Skip to main content

2 august 2016

ज्ञातीचे संघटन ज्ञातीअंतासाठी
कोणत्याही सामाजिक विषयाची चर्चा सुरू झाली की  ती आपल्या जाती-व्यवस्थेशी येते. त्या मुद्द्यावर ती पेटू लागते. आणि जो तो आपापल्या जातीची बाजू घेअून आितरांच्या जातीवर तुटून पडतो. शिक्षण, सांस्कृतक संबंध, व्यवसाय, आचार विचार अशा बाबतींत जातींचा विचार होतोच; पण राजकारण हे तर अशा विचारांच्या आधारानेच वाढत असते. जातीचा विचार करावा की नको, असा मुद्दाच नाही. जातीभेद पाळू नये हे तर निश्चितच आहे. तसा तो  न पाळणारे जे जातीसमूह किंवा कुटुंबे आहेत त्यांनाही आितरांकडून त्याच भेदांचे विदारक अनुभव येतात. पूर्वीच्या गावगाड्यात ब्राह्मण समाजाने काही व्रताचरण सांभाळूनही जातीभेद नाहीसा करण्याचे, न पाळण्याचेच धोरण ठेवलेे होते; तरीही त्याला गेल्या अर्धशतकात बरेच भोगावे आणि सोसावेही लागले आहे.

जातीअंतासाठी म्हणून जे कोणी प्रयत्न करत असतील, त्यांचे स्वागत केलेच पाहिजे, पण ते प्रयत्न निर्लेप मनाने न होता त्यातही पुष्कळदा जातीभेदातून अुद्भवणारा दंभ असतो हेे सहज ओळखू येते. आंतरजातीय विवाहांचा स्वीकार आजकाल ज्या समाजाने सर्वाधिक केलेला आहे,  त्याचाही गैरअर्थ काढून, त्यांना हल्ली आपल्या जातीत सोयरीक मिळत नाही  म्हणून ते आितर जातीत घुसूू लागलेत, त्यांच्यापासून सावध राहायला हवे; -अशा आशयाचा विखारी प्रचार होअू लागला आहे. म्हणजे ज्यांनी कमीत कमी भेद मानला, जेवढा होता तो नाहीसा होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला; आणि त्या दिशेने ज्यांनी सर्वप्रथम आचरण आरंभिले त्यांच्यावरही खऱ्या जात्यंधांचा बोल लागतो  हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत ज्या ज्ञातीसंघटना आपापल्या ज्ञातीबांधवांना अेकत्र करू पाहतात त्यांच्या कार्याचे परीक्षण त्याच परिस्थितीच्या संदर्भानेही करावे लागते.

जातीभेद नसावाच हे जेवढे खरे आहे, तितकेच  तसा भेद कोणत्याही समाजात असतोच हेही खरे आहे. जे कोणी आजकाल जातीभेदांंच्या विरोधात काम करत असल्याचा आव आणतात, तेही जातीभेद पाळतातच असा कोणालाही अनुभव येत असतो. हे जातीभेदांचे समर्थन कदापि नव्हे, तर ते वास्तव म्हणून मान्य करणे आहे. सामाजिक किंवा राजकीय विचारांच्यासुध्दा जाती होतात. कोणे अेकेकाळी जाती तयार होण्यासाठी फतवा काढलेला नव्हता, तर त्या जाती माणसांच्या आपोआप तयार होणाऱ्या स्तरांमुळे हळूहळू निर्माण होत गेलेल्या आहेत. आजही आर्थिक, व्यावसायिक, प्रादेशिक समजुतींतून तशा जाती तयार झाल्या आहेत. त्या दृढ होत चालल्या आहेत. मुंबआीत बिहारी किंवा भैये लोकांना प्रादेशिक भेदांचा सामना करावा लागतो, आणि अेका व्यवसायातील लोक दुसऱ्याशी भेद करूनच आंदोलने करीत असतात. सराफांची संघटना, सफाआी कामगारांची संघटना, वकीलांची किंवा डॉक्टरांची संघटना आितरांशी भांडतात, तेव्हा त्यांच्यात आपल्या व्यावसायिक जातीचाच विचार असतो. त्यावेळी त्यांचा जन्माशी संबंध नसतो, आितकेच म्हणता येते. पण तशा व्यवसायिक विचारांत जन्माधारित जातीचा विचारही होतोच, त्यास मान्यता का द्यायची? -अुदाहरणार्थ चर्मकार समाजाच्या मेळाव्यात, पादत्राणे तयार करणाऱ्या अभ्यंकराना बोलावले जाते काय? लक्ष्मणराव किर्लोस्कर लोखंडाच्या धंद्यात होते म्हणून ते जाहीरपणे स्वत:ला घिसाडी म्हणवून घेत असत;  पण म्हणून त्यांना कधी लोहार-घिसाड्यांच्या ज्ञातीमेळाव्यात बोलावले गेले नाही. अुलट त्यांनी जन्माधारित जात कधी मानली नाही तरी ब्राह्मणेतर आंदोलनाचा त्रास त्यांना झाला, हे त्यांच्याच चरित्रात आहे.

आजच्या काळात ज्ञातींच्या आधारावर अेकत्रीकरणाचे जे प्रयत्न जागोजागी चालू आहेत त्यांचा विचार या अनुषंगाने  केला जायला हवा. अशा काही अुपक्रमांंना जातीय म्हणून नाके मुरडण्याचा अेक पुरोगामीपणा पुष्कळजण दाखवतात, व अशा प्रयत्नांपासून दूर राहू पाहतात. कोणी तसा भेद खरोखरच पाळत नसेल तर त्याबद्दल आनंद आहे, पण तसे घडत नाही. व्यवहारात तो पाळला जातोच. आपण ज्या आडनावाचे असू त्याच आडनावाशी आपला बेटी-व्यवहार होत नाही कारण आपण तसा जन्मभेद मानतो. दुपारी जेवायला जायचे तर `आपल्या' पारंपरिक  रुचीसंस्काराशी जुळणारे  ठिकाण आपण शेाधतो. सर्वांनी नि:संकोच अेकत्र यावे, परस्परांच्या ओळखी व्हाव्यात याच अुद्देशाने जे कार्यक्रम, भोजन किंवा विधी आयोजित केले जातात, त्याही ठिकाणी माणसे समरस होअू पाहात नाहीत. तिथे आपापल्या `जाती'च्या गटातच ती रमतात, त्यांच्याशीच  गप्पा मारतात, तिथेच जेवायला बसतात. सहज शक्य असूनही आणि तोच अुद्देश असूनही माणसे आपापल्या जातीत रमतात, आितरांशी फटकून वागतात. हा मनुष्यस्वभाव आहे. तो नाहीसा करण्याचा प्रयत्न फारसा चालत नाही.

या अनुषंगाने ज्ञातीसंघटनांच्या कामांकडे पाहायला हवे. त्यांच्या अेकत्रीकरणांतून पुष्कळ काही चांगले साध्य होत आहे. परस्परांना मदत होत आहे, त्यांच्या प्रश्नांची तरी चर्चा होत आहे, त्यांवर मार्ग शेाधले जात आहेेत. अेखाद्या ज्ञातीतील वधूवरांचे प्रश्न चर्चेत आले की, स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या काही मंडळींस दलितांच्या शिक्षणाचा प्रश्न प्राधान्याचा भासू लागतो. ज्या तरुणाचे किंवा तरुणीचे  लग्न खोळंबले आहे, त्यास अुगीच जर तू बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न हाती घे म्हटले तर कसे चालेल? समग्र मानवजातीचाच विचार करायचा तर मग ऑफ्रीकेतील किंवा  अमेरिकेतील वर्णभेदांचाही प्रश्न हाती घ्यायला कुणी नको म्हटलेय?

ब्रिटनमध्ये झालेली ताजी घडामोड त्या संदर्भाने पाहण्यासारखी आहे. सकल पृथ्वीतलाचा नव्हे, तर केवळ युरोपच्या हिताचाच विचार करून युरोपीयन युनियन स्थापन झाली. परस्परांच्या नागरिकांना अुद्योगांना मुक्त प्रवेश देण्यापासून सर्वांसाठी अेकच  चलन असण्यापर्यंत निर्णय झाले, ते वास्तविक अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाकडून येणाऱ्या दबावाच्या विरोधासाठंी होते. पण त्याचा परिणाम ब्रिटनच्या हितसंबंधांवर होअू लागले, ते लक्षात येताच तो देश युनियनमधून बाहेर पडला  व त्याने आपली वेगळी चूल मांडली. त्याला आता ब्रिटिश राष्ट्न्वाद असे गोंडस नाव दिले तरी तो  आपल्या विचाराच्या संदर्भाने राष्ट्नधारित जातीभेदच आहे. भौगोलिक भेदांचा अंत करून समस्त युरोप अेक करायला निघालेले लोक आपल्या जन्माधारी हितसंबंधांशी तडजोड करायला तयार झाले नाहीत. त्याच हेतूने पूर्वी राष्ट्न्वादी मार्गारेट थॅचरबाआी युनियन करण्यास तयार नव्हत्या  म्हणून त्यांना सत्तेवरून जावे लागले; आता युनियनमधून बाहेर पडण्यासाठीच थेरेसा मे या त्याच पक्षाच्या बाआी सत्तेवर येत आहेत. तात्पर्य असे की हे भेद नाहीसे व्हावेत ही आदर्श कल्पना आहे, तसे ते नाहीसे झाले तर अुत्तमच; पण प्रत्यक्ष व्यवहारात आपले प्रश्न घेअूनच अुभे  राहावे लागते.

आपण समर्थ व्हावे यासाठी कोणत्याही आधारे अेकत्रीकरण गरजेचे असते. जे प्रश्न व्यवसायाशी संबंधित असतात ते कमी करण्यासाठी व्यावसायिक संघटना होते, जे प्रश्न भाषेच्या संबंधात असतात ते कमी करण्यासाठी भाषिक संघटना होते;  त्याचप्रमाणे जे प्रश्न आपल्या ज्ञातीशी संबंधित असतात ते कमी करण्यासाठी त्या त्या ज्ञातीची संघटना असावी लागते, तिचा जातीभेदाशी संबंध जोडणे योग्य नाही. किंबहुना ज्ञातीसंघटनेच्या प्रभावाने जातीभेदांच्या निर्मूलनाचे प्रयत्नही व्हायला हवेत.

ज्या ज्ञाती आज अेकत्वाचे काही प्रयत्न करीत आहेत, त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे. किंबहुना कोणत्याही ज्ञातीच्या अेकत्वाचा अेक अुद्देश ज्ञातीअंत करणे हाही असला पाहिजे. तो प्रत्यक्षात येण्याची शक्यता नसेल तोपर्यंत निदान परस्पर सामंजस्य तरी साधते का हे पाहावे लागेल, तेवढे साधले तरी पुष्कळ! हा विचार प्रसारत जाण्यासाठी ज्ञातींचे, त्याआधी कुटुंबांचे अेकत्रीकरण होणे आवश्यक बनते. अेकेक व्यक्ती, नंतर कुटुंब, नंतर घराणे, नंतर ज्ञाती व त्यापुढे अवघा पृथ्वीतल अेकरस व्हावा असे कोणालाही वाटते. पण त्याची सुरुवात त्याच चढतीने होण्यात फारशी चूक वाटत नाही. म्हणूनच ज्ञाती अथवा घराण्यांच्या अेकत्वाच्या चळवळींना काहीजण नाके मुरडत असले तरी ती काळाची गरज होअून बसली आहे.


ऐकावं ते नवल!
  काही महत्वाचं' किंवा `नवलाआी'  अशा काही तरी शीर्षकांनी बऱ्याच ठिकाणी काहीबाही छापून येत असतं. त्याचंं खरेखोटेपण कुठेे तपासावं? अेके काळी छापून येतं ते खरं मानायची रीत होती, आता तसं म्हणत नाहीत. वैज्ञानिक  म्हणून जे सांगतात तेही कोणी कधी सिध्द केलं ते कळत नाही. मग कोणी ग्रामजोशी जे सांगेल त्याला `मम' म्हणायचं!
     कानात तेल घालणं, बाळाची टाळू  भरणंं, काजळ घालणं  हे कालपर्यंत शास्त्र होतं. आता तेे करू नका म्हणतात. मग कुठंतरी  `अैकावं ते नवलच'  या सदरात कधीतरी छापून येआील, `आपले पूर्वज कानात तेल घालत असत...'! हे आठवण्याचं कारण नुकतंच वाचलं की, `कानात मळ असणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फार चांगलं, त्यामुळं अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया आणि कीटकांपासून आपला बचाव होतो.' कानातला मळ काढण्यासाठी आआीच्या मांंडीवर अेका कुशीवर पहुडल्याचं अनेकांना आठवत असेल. ती बिचारी कानकोरणं हलक्या हाती फिरवून लेकराचा कान पदरानं आतून पुसून घ्यायची. आता हे वाचल्यावर आपण कानात मळ घालायची पध्दत सुरू होआील काय?
     रविवारची सुटी जवळ येत जाआील तसा माणसाला जरा अुत्साह येतो हे खरे. पण सुटीचा दिवस संपत येआील तसा पुढच्या कामाच्या आठवड्याचा दबाव वाढतो, हे खरे आहे. त्याचा संबंध हृदयविकाराशी असेल? ... असतो म्हणे! ज्या दिवशी हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता ज्यास्त असते असा दिवस सोमवार म्हणतात. खरेखोटे देव  -किंवा ते वैज्ञानिक जाणे! आपण आपलं हे वाचल्यानंतर रविवारी संध्याकाळपासून  `तयारीत' बसावं की काय?
             
जाणता राजा
     जगात अलीकडे आनंदी समाधानी समाजाच्या दृष्टीने पाहणी करण्याची अेक टूम निघाली आहे. लोकांकडे पैसा, सुखसोयी, सगळं असलं तरी मनाचं समाधान असतं असं नाही. बुध्यांक, भावनांक मोजला जातो, तसा हल्ली सामाजिक समाधानाचा बिंदू कोणत्या पातळीवर आहे, त्याची तपासणी करता येते. त्या मोजणीत भूतान या छोट्या देशाचा क्रमांक फार वरचा म्हणजे पहिल्या रांगेतच आहे. कदाचित हिमालयाचे सान्निध्य, आणि निसर्गाच्या आपत्तींच्या अनुभवांतून जीवनाकडे पाहण्याचा अुच्च दृष्टीकोण यांचाही तो परिणाम असू शकेल. बाकीच्या जनतेचे  काही असूद्या, पण तिथल्या पदस्थ राजाचे वर्तन कसे असते, ते लक्षात घेण्याजोगे आहे.
     या भूतानाधिपतींचे नाव आहे, जिग्मे खेसर नमग्येल वांगचुक. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले आहे.  त्यांच्या `किडू' परंपरेनुसार गरीब विद्यार्थ्यांना, आपत्तीग्रस्तांना मदत हे त्यांचे कर्तव्य मानतात. राज्य नियंत्रणातून आिच्छुक शेतकऱ्यांना जमीन अुपलब्ध करून देण्यात ते तत्पर आहेत. मोंगर या  परिसरात कम्युनिटी स्कूल आहे,  तिथल्या मुख्य कार्यक्रमानंतर मेजवानी असते, त्याच्या स्वैपाकातही ते जातीने मदत करतात. टी शर्ट लुंगी लावून ते कांदे बटाटे सोलण्यापासून तिथे कामे करतात, तेव्हा ते कुणाला राजा म्हणून ओळखू येणार नाहीत. त्यांनी त्यांचा बहुतांश भूतान देश सायकलने किंवा पायी पालथा घातला आहे. भटकंतीवेळी ते सामान्य माणसांकडे मुक्काम टाकतात, त्यांच्यात जेवतात.  त्यांना फुटबॉल आवडतो, ते तरुणपणी गोलकीपर होतेही; पण त्यांच्याविरुध्द गोल करणे त्यांच्या खेळाडूंना रुचत नाही असे पाहून त्यांनी तो खेळ सोडला. आता ते बास्केटबॉल खेळतात. यंदा राजांना मुलगा झाला, त्यानिमित्त नागरिकांसह अेक लाखावर झाडे लावली. ६०टक्के भूभाग वनांचा असावा असे त्यांचे धोरण आहे.
     आपल्या वर्तनाने त्यांनी प्रजेसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.म्हणूनच त्यांचा देश जगात अधिक समाधानी वाटत असेल काय? आमच्याकडे स्वत:ला राजे मानणारे लोकशाहीतले  नेते  `जाणते' कधी होतील?


पंचमीचा झोपाळा
पहिल्या पावसाचा भर आता ओसरला, आणि श्रावणाची चाहूल लागली. आजच्या नागरी जीवनात श्रावण काय अन् भादवा काय फारसा पत्ता राहिलेला नाही. पाच पन्नास वर्षांपूर्वीचे दिवस ज्यांच्या डोळयापुढे येतील त्यांना श्रावणातले चैतन्य नाचत असलेले दिसेल. मला पंचमीचा झोपाळा आज स्पष्ट दिसतो आहे.
   
गावागावांत आणि गावांबाहेरच्या कुठल्याही झाडाला झोपाळयांचे दोर झुलायला लागायचे. आमच्या आिथे वाढत्या वस्तीत त्या मस्त मस्तीच्या झोपाळयांचे फार प्रस्थ होते. मोठमोठी झाडे कमी होती, जी होती त्यातलेे चार दोन वृक्ष तर आमच्याच मळयात होतेे. दारच्या भल्याअुंच कडूलिंबावर झोपाळा बांधायला तितक्याच अुंचीचे कौशल्य लागायचे. पण तेवढ्या अुंचीवर झोपाळयाची हौस भागायची नाही. म्हणून मग कैचीचे झोपाळे बांधायची चढाओढ आसपास सुरू होई.
   
अेव्हाना काही लाकूड-व्यापाऱ्यांच्या वखारींत जंगली वृक्षांचे सरळ सोट विक्रीसाठी येअू लागलेे होते. त्यातले दोन लांबलचक दणकेबाज सोट तात्पुरते निवडून आणत. ते जमिनीत  चांगले दोन हात खोल पुरण्यासाठी तितका खड्डा काढायचा. तो फार जास्त व्यासाचा काढायचा नाही, तर जेमतेम त्या सोटाचा बुडखा त्यात शिरेल अेवढाच. मग  त्याहून ज्यास्त कौशल्याचे काम म्हणजे, दोर खेचून तो सोट अुभा करून त्या खड्ड्यात सोडण्याचे असे. चारपाच बांबू अेका जागी बांधून त्याची सांगड त्या दोन खांबांना आडवी बांधत. त्या खांबांना दोन दोन तिरके आधार लावले जात. बांबूंच्या आडव्या कैचीला भक्कम दोराचा झोपाळा बांधत. त्या काळी पुष्कळ विहिरींंवर मोट असायची, मुठीत जेमतेम मावतील असे त्याचे दोेर  -त्यास `नाडा' म्हणत, ते असत. त्याचे हे झोपाळे बांधायचे. जमिनीपासून थोडे अुंच आडवे दांडके गुंफले की त्यावर दोघादोघांना अुभे राहता येआी. तसे अुभे राहणाऱ्यांंस पहिल्यांदी थोडा झोका देअून त्या  दांडक्याखालून निसटायचे, मग त्या दोघांनी दांडक्यावर झोपाळयाच्या गतीचे अवसान घेत अुठाबशा काढल्या की झोका अुंचअुंच चढू लागे.
 
काही पट्टीच्या बायका आितका अुंच झोका चढवायच्या की आख्खा दोर भुआीला समांतर व्हायचा. त्यातही अेखादं पोर त्या दांडक्यावर आपल्या पायाशी बसवायच्या, ते मग घाबरून किंचाळू लागायचं. असल्या झोपाळ-खेळाला हिंदोळा वगैरे ललित शब्द शेाभणारच नाहीत. सर्कशीतल्या ट्न्ॅपीजशी नाते सांगावे! माझी आआी आणि बहिणी त्या खेळात माहीर होत्या. माझ्या आआीने वयाच्या ६५व्या वर्षी तसा झोपाळा चढवलेला मला आजही स्पष्ट आठवतो.माझ्या मोठ्या बहिणीनं अेकदा कुंभार गल्लीतल्या तिच्या जोडीदारणी बरोबर झोपाळी बैठका मारण्याला सुरुवात केली. मी चार सहा वर्षांचा होतो. कसा काय की, त्यांच्या झोक्याच्या टप्प्यातच मी आिकडून त्या बाजूला चालत निघालो. बाकीच्या बघ्यांनी आरडाओरड केली, तोवरच त्या दोघींचा झोका माझ्यावर येअून आदळला. काय झालं असणार? कपाळमोक्ष, दुसरं काय!
   
हल्ली दहीहंडी गणपती यांचा जल्लोष फोफावला आहे. त्याच्या दणदणाटातही पंचमीच्या आठवांचे हिंदोळे लुप्त होत नाहीत. त्या काळातलं माझं लहानपण झोपाळयांच्या दांडक्यावर बसून झोके खातांना, आमचा झोका चढविणाऱ्या त्या प्रौढ बायांच्या नव्या लुगड्यांच्या दरवळात विरून गेलं आहे.
 
ही कैची झोपाळयांची सांगड पंचमीनंतर खाली उतरवून त्याचे साहित्य ज्याचे त्याला पोचविण्यात पुन्हा दिवस मोडायचा. झाडांना बांधलेले झोपाळे मात्र पुढे कित्येक महिने लोंबकळत राहात. अलीकडच्या चार-सहा वर्षांत आमच्या अंगणातल्या चिंचेला तसाच झोपाळा होता. आमच्या नातवाबरोबर पोरं त्यावर कोलांट्या-झोकांड्या खायची. ती सगळी आता शहरी शाळेत टायबूट घालून सेवन्थ-टेन्थला जातात. झोपाळा केवळ मनातच झुलत राहतो.
     

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन