संपादकीय
उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करूं नको
बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्री नको ।-अनंत फंदी
भूक पोटाची अन् डोक्याची
गेल्या पंधरवड्यात साधारण अेकाच वेळी अेकाच राजकीय पक्षाच्या संदर्भात दोन बातम्या प्रसिध्द झाल्या. राष्ट्न्वादी काँग्रेस पक्षाने १६वर्षे ओलांडली त्या निमित्ताने श्री.शरदराव पवार यांचे मनोगत व्यक्त झाले आहे, आणि त्याचवेळी त्यांच्या पक्षाच्या सांगलीतील मेळाव्यात जेवणाच्या नियोजित वेळेअैवजी असह्य अुशीर झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांची झुंबड अुडून खुर्च्यांची फेकाफेक झाली, त्यात काही गंभीर जखमी झाले, अशीही बातमी आहे. श्री.पवार यांनी सोेळा वर्षांपूर्वी सोनिया गांधींशी फारकत घेअून वेगळी चूल मांडली, पण त्या चुलीवर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही पाकसिध्दी न होता केवळ धूर महाराष्ट्नत कोंदटून गेला हे तर सगळयांनाच कळून चुकले आहे. तरीही त्यांच्याअेवढी राजकीय स्थितीची जाण आणि लोकांची नस माहीत असलेला नेता महाराष्ट्नत तुरळकच असेल ही त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांच्या पक्षाचे नाव भ्रष्टाचाराच्या संदर्भात अुच्च स्थानी आहे हे त्यांनीही आडवळणाने मान्य केल्याचे वृत्तांतावरून भासते. असूद्या, त्यांच्या पक्षाचे काय करायचे तर ते पाहून घेतील, पण त्यांनी आितर पक्षांची, त्यांच्या शैलीत जी खिल्ली अुडवली त्याला फारसे वजन काभत नाही हे त्यांच्याच लोकांंनी त्याच दिवशी सांगलीत दाखवून दिले.
दुष्काळाबद्दल आपला साथी काँग्रेस पक्ष आणि सध्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोघेही गंभीर नाहीत, हे त्यांंनी वारंवार नमूद केलेे, तसे ते नेहमीच म्हणत आले आहेत. पण त्यांच्याच पक्षाच्या मेळाव्यात जेवणासाठी जी खुर्चीफेक झाली, त्यावरून त्या पक्षाने दुष्काळाचे फारच मनावर घेतले आहे, असे मानावे काय? आधीचे मुख्यमंत्री चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या केवळ केसांचा भांग बदलला म्हणून फरक पडत नाही, असेही श्री.पवार म्हणाल्याचे प्रसिध्द झाले आहे, मराठी शैलीची टवाळी म्हणून ते बोलणे दाद देण्याजोगेच आहे. पण परिस्थितीने शरदररावांच्या मस्तकी भांगासाठी काही ठेवलेलेच नाही, त्यामुळे त्यांना कोणत्याही वळणाचा भांग, त्यावरची टोपी अुडविण्यास योग्यच वाटणार !
मुख्य मुद्दा शरद पवारांचा पक्ष हा नसून, जेवणासाठी `आपले' संभावित लोक जी वखवख दाखवितात तो आहे. अेका मोठ्या नामांकित उद्योगसमूहाने आपल्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून शालीय शिक्षणविषयक उपक्रम केला. त्या निमित्ताने शानदार समारंभ झाला. शिक्षकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, अपेक्षा, सामर्थ्य हे सारे सांगून झाले. त्यानंतर आयोजित केलेेल्या भोजनात जे असभ्यतेचे प्रदर्शन झाले, त्याने त्या सगळया `मार्गदर्शना'वर खरकटे ओतले. वांग्याच्या भाजीचे मोट्ठे पातेले काही शिक्षकांनी अुचलून दूर आपल्या ताब्यात घेअून ठेवले. यजमान अुद्योगपतीने ते सर्र्व भीषण पाहिल्यावर काढता पाय घेअून आपल्या विश्रामगृहात जाअून दूधब्रेड खाणे पसंत केले.
कोणत्याही लग्नात यापेक्षा वेगळे काही घडत नाही. अक्षता पडताच आबालवृध्दांची -त्यात स्त्रियाही खांद्याला खांदा लावून धावण्याची जी दंगल घडते ते दुष्काळाचे गांभिर्य म्हणावे काय? अेके काळी भाषासमृध्द महाराष्ट्नत असल्या बुभुक्षितांस `काय, दुष्काळातून आलास का?' असा वाक्प्रचार अैकवत असत. स्वत:ला राष्ट्न्वादी म्हणविणाऱ्यांना दुष्काळाचे असले गांभिर्य अपेक्षित असल्यास न कळे!
वास्तविक मान्सूनचे भविष्य कुडमुड्या जोशी इतकेच बेभरवशाचे ठरत आहे. वातावरण सध्या चिंतेचे असले तरी, वैज्ञानिक भविष्यातल्या वर्षावाची चाहूल देत आहे. भारताची अर्थव्यवस्था जी काही सुधारायची ती मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. अुद्योगविश्वाने कितीही काही केले तरी भारतात शेती व शेतकरी हे घटक मोठ्या प्रमाणाचे असल्याने त्यांच्यासाठी करावा लागणारा खर्च अवाढव्य असतो; त्यामुळेच दुष्काळात आितर घटकांचे प्रयत्न देशाच्या दृष्टीने थिटेच पडतात. म्हणून येत्या शेती हंगामात प्रत्येक राजकीय पक्षाला कामांचे मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात जाअून खचत्या लोकांना अुभे करणे आवश्यक आहे. दुष्काळाविषयी गांभिर्य असणे म्हणजे नेमके काय हे शरदरावांसारख्यांंनी स्पष्ट सांगायला हवे. साखर कारखाने आणि त्यांच्या बँका यांना सांभाळून घेणे.. अेवढेच असेल तर त्या वृत्तीचे प्रदर्शन जागोजागी पाहायला मिळतेच आहे. राष्ट्न्वादी नावाचे कार्यकर्ते काय, शिक्षक काय, आणि लग्नातले प्रतिष्ठित पाहुणे काय... सगळी स्थिती अेकाच गांभिर्याने घेतात. त्यात शरदरावांचे चिंतन वेगळया काही समन्वयाचे असते तर ते त्यांच्या वयाला, अनुभवाला, अभ्यासाला, अेकूण जाणतेपणाला योग्य ठरले असते.
दुष्काळासारख्या समस्येचे सध्या तरी निराकरण झाल्यासारखे असले, तरी हा धोका निसर्गाआितकाच नैैसर्गिक असतो. दुष्काळ पडेल न पडेल, पण त्या बाबतीत कोण गंभीर आहे याचे राजकारण करण्याचे किंवा तो दोष किंवा श्रेय कोणाकडेही देण्याचे कारण नाही. लोकांना त्यातून बाहेर पडण्याचे, संकटांवर मात करण्याचे धडे द्यावे लागतील. जपानसारख्या देशात याहून भीषण संकटे कोसळतात, तिथे सरकारच्या गांंभिर्याचे वाद होत नाहीत. दुष्काळातून आल्यासारखी वखवख तेथील राष्ट्न्वादी व लग्नातले सुकाळी लोक दाखवत नाहीत. आपल्या लोकांना जनजागृतीची भूक आहे. सामाजिक सभ्यतेची त्रुटी आहे. संकटांवर मात करण्यासाठी अेकत्रित प्रयत्न करण्याअैवजी संकट ही संधी मानून परस्पर संघर्षाची शिकवण देण्याने, हात पसण्याचे, तुटून पडण्याचे, पळवापळवीचे घातक व्यसन लागते आहे.
अेका पराक्रमी राजाचे युध्द परक्या सैन्याशी सुरू होते. तुंबळ लढाआी चालू असताना या राजाच्या हातून त्याची तलवार निसटली आणि त्या गर्दीत हरवली. पराजय होण्याची लक्षणे होती, त्यावेळी राजाने देवाची करुणा भाकली. देव त्याच्या पुढ्यात आला, आणि हवे ते माग म्हणाला. आपली गळबटलेली तलवार राजाने मागितली. देवाने ती मिळवून दिली. राजा शत्रूला भिडला, आणि त्याने विजय खेचून आणला. नंतर राणीने त्याला विचारले की, तुमच्यापुढे साक्षात परमेश्वर अुभा असताना तुम्ही त्या शत्रूसैन्यालाच मारून टाकण्याची मागणी का केली नाही? राजाचे अुत्तर असे होते की, त्या शत्रुसंकटाचे निराकरण परमेश्वराने त्या वेळेपुरते केलेही असते, पण संकट पुन्हा येआीलच की! हातीची तलवार कायम असायला हवी.
ज्यांनी नेतेपद मिरवायचे, त्यांनी जनतेला हे शिकवणे आवश्यक असते. दुष्काळात साखर कारखान्यांना अनुदाने देण्यातून जेवणसैनिक निपजतील. शिक्षकांंनी, लगीनभाअूंनी.... शहाण्यासुरत्या सगळयांनी संकटाला आपल्या प्रवृत्तींनी जिंकायचे असते, भुकेकंगाल मागण्यांतून अेकवेळची भूक कोणीतरी भागवेल, पण ती सवय ती प्रवृत्ती वाआीट. ती प्रवृत्ती वखवख भागविणार नाही. ते बिंबविण्याचे काम नेत्यांचे आहे, समाजशिक्षकांंचे आहे, जाणत्यांचे आहे.
दुराणी फोर्ट की हरी पर्वत
श्रीनगरमध्ये दल लेक वरून किंवा शंकराचार्य मंदिरावरून समोर पाहता एक किल्ला नजरेस पडतो. सामान्यत: स्थानिक काश्मिरी माणूस त्याचे नाव ``दुराणी फोर्ट'' म्हणून सांगतो. बाहेरून संुदर तटबंदी आणि सुरेख दिसणारा हा भाग; तिथे आता ``उठझऋ'' चा बंकर आहे आणि जाता येत नाही असे कळले.
मी मात्र ठरवूनच तिकडे निघालो. जाताना पर्वताच्या एका उतारावर ``मकदूम साहब'' दिसला, हा ोीिंर्शी म्हणजे ``सुलतान उल आफरीन'' म्हणजे `विद्येचा बादशाह', म्हणजेच मकदूम काश्मिरी यांचा. त्यांनी त्यांचे शिक्षण सुरुवातीला एका ोपशीींीू मध्ये घेतल्याचे समजले पण त्याबद्दल व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत, नंतरचे शिक्षण मदरसामध्ये झाले. या मकदूम साहेबांनी मुख्यत: शिया पंथियांना मार्गदर्शन केले व अनेक काश्मिरी मुस्लिमांना ``हनफी'' या पंथांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले, असे तिथल्या लोकांशी बोलतांना कळले. पर्वताच्या दुसऱ्या बाजूला एक गुरुद्वारा आणि अजून एक मोस्क आहे. एका वृद्ध गृहस्थाने जवळ बोलावले आणि थोडा खोल इतिहास सांगितला.
हा पर्वत मुळात `पार्वती' देवीमुळे निर्माण झाला. एक कहाणी असे सांगते की, जलोद्भव राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने एका पक्षाचे रूप धारण केले आणि एक छोटासा खडा या पाण्यामध्ये लपलेल्या राक्षसाच्या डोक्यावर टाकला आणि मग तो खडा त्या राक्षसाला पूर्ण वध होऊस्तोपर्यंत इतका वाढला की त्याचा पर्वत बनला. त्याचे नाव आहे हरी पर्वत. या डोंगरावर एक `शक्ती' देवीचे मंदिर आहे. अशीही एक कथा आहे कि, ``चांद'' व `मुंद'' हे दोन राक्षस होते आणि त्यांचा वध करायला पार्वती देवीला बोलावता, तिने ``हरी'' चे रूप घेतले आणि म्हणून या पर्वताचे नाव `हरी पर्वत' असे पडले. अकबराने या पर्वतावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली परंतु त्याच्या हयातीत हा किल्ला पूर्ण झाला नाही आणि मग दुराणी याने तो पूर्ण केला. किल्ला आता सर्व पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
काश्मिरमधल्या सध्याच्या एकूण घडामोडीचा विचार करता ही हरी पर्वताची गोष्ट खूप छोटी वाटू शकते, पण अशा लहान लहान गोष्टींच्या एकत्रीकरणातून मोठी मानसिकता घडत असते. समाज म्हणून एकत्र येताना अनुभवांची देवाण-घेवाण आणि अशा वारशामधून काहीतरी समान हाती घेऊन पुढे जायचे असते. आपण काश्मिर खोऱ्यामधल्या व्यक्तीशी बोलताना हरी पर्वताचा उल्लेख केला तर त्यााचा संदर्भ केवळ अकबराच्या काळापासून पुढे जोडला जातो. (अन्यथा तो सोयीस्करपणे तिथेच संपविला जातो)इतिहासाचा सोयीस्कर उपयोग करण्याचे हे चांगले उदाहरणच म्हणावे. अशा अगदी बारीक सारीक खाचाखोचा समजून घेत समाज त्याची मानसिकता आणि त्यातून तयार होणाऱ्या प्रतिक्रिया यांना समजून घेणे शक्य आहे.
विलंब शुल्काच्या नावाखाली...
सध्या वीज मंडळाकडून विजेची बिले येतात, त्यातला गोंधळ हा अेक स्वतंत्र विषय आहेच, पण ग्राहकांकडून जादा पैसे काढण्यासाठी विलंब शुल्काची युक्ती काढली असावी. वीज बिलांत कसले शुल्क कशासाठी लावले जाते हे तर लक्षातही येत नाही. मीटर रीडिंग घेण्यासाठी कोण माणूस कधी येतो, याचा ताळमेळ नाही. कधी अेक महिना तर कधी पंचवीस दिवसांचे रीडिंग घेतात. जे घर किंवा लघुअुद्योग कधी बंद असण्याचा प्रश्णच नसतो, तिथेही `कुलूप(लॉक)' असा शेरा मारून अंदाजे बिल येते. अेक अुदाहरण तर असे की, घर बांधून २० वर्षे झाली, आजवर मीटर रीडिंग घेतले जात आहे. पण अलीकडे त्यांचा माणूस नवीन आला, त्याची अुंची कमी म्हणून त्याला रीडिंंग घेता येत नाही त्यामुळे तो अंदाजे रीडिंग लिहितो. त्याने मालकाकडे स्टूल मागायला काय हरकत आहे? पण तो तर येण्याचे कष्टही घेत नाही.त्याबद्दल लेखी पत्र दिले, तर वीजकार्यालय ढिम्म!
रीडिंग घेतल्यावर बिल तरी वेळेत द्यावे, तेही नाही. बंद दाराच्या पायरीवर फेकून जातात. फाटकाला अडकवून जातात. ते किती दिवसांत द्यायचे हेे ठरलेले नाही. बिल भरण्याची शेवटची तारीख असते, त्याच तारखेला बिल आणून देतात, त्याबद्दल विचारू गेल्यास `आता त्यात आम्हाला काही करता येत नाही, सगळी काँप्यूटर सिस्टीम आहे' असे सांगतात. बिल वेळेत भरले नाही तर १०रु. विलंब शुल्क लागते. अेका ग्राहकाला १०रु. जादा म्हणावेत असे नाही पण यांच्या या पध्दतीने अेकेका विभागात लाखभर `विलंब गिऱ्हाआीक' सापडतात. बिल पोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाआी क ोण करणार? हे कर्मचारी कंत्राटी असतात, त्यांची जबाबदारी कुणाकडे द्यायची? घराला कुलूप(लॉक) असेल तर तारीख वेळ नोंदवून त्यावर शेजाऱ्याची सही घेण्याचे बंधन त्या लोकांवर घालावे.
वापरलेल्या विजेचे पैसे देण्याचा प्रश्णच नाही, पण हा अकारण भुर्दंड आणि बेफिेकरी कशासाठी?
---------------
वरील प्रकारे हल्ली अनधिकृत पैसे काढण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. कुुुरीयरवाल्याची पोरं टपाल देण्यासाठी येतात, तेव्हा `डिलीव्हरी चार्ज' म्हणून दहा-वीस रुपये मागून घेतात. गॅस सिलिंडर देणारा माणूस बिलापेक्षा जास्त पैसे मागून घेतो. हे लोक साधारणत: दुपारी घरी येतात, त्यावेळी महिला घरी असतात, त्यांना हे पैसे द्यायचेच असतात असे वाटते, त्या देतात. रिक्षावाले मीटरप्रमाणे पैसे न घेता वाटेल तसे घेतात ही तक्रार आता कायमच झाली. वृत्तपत्रवाले हल्ली दरमहाचे जादा वीस-तीस रुपये `वाटप खर्च' म्हणून घेतात. १०किलोच्या गहू पिठाची किंमत २६०रुपये, आणि त्याच मॉलमध्ये त्याच ब्रँडच्या ५किलो पॅकिंगची किंमत २१० रुपये हा खेळ केवळ तेच करू जाणे. दिल्लीत आम्ही अेका हॉटेलात काही खाणे केले. काअुंटरवर बिल विचारले तर म्हणाला `अेकसो चालीस.' अेवढे कसे काय म्हणून विचारले, तर म्हणाला, `ठीक है, सवासो रुपये दे दो, चलो!' ग्राहक तरी कुठे कुठे म्हणून पाहणार? अुचित व्यापार व्यवसाय (फेअर डील) ही आपल्याकडे केवळ कल्पनाच करायची काय? या प्रकारे फसवून लुटायचेच ठरविले तर त्यांच्यासाठी भारतीय ग्राहक हा अुत्तम `गिऱ्हाआीक' ठरतो.

Comments
Post a Comment