Skip to main content

20 June 2016

'Aple Jag' ankatil sampadakiy, anya Majkur tumhala avdlyas etarana pathavava.
संपादकीय
सद्रत्नहार मणि ताइत बाहुदंडी कीं स्नान चंदनफुले आणि लांब शेंडी
यांनी खरी घडतसे पुरुषा न शोभा वाणीच भूषण सु-शिक्षित-शब्दगर्भा ।।-वामनपंडित (भर्तृहरीचे नीतीशतक)
अपात्रतेचे बोलणे
भारतीय रीझर्र्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे लवकरच पदावरून दूर होत आहेत. शासकीय नोकरी किंवा पद, त्याच्या विहित मुदतीनंतर संपवून खुर्ची खाली  करावी लागते. छोट्या-मोठ्या  संस्था व आस्थापनांमध्ये जेव्हा संचालक मंडळ बदलते, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील माणसे बदलली किंवा गरजेनुसार कमीही केली जातात. यात काही गैर मानायचे नसते. आपल्या धोरणानुसार चालणारे प्रशासन असावे, यासाठीच तर लोकशाही मार्गाने सत्ताबदल करायचा असतो. जुनीच धोरणे, जुनीच पद्धत, जुनेच अधिकारी असे ठेवायचे असेल तर आटापिटा करून सत्ताबदल करायचाच कशाला, हा सरळ साधा व्यवहार आहे. पण आपल्या माध्यमांची रीत अशी की, नव्या मुख्यमंत्र्याने आपला सचिव बदलला तरी ती मनमानी असल्याचा कांंगावा होतो; शिवाय तीे बाजूला गेलेेली व्यक्ती किती कर्तबगार होती, याचे पाढे वाचले जाऊन अशा कर्तबगारावर अन्यायच झाला, अशी हवा तयार करण्याचा प्रयत्न होतो. आधीच्या काळात पदावर असणारा  अधिकारी वाआीट होता, असे कुणीच म्हटलेले नसते, पण नव्या प्रमुखाच्या पसंतीला आणि त्याच्या कार्यपध्दतीला महत्व द्यायलाच हवे.
रघुराम राजन यांच्या धोरणांचे किंवा कर्तबगारीचे मूल्यांकन करण्याचे या संदर्भात कारण नाही, तो सामान्य जनांचा वकूबही नसतो. पण राजन यांच्यावर अन्याय झालेला असून, कोण्या सुब्रम्हण्यमच्या बाष्कळ आरोपांंवरून राजनना प्रधानमंत्र्यानी घालवून दिलेले आहे, असा काही समज करून देण्याचा अश्लाघ्य प्रयत्न होताना दिसतो, तसे काही मानण्याचे किंचितमात्र कारण नाही. अेवढ्या अुच्च पदाच्या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा, त्यासाठी देशाात जनमताचा कौल घेण्याची मागणी अजून कुणी केलेली नाही हे नशीब!
ज्याने अुठावे त्याने रिझर्व बँकेच्या गव्हर्नराबद्दल बोलावे, हे अजबच आहे. आजवर अनेकानेक गव्हर्नर होअून गेले, ते पद म्हणजे काहीतरी नव्हे. त्यांतल्या काहींनी आपल्या कामाचा जो काही ठसा अुमटविला असेल, तोही काही मोजक ा वर्ग सोडला तर फार कुणाच्या लक्षातही येण्याची शक्यता नाही. ज्या वेळी हे राजन पदावर आले, त्यावेळी मनमोहनसिंहांचे काँग्रेसी सरकार होेते. ते बदलून आता दोन वर्षे अुलटली तरीही राजनना बदलण्याची कधी चर्चाही झालेली नाही, कारण ते पद आणि ती संस्था स्वायत्त आहे, आणि असलीच पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेचे ते अेक वैशिष्ट्य आहे. त्या पदाची मुदत, - त्याच्या नियुक्तीच्या वेळीच  -तीन वर्षे ही ठरलेली असते. ती संपल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याने पायअुतार व्हावे हा साधा रिवाज आहे. त्यांच्या धोरणांस ज्यांची दिलखूश पसंती असेल त्यांना असे वाटू शकते की, त्या अधिकाऱ्यास मुदतवाढ मिळावी. तशी मुदतवाढ मिळालीच तर हेही स्पष्ट असते की, ती खास बाब म्हणून गणली जाण्याने त्या अधिकाऱ्यास, मुदतवाढ देणाऱ्यांविषयी अेक प्रकारे मिंधेपण अनुभवावे लागेल. राजन स्वभावत: तसे नसावेत, म्हणूनही त्यांनी पदत्याग केला असेल. तो वास्तविक त्यांना शोभादायक मानायला हवा. राष्ट्न्पती, सरन्यायाधीश, निवडणूक आयुुक्त, रिझर्व बँक गव्हर्नर, अशी काही पदे आितर कनिष्ठ नोकरशाहीपेक्षा फार वेगळी असतात. वरची यंत्रणा बदलली तरी तिथेही आपल्या पदासाठी संधान बांधून बसायला ते काही कारकून किंवा रापम चे संचालक पद नव्हे!  योग्य ते निर्णय, बदलत्या स्थितीतही राबवत राहणे आणि आपल्या मुदतीनंतर बाजूला होेणेे यात सन्मान असतो. राजन यांना तो सन्मान लाभला आहे. त्यांच्याबद्दल राज्यकर्त्यांना दूषणे देण्याचा वावदूकपणा योग्य नाही.
 हेही खरे आहे की सध्याचे राज्यकर्ते लेचेपेचे नाहीत. त्यांना असा कोणी अुच्चपदस्थ अडचणीचा ठरत असेल, किंवा त्या जागी नको असेल तर ते त्यांच्याकडे त्याच पदावर राहण्याची मनधरणी कशासाठी करतील? तो  त्यांच्या राजकीय धोरणांचा भाग आहे. त्याविषयी  अुगीच सुब्रम्हण्यम बडबड करणे हे जसे आततायी, तसेच कोणा सामान्य जनांंच्या प्रतिक्रियांना माध्यमांतून महत्व मिळणेही घातक आहे. राजन यांचे वडील बऱ्याच काही मोठ्या पदावर होते, त्यांनी या मुदतवाढीबद्दल काही राजनयी किंवा प्रशासनीय बाब सांगितली असती तर अेकवेळ ठीक मानता आले असते, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पंतप्रधानांनी राजन यांना याआधीच पांठिंबा देअून त्यांच्यावरील टीका रोखली असती तर राजन यांनी मुदतवाढ घेतली असती. हे अेकेकाळचा वरिष्ठ प्रशासकी अधिकारी बोलत नसून रघुरामांचा पिता बोलतो आहे, त्यामुळेच त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष करायला हवे होते. आितकेच नव्हे तर रघुरामांच्या आआीचे मतही वृत्तपत्रांत प्रसिध्द होत आहे, हा तर कहर झाला. `माझा रघू हुशार आहेे, तो लहानपणापासून खूप वाचन करतो...' या छापाचे मातृमत जर अुद्या खरोखरच गव्हर्नरच्या मुदतवाढीच्या निर्णयावर प्रभाव टाकू लागले तर कठीण! राजन यांचे, - किंवा कुणाचेही  -व्यक्ती म्हणून गुणवर्णन करताना ही सार्वमते मांंडायला हरकत नाही, पण त्यांचा गव्हर्नरपदाशी काही संबंध असू शकत नाही.
 रघुरामन राजन हे कर्तबगार होते की नाही हे सांगण्याचीसुध्दा आपली पात्रता नाही. पण ते तसे होते असे जरी कोणी मानत असेल तरी त्यांना  मुदतवाढ दिलीच पाहिजे असे होत नसते. त्यांनी केलेले कार्य मोठे असेल तर त्याचा प्रभाव टिकून राहीलच. त्यांच्या जाण्याने त्या जागेवर येणारे कोणी अलबते गलबते नसतात. जी नावे नव्या गव्हर्नर पदासाठी चर्चेत आहेत त्यांच्यातही तितक्याच तोलाची पात्रता असते. त्यांच्याही कर्तबगारीचा अुपयोग देशाला होणारच आहे. पण त्यांच्यापैकी कोणाचीही निवड करण्याने आितरांवर अन्याय होतो, असे मुळीच नाही.  स्वत:ला तज्ज्ञ मान्यवर मानणारा वर्ग कोणीही कसलाही निर्णय घेतला तरी तो चूकच कसा आहे, हे मांडण्यासाठी कण्हत कंुथत असतात. राजन राहिले असते तरी त्यांच्या दृष्टीने तेही चूकच ठरले असते!
या निमित्ताने लोकशाहीतील अुच्चारस्वातंत्र्य समजून घेण्यासारखे आहे. आपापले मत व्यक्त करता येते, ते करायला हरकत नाही. पण तेच मान्य झाले पाहिजे असे नाही. ते मान्य न झाले तर लगेच तो अन्याय अन्याय म्हणत राहण्याला लोकशाही मानता येत नाही. आपल्याकडे प्रातिनिधिक पध्दतीची लोकशाही घटनेने मान्य केलेली आहे, तो आपला स्थायीभाव असला पाहिजे. आपले प्रतिनिधी त्यांच्या उच्चसभेत चर्चा करून निर्णय घेतील, तो कोणाच्या गैरसोयीचा असला तरी अन्याय्य नसतो. राजन यांना पदावर ठेवणे न ठेवणे, हे त्यांची मुदत संपल्यानंतरही राज्यकर्त्यांनी ठरवायचे नाही काय? आिथे तर राजन स्वत: राजीनामा देअून दूर होत आहेत, त्यांना  सरकारने दूर केलेले नाही. खरे तर ही सर्व घटना संबंधितांच्या  सन्मान्य प्रतिष्ठेची आहे. तशीच ती घडत आहे. यात कुणाचे मत काहीही असले तरी तेे व्यक्त करताना तो सार्वत्रिक सन्मान सर्वानीच जपायला हवा.

बाल कलाकार हेही `कामगार' होतात का?
     सध्या अनेक मालिका व नाट्य-चित्रपटांतून छोटी मुले मुली काम करतात. ती अभिनय चांगलाच करतात. पण ज्या कारणांसाठी आितरत्र मुलांच्या कामाला बंदी आहे, तेच कारण आिथे लागू होत नाही काय? बाल अभिनेत्यांस दिव्यांच्या प्रखर अुजेडात काम करावे लागते, त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होअू शकतो. मेक अप च्या रसायनांचा त्यांच्या कोवळया त्वचेवर काही परिणाम होत असेल. त्यांची शाळा बुडते. फावल्या वेळेत अभ्यास करून परीक्षा देण्याचा ताण त्यांच्यावर येत असणारच. त्यांच्या कामाचा मोबदला त्यांच्या पालकांना मिळतो, म्हणजे ते बाल-कामगार होत नाहीत का?
    काही  बालकांना आआी वडिलांचा आसरा नसतेा, ते आजारी असतात, अपंग असतात, त्यांना झेपेल असा रोजगार त्यांना शोधावा लागतो. पण शासनाच्या धोरणानुसार त्यांना कामावर ठेवता येत नाही. शिकाअू म्हणूनसुध्दा मुलांना रोजगारावर ठेवता येत नाही. तसे केल्यास मालकावर कारवाआी होेते. त्यांना  गरज असूनही रोजगार करता येत नाही म्हणून ती मुले चोरी-पाकीटमारीकडे वळतात. बालकांचा विकास व्हावा, त्यांचे आरोग्य टिकावे यासाठी बाल कामगार विरोधी कायदा आला. मग पालकांच्या किंवा दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे व मताप्रमाणे वागणारी मुले कामगारच नव्हे, तर वेठबिगार म्हणता येणार नाहीत काय? बालकामगार कायद्याचा हेतू सफल होण्यासाठी काही तारतम्य दाखविले पाहिजे.
       दिलीप प्रभाकर गडकरी, ठाणे (पूर्व),फोन : ९९७० १९७ ६६६



आपुलाचि शोध आपणांसी   
     `सांगकाम्या' म्हणजे सांगितलेले काम आपण सांगू तस्से करणारा माणूस. हरकाम्या म्हणजे आपण सांंगू ते  कोणतेही किरकोळ काम करणारा माणूस; ... आणि आपल्याला हवे ते काम सांगितल्यावर ते कोणतेही कसलेही काम अगदी स्वस्तात, कमी वेळेत अुत्तम प्रकारे करणारा माणूस असेल तर ? - त्याला `अल्लादिनका चिराग' म्हटले पाहिजे !
     आता कुणाच्याही लक्षात येआील की, `अल्लादिन का चिराग' अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नसते. खरे तर सांगकामे किंवा हरकामे हेसुध्दा सहजासहजी मिळत नसतात, अगदीच अपवाद म्हणून कोणीतरी दाखवता येआील... मग अल्लादिनका चिराग कुठला  मिळायला! तो केवळ गोष्टीतच.पण गंमत अशी की, प्रत्येक व्यवसायिकाचे, किंवा  मालकाचे असे अेक स्वप्न असते की, आपल्या पदरी अल्लादिन का चिराग असावा. हे स्वप्न अव्यक्त असेल, किंवा कधीतरी व्यक्तही होत असेल... पण ते अगम्य आहे हे नक्की. अशा प्रकारच्या माणसासाठी आपण `हरहुन्नरी', `ऑल राअुंंडर', `हनुमान', `पु लं चा नारायण', `अुजवा हात', `मॅन फ्रायडे'... अशी अनेक नावे देतो.
     अल्लादिन का चिराग या वर्गातली माणसे अस्तित्वातच नसल्याने ती मिळण्याचे स्वप्न पूर्ण होतच नाही, मग मधला मार्ग निवडला जातो. आपल्याकडे असलेल्याच, त्यातल्या त्यात चुणचुणीत व आज्ञाधारक व्यक्तीला  अल्लादिन का चिराग बनविण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण मुळात जी व्यक्ती अस्तित्वात  असणारच नाही, ती कोणी निर्माण करणार कशी? सुरुवातीला जरा यश आल्यासारखे वाटते, पण पुढे फुस्स होते. या प्रयत्नांतून निराशा येते कारण मुळातच अपेक्षा चुकीच्या असतात.हाताशी धरलेल्या व्यक्तीकडे चुणचुणीतपणा असेल तर सुरुवातीच्या अपेक्षा पूर्ण होत जातात. तेवढ्याने मग आणखी जास्त काम, यापेक्षा कमी वेळेत, कमी खर्चात चांगल्या प्रकारे करता येआील... अशी भावना प्रबळ होअू लागते. त्याचा अंमल करण्याची घाआी सुरू होते. आणि मग कालपर्यंत चुणचुणीत वाटणारा माणूस  आजपासून रड्या ठरतो, किंवा तो बंडखोर वाटू लागतो.
      प्रत्येक भल्या माणसाला असा  अल्लादिन का चिराग आपल्याकडे असावा असे तरी का वाटते? अेक कारण असे असावे की, दुसऱ्या कुणाकडे तरी तशी व्यक्ती आहे, असा झालेला गैरसमज. दुसरे म्हणजे, चुकून माकून `झाली तयार अशी व्यक्ती माझ्याकडे,  तर काय बहार होआील?'...हा (अ)विचार. असे प्रयत्न सारखे करत राहण्यातून तोटेच जास्त होतात. चुणचुणीत व आज्ञाधारक व्यक्ती अकारण निस्तेज होतात, थिजून जातात, किंवा कालांतराने आपल्यालाच सोडून जातात. मग आपणही निराश होतो, चिडचिड करतो, आपल्याभोवतीचे वातावरण तणावग्रस्त होते.
      आता यावरती अुपाय काय?
     आपण सांंगू ते काम, सांगू त्या पद्धतीने,  कमी खर्चात, कमी वेळेत करणारी व्यक्ती या भूतलावर नाही हे अेकदाचे मान्य करून टाकावे. तशी व्यक्ती नसली तरी अेखादे काम कधीतरी त्यातल्या  त्यात कमी खर्चात करणारी व्यक्ती आपल्याकडे आहे, हे लक्षात घेअून त्यावर समाधान मानावे. आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द प्रत्यक्षात यावा असे वाटत असेल तर मुळात शब्द जपून व कमीत कमी अुच्चारावेत. कामे सांगताना, `दिसेल त्यास, त्यावेळी सुचेल ते' असे काम न देता कामाच्या प्रकारानुसार व्यक्तीची निवड करावी, त्या व्यक्तीवर सध्या असलेला कामाचा बोजा समजून घ्यावा. काम जमणार नसेल तर तसे स्पष्ट सांगणाऱ्या व्यक्तीपेक्षा, तोंडावर  `हो' म्हणून प्रत्यक्षात ते न करणारी व्यक्ती जास्त घातक असते हे लक्षात घ्यावे.
     सुज्ञ जनांस अधिक काय, (आणि कशाला) सांगावे !
-रणधीर पटवर्धन,सांगली  फोन- ९८२२५ २७१३२



राज्य परिवहन मंडळास खूप अुत्पन्न मिळेल
        अेस टी मंडळाच्या गाड्यांनी जनतेच्या मनांत आदराचे स्थान मिळवले आहे.नुकताच त्या मंडळाने सुवर्ण महोत्सव केला. अखंड प्रवासी सेवा देत असताना काळानुसार गाड्यांमध्ये बदल होत आहेत, पण गेल्या कित्येक वर्षांत प्रवाशंाच्या संख्येत म्हणावीशी वाढ होत नाही. त्याचप्रमाणे आनुषंगिक सेवांचे प्रमाण घटत आहे. वास्तविक अशा सेवांची बाजारातील मागणी खूप वाढत आहे, आणि तशा सोयी करून देणे महामंडळास शक्यही आहे. त्यामुुळे अुत्पन्नात मोठी वाढ  होआील.
     प्रवासी सेवेबरोबरच मालवाहतूक व टपालसेवा मोठ्या प्रमाणात करणे मंडळास शक्य आहे. पंतप्रधानांनी `डिजिटल आिंडिया'चा धोशा घेतला आहे. त्या अंतर्गत आय टी क्षेत्राचा वापर करून चांगल्या सेवा देता येतील. अुदा० जी पी आर अेस द्वारे मुंबआीतील लोकल गाडी कोणत्या स्थानकात आहे, हे कोणालाही अॅप मधून समजू शकते, त्याच धर्तीवर बसगाडी कोणत्या ठिकाणी आली आहे, हे प्रवाशांना कळू शकेल. त्याला अपेक्षित स्थानकात ती किती वाजता पोचेल याचा अंदाज तो बांधू शकतो. त्यामुळे प्रवासी वाढतील.
     याशिवाय कंडक्टरला दिलेल्या तिकिट यंत्रात टपाल व छोट्या पार्सलांच्या बुकिंगची सोय करता येआील. त्याचा जादा खर्च लोकांना पेलण्याजोगा असतो. आज चार पैसे जास्त गेले तरी विश्वासार्ह व जलद सेवा गरजेची आहे. जिल्ह्याच्याच काय, कोणत्याही छोट्या गावातून महत्वाचे  टपाल किंवा वस्तू कोणत्याही गावाला अेस टी बसने पाठविता येआील. हे टपाल घेण्यासाठी संबंधित व्यक्ती बसजवळ हजर राहील, त्यासाठी पैसे जादा लागले तरी लोकांना आजकाल ते परवडते. या कामासाठी कंडक्टरला भरपूर पैसे द्यावेत, म्हणजे तो टाळाटाळ किंवा भ्रष्टाचार करणार नाही.
     नव्या काळात लोकांना अनेक प्रकारच्या दळणवळण सेवा हव्या आहेत. अेस टी किंवा पोस्ट विभागाचे जाळे विचारात घेता ते कार्यक्षमपणे वापरायला हवे, अन्यथा लोक दुसरे पर्याय शेाधणार, व या यंत्रणा `खाजगीकरणा'चे कारण सांगत बसणार. खाजगी जीपगाड्यासुध्दा आजकाल त्या प्रकारच्या पार्सल सेवा करून त्यांचा महसूल वाढवितात. अेवढी यंत्रणा नव्या पध्दतीने राबविली पाहिजे, तरच `प्रवाशांच्या सेवेसाठी' असे रा प म ला म्हणता येआील. अशा अनेक नव्या कल्पना माझ्यासारखे हितचिंतक सांगू शकतील.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन