Skip to main content

Aapali Upnishde


आपली उपनिषदं
संदर्भ : `उपनिषदांचा अभ्यास',
लेखक - के.वि.बेलसरे, त्रिदल प्रकाशन, गिरगाव, मुंबई

आपणा बहुतेकांना पुराणे ठाऊक असतात. पिचत वाचलेली पण असतात. पण उपनिषदे केवळ नाव ऐकून माहीत असतात.
ऋग्वेदानंतर आणि बुद्धपूर्वकाली प्रधान उपनिषदे निर्माण झाली. उपनिषदांना वेदान्त असेही म्हणतात. कारण ती वेदांच्यानंतर निर्माण झाली. वेदवाङ्मयाचे चार भाग आहेत - १)संहिता २) ब्राह्मण ३) आरण्यके व ४) उपनिषदे. ऋषींना स्फुरलेल्या आणि त्यांनी गायिलेल्या छंदोबद्ध मंत्रांचा नीट रचलेला समूह म्हणजे संहिता. या संहितांतील मंत्रांचा अर्थ, स्पष्टीकरण, विधि व विनियोग ज्यांत सांगितलेला आहे ते ब्राह्मण ग्रंथ. हे गद्य ग्रंथ आहेत. ज्ञानपिपासू तपस्वी अरण्यातील आश्रमांत राहून मनन, निदिध्यास व तत्वचिंतन करीत. ते वाङ्मय आरण्यकांत आहे. त्या त्या तत्त्वचिंतनाचा विकास व अर्थविस्तार उपनिषदांमध्ये दृष्टीस पडतो. म्हणून उपनिषदांस `आम्नायमस्तक' म्हणजे वेदांचे उत्तमांग म्हटले आहे.
पुढील दशोपनिषदे महत्त्वाची आहेत -
१) ईशावास्योपनिषद २) केनोपनिषद
३) कंठोपनिषद  ४) प्रश्नोपनिषद ५) मुंडकोपनिषद ६) मांडुक्योपनिषद ७) तैत्तिरीयउपनिषद
८) ऐतरेयोपनिषद ९) बृहद्आरण्यकोपनिषद
१०) छांदोग्योपनिषद
ही दशोपनिषदे अधिक `श्वेताश्वतर' मिळून अकरा उपनिषदे प्राचीन व महत्त्वाची समजावीत. त्यापैकी `छांदोग्य' आणि `बृहद्आरण्यक' ही दोन मोठी आहेत. इतरही बरीच दुय्यम उपनिषदे आहेत.
ब्रह्मजिज्ञासेपोटी ऋषीमुनींनी जे तत्त्वचिंतन केले त्याचा रसरसलेला आत्मानुभव यात साठविलेला आहे. वैदिक संस्कृत ही उपनिषदांची भाषा आहे. काही गद्यात तर काही पद्यात आहेत.
उपनिषद म्हणजे आत्मविद्या शिकण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी शिष्याने भक्तीयुक्त अंत:करणाने व नम्रभावाने गुरुच्या जवळ बसणे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता म्हणजे बहुजन समाजासाठी तयार केलेली उपनिषदांची छोटी आवृत्तीच होय. उपनिषदांमध्ये जीवाला भोक्ता व कर्ता मानलेला आहे. प्रत्येक जीवाला प्राण व मनस या दोन उपाधि असतात. हेतूरहित हालचाली प्राण घडवून आणतो तर सहेतुक हालचाली मनस घडवून आणते. स्थूल शरीर, प्राण, मनस व आत्मा मिळून जीव बनतो. देहाच्या दहा इंद्रियांच्या साहाय्याने  मनस काम करते. जीवाची रचना गुंतागुंतीची असते. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे जीवाचे पाच कोश असतात. मानवी ही जीवाची श्रेष्ठ पातळी आहे. म्हणूनच त्याला `विश्वस्थ सुकृति' म्हटलेले आहे.
उपनिषदांमध्ये `परा' व `अपरा' अशा दोन विद्या सांगितलेल्या आहेत. त्या अनुभूतीतूनच निर्माण होतात. अनुभूतीचे तीन प्रकार आहेत. प्रत्यक्ष, परोक्ष व अपरोक्ष. खोल आत्मचिंतन करताना देहभान हरपले असता ऋषींच्या तोंडून जे ज्ञान, आत्मस्वरूपाचे ज्ञान शब्दरूपाने बाहेर पडले व ते त्यांनी ऐकले व इतरांनीही ऐकले त्या वाङ्मयास `श्रुति' असे म्हणतात. मीपणाच्या पलीकडून म्हणजेच अतींद्रिय आत्म्याकडून `ते' शब्द येतात म्हणूनच त्यास अपौरुषेय वाणी म्हणतात.
असे बरेच ज्ञान व वरील उपनिषदांची, त्यांच्या कर्त्यांची, त्यांच्या विषयांची समग्र माहिती या ५५५ पृष्ठांत सामावलेली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ आलोडावा.
- चंद्रकांत वेलणकर, मालाड, मुंबई
मोबा. नं. ९८७००३२९९१

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...