श्री रामायण : निवेदन
आदिकवी वाल्मिकींनी गायिलेल्या रामायणाच्या मूळ गीर्वाण काव्याचे इंग्रजी रूपांतर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले, त्याचा संक्षिप्त स्वैर अनुवाद प्रसिद्ध करण्याचे योजिले असून तो प्रकल्प खर्चिक आहे. सुमारे ३५० पृष्ठांचा हा ग्रंथ कमीत कमी किंमतीत देता यावा यासाठी आर्थिक साहाय्य अपेक्षित आहे. त्या मदतीवरच प्रतींची संख्या आणि छापील किंमत ठरविण्यात येईल. ग्रंथ ऑगस्ट सुमारास प्रकाशित होईल.
सर्व रामभक्तांना, तसेच साक्षेपी वाचकांना आवाहन आहे की, त्यांनी सढळ हस्ते या प्रकल्पास आर्थिक साहाय्य करावे. ग्रंथाचे प्रकाशन वा वितरण यासाठी कोणा व्यक्ती / संस्थेला स्वारस्य असेल तर कृपया लिहावे.
- विठ्ठल राजाराम जोगळेकर
मदतीचा चेक/रोख `वि.रा.जोगळेकर' या नावाने पाठवावा.
पत्ता : द्वारा - दिलीप जोगळेकर, `रामसीता',
पोस्टाजवळ, तासगाव (जि.सांगली) फोन : ९५० ३४११ ५२०
Comments
Post a Comment