Skip to main content

25July 2016

आपले जग अंकातील मजकूर तुम्हांस आवडेलच  तो इतरानांही पाठवावा.
जनतेवरचे अत्याचार थांबवा
नगर जिल्ह्याच्या अेका खेड्यातील मुलीवर अतिप्रसंग झाला, आणि तिला क्रूरपणे मारून टाकले. हे सगळे अघोरी, अमानवी घडले. त्या आरोपींना अशी शिक्षा व्हायला हवी की, त्यामुळे कोणतेही लहानमोठे गैरकृत्य कुणाकडूनही कधी घडूच नये. ती शिक्षा काय असावी हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. कोणतीही कठोर शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालय त्या प्रकरणाचा सांगोपांग विचार करेल. त्या साऱ्या व्यवस्था-प्रक्रियेवर प्रत्येकाचा  ठाम  विश्वास असलाच पाहिजे. ती प्रक्रिया पार पाडायची तरी व्यवस्थेची काही पथ्ये पाळावी लागतात. अुगीच कुणी तरी विखे पाटील किंवा राणे म्हणतात, किंवा कुणी मोर्चा काढून मागणी करतात म्हणून धरला आरोपी  -की चढव फासावर; असे होत नसते. त्याच दीर्घकालीन  -पण अटळ न्यायिक प्रक्रियेचा गैरफायदा हीच आक्रस्ताळी राजकारणी माणसे स्वत:साठी घेतही असतात; अन्यथा त्यांच्या भ्रष्टाचारांच्या आरोेपांवरून लोकांच्या न्यायाने कधीचीच जोडामारी झाली असती. कायदा सुव्यवस्था ठीक नांदते आहे, म्हणून ते अजूनी घडत नाही, हे त्यांनाही पटेल.

पोलिसी हडेलहप्पीबद्दल फार काही चांगले बोलावे असे अेरवीही नसते, पण कोपर्डीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तपशीलानुसार नगरच्या पोलीसांनी काही कसूर केल्याचे म्हणवत नाही. १३जुलैच्या  रात्री  ९-४४ ला तक्रार दाखल झाली,  १०-१५ला पोलीस घटनास्थळी गेले,  पंचनामा वगैरे करून १२-१५ वाजता पहिल्या आरोपीला अटक झाली. १-१०ला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या आरोपीला १६ तारखेस, आणि तिसऱ्याला १७ तारखेला अटक झाली. आता यापेक्षा कोणत्या वेगवान कार्यवाहीची अपेक्षा करायची? आणि ती अपेक्षा करणाऱ्यांच्या बाबत सामान्य लोकांचे अनुभव काय आहेेत? या पुढचा तपास करून खटला अुभारेल, जो निकाल  लागायचा तो लागेल. पण जर का फाशी सुनावली तर, `आजच्या काळात फाशीची अमानुष प्रथा बंद करा' ही मागणी निघेेल; त्यातही तीच माणसे असतील,  -जी आज त्या आरेापींना लगेच फाशी द्या, म्हणून आक्रोश करीत आहेत!  थोडक्यात असे की, राज्यात जे चालू आहे ते  सगळे  गैर वाआीट अघोरी क्रूर असे आहे, आणि त्यास कुठली तरी जात, कुठला तरी महाराज,... कुणीच गवसले नाही तर हे सरकार जबाबदार आहे; असे आकांत तांडव करण्यात पुष्कळांना  पुरुषार्थ वाटत आहेे.

विधिमंडळात चर्चा करण्यासाठी यापेक्षा फार मोठे आणि अवघड प्रश्न आहेत. पण त्यासाठी काही काम करावे लागते, अभ्यास लागतो. तो करत बसण्याअैवजी मारे मुत्सद्देगिरीच्या थाटात जी बाष्कळ बडबड चालू आहे, त्याचा अुबग लोकांना येत आहे. घटनेच्या गांभीर्यापेक्षा यांचे अमानुष बरळणे जास्त गंभीर वाटू लागले आहे. कुणास ठाअूक, अुद्या त्यातलाच कोणीतरी नेता  `ते आरोपी आपलेच कार्यकर्ते आहेत, त्यांना सोडा'  हेसुद्धा व्यवस्थेला सांगेल. या प्रकारची घटना कुणाचे काळीज चिरत जाते, तर  सभांमधून आकांत करत आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ती कुणाला अुपयुक्त वाटते. ती पोर जायची ती गेली. त्या गुंड पुंडांचे तसे धाडस होतेे कसे, याच्याशी खऱ्या व्यवस्थेचा आणि प्रजेला अ-भय देणाऱ्या कायद्याचा संबंध असतो. तो कायदा मोडण्यात ज्यांना फुशारकी वाटते, ज्यांना राजकारण वाटते,.. ते तर सरसकट कायदा मोडतच असतात. सिग्नलला गाडी न थांबवणे, किंवा बेकायदा बांधकामे करणे, किंवा जमिनी हडपणे कायदेशीरच वाटावे आितके अंगवळणी पडले आहे. आणि ज्यांना तो कायदा पाळण्याच्या आग्रहातून काही लाभ होतात, तेच त्याच्या पालनासाठी दुसऱ्याकडे आग्रह धरतात, त्यात पोलीस आहेत, शिक्षणाधिकारी आहेत, तलाठी आहेत. कायद्याचे पालन हे व्रत म्हणून आचरण करायचे असते,ते कुणाला मानवणार नाही. कायदा मोडणाऱ्यांचे पुढारी तर पुढारपण करीत असतात. पोलीस खाते निष्क्रीय आहे की सक्रीय आहे ते, राज्यावर कोण आहे त्यावरती हेच ठरविणार

ताजमहाल हॉटेलात अतिरेकी घुसले होते,  राज्याचे गृहमंत्री  तिथे केवळ  असे म्हणाले की, `अेवढ्या मोठ्या देशाच्या कारभारात अशा काही किरकोळ घटना होत असतात...' ते त्यांचे विधान चूक-बरोबर हा मुद्दा नाही, पण आज मुख्यमंत्र्यावर जे आरोप होत आहेत, ते अैकल्यावर क्षणभर कुणाला वाटेल की, मुख्यमंत्र्यांनीच तो गुन्हा केलाय की काय! त्या प्रकरणाचे गांभीर्य कमी नाही, पण त्यासाठी किती वेळ कोणी अुच्चपदस्थांनी द्यावा, यालाही काही मर्यादा आहेेत. `मुख्यमंत्र्याना रशियात जायला सवड मिळते, पण त्या खेड्यात जायला नाही...' हे तर अजब तर्कट आहे. आता आरोपीला फाशी देआीपर्यंत मुख्यमंत्री, विखेपाटील, अजितदादा, राणे यांनी कोर्टाबाहेरच्या झाडाखाली बसून राहावे अशी काही रीत असेल तर माहीत नाही. तसे केले तरच त्यांना गुन्ह्याचे गांभीर्य असल्याचे सिध्द होणार काय?

रस्ता ओलांडणारी कुणी म्हातारी पडली तर शाळकरी मुलांनी तिला मदत करण्यासाठी शाळेला जाण्यास थोडा अुशीर झाला तर चालेल, पण त्याच कारणासाठी जिल्हाधिकाऱ्याने मोटारीतून अुतरून म्हातारीला अुचलावे, असे नाही. ते काम जिल्हाधिकाऱ्याचे नव्हे. ते काम करण्यास त्या त्या अुचित घटकाने पुढे यावे, अशी परिस्थिती निर्माण करणे हे त्याचे काम आहे. नगर जिल्ह्यातील घटनेचा कांगावा करून विधानसभेत ओरडा करण्याने त्याआधीच्या जलसिंचन घोटाळयांवर चर्चा घडू नये, असाही हेेतू असेल हे म्हणणे बरे नाही; पण ही अशी प्रकरणे घडतात, त्यांचा शेाध घेअून बंदोबस्त करणे हे ज्यांचे काम आहे त्यांना ते करूद्यात. आपली जबाबदारी टाळून, स्वैपाक करणारीच्या कामात सारखे अडथळे आणायचे, आणि वर `तिला निगुतीनं काम करता येत नाही'  म्हणून कांगावा करायचा हे  कसले राजकारण? सरकारी पक्षाला सतत दूषणे देण्याने कोणी विरोधी नेता श्रेष्ठ मुत्सद्दी ठरत नसतो, हे त्यांना कळत नसले तरी लोकांना कळते. बेकायदेशीर वागणाऱ्यांची गय करणेच नव्हे, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यात  स्पर्धा लागते; त्यांतूनही  कायद्यांंचा वचक नाहीसा होतो, हे प्रत्येक क्षेत्रातल्या पुढाऱ्यांना तरी आधी समजले पाहिजे.

यात्रेच्या वेळी किंवा राजकीय सभेच्या वेळी ट्न्कमधून माणसे आणणारे नेते, कायदा सुव्यवस्थेच्या कसल्या गप्पा करतात? सरकारी जमिनी आणि टेंडरे ढापणारे नेते कायद्याचा अंमल कसचा सांगतात? वऱ्हाडासाठी बेकायदा वाहनांतून जाणाऱ्यांस अपघात झाला तर, या देशात विम्याचे पैसे मिळत नाहीत पण सरकारी भरपाआी मिळते, ही कायदेपालनाची रीत विदेशात कुणाला सापडली आहे काय? कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा कुणी सांगाव्यात  -आणि कुणी अैकाव्यात? दुसरे असे की, त्या विदेशांतील पोलीस खाते फारच तत्पर वगैरे कुणी म्हटले तरी, असले प्रकार  होत नाहीत असे थोडेच आहे? अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष आणि जपानचे पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या भानगडीत सत्तेवरून गेले आहेत, आणि अमेरिकी राष्ट्नध्यक्षाचे लेविन्स्की प्रकरणही फार जुने  झालेले नाही. पण तिथे रस्त्यातल्या गोविंदा-गणपतींत राजकारणी  पुढाऱ्यांनी  पुरस्कृत केलेला डॉल्बी नाच नसतो, कारण तिथेे कायदा सुव्यवस्था नेत्यांनीसुध्दा पाळावी लागते. तिथे राष्ट्नध्यक्षांची प्रेमिका  समाजाला मान्य झाली तरी बलात्कारांचे गुन्हेहीे घडतात, त्यास शिक्षाही होतात. पण तशा कारणांवरून आपल्या परिस्थितीची, सभागृहात या मंडळींनी आिज्जत काढावी असे काही नाही. महाराष्ट्नत जंगलराज आले हे कधीतरी त्राग्यापोटी म्हणणे ठीक आहे, पण तसे ते असेेल तर ते म्हणणारे नेते त्याला काकणभर अधिकच जबाबदार आहेत, याचे भान लोकांना तरी असेल. त्यांचेच अेकेकाळचे गृहमंत्री सध्या कलप अुडालेली दाढी वाढवून अेकान्त-चिंतनात राहिले आहेत,  त्यांच्या पक्षीयांनी कायदा व्यवस्थेविषयी गळे काढावेत हे लोकांनी कसे  सहन करावे?

राज्यात याहून वेगळे प्रश्न घोंघावत आहेत. त्यात विधानसभेने लक्ष घालायला हवे. त्यांची सोडवणूक करण्यासाठी विधिमंडळात काम करायला हवे. `नराधमांना शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा करा..' - हे बाहेर बडबडण्यापेक्षा  प्रत्यक्षात तो कायदा आणण्यासाठी विधिमंडळाचाच अुपयोग करायचा असतो, हे यांना कोणी सांगायचे? हे नेते, ही माध्यमे, हा गोंधळघालू  व्यवहार, आणि ज्यात त्यात आत्महिताचा स्वार्थी विचार;  या  साऱ्यांचा  सामूहिक बलात्कार सामान्य जनतेवर होत आहे, तो करणारे जनतेच्या मनांतील आरोपी मोकाटच आहेत !



सच्चे संशोधन वादाचे होतेच.

    ढेरे वादविवाद, भांडणे यांच्यापासून दूर राहू इच्छितात. पण त्यांची ही इच्छा फलद्रूप होण्याचा संभव फार कमी आहे. तुम्हाला एक पुरावा दिसतो. या पुराव्याकडे आजवर लक्ष गेलेले नसते. तुम्ही तो पुरावा समोर ठेवता, त्याचा अर्थ सांगता. इतिहासाची खरी अडचण या ठिकाणी असते. इतिहास संपूर्णपणे मृत नसतो. तो अर्धा बेशुद्ध व अर्धा जिवंत असतो. तुमचा पुरावा प्रांताचा अभिमान, धर्माचा अभिमान, जातीचा अभिमान यांच्याविरोधी जाऊ लागला की भांडण सुरू होणारच. एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दनस्वामी यांना मोक्षोपदेश करणारा कुणी मुसलमान परंपरेतला माणूस आहे, असे ढेरे सांगणार व पुरावा बरोबर आहे की नाही हे निर्विकारपणे तपासा, असे आवाहन  करणार. वारकऱ्यांना व हिंदू धर्माभिमानी मंडळींना या मुद्द्यावर निर्विकार राहणे शक्यच नसते. तुम्ही जर महानुभाव पंथ प्रवर्तक चक्रधर आणि मुकुंदराजांचे आद्यगुरू हरिनाथ या दोन्ही व्यक्ती वेगळया नसून, तो एकच माणूस आहे असे म्हणणार असाल, तर महानुभाव धर्माचे अभिमानी व मुकुंदराजांचेही अभिमानी ते गप्प बसून कसे मान्य करतील? पंढरीच्या विठोबाबाबतचे वादळ असेच घोंगावत उठले. तुम्ही संशोधन करणार असाल, जर पुरावा आणि सत्य यांच्याशी प्रामाणिक राहणार असाल, तर समाजाच्या श्रद्धेशी कुठेतरी भांडण येणारच.
संशोधन आणि चिकित्सा यांचे श्रद्धा आणि परंपरा यांचे भांडण होणारच. ते टळणारे नाही. श्रद्धेच्या विरुद्ध जाणारा पुरावा विकारवश न होता सत्य जिज्ञासेने तपासून घ्या, म्हणणे समूहमन हे सहज कबूल करणार नाही आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत अशी आहे की, हा माझ्या श्रद्धेच्या व हितसंबंधाच्या विरोधी जातो म्हणून मी मान्य करणार नाही, असेही कुणी स्पष्टपणे कबुल करणार नाही. संशोधनाचा आव आणूनच परंपरेच्या रक्षणार्थ युक्तीवादाची फौज उभी राहते. ढेरे यांची इच्छा असो वा नसो, त्यांना वादाच्या धुमाळीत उभे राहणे भाग आहे. एक पर्याय आहे, तो म्हणजे संशोधन थांबविणे. पण हा पर्याय ढेरे यांनी ठरविले तरी त्यांना अंमलात आणणे शक्य नाही.
शोधणे, संगती लावणे आणि हे करताना तहानभूक विसरणे, मानपमान विसरणे, प्रकृतीचे स्वास्थ्यही विसरणे आणि काही हाती लागले की त्या धुंदीत व आनंदात तल्लीन होणे हा ढेरे यांचा प्राणभूत स्वभाव आहे. त्याशिवाय ते जगूच शकणार नाहीत. म्हणून  संशोधन थांबविणे शक्य नाही. मग दरवेळी नव्या रणमैदानात आपण उभे आहोत असा प्रत्यय येणे यालाही पर्याय नाही. कुणाशी भांडू न इच्छिणाऱ्या सोशिक माणसांवर नेहमीच भांडणे भाग आहे अशा जागी थांबण्याची पाळी यावी, यात दोष असला तर परमेश्वराचा आहे आणि लाभ आम्हा सर्वांचा आहे. पांडुरंगाने ढेरे यांच्यासारख्या चार-दोन चुका दर पिढीत केल्या पाहिजेत असे मी मानतो. संशोधनात मतभेद असतातच. पण निदान संशोधकांनी शास्त्राची शिस्त पाळून सभ्यपणे ते मांडावेत, ही अपेक्षा असते. नवा पुरावा उपलब्ध झाला तर संशोधकालाच आपली जुनी मते बदलून घ्यावी लागतात. ढेरे यांनाही ते करावे लागते. आपणच आपल्या विरोधी उभे राहणे याला धैर्य लागते. ते ढेरे यांच्याजवळ भरपूर आहे.
ढेरे यांचे हे मत बरोबर की ते मत बरोबर यावर मतभेद होण्याचा संभव आहे. पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीबाबत जो वाद चालू आहे त्यात ढेरे यांची बाजू बरोबर आहे, असे मी मानतो. इतर कुणाला हे पटणार नाही. संशोधकाचे मूल्यमापन करताना हा मुद्दा गौण असतो. एखादे मत, ,एखादी भूमिका आपणास पटते की नाही यावर संशोधकाचे मूल्यमापन होत नसते. कोणत्याही मोठ्या संशोधकाचे मूल्यमापन करताना त्याने स्वीकारलेल्या दिशांचे महत्व, त्या दिशांचे अचूकपण लक्षात घेऊन मूल्यमापन करावे लागते. माझ्या मते ढेरे हे असे दिशा स्थापित करणारे ज्येष्ठ नेते आहेत.


अलुतेदार - बलुतेदार
आपल्या गावांची व्यवस्था योग्य रीतीने नांदावी अशी लावून दिलेेली होती. कालांतराने व परिस्थितीने त्यात बदल होत गेले. काही गैरप्रकारही शिरले. अलीकडच्या अुद्योगीकरणात हा गावगाडा पार विस्कटून गेला. आजच्या काळात त्या संदर्भातील काही अुल्लेख कधीतरी होत असतात.
त्यांपैकी  `बारा बलुतेदार' पुष्कळदा बोेलण्यांत येतात. ती बलुती अशी - सोनार,  न्हावी,  धोबी,  कुंभार,  सुतार,  लोहार,  चांभार,  कोळी,  मांग,  ढोर,  चौकीदार, गुरव.
   
    अलुतेदार १८ होते, ते असे - तेली,  तांबोळी,  साळी,  सणगर,  माळी,  शिंपी,  गोंधळी,  भाट, डावऱ्या,  ठाकर,  मुलाणी,  गोेसावी,  वाजंत्री,  घडशी, कलावंत, कोराव,  तारल(तराळ), भोआी. या प्रकारच्या विविध ज्ञानी, कुशल व कष्टकरी लोकांच्या सहजीवनावर गावगाडा चालत होता. शिक्षण, धर्मकार्य आणि औषधोपचार यांची जबाबदारी गावच्या बामणाकडे होती, आणि या साऱ्यांचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी होता. कोल्हापूर जिल्ह्यात कणेरी येथे सिध्दगिरी मठ आहे; तेथील संग्रहालयात कायम स्वरूपी प्रदर्शन आहे. त्यात असे जुने स्वयंपूर्ण खेडे पाहायला मिळते. तिथे अधिक माहितीही मिळू शकेल.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन