Skip to main content

Grahakanchya Apeksha

ग्राहकांच्या अपेक्षा

`पोस्ट खाते म्हणजे भोंगळ' असा एक (गैर)समज बाहेरच्या जगात आहे. पोमा, स्टेमा आणि शामा (पोस्टमास्तर, स्टेशनमास्तर, शाळामास्तर) हे म्हणजे गरीब बिचारे प्राणी असे पूर्वीपासून समजत. त्या काळी मुख्यत: या साऱ्यांचे पगार तुटपुंजे होते, जेमतेम प्रपंच ओढाताणीत चालावा इतकीच प्राप्ती. इतर `सुप्रसिद्ध' खात्यांप्रमाणे कुठे हात मारण्याची संधी या दोन-तीन खात्यांमध्ये नव्हती आणि तशी प्रवृत्तीही नव्हती. नियम कायदे कठोर होते. साहेब लोकांचा वचक होता. एकंदरीत कामच करण्याशिवाय इलाज नव्हता.
अलिकडे शाळांची स्थिती बदलली. शिक्षक गाडीतून फिरू लागले. रेल्वे आणि इतर शासकीय खाती कात टाकू लागली. पोस्ट खाते मात्र पूर्वीच्याच वातावरणात गुंग राहून थोडेस मागे पडले होते. `अॅरो प्रोजेक्ट'च्या मोहीमेने ते वातावरण बदलू लागले. दुसरीकडे सहावा, सातवा वेतनआयोग लागू झाला, पगार वाढले, पोस्टाला नवा रंग चढला, काचा-फेर्नचर आले, कॉम्प्यूटर आले! परंतु....!
`पोस्ट बदलले' असे अजून लोक म्हणत नाहीत. हे खाते असे आहे की त्याचा संबंध प्रत्येक नागरिकाशी येतो. लोकांचा पोस्टावर प्रचंड विश्वास आहे, पण `झटपट कामाला ही माणसे फारशी उपयोगी नाहीत' असे बाहेरच्या जगात बोलले जाते. पोस्टमास्तर किंवा पोस्टमन मनिऑर्डरचे पैसे मध्येच खाणार नाही याची खात्री लोकांना असते पण ती मनिऑर्डर कधी पोचेल याची खात्री त्यांना वाटत नाही. वास्तविक ईएमओ (इलेक्ट्नॅनिक मनिऑर्डर) ही नवी सुविधा एकाच दिवशी नियत व्यक्तीला पैसे पोचविते, त्यासाठी जादा शुल्क नाही पण लोकांपर्यंत ही माहिती गेलेली नाही.
पोस्टाच्या बहुतांशी योजनांबद्दल तसेच म्हणता येईल. विमा, स्पीडपोस्ट, पार्सल वगैरेसाठी ग्राहक आकर्षित होत नाही. कारण लोकांची पोस्टाविषयीची कल्पना `गरीब बिचारे, भोंगळ, न बदलणारे खाते' अशीच राहिली आहे. `पोस्टाची सेवा' असा शब्दप्रयोग वापरला जात असे. `पोस्टल सर्व्हिसेस' जाऊन आता `बिझनेस डेव्हलपमेंट' म्हणजे `व्यवसायवाढ' असा शब्द पोस्टात सर्वत्र ऐकू येऊ लागला आहे. पोस्टाची अवाढव्य यंत्रणा व्यवसायाभिमुख केली तर त्यातून खूप फायदा निर्माण होऊ शकेल त्याचबरोबर लोकांनाही उत्तम सेवा त्याच यंत्रणेतून देता येईल. याचा विचार प्रत्येक कर्मचाऱ्याने केला पाहिजे. आपली सेवा म्हणजे नफ्याचा व्यवसाय मानून करावी त्याचबरोबर आपला व्यवसाय लोकांची सेवा म्हणून केला पाहिजे. सेवा आणि व्यवसाय या दोन्हीचा मेळ घातला तरच पोस्ट खात्याला उज्ज्वल भवितव्य आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
व्यवसायाचे पहिले प्राधान्य ग्राहकांचा संतोष हे असले पाहिजे. ग्राहक पोस्टाविषयी नाराज असेल तर केवळ व्यवसाय वाढवून उपयोग नाही कारण या व्यवसायातून दीर्घकाळ फायदा होऊ शकत नाही. जसे एखाद्या धान्यात भेसळ केली तर दुकानदाराला तात्पुरता फायदा मिळतो पण ग्राहकाच्या प्रत्येक घासात खडा लागला तर दुकानदाराचा ग्राहक कायमचा दूर जातो. म्हणून व्यवसायात ग्राहकाच्या समाधानाचा निकष पहिला समजला पाहिजे. यासाठी नव्या व्यवसायनीतिचा अवलंब पोस्ट खात्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यालयाची व परिसराची स्वच्छता, वक्तशीरपणा, तत्परता, स्वत:चे व्यक्तिमत्त्व, ग्राहकाचे आदरातिथ्य या सर्व गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. पोस्टातील ग्राहक उभे राहण्याची जागा कर्मचाऱ्यांनी स्वत: उभे राहून पाहावी, किंवा आपल्या घरच्या एखाद्या सदस्याला दुसऱ्या पोस्टात पाठवून त्याचे समाधान झाले का हे संध्याकाळी घरी विचारावे म्हणजे पुष्कळ गोष्टींमध्ये काय त्रुटी आहे हे समजून येईल व तसा बदल आपल्या कार्यालयीन कामात करता येईल. यासाठी फार मोठा कोर्स कुठे करायला हवा असे नाही.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन