Skip to main content

3 Dec 2018

मी लोकांचा सांगाती!
-संपतराव पवार
माझ्या आयुष्याला बालपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद आणि राष्ट्न्उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार मिळत गेली. शालेय जीवनात पुरोगामी विद्यार्थी संघटना आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जनचळवळीत सक्रिय राहिलो. १९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली. काही प्रश्न निर्णायकरित्या लढवले. काही प्रश्नांबाबत शासनाला धोरण बदलावे लागले. पन्नास वर्षांहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो. चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही. जे काही घडत गेले त्यामध्ये कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती. या चळवळीचा वृत्तांत लोकांपुढे सादर करावा, काय चुकलं ते शोधावं, या उद्देशाने लिहिलेला प्रवास `मी लोकांचा सांगाती' या नावाने प्रकाशित झाला आहे.
या प्रवासात एखाद्या पक्षाशी, विचाराशी एकनिष्ठ राहून उभे आयुष्य पणाला लावणाऱ्या, अखेरच्या श्वासापर्यंत विचार जोपासणाऱ्या,  तत्वनिष्ठ त्यागी माणसांचा सहवास लाभला. तीच माझी प्रेरणा होती.
बळीराजा धरण पूर्ण झाल्यावर धरणाची सिंचनव्यवस्था उभी राहिली. नंतर पाणीवाटपाचा एक कार्यक्रम करावा, असा विचार पुढे आला. `बळीराजा'चं मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवायचं तर अशा कार्यक्रमांची गरज आहे असं मला वाटत होतं. या कार्यक्रमाला कुणाला बोलवावं असा विचार आम्ही संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते करत होतो. तेव्हा सर्वानुमते मेधा पाटकर आणि शबाना आझमी यांची नावं निश्चित झाली. `बळीराजा'मधून पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला मेधा पाटकरांना बोलावणं हा त्यांच्या कार्याला सलाम ठरला असता आणि आमच्यासाठी प्रेरणा. शबाना आझमी या सामाजिक दृष्टी असलेल्या आणि प्रागतिक सिनेमातील एक प्रमुख अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. मेधा पाटकर आणि नंतर शबाना आझमी असे दोन कार्यक्रम झाले. त्या त्या तारखांना मुकुंदराव किर्लोस्कर या दोघींना घेऊन बलवडीला आले. कार्यक्रमाची तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे केली होती. बळीराजा धरण बलवडी आणि तांदूळवाडीला पाणी मिळावं यासाठी होतं. त्यानुसार मेधाताइंर्च्या उपस्थितीत ही योजना सुरू झाली. नंतर शबाना आझमी येऊन काम पाहून गेल्या.
खरं तर आम्हा सर्र्वच कार्यकर्त्यांसाठी तो अभिमानाचा आणि साफल्याचा दिवस होता. पण आमच्या चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांना मेधाताई आणि शबाना आझमी यांच्यासाठी दोनदा कार्यक्रम करण्याची गरज नव्हती असं वाटत होतं. एवढा खर्च कशाला, असं त्याचं म्हणणं होतं. खरं तर या दोघींना आणण्याचा खर्च आमच्यावर पडलाच नव्हता. तो सगळा खर्च स्वत: मुकुंदरावांनी केला होता. त्यामुळे या आक्षेपात काही दम नव्हता. पण या विषयावर कुणी उघडपणे बोलायला तयार नव्हतं. कुणाला काही विचारलं तर `आपलं काहीच म्हणणं नाही' असं त्यांचं उत्तर यायचं. असं का घडतंय हे कळेना. मग माझ्या लक्षात आलं, की विरोध दोन कार्यक्रम केले याला नसून मेधा पाटकर यांना बोलावण्याला आहे...

धरणाला जोडूनच एक महत्वाकांक्षी योजना माझ्या मनात आकारत गेली. ही योजना येण्यास काही घटना कारणीभूत ठरल्या होत्या. १९९२ हे चलेजाव चळवळीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. महाराष्ट्न् सरकारनेही ते वर्ष साजरं करण्याची घोषणा केली होती. ती घोषणा  झाली आणि काही दिवसांतच आमच्या भागात इस्लामपूर, शिराळा आणि कागल अशा तीन ठिकाणी एकतर्फी प्रेमातून मुलींचे खून झाले. कोवळया मुलांच्या या क्रूर हिंसाचारामुळे समाज हादरून गेला. वर्षांपूर्वी देशातील तरुण स्वातंत्र्यासाठी बलिदान देत होता, आणि आज विषयांध होऊन तो दुसऱ्याचा जीव घेऊ लागला होता. या अधोगतीच्या निषेधात सगळीकडे मोर्चे निघू लागले होते. या प्रकारांनी मीही अस्वस्थ झालो होतो.
भरकटलेल्या तरुणाईला रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटत होतं. त्यांच्या डोक्याला खाद्य आणि रट्निवाष्चारांची जोड द्यायला पाहिजे असं जाणवत होतं. आमचे मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या ज्येष्ठ मित्रमंडळींशी त्याबाबत सल्लामसलत करावी असं मला वाटत होतं. सर्वप्रथम मुकुंदराव किर्लोस्करांना भेटलो. मग ज्येष्ठ कामगार नेते बा.न.राजहंस, वासुदेव कुलकर्णी, शरच्चंद्र गोखले, अनंत दीक्षित, अनंत फडके, अरविंद गोखले आदींना भेटलो. मला वाटत होतं की, बळीराजा धरणाला लागून असलेल्या बलवडी-तांदूळवाडी गावातल्या सरकारी जमिनीवर क्रांतीस्मृतीवन उभारावं. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या एकेका सैनिकाच्या नावाने तरुणांनी एकेक वृक्ष लावावा, जेणेकरून स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास तरुणांच्या मनात पुन्हा जागा होईल आणि त्यांचं नातं एकेका स्वातंत्र्यसैनिकाशी व स्वातंत्र्यामागच्या महान हेतूशी जुळेल. बळीराजा धरण जसं लोकसहभागातून उभं राहिलं तसंच हे स्मृतिवन युवक सहभाागातून आकाराला यावं आणि त्यातून युवकांना प्रेरणा मिळावी, अशी ती कल्पना होती.
सर्वांनाच ही कल्पना आवडली होती. त्यानुसार कामाला सुरुवात केली. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अर्धा एकर जागा तयार करून घेतली. गाळ टाकून जमीन समतल करणं, त्यात वृक्षरोपणासाठी खड्डे खणणं, त्यात खत टाकणं अशी सगळी कामं आसपासच्या शाळांचे विद्यार्थी आणि मुक्ती संघर्ष चळवळीच्या आम्ही सगळया कार्यकर्त्यांनी केली. क्रांतीस्मृतिवनाच्या स्वप्नात सर्व सहकारी सामील झाल्याने मनाला उभारी आली होती. बलवडीचे गावकरीही मागे नव्हते. साऱ्यांनी दिवसरात्र झटून काम केलं. २८ जानेवारीला प्रधान मास्तर, सांगलीचे जिल्हाधिकारी सुमित मलिक, आचार्य शांताराम गरुड, भगवानराव पाटील, बा.न.राजहंस, आमदार बाबूराव कोतवाल, मुकुंदराव आदींच्या उपस्थितीत तिरंगा फडकावून आणि वृक्षारोपण करून स्मृतिवनाच्या निर्मितीस प्ररंभ झाला.
भारताच्या स्वातंत्र्यावर कुणा एका व्यक्तीचं, एका विचारधारेचं नाव नाही. अनेक दशकांच्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांतून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीचे विचार पटोत ना पटोत, पण त्या व्यक्तीचं स्वातंत्र्यसंग्रामात योगदान असेल तर तिचा वृक्ष स्मृतिवनात असला पाहिजे, अशी माझी भूमिका होती. त्यामुळे शक्य त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचा शोध सुरू होता.
स्मृतिवनाची कल्पना इतक्या झपाट्याने लोकांमध्ये पसरली की लोकांच्या सहभागामुळे हे आव्हान बरंच सोपं झालं. पहिल्या एक-दीड वर्षातच मदतीचा ओघ आमच्याकडे येऊ लागला. जिल्ह्यातले अनेक स्नेही-हितचिंतक कामाला लागले. आपल्या मित्रमंडळींकडून त्यांनी शक्य तेवढा निधी गोळा करून आमच्याकडे पाठवण्याचा सपाटा लावला. दरवेळी रक्कम मोठीच असायची असं नाही, पण अनेकांनी छोट्या छोट्या रकमा देत खारीचा वाटा उचललेला असायचा. आम्हाला तेच हवं होतं. पैसे मिळणं जितकं महत्वाचं होतं तितकंच स्मृतिवनाशी माणसं जोडली जाणंही गरजेचं होतं. पहिल्या दीड वर्षात तब्बल १० लाख रुपये या लोकसहभागातून उभे राहिले. स्मृतिवनाची संकल्पना लोकांना मनापासून पटली आहे याचंच ते द्योतक होतं.
स्मृतिवन असं बाळसं धरत असतानाच मुक्ती संघर्ष चळवळीच्या कार्यकर्त्यांमधील एकवाक्यता पुन्हा भंगू लागली. क्रांतीस्मृतिवनात साम्राज्यवादी आणि भांडवलशाही शक्तींच्या प्रतिनिधींना थारा असता कामा नये असं आमच्यातील काहींना वाटू लागं. स्मृतिवनात ज्यांच्या नावाने वृक्ष लावले जाणार होते त्यामध्ये उद्योगमहर्षी जमशेदजी टाटा यांचंही नाव होतं. त्या नावाला आक्षेप घेतला गेला. अशा भांडवलदारांना स्मृतिवनात जागा असता कामा नये, अशी त्यांची भूमिका होती. `हे आणि असे मुद्दे मान्य असतील तरच आमचा स्मृतिवनाला पाठिंबा असेल, अन्यथा बळीराजा धरणाच्या क्षेत्रात आम्ही हे स्मृतिवन होऊ देणार नाही,'  अशी टोकाची भूमिकाही घेतली गेली. ज्या मुकुंदराव किर्लोस्करांनी स्मृतिवनाच्या कल्पनेला खतपाणी घातलं, त्यांच्या बाबतीतही आमच्या मित्रांचा आक्षेप होता. का, तर म्हणे ते भांडवलशाहीचे प्रतिनिधी आहेत! त्याशिवाय सावरकरांच्या पत्नी येसूबाई सावरकर यांच्या नावाने लावलेला वृक्ष काढून टाकावा, अशीही मागणी करण्यात आली होती.
हा म्हणजे मला मोठाच धक्का होता. आपण मिळून, सगळयांच्या संमतीने जी गोष्ट सुरू केली त्याला आता अचानक विरोध करण्याचं कारण काय हे मला कळेना. क्रांतीस्मृतिवन व्यासपीठाच्या नावाने महाराष्ट्नतली अनेक पुरोगामी विचारांची मंडळी एकत्र आली होती. अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीच्या सल्ल्यामार्गदर्शनाने हे काम पुढे जाईल, असं वाटत असल्यानेच जमेल त्या हिंतचिंतकांना मी क्रांतीस्मृतिवनाच्या कामात जोडून घेतलं होतं. ही सगळी मंडळी अगदी एकाच विचाराची होती असं नाही. अनेक विचारछटांचे लोक त्यात होते. नेमकी हीच बाब माझ्या इतर सोबत्यांना खटकली असावी. शिवाय स्वातंत्र्यसैनिकांची नावं निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीनेच सावरकर आणि त्यांच्या पत्नीचं नाव या यादीत घातलं होतं. या यादीतल्या, तुम्हाला आवडेल त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नावे वृक्ष लावा असं आवाहन आम्ही शाळकरी मुलांना केलं होतं. त्यानुसार इस्लामपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थीनीनी येसूबाई सावरकर यांच्या नावाने वृक्ष लावला होता. त्या कॉलेजच्या प्राध्यापक आाणि कवयित्री शैला सायनाकर यांनी या विद्यार्थीनींना संघटित केलं होतं. येसूबाई सावरकरांच्या नावे लावलेला वृक्ष काढणं म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत जे भोगलं त्याचा अपमान करणं आणि जिने वृक्ष लावला त्या मुलीच्या भावनांनाही छेद देणं, असं मला वाटत होतं. त्यामुळे ही अट स्वीकारणं मी कदापि मान्य करू शकत नव्हतो.
थोड्या दिवसांनी विरोधाचा आणखी एक मुद्दा पुढे आला. स्मृतिवनाच्या कमिटीत सांगलीचे बापूसाहेब पुजारी हे खजिनदार होते. ते पूर्वीचे राष्ट्नीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. त्यांना कमिटीतून काढावं, अशी मागणी भारत पाटणकर आणि इतर काही सहकाऱ्यांनी केली. जातीयवादी शक्तींना मज्जाव करावा, असं त्याचं म्हणणं होतं. पण ते संघाशी संबंधित आहेत म्हणून त्यांना कामात सहभागी करून न घेणं मला पटत नव्हतं. राजकीय-सामाजिक कामात इतकी अस्पृश्यता पाळू नये असं माझं म्हणणं होतं. शिवाय बळीराजा पाणी वाटपाच्या पहिल्या योजनेसाठी कपार्टने साडे आठ लाख रुपये मंजूर केेले होते. ते पैसे आमच्याकडे वर्ग व्हावेत यासाठी बँकंचं हमीपत्र हवं होतं. ते पुजारी यांनीच सांगली अर्बन बँकेमधून मिळवून दिलं होतं. स्मृतिवन व्हावं यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीला केवळ तिची विचारधारा वेगळी आहे म्हणून विरोध करणं मला पटत नव्हतं.

असंख्य ज्ञात-अज्ञातांचा निधी आणि श्रम, हे स्मृतिवन उभारण्यात लागलेले होते. जिल्हाधिकारी संजय उबाळे आणि अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर पळसुले यांनी हा वाद मिटावा यासाठी केवढे कष्ट घेतले होते. त्यामुळे नुकसानीचा अंदाज काढणंही अशक्य होतं. पण दुसरा इलाज तरी काय होता? ते सांगतील त्यांचे वृक्ष काढले असते, त्यांना भांडवलदार वाटणाऱ्या लोकांची नावं काढली असती तर कदाचित आठ-दहा वर्षांचे कष्ट आणि वीसेक लाख रुपयांचं काम वाचलं असतं; पण मी ते नाकारलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आायुष्य दिलेल्यांची नावं काढणं म्हणजे त्या व्यक्तींचा अपमान. ते मला बिलकूल मान्य नव्हतं. ज्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत त्यांची नावं काढून त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान नाकारणं मला कृतघ्नपणाचं वाटत होतं. मी ते स्वीकारलं नाही. मनावर दगड ठेवत मी क्रांतीस्मृतिवनाचा आजवरचा अहवाल लिहिला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ठेवला. आपण या स्मृतिवनाची जागा शासनाला परत देत असल्याचं मी लिहिलं होतं. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तो अहवाल स्वीकारला. जिल्हाधिकारी नितीन करीर यांच्याशी चर्चा करावी अशी सूचना त्यांनी केली. पण मला त्यात स्वारस्य उरलेलं नव्हतं. आपला इतिहास जतन करण्याची क्षमता पुढील पिढ्यात आहे की नाही हे स्पष्ट करण्याचं नियतीने दिलेलं आव्हान स्वीकारायचं मी ठरवून टाकलं होतं. कोणत्याही परिस्थितीत २००१ या सालात प्रवेश करण्यापूर्वी हुतात्म्यांच्या स्मृती पुनर्जिवित करण्याचा स्वत:शीच निर्धार केला. झाल्या प्रकारामुळे माझे सहकारी, मुकुंदरावांसारखे मार्गदर्शक स्नेही, बलवडीचे पाठीराखे गावकरी, माझे कुटुंबीय या साऱ्यांचं मन पिळवटून निघालं. पण काय करणार? घडलं त्याचा विचार करत कुढत बसण्यापेक्षा या सर्वांच्या सोबतीने नवी वाट चालणंच श्रेयस्कर होतं. त्याआधी स्मृतिवनात झालेल्या कामांची देणीही मी फेडली. तासगाव नगरपालिकेत उषा मेहता यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
एक वादळी आणि संघर्षमय पर्व मागे टाकून नव्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी मी नव्याने सज्ज झालो.
                         -संपतराव पवार,  बलवडी(भाळवणी), ता-खानापूर, जि-सांगली फोन-९६५७७३७५३७
(श्री.पवार यांचे अनुभव आणि वैचारिक घुसळण यांचे संकलन पुस्तकरूपात आहे, त्यातून संक्षिप्त भाग)

प्रयत्नांचा पाठीराखा
माझ्या अेका शेतकरी मित्राची ही कथा, मी फार जवळून प्रत्यक्ष पाहिलेली आहे. आजच्या शेतकरी प्रश्णांच्या संदर्भात ती बोधक वाटते. कथेतील नावे वेगळी समजा.
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ भागातील श्रीराम काळे हा शेतकरी. शेदीडशे अेकरांचा बडा शेतकरी, त्यातही वडिलांचा अेकटा मुलगा. घरचे चांगले वातावरण. त्यामुळे आिंजिनियरिंगला गेला. पदवी घेअूनही नोकरी न करता घरची शेती करू लागला. जमीन भरपूर होती, पण पाणी कमी. त्यातच शेतमालाच्या भावांची पंचाआीतच. लहरी निसर्ग, मजुरांची टंचाआी, खतांची महागाआी हे तर सारे होतेच. बँकेचे कर्ज फिटत नव्हते. तशातच अेक जाहिरात त्याच्या वाचनात आली. `सदाफुली पिकवा आणि लाखो रुपये कमवा' मुंबआीतल्या कोण्या अॅग्रो आिंडस्ट्नीची ही जाहिरात होती. कंपनी सदाफुलीची रोपे शंभर रुपये किलोच्या भावात खरेदी करणार होती. तसा लेखी करार करणार. श्रीरामच्या आशा पल्लवित झाल्या. सदाफुली हे फुलझाड कमी पाण्यात फुलते, हे त्याला ठाअूक होते. त्याच्या वाचनात आलेलेे होते की, अमेरिकेत सदाफुलीच्या वाळलेल्या पानाफुलांपासून खोडामुळांपासून क्रॅन्सरवरती औषध तयार करतात. त्याने संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. पुन्हा काहीतरी करून पैसे अुभे केले आणि वीस अेकरांसाठी वीस हजाराचे बी घेतले. मशागत करून लागण केली. सोने गहाण ठेवून तुषारसिंचन वगैरे सोयी केल्या.
त्याच्या अंदाजाप्रमाणे दोन वर्षे वाढलेल्या अेका अेकरातील रोपट्यांचे वजन पाचशे किलो व्हायला हरकत नव्हती. कंपनीच्या शंभर रुपये दराने अेकरी ५० हजारांचे अुत्पन्न होणार, म्हणजे वीस अेकरात दहा लाख लाखांचा हिशेब त्याने मांडला. खर्च वजा जाता पाच लाखाला मरण नाही!!
मुंबआीला त्या कंपनीच्या मॅनेजरशी भेट ठरली. अेका भारीपैकी हॉटेलमध्ये चहापान झाले. श्रीरामने त्याच्यासोबत आणलेले सदाफुलीच्या रोपट्यांचे नमुने त्यास दाखविले.... तशी नाक मुरडून त्या मॅनेजरने म्हटले, `अहो काळेसाहेब, तुम्ही आणलेला सदाफुलीचा नमुना अगदीच सुमार दर्जाचा आहे. आम्ही जाहिरातीत दर जाहीर केला होता, पण करारपत्रात लिहिलेले कलम तुम्ही वाचलेले दिसत नाही. आमच्या प्रयोगशाळेतील तज्ज्ञ लोकांचा अहवाल पाहून तो माल नाकारण्याचा अधिकार कंपनीला आहे. तुमचा हा माल आम्ही घेअू शकत नाही.. अमेरिकेतल्या त्या कंपनीला हा माल पाठविला, आणि त्यांनी तो नाकारला तर आमचे नुकसान कोण भरून देणार?' काळेपुढे काजवे चमकले. तो हतबुद्ध झाला. घाम फुटला. ते पाहून त्यापुढे नरमाआीच्या सुरात तो मॅनेजर म्हणाला, `हे पहा काळेसाहेब, तुमची मन:स्थिती मी समजू शकतो पण माझा नाआिलाज आहे. तरीही त्या मालासाठी फार तर दहा रुपये भाव देअू'  -हे तर श्रीरामच्या जखमेवर मीठ चोळणेच होते. `विचार करून सांगा' असे म्हणत तो मॅनेजर निरोप घेअून गेला. श्रीराम खाली मान घालून बसून राहिला.
थोड्याच वेळात अेक युरोपियन माणूस तिथे येअून अुभा राहिला, ते श्रीरामला कळलेही नव्हते. त्या माणसाने श्रीरामला `हॅलो मिस्टर' अशी साद देअून म्हटले, `वेल् जंटलमन, हाअू डू यू डू?' श्रीरामने त्याला कसंतरी `हॅलो' केलं. तेवढ्यावर समोरची खुर्ची ओढून त्यावर बसत तो गोरा माणूस  विचारू लागला. पिशवीतली नमुन्याची रोपं त्यानं पाहिली. नंतर बराच वेळ दोघांचे आिंग्रजीतून संभाषण झाले. त्याने आपल्यासोबत श्रीरामला चलण्यास सांगितले आणि तो त्या अॅग्रो आिंडस्ट्नीज्च्या ऑफीसात गेला. त्या मॅनेजरला भेटला. सदाफुलीचा तो नमुना दाखवून त्याने विचारले, हा नमुना नाकारण्याचे नेमके कारण काय? तो अधिकार तुम्हाला कोणी दिला?' -योगायोग असा होता की, अमेरिकेतल्या त्या प्रयोगशाळेतच तो गोरा माणूस काम करीत होता; आणि हॉटेलमधील ते संभाषण त्याने अैकून समजून घेतलेले होते. हा नमुना अुत्कृष्ठ असूनही तो बेलाशक नाकारल्याबद्दल त्याने त्या मॅनेजरचीच खरडपट्टी काढली. `यांचा सर्व माल ठरल्यापेक्षा दहा रुपये जास्त दराने खरेदी करून तो अमेरिकेच्या कंपनीला पाठवा' -अशी तंबी देअून तो श्रीरामसह बाहेर पडला.
केवळ सुदैव म्हणून हा माणूस धावून आला, याबद्दल कुणाचे कसे आभार मानायचे या संभ्रमात श्रीराम गावाकडे जायला निघाला.
-श्रीकृष्ण मा केळकर (वय ९४)  तारा टॉवर्स,  अलंकार चौकीजवळ, पुणे ४. फोन ८४४६ ९०५ ५१७

प्रगल्भता म्हणजे काय?
जग बदलण्याचे सोडून देत, स्वत: बदलण्यासाठी आपल्या प्रत्येक कृतीचे परीक्षण सुरू होतं
लोक जसे आहेत तसे ते स्वीकारले जातात
प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबरच असतो, हे समजू लागतं
स्वत: काहीतरी घेण्यापेक्षा देण्यावर भर असतो
परस्पर नात्यामध्ये अपेक्षा न ठेवता त्यागाची भावना स्वीकारली जाते
आत्मिक सुख कशात आहे हे कळू लागतं
आपण किती हुशार किती मोठे आहोत हे जगाला पटवून देण्याचं थांबतं
आितरांकडून शाबासकी आणि स्तुती यांची अपेक्षा न ठेवता प्रामाणिक काम सुरू होतं
स्वत:ची तुलना आितरांशी करणं बंद होतं
स्वत:शी संवाद करता येअू लागतो
आपली गरज आणि हव्यास यांतला फरक कळू लागतो
माणसांशी माणुसकीनं बोलणं वागणं सुरू होतं
कधी  न  सुटणारे प्रश्ण लक्षात घेअून ते सोडून दिले जातात
आपण प्रगती करीत असताना आितरांस मोठं करण्याचा प्रयत्न असतो
आितरांच्या चांगल्याचं मनापासून निरपेक्ष कौतुक केलं जातं
आितरांना आपल्याकडून त्रास होअू नये हे जाणवू लागतं आणि सर्वात महत्वाचं -
आंतरिक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणं थांबतं
तेव्हा बुद्धी प्रगल्भ झाली असं म्हणायला हरकत नाही.
- संकलित

भारतातील धनवान
जुलै २०१८ मध्ये केलेल्या अेका पाहणीत असे दिसून आले की, अेक हजार कोटींची निव्वळ मालमत्ता (नक्त मालमत्ता) असणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या वर्षाभरात दोनशे व्यक्तींची भर पडली आहे. भारताची लोकसंख्या अेकशे पंचवीस कोटि म्हटली तर त्यातल्या ८३१ जणांकडे अेक हजार कोटिंपेक्षा जास्त संपत्ती आहे. माध्यमे आणि राजकारणी पुढाऱ्यांचे अैकून, महागाआी आणि बेरोजगारी यांविषयी आपण सामान्य माणसे, ओरडत असतो किवा डोक्याला हात लावून बसलेले असतो. या लोकांना नाही का महागाआी? त्यांना मिळतात कशी कामे? त्यांच्याकडे कुठून येतात माणसे कामाला? कौशल्य कुठून येते? त्यांच्याकडे पैसे असण्याने प्रश्ण संपत नसतो; -कारण त्यांनाही स्पर्धा असते, अडचणी तर असतातच. अुलट अेवढी अुलाढाल करतांना त्यांनी हजारो लोकांना रोजगार तर दिला असणारच.
देशातल्या त्या ८३१पैकी जवळपास निम्म्या व्यक्ती मुंबआी आणि महाराष्ट्नतल्या आहेत. महाराष्ट्नचा विकास ठप्प झाला आहे, ही ओरड तर आपल्या कानी येत असते, मग चारशे लोकांनी अेक हजार कोटिंचा टप्पा ओलांडला, तो आितर राज्यांत चोऱ्या करून तर नाही? शिवाय या टप्प्याच्या जवळपास आलेल्यांची संख्याही यांहून कितीतरी मोठी असणार; म्हणजे आितकी अुलाढाल करणारे राज्य मागेच पडले हे कसे म्हणावे? तरीही अेक बाब नमूद करायला हरकत नाही की, हा मोठा वाटा महाराष्ट्नचा असला तरी त्यात अगदी मराठीच म्हणता येतील अशी माणसे कमीच बरं का! अंबानी वगैरेंना मुंबआीकर म्हणून जरा समाधान करून घ्यायचे! मराठी तरुणांना संधी नाही असे तर आज म्हणता येत नाही. ते तरुण कोट्यधीश कसे होतील यासाठी प्रयत्न करायचे तर गावपातळीपासून शोध आणि प्रयत्न हवेतच.
या बड्या मंडळींच्या यादीत अर्थातच अव्वल स्थान आहे मुकेश अंबानींचे. अंबानी यांची संपत्ती दररोज साधारण तीनशे कोटिंनी वाढते आहे (असे म्हणतात.) गेल्या साली पतंजलीच्या बालकृष्ण यांनी त्या यादीत दहावा क्रमांक मिळवला होता, या वर्षी ते मागे पडले. चालू वर्षी स्वदेशी, मेक आिन आिंडिया, अशा घोषणा चालू आहेत; त्यांचा परिणाम झाला तर हे बालकृष्ण पुन्हा वर येतील. या ८३१जणांकडे अेकूण संपत्ती ४९लाख कोटि आितकी आहे, -म्हणजे भारताच्या सकल राष्ट्नीय अुत्पन्नाच्या तिमाहीआितकी -अेक चतुर्थांश. संपत्तीचे हे केंद्रीकरण आहेच परंतु अुरलेल्या सवासो करोड लोकांनी त्याचा विचार करावा, त्यांना संपत्ती मिळवायला कुणी नको म्हटलंय? -व्यवसायांना, -शेतीलासुद्धा पूरक दिवस आहेत. अेकत्रित प्रयत्नांची गरज आहे. पैसा निर्माण झाला तर बरेचसे प्रश्ण सुटतील असे आपल्या सर्वांना वाटते आहेच ना?
मुकेश अंबानी यांची नक्त मालमत्ता आहे ३.७ लाख कोटि, दुसऱ्या क्रमांकावर अेस पी हिंदुजा १.५९कोटि, तिसरे अेलअेन मित्तल १.१४लाख कोटि, चौथे अझीझ प्रेमजी १लाख कोटि. पुढचे क्रमांक आहेत - दिलीप संघवी, अुदय कोटक, सायरस पूनावाला, गौतम अदानी, सायरस मिस्त्री, शापुरजी पालनजी मिस्त्री. अंबानी यांच्या जवळ जाआील असे कोणी सध्या तरी दिसत नाही. कंपनीच्या अुलाढालीच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीअेस) ही ७.८६लाख कोटिंवर आहे, दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स (६.९८लाख कोटि).
-यात आमच्या गावाकल्डा म्हराटी मानूस कुटं हुबा ऱ्हानार द्येवा?
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन