Skip to main content

Lekh about Birthday


घटत जाणारे `वाढ'दिवस
- वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

प्रौढपणी साजरे होणारे माणसांचे वाढदिवस हा अलिकडच्या काळात प्रचलित झालेला एक उत्सव आहे. बालक शाळेत जाऊ लागल्यावर दर आठदहा दिवसांनी कुठल्यातरी सवंगड्याचा वाढदिवस म्हणून `लुटलेले' चॉकलेट किंवा खोडरबर घरी घेऊन येते. त्याशिवाय संध्याकाळी त्याच्या बड्डे पार्टीला जमणारे आबालवृद्ध तो उत्सव रंगाढंगानी साजरा करतात. पूर्वी केवळ आई किंवा फारतर वडील-आजी इतक्याच मर्यादेत फिरणारा मुलांचा वाढदिवस आता बदलत्या काळातील छोटे कुटंुब आणि वाढती प्राप्ती यांना अनुसरून थाटमाटी स्वरूपाचा झाला आहे.
वयाच्या तीन-चार-पाच वर्षांपर्यंत हा सोपस्कार सोहळा आजही ठीक वाटतो, थोडी ढील द्यायची तर चौदा पंधरा वर्षांपर्यंतचे वाढदिवसीय कौतुक समजून घेता येते. पण तिथपासून अशा निमित्तांनी निर्माण होणारा अहंभाव वाढत्या वयाबरोबरच वाढत जात असतो काय? हल्ली कुठल्याही गावातल्या चौकात किंवा गल्लीबोळात एखादे `उगवते नेतृत्त्व' किंवा `विचार मंचा'तील पुंड आपली छबी झळकवीत वाढदिवसाच्या शुभेच्छांचे गुच्छ मिरवीत असलेले दिसते. जन्मतिथीपासून वयाचे पहिले १० दिवस, मग १ महिना, नंतर १ वर्ष हे टप्पे माणसाला त्या बालकाच्या वाटचालीतून उत्साहवर्धक जाणवत असतात. त्यानंतर धोक्याचं सोळावं वरीस, गद्धेपंचविशी किंवा अनुभवांची चाळिशी या पायऱ्या केवळ व्यक्तिगत उल्लेखाच्या! त्यात `साजरे' करण्यासारखे काही नाही.
तथापि ६०, ७५, ८०, १०० हे वयाचे टप्पे झुकत्या माणसाला तृप्तीदर्शक वाटत असतात. पुढच्या पिढ्यांनी वडीलधाऱ्यांबाबत कृतज्ञता दर्शवावी असा एक हेतू हे टप्पे साजरे करण्यात असेल. याही टप्प्यांवर कोणाला गतकाळाविषयी अथवा केल्या कामाविषयी कृतकृत्यता वाटावी की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न उरतो. या टप्प्यांना आलेले महत्त्व हे तर उघडउघड कालसापेक्ष वाटते. थोड्या आधीच्या काळात ज्यांनी आभाळाएवढे कर्तृत्त्व गाजवले त्यांची साठी किंवा एकसष्ठी होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. ज्ञानेश्वर २१, विवेकानंद ३९, आगरकर ३४, बालकवि ३२, थोरले माधवराव २८, रा.ग.गडकरी ३६, छत्रपती शिवाजी ५०, थोरले बाजीराव ४५, शंकराचार्य ३३ ही त्यांची निर्वाणवये लक्षात घेतल्यास साठ वर्षे पूर्णत्त्वाला किती मोठे करावे अशी पंचाईतच वाटावी. याउलट महाभारतकाळी युद्ध झाले, त्यात अर्जुन ८३, श्रीकृष्ण ९० वगैरे वयाचे युध्यमान नरपुंगव होते असे तज्ज्ञांचे गणित आहे. त्यांनी सहस्रचंद्रदर्शन केल्याचे ऐकिवात नाही. साठ ही त्यावेळची `युवावस्था' म्हटल्यावर आज अधिकच वाकायला होते. परंतु त्या गरुडांची तुलना करून चिमण्यांनी उडण्याचे थांबवू नये. आपल्याला, आपल्या कुटुंबाला, गोत-गोतावळयाला साठी-पंचाहत्तरी करण्यात आनंद असेल तर कोण कशासाठी नाकारणार?
माणसाला प्रौढत्त्व आल्यानंतर त्याला एवढी समज असायला हवी की, माणसाचा अंत अटळ असल्यामुळे प्रत्येक दिवशी तो त्याच दिशेने सरकत असतो. `वाढ'दिवस हा यापुढच्या काळात `घट'दिवस मानावा लागेल, कारण आयुष्याचे एकेक वर्ष घटत असते. आजपर्यंतच्या आयुष्यात काय काय घडले याचा लेखाजोखा मांडून, बाकी उरलेल्या आयुष्यात कशी `जान' आणता येईल याचे चिंतन आपापल्या जन्मदिवशी स्वत:शी अवश्य मांडायला हवे. ढहश लळीींहवरू ाशरपी पेीं ींे रवव ूशरीी ींे  श्रळषश, र्लीीं ींे रवव ींहश श्रळषश ींे ूशरीी. (आपल्या आयुष्याला एकेक वर्ष नुसते जोडत जाणे नव्हे, तर एकेका वर्षात `जीवन' निर्माण करणे.)
निवृत्तीनंतरच्या झुकत्या वयात माणसाला मानसिक आधार देणे, शुभेच्छा देणे, आरोग्य चिंतणे, त्याचे आशीर्वाद घेणे याला महत्त्व असले पाहिजे. अशा निमित्तांनी कौटुंबिक मेळावा, सामाजिक कृत्य, आढावा-आठवणींची चर्चा, दानधर्म होणे सयुक्तिक आहे. हल्ली ६० हे वय तसे शारीरिक, आर्थिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्तीचे असते. ६० वयाला नोकरीतून निवृत्ती होतेच, खाजगी व्यावसायिकांनीही ती घ्यायला  हरकत नाही. पण त्यापुढची १५-२० वर्षे कार्यक्षमतेने वानप्रस्थी दिनक्रम आचरिला पाहिजे. हा कालावधी सामाजिक जबाबदारीचा मानला पाहिजे. संस्था, देवस्थान, शिक्षणसंकुल, संघटन इत्यादींना मनुष्यबळ हवेच असते, ते या वयोगटाने उत्स्फूर्त दिले पाहिजे. वाटल्यास त्यासाठी अल्प मोबदला घ्यावा, निदान पदरमोड करू नये. परंतु साठीशान्त करून माणसाने म्हातारपण पत्करणे हे आजच्या काळात फारसे योग्य नाही. केवळ नोकरी थांबली म्हणून ज्येष्ठ नागरीक संघ, हास्य क्लब किंवा केवळ काश्मीर-सिंगापूर हे तर अकाली वृद्धत्त्वाचे कृतिहीन उपक्रम म्हणायला हवेत. हे `कार्य' करून उरलेल्या काळात त्याचे फोटो दाखवत राहणे हा तर कालापव्यय!!
अलीकडे सहस्रचंद्रदर्शन सोहळे पुष्कळांचे होतात. कालस्थितीनुसार आज ८० वयाचा माणूस वृद्ध मानता येईल. त्याच्या आयुष्याला तृप्ती-शांतीचा एक पैलू जोडण्यासाठी या सोहळयाला स्थान असावे. हा समारंभ ८०, ८१ की आणखी कोणत्या वयाला करतात याविषयी संभ्रम असतो. त्या दरम्यान सर्व कुटुंबियांच्या सोयीचा म्हणून कोणताही दिवस योजिणे हे `सवडशास्त्र' झाले. परंतु जन्मल्यापासून आयुष्यात सहस्रचंद्र नेमके होतात कधी हे पाहणे उद्बोधक ठरेल.
अमावास्येनंतर चंद्रदर्शन शुद्ध प्रतिपदेस होतेच असे नाही. म्हणून शुक्ल द्वितीया चंद्रदर्शनासाठी मोजली जाते. काहीजण पूर्णचंद्र म्हणजे पौर्णिमांची संख्या मोजावी म्हणतात. कसेही धरले तरी जन्मानंतरचे एक हजार चांद्रमास पूर्ण होणे गृहीत आहे. आपापली जन्मतारीख इंग्रजी क्रॅलेंडरप्रमाणे नोंदली जाते, ते रूढ आहे. मग त्या मोजणीतून ८० इंग्रजी वर्षांचे चांद्रमास किती, कसे ठरवायचे?
चंद्राच्या गतीनुसार एक महिना (सिनोडिक पीरियड) म्हणजे २९.५३०६ दिवस हे तर सर्वांना ठाऊक आहे. प्रतिपदेचा प्रारंभ ते अमावास्येचा शेवट असा हा कालावधी. कोणत्याही दोन तिथींमध्ये तितकेच अंतर असणार. म्हणजेच पौर्णिमा ते पौर्णिमा हे अंतर २९.५३०६ दिवस असणार; १ हजार पौर्णिमांसाठी २९,५३०.६ इतके दिवस लागतील. इंग्रजी वर्ष ३६५.२४२१९ इतक्या दिवसांचे असते. म्हणजे(२९,५३०.६ भागिले ३६५.२४२१९ केल्यास) ८१ वर्षास ५४ दिवस कमी, म्हणजेच इंग्रजी सालमोजणीप्रमाणे ८० वर्षे व ३११ दिवस (अगदी काटेकोर सांगायचे तर ८१ वर्षपूर्तीस ५४ दिवस २५ मिनिटे कमी) ही त्या व्यक्तीच्या जन्मतिथीप्रमाणे १ हजारावी चंद्रस्थिती असणार आहे. ती जन्मतिथी प्रतिपदा ते अमावास्या अशी कोणतीही असू शकेल, पण ती १ हजारावी चांद्रतिथी असणार. आता १ हजार पूर्णचंद्र (पौर्णिमा) हवेत तर ही जन्मतिथी वद्य पक्षात असल्यास पुढची पौर्णिमा येईल आणि शुद्ध पक्षात जन्मतिथी ठरत असेल तर त्या आधीची पौर्णिमा येईल. पूर्ण चंद्राचे रथारोहण (पौर्णिमा प्रारंभ) असेही त्यास म्हणतात. नेपाळ व भारतात ही प्रथा विशेष करून आहे.
या निमित्ताने गणेशपूजन, नवग्रहपूजा इत्यादी (ऐच्छिक) धार्मिक विधी करतात. साठी वा पंचाहत्तरीच्या पुढे ज्येष्ठ व्यक्तींच्या दृष्टीने काही सोहळे सांगितले जातात.
७७ वर्षे ७ महिने ७ दिवस - भीम रथारोहण
८८ वर्षे ८ महिने ८ दिवस - देव रथारोहण
९९ वर्षे ९ महिने ९ दिवस - दिव्य रथारोहण
१०० वर्षे - शताब्दिपूर्ती
१०५ वर्षे ८ महिने ८ दिवस - महादिव्य रथारोहण
वयाची ८० वर्षे म्हणजे (द१२) ९६० चंद्रमास होतात. त्या कालावधीत अधिकमासांची संख्या २९-३० असते (बेरीज ९८९-९९०) म्हणजे ८० इंग्रजी वर्षांनंतर आणखी १०-११ चंद्रमास झाले की सहस्रचंद्र (मास) दर्शन होते हा साधारण समज अचूक नाही.
८० वर्षे ओलांडून पुढे जाणारी व्यक्ती आजच्या काळात दीर्घायुषी समजता येईल. पूर्वीपासून शतकपूर्ती हा शुभयोग मानला जातो. तो साधण्यासाठी शुभेच्छादर्शक प्रार्थना केली जाते -
पश्येम शरद: शतम - आम्ही शंभर वर्षे पाहू  (दृष्टी इंद्रिय १०० वर्षे कार्यक्षम असेल)
जीवेम शरद: शतम - आम्ही शंभर वर्षे जगू (शरीर सुदृढ)
बुद्धेम शरद: शतम - आम्ही शंभर वर्षे शिकवू, उपदेश करू (बुद्धी शाबूत)
रोहेम शरद: शतम - आम्ही शंभर वर्षे वाढू  (विकसनक्षमता)
पूषेम शरद: शतम - आम्ही शंभर वर्षे समृद्ध होत जाऊ
भवेम शरद: शतम - शंभर वर्षे उत्कर्षात अस्तित्त्व
भूयेम शरद: शतम - आम्ही शंभर वर्षे प्रगती करू
भूयसि शरद: शतम - शंभर वर्षे परिपूर्ण (समृद्धीची तृप्ती) (अथर्ववेद : २१.६३)
या सर्व शुभेच्छांचा लाभ तुम्हाबरोबरच आम्हासही होवो, इतकीच (मनोमन) प्रार्थना!
(संकलित)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन