Skip to main content

lok kya boltat in 14 Jan 2013


बुफे पद्धत गैरसोयीची
डिसेंबर अंकातील संपादकीय आवडले. `अन्नसेवन हे यज्ञकर्म आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ-वृद्ध यांना बुफे पद्धत असू नये. त्यांना एका हाती ताट-वाट्या धरता येत नाही. वृद्धांच्या एका हातात काठी-छत्री असते. ताट-वाटी सांभाळणे व एका हाताने अन्न वाढून घेणे एक संकटच असते. संयोजकांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. दहा बारा व्यक्तींनी त्यांना हवे त्या व तेवढ्या पदार्थांचे ताट वाढून दिले तर त्यांना सोपे जाईल. अन्नाची नासाडी वाचेल.
- दि. ज. डोंगरेे
`कृतार्थ' गव्हर्मेट कॉलनी, विश्रामबाग (सांगली)

कुणीतरी लक्षात घेत आहे
`यज्ञकर्म की मस्ती' या संपादकीय लेखातील प्रत्येक परिच्छेदाचा विचार अंतर्मुख होऊन करण्याची गरज आहे. मी नुकताच एका विवाहासाठी (मुलीची बाजू) जाऊन आले. आपल्या लेखातील बुफे पद्धतीचा वास्तव अनुभव घेऊन आलो. अलिकडे ऐकलेेले नितिन गडकरी पुत्राचे लग्न आणि पूर्वी ऐकलेले अकलूजच्या मोहिते-पाटलांकडचे लक्षभोजन. तिथे जेवणाऱ्यांचे अगत्यप्रेम मान्य केले तरी अन्नब्रह्माचा अनादर मनात राहतोच. `हे असंच चालायचं का?' असं वाटत होतं; पण नाही! - कुणीतरी लक्षात घेतो आहे.
- दि. भा. साठ्ये कर्वेनगर, पुणे - ५२
(याच आशयाच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, त्यांनी अधिक स्पष्ट मतप्रदर्शन त्या त्या ठिकाणी करायला हवे. हा विषय लोकांच्या लक्षात यावा असे आचरणसुद्धा सभ्यतेने करावे.)

१ तप : संस्काराचे
सध्या सामाजिक, राजकीय वगैरे समस्यांचे काहूर उठले आहे. आपापल्या मती (व कल) प्रमाणे विविध विचार प्रकट होत असतात व दूरदर्शन माध्यमातील चर्चांमधून बराच खल घातला जातो. दुर्दैवाने यामधून सकारात्मक मांडणी होण्याऐवजी केवळ दोषारोपणातच जास्त वेळ जातो.
केवळ कायदे करून अथवा सर्वांनाच सल्ले देऊन काही घडेल असे वाटत नाही. कारण कायदे झाले तरी त्यांचे पालन करण्याकडे सर्वसामान्यांचा ओढा आढळत नाही. अंमलबजावणी करणारेदेखील याबाबतीत गंभीर नाहीत असेच दिसते. `खूप वर्षांपूर्वी केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी किती प्रमाणात सुरू झाली याची आकडेवारी `द वीक' मध्ये आली होती. कायदेमंडळे केवळ कायदे करण्यात वेळ काढत असतात. अंमलबजावणीकडे त्यांचे लक्ष नाही - कारण प्रशासन व्यवस्था, कायदेमंडळ आणि न्यायसंस्था यांनी `परस्परांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करू नये' म्हणता म्हणता 'त्या त्या कार्यक्षेत्रात लक्षही घालू नये' अशीच मानसिकता आढळत आहे.
समाजप्रबोधन व्हावे असे वाटणाऱ्या मंडळींनी कंबर कसून पुढे यायला हवे. समाजधारणा होण्याचा मूळ पाया ज्या वयोगटात रचला जातो तिथेच गांभिर्य आढळत नाही. वय वर्षे ८ ते २० - एक तप - हा काळ वास्तविक बलसंपदा, संयम, त्याग आणि ज्ञान यांवर पूर्ण लक्ष केंद्रित झाले व तसे संस्कार त्या वयात नीटपणे घडवता आले तर परिस्थिती बरीच बदलू शकेल असे वाटते.
या वयोगटात बलसंवर्धन-शारीरिक तसेच मानसिक होणे - अगत्याचे आहे. बल जसजसे वाढत जाते, तसतसा अहंकार-गर्व-मद वाढत जाण्याचा धोका! म्हणून संयमाची आवश्यकता. संयम सुटला तर विनाशाकडे पावले पडण्याचा धोका. या वयोगटाच संयम पाळण्याचे व्रत, नीटपणे आचरणात येता येता ती सवय व्हावी असे प्रयत्न व्हायला हवेत.
संयमाचे आचरण जसजसे वाढेल तसा `भोग'सुद्धा संयम राखून घेता येईल. अतिरेक टाळून भोगवाद अनुसरण्यास हरकत नाही. परंतु संयमाची आणि आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक सर्वत्र बजबजपुरी माजते आणि आम्ही यावर आपापल्या मनात, कुटुंबात उपाय योजण्याची खबरदारी मनापासून न घेता दुसऱ्यांना दूषण देण्याची पळवाट शोधत राहातो.
८ ते २० या वयोगटात बलसंवर्धन व संयम व त्यामुळे त्याग यांची केवळ शिस्त नव्हे तर अंतरंगापासून वागणूक, आचरण राहायला हवे. `सरकार' केवळ धाक दाखवण्यापुरती मदत करू शकेल आणि सरकार चालवणारे स्वत: प्रामाणिक मनोबल असणारे, संयमी व मोहत्याग करणारे कर्मचारी, अधिकारी नसतील तर अस्त्र `धाक' तरी कसा बसणार? कारण वास्तविक  हे कर्मचारी, अधिकारी (व लोकप्रतिनिधी व न्यायाधीशसुद्धा) आमच्या समाजातूनच पुढे यायचे असतात.
एकंदरीत वयोगट ८ ते २० या काळातील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम होण्यासारखे शिक्षण-ज्ञान मिळायला हवे. दुर्दैवाने तथाकथित शिक्षणपंडित अशा व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. केवळ `माहिती' जमा करून मेंदूत कशी भरता येईल याकडेच यांचा तोरा आहे. परंतु `माहितगार' म्हणजे `शहाणा' असेलच असे नाही. प्रत्यक्ष आचरणावर जोर द्यायला हवा. नाहीतर सर्वच केवळ हवेत इमले बांधण्यासारखे..!
- प. श्री. जोशी, चिंचवड, पुणे

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन