Skip to main content

20-3-17

फोटोची निगेटिव्ह बाजू
आजकालच्या जमान्यात फोटोचं कुणाला फारसं कौतुक नाही.... म्हणजे फोटो काढण्याचं नाही, पण आपला फोटो झळकण्याचं कौतुक नक्कीच आहे. फेसबुक आणि तत्सम माध्यमांतून फोटो प्रसारित करण्याची अेक लाटच आली आहे. अेक काळ असा होता की फोटो काढला तर आयुष्य कमी होतं असा समज होता. छपाआीकलेचा विस्तार झाला तसे फोटो छापले जाअू लागले तरी ते फोटो जतन करण,ं त्याचे ठसे वेळेवर बनवून घेणं हे कटकटींचं काम होतं. ते ठसे कुणाच्या फोटोचे आहेत हे ओळखणं हे तज्ज्ञाचं काम असायचं. आजही जुने पुराणे कुणाचे फोटो मिळाले तर `हा कोण? हे कोण?' असं करत बसावं लागतं. चुकीचे फोटो पेपरात छापणं हेही बऱ्याचदा घडत असे.
`साहित्यसूची'त १३साली रविप्रकाश कुलकर्णीनी फोटोविषयी काही गंमती दिल्या आहेत. दत्तो वामन पोतदार गेल्याची बातमी  दूरदर्शनवर दिली, त्यात फोटो मात्र न.र.फाटक यांचा दाखवत होते. न.र.फाटक यांनी त्या बाबतीत अेक घोटाळा अनुभवलेला होता. त्यांनी न्या.रानडे यांच्यावर अेक लेख लिहिला आणि मुंबआीतच प्रसिध्दीसाठी पाठविला. लेख छापायचा तर फोटो हवाच. मग शोध घेतला पण वेळेत रानड्यांचा फोटो मिळेना, म्हणून फाटकांच्याकडेच तो आहे का अशी विचारणा संपादकांकडून झाली. त्यांनाही मिळेना. त्यांनी अेक शक्कल लढविली. प्रेसच्या फोटोग्राफरला बोलावून घेतलं, आणि त्याला सांगितलं, मुंबआी हायकोर्टाच्या बाहेर न्या.रानड्यांचा पुतळा आहे, त्याचा फोटो काढून आण. त्याने तूर्त काम भागेल. तो जाताना त्यानी आणखी अेक काम सांगितले की, तिथेच बाजूला नामदार गोखल्यांचा पुतळा आहे त्याचाही फोटो काढून आण, तोही कधीतरी लागतोच. फोटोवाल्याने काम केले आणि दोन्ही फोटो वर्तमानपत्रात दिले. दुसऱ्या दिवशी रानड्यांवरचा लेख छापला होता, आणि फोटो मात्र गोखल्यांचा!... त्यावर फाटकांची बऱ्याच काळानंतर मल्लीनाथी होती की ``पुष्कळांनी तो लेख वाचला पाहिला असेल; पण आजपर्यंत कुणी त्याबद्दल तक्रार केलेली नाही.''
केशवसुतांची कविता त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली, आणि ते प्रकाशात आले. मग त्यांच्या फोटोचा शोध सुरू झाला. फोटो काढलेलाच नव्हता. गिरगावात वैद्य या आडनावाचे अेक साहित्यरसिक होते. त्यांनी केळेवाडी (मुंबआी)च्या स्मशानात जाअून स्मरणचिंतन  केलं. त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्या चक्षूंपुढं जे केशवसुत आले ते त्यांनी चित्राने कागदावर अुमटविले. तेच चित्र आजही आपण केशवसुतांचं मानतो, वैद्यांच्या कल्पनेतलं. साहित्यक्षेत्रात कोणी अजून त्याला आक्षेप घेतला नाही हेही विशेष.
संजय गोडबोले यांना अेक जुना ग्रुप फोटो मिळाला. त्यात टिळक, शि.म.परांजपे, हरिभाअू आपटे अशी मंडळी ओळखता येतात, म्हणजे बाकीचे लोक तितकेच मोठे असणार. त्यांनी तो फोटो कुमार केतकरांकडं पाठविला, त्यांनाही व्यक्ती ओळखेनात. म्हणून मग महाराष्ट्न् टाआिम्सला तो फोटो छापला आणि त्यातील व्यक्ती ओळखण्याचं वाचकांना आवाहन केलं. जुन्या मंडळींना काहीजण ओळखले.
आगरकर ऐन तरुणपणात गेले. त्यानंतर कित्येक वर्षांनी, त्यांच्या पत्नी यशेदाबाइंर्नी आठवणी सांगितल्या. त्यावरून लक्षात येते की, ग्वाल्हेरच्या केतकरांचा मुलगा पुण्यात आगरकरांच्या हाताखाली शिकत असे. तो हरहुन्नरी मेक्रॅनिक होता. `सुधारक' पत्र छापणारे मशीन कधी बंद पडले तर खोळंबा होई, , तेव्हा हा केतकर खटपट करून ते दुरूस्त करून अंक वेळेत काढायचा. दोघांचा एकमेकांवर फार जीव होता. तो परत जाताना हट्ट धरून बसला की, `मला तुमचा फोटो पाहिजे.' त्याच्या हट्टाग्रहापायी आगरकरांनी पगडीसह आपला फोटो काढू दिला. तोच फोटो सध्या सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यापूर्वी आगरकर पागोटे वापरीत असत असे यशेदाबाइंर्नी सांगितले आहे. डेक्कन कॉलेजचे फेलो, आणि फर्ग्युसनमध्ये सर्वांचा मिळून एक असे त्यांचे एकूण तीन फोटो काढले गेले.
आठवणी, आितिहास, चरित्र याप्रकारचं काही काम करणाऱ्यांना शे-पन्नास वर्षांपूर्वीचे काही फोटो अुपलब्ध होतात; पण त्यातल्या व्यक्ती ओळखणं कठीण होतं. आजही बरेचजण सारखे फोटो काढत असतात, पण त्याची नेांद नीट करीत नाहीत -तशी सवयच नसते. कोणत्याही फोटोतील व्यक्तींची क्रमानं नावं, ठिकाण, दिवस नोंद केली तर पुढं कधी त्या स्मृती येतील तेव्हा किती चांगलं होआील. कुटुंबात ते हवंच, विशेषत: संस्थेच्या बाबतीत तर ते फार आवश्यक आहे.
दिल्लीच्या `हिंदुस्तान समाचार' या वृत्तसंस्थेचा अेक चरित्रात्मक प्रकल्प माझ्याकडं दिला होता. त्या वृत्तसंस्थेचे १९५४ मध्ये दिल्ली व पाटण्याला देवनागरी दूरमुद्रक(टेलिप्रिंटर) बसविण्यात आलेे. त्याच सुमारास पाटण्याला वृत्तसंस्थेच्या वतीने  पत्रकार संमेलन झाले, पण त्यातल्या व्यक्ती कुणाला ओळखणार? दिल्लीतल्या जुन्या पत्रकारांना भेटलो, पण जमेना. अेक अंधूक मार्ग दिसला. १९५३ च्या सुमारास नारायणराव तरहे पत्रकार कलकत्त्याला होते पाटण्याला देवनागरी दुरमुद्रक सुरू झाला, त्यात ते सक्रिय होते. हे तरटे आता रा.स्व.संघाच्या नागपूर मध्यवर्ती भवनात राहात होते, त्यांनी नव्वदी ओलांडली होती. नागपूरला जाअून सिक्युरिटी गराड्यातून त्यांना  भेटलो. त्यांची प्रकृती तशी बेताची, क्षीण आवाजात बोलत होते. तो फोटो दाखवल्यावर सगळयां प्रमुखांची नावं त्यानी ओळीनं सांगितली. त्या नावांसह फोटो पुस्तकात छापला गेल्यावर सगळयांना आश्चर्र्य व आनंद वाटला.
सांगली शिक्षण संस्थेच्या कामाची सुरुवात चार शिक्षकांनी केली, त्यांतील तिघांचे फोटो अुपलब्ध होते. त्यांपैकी सखदेव हे शाळेची सुरुवात झाल्यावर अल्प काळातच गेले. त्यांचा अेकमेव फोटो पुढच्या काळात मिळाला, तो होता त्यांच्या अंत्यदर्शनाचा! काही काळ तोच फोटो चार संस्थापकांत वापरला जात असे. पण ते काही बरे वाटेना. मग कलाकारांचे कौशल्य वापरून सखदेवांच्या स्मृती व अंतकाळचा तो फोटो यांच्या आधारे नवा `योग्य' फोटो तयार करण्यात आला. तो आता सर्वत्र वापरला जातो.
आता काँप्यूटरमुळे तो सारा खटाटोप बराच सोपा झाला आहे. पण दिलेले काम काँप्यूटर करतो; त्याला माहिती देण्याचं काम आपण माणसांनी केलं पाहिजे. चुकीचं काही सेव्ह केलं तर, पुढं शेदोनशे वर्षांनी कधीतरी आपल्या फोटोखाली  ट्न्ंप किंवा मायावतीचं नाव छापलं जाण्याचा धोका आहे. म्हणून फोटो काढण्याची हौस करण्याआितकीच त्याची सारी नोंद करणं महत्वाचं!
                                                                              -वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

नेत्र पैलतीरी
`जगण्यात अर्थ असतो तोवरच मरणात मौज असते' हे खरेच आहे. जगण्याचा आनंद असतो तोपर्यंत अस्तित्वाची जाणीवच होत नाही. जीवन नकोसे होते तेव्हाच अस्तित्वाचं भान येतं.
सर्वांनाच सुख हवंसं वाटतं. दु:ख इतरांकडे गेले तरी चालेल! अस्तित्व सापेक्ष असतं. एखाद्या व्यक्तीची इतरांना गरज असते तोवरच त्याचं असणं हवंसं वाटतं. व्यक्तीचे अस्तित्व कायमस्वरूपी नाही. माणसाचं आरोग्य बदलत रहातं. लहानपणी, तरुणपणी देहाविषयी कोणी चिंता करत नाही. म्हातारपण येतं व्यथा सुरू होतात. निव्वळ जगणंही एखाद्या व्यक्तीला असह्य होऊ लागतं. अशा मन:स्थितीत आत्मघातकी विचार डोकावू लागतात.
लहान असतो तेव्हा आपण आईवडिलांना हवेसे असतो. कालांतराने नोकरी धंद्यात गर्क झालो की कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. मुलंही मोठी होतात. आपली त्यांना फक्त आशीर्वाद देण्यासाठीच आवश्यकता वाटते. स्त्री-पुरुष वृद्धापकाळात एकाकी होतात, दुसऱ्यांची गरज लागते. ताटातूट होण्याची वेळ येते. मागे राहाणाऱ्या व्यक्तीला गेलेल्या व्यक्तीची अनुपस्थिती जाणवतेच. मग गत्यंतर नसते. हे स्वाभाविकच आहे. अस्तित्वाची जाणीव परिस्थितीनुसार ठरते. ज्याला गमवावं लागतं तेव्हा मन:स्थिती बिकट होते. अशी व्यक्ती गतआयुष्यातील बऱ्यावाईट गोष्टींचा आढावा घेऊ लागते. एकाकी आयुष्याची वाटचाल सुसह्य करण्याचा प्रयत्न करतो.
मी ही सत्तरीच्या बुरुजावरून पूर्वायुष्यात डोकावून पहाण्याचा छंद जोपासला आहे. काळपरत्वे नातवंडं बागडू लागली, त्यांना वाढताना बघतच अंतापर्यंतची वाटचाल करावयाची आहे.
                                                                            -कृ.द. गाडगीळ, मुंबई      मो.न. ९८३३७२५१४५

विजयाचे पैलू
भारतातल्या पाच राज्यांच्या मतदानाचे निकाल पूर्णत: अनपेक्षित होते. स्वत: अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे अुभयता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यावर आत्मविश्वासाने आपण जिंकणार असल्याचे म्हणत होते, ते काही निदान वा राजकीय आडाखा नव्हे; तर प्रचारात्मक घोषणा होती हे अुघड आहे. अन्यथा त्या मोठ्या विजयाचा अुत्फुल्ल आनंद ढोलनृत्यांनी साजरा होण्याचे तसे काही कारणच नव्हते. तसा तो आनंद सर्व पैलूंनी साजरा झाला याचाच अर्थ तो विजय अेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनाही अपेक्षित नव्हता. अुत्तर प्रदेशात त्या पक्षाने लोकसभेच्या वेळीच अेकतर्फी यश आणले होते, यावेळी त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यासोबत अुत्तराखंड या `देवभूमीत' चांगले पाय रोवता आले, आणि गोवा-मणिपुरात काही काळापूर्वी फारसा प्रभाव नसताना आज निदान कण्हत कुथत का असेना सत्ता मिळवता आली.

पंजाबात राहुल गांधींच्या काँग्रेसला यश आले असे नाही, पण अकालींच्या मस्तीला अपयश आले. त्यात अमरिंदर सिंग यांचेही वजन कामी आले. यात राहुलना काही श्रेय देण्याचे असेल तर ते  तिथे प्रचाराला  न जाण्याला द्यायला हरकत नाही. अेक टवाळी माध्यमांवर प्रसारित होत होती की, पंजाबात बरेच `सरदारजी' असल्यामुळे त्यांना राहुल आपल्यातला माणूस वाटले; म्हणून त्यांना मतं पडली! राहुल हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते हेसुध्दा मोदी विजयाचे अेक मोठे कारण आहे. आणि अखिलेश परिवार व हरीष रावत यांसारखे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील खेळाडू स्पर्धेत होते हे कारण तो विजय मोठा करण्याला घडले आहे. कसेही असले तरी या निकालांनी भारतीय राजकारणाला अेक नवी दिशा मिळणार हे खरे आहे.

आजवरची राजकीय लढाआी बाष्कळ घोषणा, भावनिक आवाहने आणि धार्मिक लालूच या निरर्थक मुद्द्यांवर फिरत असे. गरीबी हटाव, २०कलमी कार्यक्रम, धर्मनिरपेक्षता यांत मतदार संभ्रमित झाले होते. बऱ्याच अंशी मतदारांना निवडणुकांचे गांभीर्य कळतही नव्हते. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आसपास मतदानांचा आकडा खेळत होता. नवी पिढी आली, त्यांची मानसिकता नवी होती. ती पिढी जग फिरत पाहात होती. स्त्रिया आणि ग्रामीण भाग शिकला होता. या साऱ्यांतून नव्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या पुऱ्या करणारे तरुण, सुशिक्षित, त्यातल्या त्यात शहाणे अुमेदवार लोकांना हवे होते. हे बऱ्याच अंशी भा ज प ने ओळखले. सत्ता म्हणजे मस्ती हे समीकरण बदलू शकेल असा विश्वास मोदींनी निर्माण केला. भारताची प्रतिमा त्यांनी विदेशंापर्यंत बदलून दाखवली. त्यामुळे भारतीय मतदार त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. तरीही त्यांची भाषा सर्वसमावेशक आणि विनम्र आहे, हे खूप महत्वाचे आहे.

गेल्या काही महिन्यांत माध्यमांतून जी वादचर्चा झडत होती, तीमात्र लोकशाही व्यवस्थेशी कमालीची विसंगत होती हे लक्षात आले. वृत्तपत्रांनी तर त्यांची विश्वासार्हता घालवलेली आहे. प्रबोधन आणि समतोल वृत्तांकन हे दुर्मीळ झाले आहे. राजकीय पक्षांना खरे तर ही लोकशिक्षणाची संधी मिळालेली असते, ती सारेच पक्ष वाया घालवत असतात. त्यांच्या चर्चा म्हणजे नळावरच्या बायांची बाष्कळ कचाकची भांडणे होतात. लोकशाहीत प्रामुख्याने समन्वयाची गरज असते. त्यासाठी दुसऱ्याचे अैकून घेण्याला फारच महत्व असते. आपल्या संसदेने तर त्याबाबतीत ताळ सोडलेला आहे, त्याचेच छोटे रूप त्या त्या पक्षांचे प्रतिनिधी टीव्हीवरती दाखवीत असतात. त्या दोन्ही स्तरांत फरक आितकाच की, संसदेत निदान अध्यक्ष तरी सौम्यपणे वागतात बोलतात, चर्चा संचलित करतात... आिथे संचालक मंडळीही कर्कश्श आरोप करत सुटतात, प्रत्येकाला बोलता यावे अेवढीही काळजी घेत नाहीत.

शिवाय चर्चेसाठी मुद्दे सोडूनच बोलायचे असा काही नियम ते घालून देत असावेत. आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठीच तर त्यांना पाचारण केलेले असते; पण त्यापेक्षा ते आितरांस शिव्याशाप देण्यातच वेळ घालवतात. शिवाय कालबाह्य मुद्दे काढत राहण्याने ते आपली बाजू क्षीण करतात हेही त्यांना कळत नसेल तर त्यांचे वाक्पटुत्व ते काय राहिले? भा ज प वर आरोप करण्यासाठी आजही गांधीहत्या  वापरात आणावी लागत असेल तर त्याचा अुपयोग नव्या पिढीवर होत नाही, हे कळत नाही का? त्याअुलट काँग्रेसला ठोकायचे तर आणीबाणी काढावी लागतेच असे नाही. मुद्देसूद अभ्यासू मांडणीसाठी आक्रस्ताळेपणा अुपयोगी नसतो हे निदान त्या संचालकांनी ध्यानांत घ्यावे, आणि त्यासाठी योग्य व्यक्ती चर्चेसाठी निवडायला हव्यात.

मतमोजणीच्या पूर्वी जे अंदाज (अेक्झिट पोल) प्रकट झाले, त्या अनुरोधाने चर्चा होती. मुळात सगळयांचे सगळे अंदाज  चुकलेले आहेत हे तर खरेच; पण जे काही अंदाज पुढे आले होते, त्यांवर आधारित चर्चा करायची होती. मग ते अंदाजच चुकीचे आहेत; ते पूर्वी कसे चुकलेच होते, ट्न्ंपच्या बाबतीतही तेच कसे घडले....  यांवर मतमतांतरे कशाला हवीत? हे अंदाजच आहेत, `तसेच निकाल लागले तर तुमची भूमिका काय राहील', हे स्पष्ट करायचे असते. त्या अंदाजाप्रमाणेच निकाल लागले तर पराभव होअू शकणाऱ्या कोणी त्यावर भाष्य केले म्हणताच, तो संचालकही ओरडा करतो की, तुम्ही असे म्हणता याचा अर्थ तुम्ही पराभव मान्य करीत असून आत्मविश्वास गमावलेला आहात! हे किंवा या प्रकारचे अजब तर्कट म्हणजे चर्चा-संवाद असे आज जर मानले जात असेल तर भारतीय लोकशाही रीतीला फार काही भविष्य नाही. संसदेतील राजकीय पक्षांना लोकशाही रीत कळलेली नाही, तशीच ती समाजातील `शहाण्यां'नाही कळलेली नाही असे म्हणावे लागते. त्यामुळे हा पक्ष जाअून तो आला अेवढ्यावर समाधान फार काळ टिकणार नाही. तो पक्ष कार्यक्षम ठरण्यासाठी लोकांनीच लोकशाही अंगी बाणवायची असते.

प्रत्येक नागरिकाला त्यासाठी काळजी घ्यायला हवी. आपल्या नेहमीच्या आयुष्यक्रमांतही लोकशाही रुजल्याचा प्रत्यय आला तर राजकीय पक्षांवरही वचक राहील. रस्त्यांत वाहन कसे थांबवायचे, रांग कशी लावायची, स्वच्छता कशी ठेवायची, मुलांना काय शिकवायचे वगैरे साऱ्या गेाष्टींतून लोकशाहीचा प्रत्यय येत असतो. दुसऱ्यासह आपण चालायचे आहे, हे अेकदा कळून घेतले तर पुढच्या बाबी सोप्या होतात. लोकशाहीत `मी'पेक्षा `आपण' महत्वाचे असते. केवळ हा पक्ष जाअून तो पक्ष आला अेवढ्याने काम भागत नाही, फार तर त्याने अपेक्षा वाढतात. त्या पुऱ्या करण्यासाठी केवळ सरकार पुरे पडत नाही. सरकार कोण्या पक्षाचे नसते, ते लोकांचे असते. ते यशस्वी होण्यासाठी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा सामान्य जनतेला जास्त बुध्दीने काम करावे लागेल.


सकारात्मक निर्णय
रोहितच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितलं, `तुमचा रोहित आज शाळेच्या वेळेत गावाबाहेर फिरताना दिसला.' सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण पुन्हा असंच ऐकायला मिळाल्यावर त्यांनी रोहितला विचारलं. तो मान्य करत नव्हता, पण खडसावून  विचारल्यावर आणि शाळेत चौकशी करण्याची तंबी दिल्यावर त्याने चूक कबूल केली. `मला शाळेत अजिबात जायचं नाही' असं सांगायला लागला. रोज आवडीनं शाळेला जाणारा रोहित आता असं का वागतोय हे कळत नव्हतं.
तसा रोहित हुशार होता. आतापर्यंत शाळेत त्याला उत्तम गुण मिळाले होते. परंतु सहामाहीत त्याचे गुण कमी झाले. शाळा, मित्र, शिक्षक यांच्याशी तो फार बोलायचा नाही. त्याचे एका विषयाचे शिक्षक `त्याच्या मते' त्याला उगाचच ठरवून बोलतात. त्यामुळे त्याची वर्गातली प्रतिमा खराब होत होती. शिक्षक चिडवतात म्हटल्यावर मुलंही त्याला चिडवू लागली. ही गोष्ट पालकांना सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण स्वत: शिक्षक असणाऱ्या आईला मान्य होईना. उलट त्यालाच तिने `तुझा अभ्यास होत नाही म्हणून सर ओरडत असतील' असं कारण सांगितलं. वर्गात आणि घरात कोणीच आपलं म्हणणं ऐकून घेत नाही, हे पाहिल्यावर त्याच्यावर प्रचंड ताण आला. त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं. गृहपाठ अपूर्ण राहू लागला. आपला पाणउतारा करवून घेण्यापेक्षा शाळेबाहेर राहणं जास्त बरं वाटू लागलं.
साधारणपणे या वयातील मुलांना अशा ताणाला सामोरं जाण्याचं योग्य प्रशिक्षण नसतं. रोहितसारखी आई असेल तर मुलांना त्यांच्या मनांतील गोष्टी पालकांना सांगण्याचीही सोय नसते. मग मुलं स्वत:ला योग्य वाटेल असा मार्ग शोधतात. बरीच मुलं घाबरून जातात, नंतर परिस्थितीपासूनच पळ काढतात. पळ काढण्यामध्येसुद्धा विविध प्रकार आहेत. रोहितसारखा मुलगा शाळा चुकवतो. काहीजण `आपल्याला हे जमतच नाही' म्हणून त्या विषयापासून पळून जातात. काहीजण अगदी टोकाचा मार्ग स्वीकारतात.
आपण नेहमी आनंदी असावं अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो. आपल्याशी आलेली घटनाच आपल्याला दु:खी करत आहे असं वाटतं. त्या घटनेला, आव्हान म्हणून न स्वीकारता तिच्याकडे समस्या म्हणून पाहू लागतो तेव्हा ताण निर्माण होतो. उत्क्रांतीच्या काळात आदिमानव आव्हानांना तीन प्रकारे सामोरं जायचा, घाबरणे, पळून जाणे, आणि लढा देणे. आदिमानवाला एखादा वाघ समोर पाहून पळून जावं लागलं असेल. नंतर स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर तो त्या वाघाशी लढा द्यायला शिकला. आत्ताच्या काळात आपण परिस्थितीपासून पळून जाऊ शकत नाही. परिस्थितीला आव्हान समजून आपण तिचा सामना केला पाहिजे.
लढा देणे म्हणजे नेमकं काय? शस्त्र किंवा ताकदीने लढा नक्कीच नाही. हा लढा म्हणजे बौद्धिक लढा. घटना जेव्हा आपल्याला आव्हानाऐवजी न सुटणारी समस्या वाटू लागते, तेव्हा ताण निर्माण होतो. म्हणजेच आपला दृष्टिकोण बदलला की तणाव निर्माण होतो. नकारात्मक दृष्टिकोण बदलून स्वत:च्या मनात सकारात्मक दृष्टिकोण निर्माण करणे म्हणजेच तणावाशी बौद्धिक लढा देणे. `तुम्ही कोणत्या परिस्थितीला सामोरं जाता त्यानं फरक पडत नाही. तुम्ही त्या घटनेला कोणत्या दृष्टिकोणातून पाहता, त्यावर काय प्रतिक्रिया देता हे महत्वाचं आहे.' असं डॉ. हान्स सेल्ये यांचं म्हणणं.
आपल्या मुलाला त्याच्याबरोबर घडणाऱ्या घटनांकडे कसं पहायचं, त्यांच्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याचं मार्गदर्शन करणं ही सध्याच्या घडीला पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं खेळीमेळीचं आणि तणावमुक्त असेल तरच तो त्याच्या मनातील विचार तुमच्याकडं व्यक्त करू शकणार आहे. यासाठी पालकांनी आपणहून पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण अनुभव तुम्हाला जास्ती आहे, तुम्ही मोठे आहात, आणि त्यामुळं तुमची जबाबदारी जास्त आहे. तुमच्याबरोबर घडलेल्या घटनांबद्दलचे विचार, तुमचे दृष्टिकोण आणि त्या परिस्थितीत तुम्ही कसे वागलात आणि जर कधी चुकला असाल तर का चुकलात हेही तुमच्या पाल्याला सांगा. यात पालकांनी कमीपणा घेण्याचं काहीच कारण नाही. यासाठी मनशांत असावं लागतं. मनाची चंचलता कमी करण्यासाठी आपल्या पाल्याकडून रोज काही मिनिटं तरी ध्यान, प्राणायाम अथवर श्वसनाच्या व्यायामाचा अभ्यास करवून घेणं गरजेचं आहे.
ताण हा कायमच आपल्याला त्रास देण्यासाठी, आपलं नुकसान करण्यासाठी आलेला नसतो. वाघ समोर पाहून आलेला ताण आदिमानवाला पळून जाण्यात मदत करत होता, आणि त्यामुळं आदिमानवाचा जीव वाचला होता. मुलाला परीक्षेच्या आधी आलेला ताण हा त्याला नीट अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो. ताण या विषयाकडंसुद्धा विवेकी दृष्टिकोणातून पाहायला शिकवावं, जेणेकरून तो त्याला येेणाऱ्या ताणाचा आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा वापर त्याच्या प्रगतीसाठी करून घेईल.
                                  -अजिंक्य नितीन गोडसे, इचलकरंजी   फो नं. ९६३७७४१८६५

कौपिनाची कंपनी
दहा पंधरा वर्षांपूर्वी केवळ योगासनांची फासफुस करणाऱ्या रामदेवबाबानी आजकाल मोठ्या बँड कंपन्यांना घाम फोडला आहे. दीडदोनशे वस्तूंचे अुत्पादन सुरू करून ते साऱ्या देशभर वितरण करण्याचा अलौकिक व्यवसाय त्यांनी पाहाता पाहाता स्थिर केला आहे.
पश्चिमी देश आणि चीन हे सध्या अर्थजगतात स्पर्धक आहेत. तिकडे मंदी डोकावू लागल्यावर गेल्या काही वर्षांत त्यांनी दक्षिण आशियाकडे लक्ष वळविले होते. आिथे वाढते दरडोआी अुत्पन्न त्यांना दिसले. नवसाक्षर मध्यमवर्ग हा घरेलू वस्तूंचा खरा ग्राहक असतो तो आता बाजारात आलेला आहे. त्यात भारताशिवाय अन्य देशही आहेत. थायलंड, आिंडेानेशिया, मलेशिया, बांगला, श्रीलंका वगैरे देशांतून बाहेर नोकऱ्या करण्यासाठी जाणारा तरुण वर्ग आणि त्या देशांतूनही वाढणारे अुद्योग यांमुळे नवा वाढता मध्यमवर्ग हा त्या वस्तूंचा मोठा ग्राहक असतो. ते हेरून पश्चिमी कंपन्यांनी इकडे मोर्चा वळवला आहे.
तथापि त्यांना रामदेवबाबाशी स्पर्धा करावी लागेल असे वाटले नसावे. रामदेवबाबंांच्या पतंजलीची  अनेक अुत्पादनकेंद्रे आहेत, तिथे दोन लाखांवर लोकांना रोजगार मिळतो. त्या मालाची अुलाढाल आता ३हजार कोटींचा टप्पा ओलांडून गेली आहे. पतंजलीची अुत्पादने आयुर्वेदिक असतात, हा समज आितका दृढ झाला आहे की, गावोगावच्या बाजारातील सामान्य ग्राहक, भांडी घासण्याची पूड किंवा मोरी घासण्याचा ब्रशही  `आयुर्वेदिक' म्हणून पतंजलीला प्राधान्य देतो. योग आणि भारतीय परंपरांवर लोकांचा विश्वास आहे, त्याला राबदेवबाबाने `अेन्क्रॅश' केले. त्यात मार्केटिंगचे कौशल्य असले तरी गैर मानण्याजोगे काहीच नाही. असल्याच काहीतरी तंत्राने विदेशी कंपन्या आिथे धंदा करतात; राबदेवबाबानी  तसा धंदा केला म्हणून काय झालं?
हे बाबा तर आता पतंजली योगपीठाच्या वतीने अेक भव्य शाला सुरू करणार आहेत, त्या शालेत पहिलीपासून साऱ्या क्रेमक पुस्तकांबरोबरच संस्कृतचे पाठ आणि वेदांचे अध्ययन होआील. त्याला त्यानी `भारतीय शिक्षा बोर्ड' असे नाव दिले आहे. जगातील जातीभेद वेदपठणाने नाहीसे होतील असा त्यांचा हेतू असल्याचे ते म्हणतात. पतंजली योगपीठ पुण्याच्या वेदभवनाच्या पाठीशी राहील असेही त्यांनी जाहीर केले आहे.

अभिवादन
या नियतकालिकास ३८ वर्षे पूर्ण झाली-त्यानिमित्ताने खूप म्हणजे खूपच वाचकांनी विविध माध्यमांतून आशीर्वाद देऊन शुभचिंतन केले. सर्वांचा ऋणभार सदैव वाढता राहू द्या.
-`आपले जग' परिवार
अंक पोस्टाने वेळेत मिळत नसल्याची तक्रार असते. पर्याय म्हणून ई-मेलवर अंक पाठविता येईल. ज्यांना सोयीचे असेल त्यांनी कृपया कळवावे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन