Skip to main content

15 may 2017

राष्ट्न्पतींची निवडणूक
आपल्या देशात घटनेप्रमाणे संसदीय प्रातिनिधिक लोकशाही राज्यपध्दती आहे. राज्यावर कोणी यायचे हे, लोक आपल्या मतदानातून ठरवतात. लोकांचे ते प्रतिनिधी काही अुच्च पदाधिकारी निवडून देत असतात. पंतप्रधानाची निवड लोक करत नाहीत, तर त्यांनी निवडून दिलेले खासदार करत असतात. आपल्या देशाचे सर्वाधिकारी राष्ट्न्पती असतात. त्यांची निवड कोणी अेकच अेक गट करत नाही, तर आपले प्रतिनिधी त्यांची निवड करत असतात. त्यांच्या मतांचे मूल्य ठरते, व त्या मतांची बेरीज करून राष्ट्न्पतींची निवड घोषित होते. हे मतांचे मूल्य आपल्या सामान्य मतदाराप्रमाणे `अेक मतदार-अेक मत' असे नसते.
राष्ट्न्पतीपदाच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य ठरविण्यासाठी १९७१ची  जनगणना आधारभूत धरलेली आहे. त्यानुसार त्या त्या राज्याची लोकसंख्या लक्षात घेअून, त्याचा दर हजारी हिस्सा(प्रमाण) ठरतो, व त्याला भागिले त्या राज्याच्या विधानसभेतील आमदारांची संख्या; हे त्या अेका आमदाराच्या मताचे मूल्य असते. महाराष्ट्नची लोकसंख्या १९७१ साली ५.०४ कोटि होती. त्याचा हजार हिस्सा म्हणजे ५०४०० हे महाराष्ट्नच्या विधानसभेचे अेकूण मतमूल्य. तिथे २८८आमदार आहेत. म्हणून प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य १७५ होते. याचप्रमाणे आितर राज्यांच्या आमदारांच्या मताचे मूल्य ठरते, ते वेगवेगळे असते. अुत्तर प्रदेश २०८, केरळ १५२, मध्यप्रदेश १३१, कर्नाटक १३१, पंजाब ११६, बिहार १७३, गुजरात १४७, झारखंड १७६, ओदिशा १४९. आंध्रातील आमदारांच्या मताचे मूल्य १४८होते; तेलंगण वेगळे निघाल्यामुळे ते मूल्य आता  बदलू शकेल. देशभरात अेकूण आमदार ४१२० आहेत, व त्यांच्या अेकूण मतांचे मूल्य ५,४९,४७४ आहे. राज्याच्या विधानपरिषद  सदस्यांना मताचा अधिकार नसतो. काही राज्यांत विधान परिषदच नाही.
लोकसभेत ५४३ सदस्य(खासदार) आहेत, व राज्यसभेचे २३३आहेत. या अेकूण ७७६ संख्येने, आमदारांच्या अेकूण मतमूल्यास भागले की अेकेका खासदाराच्या मताचे मूल्य ठरते. अेकूण सर्व आमदारांचे मतमूल्य ५,४९,४७४. त्यास भागिले ७७६ = ७०८हे अेका खासदाराच्या मताचे मूल्य असते. म्हणजे अेकूण ७७६ खासदारांच्या अेकूण मतांचे मूल्य ५,४९,४०८ होते. भागाकार-गुणाकार करताना पूर्ण संख्येचे अुत्तर नक्की केल्याने मतमूल्याचा ताळा जुळण्यात थोडा फरक पडतो.
देशातील ७७६खासदार आणि ४१२०आमदार हे मतदानास पात्र असतात; खासदारांच्या मतांचे अेकूण मूल्य ५,४९,४०८ आणि आमदारांच्या मतांचे अेकूण मूल्य ५,४९,४७४ असे अेकूण मतदान १०लाख,९८हजार,८८२ आितके धरले जाते.विजयासाठी अर्थातच ५०% मते हवीत.
अुपराष्ट्न्पती पदासाठी लोकसभेचे व राज्यसभेचे खासदार मतदान करतात. तिथे आमदारांना मत नसते.
सध्याचे राष्ट्न्पती मा.प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपतो. त्यामुळे नव्या राष्ट्न्पतींच्या निवडीचे वारे आपल्या देशात वाहू लागले आहेत. ही निवडणूक जूनअखेरीस किंवा जुलैच्या प्रारंभी होआील. गेल्या दोनअडीच वर्षात पक्षीय स्थित्यंतरे झाल्यामुळे  राष्ट्न्पतीपदासाठीचे मतदान हा अुत्सुकतेचा विषय झाला आहे.
राज्यघटनेच्या ५५(२) या कलमानुसार मतांचे मूल्य ठरविण्याची पध्दत अनुसरली जाते.
आपल्याकडे शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी पसंतीक्रमानुसार होते व त्यात ५० टक्के मते पडणारा अुमेदवार विजयी होतो, तीच पध्दत राष्ट्न्पतीसाठी वापरतात. त्यास अेकल संक्रामक मत (सिंगल ट्नन्सफरेबल व्होट) असे म्हणतात. जेवढे अुमेदवार असतात, तितके आपले पसंतीक्रम मतदार नोंदवितो. पहिल्या पसंतीची मते वेगळी केली जातात. तीच मते जर ५०% पेक्षा जास्त असली तर तो विजयी झालाच. पण दोनपेक्षा जास्त अुमेदवार असतील तर कोणालाच तितकी मते पडली नाहीत असे होअू शकते. मग सर्वांत कमी मते मिळालेला अुमेदवार बाद करून दुसऱ्या क्रमांकाची मते ज्याला दिली गेली असतील, ती मोजतात आणि ती त्यास संक्रेमत करतात. अशा प्रकारे अेकेकजण बाद होत, ठरलेले ५०% चे अुद्दिष्ट जो ओलांडतो, तो विजयी होतो.
घटनेच्या ५८व्या कलमानुसार राष्ट्न्पतीची निवडणूक लढविण्यासाठी ३५ वय ओलांडावे लागते.तो भारताचा नागरिक हवा, लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र, केंद्र-राज्य-वा स्थानिकही स्वरूपाचे कोणतेही लाभाचे पद नसलेला अुमेदवार असतो. पण अुपराष्ट्न्पती, राज्यपाल, मंत्री हे मात्र ती निवडणूक लढवू शकतात. त्याच्या अर्जाचे सूचन व अनुमोदन प्रत्येकवेळी किमान ५० मतदारांनी करावे लागते.
आपली राजकीय यंत्रणा म्हणजे इंग्लंड व अमेरिकेतील चांगली बाजू आहे. आपल्याकडे शासनाचा प्रमुख(राष्ट्न्पती) व सरकारचा प्रमुख (म्हणजे पंतप्रधान) अशी दोन पदं आहेत. पण अमेरिकेप्रमाणे आपल्याकडे प्रजासत्ताक लोकशाही आहे, देशातील सर्वोच्च पद (म्हणजे राष्ट्न्पती) जनता किंवा जनतेचे प्रतिनिधी निवडतील अशी तरतूद आहे. म्हणूनच आपल्याकडे संसदीय लोकशाही असली तरी सर्वोच्च स्थानी राजघराण्यातील व्यक्ती नसते तर लोकांच्या प्रतिनिधींनी निवडून दिलेली व्यक्ती असते. अमेरिकेत एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार दिलेले असते. आपल्या देशातील दोन्ही सर्वोच्च पदं जनतेने निवडून दिलेली असतात.
आपल्या देशात पंतप्रधानांना फार अधिकार आहेत. राष्ट्न्पतीपदाकडे फार आदराने बघितले जाते. आपल्या देशातील राष्ट्न्पतीपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांचा सहभाग नसतो. म्हणूनच या निवडणुकीला `अप्रत्यक्ष निवडणूक' म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून घटना लागू झाली. तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद पहिली दोन वर्षे राष्ट्न्पती होते. १९५२ साली रीतसर निवडणूक झाली व डॉ.राजेंद्र प्रसाद निवडून आले. १९५७ साली ते दुसऱ्यांदा जिंकले. त्यानंतर कोणत्याच व्यक्तीला दोनदा राष्ट्न्पतीपदी विराजमान होण्याचा मान मिळालेला नाही.
आपल्या राजकीय व्यवस्थेत राष्ट्न्पती हे पद जरी बरेचसे शोभेचे असले तरी या पदाला कमालीची प्रतिष्ठा आहे, शिवाय अनेक अधिकार आहेत. लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेले विधेयक त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते, तोपर्यंत नाही.  इंदिराजींनी आणीबाणीच्या काळात ४२वी घटनादुरुस्ती संमत करवून घेतली व संसदेने पारित केलेल्या विधेयकांवर राष्ट्न्पतींनी स्वाक्षरी केलीच पाहिजे अशी स्पष्ट तरतूद केली. राष्ट्न्पती वित्तविधेयक परत पाठवू शकत नाही. कारण वित्तविधेयक त्यांना दाखवूनच संसदेत मांडले जाते. त्यावरून आपल्या राजकीय व्यवस्थेत राष्ट्न्पती हे पद किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल.

सेवा हाच धंदा?
माणसाच्या जगात सेवाभाव हा घटक असायलाच हवा. सेवाभावी  माणसालाही पोट असते, प्रपंच असतो; त्यामुळे त्याच्या चरितार्थाआितके अर्थार्जन गरजेचेच असते. कोणत्याही देवळात भक्तांची सोय करणारा, निगा राखणारा, पूजाअर्चा करणारा, साफसफाआी करणारा पुजारी-गुरव-मौलवी-ग्रंथी असावाच लागतो. त्याचा चरितार्थ चालण्यासाठी `पगार' असत नाही. पण देवाला जाणारा भक्त देवापुढच्या पेटीत पैसा आणि तबकात तांदूळ टाकतो. देवाला जाताना मोकळया हाती जाअू नये म्हणतात ते त्यासाठी. भक्ताला देणारा तर देवच असतो, मग भक्ताच्या मूठपशाने देवाला काय मिळणार आहे? मिळणार ते त्याच्या पुजाऱ्यालाच. देवाची  -म्हणजे तिथे येणाऱ्या माणसाचीच सेवा करणाऱ्यासाठी  परस्पर सोय लावण्याला देवकार्य किंवा पुण्यकर्म मानले की तो सारा व्यवहारी प्रश्न सुकर होतो.

पण आजच्या काळात त्या देवकार्यातील सेवाभाव संपून तिथे धंदा सुरू झाला. धंदा म्हटला की  कमाआी आली, वाटण्या आल्या, येणाऱ्या `ग्राहकांची' सोय करणे आले. त्याचे दर ठरले जाअू लागले. अभिषेकाला आितके रुपये, अर्जंट दर्शन पाहिजे तर ज्यादा चार्ज, त्याची वेगळी रांग, भक्तेनवासात अॅटॅच बाथरूमला वेगळा दर, तिथे गरम पाणी  वातानुकूल हवे असेल तर भरपूर पैसे.... हे सरसकट क्षेत्रांमध्ये सुरू झालेले आहे. त्यामुळे तिथल्या पुजारी मंडळींना अेका पंचा-जानव्याच्या भांडवलावर आिस्टेटी करता येअू लागल्या. त्यात राजरोस व्यवसाय आहे. गैरप्रकार काही नाही, असलाच तर कर चुकवण्यापुरता असेल.

आपण तसे कित्येक व्यवहार सेवाभावी समजून चालतो आहोत. त्याचे निकष पक्के नाहीत, त्यामुळे कधी त्याच कर्मास सेवा म्हणायचे तर कधी सोयीनुसार व्यवसाय म्हणायचे, अशी कोलांटगिरी चालते. सध्या शेतीच्या बाबतीत तसे आहे, परंतु सगळयाच क्षेत्रांतील सेवाभावाचे व्यवसायीकरण झाले आहे. डॉक्टरी पेशा ही सेवा मानण्याची अेक रीत आहे. डॉक्टरचे काम म्हणजे अेका श्वासाचे अंतर असे म्हणायची जुनी पध्दत आहे. आज रुग्णालयातील खाटेवर आडवे होण्यापूर्वी त्याच्या दारात अगाअू पैसे भरतानाच माणूस आडवा होतो. डॉक्टर संप करू शकतात, औषधात गाळा मारतात, खेड्यात काम करायला नकार देतात, खोट्या पदव्या लावतात, भ्रूणहत्या करतात.... दणकून कमाआी करतात. सेवाभाव कुठे असेलच तर तो शेाधावा लागतो. अुत्तम शिष्य तयार करण्याची सेवा करून शिष्याने यथाशक्ती दिलेली  गुरुदक्षिणा आनंदाने स्वीकारणारा गुरू आज कुठे दिसेल? टाय बूट आणि पिवळया गाड्या यांतून आिंटरनॅशनल स्कूलिंग आिंडस्ट्नी टेचात फिरत असते. सातवा वेतन आयोग झेलत असणारे कितीतरी शिक्षक आितर अुचापतींत रममाण असतात. त्यात शिक्षकाचा सेवाभाव कुठे असतो?

मुळात सेवाभाव आणि चरितार्थाचा व्यवसाय या दोन्ही गोष्टी समान्तर चालल्या पाहिजेत. योग्य मोबदला घेअून लोकांना जेवायला घालणारी क्षुधाशांती भुवन कालबाह्य झाली. आज प्रत्येक `यस्सर..' म्हणण्याला पैसे आकारले जातात. त्याशिवाय लग्ने जमवणे, त्यात मध्यस्थी करणे, पोहायला शिकवणे, पूजा करणे, नृत्यगायन करणे, वधूला नटवणे, बालसंगोपन करणे, अशा कितीतरी  -  प्रत्येकच  - सेवाभावी कामांचा धंदा बनला आहे.

याअुलट जी कार्ये सेवाभावानेच चालतात, समाजकल्याणासाठी चालतात तिथे सारा भोंगळ कारभार चालतो. देणग्या, हिशेब, पारदर्शकता, नियोजन, मूल्यमापन अशा बाबतीत कोणी काळजीच घेत नाही. कधी कोणी नेटाने विचारू पाहिले तर `सामाजिक सेवाभावी कार्यात जरा आिकडे तिकडे चालायचेच, आिथे कोणी पैसे कमवण्यासाठी काम करत नाही...' असे समर्थन होते. व्यवसाय आणि सेवा असे वेगळेपण आदर्श समाजव्यवस्थेत असू नये. पक्का लबाड दुकानदारही `ग्राहकांच्या सेवेसाठी' काम करत असल्याचे सांगतो. भजनकीर्तनही देवाची सेवा म्हणायचा प्रघात आहे, आणि कोट्यवधी रुपये खर्चून निवडणूक खेळणारा पुढारी लोकांचा सेवक म्हणवून घेतो. यांत कुठेही सेवाभाव नाही, धंदा आहे. साळसूदपणे सोदेगिरी  करण्याला आज सेवा म्हणतात.

चांगल्या समाजव्यवस्थेत सेवा आणि व्यवसाय हे परस्पर पूरक आणि अभेद्य असले पाहिजेत. व्यवसाय करताना सेवाभावाने करावा, आणि सेवाक्षेत्राचे व्यवस्थापन व्यावसायिक  असावे. सामाजिक काम करताना ते पदरमोड करूनच करावे लागते असे नाही. चांगल्या कामासाठी चांगला कार्यकर्ता असावा लागतो आणि त्याची योग्य ती सोय करणे आिष्ट असते. ज्येष्ठ नागरिकानी आपल्या संघाच्या कार्यक्रमासाठी कुणाची भेट घ्यायला जाताना वैशाखाच्या अुन्हातून दुचाकीवरून जाण्याचे कारण नाही; कालस्थितीनुसार टॅक्सीने जावे, पण त्यांच्या कार्यक्रमातील भोजनास श्रीखंडपुरी करणे हा सेवाभाव नाही. त्या दोहोतील सीमारेषा पुसट असते. कोणता डॉक्टर सेवाभावी आणि कोण धंदेवाआीक असतो  हे कंठशेाष करून सांगावे लागत नाही. पत्रकार, पुजारी, रिक्षावाला, बँकर वगैरे साऱ्या क्षेत्रांतील सेवाभाव वाढवीत नेण्याचा प्रयत्न सातत्याने करावा लागतो. तो लोकांच्या विश्वासाबरोबर जोखला जातो. स्टेशनमास्तर आणि तलाठी सेवा करू शकतो, आणि ज्यांना सेवा म्हणावे ती क्षेत्रे तर कधीचीच धंदेवायीक झाली आहेत, त्यांना सेवेत आणावे लागेल. तर ते व्यवहार मनुष्यत्वाचे होतील. अन्यथा माणूस हाही प्राणी म्हटलेले आहेच.

मना सज्जना
संवाद कौशल्य
  शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यातील चंद्रराव मोरेची जहागीरी नेस्तनाबूत करण्यासाठी हल्ला केला. त्यावेळी  मोरेचा एक मावळा दोन्ही हाती दांडपट्टा घेऊन कडवा झुंझत होता. त्याच्या या झपाट्यामुळे महाराजांचा कोणताही सैनिक पुढे सरकू शकत नव्हता; शिवाजी राजानं मनातच आणलं असतं, तर धनुष्यबाण चालवणाऱ्या आपल्या तिरंदाज सैनिकाला बेालावून त्या मावळयाला `झोपवता' आलं असतं. परंतु, महाराजांनी तसं न करता त्या वीर मावळयाशी संवाद साधला. `श्रींचं' स्वराज्य स्थापनेचं आपलं ध्येय त्याला कुशलतेनं पटवून दिलं. तो त्यानंतर स्वराज्याचा एकनिष्ठ पाईक बनला. पुढे तो किल्लेदार झाला. पुरंदरच्या त्याच्या स्वामीनिष्ठ पराक्रमाच्या प्रसंगाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. त्या किल्लेदाराचं नाव आहे मुरारबाजी देशपांडे.
शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर मुरारबाजीला धारातीर्थी पाडू शकले असते. पण त्यांनी वेगळा विचार केला. असा मोहरा मारण्यापेक्षा स्वराज्याच्या कामी आला पाहिजे, हा त्यांचा विचार. हा वेगळा दृष्टिकोण. शिवचरित्रात असे सकारात्मक दृष्टिकोण विपुल प्रमाणात दिसतात.
या उदाहरणावरून लक्षात येतं की घटनेपेक्षा आपला त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोणच, त्या घटनेची `संधी किंवा समस्या' अशी विभागणी करतो. पण केवळ दृष्टिकोण असूनही भागत नाही. विचार आचरणात आणण्याचं कौशल्य बाणवणं जास्त महत्वाचं. शिवाजी महाराजांचं संवादकौशल्य किती होतं हे लक्षात येतं. `ये हृदयीचे ते हृदयी' म्हणजे काय हे स्पष्ट होतं. भावनांक(इ.क्यू.) उत्तम असण्यासाठी संवादकौशल्य उत्तम असणं खूप महत्वाचं आहे.
संवादकौशल्याची सोपी व्याख्या कशी करता येईल? आपल्या भावना, कल्पना आणि विचार प्रभावीपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजेच संवादकौशल्य. सध्याच्या संगणक-आंतरजाल(इंटरनेट) युगात संवाद फक्त बोलूनच साधत नाही तर तो लिहूनही साधतो, वेगवेगळया प्रकारचे चेहेरे(इमोजी) पाठवून, लाईक करून आपल्या मनातल्या भावना आपण सोशल नेटवर्कवर मांडत असतो. एखाद्याचे हावभाव, हालचालसुद्धा बरंच सांगून जाते. एकूणच आपण सतत संवाद साधतच असतो. आपण एकटे असलो तरी मनातल्या मनात स्वत:शी आपण संवाद साधतच असतो.
आपल्याला हे `कौशल्य' कसे साधता येईल? संवादकौशल्य प्रभावी करण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी गरजेचे असणारे काही मुद्दे आहेत. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे स्वत: ऐकणे; काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकणे. समोरचा काय म्हणतोय हे नीट ऐकल्याशिवाय आपल्याला त्याला समजून घेता येणार नाही. काहींना फक्त आपलं म्हणणं मांडायची सवय  असते, ते दुसऱ्याचं अजिबात ऐकून घेत नसतात. काही लोक दुसऱ्याचं पूर्ण ऐकून न घेताच पुढचं बोलतात, किंवा कृती करतात. दोन्ही प्रकारच्या लोकांना बरेच तोटे सहन करावे लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण कोणाशी बोलत आहोत आणि कोणत्या प्रकारे बोलत आहोत हे ध्यानात घेणं. बॉसबरोबर आपल्याला मित्रांसारखं बोलून चालणार नाही (काही चांगले बॉस स्वत:च कार्यालयाचं वातावरण तणावरहित असावं म्हणून मित्रासारखे वागतात.) याउलट मित्राशी आपण बॉससारखं बोलू लागलो तर मैत्री टिकणार नाही.
आपलं म्हणणं स्पष्टपणे आणि न डगमगता मांडणं आवश्यक. काही लोक आपलं म्हणणं `दुसऱ्यांना काय वाटेल' असा विचार करून स्पष्टपणे सांगत नाहीत; आणि बरंच पाणी वाहून गेल्यावर `माझं असं मत नव्हतं' सांगतात. अशा लोकांबद्दल गैरसमज पटकन पसरतात. शेवटचा आणि सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे सकारात्मक बोलणं. अगदी नामदेवानींही आपल्या अभंगात `बोलू ऐसे बोल । जेणे बोले विठ्ठल डोले ।।' असं म्हटलेलं आहे. सकारात्मक बोलायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोण, सकारात्मक विचार हवा. विचार हाच आपल्या बोलण्याचा स्त्रोत असल्यानं, तो जसा असतो तसा संवाद आपण साधत असतो. मनात एक आणि बाहेर भलतंच, हे पकडलं जातंच. कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याशी छान बोलत असते पण तिच्या देहबोलीतून मात्र आपल्याला तिच्या बोलण्या-वागण्यातील विसंगती दिसते. आपले विचार, बोलणं आणि क्रिया जर सकारात्मक असेल तर तो नक्कीच प्रभावी सुसंवाद असेल.
रामदास आपल्या मनाला अगदी असाच उपदेश करतात. `न बोले मना राघवेवीण काही । जनी वावुगे बोलता सुख नाही ।।'
-अजिंक्य गोडसे, इचलकरंजी
फो.नं.९६३७७४१८६५ 

संगीत व नाट्य साधना 
आम्ही नाटकांच्या आणि संगीताच्या बाबतीत भाग्यवान होतोे. मला आठवते तेव्हापासून वाडीतल्या माणगावकरांचे नाव अैकत होतो. ते गाणे शिकवत. आमचे वडील गाण्याचे नादी होते. ते येताजाता लकेरी मारत. पहाटे ते खूप लवकर अुठायचे  आणि अंथरुणांतून आमची पांघरुणे ओढत गाणी-ओव्या-अभंग म्हणत. त्यात खूपसे विडंबनकाव्यही होते. माझी मोठी बहीण शाळेत असल्यापासून गाणे शिकायची,म्हणायची. ती माझ्या जन्माआधीच सासरी गेली, तिचे लेल्यांचे घर कलावंतांचे होते. त्यामुळे तिच्याकडूनही बाळकडू मिळायचे.त्यात गाण्यांच्या टवाळीचाही भाग होता. मोठा भाअू तबला वाजवायचा. दहा बारा वर्षांचा असताना मीही शिकू लागलो. आमचे गुरू रामभाअू गुरव हे पखवाजिये होते.. पण सूरपेटी, तबला, मृदंग सगळं वाजवायचे. त्यांच्या खोलीत पाचसहा शिष्य शिकायचो, त्यात मी अेकटा बालशिष्य होतो. तिथंही विजेचे दिवे नव्हतेच.पण रॉकेलच्या मंद चिमणीच्या प्रकाशात गाण्याचे तबल्याचे रियाज चालत. `सखी मोरी रुमझूम', `घगरी मोरी भरन नाही दे'  अशा अवीट चिजा, किंवा `बाआी% पाअूस पडतो गं' अशी भावगीतं घोळली जात असत. त्या तेवढ्या भांडवलावर मी किडूक मिडूक साथही  करू लागलो. कुठं कीर्तन वगैरे असलं तर मला बोलावत.तिथं माझ्या कलेपेक्षा माझं वय हा कौतुकाचा विषय होआी. मानाचा नारळ  आणि दोन पाच रुपयांची प्राप्ती होआी.
पण या सगळया सरावामुळं मला संगीताची जाण बरी आली होती. वाडीत नाटकं बरीच यायची. गणेशेात्सव हा तर साक्षात अुत्सव. सांगलीसारख्या शहरात नाटके यायची नाहीत, ती आिथं पाहायला मिळत. शिवाय गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. कट्यार, मंदारमाला, सुवर्णतुला अशी संगीत नाटकं अस्सल नटसंचात पाहायला मिळाली. भीमसेन, अभिषेकी, शिलेदार मंडळी, नूतन गंधर्व यांना अैकता आले.  फुलराणी, रायगड, नटसम्राट असली मोठी नाटकं आिथंच पाहिली. शिवाय कितीतरी अेकपात्री, प्रहसनं, कवितावाचन, चैत्रबनात, असे कितीतरी प्रयोग पाहता आले.
त्याशिवाय काही अनुभव वेगळे सांगायलाच हवेत. किर्लोस्करवाडीचे हे `हायर' वातावरण सोडले तरी जवळपासच्या खेड्यांतून नाट्यमंडळे होती. आमच्या आिथं नव्यानं वसत चाललेल्या गावात अेकदा  आनंद संगीत नाटक मंडळी अवतरली होती. गावात अेक खोली तात्पुरती घेअून त्यांनी कँप टाकला होता. रात्री अेकेक नाट्यप्रयोग झाल्यावर सकाळी अंघोळ-धुणी करायला ते लोक आमच्या विहिरीवर येत. विहिरीला रहाटगाडगे होते, त्या पाण्यावर त्यांची आन्हिकं आवरत. ही नाटकमंडळी बहुतांश अेकाच कुटुंबातली होती..तिघी तरुण मुली, तीन चार भाअू असे त्या गोतावळयातले असावेत. त्यांचे पिताजी साधारण साठीचे. सकाळी आमच्याकडे आल्यावर त्यांना, आज कोणता प्रयोग - ते विचारत असू. कधी तेच विचारत, `काय रे बाळांनो,आज काय पाहणार?' या मंडळीनं  आमच्या आिथल्या मराठी शाळेसमोर पाचपन्नास प्रेक्षकांसमोर अेकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळ ही नाटकं केली.. त्याचं गायन, व सादरीकरण खरोखरीच फार चांगलं - अप्रतिम होतं. नंतरच्या काळात मी दामूआण्णा मालवणकरांचा फाल्गुनराव पाहिला, पण मला तरी तो कमी वाटला. आनंदवाल्यांच्या भावबंधनातला प्रभाकर पायानं अधू होता, पण `स्वकर शपथवचनी वाहिला, अुगीच का तुवां?'  हे पद गाताना त्यानं असल्या गावठाणात तीन  `वन्स मो%र' घेतले होते.
आमच्या जवळपासच्या गावांतून नाटकं होत, त्यात पुणदी गावचे  लोक अुत्तम होते. अेकदा त्यांनी ठरवून माझ्या वडिलांना `अैतिहासिक नाटक पाहिजे' म्हणून गळ घातली. काका(वडील) तयार झाले. त्यांनी `विजापुराहून सुटका' हेे नाटक लिहून दिलं. त्याचे काही प्रयोग आिथल्या मंडळींनी केले. आमच्या घरापुढच्या अंगणात तालमी चालत. मी १०-१२ वर्षांचा होतो, तरी  काहीवेळी पार्श्वसूचक (मराठीत : प्रॉप्टींग) म्हणून तालमींना बसत होतोे. शामू जाधव सआीबाआी, रामदास कवडे मंजुळा, प्रधान नावाचे जिजाबाआी असे स्त्रीपार्टी होते. सांगलीत या नाटकाचा अेक प्रयोग `भावे नाट्यमंदिरा'त केला. अफजलखान आणि बाजी घोरपड्याचा प्रवेश संपवून विंगेत जाताना खानाच्या तोंडी वाक्य होते, `चला बाजी, तोवर आपण थोडी शराब घेअू' आिथे हा अफजल रोजच्या सवयीनं म्हणाला `चला बाजी, तोवर आपण जरा चहा  घेअून येअू'... विंगेतही सारे हसू लागले..
माझ्या तबल्याचा शेवटचा प्रयोग कऱ्हाडला कॉलेजात असताना झाला. तिथं गॅदरिंगला बरीच गाणी, ऑर्केस्ट्न वगैरे होतं. माझ्यात स्टेज डेअरिंग नव्हतं, म्हणून  मी तयार नव्हतो. पण प्राचार्य रावेरकरांच्या आदेशामुळं त्यावेळी तबल्याच्या साथीला जावं लागलं. नंतर आयुष्याला अशी वळणं मिळत गेली की तबला दूर राहिला. आता  काही बोल काही कायदे पाठ आहेत, पण  बोटं लोखंडाची असल्यागत वाटतात. ढिम्म हलत नाहीत. तरीही संगीत, नाट्य, सिनेमा  यांचा तो `मझा' घेता येतो, ह े काय  कमी आहे?
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी फो.नं.९५६१३९०८९०

त्रि स्थ ळी
गाव गाव पुस्तकांचं
महाराष्ट्न् शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अेक चांगला प्रयोग नुकताच सुरू झाला आहे. राज्य मराठी विकास संस्थेने महाबळेश्वरजवळच्या भिलार या गावात `वाचनानंद' सुरू केला आहे. `पुस्तकांचं गाव' अशी ही योजना, त्या गावातील २५ घरांत प्रारंभी पुस्तके भरून ठेवलेली असतील, ती सहज कुणालाही हाती घेअून वाचत बसता येआील. काही सार्वजनिक जागीही तशी सोय करण्यात आलेली आहे. कोणत्या घरात कोणते पुस्तक अुपलब्ध आहे याचे फलक रस्त्यावर लावले आहेत. त्या पुस्तकांवर क्रमांक टाकून ते शोधण्याला सोपे केले आहे. विविध साहित्यप्रकारांतील सुमारे १५हजार पुस्तके गावात आलेली आहेत. भारतात हा पहिलाच प्रयोग आहे.
कोणत्याही गावात हा प्रयोग सहज करता येण्यासारखा आहे. शासनाची मदत मिळाली तर चांगलेच, पण त्याविणा काही नडण्यासारखे नाही. गावातले सध्या असलेले बरेसे वाचनालय, त्या गावातील शाळा-कॉलेज, अेखादी सार्वजनिक ट्न्स्टसारखी संस्था अशांनी अेकत्र येअून ते करता येआील. अेके काळी काही गावांत आपापल्या दारी भिंतीवर बातम्या, सुविचार व आितर मजकूर लिहिण्याचे व्रत सांभाळले जात असे. कोरेगाव तालुक्यातील अेकसळ या छोट्या गावात शि म पंचादेवी नावाचे निवृत्त पशूवैद्य आजही ते व्रत आचरतात. त्याचे विस्तृत रूप म्हणजे शासन पुरस्कृत `पुस्तकांचं गाव' ही योजना आहे. याचा अुपयोग किती होतो, ते प्रत्यक्ष दिसून येणार नाही कदाचित. नाहीतरी घरातल्या देवांचा अुपयोग कसा मोजतात? आयुष्यभर केलेल्या व्रताचा अुपयोग कसा ठरवतात? पुस्तकाच्या आितक्या निकट सान्निध्यामुळे ते गाव अेक वेगळी ओळख घेअून वावरेल, हे काय कमी आहे?
रमेश बावकरांचा व्यासंग
अध्यात्म आणि परमार्थ असे ज्यांस रूढ अर्थाने म्हटले जाते, त्यांत रमलेली माणसे खूप वाचन करतात. ज्ञानेश्वरी किंवा तत्सम ग्रंथांचे पारायण सोहळे तर गावोगावी होतातच; पण त्यांत सहभागी न होणारे भक्त आपापल्या विचारधारेचे ग्रंथ वा नियतकालिकांचे वाचन करत असतात. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील व्यासंगी व्यक्ती ग्रंथ निर्मितीही करते, त्यांस चांगला प्रतिसाद स्वाभाविकच मिळतो. अशा पंथातील अेक ज्येष्ठ प्रयोगशील नाव म्हणून रमेश बावकर यांचा अुल्लेख करावा लागेल. `ज्ञान तेच देव', `ऋग्वेदीय सूक्ते : समश्लोकी रूपान्तर', परब्रह्म-ज्ञानं विज्ञानसहितम्', `मकरंद : गीतेवरील विवेचनात्मक ग्रंथ', `परकाया प्रवेश', ही त्यांच्या पुस्तकांची नावे वाचली तरी त्यांचा अधिकार जाणवू शकतो.
लाला व्यावसायिक प्रकाशक मिळणे सहसा शक्य नसते. हल्ली तर प्रकाशनांचा व्यवसाय सेवाभावी राहिलेला नसून तो अधिकांशी धंदा झाला आहे म्हणतात. अशा स्थितीत या पुस्तकांना वाचकांपर्यंत नेणे हे चिकाटीचे आणि काही कौशल्याचेही काम ठरते. ते बावकरांनी अुत्तम प्रकारे केले आहे. त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. `ज्ञान तेच देव' या ७५० पृष्ठांच्या पुस्तकाची १५वी आवृत्ती प्रकाशित झाली. त्याची किंमत केवळ २७० आहे. अुत्पादन खर्च विचारात घेतला तर अशा प्रकारे स्वस्त पुस्तकांना प्रतिसाद चांगला मिळतो, हेही त्यावरून लक्षात येते.
कोणतेही विषय साध्या सोप्या भाषेत सलग सुसूत्र मांडणे हे मात्र फार महत्वाचे असते. कारण त्या संबंधितांच्या बाहेरही ते वाचले जाणे आवश्यक असते. पुस्तकांना चांगले दिवस आहेत, पण ते विषय, संबंधित वाचक आणि त्यातील पुस्तके यांचा मेळ लागणे दुर्लभ होते. रमेश बावकर यांनी ती किमया त्या प्रांतातील सेवाभावानेच साधली आहे.
संपर्क : रमेश बावकर, १ ध्रुव अपार्ट. ६२अ मयूर कॉलनी, पुणे ३८. 
फोन ९८८ १४९ ८४३६
पुतळयांची शोभा
ज्या महान विभूतींच्या स्मरणाने लोकांना प्रेरणा मिळू शकेल, अुत्तम जीवन जगण्यासाठी मार्ग सापडेल किंवा त्यांच्याप्रति समर्पणभाव जागृत होआील अशा विभूतींची  मोठीशी मूर्ती साऱ्या गावाच्या दर्शनासाठी अुभी करण्याची रीत आली, आपण त्यास पुतळा म्हणतो. गावाला त्यायोगे काही शोभाही प्राप्त होत असे. घरातल्या देवघरामुळे जसे त्या घराचे अेक वातावरण तयार होते, तसे त्या गावाच्याही बाबतीत होअू शकते. म्हणून गावाच्या मध्यावर किंवा लोकांच्या दर्शनासाठी योग्य जागी महनीय व्यक्तीचा पुतळा बसविला जात असे. जुन्या शहरांतून चिरंजीवत्व लाभलेल्या काही विभूतींचे चिरंजीव पुतळे आहेत. त्यांतून गावाचेही मोठेपण कळते.
तंत्रशास्त्र प्रगत होत गेले तसतसे पुतळे तयार करणे सुलभ होत गेले. त्यामुळे गावातल्या पुतळयांची संख्याही वाढू लागली. त्या पुतळयांनी गावाची अुंची कमी होत जाआील काय याचे भान सुटत जाअू नये. पुतळा कुणाचा अुभा करायचा, कुठे अुभा करायचा, कशासाठी करायचा याचा अविचार, कुणालाही विचारच करायला लावतो. आजच्या परिस्थितीत गावातले पुतळे म्हणजे असून अडचण होअू लागले आहेत. रहदारी वाढली तसे हे अडथळे ठरू लागले. ते नगरनियोजनाच्या दृष्टीने बाजूला  हटवायचे तर सामाजिक डोकेदुखी  होते. करणारे खर्च करून जातात, त्यांच्या भावना कुणाप्रति काय असाव्यात हा त्यांचा प्रश्न असतो. पण गावाची म्हणून अेक संस्कृती असते, अेक स्वभाव असतो, अेक तत्वप्रणाली असते त्या साऱ्याला छेद देणाऱ्या व्यक्तीचा पुतळाही अुभा राहू शकतो; आणि मग कुणाचेही पुतळे  अुभे करूच नयेत असे गावालाच वाटू लागते.
पुतळे अुभे करण्यासाठी शासनाची नियमावली आहे, ती आता अधिक कडक करणार असल्याचे जाहीर झाले आहे.वास्तविक २००५साली शासनाने त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पण आितर नियम व सूचनांचे होते, तेच याही बाबत झाले. `पुतळा अुभारल्यामुळे जातीय तणाव वाढणार नाही'  याबाबत पोलीसांचे ना हरकत पत्र जोडावे लागते. प्रत्यक्षात जातीय तणाव वाढलेला असतो, म्हणूनच पुतळा अुभा करण्याची टूम निघते, असेही घडते. कसेही असो, पण पुतळयांच्या राजकारणाचे आणि भांडणांचे, विद्रूपीकरणाचे वा ते हटविण्याचे खेळ शासनाच्या नियमावलीने आटोक्यात आणले तर बरे!
गाढव कोण?
आडवळणी जागेत, चढउताराच्या पाऊलवाटेत किंवा चिखलपाण्याच्या अडचणीत माती-मुरूम असल्या गाढवी कष्टाला, गाढव खूप सोयीचे असते. शिवाय त्यास खायप्यायला देण्याची फारशी काळजी नाही, रिकाम्या वेळात कुठेही मोकाट सोडली, तर ती बिचारी कागद-साली खाऊन वेळ भागवतात. त्यामुळेच बांधकामे - बागकामे - शेतीकामे अशांसाठी काम अडते आणि गाढवांऐवजी गाढववाल्यांचे पाय धरावे लागतात.
मोकाटपणी ही गरीब जनावरं शहाण्यासारखी काहीही खातात, आणि रस्त्यात कुठंही लोळतात, विनातक्रार बसतात किंवा निवांत उभी राहतात. पण तेही माणसांना बघवत नाही. त्यांना हाकत-हाकलत कोंडवाड्यात कोंबतात. पण तिथे त्यांची बडदास्त असते, ती कागदावर! त्यांच्या नावावर भरपूर खाद्या दाखवून, प्रत्यक्षात ते गाढवांचे खाद्य आपणच खायची रीत नगरपालिकेच्या पोटवळणी पडली आहे.
एका महापालिकेतले वृत्त तर त्यांच्या गाढवी कारभारावर शहाण्यांनी तोंडात बोट घालावे असे आहे. रस्त्यात अडथळा करणाऱ्या गाढवांना पकडा, म्हणून एका मोठ्या पदाधिकाऱ्याने धोशा लावला. त्यांच्यासाठी (म्हणजे गाढवांसाठी) कोंडवाडा दुरुस्ती करण्याचा खर्च झाल्यावर पन्नासभर गाढवं तिथं आणली. आता ती गाढवं सोडा, असा तगादा त्याच पदाधिकाऱ्याने लावला आहे. त्यावेळी त्यास सामान्य वाहनचालकांचा कळवळा होता, नंतर त्यास, मातीकामावर पोट भरणाऱ्या गाढववाल्यांची कणव आली .
प्रश्न असा पडतो की तो पदाधिकारी कुणाचे प्रतिनिधित्त्व करतो? वाहनवाल्यांचे, गाढववाल्यांचे - की गाढवांचे?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन