Skip to main content

14July 2014

कर्मयोग्याची लोकमान्यता
२३ जुलै (१८५६) हा टिळकांचा जन्मदिन आणि ०१ ऑगस्ट (१९२०) निर्वाणदिन. या `बाळा'ची जन्मस्थिती क्षीण होती आणि निर्वाण स्थिती भव्योदात्त लोकमान्य बनली! मधल्या ६४ वर्षांची विलक्षण तपश्चर्या त्यास अर्थातच कारणीभूत झाली. 
(गंधर्व-वेद प्रकाशनचे `कर्मयोगी लोकमान्य' हे चिकित्सक चरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्यातून संपादित)

जन्म 
बाळ गंगाधर टिळकांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे होय.  टिळकांचे `श्रीतिलकयशो%र्णव' नामक संस्कृत चरित्र लिहिणाऱ्या विदर्भातील माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांनी या कोकणच्या भूमीचे वर्णन केले आहे.
भूमि: शस्त्रबलविदिता रामेण सिन्धो: पुरा
पुण्यश्लोक जति: खनिश्च महती मनुष्यरत्नाश्मनाम् ।
पूता सिद्धतपोधनाश्रमपदैर्या पुण्यम् सेविता
प्राज्ञै: कोङ्कणसंज्ञितेयममला देवर्षिसंघैर्मुदा ।।
अर्थ असा की, `पुण्यवंतांची जन्मदात्री व मनुष्यरत्नांची मोठी खाण असलेली, पूर्वी परशुरामाने शस्त्रबलाने हस्तगत केलेली ही समुद्रभूमी प्रसिद्ध आहे. सिद्धांच्या आणि तपोधनांच्या आश्रमांनी पावन झालेली, विद्वानांनी जिची सेवा केली आहे अशी ही देव आणि ऋषी यांच्या समुदायांनी आनंदित झालेली कोकण नावाची पुण्यभूमी आहे.''
पंचद्रविडांपैकी मानल्या गेलेल्या चित्पावन ब्राह्मणांच्या शांडिल्य गोत्रातील टिळकांच्या कुळात हे बालक २३ जुलै १८५६ या दिवशी जन्मास आले. शांडिल्य गोत्रातील एक ऋषी वैश्वानर याच नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी अग्नीची उपासना भक्तिभावाने आणि दृढनिश्चयाने केली आणि ते स्वत:च अग्निरूप म्हणजे वैश्वानर झाले. याच गोत्रातील आणखी एक प्रसिद्ध ऋषी गोत्रनामाने-म्हणजे शांडिल्य असेच ओळखले जातात. टिळक घराण्याचे कुलदैवत लक्ष्मीकेशव. कोकणस्थांच्या गुणांची कल्पना असल्यामुळे ब्रिटिश सरकारचा त्यांच्यावर पहिल्यापासूनच कटाक्ष होता. गव्हर्नर रिचर्ड टेंपलपासून टाइम्सचा प्रतिनिधी व्हॅलेंटिन चिरोलपर्यंत कितीतरी इंग्रजांकडून कोकणस्थांना शिव्याशापांच्या रूपात गेलेली शिफारसपत्रे सापडतात. कोकणस्थांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे प्रगटीकरण त्यांच्या देशबांधवांपुढे करून त्यांना कोकणस्थांची भीती घालून फूट पाडण्याचे राजकारणही इंग्रजांनी केले.
टिळकांकडे चिखलगावच्या खोतीचे वतन होते. संसाराची सारी जबाबदारी गंगाधरपंतांवर पडली. ती निभावण्यासाठी त्यांनी मालवण शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. गंगाधरपंतांनी संस्कृत भाषेचे व्याकरण व गणित या विषयांत प्रभुत्व संपादन केले. त्याचा फायदा स्वत: लोकमान्यांना बालवयात भरपूर झाला. त्यांचे संस्कृत आणि गणित हे विषय घरच्या घरीच इतके तयार झाले की शाळेतील अभ्यासक्रम पोरखेळाइतका सोपा झाला.
गंगाधरपंतांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई. त्यांना एकापाठोपाठ तीन मुलीच झाल्या. साहजिकच या दंपतीला पुत्रमुख पाहण्याची तीव्र आस लागून राहिली. एक परिचित बाई नर्मदाबाई सोमण यांनी पार्वतीबाइंर्ना आदित्य व्रत करायचा सल्ला दिला. व्रत अत्यंत कडक असून स्वत:ची तब्येत तोळामासा असतानाही पार्वतीबाइंर्नी ते घेतले. पुढच्या वर्षाच्या श्रावणात बाइंर्ना चौथ्या अपत्याची चाहूल लागली.
ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवायचा की त्या शास्त्राने सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट घडली असेल तर तिला घृणाक्षरन्यायाने योगायोग म्हणायचे हा भाग वेगळा. परंतु गंगाधरपंतांच्या जन्मकुंडलीतील पाचव्या म्हणजे सुतस्थानी केतू आणि मंगळ या ग्रहांची युती आहे आणि ती नवसासायासाने पुत्रप्राप्ती सूचित करते. पार्वतीबाइंर्ची प्रकृती अधिकच अशक्त झाली. दि.२३ जुलै १८५६ (आषाढ कृष्ण षष्ठी शके १७७८) सोमवार, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र या दिवशी सूर्योदयानंतर दोन घटकांनी रत्नागिरी येथील सदोबा गोरे यांच्या वाड्यात पार्वतीबाई पुत्ररत्न प्रसवल्या. जन्मलेले बाळ अत्यंत अशक्त होते. जन्मानंतर त्याचे रडायला पंधरावीस मिनिटे घेतली. त्याचे मस्तक बिलबिलीत होते. ते नीट होण्यासाठी तुपाने टाळू भरण्याचा उपक्रम काही महिने करावा लागला.
जन्मानंतर बाळ आणि बाळंतीण यांच्यापैकी कोण जगेल व कोण मरेल याची खात्री देता येत नसल्याने गंगाधरपंतांना `मुलगी झाली' असे लटकेच सांगण्यात आले. (हेतू एवढाच की मुलगी झाली आणि ती गेली असे झाले असते तर त्याचे फारसे दु:ख झाले नसते.)
गंगाधरपंत गणिती असून परंपरेवर श्रद्धा ठेवणारे असल्यामुळे त्यांनी स्वत:च बाळाचे जन्मटिपण तयार केले. टिळक ज्योतिषाला फारसे महत्त्व देत नसत. कर्क लग्नाच्या पत्रिकेतील नवम म्हणजे भाग्यस्थानातील चंद्र आणि गुरू यांची युती गजकेसरी योगाची द्योतक आहे तर व्यय म्हणजे द्वादश स्थानाची शनी बुध युती बंधनयोग दर्शवते. नामकरणाच्या वेळी त्याचे नाव `केशव' असे ठेवण्यात आले. पण थोरल्या बहिणी आपल्या लहान भावाला लाडाने `बाळ' म्हणून हाका मारत, तेच नाव कायम झाले. समकालीन लोक त्यांना `बळवंतराव' म्हणू लागले असावेत.
थोडा मोठा झाल्यानंतर बाळाची प्रवृत्ती आजोबा आणि वडील यांचे अनुकरण करण्याची झाली. त्यामुळे त्याचे ब्रह्मकर्माचे संस्कार अगदी पक्के झाले. बोबड्या शब्दांमध्ये तो संस्कृत श्लोक पाठ म्हणू लागला. एका श्लोकासाठी एक पैसा बक्षीस हा क्रम तो साडेतीन वर्षांचा असताना सुरू झाला. त्यामुळे शाळेत अधिकृतपणे प्रवेश घ्यायच्या आतच शालेय अभ्यासक्रमातील लक्षणीय हिस्सा त्याने आधीच तयार करून ठेवला होता. १८६४ मध्ये त्याचे उपनयन झाले. तोपर्यंत (८ व्या वर्षी) पूर्णांक, अपूर्णांक, रूपावली, समासचक्र, अर्धाधिक अमरकोश येथपर्यंत त्याने मजल मारली होती. संस्कृत आणि गणितात बाळाने जी पारंगतता बालपणीच संपादन केली तिचे बरेचसे श्रेय वडिलांच्या शिक्षणपद्धतीला जाते.
***
निर्वाण
कलकत्त्याच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्षपद टिळकांनी स्वीकारावे अशी पं.मालवीय प्रभृतींची सूचना होती; परंतु खुद्द टिळकांनाच ती मानवली नाही. टिळक म्हणाले, ``महात्मा गांधींची असहकारितेची तत्त्वे कोणाही विचारी पुरुषास अमान्य होण्यासारखी नाहीत.तथापि ती निरनिराळया प्रमाणात अंमलात येण्याचा संभव असल्यामुळे कलकत्त्याच्या राष्ट्नीय सभेत २-४ तट दृष्टीस पडल्यावाचून राहणार नाहीत. या तटांमुळे कलकत्त्याच्या राष्ट्नीय सभेचे २-३ तुकडे होण्याचा संभव आहे. हे तुकडे पडू नयेत म्हणून जोराची खटपट करावी लागेल. राष्ट्नीय सभेची शक्ती या नात्याने जूट कायम ठेवण्याचा उद्योग मला करावा लागेल. ही तोंडमिळवणी तडजोडीने आणि मोकळेपणाने मला करता यावी, म्हणून मी अध्यक्षपद स्वीकारले नाही.''
कलकत्त्याच्या विशेष अधिवेशनानंतर असहकारितेची चळवळ जोरात सुरू होईल आणि सरकार टिळक व गांधी या दोघांनाही अटकेत ठेवेल अशी टिळकांची अटकळ होती. ``अशा रितीने नोकरशाहीच्या अटकेत पडण्यापेक्षा विलायतेस वर्ष-सहा महिने जाऊन राहणे बरे, असे मला वाटत असल्यामुळे मुंबईस गेल्यावर तशा व्यवस्थेला अंशत: मी सुरुवात करणार आहे.'' असे त्यांनी बोलून दाखवले. त्यांनी विठ्ठलभाई पटेलांना सांगितले होते की, लंडनच नव्हे तर न्यूयॉर्क, पॅरिस, टोकियो इत्यादी महत्त्वाच्या शहरात भारताची प्रसिद्धी आणि माहितीकेंद्रे सुरू करून संपूर्ण जगातील राष्ट्नंना भारतविषयक योग्य ती माहिती पुरवून भारताविषयी अनुकूल लोकमत करण्याचेही त्यांच्या मनात आहे.
मात्र विधिलिखित काही वेगळेच होते. टिळकांची प्रकृती खूपच खालावली होती. २० जुलैला टिळकांना फुरसत होती. मधल्या काळात आलेल्या तापाकडे तसे दुर्लक्षच झाले होते. ताप मलेरियाचा आहे अशी समजूत झाली होती. २० तारखेला दिवाण चमनलाल टिळकांच्या समाचारास आले. त्यांनी टिळकांपुढे अखिल भारतीय मजूर परिषदेचे उपाध्यक्ष होण्याचा प्रस्ताव ठेवला. टिळकांनी त्याला आनंदाने संमती दिली. चर्चेच्या ओघात चमनलाल यांनी टिळकांना मोटारीतून फेरफटका मारण्याची विनंती केली. ती मान्य करून टिळक मोटारीत बसून बाहेर पडले. त्यांची मोटार उघडी असल्यामुळे टिळकांना पावसाळी सर्द हवा बाधली असल्याचीही शक्यता आहे. त्यांचा ताप रात्री वाढला आणि त्यांनी अंथरुण धरले. डॉक्टरांनी नीट तपासणी केली, तेव्हा टिळकांचा ताप मलेरियाचा नसून न्यूमोनियाचा असल्याचे निष्पन्न झाले. हा ताप १०४ डिग्रीपर्यंत वाढला.
सर्व महत्त्वाची मंडळी टिळकांना पाहायला आली. गांधीजी मुंबईत परत आले. २९ जुलै रोजी त्यांनी मुंबईत खिलाफतीविषयी जाहीर सभा घेऊन १ ऑगस्टपासून आपण चळवळ करणार असल्याचे सांगितले. २७ तारखेपर्यंत टिळकांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते शुद्धीवर होते. त्यांची विनोदबुद्धीही नेहमीप्रमाणे जागृत होती. ३० तारखेला भेटायला आलेल्या गांधींना त्यांनी शिष्टाचार म्हणून नमस्कार केला, परंतु ते काही बोलू शकले नाहीत.
३१ जुलैच्या रात्री आणि १ ऑगस्टच्या पहाटे टिळकांची प्रकृती एकदम गंभीर झाली. भवितव्य लक्षात आल्यावर सर्व उपचार थांबवून टिळकांचा देह पलंगावरून जमिनीवर अंथरलेल्या दर्भासनावर ठेवण्यात आला आणि या दर्भासनावरच टिळकांनी अखेरचा श्वास सोडला.
टिळक पुण्याचे असल्यामुळे त्यांच्या पुण्यातील अनुयायांना त्यांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावेत असे वाटणे स्वाभाविक होते; परंतु टिळक अखिल भारताचे नेते होते आणि मुंबई हे खऱ्या अर्थाने भारतीय स्तरावरील शहर असल्यामुळे तो मान मुंबईलाच मिळणे उचित असल्याचे खापडर््यांप्रमाणे अनेकांचे मत पडले. सर कावसजी जहांगीरांनी आपले वजन वापरून टिळकांचे दहन चौपाटीवर करण्याची परवानगी मिळवली.
१ ऑगस्ट रोजी टिळकांची अंत्ययात्रा सरदारगृहामधून निघाली, तेव्हा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. परंतु त्याची तमा न बाळगता लक्षावधी लोक तिच्यामध्ये सामील झाले होते. टिळकांचे अंत्यसंस्कारकर्म ब्राह्मणी पद्धतीने करायचा काही लोकांचा बेत हाणून पाडून स्वत: महात्मा गांधी, मौलाना शौकत अली यांनी टिळकांच्या शवाला खांदा दिला.
मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी उभारलेल्या चंदनाच्या चितेवर टिळकांचा देह ठेवण्यात आला. काकासाहेब गाडगीळांनी दिलेल्या उपमेचा उपयोग करून सांगायचे झाल्यास स्वातंत्र्याची हरिभजनाची वीणा टिळकांकडून गांधींच्या खांद्यावर आली होती. `हरिभजन अबाधित राहिले.'
लेखक पत्ता - २२, प्रोफाईल ईडन
प्रभात रोड, गल्ली नं.८, पुणे ४११००४
दूरध्वनी - (०२०) २५४२३८४९
मोबा. ९८२२८३२८९६

समाजासाठी सत्ता हवी
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर श्री.अमीत शहा यांची नियुक्ती झाली आहे. आजपर्यंतच्या दहाबारा वर्षात त्यांनी गुजरातेत पक्षाच्या बाजूने जी कामगिरी केली, आणि परवाच्या लोकसभेला विशेषत: उत्तरप्रदेश त्यानी गाजवला, त्यावर खूश होऊन त्यांना हे पद देण्यात आले हे तर खरेच. त्यांचे निवडणुका जिंकण्याचे कौशल्य त्यांच्या पक्षाने मान्य केले आहे, पण दबक्या आवाजात ते त्यांच्या विरोधकांनीही मान्य केलेले आहे. येत्या चार महिन्यात महाराष्ट्नसह चारपाच राज्यांत, आणि त्यानंतरच्या दोन वर्षांनी जम्मू-काश्मीरसह अन्य काही राज्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. अमीत शहा त्या सर्व जिंकून देतील असा एक भाव प्रगट होत आहे. त्या पक्षावर ज्यांची श्रद्धा भक्ती आहे त्यांना तो भाव एकवेळ शोभून दिसेल, परंतु राजकीय चळवळींच्या अनुषंगाने समग्र समाजचिंतनाचे भान आणले तर तेवढ्या श्रद्धेने भागणार नाही, तिथे सबूरीने विचार झाला पाहिजे.

मुळात राजकीय पक्षाचे उद्दिष्ट सत्ता हेच तर असते. म्हणून सारे कौशल्य पणाला लावून सत्ता मिळविण्याला पर्याय नाही. परंतु सत्ता मिळाल्यानंतर पुढे काय? सत्ता माणसाला भ्रष्ट करते, आणि निरंकुश सत्ता निरंकुश भ्रष्टाचार करते असे म्हटले जाते. मग उद्या जर अमीत शहांनी संपूर्ण भारतभरात त्यांच्या पक्षाची निरंकुश सत्ता आणलीच, तर पुढच्या प्रश्नाचे उत्तर त्याच सूत्राने काढावे लागेल ना! सत्ताकारणासाठी राजकारण करायचे हे बरोबरच आहे; पण सत्ता समाजकारणासाठी राबवायची असते हा पुढचा टप्पा दुर्लक्षित होतो याचेही भय सामान्यजनांस असते. एखादा जुलुमशहा पराभूत झाला याचा आनंद असतोच, पण नवा `शहा' सुलतानी करेल अशीही एक अस्पष्ट-अदृश्य सल त्या आनंदयात्रेत असते.

राजकीय पक्ष स्थापन होण्यापूर्वी ती एक सामाजिक म्हणविणारीच संघटना असते. एकोणीसावे शतक संपताना फिरोजशा, अलेकडग्लस व्ह्यूम, अॅनी बेझंट इत्यादींनी `काँग्रेस' म्हणजे संघटना स्थापन केली, नंतर तिला `राष्ट्नीय सभे'चे स्वरूप आले. तरीही `संपूर्ण स्वातंत्र्याची' घोषणा करण्यास त्या संघटनेला १९३० साल उजाडले. तेव्हापासून स्वातंत्र्याची चळवळ भरात आली. अर्थात स्वातंत्र्याचे - म्हणजे भारताच्या सत्तेचे स्पष्ट उद्दिष्ट होते. स्वातंत्र्य हवे म्हणजे सत्ताच हवी असे सर्वच सर्वसामान्यांस वाटत होते. गांधींचे विचार केवळ सत्तेपुरते नव्हते. त्यांनी राजकीय स्वातंत्र्य हे साधन मानले होते. सत्ता-स्वातंत्र्य हे समाजकारणासाठीच मिळवायचे हा त्यांचा उद्देश स्पष्ट होता. म्हणून तर त्यांनी, स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर काँग्रेस विसर्जित करून समाजबांधणी करण्याचा सल्ला दिला. तो कोण मानणार? कारण इतरांना स्वातंत्र्य हे सत्तेसाठी हवे होते. आधीच्या पिढीचे काही बुजुर्ग लोक `इंग्रज बरा होता' असे उद्वेगाने म्हणतात. कारण सुलतान शिरच्छेद करणारच असेल तर तो निदान वेदना तरी कमी देणारा असावा!

समाजकारणाचाच विचार केला तर गेल्या २५-३० वर्षांतील काँग्रेसपक्ष पूर्णत: अपयशी आहे.  सामाजिकतेचा दबाव राजकीय सत्तेवर असणे ही आदर्श व्यवस्था झाली. सामाजिक संघटन म्हणून पक्षाची ध्येये-उद्दिष्टे-निरीक्षणे-अंमल हे राजकारणाला दिशा देणारे हवे. पक्षाध्यक्ष हा त्या अर्थाने सत्ताधारी पदापेक्षा महत्त्वाचा ठरायला हवा. काँग्रेसमध्ये आजपर्यंत सोनिया गांधी मनमोहनसिंगांपेक्षा महत्त्वाच्या ठरल्याच, पण त्या फार वेगळया अर्थाने. तिथे संघटनेचे अध्यक्षपद केवळ राहुल आणि वड्न यांच्यापुरते वापरण्याचा सोनिया गांधींचा तो वकूबच शंकास्पद होता. पूर्वीचे काँग्रेसचे व भारतीय जनता पक्षातील आजवरचे बहुतांश पदाधिकारी समाजाचा सर्वांगी विचार करणारे होते, पण त्यांना सत्ता मिळवता आलीच नाही. इतर पक्षांतील बहेनजी-नेताजी-दीदी-अम्मा इत्यादींच्या समाजकारणाबद्दल बोलण्याजोगे नाही. महाराष्ट्नत राष्ट्न्वादी नावाचा आबा-दादा-साहेब इत्यादींचा कंपू जाणत्या राजाच्या नेतृत्त्वाने राजकारणातही अरेरावी करतो; त्यास समाजकारणाचे काय होय? त्यांना सत्ता हवी असते ती साखर-वाळू-टोल यांसाठी; राजकारण त्यासाठी करायचे!

सामाजिक कार्याचे एक अंग म्हणून सत्ताप्राप्ती, असे जोपर्यंत कोणतेही संघटन मानते तोवर समाजाला आशा आणि विश्वास वाटेल. दुष्काळ पडणे हे नैसर्गिक असते, पण त्या संकटातील दु:ख एकत्र करून समाज बांधण्याची संधी असते. सत्ताधाऱ्यांनी ती घेतली पाहिजे. दुष्काळ आला की टँकरचे कंत्राट मिळवून जास्तीच्या खेपा रिचविण्यासाठी, किंवा रोजगार हमीमध्ये खडी खाण्यासाठी सत्ता वापरणे हे जर सत्तेचे उद्दिष्ट असेल तर कोणी `राजा' अगर `शहा' अगर `मॅडम' संघटनेचा अध्यक्ष झाल्याने फरक पडणार नाही. दु:ख वाटून घेतले तरी ते कमी होते.

आजकाल मोठमोठ्या कंपन्या, कार्पोरेट, आंतरराष्ट्नीय संघटना यांच्यातील मोठी पदे `तरुण-अनुभवी' लोकांस सोपविण्यात येत आहेत. तसे भा.ज.प.ने योजिल्याचे दिसते. आपल्या सभोवती ज्या संघटना आहेत, त्यातही तो दृष्टिकोन हवा आहे. सहकारी बँका, पतपेढ्या, गृहसंस्था, गणेशमंडळे यांतही नवे चेहरे दिसू लागले तर बरे. मुळात त्याही संघटनांचे उद्दिष्ट स्पष्ट हवे आणि प्रत्येक टप्प्यावर त्या दिशेने पाऊलभर तरी पुढे जायला हवे. गणेशमंडळांतून वर्षानुवर्षे डगमगते कालियामर्दन किंवा महाप्रसाद करण्यासाठी अध्यक्ष बदलण्यातून काय साधणार? ज्ञातींची संघटनेही कुलसंमेलनात अडकली आहेत. फारतर तुंबलेल्या शिष्यवृत्त्या आणि अलिप्त वधुवर सूचक; ही सामाजिकता पुरेशी ठरत नाही. आपल्या योजनेतून जुळलेला विवाह विस्कटणार नाही यासाठी सारी संघटनशक्ती पणाला लागली पाहिजे. गृहसंकुलाच्या अध्यक्ष किंवा सचिवपदाची सत्ता वॉचमनला भाजी आणायला लावण्यापुरती असते. आपल्या संकुलात परस्पर सामंजस्य, संवाद, संस्कृती नांदण्यासाठी सामाजिकतेची आस असावी लागते.

समाज किंवा समुदाय प्राधान्यक्रमावर असेल तर राजकारण-अर्थ-शिक्षण-अध्यात्म ही क्षेत्रे उत्तम वापरता येतात. ती वापरण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील सत्ता हवीच, परंतु सत्तेला समाजशरणतेची जोड असायला हवी. शिवाजीने सत्ता राबविली आणि `सिंहासन' स्थापन केले त्यास `रयतेचा राजा' किंवा `श्रीमंत योगी' म्हटले गेले. सुलतानही सत्तेसाठी झगडले, त्यांना समाजाशी देणे घेणे नव्हते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करणे आणि `डीम्ड युनिव्हर्सिटी' काढणे यात फरक असतो.

अमीत शहा कदाचित सत्ता मिळवून देतील, तथापि त्या सत्तेपुढे कुणाचे शहाणपण चालणार नसेल तर सत्तेतून सत्ताभ्रष्ट वाढतील. तसे होऊ नये याची काळजी आहे. आपापल्या स्तराच्या संघटनेला समाजाभिमुख, समाजशरण करणे हे आपापल्या कुवतीला शक्य असते. ते घडले तर मोठ्या राजकीय पक्षांना योग्य दिशा मिळेल.

त्यांनी हे केले; आपण?
प्रत्येक गावात मारुती मंदिर आणि वड-पिंपळाचा पार असतो. गावदेवीच्या किंवा देवाच्या आसपास काही एकर गावरहाटी असते. त्यातील झाड-माड कोणीही ग्रामस्थ तोडीत नाहीत. वड-पिंपळ व काही वृक्ष शेकडो वर्षे जगतात.
काही वर्षांपूर्वी मी पालगडला पोस्टमास्तर असताना अॅग्रिकल्चर कॉलेजमधील श्री.बापट यांचे भाषण झाले होते. त्यांनी सांगितले की, `एक वड व पिंपळ १० हजार वस्तीच्या गावाला ऑक्सिजन पुरवतो.' माझ्या लक्षात आले की प्रत्येक गावात वड-पिंपळ का असतो ते. धर्मशास्त्रात सांगितले आहे, वड आणि पिंपळ यांना पार बांधून संरक्षण दिले जाते. पालगडला मी वडाचा पार बांधून घेतला.
मला माझ्या मामांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. एक सबरजिस्ट्नर होते. त्यांची तब्येत सारखी बिघडे. बारीक ताप, अशक्तपणा, पोटाचे विकार इ. त्यांनी खूप वैद्यकीय उपचार केले पण गुण येईना. माझे मामा विनामोबदला गावठी औषध देत व काही उपाय सांगत. मामांनी त्यांना उपाय सांगितला की, नोंदी करताना पैसे घेणे बंद करा आणि गावातल्या वडाचा पार ढासळला आहे तो नीट बांधून द्या. वटपौर्णिमेला सुवासिनींना उपयोग होईल आणि तुम्हालाही गुण येईल. त्याप्रमाणे त्या गृहस्थांनी केले आणि त्यांना गुण आला! त्यांची तब्येत काही औषधपाणी न करता सुधारली.
राजापूर तालुक्यात पांगरी बु।। म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी शिवानंद नावाचे सत्पुरुष होते. त्या स्थानाला पुतण्याबरोबर गेलो. समाधीचे दर्शन घेतल्यावर हरीहरेश्वर मंदिरासमोर एका पिंपळाच्या पारावर पाटी लिहिलेली होती `७०० वर्षांचा पिंपळ' म्हणजे हे महावृक्ष व देववृक्ष शेकडो वर्षे जगतात. आता `झाडे लावा, झाडे जगवा' ही सरकारी घोषणा आहे, पण पूर्वजांनी पूर्वापार ते केले आहे.
आणखी एक आठवण. माझे वडील पहिल्या पावसात आंब्याच्या कोयी पोत्यात भरून रानात एकेका जाळीत एकेक कोय टाकत असत. त्यामुळे त्या ठिकाणी आमराई झाली, आणि आम्हाला त्याचा पुढे उपयोग झाला!
- वा. मो. बर्वे, पोस्ट लेन, सुर्वे बिल्डिंग, मु.पो.दापोली
(फोन : ०२३५८)२८३०५२


मोठ्या अपेक्षेने मोदींच्या कर्तृत्त्वाकडे लोक पाहात आहेत. मोदींची खरी ओळख अजूनही झालेली नाही. मोदींच्या वर्तणुकीकडे प्रत्येकजण आपापल्या नजरेतून पाहात आहे. संसदेत प्रवेश करताना माथा टेकणारे मोदी, `मी समर्पणाच्या भावनेने कर्तव्य केले' असे भावनाविवश होऊन सांगणाऱ्या मोदींनी त्यांच्या चाहत्यांबरोबर, त्यांच्या बेभान द्वेषात धन्यता मानणाऱ्यांनाही धक्का दिला.
देशप्रेम म्हणजे नेमके काय असते? आपला पक्ष, सर्व जात, पंथ व भाषिक समाज, विरोधी पक्ष, विरोधक यांच्यासह सर्वांचा विकास-असा देशप्रेमाचा आजचा अर्थ मोदींनी दिलेला आहे. शेजारी राष्ट्नंच्या हितामध्ये आपल्या देशाचे हित आहे.
मोदींच्या तडफदारपणाची जाणीव सर्वांना होते. परंतु त्यांची हुकूमशाही आहे अशी टीका होती. मोदींनी मंत्रीसमूहाला कामाला जुंपले हे सत्य आहे. `मोदींचे विरोधक' या विषयावरही प्रबंध करता येईल. विरोधकांची व्याप्ती वाढतच जाते. पुराणकथेतील नरराक्षस ते हिटलरपर्यंत त्यांची तुलना करण्यात आली. एवढ्या विरोधावर मात करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची सावली उंचीवर नेऊन ठेवली. मोदींच्या समर्थकांचे दोन गट - पहिला गट चाहत्यांचा आहे, दुसरा गट त्यांचे नवे रूप पाहून मतपरिवर्तन झालेल्यांचा आहे. काही विरोधकांची फसगत झाली. त्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, कन्नड साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती आहेत. मोदींनी एकेकाळी त्यांच्यावर टीका करणाऱ्या उमाभारती यांना मंत्रीमंडळात स्थान दिले. काँग्रेस सरकारने देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलेले आहे याचाही उल्लेख केला.
शपथविधीच्या वेळी सार्कच्या राष्ट्न्प्रमुखांना बोलावणे ही गरज होती. फक्त निमंत्रणपत्रास मान देऊन श्रीलंका आणि पाकिस्तानने भारतीय कोळयांना मुक्त केले, ही घटना महत्त्वाची आहे. भारतामध्ये सत्तापरिवर्तन झाले तरी सार्क राष्ट्नंना दिलासा देण्याचे काम या निमंत्रणाने केले.
मोदी दररोज १८ तास काम करतात. मंत्र्यांना ते सकाळी ६ वाजता फोन करून अभिवादन करतात. मंत्रीमंडळ आणि मंत्री यांच्या कार्यक्षमतेतच देशाच्या विकासाचे सूत्र दडले आहे हे ओळखणारे पंतप्रधान मोदी आहेत. मोदींचे कर्तृत्व फुलत जाईल. हा त्यांचा स्वभाव कळला नव्हता, आता कळतो आहे. `मैंने तुझे जरा देर से जाना' असे कबूल करणे भाग आहे.
- श्रीपाद पटवर्धन, विजापूर
मोबा.०९२४३२१२६५७


भारतीय इतिहासातील गणिताचे सुवर्णयुग म्हणजे आर्यभट्ट ते भास्कराचार्यांचा काळ! या गणितज्ज्ञांच्या श्लोकांतील नोंदींमुळे त्यांच्या जन्मांचा अचूक काळ निश्चित करणे शक्य झाले आहे.
रसगुणपूर्णमही
१९ एप्रिल १९७५ रोजी भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला, त्याचे नाव होते `आर्यभट्ट' आणि त्यानंतर चार वर्षांनी ७ जून १९७९ रोजी दुसरा उपग्रह अवकाशात सोडला, त्याचे नाव होते `भास्कर १'. आर्यभट्ट आणि भास्कराचार्य हे दोन्ही जागतिक कीर्तीचे भारतीय गणिती होत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य हा काळ म्हणजे भारतीय इतिहासातील गणिताचे सुवर्णयुग होय.
त्या काळातील ऐतिहासिक नोंदी दुर्मिळ असल्या तरी त्या दोघांची जन्मवर्षे निश्चितपणे सांगता येतात; कारण त्या दोघांनी श्लोकांत त्यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सध्याच्या २०१४ या वर्षात भास्कराचार्यांची नऊशेवी जयंती साजरी होत आहे. भास्कराचार्यांनी `लीलावती' हा ग्रंथ लिहिल्यानंतर एका श्लोकात त्याची माहिती दिली आहे, तो श्लोक-
रसगुणपूर्णमहीसमशकनृपसमये%भवन्ममद्ध%गुणत्त्ूद्धॅणमीु%मिंकण्ूत्त्%मद्गें%दिण्ॅमम ।
रसगुणवर्षेण मया सिद्धान्तशिरोमणी रचित: ।।
येथे अंकसंज्ञा त्या काळच्या प्रथेप्रमाणे शब्दार्थानुसार स्पष्ट होतात. उदा.रस=६ (गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट), गुण=३ (सत्त्व, रज, तम), पूर्ण=०, मही=१ (पृथ्वी). `अंकानाम वामतो गति: ।' म्हणजे अंक उजवीकडून क्रमाने डावीकडे वाचले जातात. रसगुणपूर्णमही म्हणजे ६,३,०,१ हे १०३६ असे लिहून वाचावयाचे. १०३६ शालिवाहन शकात ७८ वर्षे मिळविली की १११४ हा इसवीसन मिळतो. २०१४ मध्ये या घटनेला ९०० वर्षे पूर्ण होतात. स्वत: भास्कराचार्यांनी आपले जन्मवर्ष आणि ग्रंथलेखनाचे वर्ष `गोलाध्याय' या ग्रंथातील श्लोकात दिले आहे. त्याचा सरळ अर्थ पुढीलप्रमाणे -
`शालीवाहन शके १०३६ मध्ये माझा जन्म झाला आणि छत्तिसाव्या वर्षी मी `सिद्धांतशिरोमणी' हा ग्रंथ रचला.'
आर्यभट्टानेसुद्धा आपल्या जन्माविषयी आपल्या `आर्यभट्टीय' या ग्रंथात एक श्लोक लिहिला आहे, तो असा -
षष्ट्यब्दानां षष्टिर्यदा व्यतीता: त्रयस्य युगपादा: ।
त्र्यधिकविंशतिरब्दा: मम जन्मनो%तीता: ।।
भारतीय संस्कृतीत कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी कालगणना आहे. यांपैकी तीन युगपाद संपल्यानंतर म्हणजे कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर ३६०० (६०द६०) वर्षे जेव्हा संपली, तेव्हा माझ्या जन्माला २३ वर्षे झाली. कलियुगाचा प्रारंभ इ.स.पूर्व ३१०१ या वर्षी झाला असे मानले गेले आहे. त्यानसार आर्यभट्टांनी इ.स.४९९ मध्ये (३६००-३१०१=४९९) तेवीस वर्षे पूर्ण केली होती. यावरून त्यांचे जन्मवर्ष इ.स.(४९९-२३) = ४७६ हे ठरते. आणखी एक भारतीय गणिती ब्रह्मगुप्त यांनीही एका श्लोकात आपले जन्मवर्ष सांगितले आहे.
श्रीचापवंशतिलके श्रीव्याघ्रमुखे नृपे शकनृपाणाम् ।
पंचाशत्संयुक्तै: वर्षशतै: पंचभि: अतीतै: ।।
ब्राह्मस्फुटसिद्धान्त: सज्जनगण गणित गोलवित्प्रीत्यै: ।
त्रिंशतवर्षेण कृतो जिष्णुसुत ब्रह्मगुप्तेन ।।
श्रीचापवंशीय राजा श्रीव्याघ्रमुख याच्या काळात नृप शालिवाहन शकाची ५५० वर्षे (पंचाशत=५०, पंचभि: शतै = ५००, ५० + ५०० = ५५०) पूर्ण झाली तेव्हा जिष्णूचा (विष्णूचा) पुत्र ब्रह्मगुप्त याने वयाच्या तिसाव्या (त्रिंशत = ३०) वर्षी सज्जनलोक आणि गणितज्ञ यांच्यासाठी `ब्राह्मस्फुटसिद्धान्त' हा ग्रंथ लिहिला.
शालिवाहन शक ५५० मध्ये ७८ मिळविल्यास इ.स.६२८ या वर्षी ब्रह्मगुप्तांचे वय ३० वर्षे होते, म्हणजे ब्रह्मगुप्तांचा जन्म (६२८-३०=५९८) इ.स.५९८ मध्ये झाला.
पंधराशे वर्षांपूर्वीच्या घटनांचा अचूक काळ या गणितज्ज्ञांच्या नोंदींमुळे निश्चित करता येतो. त्यामुळे भारतीय इतिहासलेखनाला कितीतरी मदत झाली आहे. संस्कृत साहित्याच्या अभ्यासाने अजूनही अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकेल. यासाठी संस्कृत साहित्याचा अभ्यास झाला पाहिजे.
- भालचंद्र नाईक
(मराठी विज्ञान परिषद - पत्रिकेतून साभार)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन