Skip to main content

26 April 2018

झुंज देण्याची हीच वेळ 
कविवर्य सुरेश भट यांचा जन्म १५-०४-१९३२ चा. त्याना जाअूनही आता १५वर्षे झाली. प्रस्तुतचा लेख त्यांनी २५ वर्षांपूर्वी लिहिला. त्या लेखातली परिस्थिती आणि आव्हाने आज तितकीच गंभीर आहेत. `हिंडणारा सूर्य या त्यांच्या पुस्तकांतून हा लेख, काही नामोल्लेख व  मजकूर वगळून  दिला आहे.
जेव्हा मी `भारत' असा शब्द अुच्चारतो, तेव्हा माझ्या नजरेसमोर  माझ्या देशातील नद्या, खेडी, गावे, शहरे, जमीन, अवकाश , तारे, वारे, फुले, पर्वत किंवा निसर्ग नसतो; माझ्या दृष्टीने माझा भारत म्हणजे माझ्या देशात राहणारी सर्व जातीची व धर्माची, विविध भाषा बोलणारी सामान्य माणसे आहेत. या माणसांशिवाय `देश' हा शब्दच अर्थशून्य आहे. `देशभक्ती' म्हणजे जेथे आम्ही राहतो, तेथील सर्व माणसांच्या सुखाची आणि स्वप्नांची काळजी घेणे.. `देशभक्ती ' म्हणजे आपल्या देशात राहणाऱ्या सर्व माणसांवर प्रेम करणे, त्यांना आपल्यासारखीच माणसे समजणे आणि आपण सर्वांनी अेकमेकांसाठी जगणे. या देशात राहणाऱ्या माणसांच्या मूलभूत समस्यांचा विचार  न  करता लोक स्वत:च्या वर्चस्वासाठी फक्त देशभक्तीच्या कोरड्या गप्पा मारतात, आणि त्याचवेळी या भारतात राहणाऱ्या साध्यासुध्या गरीब माणसांना अेकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चिथावणी देतात. अशा दोन पायांच्या प्राण्यांना, बेवारस कुत्र्यासारखी वणवण करणाऱ्या युवकांना आम्ही हिंदू मुसलमान शिख िख्र्चाश्न किंवा बौद्ध मानून त्यानुसार त्यांचा वेगवेगळा विचार करायचा काय? मी परमेश्वर किंवा धर्म यांचा विचारच करीत नसतो. ज्या अर्थी भारतात रा स्व संघ, वि हिं प, बजरंग दल, शिवसेना, काँग्रेस, अेकूण तेहेतीस कोटि अखिल भारतीय रिपब्लिकन पाटर््या , मुस्लीम लीग, जमाते आिस्लामी आणि भारतीय जनता पक्ष आहे; त्याअर्थी परमेश्वर नाही. निदान आपल्या भारतात तरी परमेश्वर नाही, अशी माझी खात्री आहे.
आम्हाला सार्वजनिक जीवनात परमेश्वर आणि धर्माची गरज नाही. आमची खरी गरज म्हणजे आम्हाला आधी माणूस म्हणून सन्मानपूर्वक ताठ मानेने जगता आले पाहिजे. आम्हाला फक्त कागदावर असलेले नागरिक म्हणून प्राप्त झालेले आमचे हक्क खऱ्या अर्थाने अुपभोगता आले पाहिजेत. मशिदी किंवा मंदिरे यांची नासधूस करून आम्ही भारतीय लोक आमचे मूलभूत प्रश्न सोडवूच शकत नाही. धर्म हा माणसांच्या आत्मिक विकासासाठी असतो. धर्म ही अेक संपूर्ण खाजगी बाब आहे. ज्याचा धर्म त्याच्या घरात. पण रस्त्यावर जो तो फक्त साधा माणूस असतो, - अेक भारतीय नागरिक असतो.
मला आज दु:ख याचेच वाटते आहे की, आमच्या रोजच्या ज्वलंत  प्रश्नांकडे आम्ही दुर्लक्ष करावे आणि अेकमेकांच्या छातीवर बसावे, म्हणूनच हे सर्व काही घडविण्यात येत आहे. खरे तर आज वाढत्या महागाआीला आळा घालण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांनी अेकवटून लढा अुभारला पाहिजे.  आम्ही फक्त धर्माचा जयजयकार करीत, आितरांचा द्वेष करीत आहोत; पण आमच्या करोडो बेरोजगार युवकांना हक्काचे काम मिळावे म्हणून आम्ही अेकवटून, संघटित होअून लढा देत आहोत काय?  याचा आम्ही सर्वांनी -विशेषत: बेकार युवकांनी विचार केला पाहिजे. आम्हाला सदैव बेकार, भुकेकंगाल, हैराण, गरजू आणि आसऱ्यावाचून ठेवणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा असायला पाहिजे; पण हे सारे बाजूला ठेवून आितर वाद पेटविले जात आहेत. गरिबांनाच गरिबांचे रक्त सांडण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. पण सामान्य लोकांनी अेकमेकांना ठार मारले तरीसुद्धा त्यांचे प्रश्न सुटणार आहेत काय?
  आपल्या या देशातील अेकूण अेक मशिदी पाडून तेथे भगव्या झेंड्यासह मंदिरे बांधली तरीसुद्धा हिंदू युवकांचे प्रश्न सुटणार आहेत का? जरा शांत डोक्याने आणि बारकाआीने विचार केला तर फक्त महाराष्ट्न्च नव्हे तर साऱ्या भारतात, अुठल्या सुटल्या हिंदुत्वाचा जय करणारा अेकही माणूस बेकारी व गरिबीमुळे मेल्याचे अेकही अुदाहरण  माझ्या तरी लक्षात नाही. घरी दोन वेळच्या जेवणाची अुत्तम व्यवस्था असल्याशिवाय किंवा तेवढी समाधानकारक मजुरी मिळाल्याशिवाय कोण धर्मवीर अयोध्येला जाअू शकतो? गोरगरिबांपैकी गेले असतील तर त्यांची टक्केवारी किती? आता साधूसंतांचे म्हणाल तर, आपल्या देशात सामान्य माणसेच गरिबी किंवा अुपासमारीने मरतात,  अेकही `साधू' किंवा `संत' अुपाशी मेल्याचे अेकतरी अुदाहरण आम्ही कुठेतरी पाहिले आहे काय?
वस्तुस्थिती अशी आहे की, या देशाची सत्ता आपल्या ताब्यात यावी म्हणून हे राजकारणी देवधर्माला वापरीत आहेत. शतकानुशतके यातना सोसून  आणि त्याचबरोबर संघर्ष करून भारतीय जनतेने जे थोडे मिळविले, तेही गमावण्याची वेळ आलेली आहे. त्यांची ही आिच्छा पूर्ण झाली तर आमचा भारत देश केवळ भूतकाळात जाणार नाही तर अेक अखंड देश म्हणून शिल्लकच राहणार नाही. कागदी का होआीना, पण भारताचे संविधान अजूनही शिल्लक आहे. त्या संविधानानुसार भारत हे हिंदुराष्ट्न् नाही आणि याच संविधानानुसार भारताच्या सरकारचा कोणताही धर्म नसतो. भारतीय राज्यघटना हाच भारताच्या सरकारचा धर्म आहे आणि आम्हा भारतीयांसाठीसुद्धा आम्हा भारतीयांचा भारतीय राज्यघटना हाच धर्म आहे.
मी आजवर रा स्व संघ, शिवसेना आणि भा ज प वर टीकाच केली आहे. त्यांच्यापैकी कोणत्याही नेत्याचा द्वेष करतो म्हणून नव्हे तर मला पटतच नाही म्हणून लिहितो. सर्व लोकशाहीवादी शक्तींनी अेकत्र येअून मोर्चा बांधण्याची हीच वेळआहे. कुणीही गप्प बसू नये. जे कार्ल मार्क्स किंवा लेनिनला मानतात, त्यांनाही गप्प बसण्याचा अधिकार नाही आणि जे महात्मा फुले - परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना आपले दैवत मानतात त्यांनी तर लोकशाहीवादी शक्तींच्या अग्रभागी असायला पाहिजे.

माणूस नावाचे बेट
पूर्वी मी गावात भरवस्तीत राहात असे. माझ्याकडे सतत लोक येत जात असत; सकाळी तर माझ्या घरी दरबारच भरत असे. लोक निरनिराळया तक्रारी घेऊन येत, व मी माझ्या ओळखीच्या जोरावर त्यांचे निराकरण करी. गावाबाहेर माझ्या मुलाने व सुनेने तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर निवासाची सोय केली. नातू व नात तिकडे गेले. त्यामुळे आम्हा आबोजा-आजीस नव्या घरी जावे लागले. नवा विभाग पॉश लोकांचा, अपार्टमेंटस्वाल्या लोकांचा. मुख्य दरवाजा बंद की जगाशी व्यवहार बंद. मोबाईल हे एकमेव व्यवहाराचे माध्यम. गावातून माझ्याकडे कोणास रिक्षाने यावयाचे झाल्यास, यायला ६०-७० रुपये व तितकेच जायला लागतात. मुलगा व सून त्यांच्या व्यवसायात, नातू बंगलोरला साऊंड इंजिनियरिंग करतो आहे तर नात पुण्यास एम.डी. करते. त्यामुळे मला व पत्नीला एकांतवासाचे महत्व कळले. म्हणून एकांतवासावर जरा अधिक वाचन केले.
सावरकरांचा एकांतवास तत्कालीन  सरकारने जाणूनबुजून लादला होता. मानसिक दाब आणून मानसिक छळ करण्यात देखील एक और प्रकारचा आसुरी आनंद मिळतो, तो सरकारने मिळवला. पूर्वी माणसाला शारीरिक व्याधी सहन कराव्या लागत, आता मानसिक. औरंगझेबाने आपल्या बापाला -शहाजहानला एकांताची शिक्षा दिली होतीच ना? एल्बा बेटावर इंग्रजांनी नेपोलियनला त्याच कारणाने ठेवले होते.
आजकाल सर्व गोष्टींचा वैज्ञानिक व आर्थिक बाजूंनी विचार केला जातो. तुम्ही रोज १५ सिगारेटी फुंकत असाल किंवा रोज दारूचे ६ पेग पोटात ढकलत असाल तर त्याने जेेवढे नुकसान होईल त्यापेक्षा एकांतवासाने हार्ट अॅटॅकचे भय २९ टक्क्याने वाढते आणि पक्षाघाताचे (पॅरालिसिस) ३२ टक्क्याने, एकांतात स्ट्न्ेस हॉर्मोन्स वाढतात आणि रोगप्रतिबंधक शक्ती कमी  होते.
माझे मित्र कोल्हटकर म्हणतात, ``देशादेशातील अंतर भले कमी झाले असेल, पण माणसामाणसांतील मानसिक अंतर वाढले आहे त्याचे काय?
``मला फेसबुकवर ४०० हून जास्त मित्र आहेत. टि्वटरवर ८००० हून अधिक लोक फॉलो करतात. व्हॉट्सॅपच्या २०० गटांचा मी सभासद आहे. मी फेसबुकवर एक नवा फोटो टाकला की ५०० लोक मला `लाईक' करतात; पण मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा मला भेटायला ५ मित्रही आले नव्हते. इतर मित्रांपाशी वेळच नव्हता. कदाचित् काही अडचणीही असतील. माझ्या फेसबुकवरील मित्रांनी `गेट वेेल सून'चे संदेश पाठवले.मी किती एकटा आहे त्याचा  मला निराळाच साक्षात्कार झाला. मी त्या खिन्नतेत सारे फेसबुक व टि्वटर अकाऊंट डीलीट करून टाकले. त्या बेगडी सृष्टीस राम राम ठोकला.
-(`धर्मभास्कर'मधील डॉ.दा.वि.नेने यांच्या लेखातून)

मतिभिन्नता आणि मतभिन्नता
भारताच्या संसदेत कोणतीही चर्चा  न  होता अधिवेशन संपले, त्याबद्दल परस्परांना दूषणे देण्याची आता चढाओढ लागली आहे. लोकशाहीचे मूलतत्व हे आहे, -आणि असलेच पाहिजे की प्रत्येकाला स्वत:चे मत असते आणि त्याचा योग्य तो आदर राखला गेलाच पाहिजे. संसदेत कोणत्या पक्षाने गोंधळाची परिसीमा गाठली हे तर सारा देश जाणून आहे. पण आपल्याकडची लोकशाही केवळ राजकीय पक्षांपुरतीच मर्यादित समजाने घेतली जाते हे त्यातले गौणत्व आहे. आपल्या रोजच्या जीवनातही दुसऱ्याचे अैकून घेण्याची आपल्यातल्या भल्याभल्यांना सवय नाही. दुसरा पक्षच कसा चूक आहे हे सांगण्यात आपली आयुष्ये संपतात; पण आपली बाजू चांगली असेलच तर ती कोणती, हे सांगण्याला कोणी तयार नाही. -कारण आपली बाजूच चांगली आणि योग्य आहे याची स्वत:लाही खात्री नाही. आपले वैगुण्य झाकण्याचा सोपा मार्ग  मग अेकच अुरतो, -तो म्हणजे दुसऱ्यावर दोषारोप करणे! तोच आज सर्वत्र सरसकट अनुसरला जातो आहे. अेका अर्थी लोकशाही सहजीवनाची ही क्रूर कुचेष्टा आहे.

अेकेकाळी काँग्रेसचे राज्य असताना लोकसभेत भारतीय जनता पक्षाने विरोधकाच्या भूमिकेतून तसाच गोंधळ घातला होता, आणि त्या संदर्भात `सभागृह चालविणे ही सरकार पक्षाची जबाबदारी आहेे' असे निरर्गल सुरात म्हटले होते. तसे म्हटले होते हे खरे असेल आणि ते नि:संशय चूकच असेल तर' ती चूकच करीत बसण्याशिवाय विरोधकांना काही पर्याय दिसत नाही काय? आज आपल्याही सामुदायिक जीवनात -आणि कुटुंबांतही याच प्रकारचे वाद चालतात. लहान मुलांच्या खेळात कोणी बाद झाला की, `मग तू मघाशी बाद असताना कसा खेळत राहिलास? -आता मी पण बाद होणार नाही...' असली भांडणे असतात. त्याला त्याची चूक दाखवून दिली तर - `तू माहिती आहेस की, तू कोण लागून गेलास, तू तरी काय करतोस तेव्हा?' हे  धडधडीत चुकांचे समर्थन असते. तोच प्रकार बालपणापासून आपल्या हाडीमासी रुळत असावा; -त्याचा आविष्कार संसदेतही दिसतो आहे.

दुसऱ्याची चूक हा आपला मोठेपणा असे कधीच ठरत नाही. पण आजच्या निवडणुकांतही राजकीय पक्षांचा प्रचार याच पातळीवर अुतरतो आहे. आपली बाजू चांगली असे सांगता येण्याजोगे असेल ते जरूर मांडले पाहिजे; पण दुसरा पक्ष कसा वाआीट हे सांगण्यात स्पर्धा लागते. त्याचा परिणाम असा की निवडणुकांच्या निमित्ताने लोकशिक्षण होेण्यापेक्षा कुचाळक्या अैकायला लागतात आणि समोर आलेल्यांतील कोेणताच पक्ष चांगला नाही असे मतदारांना वाटू लागते. काम करण्याच्या स्पर्धेअैवजी कमी वाआीट कोण त्याची निवड करण्याची पाळी येते. आपल्या अैतिहासिक आक्रमणांच्या काळात  सुलतान चांगला कोणता, असा प्रश्न पडायचा म्हणतात. सरळ गर्दन मारणारा;  की हाल क रून मारणारा? -तशी निवड करण्याला लोकशाही निवडणूक म्हणायचे काय?

कर्णाटकच्या निवडणुकीत त्या प्रचाराचा अनुभव येत आहे. आपल्याकडे कोणत्याही निवडणुकीचा त्यास अपवाद नाही. नेहरू पटेल यांचे नाव सांगणाऱ्या सवाशे वर्षांच्या पक्षाचा राष्ट्नीय अध्यक्ष म्हणतो काय, -तर `मी संसदेत बोलू लागलो तर प्रधानमंत्री पंधरा मिनिटं समोर अुभारणार नाहीत -' आणि आज साऱ्या भारतात निवडणुकीत प्रभावशाली ठरलेला प्रतिपक्षाचा अध्यक्ष करवादून ओरडतेा काय, तर `यांना जाब विचारणाऱ्यांना, आणीबाणी लादून तुरुंगात टाकले....' यात कर्णाटकच्या सामान्य जनतेच्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षांतील योजना कोणत्या, त्या पूर्ण करण्याचा आराखडा कोणता, आधी केलेल्या घोषणांची आणि त्यांच्या पूर्ततेची सद्यस्थिती काय अशी काही चर्चाच नाही. दुसरी बाजू किती वाआीट याची जीवघेणी चर्र्चा चालली यांतून कोणते लोकशिक्षण साधले?  -साधलेच असेल तर आितकेच समजले की, `सगळेच तसले!!'

प्रधानमंत्री मोदी हे तर सध्या सर्वचर्चित व्यक्तिमत्व आहे. ग्रामपंचायतीची सभा असो की, आंतरराष्ट्नीय परिषद असो, मोदींचा अुल्लेख अटळ बनला आहे. त्यातही ती व्यक्ती पक्की राजकारण-धुरंधर आहे हे तर सिद्धच झाले आहे. त्यांच्या प्रचारी भाषणांवर टीका होते की, देशाच्या प्रधानमंत्र्याने अशा निवडणुकींच्या गदारोळात प्रचारकी हल्लेगुल्ले करणे प्रशस्त नाही. पण त्या म्हणण्यात सरळ मतलबीपणा आहे. त्या निवडणुकीच्या प्रचारांत राष्ट्नीय म्हणविणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाने त्याच प्रधानमंत्र्यावर काहीही तोंडसुख घ्यावे, -आणि त्यास सणसणीत जबाब मिळाला की, प्रधानमंत्र्याने पातळी सोडली म्हणावे? मोदी गेल्या चार वर्षांत शब्दश: साऱ्या जागतिक नेत्यांना अनेकदा भेटले, विदेशांतल्या भारतीय समुदायांना भेटले, त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना भेटले, सरसंघचालकांना भेटले, सामान्य जनतेला आणि चिट्यामिट्या पोरांनाही भेटले आहेत. त्या काळात त्यांनी कित्येक सभांचे फड मारले आहेत. त्यांच्या प्रत्येक वेळच्या वागण्याबोलण्यात कमालीचा फरक असतो. जिथे जसे बोलावे वागावे लागते, तिथे ते कधी कचमचत नाहीत. अमेरिकेच्या दोन अध्यक्षांशी ते तितक्याच खुलेपणाने बोलले, चीनच्या सामर्थ्यवान हुकूमशहाशी दोनदा बोलले आणि क्रॅनडाच्या पंतप्रधानाला त्यानी हेतुपुरस्सर हुंगलले. कोणत्याही देशातल्या पोरीबाळी आणि बालके यांच्यापासून कुणाशीही त्यांनी सहजसंवाद केला. अर्थात त्याही वेळी `मोदी अुगीच मिठ्या मारीत फिरतात...' अशी संभावना करण्यास विरोधकांनी कमी केले  नाही. हीच समज बाळगून पोच नसलेल्या पदाधिकाऱ्याने काही तारे तोडले तर ते मोदीसारखा खमक्या माणूस कशासाठी खपवून घेआील? बोलूनचालून निवडणुकीचीच प्रचारसभा असते, तिथे तर आपल्या लोकशाहीने विरोधकांच्या चुकांवर तुटून पडण्याचीच प्रथा दिली आहे; मग ती संधी प्रधानमंत्री झाला तरी का सोडेल? - आाणि त्याने तरी ती का सोडावी?

अेकूणातच ही कुचाळकी प्रचाराची प्रथा खऱ्या लोकशाहीला पूरक नाही. ते करतात म्हणून हे करतात, हे काही त्याचे सच्चे समर्थन नव्हे, पण त्याला तूर्त आिलाजही नाही. महाराष्ट्नत ठाकरे अत्रे अथवा अन्य कित्येकांची ती प्रथा होती. जनसामान्यांच्या लोकशाहीत ते चालते, प्रभावी ठरते. म्हणून त्याचा अवलंब कधी नाआिलाजाने वा कधी योजून करावा लागतो. तरुणांच्या तोंडी गाणी कोणती यावरून देश कळतो असे म्हणतात, त्याच चालीवर असे म्हणावे लागते की, निवडणुकीतला प्रचार पाहून अैकून आपल्या लोकशाहीची पप्ता कळते.

थंडावा देणारी पांढरी माती
पूर्वीचे अुद्योग व्यवसाय जीवन हे सारे मंद गतीने चालणारे होते. परंतु खोलात जाअून पाहिले की ही मंद पण निश्चित गती योग्य वाटेल. गती वाढली तर विचारशक्ती नष्ट होत जाते.
पूर्वी काळया मातीपासून किंवा केाणत्याही मातीपासून चिकट चिवट पांढरी माती बनविली जात असे. त्यातून घरे बांधली जात. `बेलदार' समाज त्यात तज्ज्ञ असे. मोठा खड्डा करून त्यात भरपूर शेण, माती, काडीकचरा, पुन्हा शेणमाती, बेलफळे व आितर अनेक वनस्पती टाकून तो खड्डा पेटवून दिला जाआी, त्यानंतर दोन आठवड्यांनी ती माती पांढरी होआी. हीच माती मळून पुढे बांधकामासाठी वापरली जात असे. १०० वर्षांनी गावाला आग लावून पुन्हा तीच माती वापरून नवे गाव अुभे करीत  असत. सीमेंटचा शोध लागण्यापूर्वी भारतात या मातीचाच अुपयोग करून मोठमोठे वाडे किंवा लहान घरे बांधली जात. त्यांचे आयुष्य शेकडो वर्षे होते. हे बांधकाम करतेवेळी पाण्याची आजच्या तुलनेत खूप बचत होत असे. तसेच ही माती बांधकामासाठी पुन्हापुन्हा वापरता येत असे. अशा प्रकारे बांधलेल्या घरांतून तापमानाचे संतुलन राखले जात असे. ज्या प्रदेशात तांबडी किंवा काळी माती आहे तिथेसुद्धा पांढऱ्या मातीतली घरे पाहून, ही माती कुठून आली असा प्रश्न पडत असे... परंतु तिथल्या स्थानिक मातीचेच पांढऱ्या मातीत रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान `बेलदार' समाज जाणत होता, हेच त्यांच्या अुपजीविकेचे साधन होते.
या साऱ्या भेटीतून आम्हाला आश्चर्यकारक माहिती मिळत होती आाणि अेक पुरातन विश्व आमच्यासमोर नव्याने अुलगडत होते.
दुर्दैव असे की, हे  वार्तांकन लिहीत असताना नुकतीच बातमी आली की, हे शर्मा गुरुजी कालवश झाले. त्यांच्या संशोधन, चिंतन आणि अनुभव यांचा अुपयोग कसा होणार हा आता प्रश्नच आहे. पण असे ज्ञानाचे वैभव काळाच्या गतीबरोबर आपण घालवत चाललो आहोत याची खंत तरी किती करायची!!
(रविंद्र शर्मा, आदिलाबाद यांच्याशी चर्चेतून, संकलन-जयंत बर्वे,विटा
    फोन-९०११०८५८१०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन