Skip to main content

12 March 2018

गुढीपाडवा - एक सांस्कृतिक उत्सव
गुढीपाडवा एक पूर्ण मुहूर्त आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्र्रम्हदेवाने निर्माण केलेल्या वस्तुमात्राने आपल्या कार्याला या दिवशी सुरुवात केली. मराठी कालगणनेलाही गुढीपाडव्यादिवशी सुरुवात झाली. प्रभू रामचंद्राने वालीच्या त्रासातून दक्षिणेकडील प्रदेश मुक्त केला. त्यासमयी जनतेने गुढ्या तोरणे उभी करून आनंदोत्सव केला, तो दिवस गुढी पाडव्याचा. वनवास भोगून रामचंद्राने या दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. वैशंपायन ऋषींनी जनमेजय राजाला महाभारतातील कथा या दिवशी सांगितली.
चेदी देशाचा राजा वसू अरण्यात तपश्चर्येसाठी गेला. इंद्राने वसू राजाने काठीची पूजा केली. तो दिवस गुढीपाडवा. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. वडीलधाऱ्यांनी वेळूची काठी धुऊन घ्यावी. रेशमी वस्त्र, चंबूच्या आकाराचे पात्र, कडूलिंबाचा पाला, चाफ्याची पाांढरी फुले, साखरेची माळ बांधून गुढी उभारावी. गुढीची षोडशोपचारे पूजा करावी. सायंकाळी गुढी खाली उतरवावी अशी प्रथा आहे. पाडव्याला कडूलिंबाची भाजी खाण्याची पद्धत आहे. कडूलिंबाला अमृतफळ असे म्हणतात. वसंत ऋतूतील सूर्याच्या दाहक किरणांमुळे भूक मंद होणे, अशक्तपणा येणे यासारख्या व्याधी उद्भवतात, त्याकरिता कडूलिंबाचा रस आरोग्यदायी आहे. `निंबति सिंचत स्वास्थ्यम इति निंबा:'
शालिवाहन शक गुढीपाडव्यालाच सुरू होते. सहा ऋतूंचे चक्र पूर्ण होऊन वसंतऋतूने कालचक्र पुन्हा कार्यान्वित होते. ६० संवत्सरे आहेत. भगवान नारद  व त्यांची भार्या नारदीस ६० पुत्र झाले. त्यांच्या नावाची ही संवत्सरे असल्याचे उल्लेख आढळतात. १ले नाव प्रभव व शेवटचे नाव क्षय.
महाराष्ट्नत एकूण १८ पंचांगे प्रसिद्ध होतात. १ल्या शतकात महाराष्ट्न् प्रांतातील राजा पलुमाची सातकर्णी याने नवीन शक सुरू केले. १ला शककर्ता राजा धर्मराज, दुसरा उज्जैनीचा राजा विक्रम, तिसरा पैठणचा राजा शालीवाहन, ४था सिंधुदेशाचा राजा विजयाभिनंद, ५वा धारातीर्थीचा राजा नागार्जुन व ६वा रायगडचा राजा शिवछत्रपती यांना शककर्ते म्हणून ओळखले जाते. तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही पंचांगाची पाच प्रमुख अंगे. ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र यांवर आधारित पंचांगाची निर्मिती आहे. लाटकर, दाते, रुईकर, राजंदेकर, पारनेरकर, देशिंगकर, टिळक वगैरे पंचांगे मराठीत प्रसिद्ध आहेत.
चैत्र गौरीची तीज असते. यावेळी गौरी माहेरपणास येते व ती अक्षय तृतीयेपर्यंत वास्तव्य करते, अशी आख्यायिका आहे. या प्रीत्यर्थ घरोघरी माहेरवाशीण हळदीकुंकू, चर्चासत्रे, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम करतात. काकडी, पन्हे, चाफ्याची फुले, आंब्याची कोशिंबीर, अत्तर, गुलाबपाणी, मोगऱ्याचे गजरे, बत्तासे यांसह गौरीची आरास केली जाते. गुढीपाडवा बालमनाचा आनंदोत्सव. चिमुरडी मुले-मुली शाळेत जातात. गुढीच्या चित्राचे पूजन करतात. गुरुजनांना वंदन करून ज्ञानयज्ञाचा श्रीगणेशा करतात. या मुहूर्तावरील कोणतीही सुरुवात निर्वेध यशस्वी होते, अशी श्रद्धा असते.
***

श्री महालक्ष्मी रथोत्सव
धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक बैठकीवर आपली संस्कृती आरूढ आहे. उत्सवाच्या निमित्ताने रथोत्सव सोहळे होतात. रथावर आरसे, चवऱ्या, मोर्चेल्या, मशाल, वाद्य, छत्रचामर, गीत, नृत्य आदी मिरवणुकीत आढळतात. रथाचे बहुधा चार चक्र, पिचत आठ, तर मोठे रथ बारा अथवा सोळा चक्रावर असतात. मंदिराचे गर्भगृह, शिखर घुमटी, शयनगृह यासारखी रथाची रचना आढळते. रथाला लांब दोरखंड अथवा अश्व, हत्ती, जोडून किंवा भक्तगणांकडून रथ ओढत नेण्याची परंपरा आहे.
काही उत्सवात वैदिक मंत्रघोष असत. मिरवणुकीच्या मार्गावर सडा-संमार्जन, रांगोळया, आंब्याचे डहाळे, गुढ्या, तोरणे, दीपोत्सव करून रथमार्गावरील घरांतून देवदेवतांची आरती, व रथ-सारथ्यांचे पाय धुण्याची परंपरा आढळते. बऱ्याच रथोत्सवात अबीर-गुलाल, भंडारा यांची उधळण केली जाते. रथावर भालदार-चोपदार, रोषणनाईक, देवदेवतांचे पूजक, हक्कदार आरूढ होतात. तिकटी, चौक अथवा रथाचा मार्ग बदलताना श्रीफळ वाढविण्याची प्रथा असते.
भविष्य पुराणात ब्रह्मदेवाच्या रथयात्रेची महती वर्णन केली आहे. रथोत्सवाची बरोबरी इंद्रध्वजोत्सवासारखी आहे. मूर्तीची स्थावर बैठक कशी असावी याबाबत भविष्योत्तर पुराणात संहिता विषद केली आहे. रथयात्रेच्या लोकाभिमुख पद्धतीबाबत बौद्ध महायान पंथात उल्लेख आहेत. हीनयानी हे बौद्ध पदचिन्हांच्या तर महायान पंथी बौद्ध मूर्तीच्या रथयात्रेचे आयोजन करीत. रणांगणात विजयी झालेले राजे रथावर आरूढ होऊन राजवाड्यापर्यंत मिरवणुकीने जात असत.
पाचव्या शतकात फायीयान नावाच्या चिनी प्रवाशाने वैशाख महिन्याच्या शुक्ल अष्टमीला पाटलीपुत्राच्या रथोत्सवाचे वर्णन केले; रथाला हंस पक्षी ओढत असल्याचे त्याने दर्शविले आहे. वैष्णव संप्रदायात पुरी येथे जगन्नाथाची रथयात्रा प्रसिद्ध आहे. आषाढ द्वितीयेला जगन्नाथाच्या रथोत्सवाचे आयोजन करतात. पुरीच्या रथयात्रेचे वल्लभ संप्रदायाने वैभव वाढविले. वैदिक आर्यांनी रथ हे सैन्याचे अंग ठरविले. मौर्य काळात रथ चतुरंग दळात होते. कोणार्क येथील सूर्यरथ, हंपी येथील विजयरथ, महाबलीपुरम् येथील पांडवरथ हे प्राचीनतेचे साक्षीदार आहेत. देवांच्या उत्सवात पालखी, लालखी, सुखासन, जोडनौका ही उपअंगे आहेत.
माघ शुद्ध सप्तमीला रथ सप्तमी. या व्यतिरिक्त अचला सप्तमी, जयंती सप्तमी, भास्कर सप्तमी, महासप्तमी, भाकरी सप्तमी या व्रतांचे माहात्म्य आहे. ऋग्वेदात रथाला देवता मानले आहे. रथाबाबत प्रशस्ती यजुर्वेदात येते. ब्राह्मण ग्रंथात रथांच्या चक्रांचे महत्व आहे. देवांचे सुतार सौधन्वन ऋभू हे रथ बनविण्यात कुशल सेनानी होते. अग्नीध्यानाचा अधिकार या कुळीला प्राप्त होता. रथाची चक्रे किंशुक किंवा शाल्मली वृक्षाची बनवीत. वाजपेय आणि राजसूय यज्ञाच्या वेळी रथांना इंद्राचे वज्र समजले जायचे. ध्वनी आणि वायूच्या वेगाने रथ धावत असत, असे उल्लेख त्रैतरीय संहितामध्ये आहेत. ऋग्वेद काळात रथांना `रघुद्रु' म्हणून संबोधत; काही वेळा `स्वप्नरथ' म्हणत. वज्र हनुमानाच्या रथाला `विद्युतरथ' किंवा `त्वेषारथ' म्हणत. रथांच्या चक्रांना पच्चार, वळर, द्वादशार, सप्तदगार असे रथाच्या नाभीत व वर्तुळभारात आरे बसविले जात. रथाच्या दोन्ही बाजूंना `बहुधा' अथवा अड्:क असे म्हणत. दोरासाठी गेंड्याचे, हत्तीचे, बैलाचे चामडे वापरत. संग्रामिक रथामध्ये अग्नी अस्त्र ठेवीत. आश्विनी देवता व उषादेवता रथ वापरत.
उत्तर रामचरित कथेत `अस्तलिसंपात' म्हणजे मार्गावरील धक्के न बसणाऱ्या रथातून सीतादेवीला गर्भावस्थेत वनात नेल्याचे उल्लेख आढळतात. रथावर डावीकडे व उजवीकडे दोन-दोन सारथी रथ वळवीत व हाकत असत. रथावर केतू ध्वज लावण्याची प्रथा आढळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात रथाच्या पथकांचा स्वतंत्र आढावा घेतला जायचा. पारशी धर्माच्या `अवेश्ता' ग्रंथात रथचक्रांचे उल्लेख आढळतात. `रथेष्ठा:' नावाची युद्धनितीतज्ज्ञ क्षत्रियांची कुळी प्राचीन इराणमध्ये होती. भारताप्रमाणेे सुमेरिया, इजिप्त, अॅसेरिया, खाल्डीया, ग्रीस या देशांत रथसदृश वाहने युद्धात वापरली जात असत.
सिंधुनदीच्या खोऱ्यात पंदुदारो, मेसोपोटेमियात तेल अग्रण्य येथे रथाच्या मोठ्या ताम्रपती आढळतात. इसवी सनापूर्वी रथांचा वापर चीनमध्ये सुरू झाला. भारतात विविध राज्यांत रथोत्सवाचे संदर्भ आढळतात. महाराष्ट्नत सांगली, सातारा, नाशिक, पंढरपूर व कोल्हापूरात रथोत्सवाची परंपरा आढळते. करवीर नगरीतील महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. देवगिरीच्या यादव राजाच्या प्रधान करणादीप हेमाद्री याच्या ३८व्या ग्रंथाच्या व्रतखंड पुराणात देवी रथ यात्रेत करवीर रथोत्सवाचे संदर्भ आढळतात. १८२४ साली श्रीमंत केशवराव यादव यांना रथोत्सवाचा पुत्रपौत्रादी वंश परंपरेने सन्मान होता. १८४८ साली राजे यादव व गजेंद्रगडकर घोरपडे यांना क्षेत्र करवीर येथून रथोत्सवाचा प्रसाद दिला जात असल्याचे संदर्भ इतिहासात आढळतात. विविध प्राचीन पंचांगात श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवाचे उल्लेख आढळतात.
कोल्हापूरात रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी श्रीराम रथ, चैत्र कृष्ण प्रतिपदेला श्री महालक्ष्मी रथोत्सव असतो. संस्थान देवस्थान नोंदीत श्री महालक्ष्मी रथोत्सवाचे जमाखर्च पाहायला मिळतात. १९३० साली या रथाच्या दुरुस्तीचे काम शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये केल्याचे संदर्भ आढळतात. राजर्षी शाहू, राजाराम महाराज, आक्कासाहेब महाराज महालक्ष्मी रथोत्सवाला उपस्थित असत. १००० घोडे, दोन हत्ती, तोफा, उंटावरील नौबती लवाजम्यासह संस्थानाचा रथोत्सव प्राचीनत्व सिद्ध करतो. श्री महालक्ष्मीचा रथोत्सव म्हणजे करवीर संस्थानाचे वैभव होते.
पश्चिम महाराष्ट्न् देवस्थान समितीने यंदा ऐतिहासिक रथाला `रौप्य आवरण' करण्याचे ठरविले असून यंदाचा वैभवशाली रथोत्सव होईल. हजारो कार्यकर्ते रथोत्सवासाठी सज्ज आहेत. चैत्र ज्योतिबा यात्रेकरूंना व करवीरच्या भक्तांना वेगळे चैतन्य प्राप्त झाले आहे.
श्री महालक्ष्मीचा सेनापती जोतिबा, करवीर नगरीच्या उत्तरेला डोंगरावर वाडी रत्नागिरी भागात जोतिबाचे वास्तव्य अतीप्राचीन आहे. जोतिबाच्या नावाने चैत्र पाडव्याच्या निमित्ताने भक्तांचे खेटे सुरू होतात. पौर्णिमेला मोठा उत्सव असतो. गुलाल, खोबऱ्याची उधळण, सासन काठ्या, वाद्यांच्या गजरात यात्रा भरते. चैत्र कृष्ण प्रतिपदेला महालक्ष्मीच्या रथाचे आयोजन केले जाते.
-नंदकुमार मराठे, कोल्हापूर 
फोन-९९७५४२९४९४

यंत्रास मन असेल?
औद्योगिक क्षेत्रात यंत्रमानवाचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. तसाच तो सर्वत्र -म्हणजे अगदी मानवी भावनांच्याही बाबतीत वाढू लागण्याची अेक चाहूल लागते आहे. महाराष्ट्नतले औरंगाबाद शहर अलीकडे अुद्योगधंद्यात पुढे आले आहे. बजाज ऑटोसारख्या कंपन्या आल्यानंतर अेकूणच व्यवसायक्षेत्र बहरू लागले. त्या भागात आता ५०० रोबो काम करीत आहेत. त्यामुळे त्या कंपनीत दिवसाला १६शे रिक्षा तयार व्हायच्या, तिथे आता २५शे रिक्षा तयार होतात. रिक्षा तयार करण्यासाठी अुत्पादनाच्या सर्व प्रक्रिया रोबो सांभाळतो, शिवाय त्याचा दर्जा अचूक असतो. या क्रांतीमुळे औरंगाबादशेजारच्या वाळूज अुद्योगपट्ट्यात कामगारक्षेत्रातही वेगळे वातावरण तयार झाले आहे. वेल्डिंग रंगकाम यांसाठी रोबोला काम ठरवून देणारा `प्रोग्रॅम' आता तेथील कामगारही देअू शकतात. मोठ्या कंपन्यांची कंत्राटी कामे ज्या अुपकंपन्या किंवा पूरक अुद्योग करत असतात त्यांनीही आता हे रोबो तंत्रज्ञान आणले आहे.
कामगारांचे म्हणून जे मानवी प्रश्न असतात, त्यांतून अुद्योगांची मुक्तता झाली आहे. कामातील अचूकता, वक्तशीरपणा, हे तर साधतेच पण थकून जाणे, व्यसनाधीनता, चुकारपणा, सणाच्या सुट्या, कुटुंबासाठी देण्याचा वेळ, आरोग्याचे प्रश्न हे सारे दूर गेले. याचा मानवी कामगारांवरही चांगला परिणाम दिसून येत असल्याचे कारखानदारांचे मत आहे. कामगार क्षेत्रात अुत्साह आणि आधुनिकता येत असून बेकारीचे नावही न काढता अधिक अुत्पादन करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. हा नवाच परिणाम रोबो नगरीत दिसू लागला आहे.
पण रोबोला यंत्र`मानव' ठरविण्याच्या प्रयत्नांत त्याच्याकडे कोणती कामे सोपवायची त्याची सीमारेषा कशी ठरविणार? मुंबआी आयआयटी ला टेकफेस्ट नावाची विज्ञानजत्रा भरली होती. माणसासारखा दिसणारा आणि बुद्धिमत्ताही तितकीच (पण कृत्रिम) असणारा `मानव' म्हणजे ह्यूमनॉआीड. त्यांची बुद्धिमत्ता आितकी तेज असते की त्यांस चेहऱ्यांवरून माणसेही ओळखता येतात. माणसांच्या प्रश्नांना, त्यांतला आशय समजून घेअून नीट अुत्तरे देतात. अशी अेक यंत्रमहिला सोफिया या नावाची तयार करण्यात आली, ती `दाखवायला' मुंबआीला त्या विज्ञानजत्रेत आली होती. माणसासारख्या भावनाही व्यक्त करणारी ही यंत्रमहिला अुपस्थितांच्या कोणत्याही प्रश्नांना छान अुत्तरे देत होती. अवतीभोवती जे घडतं ते समजून घेअून ती `शिकते', त्याचे अर्थ लावणारे प्रोग्रॅम तिच्यात आहेत; त्यावर विचार करून अुत्तरे देते. आपण वेगवेगळया माध्यमांतून माहिती घेअून आपले मत बनवितो, तशीच ती अुत्तरे शोधते. ही त्या कृत्रिम बुध्दीची कमाल म्हणायची, की अजूनी कायकाय पाहायला मिळणार याची प्रतीक्षा करायची?
ती रोबो आितक्या तयारीची असली तरी तिला पढविलेल्या प्रोग्रॅमनुसारच ती अुत्तरे शोधणार. त्या विज्ञानजत्रेत ती छान साडी वगैरे नेसू(वू)न आली, अुत्तरे देअू लागली पण अेकाने तिला खऱ्या मानवाचाच प्रश्न विचारला की, `जगात अजूनी मानवाच्या कितीतरी मोठ्या समस्या आहेत, त्या सुटत नाहीत; तर अशा वेळी रोबोच्या संशोधनासाठी आितका पैसा खर्च करणे योग्य आहे काय?'' असा प्रश्न तिला सुटणार नव्हता. ती रोबो अडखळली, थटली!  याचा अर्थ तिला तो प्रोग्रॅम दिला नव्हता हे खरं असलं तरी प्रत्यक्ष मानवालाही  त्या प्रश्नाचे अुत्तर देता येणारच नाही. तोही त्या प्रश्नाला थांबेलच. म्हणजे त्या बाबतीतही तो रोबो खराच मानव ठरला ना! मानवाकडे जसे प्रत्येक प्रश्नाला अुत्तर असतेच असे नाही तसाच हा रोबो; कृत्रिम असूनही मानव!
आंतरराष्ट्नीय महिला दिनाला पुणे मुंबआी दरम्यान धावणाऱ्या डेक्कन पीन रेल्वे गाडीला ड्नयव्हरसह सारी व्यवस्था महिलांकडे सोपविण्यात आली होती, याचे कौतुक बरेच झाले. व्हायलाही हरकत नाही, कारण त्यात वेगळेपण होते.घरची  महिला स्कू टर चालवायला शिकली तरी त्या घरी कौतुक असतेच. पण आजवर घरी कधी तशी संधीच मिळाली नाही हे त्याचे खरे कारण असते. आता शाळेत जाणारी १३ वर्षांची मुलगी गाडी चालविते, त्याचे कसले कौतुक? बायकांहाती तरवार-बंदूक येअू लागली, हळूहळू त्याचेही नावीन्य मागे पडेल. तरीही झाशीवालीचा आितिहास कौतुकाचाच राहणार ना. तसेच कौैतुक ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेणाऱ्या बायांचे होणे योग्य होते.
कोेल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या बुबनाळ या गावात महिला राज्य आहे. तिथे साडेतीन हजाराची लोकसंख्या आहे. दोनतीन वर्षांपूर्वी तिथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. ११सदस्यांसाठी मतदान व्हायचे होते. आरक्षणाप्रमाणे तिथे मागास समाजातील अुमेदवाराची निवड करायची होती. पण गावातल्या लोकांनी त्याहीपुढे जाअून गावातल्या मागास बायकांचीच ग्रामपंचायत करण्याचे ठरविले. ज्या घराने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पदे-सत्ता  राबविलेली नाहीत, ज्या घराला याआधीच्या नात्यागोत्यात कधी खुर्ची मिळालेली नाही, अशा घरांतील महिला निवडण्याचे साऱ्यांनी मान्य केले. आणि सगळया  ११जणी बिनविरोध निवडल्या गेल्या. पाच वर्षांसाठी सरपंचपद होते, ते ओबीसी साठी राखीव होते, तेही त्या वर्गातील तीन महिलांना वीसवीस महिन्यांसाठी देण्याचे ठरले.
गावातल्या काही तक्रारी नेहमीच्या पूर्ण नाहीशा होतील असे नाही, पण असाही काही प्रयोग होत असतो. तो जमला  न  जमला हा गौण भाग आहे. पण तसे करून बघितले जाते हे तरी काय कमी आहे?  त्या गावात प्रत्येक घरात नळ आहे. पाणी जास्त वापरले जाते हे बायांच्याच लक्षात आल्यावर त्यांनी मीटर बसविले. गावात शांतता सलोखा समिती आहे. गडबड करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही क्रॅमेरे बसविले आहेत.
या गावाचा सन्मान माल्टा या देशाची राजधानी व्हॅलेटा येथील आंतरराष्ट्नीय परिषदेत करण्यात आला होता. राष्ट्न्कुल स्थानिक स्वराज्य शासन मंच अशी अेक परिषद गेल्या नोव्हेंबरात झाली, त्यासाठी महाराष्ट्न् राज्याचे निवडणूक आयुक्त हजर होते. त्यांनी या बुबनाळ निवडणुका आणि त्यानंतर गावात चाललेली कामे यांबद्दलचे सादरीकरण केले. तिथे जमलेल्या प्रतिनिधींना अर्थातच त्याचे फार कौतुक वाटले.
आपल्याकडे  लोकशाही रुजली आहे ती केवळ निवडणुकांपुरती तरी आहे. ती साऱ्या समाजजीवनांत येण्यासाठी महिला बालके वृध्द तृतीयपंथी यांसह साऱ्या समाजघटकांस योग्य स्थान मिळणे आवश्यक आहेच. तथापि अशांचे सन्मान करण्याच्या अुत्साहात जे ज्ञानमंत शुचिष्मंत आहेत त्यांच्या कर्तृत्वाला कुठे अडथळे येअू नयेत हेही आवर्जून पाहिले पाहिजे, तर सारे राष्ट्न् पुढे जाआील.
***

नर्मदा परिक्रमा
नर्मदा ही प्राचीन नदी आहे. नर्मदेचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे आहे. १३१२कि.मी. प्रवास करून ती गुजरातमध्ये भरूचजवळ मिठीतलाई येथे अरबी समुद्राला मिळते. स्कंद पुराणातल्या कथेप्रमाणे नर्मदेचा उगम मेकल पर्वतावर होतो म्हणून नर्मदा मेकलसुता किंवा मेकलकन्या म्हणून ओळखतात. शोण नद आणि नर्मदा नदी. दंतकथा अशी की नर्मदा मेकल राजाची कन्या, शोण या राजकुमारावर मुग्ध झाली. पण मेकल राजाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे हा विवाह लांबणीवर पडला. हा निरोप नर्मदाने, शोण राजाला कळविण्यास दासी जोहिलेला पाठवले. जोहिलेच्या मनात नर्मदेबद्दल द्वेष व शोणबद्दल प्रेम निर्माण झाले; ती शोणला आपण नर्मदा असल्याचे सांगते व त्यांचा विवाह होतो. बरेच दिवस झाले जोहिला परत न आल्यामुळे नर्मदा स्वत: जाते; जोहिलेला शोणची पत्नी झाल्याचे पाहून क्रोधीत होते व अपमान सहन न झाल्यामुळे अमरकंटकच्या कुंडात उडी घेते व जलरूप होऊन प्रवाहित होते. शोणला जेव्हा हे कळते तेव्हा तोही आत्महत्या करण्यास मेकल पर्वतावरून उडी घेतो. त्याचे रूपांतर `नद'मध्ये होते. प्रेमभंगामुळे अपमानित झालेली नर्मदा आजन्म कुमारिका राहून लोकोपकारी सेवा करण्याची प्रतिज्ञा करते. नर्म ददाति नर्मदा. सुख देणारी ती नर्मदा, सुखदायिनी. दुसरं नाव रेवा खळाळत धावत जाणारी.
भौतिक सुखाच्या पलीकडे काय, याची जाणीव परिक्रमेत होत असल्यामुळे परिक्रमा शाश्वत आनंदयात्रा आहे. परिक्रमा अमरकंटकपासून, नदीच्या दक्षिण तटावरून  करतात; भरूचला समुद्रातून वळसा घालून उत्तर तटावरून परत अमरकंटकला समाप्त करतात. बरेच जण परिक्रमेची सुरुवात आेंकारेश्वरपासून करून भरूचला समुद्रातून वळसा घेऊन अमरकंटक येथे उगमाला वळसा घेऊन दक्षिण तटावर परत आेंकारेश्वरला समाप्ती करतात. असे म्हणतात की, पहिली नर्मदा परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली. वाटेतील ९९९ उपनद्या, नाले पायी किंवा होडीने ओलांडून परिक्रमेचा कालावधी तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसांचा आहे. चतुर्मासात परिक्रमा करत नाहीत कारण मैया पावसाळयात दुथडी भरून वाहात असते. आता बरेच परिक्रमावासी दररोज १५-२० कि.मी.चालून साधारण ५ महिन्यात पूर्ण करतात. बस किंवा इतर वाहनाने प्रवास करून दररोज फक्त २-३ कि.मी. चालून परिक्रमा १५-२० दिवसांत पण करता येते.
ही सहल नसून यात्रा आहे. मनोभावे श्रद्धा असणाऱ्यांनीच परिक्रमा करावी. संसाराची हाव किंवा ओढ सोडून द्यावी, सहनशीलता वाढवावी, अहंकाराचे नर्मदेत विसर्जन करावे, दुसऱ्यांच्या दृष्टीने विचार करण्याची सवय करावी, स्वत:ला निर्मोही करावे. प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक जीवन जगण्यास शिकावे. परिक्रमेत `नर्मदे हर' असं म्हणून अभिवादन करतो, याचा अर्थ `नराचा मद हरण कर' असे समजतात. नर्मदा परीक्रमेमुळे पाप क्षालन होते, हा श्रद्धेचा भाग असला तरी तिच्या साभिध्यात पाप वृत्तीचा मात्र नक्कीच नाश होत असावा. परिक्रमेत अनेक ठिकाणी कोरडा शिधा भिक्षा म्हणून मिळतो, आपल्याकडे सदावर्त म्हणतात, गुजरात व मध्यप्रदेशमध्ये सदाव्रत असा शब्द आहे. स्वयंपाक स्वत:ला करावा लागतो. पिचतच तयार जेवण मिळते.
मी नर्मदा परिक्रमा बसने केली. अनुभव संस्मरणीय होता. रमणीय निसर्ग, हिरवीगार शेती, काही ठिकाणी सागाची जंगले आणि बऱ्याच वेळा उजव्या बाजूला नर्मदा मैयाचे दर्शन असल्यामुळे प्रवास उत्साही व सुखकर होता. परिक्रमावासियांना तेथेे `मूर्ती'(परमेश्वर) म्हणतात आणि महिला परीक्रमावासियांना `माताराम' म्हणतात. आम्ही बसने ही परिक्रमा १८ दिवसात केली.
या परिक्रमेतील वैशिष्ट्ये-
* रावेरखेडी येथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थान व त्याच्या बाजूने वाहत असलेली मैया यांचे दर्शन.
* बडवाणी येथे महात्मा गांधींच्या अस्थींचे व रक्षेचे विसर्जन जेथे केले तो राजघाट आता पाण्याखाली गेला आहे.
* बावन्नगजा या गावी जैनांचे धर्मस्थळ व आदित्यनाथ धर्मगुरूंचा ५२ हात उंचीचा पुतळा.
* लेपा पुनर्वास येथील भारती ठाकूर यांचे रामकृष्ण सारदा निकेतन स्कूल व `निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन  (छरीारवर) प्रकल्प. अशा खेडेगावात प्रकल्प जिद्दीने उभारला त्यांचे कौतुक
* `प्रकाशा' येथे तापी, पुलिंदा व गोमती नदींचा संगम
* राजपिपला जवळ `वाल्मिकी आश्रम'चे कमलाकर बापटस्वामी भेटले, त्यांनी तेथे २५० मुलांकरिता शाळा चालविली आहे. तेथे संस्कृत भाषेचे शिक्षण. व या मुलांना जवळच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्याची सोय आहे. शाळेला सरकारी मदत मुळीच नाही.  सागर पार करून मिठीतलाईला पोचलो. समुद्र प्रवासात सुरक्षेकरिता सर्वांना लाईफ जॅकेट दिली होती. समुद्र जवळ असल्यामुळे सर्व विहिरींना खारट पाणीच, पण दोन विहीरींना गोड(कमी खारट) पाणी आहे म्हणून त्यांना मिठीतलाई म्हणतात.
* नर्मदा नदीवरील धरण, जगप्रसिद्ध सरदार सरोवर हे विंध्य व सातपुडा दरम्यान १.२ कि.मी.चे धरण बांधले, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा जगात सर्वात उंच बांधला जात आहे. पं.नेहरूंच्या शब्दांत हा प्रकल्प नव भारताचे एक श्रद्धास्थान असेल.
* महेश्वरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी. नर्मदा घाट विस्तीर्ण व स्वच्छ आहे. दत्तधाम(नारायणपूर) येथील नर्मदा सहस्त्र धारांच्या स्वरूपात वाहते.
* जबलपूरपासून ६५ कि.मी वर घुघवा जीवाश्म राष्ट्नीय उद्यान. करोडो वर्षाआधीचे काही जीवाश्म ठेवलेले आहेत.
* अमरकंटक येथे नर्मदामातेचे उगमस्थान, साल वृक्षांच्या दाट झाडीत आहे.
-माधव भास्कर आपटे,मुंबई 
फोन-९८१९८१४६५५

आठवांचे साठव
दत्तापुढे नमाज
आरक्षणाच्या मागण्या आणि जातीय धार्मिक तेढ वाढत ठेवण्याचे प्रयत्न बऱ्याच पुढाऱ्यांकडून होत आहेत. राजकारणासाठी लोकांच्यात जुंपून देण्याची ही कला आजच्या काळात बहराला आली आहे, बरेच अविचारवंत त्या जाळयात अडकून स्वत: संपेपर्यंत धडपडत असतात. आिंग्रजांनी त्याचा फायदा करून राज्य चालविल्याचे सांगण्यात येते, आजही वेगळे काय?
शेतातल्या झोपडघरात आमची कायमचीच वसती होती. परंतु सभोवार कामधंदा वाढत होता, शेतीबागायती वाढत होती, शाळासुळा वाढत होत्या. या सगळयामुळे लोकसंख्याही वाढत चालली होती. किर्लोस्करांच्या कारखान्यात नोकरीधंद्यास आलेले लोक जवळपास घरेचुली मांडू पाहात होती. आमच्या शेताचे अुत्पन्न यथातथाच होते, पाण्याची टंचाआी होती, बागायत नव्हती. माझे  आआीवडील प्रपंच रेटत चालले होते. त्यांच्या मुली अुपवर होत्या, मी दहा बारा वर्षांत होतो. त्या काळात बिगरशेती करून प्लॉट्स पाडण्याची अेक गोम काहीजणांस कळली. काहींनी शेतीचा तोे अुपयोग सुरू केला. सभोवारच्या शेतांतून गाव वसू लागले. `किर्लोस्कर' प्रकाशनांत एके काळी काम करणाऱ्या ना.धो.ताम्हणकर यांचा मुलगा दिलीप यांनी टाऊन प्लॅन केल्याप्रमाणे प्लॉट्स पडू लागले.
पन्नास साठ वर्षांपूर्वी हे `गाव' वाढू लागले. पांढरमाती, लाकूडवासे आणि मंगलोरी कौलांचे छप्पर अशी साधारण घरबांधणी असायची. सांगलीजवळच्या समडोळी गावचे काही लोक त्या रोजगारास आिथे येअून राहिले होते. गवंडी, सुतार, बिगारी अशी ती मंडळी, बहुतांश लोक मुस्लिम होते. त्यांच्याच भाअूबंदांचे होते, अेकाच गल्ली-मोहोल्ल्यांतील असायचे. जत भागातूनही काहीजण यायचे, ते कानडप्पा असत. आपाभाआी, युसुफभाआी, यांच्यात अेक बाळूही होता. आण्णापा, तिप्पण्णा, चन्नव्वा, हे जतचे. आमच्याच मळयात ती सारी फौज मुक्काम करून होती. तात्पुरत्या खोपी, किंवा छपरे टाकून ते लोक राहात. आमच्या घरामागे विहिरीवरच्या टपरीत सहा सातजण राहायचे. त्यात चूल घालून अेकजण भाकरी-कोरड्यास असा स्वैपाक करायचा. ताक आमच्या घरून त्यांना मिळायचे. दिवसभर ते सारे कामावर जात, रात्री आमच्या अंगणात पथाऱ्या टाकत. त्यातले अेकदोघेजण वयस्कर होतेे.
आमच्या अंगणात दत्ताची मूर्ती स्थापित केलेली अेक घुमटी होती. घरात वेगळे देवघर नव्हते, तशी गरजही नव्हती. माझे वडील या शेतीवर राहायला आल्यानंतर बरेच दिवस त्यातले काही नव्हतेच, पण देव तर हवेत म्हणून ही घुमटी १९५४ साली बांधली. रोजची पूजा वगैरे आमच्यातले कोणीतरी करीत असे. सभोवती गावच नव्हते, त्यामुळे कुठे देअूळ असण्याचा प्रश्न नव्हता. त्या गडीगवंडी ताफ्यातील दोघेजण पहाटे अुठत. नमाज पढणे आवश्यक होते, ते आमच्या दत्तापुढे पढत. ते तोंडाने मनोभावे आधी `अल्ला हु अकब%र' म्हणून अजान पुकारायचे. नंतर थोड्या वेळानं काहीतरी पुटपुटत गुडघे टेकायचे. ही सारी त्यांची अर्चना आम्हा बामणांना चालायची, आणि त्या मुसलमानांनाही चालायची. जवळपास वसती नव्हती, त्यांची सोबत आम्हाला होती. आण्णापा आणि त्याची मुलगी लक्षी अेका शेळीच्या दुधावर त्यांचा चहा बनवायची, ती शेेळी अेखादे वेळी दूध द्यायची नाही. मग यांच्यातल्या बाळूने केलेला चहा आणि आमच्यातलं दूध असा चहा लक्षी करायची आणि तो चन्नवा-आण्णापाला मिळायचा.
या साऱ्या व्यवहारांत कुणाला कुणाची जात धर्म विचारावा लागत नव्हता, अडथळा ठरत नव्हता. आम्हा पोराटोरांना कुणाचीही नकल टवाळी करता येत होती. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न १९६२ला सांगलीत झाले, त्या लग्नात लाला जाधव, विठू सावंत, आप्पा भाआी, चन्नवा हे सारे घरचे स्वयंसेवक होते. त्या बहिणीचे यजमान गजानन बापट हे, सांगलीचे विनोबावादी वामनराव कुंटे यांच्या घरी वाढलेले होते. हा धार्मिक जातीय भेदाभेद कुठे अनुभवातही येत नव्हता.
तोे जंतू कुठून कधी आपल्या समाजात शिरला कळले नाही. आता तो समाजपुरुषाच्या साऱ्या रक्तामांसात फैलावला की काय असे वाटते! अुपाय होअू शकेल, -की रोग हाताबाहेर जाआील याची काळजी कलत्या वयाला व थकत्या शरीराला जास्त जाणवते म्हणतात!
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन