Skip to main content

13 Nov. 2017

नवी दिशा देणारे नगरनियोजन

विसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर आिमारतींच्या रचनेत खूप बदल झाले. मुख्यत: सिमेंट, पोलाद, व मोठ्या आकाराच्या काचेचा वापर वाढला. वेगळया आिमारत-साहित्याची निर्मिती झाली, व त्यातही बदल, सुधारणा होत चालले आहेत. त्यापूर्वी भिंतींच्या जाडीमुळे आिमारतींच्या अुंचीवर बंधन पडत असे. पोलाद व कांॅक्रीटच्या संयोगाने आिमारतींचे वजन भिंतींवर देण्याअैवजी ते -तुलनेने नाजूक भासणाऱ्या - कॉंक्रीटच्या खांबांवर दिले. भिंतींची वजन पेलण्याची क्षमता खांबांकडे सोपविण्याने आिमारती बांधण्याच्या तंत्रात खूप बदल आणि विकासही झाला.  संपूर्ण बहुमजली आिमारत जमिनीपासून अुंचीवर - खांबावर तोलून बांधलेली, आिमारतीखाली वाहने ठेवायला किंवा मुलांना खेळायला मोकळी जागा राखलेली, अशा आिमारती आपल्याला आता सर्वत्र दिसतात. जमिनीपासून अलग करून  अुंच अंतराळी आिमारत बांधण्याची ही कल्पना `ल कार्बूझिअे' या वास्तुकाराची आहे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून शहरीकरण वाढत चालले. शहराच्या आजूबाजूच्या लोकवसतीला अुपजीविकेचे साधन राहिले नाही. नोकऱ्या शहरांत अुपलब्ध होत्या, त्यामुळे शहरांंत स्थलांतर वाढत गेले. अशा लोकांसाठी राहण्याची सोय करणे भागच होते, तशी गरजच वाढत चालली. शहरीकरणाला वेग आला तशी ती गरज जास्तच वाढली. शहरालाही आपला चेहरा बदलणे भाग होते.
तोवर  कोणत्याही शहरांत लहानमोठे भूखंड आणि त्यांवर छोटे मोठे बंगले अशी रीत सामान्यत: होती. या प्रकारच्या शहर नियोजनामुळे अेकेका बंगल्यापुढे दुसरा अुभारत गेल्यास मर्यादित कुटुंबांची सोय होणार; आणि शहराचा विस्तार खूपच वाढणार. असे अस्ताव्यस्त शहर वाढत्या लोकसंख्येलाही  गैरसोयीचे  ठरणार. त्या शहरातील रस्ते, जलनि:सारण, पाणीपुरवठा अशा सोयी देण्यासाठी भुयारी किंवा जमिनींवरील व्यवस्थाही लांबच लांब होआील. त्या सर्वांसाठी खर्चही मोठा - काही वेळा अशक्य होणार! हेे सारे धोके   ल कार्बुझिअे या वास्तुकाराला दिसू लागले. यापावेतो अशा सरधोपट शहरांचे नियोजन `अुपवन नगर (गार्डन सिटी)' म्हणून सर्वमान्य होते. शहरांतील जमिनींचे चढते भाव आणि त्या मानाने लोकसंख्येची सीमित गृहबांधणी यांचे गणित अव्यवहार्य होअू लागले होते. शहरे बांधायची, वाढवायची, तर ती बहुमजली आिमारतींची बांधणे व्यवहार्य वाटू लागले. हा पर्याय -कुठल्याही नव्या गोष्टीप्रमाणेच, समाजाने नाखुशीनेच स्वीकारला. पण त्यावेळी तो मान्य करावा लागला आणि आज तर तो अपरिहार्यच झाला आहे.
अशा बहुमजली आिमारतींची रचना कशी असावी? लोकांना वापरायला तर ती सुलभ झाली पाहिजे. त्यावर मंथन सुरू झाले.  ल कार्बुझिअे  याने त्या आिमारतींचे निकष कसे असले पाहिजेत यावर सखोल चिंतन केले. `अुपवननगर (गार्डन सिटी)'  याअैवजी  `बहुमजली वन नगर (व्हर्टिकल गार्डन सिटी)' ही संकल्पना त्यानी मांडली. अशा नगरातील आिमारती २०-३० मजली असतील, त्या अेकमेकींपासून खूप अंतरावर असतील, प्रत्येक आिमारतीत हजारभर कुटुंबियांची सोय त्यांच्या गरजेनुसार असेल. अशा आिमारतीत नित्य गरजेच्या वस्तू विकणारी दुकाने, गच्चीवरती व्यायामशाळा, ग्रंथालय, बालवाडी अशा सुविधा असतील. अशा परिपूर्ण गरजा भागविणाऱ्या  ५-६  आिमारतींचे ते शहर असेल. १९२०च्या सुमारास नगरनियोजनकारांसही ही कल्पना स्वप्नाळू वाटली. त्यांतली काही तत्वे आपली शहरे आता मान्य करीत आहेत कारण त्याशिवाय पर्यायच नाही. आिमारतीखाली मोकळी जागा ठेवण्याचा आणखी अेक फायदा म्हणजे शहरात वाहणाऱ्या वाऱ्याला नैसर्गिक अनिर्बंध हालचाल करता येआील. त्यामुळे आपणा अुष्ण कटिबंधातील लोकांना आवडती मोकळी हवा सहजी अुपलब्ध व्हावी.
मात्र अशा आिमारतींतील रहिवाशंाना निसर्गाचा सहवास मिळणे अंमळ कठीणच होणार, म्हणून अशा महाकाय आिमारती अेकमेकींपासून खूप अंतराने बांधून त्या मोकळया जागेत अुपवने निर्माण करावीत. खाली अुतरले की, खऱ्या निसर्गात येता यावे. शिवाय प्रत्येक रहिवाशाला गच्चीतील छोटी बाग करता यावी. दुरून ही आिमारत वनश्रीने नटलेली दिसेल. अशा बऱ्याच कल्पनांचा वापर फ्रान्समधील  मार्से  शहरातील अेका आिमारतीत त्यांनी केला. त्यामुळे त्याचे प्रात्यक्षिकच मिळाले. त्यापैकी काही कल्पना माँटि्न्यल येथे भरलेल्या जागतिक प्रदर्शनात वापरल्या गेल्या. पूर्ण आिमारत पूर्वरचित (प्री कास्ट) तंत्राने बांधून अशाही बहुमजली आिमारती अुभारता येतील ही नवी दिशा मिळाली.अशा कल्पनांचे जनक असलेले  ल कार्बूझिअे यांनी भारतातील चंडीगढ शहराचे नियोजन  ५०च्या दशकात केले आहे.
अस्ट्न्ेिलॉयातील क्रॅनबेरा, दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलची राजधानी असलेले ब्रासिलिया, आणि आपले चंडीगढ  ही तीन शहरे नव्याने अुदयाला आलेल्या नगरनियोजनाच्या मानकांनुसार वसविली गेली; त्यांना आधुनिक वास्तुकलेची जोड मिळाल्यामुळे त्यांना वेगळे देखणे रूप मिळाले आहे. ही नगरे वास्तुकारांना व अभ्यासकांना दिशादर्शक ठरतात.
चंडीगडमधील रॉक गार्डन ही कै.नेकचंद यांची निर्मिती. ते स्थलशिल्पाचे (लँडस्केप डिझाआीन) अभूतपूर्व अुदाहरण आहे. काही हेक्टर्स जागेवर,जमिनीच्या वेगवेगळया पातळयांचा अुपयोग करून हे अुद्यान अुभारले आहे. स्वत: नेकचंद  हे चंडीगडची निर्मिती चालू असताना तिथले कचरा डेपो धुंडाळत असत. वॉशबेसीन्स, टाआील्स, तुटक्या पाआीप्स अशा विघटन   न  होणाऱ्या सिरॅीमक्सच्या वस्तू गेाळा करीत. त्यात ग्लास, बांगड्या असे काहीबाही असे. लोखंडांचे तुकडे सांगाडे असत. अशा भंगारातून त्यांनी मानवाकृती, प्राण्यांचा भास होणारे आकार निर्माण केले.त्यांतून अशा शिल्पसमूहाची मायावी नगरी तयार झाली, ते हे रॉक गार्डन. ते पाहणाऱ्याला मनाच्या तळापासून हलवून सोडते. - कारण अेका शहराच्या निर्मितीत किती वस्तू आपण तोडतो मोडतो फेकतो; - आणि त्या टाकाअूंतही सौंदर्य दडलेले असते, हे त्यांचा अुपयोग पाहिल्यावर लक्षात येते. शिल्पसमूह, कृत्रिम धबधबे, बोगदे, पायवाटा, डोंगर अुतार अशा अनेक घटकांनी मन रंगून जाते. तिथे जी कला साकारली आहे, संवेदनशील वृत्तीने पाहणाऱ्याला हे सारे विस्मयानेे अंतर्मुख करते. तिला रॉक गार्डन हे नाव मात्र साजेसं वाटत नाही.
चंडीगड शहराची ओळख म्हणून  ल कार्बूजिअे याने खुला पंजा(ओपन हँड) हे प्रतीक निवडले. हाताचा तळ वा -त्याची चार बोटे  व  अंगठा विलग केल्यास त्याचा आकार अुडणाऱ्या पक्षाचा भासतो. `ओपन टु गिव्ह अँड ओपन टु रिसीव्ह' हा संदेश त्यांना त्यातून द्यायचा आहे. त्याना असेही अभिप्रेत होतेे की, माणसाने कल्पनेच्या भराऱ्या पक्षासारख्या जरी घेतल्या तरी, त्या प्रत्यक्षात अुतरविण्यासाठी त्याला मानवाच्या हातांचा अुपयोग (श्रम)करणे अनिवार्य असते.
या प्रतीकाचे अेक (पोकळ धातूचे)भव्य शिल्प खुल्या रंगमंचात आहे. जमिनीच्या खाली चार मीटर पातळीवर चौरस आकाराचे हे खुले रंगमंच आहे, त्यास छत नाही. व्यासपीठाच्या अेका टोकाला पोलादी स्तंभ आहे, तो जमिनीच्या वर ६ मीटरपर्यंत आहे. त्याच्या माथ्यावर हे शिल्प आहे. त्याची रचना वातकुकुट यंत्राच्या तत्वावर असल्याने वाऱ्याच्या दिशेप्रमाणे ते फिरते. रंगमंच जमिनीच्या खाली असल्याने बाहेरच्या आवाजाची तीव्रता खूप कमी होत असते. व्याख्याने पथनाट्य या कार्यक्रमांना प्रेक्षागृहातील ते शिल्प आकाशाच्या पृष्ठभूमीवर त्या प्रतिकाची जाणीव करून देत असते.
चंडीगढ निर्माण झाल्यावर तेथील सोयीसुविधा लोकांना तीस वर्षे पटलेल्या नव्हत्या. कार्बूझिअे ने म्हटलेच होते की, हे शहर पन्नास वर्षे तरी काळाच्या पुढे आहे. वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत असेल अगर नियोजकांच्या होऱ्याप्रमाणे असेल, चंडीगड हे आता यशस्वी म्हणून नावाजले जाते. त्यामानाने त्याच्याच बरोबरीचे ब्रासीलिया तितके वाटत नाही.
-वैकुंठ सरदेसाई, पुणे०४
फोन-८५५४९९२०५९

गुन्हेगार कोण?

दिल्लीच्या कोण्या एका शाळेत प्रद्युम्न नावाच्या बालकाचा खून झाला, हा प्रकार भीषण होताच; पण त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना ज्या कथा नव्याने उजेडात येत आहेत त्या अधिक भीषण आहेत. कारण आधीच्या संगतीप्रमाणे अेका बालकाच्या अघोरी मृत्यूपुरता किंवा त्याच्या मातापित्यांसह अेका गोतावळयाचा तो करुण प्रश्न होता. त्या निमित्ताने शाळेचे व्यवस्थापन दाताला लागले म्हटल्यावर ते साऱ्यांनी यथासांग चावून चघळून घेतले. कितीही बंदोबस्त केला म्हणून शाळेच्या मुतारीच्या खिडकीतून येणाऱ्या खुन्याला मुख्याध्यापक रोखू शकणार नाहीत. पण ते मनावर  न  घेता, त्या उच्चभ्रू शाळेच्या मुतारीच्या भिंती व खिडक्या यांची  कशी दुरवस्था आहे त्याचाच  गर्गशा करत राहण्यात साऱ्यांना स्वारस्य असावे. मुतारीच्या पडक्या खिडक्या हा जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होत असेल तर आपल्या विचारांची दशा दयनीयच झाली म्हणावी लागेल. गुंड लोक मोटारीतून पळतात म्हणून तरण्या महिलेवर अतिप्रसंग घडण्याला मोटारी कारणीभूत आहेत... असला काहीतरी बादरायण संबंध जोडण्याने मूळ समस्या दूर राहते.

तपासातून पुढे आलेल्या  नव्या माहितीनुसार त्या बालकाचा खून त्याच्याच शाळेतल्या अेका पोराने केल्याचे दिसू लागले आहे. प्रद्युम्न जायचा तो गेलाच पण या गुन्हेगार पोराने आपल्या समाजाच्या भविष्यावर प्रश्नचिन्हे उभी केली आहेत, त्यांचा परामर्श घेअून सुजाण लोकांनी त्यांची उत्तरे कशी कुठे शोधायची ते पाहायला हवे. ज्या पोराने त्याच्याच शाळेतल्या दुसऱ्याला क्षुल्लक कारणासाठी भोसकले तेही पोर तसे अजाणच की! त्याला खुनाच्या आरोपावरून फाशीसारखे कठोर शासन जरी दिले तरी त्यातून काय साधेल? त्या पोराला परीक्षेचे भय वाटले, ती परीक्षा पुढे ढकलली जावी यासाठी त्याने हा अघोरी प्रकार केला,असे म्हणतात. त्याला शिक्षा करायची; तर मग त्याला तसे करण्यास उद्युक्त करणारी जी परीक्षा पध्दत रूढ झाली आहे ती राबविणाऱ्यांचा सत्कार कोणत्या महावस्त्राने करायचा?

शाळेतले शिक्षण म्हणजे गुण(मार्क) देणारी,  परीक्षा नावाची एक महाअडचणीची  शर्यत  - हे जर पालकांत आणि विशेषत: लहान मुलांत भिनले असेल तर त्या परिस्थितीचा तो बळी ठरतो. परीक्षेत अुत्तीर्ण होअून चांगले मार्क  मिळाले की मग चांगली नोकरी, चांगला पैसा, आणि त्यांतून गाडी-बंगला-सत्ता  अशी सारी सुखे पायाशी लोळण घेतील अशी श्रीमंती, - हे यशाचे टप्पे ठरल्यानंतर ते गाठण्याची चढाओढ पालकांत सुरू होते, आणि ती मुलांत झिरपते. अेक वेळ तेही ठीक म्हणावे, पण त्याहीपेक्षा वेगळे म्हणजे दुसऱ्याचा घात करून आपल्या समाधानाचा मार्ग प्रशस्त करण्याची आिच्छा आणि क्लृप्ती मुलांत कुठून येते?

अेका शाळेत वेगळा प्रकार अैकिवात आला. मुलांना पाणी पिण्यासाठी शाळेच्या आवारात जी टाकी होती तिच्या सभोवती नळाच्या तोट्या लावलेल्या; त्या हौदावर चढून अेका मुलाने आितर मुलांच्या देखत, त्या पिण्याच्या पाण्यात लघवी केली. आता आपल्या प्रथेनुसार त्यातून प्रश्न कोणते सुरू झाले? -तर शाळेचा तो हौद झाकलेला का नव्हता? त्यावर मुलगा सहज चढला तर हौद अधिक उंच बांधायला हवा होता. असल्या प्रकारचे पाणी मुले पीत असतील तर त्यांना प्रतिबंधक लस दिली का? आता तरी हौदावर झाकण केलेे का? त्या हौदावर व्यवस्थापनाने नोटीस लिहिली का? ...त्याहीपेक्षा आजच्या काळातील विखारविचारास शोभेसा प्रश्न म्हणजे, तो प्रकार करणाऱ्या मुलाची जात कोणती होती? -मुळात तसे करणाऱ्या मुलांची ती दुष्ट मनोवृत्ती कशातून आली त्याचा शोध घेण्याची तसदी कुणी घेणार नाही कारण तसा शोध घेतला तर त्याचे निष्कर्ष आपल्यापर्यंत येअून पोचणार आहेत हे आपल्यास ठाअूक आहे. -आणि ते पाप स्वीकारून, सुधारणा वा बदल करणे आपल्यास नको आहे.

त्यापेक्षा `अजापुत्रो बलिर्दद्यात्' हा न्याय आपल्या सोयीचा ठरतो. प्रद्युम्न प्रकरणात तेही झाले. कोणा ड्नयव्हरला धरून त्याला पोलिसांनी छळले आणि त्याने स्वत:ला  बळी चढवायला मान्यता दिली - म्हणजे त्याला द्यावीच लागली, कारण त्याला कुणी विचारलेच नाही. आपल्या व्यवस्थेची ती रहाटी म्हणू अेक वेळ, पण साऱ्या सामान्य नागरिकांचे मन आितके निर्ढावणे हेच आपल्या शिक्षणविषयक कल्पनांचे मोठे अपयश सांगण्यास पुरेसे आहे.

असे म्हणतात की मुलांना शिकवावे लागत नाही; ती शिकतच असतात. भारतात मुलांच्या अडीच वर्षांपासून पर्सेटेज्ची भाषा त्यांच्या कानी पडते. त्यांच्या वाढदिवसाचे अतिरेकी कौतुकही सायन्स अँड मॅथ्समध्ये हरवून जाते, रिटर्न गिफ्ट काय मिळणार याचे पालकांनी केलेले हिशेब त्यांना कळू लागतात. आपल्याकडे तिसरी इयत्ता ९९.७ टक्क्यांनी पास झालेल्या पोराचे पालक परदेशी जातात तेव्हा त्या पोरांना तिकडे चौथीत घेत नाहीत असा अनुभव सांगितला जातो. त्याचे कारण असे सांगतात की, आपल्या बालकांचे मार्क्स तिथे खिजगणतीत नसतात. तिथे बालकांना सायन्स मॅथ्स शिकवत नाहीत; तर कचरा न करणे, वाहतुकीचे नियम पाळणे हे शिकवतात. मूल जन्माला येण्याआधी त्याचे संगोपन कसे करायचे याचे प्रशिक्षण,  बाप होणाऱ्याला घ्यावे लागते. त्याच्या तितक्या रजेची सोय करावी लागते. आितकेही करून त्यांच्याकडे मुक्त गोळीबार करून बेछूट हत्याकांडही घडते. नागरिकत्व चांगुलपणाने सांभाळण्याइतकेच कुटुंबांतील दयनीय वातावरण परदेशांत आले आहे. आपण त्यांच्याच `विकास'मार्गावर चालायचे ठरविले आहे. मुले कुठून काय शिकणार? `मुले हल्ली ऐकत नाहीत' ही सार्वत्रिक तक्रार खरीच आहे; कारण मुले `ऐकत' असतात, तितकेच ती  `पाहात' असतात, जिज्ञासेने जाणून घेत असतात. अनुकरणही करत असतात. ज्या मुलांत सहज दुष्टावा दिसतो, क्रूरता दिसते, दुसऱ्यांना उपद्रव करून आपला क्षुल्लक फायदा करण्याची बुध्दी दिसते ती कुठून आली याचे अुत्तर देणे म्हणूनच कठीण बनते.

आजचे राजकारण असो की समाजकारण, धर्म असो की शिक्षण, उत्सव असो की निवडणूक, रुग्णालय असो की देऊळ आणि  राज्याभिषेक असो की अंत्ययात्रा; -सारे सामुदायिक  वातावरण कलुषित झाले आहे. समाज म्हणून जो एकजिनसीपणा अपेक्षित आहे, तो विफल विकल विस्कट होत चालला आहे. आत्मकेंद्री वृत्ती माणसाला नवी नाही, पण तिचे इतके विविध विमनस्क आविष्कार चालू आहेत की पुढच्या काळासाठी आपण काय मागे ठेवून जाणार आहोत याची सामुदायिक खंत वाटावी. जगराहाटी चालू असते, तशी आजही चाललीच आहे; ती थांबत नाही. इंग्लंड फ्रान्स देशांतील माणसे त्यांच्या अुद्योगीपणाने आणि मुत्सद्देगिरीने जगाला कवेत घेणारी ठरली होती, पण  त्यांतून आलेल्या दुष्ट मुजोरीने त्यांचाही काळ झाला. आपल्याकडेही अनेक अनुभवांची तशी गाठोडी आहेत. त्यांच्या गाठी सोडल्या तर मुलांना खूप काही शिकविता येआील. आपल्याला जे मिळाले ते अधिक विकसित करून पुढच्या पिढीकडे सोपविण्याने संस्कृती निर्माण होऊ शकेल. त्याअैवजी जे हाती मिळाले त्याची सार्वजनिक लक्तरेच करून आपल्याभोवती गुंडाळत राहिलो तर त्यात किती काळ लाज झाकली जाणार? कधीतरी आपला प्रद्युम्न बळी पडेल; कधीतरी तो कुणाला तरी प्रद्युम्न करेल!!

शाळेतील आणि समाजातील परिस्थिती बदलणे आपल्या सामान्य कुवतीला जमेल -न जमेल; पण समाजाची ती भीषण दाहकता आपल्या सुसंस्कृत वर्तनाच्या  लेपाने  कमी करणे जमण्यासारखे आहे. त्यासाठी रस्त्यावरची  आंदोलने आणि आरक्षणाच्या किंवा नामांतराच्या चळवळी कराव्या लागणार नाहीत; तर ती आंदोलने आपल्या हृदयात सुरू होऊन स्थित्यंतराच्या तळमळीने करावी लागतील. तसे काही प्रयत्न  याच जगात चालूही असतात, त्यात शक्यतेनुसार सहभागी व्हायला हवे. शिवाजी आपल्याला होता येणार नाही; शिवाजीचे  सैनिक होणेही सोपे नाही; - पण निदान अफजलखानाचे सैनिक आपण होणार नाही, एवढे तरी ठरवू शकतो! आजच्या घटनेतील त्या पापी मुलांचा दुष्टावा त्यांच्या आआीबापांनी शिकविला असणार असे म्हणवत नाही; पण मुलांनी तो कुठेतरी पाहिला असणारच! कुठे पाहिला असेल? आपल्याच वागण्यात तर नसेल ना?

मराठी आपण वापरायला हवी!

अलीकडे काही वृत्तपत्रांतून, काही सभासंमेलनांतून मराठी भाषेविषयी काळजी व्यक्त केली जाते. आपली भाषा टिकून राहणार की आक्रमणांच्या धोधाट्यांत नष्ट होअून जाणार याबद्दल अनेक मते व्यक्त होतात. काही व्यत्पन्न वाचकांनी त्यासंबंधी साधारण अेकाच वेळी जी मते लिहून पाठविली आहेत-

पुण्या-मुंबआीतील काही  वृत्तपत्रांंत छापून आले की, महाराष्ट्नच्या राजधानीत मराठी भाषा चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अेक वाचक `मराठी वाचवा' म्हणून असे सांगतो की, मराठी माणसांनीच मराठी भाषेचे जतन, संवर्धन, आणि वापर केला नाही तर मराठी भाषेची गत संस्कृतप्रमाणेच होआील.
त्या मताशी मी अंशत: सहमत आहे, तरीही मराठी भाषा संस्कृतच्या पंगतीला जाआील असे मला वाटत नाही. मराठी साहित्यातून मराठी भाषेचे जतन संवर्धन केले जात आहेच. मराठी संमेलने, वृत्तपत्रे, कविता, दूरदर्शनवरील मराठी वाहिन्या आित्यादी मराठी आविष्कार जोवर चालू आहे, तोवर त्या भाषेला मरण नाही. परंतु अेक खरे आहे की, मराठी बोलींचा वापर व्यवहारांतून कमी होत चालला आहे, ती चिंतेची बाब आहे. आजकाल महाराष्ट्नच्या मुंबआीसह साऱ्या लहान मोठ्या शहरांतून हिंदी-आिंग्रजी भाषा किंवा त्या भाषेतील खूप शब्द वापरले जातात.
मराठी बोलींच्या या घसरगुंडीला मुंबआीपासूनच सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यानंतर त्या अुद्योगनगरीवर परप्रांतियांचे लोंढे धडकू लागले. त्यांत हिंदी व गुजराती भाषकांचे प्रमाण सर्वाधिक होते. पण मुंबईत बहुसंख्य मराठी भाषक होते. त्यांच्या मातृभाषेची जागा हळूहळू आितर भाषा घेअू लागल्या आहेत हे तिथल्या विचारवंतांच्या लक्षात आले नाही. स्वत:ला मराठी भाषकांची कैवारी म्हणवून घेणारी शिवसेना त्यावेळी कुठे होती? त्यावेळचे राज्यकर्तेही मराठीच्या आजच्या दैन्यावस्थेला जबाबदार आहेत. त्या वेळेपासून मराठी लोकांनी कटाक्षाने मराठीचा वापर बोलण्यात ठेवला असता तर या भाषेचे अस्तित्व सन्मान्य राहिले असते.
अेव्हाना कित्येक मराठी माणसे मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक आित्यादी राज्यांतच नव्हे, तर परदेशांतही सुखाने राहतात; व त्यांनी तिथल्या भाषा आत्मसात केल्या आहेत.मंुबआीत परप्रांतियांची संख्या वाढत होती त्या काळात जर तिथल्या सर्व घटकांनी मराठीचा वापर केला असता तर नव्याने तिथे येणाऱ्या लोकांना मराठीच बोलणे भाग पडले असते.
मला आठवते की, माझी पत्नी पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयाच्या प्रारंभकाळात गृहव्यवस्थापन (हाअूस कीपिंग) विभागप्रमुख होती; तेव्हा अनेक कंपन्यांचे विक्रेते आपापल्या कंपन्यांचे अुत्पादन दाखवायला घेअून येत, आणि तिच्याशी हिंदी किंवा आिंग्रजीतून बोलू लागत. तेव्हा ती त्याला सांगायची, ` तुम्ही महाराष्ट्नत आलेला आहात, तर माझ्याशी मराठीतूनच बोला ना! अन्यथा तुमचे अुत्पादन मला कसे कळणार; ते मी कसे घेणार?' तेव्हा मग तो विक्रेता तोडके मोडके मराठी बोलू लागे. ती माहेरची बेळगावची होती, तिला कानडी यायचे.पुण्यात शिक्षण झालेेले होते, मराठी तर होतीच पण आिंग्रजीही सफाआीदार बोलायची. तरीही ती मराठी आग्रहानेच बोलायची.
आपण आितर भाषा शिकले पाहिजेच, ज्यांना मोठे करीयर करायचे त्यांनी आिंग्रजीही शिकले पाहिजे, पण आपल्या बांधवांशी संवाद साधण्याकरिता रोजच्या व्यवहारांत `आपल्या' भाषा वापरल्या पाहिजेत.
-श्रीकृष्ण माधव केळकर, कोथरुड  पुणे ०४     
 फोन ८४४ ६९० ५५१७

मराठी भाषा वाचविण्यासाठी कितीतरी लोक आपापल्या परीने प्रांजळ अुपाय सुचवीत असतात. भाषा संस्कृतीची वाहक असते, म्हणून ते लोक जोरजोराने ठराव पारित करतात.मराठीप्रमाणेच स्थिती भारतातील चौदाही भाषांची आहे, असे त्या त्या भाषेतले लोक म्हणत असतात. दुय्यम भाषा, अुपभाषा, पोटभाषा, बोली या तर साऱ्या नामशेष होत आहेत असे सांगितले जाते.
तथापि अशा पोटतिडिकेने आपली व्यथा व्यक्त करणारी मंडळी यथास्थित आिंग्रजीचाच कासोटा धरून फिरत असतात. खेडेगावांतला अशिक्षित माणूसही कधीपासूनच आिंग्रजी शब्दांची फेकाफेक करीत असतो. त्याची सायकल पंक्चर होते, फॅक्टरीत कार्ड पंच करायला लेट होते, कार्नरच्या कोपऱ्याला टर्न मारून वळले की लेफ्ट मारायला तो सांगतो, आणि हे डायलाग कळायला त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. मोबाआील, क्यांपूटर, हे त्याच्या रोजच्या जीवनाचे भाग झाल्यामुळे ही भाषेची घुसळण अधिक जोराने, आणि हौसेमौजेने चालली आहे.
वास्तविक तो चिंतेचा किंवा अूर बडविण्याचा विषय का व्हावा?  प्रत्येक भाषेवर दुसऱ्या भाषेचे आक्रमण सतत होतच असते. तसे ते आजही होते, होणार आहे. ते अटळ आहे. दारे खिडक्या लावून घेतली तरी छपरांतून, धुराड्यातून, फटीतून हवा आतबाहेर होत असते. मराठी भाषा जन्माला आल्यापासून प्रत्येक पाचपन्नास वर्षांच्या टप्प्यावर तिच्यात आितर भाषांतली कुमक वाढते आहे; तसेच कित्येक शब्द बेडकाची शेपटे गळावीत तसे गळून पडतात. परक्या शब्दांना रोखून चालत नाही. त्यांच्यासाठी कृत्रिम शब्द तयार करून चालत नाही, त्याने समाधान होत नाही. त्या कृत्रिम शब्दांनी बोलणारा आणि अैकणाराही सैरभैर होतो.
सगळयांचा रोख आिंग्रजी भाषेवर असतो, पण ती आिंग्रजी भाषाही तशा आक्रमणापासून आणि घुसळणीपासून मुक्त नाही. आपल्याकडे धेडगुजरी असते तशी  धेडजपानी, धेडकोरीयन, पॅनअरबी असे शब्द आिंग्रजीत यथेच्छ नाचत आहेत. तेही मोडतोड करून भारतीय भाषांच्या आखाड्यात अुतरतात आणि धिंगाणा घालतात. गाड्यांची, यंत्रांची, कंपन्यांची नावे, चालू परिभाषेतील शब्द; त्यातला अेकही शब्द आमच्या डिक्सनरीत सापडत नाही. पण या नव्या भाषेमुळे मूळ भाषेचे सौंदर्य  सामर्थ्य कमी होआील अशी कैफियत मांडता येत नाही. आजच्या डिजिटल सायबर परिभाषेतही कवितांचे अफलातून तर्जुमे पेश होत असतात. फेसबुक व्हॉट्सअॅप यांसारख्या कलमबहादुर माध्यमांतून काही काव्यांचा मध ठिबकत असतोच. ग्लोबलायझेशन, काँप्यूटर, मोबाआील यांच्यामुळे तशी पारिभाषिक आक्रमणे वेगाने, आणि आक्रमक होणे स्वाभाविक आहे. ती वरचेवर होत राहणार आहेत. ती घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना मंजूर असल्यावर मधल्या अुपाध्यांनी अुगीच तक्रार करीत राहण्याला काय अर्थ?
यापुढच्या काळात भाषाभिमान धर्माभिमान राष्ट्नभिमान अशा भिंती ढिसाळ होत जाणार आहेत. तरीही शाश्वत मूल्ये कधीच बदलणार नाहीत, ती बदलण्याची शक्यताही नाही. कारण ती मानवी जीवनाची प्राणतत्व आहेत. जीवनाला चिरंतन समाधान, शांती ती देअू शकतात. माणसाच्या मनाची तीही अेक भूक असते.
-म.वि.कोल्हटकर, सातारा   फोन :(०२१६२)२३२५०४

अ मराठी वाहिन्या 
ऑक्टोबरच्या अंकामधील `उच्छाद  वाहिन्यांचा' भावले. `वृत्त वाहिन्या' गरजेच्या आहेत. तथापि या लेखातून वृत्त वाहिन्यांचे महत्व व उपयोग स्पष्ट होण्याऐवजी त्या माध्यमातून होणारा त्रासच अधोरेखित होतो. वृत्त निवेदकांचे मराठी अनुभव व ज्ञान सामान्य दर्जाचे आहे. हे फार जाणवते. मराठी वाक्यरचना कर्ता-कर्म-क्रियापद अशी असण्याऐवजी त्यावर हिंदी व इंग्रजी भाषेचा प्रभाव दिसून येतो.
मराठी वाहिन्या नावापुरत्या `मराठी' असतील!

-नारायण खरे,पुणे-५१
फोन-(०२०) २४३५५९१४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन