० ते २०० हा मानला जातो. त्यामुळे इ.पू.२०० पर्यंत तरी स्त्रिया यज्ञात सहभाग घेत होत्या हे मानावेच लागेल. आजच्या कुटुंबातील घटकांनी `पत्नी' या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्यावा. स्त्रियांनी मंत्र म्हणावे की नाही, यज्ञ करावा की नाही याचे उत्तर `पत्नी' या शब्दाच्या वरील अर्थावरून मिळेल.
दंपती म्हणजे -एकाच घराचे जोडमालक असते. दंपती हा शब्द (`दांपत्य' म्हणून) आपण सर्रास वापरतो. पती आणि पत्नी म्हणजे दंपती(दांपत्य) अशी आपली धारणा आहे. पण दंपती या शब्दाचा नेमका अर्थ एकाच घराचे जोडमालक असा आहे. पत्नी अर्थात् गृहिणी ही त्या घराची स्वामिनी असते. घरात गृहिणीचीही सत्ता, याचा हा उत्तम पुरावा आहे.
स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच सर्व शिक्षण दिले जात होते हे सांगणारे असंख्य उल्लेख प्राचीन वाङ्मयात आढळतील. आपस्तंबासारख्या सूत्रकाराने `उपनयनं विद्याथ्यस्य श्रुतित: संस्कार: ।' या सूत्राने स्त्री-पुरुष शिक्षणाचे चित्र उभे केले आहे. यम या स्मृतिकाराच्या एक श्लोकाने स्त्रियांच्या अध्ययनावर वास्तव प्रकाश पडतो. तो म्हणतो -
पुरा कल्पे तु नारीणां मौंजीबन्धनमिष्यते ।
अध्यापनं च वेदानां सावित्रीवचनं तथा ।। (यमस्मृती)
पूर्वीच्या काळी स्त्रियांचे मौंजीबंधन केले जात होते. आता काही अभ्यासूंना असा प्रश्न पडेल की, हे उपनयन अमंत्रक होते की समंत्रक होते? याचे उत्तर पुढील श्लोकार्धात मिळते. `अध्यापनं च वेदानां...' त्यांना वेद शिकवले जात असत. आता काही शब्दमात्राग्रही लोकांचा आक्षेप `पुरा कल्पे' या दोन पदांवर येईल. कल्प हे कालवाचक भारतीय परिमाण आहे. १ कल्प म्हणजे ४ अब्ज ३२कोटि वर्षे. ही प्रचंड मोठी संख्या ध्यानात घेतल्यास वरील पुरा कल्पे या पदांमधील अतिशयोक्ती ध्यानात येईल. काही स्मृतिकार आणि पुराणकार यांची भाषा, कालविषयक अतिशयोक्तीची असते. त्यांच्या कालविषयक गणनेवर पूर्णत: विश्वासता येणार नाही. स्त्रियांच्या शिक्षणाची प्राचीन कालची स्थिती अतिशय बलवत्तर होती. इतकेच नव्हे तर इतर कोणत्याही प्राचीन संस्कृतीपेक्षा येथे स्त्रीला उच्चतम स्थान दिले होते.
स्त्रिया सूक्तकर्त्या होत्या. ऋग्वेदातील अनेक सूक्ते स्त्रियांनी रचलेली आहेत. अपाला, घोषा, विश्ववारा इत्यादी स्त्रियांनी त्या `अपौरुषेय' वेदवाङ्मयात आपल्या सूक्तांनी स्थान मिळवले आहे. त्यामुळे वेदकाली स्त्रियांना वेदाधिकार होता किंवा नाही हा प्रश्नच निकालात निघतो. ब्रह्मयज्ञांग तर्पणात अनेक स्त्रियांची नावे आली आहेत. आश्वलायन गृह्यसूत्रांत हे तर्पण आले आहे, त्या काळापर्यंत स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते हे स्पष्टच आहे.
तात्पर्य, प्राचीन काल स्त्रियांच्या सन्मानाच्या दृष्टिकोणातून अत्यंत भरभराटीचा होता.
विवाह ही आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना. काही ठिकाणचा मातृसत्ताक पद्धतीचा अपवाद वगळता, विवाहानंतर स्त्रीने पतीच्या घरी जाण्याची पद्धत सर्वत्र रूढ होती. त्यामुळे स्त्रीचे भावविश्व पूर्णपणे बदलून जात असे. (आजही तीच पद्धती रूढ आहे.) विवाह विधीमध्ये स्त्रीला शास्त्रकारांनी सन्मानाचे स्थान देऊन पतीवर अनेकानेक बंधने लादली आहेत.
`धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि' (धर्म, अर्थ आणि काम यांत मर्यादा ओलांडणार नाही) ही शपथ वराला व वधूला घ्यावी लागते. त्याचप्रमाणे पत्नीच्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी त्याच्यावर येते. विवाहात अश्मारोहण नावाच्या विधीत पती ज्या शब्दांनी पत्नीचा अनुनय करतो ते शब्द (मंत्र) असे आहेत-
`मी सामवेद आहे तू ऋग्वेद आहेस, मी आकाश आहे तू पृथ्वी आहेस, आपण विवाह करू, मुलांना जन्म देऊ, परस्परांवर प्रेम करू, एकमेकांना प्रिय होऊन शंभर वर्षे जगू'(आश्व गृह्य सूत्र) स्त्रीला पत्नी म्हणून सन्मान होता. इथे भेद नाही. तिरस्काराची भावना नाही, मोक्षसाधनेत ती अडचण नाही!
सप्तपदी या विधीत या विधीत पती आणि पत्नी परस्परांच्या साथीने सात पावले चालतात. प्रत्येक पावलासाठी शास्त्रकारांनी मंत्र दिले आहेत, ते असे- `माझ्यासह तू एक पाऊल चाललीस, मला अनुकूल हो. आपल्याला दीर्घायुषी पुत्र होवोत...
`दोन पावले चाललीस, तू माझे बल वाढव...
तीन पावले चाललीस, माझी धनवृद्धी कर...
चार पावले चाललीस, माझे  सुख वाढव
पाच पावले चाललीस, संतती वाढविणारी हो..
सहा पावले चाललीस, ऋतूद्भव सुखोपभोग वाढविणारी हो....
सात पावले चाललीस, जीवनभराची सखी हो....
या प्रत्येेक मंत्रात सुखी आणि यशस्वी संसाराचे रहस्य तर आहेच, पण स्त्रीला शास्त्रकारांनी दिलेले सन्मान्य स्थान दिसते. वैदिकांचा दृष्टिकोण केवळ पारलौकिक नसून तो शुद्ध इहवादी होता. त्यांनी या जीवनात उपभोगास पाप असे मानले नाही. पण उपभोग हा धर्माधिष्ठित असला पाहिजे, हाच त्यांचा आग्रह होता. त्यांनी स्त्री आणि पुरुष यांना सृष्टिरथाची दोन चाके मानली आहेत. दोन्ही चाकांशिवाय रथ गतिमान होत नाही.
विश्पला नावाची स्त्री रणक्षेत्रात अतुलनीय पराक्रम गाजवीत असता दुर्दैवाने तिचा पाय तुटला. आश्विनौ देवांनी एका रात्रीत तिला लोखंडी पाय(आयसीजंघा) बसवून दुसऱ्या दिवशी युद्धास जाण्याइतकी तयार केली. वैदिक स्त्रिया धीरोदात्त आणि पराक्रमी होत्या याचे हे उदाहरण आहे.
प्राचीन काळी स्त्रीजीवन कसे होते? भवभूतीच्या उत्तरराम चरितातील आत्रेयी ही विद्यार्थिनी सांगते,

अस्मिन्नगस्त्यप्रुमखा प्रदेशे  भूयांसउद्गीथविदो वसन्ति ।
तेभ्यो%धिगन्तुं निगमान्तविद्यां  वाल्मिकिपार्श्वादि पर्यटामि ।।

या अगस्तिप्रमुख प्रदेशात पुष्कळ ज्ञानी लोक राहतात, त्यांच्याकडून वेदान्तविद्या शिकण्यासाठी मी वाल्मिकींच्या आश्रमातून येथे आले आहे. -`येथे' म्हणजे ती दंडकारण्यात आली आहे. गंगेच्या काठी असणाऱ्या वाल्मिकी आश्रमातून गोदावरीकाठच्या अगस्ति आश्रमात सहजपणे येण्याइतके शैक्षणिक आणि सामाजिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता स्त्रियांना होते हे स्पष्टच आहे.
स्त्रीचा त्याग केला जात नाही, स्त्रीचा त्याग कधीही करू नये; ती अगदी दोषी असली तरीही! याविषयी पुराणांमध्ये वचन आहे-

बलात्कारोपभुक्ता वा चोरहस्तगतापि वा।
न त्याज्या दयिता नारी नास्यास्त्यागो विधीयते ।।

बलात्कारित, उपभुक्त, चोराने पळवली तरी स्त्रीचा त्याग करू नये, स्त्री नेहमी पवित्र असते. तथापि मानसिक समाधानासाठी शास्त्रकारांनी एक नियम सांगितला- संशुद्धी रजसा नार्या:।। दरवेळी मासिक धर्माने स्त्रीची शुद्धी होतच असते. ज्या सहस्त्रावधी स्त्रिया भ्रष्ट होऊन त्यांनी प्राणत्याग केला, किंवा आम्हास त्या नित्याच्याच पारख्या झाल्या, त्यांच्या बाबतीत हा नियम पाळला असता तर किती चांगले झाले असते!
एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, `नास्यास्त्यागो विधीयते' आणि `स्त्रियो मेध्यास्तु सर्वत:' असा भारतीय संस्कृतीचा उदात्त आणि दैवी संदेश आहे. म्हणून येथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते,
संपूर्ण विश्वात स्त्रियांना सर्वोच्च सन्मान प्राचीन भारतीयांनीच दिला आहे. त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये झेपावण्याचे स्वातंत्र्यही दिले होेते. वेदांमधील ऋचा गातागाता प्राचीन स्त्रिया रणरागही आळवत होत्या. ज्या स्त्रियांना फक्त अध्ययन करावयाचे, त्या आजन्म  अविवाहित राहून अध्ययन करत, त्यांना ब्रह्मवादिनी असे म्हणत. ज्यांना विवाह करावयाचा आहे, त्या आवश्यक अध्ययनानंतर विवाह करत, या स्त्रियांना सद्योद्वाहा असे म्हणत. त्यांना स्वत:साठी वर निवडीचा अधिकार होता. याचप्रमाणे अनेक स्त्रिया अध्यापन करत, त्यांना आचार्या ही संज्ञा होती.

तरीही एकच तुणतुणे ऐकायला येत राहते की, स्त्रियांना भारतीयांनी गुलाम केले, चूल आणि मूल यांशिवाय दुसरे आयुष्यच ठेवले नाही, त्यांना पद्दलित केले, त्यांना शिक्षण दिलेच नाही! हे सारे आरोप का? याचा विचार मनाशी करणे सयुक्तिक ठरेल.
इ.स.७१०च्या पुढे आक्रमकांनी हिंदुस्थानात प्रवेश करून अरेरावी सुरू केल्यावर राजकीय व सामाजिक परिस्थिती बदलत चालली. त्या भयग्रस्त, पराभूत व दबलेल्या कालखंडात त्या त्या वेळेनुसार साऱ्या समाजावरच पुष्कळ बंधने आली. हा कालखंड बराच मोठा आहे. अध्ययन, संशोधन, नवनिर्माण ही कार्ये-कर्तव्ये खुंटली. त्या काळात जे काही अन्याय्य घडले-रुळले, त्याचा दोष कोणत्याही समजातून भारतीय संस्कृतीला देण्याचे काहीही कारण नाही.

-दीपक पाटणकर, गावभाग,सांगली
फोन- ९८५०९३४१७२

निरामय जीवनाची वाटचाल
आपल्या शारीरिक निरामय जीवनशैलीचा विचार करत असताना निसर्गदत्त अनाकलनीय शरीरांचे सुक्ष्मावलोकन करणे प्राप्त आहे. आपली पंचज्ञानेंद्रिये पचनसंस्था, अभिसरण संस्था, अस्थिसंस्था, मज्जासंस्था आणि उत्सर्जन संस्था यांचा समावेश असतो.
आपण आपल्या शरीराचे मालक असतो. पण विश्वस्त कधी होणार? मालक फक्त मालकी गाजवत असतो. पण विश्वस्ताची भूमिका सांभाळण्याची असते. आपण आपले शरीर सांभाळतो का? शरीर सतेज राहण्यासाठी ते सतत कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. 'र्चेींशाशपीं ळी ङळषश, ीींरूपरींळेप ळी ऊशरींह' कठोपनिषदांत श्लोक आहे-
आस्ते भग आसीनस्य -ऊध्वस्तिष्ठति तिष्ठत:।
शते निपद्य मानस्य -चराति चरतो भग:।।
एखादी शारीरिक क्रिया तशीच चालू ठेवली तर तेच महत्वाचे वाटते. उदा.बसणाऱ्याला बसणे, उभे राहणाऱ्याला उभे राहाणे, झोपणाऱ्याला झोपणे आणि चालणाऱ्याला चालणे महत्वाचे वाटते.
उच्च-नीच रक्तदाब, आणि मधुमेह यासाठी  औषधोपचार निश्चितच हितकारक आहे. पण असे विकार केवळ औषधोपचारांनीच बरे होत नाहीत. अति विचारमग्न होऊ नका, चार घास कमी खा, आणि पोट स्वच्छ ठेवा.
आपण खातो खूप आणि हलतो कमी. एक पेढा खायचा असेल तर किमान एक तास व्यायामाची मानसिकता हवी. आपण असे कधीच वागत नाही. पोटाचा घेर वाढत जातो. छातीच्या घेरापेक्षा पोट लहान असावे. उंची, आणि आपले वजन प्रमाणित असावे.
उगवत्या सूर्यनारायणाला साक्ष  ठेवून केलेला दैनंदिन व्यायाम कधी व्यर्थ जात नाही. ज्या दिवशी व्यायाम होणार नाही, त्या दिवशी जेवणार नाही असे जेव्हा ठरवू, तेव्हाच न्याय दिल्यासारखे होईल.
आधुनिक तंत्रज्ञानाने आणि यंत्रसामग्रीने आपल्या घरांत प्रवेश केला आहे. पण दैनंदिन  जीवनशैलीत मात्र आमूलाग्र नकारात्मक बदल झाले आहेत. बैठे काम वाढले. शारीरिक कष्टांकडे बुद्धिपुर:सर पाठ फिरवली गेली. व्यायामाला सवड मिळेनाशी झाली. जंकफूडचा वापर वाढला. कौटुंबिक सुसंवाद ढासळू लागला. मानसिक आणि शारीरिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात आढळतो. मोकळया हवेतील मैदानी खेळ कमी होऊन घरकोंबडेपणा वाढीस लागला.
आपण सर्वजण अन्न, वस्त्र, निवारा या गरजा  भागवण्या इतपत सधन आहोत. त्याचबरोबर आपल्या हातून स्वआरोग्याची हेळसांड करत आहोत. आपले शरीर सोशिक असते. अनेक वर्षांपासून अनेक अघोरी आघात सहन करत करत ते इथपर्यंत आलेले असते. असे आघात सोसतासोसता ते दुबळे बनत जाते, पूर्वी कधीतरी शरीरात चंचूप्रवेश करणारा रोग शड्डू ठोकून उभा राहतो, त्यावेळी आपण खडबडून जागे होतो. नंतर धावपळ सुरू होते. `होईल तेव्हा बघू' अशा बेफिकीर मनोवृत्तीतील आपला समाज आहे. काही अघटित घडते, तेव्हा धावपळ व्यर्थ होऊन जे घडू नये तेच घडते!!
दृश्य शरीर आणि अदृश्य मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीरस्वास्थ्याला शांत मनाची जोड असायला हवी. सकारात्मक विचार असायला पाहिजेत. मनाचेही ज्ञात मन व अर्धज्ञात मन असे दोन प्रकार असतात. ज्ञातमनाला निर्णय क्षमता असते. आपल्या शरीरांतील सर्व संस्था आज्ञा पालनाचेच काम करत असतात. मला गुण येणार आहे, मला चांगले वाटणार आहे, किंवा मी करत असलेल्या कामात मला हमखास यश मिळणार आहे. असा सकारात्मक विचार केला तर त्याचा सुपरिणाम जाणवतो. शारीरिक मशागतीएवढीच मनाचीही मशागत केली, तर अपेक्षित परिणाम आपण अनुभवू शकतो. निरामय जीवनाचा हाच तर खरा पाया आहे.
-दत्तात्रय गो.मेहेंदळे, पुणे ३०
फोन- ०२०- २४३३१२८६

अर्पित होऊनि जावे!
संघकार्यासाठी असंख्य प्रेरक गीतं रचली गेली. त्यातून अनेक जण देशकार्यासाठी बाहेर पडले. या प्रेरणादायी गीतांचे रचयिता अनेक आहेत. प्रथेप्रमाणे त्यांची नावे कोणाला माहीत नाहीत. गोडसे सर हे अशाच अनाम कवींपैकी एक. `अर्पित होऊनी जावे । विकसित व्हावे ।।' हे त्यांच्या लेखणीतून उतरलेले गीत. हे गीत त्यांनी आणीबाणीत ठाणे कारागृहात लिहिले होते.
त्यांच्या सहधर्मचारिणीने त्यांचे व्यक्तिेचत्र रेखाटले, त्यातील काही अंश....
पुण्याला ओटीसी कँप लागला. मुलांनी शिबिराला यावं म्हणून त्यांना तयार करणं, त्यांच्या आई-बाबांना तयार करणं, त्यांची मानसिक तयारी करणं, गणवेशाची तयारी करणं... असंख्य कामं. एक गरीब मुलगा असा भेटला, प्रवासखर्चही करणं त्याला अशक्य. सारीच वानवा दोघांकडेही. पण अर्ध्या चड्डीला कोणताच अडथळा अडवत नव्हता. कोल्हापूर ते पुणे सायकल प्रवास, त्या बालस्वयंसेवकाला घेऊन. चंद्रप्रकाशात पहाटे सायकल दामटायला सुरुवात, जिवाची बाजी लावून शिबिरात वेळेवर उपस्थित.

१९६३ साल असावं. मी रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये विद्यार्थिनी होते. कॉलेजच्या क्रीडांगणावर अटलबिहारींची जाहीर सभा होती. सारं मैदान खचाखच भरून गेलं होतं. सभेच्या सुरुवातीलाच दूरवरून खणखणीत भावगर्भ सूर आले-
कालगतीहून बलवत्तर ही पौरुषशाली मनें ।
याच मनांच्या अमित बलावर लाख झंुजवू रणे ।।
ते शब्द, ते स्वर, तो सूर ऐकून सर्वांच्या अंगावर सरसरून काटा आला. विशाल जनसमुदायाला तो स्वर जाऊन भिडला! त्या शब्दसुरांची ताकद विलक्षण होती!
पुढे खूप वर्षांनी कळलं की ते शब्द, तो सूर, तो स्वर.. पुढे आपला जीवनसाथी झालेल्या गोडसे सरांचेच होते. एवढेच नव्हे, नंतर त्या आठवणींचा उत्तरार्धही त्यांनी सांगितला-
-हे गीत संपताच अटलजींनी `वाह कविराज, आपने तो कमाल कर दिया!'' म्हणत यांना स्वत:जवळ बसवून घेतलं आणि आपल्या खिशाचं पेन या तरुण स्वयंसेवक-कवी-गायकाच्या खिशाला लावलं!

कुठला तरी आदिवासी भागातला एक मुलगा येरवड्याला यांच्या बराकीत स्थानबद्ध होता. सर सारखं काय वाचतात, काय लिहितात याचं त्याला कुतुहल वाटायचं. तो सारखा यांच्याभोवतीच असायचा. तुम्ही काय लिहिता, मला सांगता? असा हट्ट त्याने केला. तेव्हा यांनी घरी लिहिलेलं पत्र त्याला वाचून दाखवलं. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ``किती छान लिहिलं आहे तुम्ही! मलाही घरची आठवण येते. मलाही पत्र पाठवायचं आहे.''
``मग लिही नं.. मी तुला अंतर्देशीय पत्र देतो, तू लिहून काढ.''
``नको, सर तुम्हीच लिहून द्या.'' त्याचा आग्रह.
मग त्याच्या घरची सर्व माहिती विचारून घेऊन यांनी त्याला एक छान मजकुराचा कागद लिहून दिला. वाचूनही दाखविला. कोरं पत्र दिलं आणि ``आता तू हा मजकूर तुझ्या अक्षरात लिही'' म्हणून सांगितलं.
दोन दिवसांनी तो लिहिलेलं पत्र घेऊन आला. ``हं, आता वाचून दाखव.'' हे म्हणाले.
``सर, तुम्ही वाचा. मला वाचता येत नाही.''
हे चकित झाले. ``अरे, तुला वाचता येत नाही, तर मग लिहिलंस कसं?''
`तुमची अक्षरं बघून मी तश्शी या कागदावर काढली.'' हे आश्चर्याने थक्क झाले. सारा मजकूर त्या पत्राप्रमाणे नीटनेटकेपणाने त्या मुलाने जसाच्या तसा उतरवला होता. पण त्यातलं एक अक्षरही त्याला वाचता येत नव्हतं.

मार्च १९७७. देशात निवडणुका जाहीर झाल्या होत्या. विस्मय वाटावा असे निवडणुकांचे निकाल जाहीर होत होते. राजबंद्यांची सुटका झाली. यांचा धाकटा भाऊ दिल्लीला एअरफोर्समध्ये स्पॅड्न्न लीडर होता. आई-बाबा त्यावेळी त्याच्याकडेच होते. सुटकेनंतर त्यांना भेटायला हे दिल्लीला गेले. जनता पक्षाचं  सरकार स्थापन झालं होतं. कारागृहात यांच्याबरोबर रवींद्र वर्माही होते. आताच्या जनता सरकारमध्ये ते गृहमंत्री झाले होते.
हे त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेले. बाहेर खूप माणसं त्यांना भेटायला बसली होती. यांनी एका कागदावर आपलं नाव लिहून तो तिथल्या कर्मचाऱ्याबरोबर आत पाठवला. ते नाव वाचलं मात्र, वर्माजी स्वत: खुर्चीतून उठून यांना न्यायला केबिनच्या दारापर्यंत आले. हाताला धरून खुुर्चीत बसवलं. गप्पागोेष्टी झाल्या. जेलमध्ये यांची व्याख्यानं, गीतं त्यांनी ऐकली होती.
``गोडसेजी, बताईये.. मै आपकी क्या सेवा करूँ?''
``सेवा? नही, नही! मै सिर्फ आपसे मिलने के लिए आया हूँ!''
``अरे, कुछ मांगो तो.. मै आपको दे सकता हूँ!'' -यांनी विनम्रपणे हात जोडले. साऱ्या स्थित्यंतरानंतरचा तो आनंद अपूर्व होता.
``मुंबईत एखादा फ्लॅट नाही का मागून घ्यायचा सवलतीत!'' इकडे कुणीतरी म्हणालं, हे फक्त हसले.

नागपूरच्या योगाभ्यासी मंडळाचे संस्थापक परमपूज्य योगमहर्षी जनार्दनस्वामी हे यांचे सख्खे काका. अनेक विद्यांत पारंगत, योगप्रसारासाठी आयुष्य वेचणारे, अनेकांचे मार्गदर्शक, अयाचित संन्यासी, अनेक सांसारिक लोकांना मोलाचे मार्गदर्शन देणारे. नागपूरला त्यांच्या पुण्यतिथीला आम्ही गेलो होतो. सर तेथे म्हणाले, `मीही खरा याच मार्गाने जायचा, पण वाट थोडी वेगळी झाली. मला फार लहान वयात संघ भेटला. मी त्यात दंग झालो.''
-मंदाकिनी ना. गोडसे, देवगड
फोन- ९४२१२६४००८ 

लोकशिक्षक संत गाडगेबाबा...
जनसागराला बाबा आवर्जून सांगत `मायबाप हो! माझा हा नाशिवंत देह डोक्यावर घेऊन तुमचे कल्याण होणार नाही. त्याने तुम्हाला पुण्य लाभणार नाही. मी सांगितलेले विचार आपल्या डोक्यात पक्के भरवा. त्या विचारानुसार आचरण करा. इतरांनादेखील तसे आचरण करायला शिकवा. त्यायोगे तुम्हाला सत्य पुण्याचा लाभ होऊन तुमचे तसेच तमाम मानव जातीचे कल्याण होईल. मानवसेवा हीच खरी ईशसेवा होय.'
या लोकशिक्षकाचा जन्म १८७३ साली २३ फेब्रुवारी महाशिवरात्रीला झाला. वडिलांचे नाव झिंगराजी जाणोरकर. ते अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव(शेंडगाव) येथे राहात होते. त्यांच्याकडे चांगला जमीनजुमला होता. अनेक चाहते त्यांच्या संगतीला असत. ते सण-उत्सवात अंगती-पंगतीसाठी सढळ हाताने खर्च करीत. झिंगराजीने बाळाच्या बारशात सर्व जातीबांधवांच्या  सरबराईत पाण्यासारखा पैसा उधळला. बाळाचे नाव डेबू ठेवण्यात आले. त्यांचा देवभोळेपणा, अज्ञान, व्यसनाधीनता, निरक्षरता यांमुळे त्यांना दारिद्य्र आले. जमीनजुमला, घरदार सारे सावकारांच्या घशात गेले. दारूने त्यांचे शरीर खंगले.
लहानगा ८वर्षांचा डेबू. डेबूचे मामा चंद्रभानजी यांनी बहीण सखुबाई व भाच्यास त्यांच्या घरी दापुऱ्यास नेले. डेबु बालपणापासूनच जिज्ञासू, चिकित्सक, सत्यवचनी आज्ञाधारक होता. डेबूने मामाची गुरे रानात चारावयास नेणे सुरू केले. गुराखी मुले, सोबती मिळाले. तो बुद्धीचा तल्लख असल्याने  त्याला अनेक ओव्या, भजने तोंडपाठ होती. त्याची बुद्धी प्रगल्म बनू लागली होती. तो फार समंजस, सहनशील होता. एक दिवस रानात मित्रांसोबत सगळयांच्या शिदोऱ्या एकत्र करून एकत्र बसून जेवले. हे ऐकून सायंकाळी गावात एकच कल्लोळ उसळला. डेबूने पोरांना बाटवले.
डेबूने सर्व कामे शिकून घेतली. शेतीमध्ये पिकू लागले. कर्ज फेडून शेत सोडविले. १८९२ साली त्याचे लग्न कुंतीबाई नावाच्या मुलीसोबत लावून दिले. पण त्याचे मन संसारात रमत नसे. अन्याय, अत्याचार, कुप्रथा, अज्ञान, रोगराई, दारिद्य्र, शोषण पाहून त्याचे हृदय हेलावून जाई. त्याला वैराग्याने पछाडले. १९०५ साली घरची सगळी मंडळी झोपी गेली असता, हातात काठी घेऊन तो घरापासून दूर निघून गेला. वेड्यापरी १२ वर्षे फिरून अनेक राज्य पायतळी घातले. लोकजीवन धार्मिक समज-गैरसमज, वेश, भाषा यांचा अभ्यास केला. १९१७ अंगात ठिगळाचे वस्त्र, खांद्यावर गोधडी, डोईवर खापरी, हाती गाडगे, काठी व खराटा असा वेष धारण करून लोकसेवेला प्रारंभ केला. कोणत्याही गावी जावे, सकाळी गावगल्ल्या झाडून रात्री त्याच गावात कीर्तन ठोकून स्वच्छतेच्या महत्वापासून मानवी विकृती, अज्ञान, अंधश्रद्धा, कुप्रथांची घाण साफ करण्यास सुरुवात केली.
`गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला' या गजरात गुंगवून जिव्हाळयाचा संदेश ते देत. बाबांचे  कार्य चालू असताना अनेक दानशूरांनी धनराशी बाबांना अर्पण केल्यात. बाबांनी त्या पैशाला स्पर्श केला नाही. त्यांनी लोककल्याणासाठी म्हणजे नद्यांना घाट बांधणे, गोशाळा बांधणे, वसतिगृह काढणे, अन्नछत्र चालविणे यासाठी खर्ची घातले. ८०व्या वर्षी २० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव, अमरावती येथे सर्व सहकाऱ्यांसमोर चालताबोलता प्राण सोडून त्यांनी निर्वाण केले.
-श्रावण शिवरामजी सोनोने, यवतमाळ
फोन- ९२२६३९०९०५

सखे सोबती 
आम्हा दोघांनाही प्राण्यांची खूप आवड आहे. एका मित्राने लॅबरेडॉर जातीची ५-६ वर्षांची कुत्री यांना देऊ केली. आम्ही नुकतेच स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो, त्यामुळे ही अनोखी भेट आम्ही मनापासून स्वीकारली. लॅबरेडॉर ही बुद्धिमान कुत्र्यांची जात. पोलीस खाते गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी  बहुतांशी या जातीचा वापर करतात.
मित्राच्या घरी आम्ही अधून-मधून जात असू. त्यामुळे `शेरी'ची तोंड ओळख होती. थोड्या अवधीतच शेरी आमच्या घरी रुळली! तिच्याकरता ठेवलेल्या छोट्या मोरीमध्ये ती सर्व विधी करायची, इतरत्र कुठे घाण करत नसे. बाजारात मिळणाऱ्या पेडिग्री नावाच्या गोळयाच(पिलेट्स) फक्त ती खायची. शेरी चांगलीच धष्टपुष्ट झाली.
माझे सासरे (बाबा) त्यांच्या रोप वाटिकेवर जाताना शेरीला बरोबर नेत. बाबा निघाले की शेरी पळत जाऊन आपला पट्टा तोंडातून आणून बाबांच्या पुढ्यात टाके. गाडीची डिकी उघडून दिली की उडी मारून ती बसायची. सकाळी दारात पडलेला पेपर आणून द्यायची. ती कधी कुणाला चावली नाही, अंगावर धावून गेली नाही. नवखा माणूस घरी आला तर तिचे त्याच्यावर बारीक लक्ष असे. घरातील कुणी आल्याशिवाय कुठल्याच वस्तूला हात लावू देत नसे. आजारी असताना डॉक्टरांनी इंजेक्शन देईपर्यंत ती शांत पडून होती. `पाय बांधल्याशिवाय सगळे सोपस्कार करू देणारी ही कुत्री प्रथम पाहिली!' असे डॉक्टर म्हणाले. शेरी आमच्या घरी ८-१० वर्षे होती. ती मेल्यानंतर मुले तर अक्षरश: रडत होती.
नंतर आम्ही गावठी पर्शियन असे संकरित मांजर आणले. परी नावाची ही भाटी(मांजरी) शुभ्र पांढरी व हिरवट डोळयांची होती. ती फक्त क्रॅटफूड (मांजराच्या अन्नाच्या गोळया) पिलेट्स खात असे. दुधाचं पातेलं समोर असलं तरी ढुंकून बघत नसे. बाल्कनीत तिला पारवा सापडला की झडप घालून तिला मारून माझ्यापुढे आणून टाकायची. मोठ्या ट्न्े मध्ये तिला शी-शू करण्यासाठी लिटर(चाळलेल्या बाळूसारखा) ठेवलेले असे. पूर्वी मांजराकरता एखाद्या कोपऱ्यात राख पसरून ठेवत. एकदा पावसाळयात उडी मारायच्या प्रयत्नात परी आमच्या ९व्या मजल्यावरून डकमध्ये पडून मेली.
नंतर शुद्ध पर्शियन जातीचा एक बोका (पिलू) आणला. `आइनस्टाईन' असे नामकरण केले. काळसर रंगाचा, पिवळे डोळे असलेला हा बोका गलेलठ्ठ होता. दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाने घाबरून त्याने दडी मारली ती चार दिवस! यानंतर थोड्याच दिवसात तो मेला. फटाक्याच्या आवाजाने त्याचा हार्ट फेल झाला असावा.
हल्ली आमच्याकडे एक पर्शियन हिमाालयीन जातीच्या संकराची मांजर (भाटी) आहे. तिचे नाव ऑरी. हुशार मांजरी आहे. सकाळी ६ वाजता आमच्या बेडरूमच्या दारावर नख्याने खरवडून मला उठवते, बाल्कनीतील झाडांना मी पाणी घालू लागले की जवळच बसते. ऑफिसमधील टेबलावर असते तसली बेल पंज्याने वाजवते, शेकहँड करते. डाऊन डाऊन म्हणाले की लोळण घेते. `जंप' म्हटले की एका रिंगमधून उडी मारते. स्टँडअप म्हटलं की उभी राहते. सर्वजण `ऑरीची' ही सर्कस पाहून चकित होतात.
काम करून दमल्यावर मी ऑरीला क्षणभर उचलून छातीशी धरते. त्याने माझे श्रम पळून जातात! धनंजय (डॉ.केळकर) हॉस्पिटलमधून घरी आल्याबरोबर प्रथम तिला उचलून घेतो, गप्पा मारतो. दिवसभर ती मुलांच्याभोवती असते.
-स्वाती केळकर, तारा टॉवर्स, कोथरूड, पुणे
फोन- (०२०) २५४३२८१३

मेळ घातलेला समारोप
कोणत्याही स्थळी कोणत्याही देवतेची सामुदायिक आरती असते, तेव्हा शेवटी शेवटी धूपारती- शेजारती होते; -आणि मग  `आ%ता घ्घालीन लोटांगण....'  सुरू होतं. याला जोडून काही प्रार्थना-जप म्हणायची प्रथा पडली आहे, त्यांचा तसा क्रम, सयुक्तता, सलगता, संलग्नता असे काही नाही. प्रथा आहे म्हणजे प्रथाच.
गणपतीच्या पूजेचा  या अभंगाशी किंवा भजनांशी तसा काहीच संबंध नाही. पण बाप्पापुढं आरती झाली की, `घ्घालीन लोटांगण...'चा तालठेका सुरू होतो. १३व्या शतकातल्या संत
नामदेवाच्या त्या दोन ओळी -

`घालीन लोटांगण वंदीन चरण डोळयांनी पाहीन रूप तुझे
प्रेमे आलिंगिन आनंदे (अनन्य?) पूजिन भावे ओवाळिन म्हणे नामा ।'

नंतर `त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु: सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव' - हे कडवं आहे आठव्या शतकातील शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातलं.

`कायेन वाचा मनसेंद्रियेद्वा बुध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्
करोमि यद् यद् (बरेचजण `यज्ञं' म्हणतात - ते चूक) सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ।' हे कडवं आहे भागवत पुराणातील, त्याचे नेमके शतक माहीत नाही.

पुढचा-जप - `अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र्ं भजेत् ।'
हे कडवं शंकराचार्यांच्या अच्युताष्टकातील आहे. आणि या नामजपाचा शेवट आहे,
`हरे राम हरे राम,  राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे' ही रचना आि स पूर्व १५०० मधील असावी.
                            -(कोल्हापूर संघाच्या `नवस्नेह' च्या आधारे) 

अनेकानेक पैलूंचे व्यक्तिमत्व : प्रभाआजी केळकर
गोव्यातल्या लोकांची अनेक व्यवधानं असतात. कलावंतांच्या गोव्यात सारस्वतांची  मांदियाळी असते. अेवढासा मुलुख, पण निसर्गाच्या सांन्निध्यामुळं माणसांची मनंही समृद्ध करत असतो. प्रभा केळकर हे असं अेक नाव. वनस्पतीशास्त्रज्ञ असलेल्या प्रभाताआी या नामवंत शिक्षिका, कलाकार, सामाजिक कार्यकर्त्री, गृहिणी... आणि सर्वोपरी अेक परोपकारी विदुषी! अशा व्यक्तीची जातकुळी कोणती? -सांगता येत नाही.
`माझे विद्यार्थी हे माझ्यासाठी देवाच्या ठिकाणी आहेत, आपण आज जे काही आहोत ते आमच्या विद्यार्थ्यांमुळेच आहोत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांशी पोटच्या पोरांप्रमाणेच वागलो; गरीब-श्रीमंत किंवा उच्च-नीच असा कोणताही भेदभाव आमच्या मनात आला नाही. शिक्षकांच्या दृष्टीने सगळे विद्यार्थी सारखेच असले पाहिजेत. जो कोणी त्यांच्यात असा फरक करतो तो खरा शिक्षकच नव्हे'.हे प्रभाताइंर्चे म्हणणे आहे. आजकाल शिकवण्या आणि क्लासेस यांचे पेव फुटले आहे. त्याबद्दल त्या म्हणतात, `मी माझ्या आयुष्यात कधी शिकवणीला गेले नाही किंवा मी कुणाची शिकवणी घेतलेली नाही. परंतु माझ्याकडे जो कोणी कोणतीही अडचण घेऊन आला त्याला मी वेळ काळ न पाहता मनापासून मदत करीत राहिलेले आहे. आज माझ्या उतारवयात आणि प्रकृतीच्या अडचणीतही विद्यार्थी माझ्याकडे येतच असतात आणि मी त्यांच्यापुढे जीवशास्त्राची पुस्तके पसरून बसलेली असते.' त्या हसतहसत पुढे म्हणतात की, `मी शिक्षकीपेशात चाळीस वर्षांचा प्रदीर्घ टप्पा ओलांडला. माझे विद्यार्थी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत चमकत असलेले पाहायला मिळतात. पोलीस खात्यापासून उच्च स्थानीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यापर्यंत माझी पोरं काम करीत आहेत. ती सगळी माझ्याबद्दल खूप आदर दाखवतात.
माझ्या आयुष्यात महत्वाकांक्षा होती की, डॉक्टरेट पदवी मिळवायची. वयाच्या ५१व्या वर्षी, सागरीशास्त्र(मरीन सायन्स) या विषयातील डॉक्टरेट मी मिळवली. तेल व नैसर्गिक वायू(ओएनजीसी) प्रकल्पावर असताना मी वनस्पती शास्त्रातील हे संशोधन केले. त्यानंतर गोव्यातील धेंपे कॉलेज येथे अध्यापनाचे काम केले.
शिक्षकी पेशाव्यतिरिक्त जास्तीचा वेळ त्यांनी एक विशेष छंद जोपासण्यात घालविला. औषधी वनस्पती आणि त्यांचे फोटोग्राफस् व माहिती ते जमवत राहिल्या. समुद्रातली पोवळी, शंख-शिंपले जमा करण्याबरोबरच साड्यांवरती उत्तम कशिदाकाम करण्यातही त्यांनी मोठे कौशल्य मिळविले. शंख शिंपल्यातून अनेक वस्तू तयार करण्याच्या हस्तकलेबद्दल त्यांना पहिले पारितोषिकच मिळाले. अंटार्टिकाहून आणलेले छोटे खडक, निळे प्रवाळ, उजवा शंख-शाळीग्राम, जवाहिर घडविताना वापरला जाणारा अंबर नावाचा टणक पदार्थ अशा दुर्मीळ वस्तू त्यांच्या संग्रहात आल्या. अमेरिका क्रॅनडा येथपासून भारताच्या विविध प्रांतातील दुर्मिळ निसर्ग संपत्तीचे अनेक फोटो व माहिती त्यांच्याकडे आहे. शेवाळी प्रवाळचे अत्यंत दुर्मिळ असे नमूने त्यांच्याकडे आहेत. यातल्या कितीतरी वस्तू आणि दुर्मिळ माहितीचा संग्रह त्यांनी धेंपे कॉलेजला दिला आहे.
प्रभा केळकर यांचे लहानपण विजापूरला गेले नंतर त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकल्या. पुणे विद्यापीठाची एमएससी केल्यानंतर प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.पी.एस.महाबळ यांच्या हाताखाली सहाय्यक संशोधक म्हणून त्यांनी काम केले. १९६३ पासून त्या गोव्यात प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. तथापि मुंबईच्या टाटा इंन्स्टि.मधून राष्ट्नीय सेवा योजनेच्या दृष्टीने त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि त्यांचे पती प्रोफेसर गजानन केळकर यांना सामाजिक उपक्रमात त्या साहाय्य करू लागल्या. आज हे दांपत्य ढळत्या वयात आहे. बाकी प्रपंच आपापल्या ठिकाणी सुखात आहे तथापि वयानुसार येणारे काही आधुपन बाजूला ढकलत त्या सकारात्मक आनंदी मनाने राहात आहेत.
संपर्क -प्रभा केळकर, करंजाळे (टाका), पणजी(गोवा)
फोन-९१६८००७४०४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन