Skip to main content

Lok kaya boltat in 25 June 2012


ग्रंथाचा प्रसार आवश्यक, 
ग्रंथपालाचा नको
आपल्या ४ जूनमधील अंकात ग्रंथालय पडताळणी याविषयी मजकूर आहे. ग्रंथालय ही गरज आहे याचा विसर पडला आहे. शाळा कितीतरी वाढल्या पण त्यांनाही ग्रंथालय हा विषय गौण वाटतो. ज्या गावात हायस्कूल आहे तेथे वास्तविक वेगळया ग्रंथालयाची गरज नाही. शाळांसाठी ग्रंथालय अनुदान काल-परवापर्यंत दिले जाई. वेगळे ग्रंथालय, त्याची व्यवस्था, कर्मचारी यासाठी पुन्हा पैसे वाटण्यापेक्षा माध्यमिक शाळांना त्या सुविधा द्याव्यात आणि नागरिकांसाठी तेथील पुस्तके ठराविक वेळेत उपलब्ध करून द्यावीत. एखाद्या छोट्या खेड्यात वेगळे वाचनालय असायला हरकत नाही, पण त्यासाठी सरकारने इतके पैसे खर्चू नयेत. किमान ज्या गावात हायस्कूल आहे, त्याच गावात सरकारी मदतीचे वाचनालय-ग्रंथालय आवश्यक आहे. आणि ती गरज शाळेमार्फत भागू शकते.
जिथे एकापेक्षा जास्त माध्यमिक शाळा असतील अशा गावांत मोठमोठे ग्रंथ, कोश, सीडी असे मूल्यवान साहित्य विभागून खरेदी करून उपलब्ध ठेवावे. अमूक ग्रंथ गावातील कोणत्या शाळेच्या ग्रंथालयात आहे ते सांगणारी सूची करता येईल. प्रत्येक शाळेत हल्ली संगणक आहेत. त्याचा वापर त्यासाठी व्हावा.
`करणाऱ्यांना' करता येण्याजोगे खूप आहे. `अनुदान अडवा, अनुदान जिरवा' या उद्देशाने `ग्रंथालय चळवळ' वाढल्यासारखी वाटेल पण ती फक्त फसवणूक होईल. ग्रंथपालास व कर्मचाऱ्यांस पगाराचे जे आकडे त्या लेखात दिले आहेत ते कमीच आहेत परंतु त्यांनी ग्रंथ-व्यवहार कोणते व कसे चालविले आहेत याची पडताळणी करायला हवी. जे लोक तळमळीने काम करतात त्यांनाच चांगला मोबदला दिला पाहिजे. वाचनसंस्कृती रुजविणे म्हणजे पैसे वाटणे नव्हे. शाळा वाढल्या, शिक्षकांचे पगार वाढले म्हणून `शिक्षण' वाढत नाही. ग्रंथालय व वाचनालय हे `वाचकांची समृद्धी' वाढविणारे हवे.
- एस. वाय. क्षीरसागर
सावेडी, अहमदनगर

संस्कार-शिबीरांची गरज
आपल्याकडे सामुदायिक जीवन पूर्णत: नाहीसे झाले आहे. पूर्वी हा विषयच शाळेत असायचा. त्याचे वार्षिक शिबीर व्हायचे. सहावी-सातवीची आम्ही मुले-मुली त्या शिबीरातील सर्व कामे करायचो. मुली स्वैपाक करायच्या. मुले श्रमदान, शाळा-सफाई करायची, पाणी भरायची. मुक्काम शाळेत असे. एकत्र राहण्याची, `मिळून राहण्याची' शिकवण असे. शिवाय दररोज दैनंदिनी (डायरी) लिहिणे सक्तीचे होते. ते शिक्षकांनी पाहायचे.
याच प्रकारे भारत सेवक समाज, एन.सी.सी., रा.स्व.संघ, राष्ट्न् सेवादल वगैरे ठिकाणी मुलांच्या वयात एकत्र राहण्याचा सराव-संस्कार दिला जात असे. तेथील राहणीमान, वर्तणूक व शिकवण सामान्य परिस्थितीची असे. त्यांमधून तयार झालेली मैत्री आजही टिकून आहे असा अनुभव पुष्कळांचा असेल. हल्ली `व्यक्तिमत्त्व विकास' किंवा `सुटीतील प्रशिक्षण' या प्रकारात भरपूर पैसा भरून अलिप्त अहंगंड वाढविणारे प्रयोग चालतात. अपवाद दोन्ही बाजूंस असतील, पण एकंदर चित्र बरे नाही.
`स्वत:बरोबरच इतर' अशी शिकवण देणारी शिबीरे बालपणी फार आवश्यक वाटतात.
- हरि श्रीधर कुलकर्णी,
`तृप्ती', गंगावेश, कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...