Skip to main content

17 Nov.2014

स्वत:ला शोधताना
निवृत्त झाल्यानंतर वर्षभरातच सचिनने  'झश्ररूळपस खीं चू थरू' हे आत्मचरित्र साजेशा दिमाखात, गाजावाजा करत `बाजारात' आणलं; सचिनच्या विक्रमांना साजेशी तडाखेबंद नोंदणीही झाली. हे पुस्तक आकडेवारीचे काही विक्रम नोंदवेल. अनेक सचिनप्रेमींनी पुस्तकासाठी प्रयत्न केले, पण बहुतेकांची निराशा झाली. तरीही `बाजारा'च्या नव्या तंत्रानुसार पुस्तकाची परीक्षणं मात्र पुढच्या दोन-तीन दिवसातच धडाधड यायला लागली. `हे पुस्तक, सचिन कसा घडला या बाबतीत ठार निराशा करतं,' `हे पुस्तक म्हणजे निव्वळ मॅचेसची वृत्तांकनं-आकडेवारी याची जंत्री आहे', `याला साहित्यिक मूल्य मुळीच नाही', `अनेक अप्रकाशित घटनांवर प्रकाश टाकणारे', `अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करणारे'.... अशी मते व्यक्त होऊ लागली. या सर्वाचा पुस्तकाच्या खपावर परिणाम होणार नाही, कारण सचिनविषयीचे प्रेम, कौतुक याबरोबरच त्याच्या उत्तुंग कारकीर्दीबद्दल आणि त्याच्या संयमी व्यक्तिमत्त्वाबद्दलचे कुतुहल.

क्रिकेटचे दर्दी वा जाणकार नसलेल्यांना विविध खेळाडू, प्रशिक्षक, संघनायक यांच्याविषयी विधानांबद्दल रस नसेल. ही सगळी मते त्याने त्या त्या वेळी व्यक्त न करण्याचा संयम बाळगला, व `हे मी आताही बोललो नसतो तर मी जपलेल्या प्रामाणिकतेशी प्रतारणा केल्यासारखे वाटले असते' हे त्याचे म्हणणे ठसते. स्वत:चे ठशषश्रशुशी सुधारावेत यासाठी त्याने घरात टेनिसच्या चेंडूने झेल पकडण्याचा सराव करणे, बसमध्ये क्रीडासाहित्याच्या पोतडी(किट)साठी स्वतंत्र तिकीट लागते म्हणून, जास्तीत जास्त `आयुधे' अंगावर वागवून त्या अगडबंब `किट'ला शरीराचा एक भाग होईल असे लपेटणे, आईच्या वरणभाताइतकंच प्रिय असलेले सॅलड बाऊलमध्ये जास्तीत जास्त भरून घेता यावे यासाठी खुबीने लेट्यूसची पाने बाऊलच्या कडेने लावून बाऊलची उंची वाढवणे... अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी वाचकांस सतत शीर्षकाच्या आशयाकडे नेतील. `त्याच्या' घडण्याच्या काळात त्याच्या अडचणींवर त्याने शोधलेले हे खास `त्याचे' मार्ग होते.

लहान वयात त्याने खूप टोकाची दडपणे पेलली, आणि दडपणांतही बहुतेक वेळी अप्रतिम खेळ केला. `२०११च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना सर्वात जास्त दडपण होते; ते घालवण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी मी शांतपणे `बडे अच्छे लगते है...' ऐकत होतो' असे तो सांगतो. इयान चॅपेलने २००७च्या अस्ट्न्ेिलॉया दौऱ्यावेळी `सचिनने एकदा आरशात स्वत:ला पाहून ठरवायला हवं की, त्याने अजून किती काळ खेळायचं..' असे म्हटले होते. बहुधा त्यावेळी सचिनने काही भाष्य केले नसणार. आज तो म्हणतो की, `मी त्याला फक्त माझ्या आरशाचा आकार (साईज) दाखवला' त्याच दौऱ्यात सचिन मालिकावीर ठरला होता! त्याचे कप्तानपद काढून घेतलेले त्याला कळवण्यातही आले नाही, मित्रांसोबत टीव्ही पाहताना त्याला ते कळले. वडिलांच्या मृत्यूनंतरही धीराने मैदानात परतून तो उत्तम खेळला. या सर्वातला सचिन बाजूला काढला, तर उरतात ती विजिगीषू योद्ध्याची, वा शिखरावर पोचलेल्या यशस्वी माणसाची स्वभावलक्षणे!

मग हा स्वत:चा मार्ग त्याच्या प्रत्येक कृतीतून उलगडायला लागेल. त्याने सांगितले की, अगदी सुरुवातीपासूनच त्याच्या बॅटची ताकद प्रतिस्पर्धी संघांना समजली, त्यामुळे त्याला बाद करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर असायचे. त्याच्या आवडत्या फटक्यांचा अभ्यास करून, त्याला तसा फटका मारायला मोहात पाडणे, व त्याचा `बळी' घेण्याची व्यूहरचना करणे; हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे `माझे आवडते फटके मारायचा मोह मला अनेकदा आवरावा लागला.' असे तो सांगतो. स्वत:ची उत्स्फूर्तता, सर्जकता स्वत:चा घातही करू शकते, त्यामुळे त्या मोहात न पडता प्रसंगी ती आवरावी लागते. स्वत:चा मार्ग बनवण्यासाठी कधी कधी स्वत:चे धुमारे छाटायला लागतात, हे समजून घेणे हा यशस्वीतेच्या वाटेवरचा एक अटळ टप्पा असतो.

नुसती सर्जकता, उत्स्फूर्तता, नैसर्गिक प्रतिभा या गोष्टी पुरेशा नाहीत. अनेकदा व्यावहारिक तडजोडी कराव्या लागतात. आपली कला, आपले लक्ष्य याची सांगड घालताना दमछाक होते, मनस्तापही होतो; पण कुठे-कशी-किती तडजोड करायची ते समजून आपल्याच क्षमतांचा लगाम आपल्या विवेकाच्या हाती देऊन समोर येणाऱ्या मोहांना वा अडथळयांना वेढे-वळसे घालायचे असे करत पुढे जात राहतो तोच यशस्वी ठरतो. मागून येणारे त्या वळणावळणाच्या वाटेकडे मोठ्या कौतुकाने पाहतात!

एक काळ असा होता की, `धोपट मार्गा सोडू नको...' हाच मंत्र समाजमान्य होता. आता परिस्थिती अशी आहे की, धोपट मार्गांची संख्या वाढली, सोपेपणाही वाढला. त्याच त्या मार्गांवर जाणाऱ्यांची झुंबडगर्दी प्रचंड आहे. त्या रस्त्यांच्या शेवटी असणारे सोनेरी मृगजळ दृष्टीपथात येत नाही. आपल्या क्षमता, परिस्थिती आणि कर्तव्ये ही तीन वर्तुळे जिथे छेदू शकतात असा स्वत:चा ध्येयबिंदू शोधावा लागतो. त्याच्यापर्यंत पोचण्याचे मार्गही स्वत:चे असावे लागतात. समस्येकडे पाहण्याचा आपला एक `कोन', एक पातळी आली की ती सोडवण्याचा मार्गही आपणच ठरवायचा. तयार गाईडमधील उत्तरे फार फार तर शाळेपर्यंत पुरतात. पुढल्या आयुष्यवाटा दाखवण्यासाठी `यशस्वीच व्हा...'च्या मालिकेतली, तयार उत्तरे देणारी पुस्तके आहेत; ती कधीच प्रत्यक्षात वापरता येत नाहीत.

या कलेतली `माहिर' किंवा नवे कल्पक मार्ग शोधणारी आद्य सर्जक व्यक्ती असते ती `आई'. चांगली आई आपल्या रडव्या मुलाला हसवण्याचे नाना मार्ग शोधते, त्याच्या पोटात सर्व पोषण जावे यासाठी पाककृती बनवते, त्याच्यासाठी त्याच्याच अगम्य भाषेत संवाद साधते, त्याच्या `सन्माना'ला न दुखावता कौशल्याने त्याच्याकडून हवे ते आणि योग्य ते करून घेते. अशा क्लृप्त्यांसाठी कुठल्याही पुस्तकावर अवलंबून न राहता, अपत्यप्रेमाच्या अंत:प्रेरणेला जागणारी असते. तिच्याच पोटच्या दोन मुलांसाठी तिला तेच ते `मार्ग' वापरता येत नाहीत. प्रत्येक आईचा प्रत्येक मुलाला हाताळण्याचा एक `स्व-मार्ग' असतो. बालसंगोपनाच्या छापील साच्यात न बसवता आई आपल्या मुलाला त्याच्या आवडीनिवडी, स्वभावाच्या मर्यादा, क्षमता हे लक्षात घेऊन कल्पकतेने वाढवू शकते; तिचे मूलही भविष्यात आपल्या वाटा शोधते.

आताच्या वातावरणात झटपट पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान देतील अशी आशा दाखवणाऱ्या चमकदार वाटा खुणावत असतात. साधीसुधी, वळणावळणाची, चढउताराची खडतर वाट निवडण्याचे धाडस फार कमीजण करतात. जे त्या वाटेवर चालायचे धाडस आणि चिकाटी दाखवतात ते अंती खूप काही मिळवतात. आपल्या भूमीने सांगितलेला `स्वधर्म' म्हणजे हाच असेल का? परिस्थितीने वाट्याला दिलेले कर्म, मग ते युद्धात स्वजनांविरुद्ध हत्यार उगारण्याचे का असेना, -पूर्ण क्षमतेने, निष्ठेने पार पाडणे! पण आपल्या भावनिक मनाला तो संहार पटत नाही. तो अपरिहार्य होता असे बुद्धीला पटले तरी `असं व्हायला नको होतं' हे वाटत राहते. आजच्या `अर्जुना'ला हे वाटणे टळलेले नाही.आपल्याला आपली वाट शोधावी लागणार, ती चालावी लागणार,-अगदी नकोशी वाटली तरीही!  ज्ञानेश्वर म्हणतात,
तरी स्वधर्माचेनि नावे । जे वाटिया आले स्वभावे ।
ते ते आचरे विधिगौरवे । श्रृंगारोनि ।।
आपल्या वाट्याला जो धर्म, जे कर्म येते, ते आचरणात आणावे लागणारच; ते आचरणे कसे? कसेबसे, उरका पाडल्यासारखे, वा ओझे वाहिल्यासारखे नाही, तर मनापासून, रीतसर, `श्रृंगारोनि'!
सचिनपासून सुरू झालेले जुप थरूचे चक्र नकळत माऊलींपाशी आले. सचिनची शास्त्रशुद्ध अन् चमकदार खेळी त्याच्या कथनातून अनुभवताना वाटते, `गड्या, तुझ्या पुस्तकाला हे शीर्षकही चालले असते!'

सिाहाय्यक संपादक-विनिता तेलंग (९८९०९२८४११)ेर्

शब्द देताना......
माझ्या पिल्लांच्या बाबास,

तिकडे दूर जाऊन बसला आहेस
आणि मी एकटी इकडे किल्ला लढवतीये बाजीप्रभूसारखा
ये बाबा आता. आज हिचं मला सहन नाही झालं.
(आता विचार, `काय झालं?')

मी सकाळी ऑफीसच्या गडबडीत
मनूला जगभराच्या गोष्टी त्याच वेळी सांगायच्या असतात
काहीतरी फुलपाखरं, फुगे, बाग असे शब्द कानावर येत होते.
तिला म्हटलं, आपण नंतर बोलूया का?
तर मला म्हणते, `नाही, फारच महत्त्वाचं आहे.
आता नाही सांगितलं तर आपल्याला कॉल घ्यावा लागेल.
(हा तुझा आयटी इफेक्ट) मग ती बोलत राहिली. मी हं हं करत राहिले.
मग म्हणाली, `प्रॉ मि स?' आणि मी हो म्हणाले.
हो म्हणाले आणि मग मी कान टवकारले. `प्रॉमिस' हा शब्द मी ऐकला होता का??

ऑफीसमधून यायला आज नेमका उशीर झाला.
त्या खडूसला साडेपाच वाजले की काहीतरी आठवतं,
खूप इंपॉर्टंट काहीतरी डिस्कस करायचं असतं.
(म्हणजे मी निघण्याच्या घाईत असताना, महत्त्वाचं सांगणारा नं.२)
बघ भरकटले ना?
घरी आले तर या बाईसाहेब तयारच होत्या बागेत जायला.
मग नेहमीचे संवाद ``मम्मा, तू प्रॉमिस केलं होतंस.''
``अगं हो, पण उद्या जाऊया.''
``पण मला आज जायचंय. फुलपाखराचा फुगा घ्यायचाय''
माझ्या अंगात अजिबात त्राण नव्हतं. मग तिला म्हटलं,
`आपण इथे बबल्स उडवूया?'
मग एक आठी कमी करत ती म्हणाली,
`ठीक आहे, मी करते आज अॅडजस्ट. पण उद्या प्रॉमिस?'
कसंबसं सावरलं सगळं.

पण रात्री पाठ टेकल्यावर माझं मन मला शिक्षा करू लागलं.
कसं गंडवलं पोरीला असं म्हणत ते नाचत तर नव्हतं.
कुठेतरी एक अपराधी बोच लागून राहिली होती.
वचन दिलं की ते पाळायचं, हा माझ्या बाबांचा नियम.
आणि तो त्यांनी कायम पाळला.
ते सांगायचे...
अश्वत्थाम्याच्या आईने त्याला दूध म्हणून पाण्यात पीठ कालवून दिलं पोराची अशी फसवणूक करताना
त्या आईच्या जिवाला काय यातना झाल्या असतील.
पण ही फसवणूक परिस्थितीमुळे करावी लागली होती.
आपल्या अक्षमतेमुळे किंवा कंटाळयामुळे कधी असे करू नये.
पाळता येणार नाही असा शब्दच देऊ नये कुणालाही......
त्यातूनही लहान मुलांना तर नाहीच नाही.
असं सगळं काहीतरी आठवत होतं.

वाटलं, आपण नोकरी करतो हे चूक आहे का?
माझ्या पिल्लाचं एवढंसं मागणं मी पूर्ण करू शकत नाही का?
तिला दुसरीकडे गुंतवून मी कुणाची समजूत काढत होते?
तिची का माझीच? - की काहीतरी केलं ना मी तुझ्यासाठी?
चहाची तल्लफ आली की चहाच लागतो तुला.
तेव्हा म्हणतोस, आता तू अमृत जरी दिलंस तरी चहाची सर त्याला नाही.
हवी असलेली गोष्ट हवी तेव्हा मिळणं
आणि हवी असलेली गोष्ट केव्हातरी मिळणं
ह्यामध्ये `हवी तेव्हा' हे फार महत्त्वाचं आहे.
आपल्या शब्दांची किंमत आपणच जपली पाहिजे ना!
पूर्वीच्या काळी `मी तुला वर देते' किंवा `मी तुला शाप देते' असं म्हणताच त्या माणसाने म्हटलेली गोष्ट खरी होत असे म्हणे.
कुठे गेली ती शब्दांची किमया? आपणच गमावलं ना??
आता म्हण, अगं किती विचार करशील छोट्याशा गोष्टीचा....
ते पिल्लू कधीच विसरून झोपलंही असेल. असो.

यापुढे अजून सजग राहिलं पाहिजे शब्द देताना...
मला, तुला, आपल्याला!
- तुझ्या पिल्लांची मनातून अपराधी आई

- दीपा मिट्टीमनी, टोरंटो 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन