Skip to main content

22 October Ank

शांबरिक खरोलिका
`शांबरिक खरोलिका' हे नाव त्याच्या वैचित्र्यानं लक्षात होतं. हे नाव एका अद्भूत ऐतिहासिक महत्वाच्या ठेव्याचं आहे. सिनेमा जगताची झगमग आज डोळे दिपवत आहे त्याची ही सुरुवात होती. चित्रपटसृष्टीने व इतिहासाने या प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे. कित्येक वर्षे पटवर्धन कुटुंबात एकमेवाद्वितीय अशी कलाकृती ६ मोठमोठ्या पेट्यांमध्ये माळयावर ठेवली होती. दिवाळीला वा गणपतीला त्यांतल्या काही स्लाइड्स काढून घरगुती सिनेमा दाखवला जाई. 
शे-सव्वाशे वर्षांपूर्वी एका मराठी माणसानं जगातील पहिला चलत् चित्रपट व तोही २ ।। तासांचा तयार केला होता. या गोष्टीचे ऐतिहासिक अपूर्वत्व जाणून `ग्रंथाली'तर्फे या खरोलिकाच्या स्लाइड्स पडद्यावर दाखवल्या गेल्या. तरुण पिढीनंही  आश्चर्यानं या प्रकाराकडे पाहिलं. १० फूट बाय १० फूट रंगीत चित्र व त्यात हालचाली निर्माण करण्याचा तो यशस्वी प्रयोग अनेकांनी पाहिला. केवळ एकाच लँटर्नवर हा शो झाला.
`शांबरिक खरोलिका' हा शब्द मॅजिक लँटर्न या शब्दाला पर्याय म्हणून पटवर्धनांनी तयार केला. शांबरिक हा जादू जाणणारा राक्षस व खरोलिक म्हणजे दिवा. हा १९व्या शतकातला सिनेमा होता. हा चलत्पट होता. १८८५ चा काळ. दळणवळणाची अपुरी साधनं असतानाही `शांबरिक खरोलिका' या शोचे प्रयोग हिंदुस्थानभर होऊ लागले होते. चलत्चित्राचा आभास निर्माण करण्याचे तंत्र पहिल्यांदा महादेव गोपाळ पटवर्धन यांनी विकसित केलं. त्यांनी एक जुनाट मॅजिक लँटर्न मिळवला आणि आपले पुत्र विनायक व रामचंद्र यांना या कल्पनापूर्तीसाठी हाताशी धरले. विनायकरावांना जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये घातले; तेथे त्यांनी काचेवरील चित्रकारिता अवगत करून घेतली. आणखी लँटर्न तयार केले. पूर्वी रेल्वे स्टेशनवर असत ते दिवे वापरायला सुरुवात केली. त्यापूर्वी असे मॅजिक लँटर्नचे शो होत असत; परंतु चलत्चित्राची कल्पना मात्र महादेवराव पटवर्धनांचीच!
महादेवरावांनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने हे खेळ करायला सुरुवात केली. अल्पावधीतच त्या खेळांना राजमान्यता व लोकमान्यता  मिळाली. ते व्यवस्थित जाहिरात करीत असत. सुरुवातीला खाजगी समारंभातून शोज केले. शोमन-शिपचे सारे गुण त्यांच्या अंगी होते. आज चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या अनेक अंगांचा, तंत्राचा त्यांनी आपल्या या शोसाठी वापर केला होता. मोठमोठ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षिसे व प्रशस्तिपत्रके दिली होती.
काचेच्या पट्ट्यांवर रंगीत चित्रे काढलेली असत. त्यात हावभाव अभिनय यांची काळजी घेतलेली असे. कुणीही आजवर असा हलणारा पडदा पाहिला नव्हता. एक सूत्रबद्ध कथानक पडद्यावर साकार होत असे. हाताने काढलेल्या या चित्रांतून लोकांना हलवून टाकण्याची किमया, अॅनिमेशन फिल्म - ज्यांना आपण आज व्यंगपट म्हणतो त्याची ही सुरुवात होती. अगदी अस्सल देशी मऱ्हाटी! २ ।। तासांच्या शोकरता अक्षरश: हजारो स्लाइड्स तयार कराव्या लागत. त्या शोला संगीताची पार्श्वभूमी असे. प्रत्येक चित्रातील अभिनय कौशल्य ब्रशमधून त्या काचेवर उमटवावे लागत होते. राजवाड्याचा सीन असेल वा रासक्रीडेतील नदीकाठ असेल तर असे स्टॉक सीन्स एका खरोलिकेवर स्थिर ठेवून त्यातील काही कोऱ्या भागात दुसऱ्या खरोलिकेतून चित्र प्रकाशित करून हालचाल दाखवणे इत्यादी प्रकार करून खरोलिकाने प्रेक्षकांना अचंबित करून सोडले होते.
सिनेमाची अनेक टेक्निक्स त्यांनी खरोलिकात प्रथम वापरली होती. सिनेमातंत्रातील प्रेक्षक खेचण्याचे उपायही केले. रामायण, महाभारत यांतील मुख्य कथानकाबरोबरच छोटे छोटे प्रसंग विनोदाने खुलवण्याचं तंत्र त्यांनी वाढवलं. यमुनेच्या पुरातून वसुदेव श्रीकृष्णाला टोपलीतून नेत असताना बालकृष्णाच्या अंगठ्याला पाणी लागेस्तोवर यमुना वाढत होती व अंगठ्याला स्पर्श करताक्षणीच ती ओसरू लागली. हे खरोलिकाच्या प्रेक्षकांच्या टाळयांचे दृश्य होते. प्रेक्षकांचे डोळे पडद्यावर खिळून राहत. आज शंभर वर्षांनंतरही या काचेवरील चित्रांचे रंग नव्या शालूच्या रंगासारखे ताजे व चकचकीत आहेत.
पटवर्धनांनी सर्कसमधील जनावरांचे खेळही खरोलिकातून दाखवले. पडद्यावरील हालचालींना संवादाने व संगीताने जिवंत केले जाई. कथानकाची सुरुवात `सुस्वागतम्- पटवर्धन ब्रदर्स शांबरिका खरोलिक' या मखरातील चित्राने होई. नाटकांच्या पद्धतीप्रमाणे सूत्रधाराच्या प्रवेशाने शो सुरू होई. सूत्रधाराच्या बाजूला तंबोरे घेतलेले गायक कार्यक्रम सुरू करीत. तंबोऱ्याच्या तारा झंकारताना व गायक माना वेळावत गाताना पाहणं ही गोष्ट प्रेक्षकांना चक्रावून टाकत असे. नर्तकींच्या हातापायांच्या हालचालींतून नृत्यातील आविर्भाव पडद्यावर दिसू लागत. या प्रयोगाच्या नावीन्यामुळे लोकांनी खूप गर्दी केली व प्रयोगाला भरपूर लोकप्रियता मिळाली. सीतेला अशोकवनात ठेवल्यानंतर तेथील राक्षशिणींच्या विद्रूपतेचे पटवर्धनांनी मोठे मजेशीर चित्रण केले आहे. विद्रूप राक्षशीण मोठमोठ्याने घोरत आहे, घोरताना तिच्या तोंडात एक मोठा उंदीर जातोय व ती त्याला कुडमकुटूम खातेय हे दृश्य बाळगोपाळांचे चांगलेच मनोरंजन करी.
प्रेक्षकांचे आवडते नायक त्यांना पडद्यावर पाहायला मिळाल्याने व त्यांचे कर्तृत्व दिसल्याने प्रेक्षक खूश असत. आजच्या सिनेमाप्रमाणे त्यावेळी खरोलिकासाठी पटवर्धन, फ्रेम बाय फ्रेम कथानक घेत असत. निवेदन आवश्यक असेल तिथे कुठली स्लाइड दाखवायची याची आखणी केलेली असे. एकेका प्रसंगाच्या चित्रणासाठी कधीकधी १२-१५ स्लाइड्स कराव्या लागत. या स्लाइड्स रंगीत असत व चित्रकाराच्या कौशल्यावर `शो'तील टाळया अवलंबून असत. प्रसंगातील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने पोशाखांचे बारकावेही लक्षात ठेवावे लागत. रुक्मीणीच्या शालूवरील बुट्ट्यांचे डिझाइनही अनेक प्रसंगांत बदलत नसे. हे सारे बारकावे छोट्याशा काचेवर चितारणे हे  कौशल्याचे काम होते. हे काम साध्या पांढऱ्या काचेच्या पट्ट्यांवर होत असे. या पट्टीची उंची १०से.मी. व लांबी मात्र प्रसंगानुसार २४ ते ३२ से.मी. पर्यंत असे . काचेच्या पट्टीवर मानवी आकृती ५ से.मी.हून लहानच करावी लागे. बारीकशा मानवी आकृतीच्या हावभावांची रेखाटणी किती अवघड असेल. १०-१५ गोपींचे कृष्णासह रासनृत्य, प्रत्येक गोपीचा शालू वेगळा, केशरचना वेगळी, पदराचे फलकारेही पाहण्याजोगे चित्तारलेेले होते. पडद्यावरील वस्त्रांचे व दागिन्यांचे नमुने पाहून आपली वस्त्रे व दागिने तयार करून घ्यावेत असा मोह पडण्याइतके ते मोहक असत.
३-४ तासांच्या शोसाठी ४००-५०० स्लाइड्स लागत असत. त्यात कलाकारांचे दिवसच्या दिवस जात. महादेवराव पटवर्धनांनी सुरू केलेला हा शो वाढला तो त्यांच्या दोन मुलांच्या कर्तृत्वाने. श्री.विनायक व श्री.रामचंद्र पटवर्धनांनी या प्रयोगात अमूल्य भर टाकली. या पारदर्शिका जतन करणे ही अतिशय अवघड गोष्ट. शो करायला पटवर्धन कुटुंब हिंदुस्थानभर फिरत असे. प्रसंगी बैलगाडीतूनही  प्रवास होई, ३०-४० माणसांचा लवाजमा असे. तंबूही घेऊन जात. मुक्काम पडेल त्या ठिकाणी तंबू लावून शो केला जाई. रामचंद्र पटवर्धनांच्या पत्नी सीताबाई खूप मदत करीत. बिऱ्हाडी असलेल्यांचा सोवळयात स्वयंपाक त्या करीत असत, वेळप्रसंगी खरोलिकांच्या ऑपरेटर म्हणूनही त्या काम करीत. त्यांची कन्या कथानकातील योग्य ठिकाणी गाणी म्हणत असे. पडद्यावर संवाद सुरू असत तेव्हा पडद्यामागे दोघे जण संवाद म्हणत असत. त्यामुळे हा चित्रपट एक प्रकारे `बोलपट'  होत असे. आजही या कुटुंबातील सुना हा कार्यक्रम सादर करू शकतात. आज आपण फक्त झलक पाहू शकतो. पांढरा पडदा पाण्याने भिजवला जाई, त्यामुळे आकृत्यांना उठाव येई व पडद्याच्या दुसऱ्या बाजूलाही प्रेक्षक बसवता येत असत. एकेकदा हजार-हजार प्रेक्षकांसमोर हा कार्यक्रम सादर केला जाई. प्रेक्षकांना समजेल अशा मराठी व हिंदी भाषेतून, पिचत इंग्रजीतून हे शोज होत. अलाहाबाद, लखनौ, अयोध्या, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा, राजपुतान्यातील शहरे, गुजरात इत्यादी ठिकाणी शांबरिक खरोलिकाचे अनेक शोज झाले.
१८९२ मध्ये न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू झाल्याबद्दल मेजवानीच्या प्रसंगी शांबरिक खरोलिकाचा प्रयोग करण्यात आला होता. अनेक ठिकाणी शोसाठी आमंत्रणे येऊ लागली. न्या.रानडे, नामदार विठ्ठलदास करसनदास, वासुदेव कीर्तिकर, डॉ.भालेराव, नारायणराव चंदावरकर, त्रिभुवनदास मंगलदास, विठ्ठलदास ठाकरसी, डॉ.भाटवडेकर इ. मंडळींकडेही शांबरिक खरोलिकाचे प्रयोग झाले.  १ आणा ते ४ आणे अशी तिकिटे असत. काशिनाथपंत व विष्णुपंत छत्रे यांनी पटवर्धनांची `सर्कसची खरोलिका' पाहून त्यांना आर्थिक साहाय्य केले.
१९१० मध्ये जळगाव येथील प्रदर्शनात त्यांना ३ तोळयांचे सुवर्णपदक देण्यात आले. नियमानुसार पोलिसांची परवानगी घेऊन खेळ झाला होता. अलाहाबादच्या अखिल भारतीय प्रदर्शनात खरोलिकेला पुन: सुवर्ण व रौप्य पदके मिळाली. १८९५ मध्ये पुण्याला  भरलेल्या राष्ट्नीय काँग्रेसच्या अधिवेशनात या खरोलिकेचा शो लोकमान्य टिळक, भिडे, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, नामदार गोखले, न्या.रानडे यांनी पहिला व शाबासकी दिली होती. पटवर्धन बंधूंनी काही राष्ट्नीय भावनेच्या चित्रांच्या स्लाइडस तयार केल्या.
१९०९ सालची गोष्ट, खरोलिकाचा तंबू नाशकाला होता. नाशकाचे कलेक्टर जॅक्सननी तो शो पाहिला; कौतुकाने प्रशस्तिपत्रही दिले होते, (ते आजही पटवर्धन कुटुंबाकडे आहे) या शो नंतर दुसऱ्या दिवशीच जॅक्सनची हत्या झाली. या घटनेचा छडा लावण्यास पोलिसांची पटवर्धन बंधूंना जवळजवळ कैद भोगावी लागली होती. हा खेळ  १९२० साली पूर्णत: बंद झाला. त्यातील अनेक स्लाइड्स साठ वर्षांपूर्वी पानशेतच्या पुरात नामशेष झाल्या. तरीही शेकडो स्लाइड्स आजही उत्तम स्थितीत आहेत. पटवर्धन बंधूंच्या वारसांनी त्या फिल्म संग्रहालयाकडे दिल्या आहेत. एकमेवाद्वितीय असा हा पहिला सिनेमा, एका मराठी माणसाने केला होता. हा खजिना आपला होता याचा सार्थ अभिमान मराठी माणसानं बाळगायला हवा.


संयोजकस्तत्र दुर्लभ:
`हल्लीच्या काळात लोक फारसं वाचत नाहीत', `हल्ली चांगल्या कार्यक्रमांना लोक येत नाहीत', `हल्ली चांगलं काही.....' अशा तक्रारी करण्याची अेक प्रथाच झाली आहे. त्यात तथ्य आहे का? त्यांआितकीच अशीही तक्रार अैकावी लागते की, `हल्ली चांगलं काही वाचायला मिळत नाही. टीव्हीच्या रटाळ मालिकांचा अुबग येतो. वृत्तपत्रांत तर काही वाचनीय नाहीच. सभा-समारंभांची तर रयाच गेली'... हेसुद्धा हल्लीच म्हटलं जातं. याबाबतीत असं ठाम म्हणता येआील, -की चांगल्याला चांगल्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे वास्तव नाकारता येत नाही!!
हल्लीच्या कार्यक्रमांचं स्वरूप जरा आठवून पाहिलं तर, चांगल्या कार्यक्रमांच्या निकषाला किती अुतरतात ते ठरविता येतं. अेक तर जे कोणी काही कार्यक्रम ठरवितात, ते त्या कार्यक्रमाचं नीट नियोजन करीत नाहीत. हा विशिष्ट कार्यक्रम नेमका कुणासाठी आहे, त्यातील मुद्दे काय आहेत, अुद्देश काय आहे हे संयोजकांस नेमके सांगता येत नाही. ज्या कुणासाठी कार्यक्रम अुपयुक्त आहे, त्यांना त्या कार्यक्रमाची माहिती नीट वेळेत करून दिली पाहिजे. `वॉट्सअॅपवर टाकलं' ही काही रीत नव्हे. आपण ज्या गांभीर्यानं ते करतो, त्याच गांभीर्यानं लोक त्याकडं पाहून `लाआीक' करतात, किंवा `गुड लक' म्हणतात. त्याचा अुपयोग काय? ज्यांना कळवायला हवं, त्यांची यादी नीट करून त्यांना  बोलावलं पाहिजे. नंतर त्यांना स्मरणासाठी तसले संदेश पाठविता येतील. येणाऱ्यांची प्रवेशद्वाराशी दखल घ्यावी, स्वागत करावे, आसन दाखवावे. थोडक्यात म्हणजे अुपस्थितांस प्रतिष्ठा द्यावी, अगत्य करावे. यांतले काही घडत नाही.
कार्यक्रमाची ठरलेली वेळ, हा तर भलताच नाजूक विषय झाला आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होत नाही म्हणून लोक अुशीराने येतात,  आणि समोर लोक जमलेले नाहीत म्हणून संयोजक खोळंबून राहतात. हे दुष्टचक्र संयोजकांनीच भेदले पाहिजे. श्रोत्यांना अग्रक्रम देण्यासाठी संयोजकांनी कठोर व्हावे. फारतर आधी जरा लिंबूटिंबू वक्त्याचे भाषण ठेवावे, तोपर्यंत लोक जमतील. चाचणीदाखल काही कार्यक्रम हेतुत: करावेत, आणि त्यांची सुरुवात अगदी काटेकोर वेळेत करावी. त्यावेळी अगदी चारदोन श्रोते असले तरी बिघडत नाही, पण `यांचा कार्यक्रम वेळेतच सुरू होतो-' असे लोकांना माहीत झाले तर श्रोते चुकणार नाहीत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सभेसाठी श्रोते वेळेत हजर असतात, म्हणजे वक्ता आग्रही असेल तर श्रोत्यांना नेमकी वेळ कळत असते. अेखादा आवडीचा कार्यक्रम टीव्हीवर असेल तर लोक बटण दाबायला वेळ चुकत नाहीत. निमंत्रणपत्रिकेत दिलेल्या वेळेत संयोजक जर ध्वनिवर्धकाची जोडणी, फुलदाणी, खुर्च्या असल्या व्यापातच असतील तर लोकांनी वेळेत का यावे? जे मोजके लोक अगदी वेळेत येतात तेच जर बरोबर वागत असतील तर त्यांच्यावर, जे चुकीचे वागून अुशीरा येतात त्यांच्यासाठी अन्याय होतो. त्याबद्दल चांगल्या श्रोत्यांनी कशी चीड व्यक्त करावी? पुष्ळळदा तर, वेळेवर पोचल्यानंतर प्रास्तविक, परिचय अशा नमनालाच धडाभर तेल घातले तर, आता अधिक वेळ दवडू नये म्हणून मुख्य भाषण नाआिलाजाने टाळून, श्रोत्यांना अुठून यावे लागते.
कार्यक्रमासाठी अेकूण वेळ किती द्यायचा याचेही काही आडाखे असतात. नाटक किंवा सिनेमा असला तरीही साधारण तासाभराने `विश्रांती' द्यावी लागते. सभा-समारंभात माणसाला अेका जागी खुर्चीत बसणे दीड तासापेक्षा जास्त निभत नाही. आितक्या वेळेत कार्यक्रम संपला तर, आणि तरच त्याचा, -त्या व्याख्यानाचा ठोस परिणाम(आिम्पॅक्ट) राहतो. अभ्यासवर्ग, सेमिनार असे असेल तर दोन विषय अेकाच सत्रात घेअून फार तर अडीच तास सलग घेता येतात. अेरवी बौद्धिक जनसभा असेल तर दीड तास ही मर्यादा असली पाहिजे. त्यात काही पारितोषिके, पुरस्कार, सत्कार हेही आटोपले पाहिजे. अशा `प्रदान सोहळया'वेळी मुख्य वक्त्यासाठंी कमी वेळ राहतो, परंतु तो पुरेसा असतो; -कारण पुरस्कार वा बक्षिस देणे हाच मुख्य कार्यक्रम असतो. याबाबतीत मतभिन्नता होआील; परंतु अेकूण दीड तासाच्या वेळ-मर्यादेत बदल होता कामा नये.
हे भान सांभाळताना संयोजकांची कसोटी असते. सभेच्या अध्यक्षाला त्यात महत्वाची भूमिका घ्यावीच लागते, कारण काही जणांना `माआीकचं बोंडूक पुढं धरून बडाबडा करायची' खोड असते. त्यांना आवरावं लागतं. कुणा तरी हौशी
व्याख्यात्याच्या नसत्या भरीला पडून श्रोत्यांवर जबरदस्ती करण्याला अध्यक्षानी परवानगी देअू नये. सभ्यता अध्यक्षानी पाळावी, आणि त्या अुत्साही बाष्कळ वक्त्यानं ती कोलवावी हे चांगल्या श्रोत्यांना अजिबात रुचत नसते.
या दीड तासाच्या मर्यादेचं बंधन पाळलं की मग स्वागतपद्याला किती वेळ, आभाराला किती वेळ, वगैरे ठरविता येतं. स्वागतपद्य खरे तर पाहुणे व्यासपीठावर येत असताना, स्थानापन्न होत असताना जी चारपाच मिनिटे जातात त्याच वेळी गावीत. -किंवा दीपप्रज्वलन असेल तर तेवढ्याच वेळेत `बसवावीत.' ती पद्ये व्यासपीठाच्या मागेही म्हटली तरी चालतील. पेटी-तबला लावण्यापासून सारं काही श्रोत्यांसमोर कशाला? पुष्कळ ठिकाणी रटाळ भाषणांनी वेळ दवडल्यानंतर संपूर्ण वंदेमातरम् किंवा पसायदान म्हटले जाते. ही दोन्ही पद्ये अुत्तम असली तरी, त्यांसाठी ज्या परिस्थितीत वेळ खर्ची पडतो याचाही विचार करणे भागच असते. श्रोत्यांची सहनशक्ती कसाला लागते. जांभया आवरताना धीर सुटतो. त्या चांगल्या पद्यांचे गांभिर्य राहात नाही. काहीजण तिथं त्या कठीण वेळी आपल्या गायकीचं प्रदर्शन सुरू करतात. पूर्वप्रसिद्ध ध्वनिमुद्रिकेप्रमाणं तानामुरके यांसह त्या `जागा' घेअून `बेरंग' भरतात. वंदेमातरम् संपूर्ण म्हणणं चांगलं वाटत असेल तर ते कमी वेळेत करावं, किंवा मग रेडिओप्रमाणं दोनच कडवी म्हणावीत. कारण `ती' वेळ त्या रट्निनाष्ष्ठेच्या किंवा आीशभक्तीच्या आळवणीची नसते. शक्य तर अेखादा मंगलमय श्लोक  म्हणून काम भागविता येआील.
सभा-समारंभाचा अध्यक्ष हाच खरे तर त्याचा संचालक असतो. त्याच्या हाती सूत्रे असली पाहिजेत. कुणाला पुढे आणायचं, कुणाला थांबवायचं, कुणाला रोखायचं हे त्यानं ठरवायचं असतं. सभा सुरू करताना किंवा प्रत्येकजण बोलायला प्रारंभ करताना अध्यक्षाची संमती घ्यायची हा संकेत आहे. आपण लोकसभेचे कामकाज पाहतो, ते त्या सभासंकेतांनुसार चालते. त्या पीठाची सूत्रे जशी सभापतीच्या वा अध्यक्षाच्या हाती असतात तेच सर्वत्र अनुसरले पाहिजे. त्यामुळे सभा म्हणून त्याच्या संचालनाचे जे काही यश-अपयश असेल ते  अध्यक्षाच्या खात्यास जमा होते. लोकसभेच्याच बाबतीत सांगायचे तर तेथील अध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीची तुलना करून पाहायला हरकत नाही. आपल्याकडे त्या बाबतीत सारा आनंद! शक्यतो वयानं `झालेला', न  बोलणारा असा अध्यक्ष शेाधतात. तो बसल्या जागी पेंगत राहिला तर चांगला. बऱ्याच जणांस अध्यक्ष कोण, प्रमुख पाहुणा कोण हे नेमके माहीत नसते. अेकाच व्यक्तीचा अुल्लेख वेगवेगळा करतात.
`प्रमुख अतिथी' ही संज्ञा तर भलतीच कोड्यात टाकणारी असते. खुर्चीतल्या पाहुण्याला चांगले बोलावून, ठरवून, पुष्कळदा मानधन ठरवून  -म्हणजे चांगले धरून आणलेले असते; तो अतिथी कुठला? `न विद्यते तिथि: यस्य, स: अतिथि: ।' (ज्याच्या येण्याचा नक्की दिवस ठरलेला नाही, तो अतिथी) ही व्युत्पत्ती मानली तर बोलण्याचा अर्थ अुलट निघतो. `अतति(गच्छति) न  तिष्ठति।' (जो आला तरी लगेचच जातेा, थांबत नाही), किंवा `अनित्यं हि स्थितो यस्मात्' असे मानले तरी व्यासपीठाच्या कुणालाही अतिथी म्हणणे चूक ठरते. पण अतिथी शब्द जरा भारदस्त वाटतो की काय न कळे! खरं तर पाहुणा हाही शब्द तितकासा ठीक नाही. पाहुणा या शब्दासाठी अतिथी, कधीतरी येणारा, परका मनुष्य असे अर्थ मराठी व्युत्पत्तीकोशात दिले आहेत. संस्कृत `प्राघूर्ण:' चे पाहुुणा हे मराठी रूप दिले आहे. प्र+घूर्ण या  संस्कृत धातूचा अर्थ  आिकडे तिकडे फिरणे असा आहे..  अशा फिरत्या मनुष्याला कधी कुठे अवचित मुक्काम करण्यासाठी कुणाच्या दारी जावे लागत असे, त्यास अतिथी म्हणायचे. आणि त्याचाही सत्कार करण्याची रीत होती. `अतिथिदेवो भव' हे त्यातून आले. सभासमारंभात हे कुठून शिरले?
अध्यक्षाकडे सूत्रे असली पाहिजेत, त्यांचे संचलन त्याने करायचे. वेगळा सूत्रसंचालक नव्ह तर निवेदक, हवा तर नेमावा. हल्ली अशा निवेदक व्यक्तीला सूत्रसंचालक करण्यामुळे श्रोत्यांची पुष्कळदा पिळवणूक होते. दोन वक्ते किंवा सभेतील कृती यांच्यात दुवा सांधणारे चित्तवेधक निवेदन करणे हा तसा कौशल्याचा भाग असतो. परंतु बहुतेक सूत्रधारक काहीबाही लिहून आणतात, आणि दे दणादण किंवा लाडेलाडे वाचत राहतात. त्यांची जागा कुठेतरी बाजूला कोपऱ्यात टेबल मांडून दिलेली, पुढ्यात कागदांची चळत असते. ते पुढे नीट दिसतही नाहीत. म्हणजे तितका काळ पीठावरती कोणी बोलताना दिसत नाही, पण स्पीकर चालू असतो. कोणीतरी प्रवचन देत असते. श्रोत्यांनी लक्ष कुठे द्यायचे? त्या `सूत्रका'च्या हातचे वाचून संपले(अेकदाचे), की मग `बापरे, आता आणि पुढे  काय येणार...' अशी गत होते. निवेदन करण्यात अेक नजाकत हवी. आधी  मांडलेल्या विचारांचा किंवा झालेल्या कृतीचा संबंध पुढच्यांशी जुळवून घेण्यासाठी वाचन, भाषा, आवाज, हजरजबाबीपणा, अुपस्थितांचा व यथावकाश येणाऱ्यांचाही परिचय असणे अशा बऱ्याच गुणांची आवश्यकता असते. तसे व्यावसायिक निवेदक असतात, त्यांची मदत घ्यायला हरकत नाही. शक्यतो निवेदन प्रत्येक वेळी ध्वनिवर्धकासमोर येअून करणेे शोभून दिसते. अेका विधीनंतर, `आता यानंतर काय असेल बरं?' अशी अुत्सुकता  वाढावी; परंतु तो क्रम अध्यक्षाला ठाअूक असावा. निवेदकाच्या आकर्षक बोलण्यातून, वागण्यातून, दिसण्यातूनही ती अुत्सुकता पुरी व्हावी. त्यामुळे  कार्यक्रम चित्तवेधक ठरतो.
अध्यक्षीय भाषण हे तर शेवटीच हवे, कारण त्यानेच समारोप केला पाहिजे. मुख्य वक्त्याचे भाषण झाले की हल्ली कोणी दम काढत नाही. म्हणून मग वक्त्याच्या आधीच अध्यक्षाचं `अुरकून' घेतात. वक्त्याचे आभार `चांगल्या भाषणाबद्दल' आधीच मानून टाकतात. त्या आभार`प्रदर्शना'त जर कार्यक्रमानंतरच्या अल्पाहाराची घोषणा झाली तर काही लोक शेवटपर्यंत थांबतील असा हिशेब!  -वास्तविक जर कार्यक्रम वेळेवर सुरू झाला, आणि तो ठीक वेळेत संपविला तर लोकांना पूर्ततेसाठी थांबायला अडचण वाटणार नाही.
कार्यक्रमाच्या अेकूण रचनेत कोणाही अुत्तम अभ्यासू चांगल्या वक्त्याचे, चांगले  -म्हणजे अभ्यासू अथवा रंजक व्याख्यान साधारण ४० मिनिटात संपावे, तेवढे पुरेसे असते. वेळ अुपलब्ध असेल, भाषण रंगले असेल, श्रोत्यांचे अवधान असेल तर  -म्हणजे सारी अनुकूलता असेल तर, वक्ता ५० किंवा अगदी ७० मिनिटांपर्यंत बोलू शकेल. तितका वेळ अेकच विषय श्रोते तल्लीनतेने अैकू शकतात, त्यापुढे नाही. त्यामुळे प्रास्तविक, आभार, परिचय, वगैरेंसाठी किती वेळ घालवायचा हे संयोजकांस आधी ठरवावेच लागते. मुख्य भाषणानंतर अध्यक्षाने त्या मांडणीवर आपली प्रतिक्रिया द्यायचीच असते, कारण अध्यक्ष हा कार्यक्रमाचा यजमानस्वरूप नेता असतो. ही सभा कशासाठी होती, आणि त्या दृष्टीने या सभेचे फेलत काय हे अध्यक्षाने सांगितलेे पाहिजे. हे मुख्य व्याख्यानाच्या आधीच कसे काय करायचे? संयोजकाची सोय पाहायची? सभाशास्त्र सांभाळायचे? -की कार्यक्रमाचे नेमके अुद्दिष्ट साधायचे? की केवळ कार्यक्रम केला असा अुपचार पार पाडायचा?... यासंबंधी संयोजकांना भान नसेल तर श्रोत्यांनी सारे संकेत आणि सभ्यता पाळावी ही अपेक्षा कशासाठी करावी?
बाकीचे संकेत आणि नियम असे काही सांगायचे कारण नाही, तो ज्याच्या त्याच्या हौसेचा भाग आहे. अुदाहरणार्थ पाहुण्यांच्या छातीवर अेक बिल्ला वा पदक (बॅज्) लावतात, तो किती आकाराचा असावा? सत्काराची तबके कशी असावीत, त्यात कायकाय असावे?  सत्कार करताना फोटो काढायचा, -की फोटो काढण्यासाठी सत्कार करायचा? फोटोसाठी किती वेळ अवघडत थांबायचे? -किंवा पुन्हा तशी पोज् द्यायची? सत्कारमूर्तींसह  पाहुण्यांचा फोटो घेण्यासाठी स्टेज्वरती साऱ्यांनी येअून श्रोेत्यांचा वेळ खावा का? दीप लावतांना किंवा अेकमेकांस गुच्छ देतांना आडवे क्रॅमेऱ्याकडे पाहण्यात कृत्रिम नाटकीपणा नाही का? हल्ली काही ठिकाणी फुलांअैवजी कुंडीतील रोप देतात ते किती मोठे व कशाचे असावे? .... अशा कितीतरी बाबतीत तारतम्य वापरणे आवश्यक आहे, पण ते सारे संयोजकांच्या हौसेवर आणि प्रेक्षक-श्रोत्यांच्या सहनशीलतेवर सोडावे हे बरे!!
हे सारे मांडायचा शुद्ध हेतू असा की, सभा-समारंभाना लोकांचा प्रतिसाद मिळत नाही ही तक्रार नाहीशी व्हावी. चांगल्या रसिकांना चांगले  कार्यक्रम हवे आहेत. आणखी अेक बाब महत्वाची अशी की, कोणत्या कार्यक्रमांस किती लोक  येतील हे ठरलेले असते. ज्येष्ठ नागरिकांच्या गायनस्पर्धा आणि मोदींचे अमेरिकेतील तिकिट लावून केलेले भाषण यांत श्रोत्यांची अुपस्थिती सारखीच असेल काय? आजच्याच नाही तर पूर्वीच्याही काळात, प्रसिद्ध व्यक्तीच्या बौद्धिक स्वरूपाच्या माहितीपूर्ण व्याख्यानास मध्यम शहरात तीनशे, छोट्या गावात पन्नास, आणि मोठ्या शहरात पाचशे हा आकडा साधारण योग्य असतो. गणेशोत्सवात मुंबआीच्या गायवाडीत टिळकांचे व्याख्यान झाल्याचा अेक पुरातन फोेटो पुष्कळ ठिकाणी आलेला आहे. त्यात अगदी गॅलरीत झुंबड केलेली माणसे पाहिली तरी त्या गर्दीची संख्या तीनशे-चारशेपेक्षा जास्त नसावी. हल्ली अेखाद्या सिनेमा नटीला पाहायला लोक येतात, ते स्वरूप पूर्णत: वेगळे. आपल्या मूळ तक्रारविषयाशी त्याचा संबंध जोडण्याचे कारण दिसत नाही.
तितक्या नेमक्या अपेक्षेने, आणि सुबद्ध नियोजनाने कार्यक्रम करायचेच ठरविले तर सुबुद्ध लोकांना ते हवे आहेत. तसे अगदी काटेेकोर होणारे कार्यक्रम आजही अपवादाने होतात, त्यांचा आस्वादही घेणारे आहेत. लोकांच्यात जागृती करणे, प्रबोधन करणे, रंजन करणे, प्रोत्साहक संजीवनी देणे, यांची आज आणि नेहमीच गरज असते. तसेच ते स्वीकारण्यासाठी लोकही अुत्सुक आहेत. या  दोन्हींचा मेळ बसावा आणि या जगी वाग्यज्ञांचा सुकाळू व्हावा. त्यायोगेही आपली सामाजिक श्रेष्ठता वाढेल.
                                                   -वसंत आपटे

 संपादकीय
आला प्रकल्प - चला आडवे!
`गोेतावळा' ही आनंद यादव यांची गाजलेली कादंबरी. त्यात अेक प्रसंग असा की, आिथला झाडझाडोरा, पशूपक्षी, मातीपाणी यांसह साऱ्या चराचराशी तद्रूप झालेला नारायण हा सामान्य शेतमजूर. त्याचा मालक शेतीतली सुधारणा म्हणून ट्न्ॅक्टर आणायचे ठरवतो, आता निरुपयोगी ठरणारे बैल तो त्यासाठी विकावेत म्हणतो. या त्याच्या विचाराने नारायण कमालीचा कळवळतो.

`ठेविले अनंते...'कडून `जुने जाउद्या मरणालागुनी..' या दिशेने माणसाची वाटचाल होत असते. तरीही जुने टाकताना माणूस कळवळतो, आणि जुने ते सोने म्हणून ते इतरांनी जपायला हवे असा आग्रह धरून बसतो. मुंबईतल्या आरे वसाहतीतल्या वृक्षतोडीचे प्रकरण त्या दुराग्रहाच्या नमुन्याचे आहे. कोणत्याही शहरातल्या विस्तार योजनेला कोर्टबाजीचे विळखे टाकण्याची अेक प्रथाच पडली आहे. तसला विरोध करण्यासाठी कधी झोपड्यांतील गोरगरीबांचा कळवळा येतो, कधी मंदीर दर्गा असेल तर त्यावर धार्मिक भावना पेटतात, तर कधी सध्याप्रमाणे पर्यावरणाची काळजी वाटू लागते.

आपल्याकडे वृक्षतोड फार झालेली आहे, आणि अेकेक झाड वाचवण्याची आवश्यकता आहे यात कोणतीही शंका नाही. परंतु झाडांच्या लाकडाचा वापर थांबलेला नाही, आणि त्यासाठी झाडे तोडावी लागतात हेही तितकेच सत्य आहे. त्यावरती योग्य अुपाय म्हणजे ज्या प्रमाणात झाडे तोडली जातात त्याच्या जास्त पटीत ती लावली आणि जोपासली पाहिजेत.  मुंबआी हे मूलत: कोकणातले अेक बेट, तिथे डोंगर-दऱ्या होत्या, समिंदर होता. माणसाच्या आधुनिकतेच्या हव्यासापोटी मुंबईची सात बेटे जोडली गेली. तिथे आधुनिकता ओसंडून वाहात राहिली. लोकवसती भयाण वाढली. अशा स्थितीत त्याच वसतीला सोयीसुविधा पुरविण्याची नितांत गरज आहेच. मग मेट्ने हवी, रस्ते हवेत, गाड्या हव्यात, अुंच अुंच आिमारती हव्यात. त्या कशा होणार? कुठे होणार? आरे वसाहतीतील झाडे अशा प्रकल्पासाठी तोडावी लागली याबद्दल सरकारी यंत्रणेला आनंदाचे भरतेच आले असणार अशातला काही भाग नाही. तीही सारी माणसे सुशिक्षित सुसंस्कृत व जाणकार आहेत. त्या अधिकाऱ्यांनी तेथील झाडे वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न कसोशीने केलेलाच असणार. तो केलेला आहे की नाही, याची खातरजमा आंदोलनवाल्या निसर्गप्रेमींनी दहा वेळा करून घ्यावी. आजपर्यंत ती  करून घेता आली असती. आता तो संबंधित मेट्ने प्रकल्प मार्गी लागण्याच्या वेळी नसती कोर्टबाजी करून गुंता वाढविण्याचे काही  कारण नव्हते. पण या पर्यावरण-प्रेमाच्या उमाळयांना कोण कसे आवरणार? एक गोष्ट उत्तम वाटते की, विरोध करणाऱ्या आंदोलकांनी आपली चळवळ कोण्या राजकीय पक्षाच्या खुंटीला बांधली नाही. तथापि पर्यावरणाचे उमाळे जास्तच दिसतात.

मुंबआीत जी वसती वाढली, त्या अघोरी पापाला हे दांभिक पर्यावरणशास्त्री कारण आहेतच. ते आपापली गावे सोडून मुंबआीत आले, म्हणून तर आधुनिक सुखसुविधा करून देण्याची ही वेळ आली. आजही ते लोक मुंबईत जिथे कुठे राहात असतील त्या बिल्डिंगा पर्यावरणस्नेहीच आहेत काय? पाचसात मजली आिमारतींच्या खुराड्यांत राहणारी ही निसर्गप्रेमी माणसे, सभोवती किती झाडे लावून थकली ते आकडे जाहीर करावेत. शहरांतील झाडे वाचवायची, तसे प्लॅस्टिकही बंद करायचे आहे. या मंडळींनी प्रामाणिकपणे सांगावे की, त्यांनी गेल्या महिन्यांत किती बंधन पाळले! प्लॅस्टिक पिशवीतले दूध बंद केले? वाहनांचा वापर बंद केला? अेरवी शहरातल्या पैशासाठी जीव टाकणाऱ्या माणसाच्या या प्रजाती कधीतरी सटी-सहामासी ट्न्ेिंकग-पिकनिकला जाणार, फार तर सुटीला जोडणारी रजा टाकून `मामाच्या गावाला' जाण्यापुरती निसर्गाची सफर करणार, आणि अेरवी त्याच शहरांत वडापाव किंवा पिझ्झा-झोमॅटोवर आयुष्य झोकणार!
ऊर्जा आणि सुविधा हा प्रत्येक मनुष्यमात्राचा ध्यास असतो, त्याला हे पर्यावरणवादी अपवाद नाहीत. झाडे तोडू नयेत हे त्यांचे म्हणणे उत्तमच आहे, पण मग मेट्नेवर बंदी, मोटारींवर, पाणी वापरावरती बंदीच घालावी. तसे घडले तर फारच छान होईल; परंतु ते शक्य नाही -व्यवहार्य नाही. दुुसरा कोणताही पर्याय कुणीही सुचविला तरी त्यात असेच तोटे-फाटे निघतील. सरदार सरोवराच्या विरोधात मेधा पाटकर लढल्या, तो थांबला नाही पण पैसा आणि वेळ वाढला. आज ते स्थळ जगाला आकर्षित करत आहे. तिथल्या विस्थापितांचे पुनर्वसन व्हायलाच हवे, तसेच नवी झाडे लावली-जगवलीच पाहिजेत. आहे ते वाचविण्याचा हट्ट फार करून चालत नाही; नवे पर्याय निर्माण करण्याचे आग्रह धरले पाहिजेत. त्या मेणबत्ती मोर्चे कामाचे नाहीत, कुदळ फावडी घ्यावीत.

आजचे कायदे कधी पाळायचे आणि कधी ते झुगारून झुंडशाही करायची याचे अेक तंत्र ठरले असावे. या तथाकथित विचारवंतांच्या पात्रता आणि आिच्छा त्यांना किती याविषयी संशय वाटतो. आज कोणत्याही शहरात प्लॅस्टिक, सांडपाणी, जैवकचरा, आणि आिंधनधूर यांनी थैमान घातले आहे. हे  सारे पर्यावरणास घातकच आहे. त्यातल्या कोणत्याही निमित्याचा त्याग करण्याची बुद्धी या दांभिकांस होत नाही. स्वत:पुरते काही करता येआील, त्यासही त्यांची तयारी नसते, काहीतरी फाटे फोडून ती बंधने कशी चूकच आहेत याविषयी हे  लोक वितंडवाद घालतात; -कारण ते विचारवंत असतात. जगाचे कल्याण आणि संस्कृती फक्त त्यांनाच कळते असे त्यांना वाटते. मुंबआीचे अनेकानेक प्रश्ण सोप्या अुपायाने सोडवायचे असतील तर शासकीय राजधानी मराठवाड्यात हलवावी, किंवा या निसर्गप्रेमींनी मुंबआी सोडून निसर्गाच्या कुशीत कायमचे राहायला जावे.

पण ते होणार नाही. मुंबआीत राहून आपल्या ज्ञानाचा प्रसार करता येतो, ते कसे साधणार? अशांचा विरोध धरणांना, रस्त्यांना, आिंग्रजी शाळांना, आरत्या-गरब्यांना... सगळयाला असतो. या गोष्टी बरोबर आहेत असे मुळीच नाही; परंतु या विरोधकांनीच त्या साऱ्यांचा अवलंब करायचा आणि आितरांसाठी मात्र त्या विरोधात बोंबा मारायच्या असले हे थोर निसर्गप्रेम आहे. यांना `बसायला' कमोड लागते, शॉवर लागते, घराला पडदे लागतात, गाडी हवी, फ्रीजटीव्ही हे तर मस्टच, अॅक्रीलिक रंग हवेत... पण त्यासाठंी मजुरांची वसाहत नको, झाड तोडायचे नाही, वाळू उपसायची नाही, सांडपाणी सोडायचे नाही, लोकांच्या जमिनी घ्यायच्या नाहीत!! असला हा भ्रमिष्ट आणि दांभिक पुरोगामी साधेपणा आहे. स्वत:साठी आधुनिक वसाहतीत प्रशस्त बंगल्यातील राहणी हवी, पण तशीच आितरांसाठी सोय करावी म्हटली की यांना हज्जार समस्या सुचतात. पु.लं.नी अशा लोकांसाठी चांगले अुदाहरण दिले होते. `यांना नववधूची सोनपावले दिसत नाहीत, यांच्यापुढे कुटुंब-नियोजनाचा प्रश्णच उभा राहतो!!

कंकणाकृती सूर्यग्रहण
पुष्कळ वर्षांनंतर खग्रास सूर्यग्रहण भारतातून दि.१६ फेब्रुवारी १९८० रोजी दिसले. त्यानंतर दि.२४ ऑक्टोबर १९९५, ११ ऑगस्ट १९९९ , २२ जुलै २००९ रोजी झालेली खग्रास ग्रहणे पाऊस, हवामानाचा व्यत्यय यामुळे दिसलेली नाहीत म्हटले तरी चालेल.
दि.१५ जानेवारी २०१० रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम या भगागातून दिसले होते. यावर्षी दक्षिण भारताच्या काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. ही घटना दि.२६ डिसेंबर २०१९ रोजी अवलोकन करता येणार आहे. त्यातील काही प्रमुख शहरे म्हणजे मंगलोर,(मेंगालुरू), उटकमंड (उधगमंडलग्-उटी), पुदुकोहई, कोईमतूर, तिरूपूर, इरोड अशी सांगता येतील. प्रत्येक ठिकाणचा कंकणाकृती ग्रहण कालावधी वेगवेगळा आहे. त्या वेळा विविध पंचांगात दिलेल्या आहेत.
`उटी' अथवा उधगमंडलग् हे पर्यटकांचे हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे. येथे चहाचे मळे व दोडाबेटा हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर आहे. येथील वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डन) प्रसिद्ध आहे. `रामेश्वर' हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. रामेश्वरम् हे बारा ज्योतिर्लिंगातील एक स्थान, रामेश्वरमचे मुख्य शिवलिंग, २२ पवित्र पाण्याची कुंडे आहेत. श्रीरामांच्या पायाचे ठसे उमटलेल्या या गावातील टेकडीवरून चांगले दृश्य दिसते.
तामिळनाडूूमधील चेन्नई खालोखाल `मदुराई' हे महत्वाचे शहर मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. रंगीत कोरीव काम केलेली येथील कलात्मक गोपुरे लक्ष वेधून घेतात. १६व्या शतकात बांधलेले हजार कोरीव खांब असलेले सभागृह आहे. या कॉरिडॉर खांबांतून संगीताचे मधूर ध्वनी उमटतात. येथील `तिरूमल नायकर' महाल पाहण्याजोगा आहे. कोईम्बतूर हे एक औद्योगिक केंद्र. तिरूचिरापल्ली(त्रिची) येथील रॉकफोर्ट, तसेच गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. पुदुचेरी ऐतिहासिक अवशेष व मंदिरे आहेत. मंगलोर (मंगलुरू) हे कर्नाटकातील प्रसिद्ध शहर पश्चिम किनाऱ्यावरील बंदर आहे. येथे सुल्तना बॅटरी मंगलादेवी प्रसिद्ध आहे.
या सर्व ठिकाणांहून २६ डिसेंबरचे सूर्यग्रहण दिसेल. खंडग्रास कंकणाकृती खग्रास कोणतेही सूर्यग्रहण असो, ते उघड्या डोळयांनी निरीक्षण करायचे नसते. शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेल्या सुरक्षित ग्रहण चष्म्यातूनच पाहावे. अन्यथा डोळयाला रॅटीनाला इजा होण्याची शक्यता असते. डोळयाची सुरक्षितता जपणे महत्वाचे आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणात सूर्यबिंब बांगडीसारखे वलय दिसते. आपणास आवडत असलेल्या (कंकणाकृती अवस्था दिसत असलेल्या) भागातून ग्रहणाचे अवलोकन करावे. पर्यटनाचा आनंद द्विगुणित होईल. अंध:श्रद्धा दूर ठेवून ग्रहणाचा आविष्कार पाहावा. वरचेवर अशी संधी मिळत नसते.
-अनिरुद्ध भातखंडे, कांदिवली, मुंबई ६७
  फोन- ९९२०८४५९३१
जमिनीचे अमूल्य मोल
पूर्वीच्या काळी राज्यव्यवस्थेडून जमिनी व स्थावर इनामे दिली जात. युद्धांतील किंवा अन्य काही क्षेत्रांतील विशेष पराक्रम गाजविणाऱ्यास जमीन इनाम दिली जाई. त्याशिवाय काही विशेष जबाबदारीचे कार्य (वृत्ती) सोपवून, त्याचा मोबदला मिळत राहण्यासाठी इनाम देऊन खर्च चालविण्याची तरतूद केली जाई. कुलकर्णी, पाटील, पुजारी, देवालये, नर्तकी, येसकर यांनाही जमिनी इनाम मिळालेल्या असत. साधारणत: शिवशाहीपासून मराठेशाही संपेपर्यंत ती प्रथा होती. त्या संबंधाने कागदोपत्री स्पष्ट हुकूमनामे असत. वतननामा, कुलमुखत्यार, परगणा वगैरे शब्द आजही जमिनींच्या दाव्यात न्यायालयांच्या आवारात एैकू येतात.
मराठीशाहीतील फार्सीमिश्रित भाषा हे त्या इनामपत्रांचे वैशिष्ट्य असते. `मौजे मजकुरी जिरायत जमीन असेल त्यापैकी पड जमीन पाहून विसी पाडीयाचे बिघ्याने चौप्रतीचे चावर रास इनाम देऊन यास व याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालवणे.' अशी वाक्ये असत.
शिवकाळात जमीन मोजण्यासाठी काठीचा वापर करत. या काठीला `शिवशाहीची काठी' असेही बोलले जात होते. या काठीच्या लांबीबाबत सभासद बखरीत लिहिले आहे की, `५ हात ५ मुठीची काठी  हात १४ तसूचा असावा. हात व तसू मिळून ब्याएेंशी तसूची काठीची लांबी. अशा औरस चौरस वीस काठ्या टाकल्या की त्याचा १ बिघा होतो. आणि एका बिघ्याचे २० पांड होतात. म्हणून वीस पांडाचा बिघा, या परिणामानुसार अशा १२० बिघ्याचे १ चावर.
चौप्रतीची जमीन म्हणजे सर्वसाधारण अव्वल, दुम, सीम व चारहम असे जमिनीचे वर्गीकरण केलेले असते. अव्वल म्हणजे अव्वल प्रतीची, दुम म्हणजे दुुय्यम प्रतीची, सीम म्हणजे कनिष्ठ प्रतीची, आणि चारहम म्हणजे चौथ्या प्रतीची असे प्रकार होते. जिरायत जमिनीपैकी पड जमीन इनाम देण्याचे अनेक कागदपत्रांत लिहिलेले आढळते. रयतेचे आर्थिक जीवन शेतीशीच निगडीत असल्यामुळे ज्या नापीक जमिनी आहेत त्या जास्तीत जास्त पिकाऊ करण्यासाठी, त्या जास्त प्रमाणात लागवडीखाली आणण्यासाठी इनामे दिलेल्या असाव्या.
`दर साल ताजे सनदेचा उजुर न करणे तालिक लेहून घेऊन असेल पत्र फिराऊन मशार निले पासी देणे.' सरकारी काही सनदी पत्रात शेवटी समारोपाची अशी वाक्ये असतात. `दर वर्षी नवीन पत्र आणण्यासाठी इनामदारास हरकत करू नका' असा हुकूम असतो. परगणे अंमलदार बदलला आणि त्याच्या जागेवर नवीन अंमलदार आला की, गावातील इनामदारांना सरकारातून मिळालेली इनामपत्रे त्याला दाखवावी लागत. त्यामुळे ती सरकारातून परत दुमाला (रीन्यू) करून आणावी लागत होती. ते न करण्यासाठी असा हुकूम केल्याचा आढळतो. तालिक म्हणजे अस्सल पत्राची नक्कल. लिहून घेऊन अस्सल पत्र ज्यापाशी द्यावयाचे आहे `त्यापाशी ते परतोन देणे. जाणिजे छ.१२ जमादीलाखर.' अशी वाक्ये असतात.

आठवांचे साठव
वळणा वळणावर
मी पलूसच्या शाळेत ११वीला असतानाच तिथे शालांत परीक्षा मंडळाचे केंद्र सुरू झाले. साहजिकच तिथल्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून काम करण्याची संधी अुपलब्ध झाली. साधारण अेका पेपरला तीस रुपये याप्रमाणं पाच सहा पेपर मिळाले तरी शिक्षकाला दीडदोनशे रुपयांची जादा प्राप्ती होणार. आमचा भाऊ तिथे शिक्षक असल्याने त्यालाही संधी होती, परंतु त्यात अडचण अशी की मी त्याच्याच कुटुंबातील परीक्षार्थी असल्यामुळे नियमाप्रमाणे त्याला पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) करता येणार नव्हते. यावर त्याचा तोडगा असा की, मी आमच्या शाळेतले केंद्र घेण्याअैवजी आजवर प्रचलित असलेले सांगली केंद्र घ्यावे. सांगलीत माझी राहण्याची सोय, आणि आिकडे पलूसला पर्यवेक्षण करून भाअूलाही चार पैसे मिळतील असा त्यात विचार होता -आणि तो चुकीचाही नव्हता. पण मी त्यातून आणखी अेक आव्हानात्मक तोडगा सुचविला. त्या वर्षी विषयांची बरीच बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. मी अभ्यासात चांगलाच होतो. -म्हणून मी ते आव्हान घेतले. पलूसचेच केंद्र मी घेणार, आणि भाअूला परीक्षेच्या पर्यवेक्षणाचे जे पैसे मिळणार, त्याची भरपाई होआील आितकी किमान बक्षिसे मिळविणार. आमच्या आआीच्या मध्यस्थीने माझा प्रस्ताव मान्य झाला. परीक्षेचा निकाल लागला, आणि मला खरोखरीच गणित, संस्कृत या विषयांची, तसेच शाळेत पहिला आल्याचेही बक्षिस मिळाले, आणि भाअूच्या मानधनापेक्षा तिप्पट रकमेची कमाआी झाली.
मला चांगले गुण मिळाले, शिवाय संस्कृत होते. त्यामुळे मी आमच्या वाढत्या गावाची गरज म्हणून आयुर्वेदिक वैद्यकाचा अभ्यासक्रम निवडावा असा सर्वानुमते विचार झाला. साताऱ्याच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य बोडस हे माझ्या वडिलांचे स्नेही होते. वडिलांच्या बरोबर मी साताऱ्याला जाअून अेमअेफअेअेम् या कोर्सला प्रवेश घेतला. श्री बोडस यांनाही जरा आश्चर्यच होते. कारण ११वीला अेवढे गुण पडणारा विद्यार्थी या `साध्या' कोर्सला सहसा येत नाही, असा त्यांचा अनुभव त्यांनीच बोलून दाखविला होता. त्यामुळे माझा प्रवेश पक्का न करता, त्यांनी पैसे भरून घेतले नाहीत. तुमचा विचार बदलला तर प्रवेश रद्द करा, असे सांगून त्यांनी मोठे मन दाखविले. आणि नंतर खरंच तसे झाले. माझ्या नात्यागोत्यातल्या साऱ्यांनी मला येड्यात काढलं. अेवढं चांगलं करीयर आहे, आणि तुला डॉक्टरच व्हायचं आहे तर अेमबीबीअेस करून चांगला डॉक्टर हो.... हा सल्ला प्रतिष्ठेच्या बड्या कल्पनांतून सारेजण देत राहिले, आणि मी त्यास बळी पडलो. आयुर्वेदिक अभ्यासक्रमाची त्या काळात टवाळी होत असे. कोणीतरी गावठी वैदू रस्त्याने औषधी विकत फिरायचे; `जळवात्तावर औषेध, संदिवात्तावर' असे ओरडताना ऐकलं, की माझे दत्तूकाका चिडवत `तो बघ तुझ्या कॉलेजचा माजी विद्यार्थी आला.'
साहजिकच आता सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात सायन्सला प्रवेश घ्यायचा आणि आिंटरनंतर मेडिकलला जायचे असा मार्ग ठरला. मी विलिंग्डन कॉलेजात फॉर्म भरला. हे प्रतिष्ठित कॉलेज असल्यामुळे प्रवेशाची गर्दी ओसंडून वाहात होती. पैसे भरण्याआधी अुपप्राचार्य श्री तारे यांची भेटवजा मुलाखत प्रत्येकाने घ्यायची होती, म्हणून त्यांच्या खोलीत गेलो. आजवर वाडी किंवा पलूस अशा `आपल्यातल्या' शाळांतून वावरलेला मी, आिथल्या भव्यतेने आणि रुबाबाने बावचळलो होतोच. माझ्याकडचे गुणदाखले न्याहाळत तारेसरांनी विचारले, `आितके मार्क्स घेअूनही प्रवेश घेण्याला आितका अुशीर का लावला?' -मी कारण अुघड सांगून टाकले. त्यांचे समाधान झाले. ते म्हणाले, प्री डिग्रीला अेक विषय जादा घ्यावा लागतो, तुमच्या मागणीप्रमाणं तो मराठी घेता येत नाही -कारण त्या वर्गात फार गर्दी आहे. तुझं संस्कृत आहे तर तोच विषय घे. -सायन्सला प्रवेश घेअूनही मी ज्यास्तीचा विषय म्हणून संस्कृत घेतला, आणि विलिंग्डनला दाखल झालो.
कॉलेज सुरू झालं. नव्या ओळखी झाल्या. भले मोठे वर्ग, प्रयोगशाळा, मैदान... अेकूणातच हा माहौल वेगळा. सांगली शहरातून आम्ही मुलं कॉलेजात रेल्वेनं येत असू. सांगली-मिरज असा मीटरगेज रेल्वेचा फाटा होता. त्यावर वानलेसवाडी आणि विश्रामबाग ही दोन स्टेशन. त्यातलं विश्रामबाग हे कॉलेजचं. सांगली-मिरजेतून येणारी खूप मुलं मुली होती. त्यात सांगलीतली काही `डीलक्स' वर्गातली होती. आम्ही शाळकरी लेंग्यातली भटुर्डी होतो. तो गट वेगळा वावरायचा.

मेट्ने वुमन : आश्विनी भिडे 
मुंबईच्या वाहतुकीचा चेहरा आमूलाग्र बदलणारी मुंबई मेट्ने! हे आव्हान पेलणारी आणि पूर्णत्वाकडे नेणारी, आयएएस अधिकारी आश्विनी भिडे. सांगली येथे मराठी माध्यमात शिकलेली... दहावी-बारावी गुणवत्ता यादीत आलेली, मध्यमवर्गीय कुटुंबातून वाढलेली. वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून आर्ट्स्ला अॅडमिशन घेतली. स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वाचनाची आवड होतीच, झपाटल्यासारखा अभ्यास केला. परीक्षा, मुलाखत असे टप्पे पार करत आश्विनी १९९५ बॅचमध्ये भारतात महिलांमध्ये पहिली आली.
अधिकारी झाल्यानंतर सुरुवातीला इचलकरंजी, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी काम करत २००० मध्ये त्या नागपूरला जिल्हा परिषदेमध्ये चिफ ऑफिसर झाल्या. १९९९ मध्ये आयएएस अधिकारी डॉ.सतीश भिडे यांच्याशी लग्न झालं.
नागपूरमध्ये विकासकामांबरोबरच कमी खर्चात लघु जलसिंचन करणारे बंधारे उभारण्यावर त्यांनी भर दिला. वनराई संस्थेच्या मदतीने ही कामं केली. या बंधाऱ्याची नोंद `आश्विनी बंधारे' अशी आहे. या मोहिमेकडे सगळयांचे लक्ष वेधलं गेलं. या आधारेच ग्राऊंड वॉटर कॉन्झर्वेशन अॅक्टची अंमलबजावणीही झाली. महाराष्ट्नच्या राज्यपालांकडे उपसचिव म्हणून त्यांनी कामं केलं. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचं प्रलंबित काम कमी कालावधीत पूर्ण केलं, प्रसंगी ठाम भूमिका घेतली. काही निर्णयांना तत्कालीन राज्यकर्त्यांनी आव्हानही दिले, पण `न्याय्य भूमिका' हेच कामाचे सूत्र असल्याने पाठिंबा मिळत गेला.
एमएमआरडीएची जबाबदारी आल्यावर आव्हान वाढलं, क्षितिजही विस्तारलं. साहित्यामध्ये एमए केलेल्या आश्विनी आता इंजिनिअरिंगचे धडे घेऊ लागल्या. रोजच्या टेक्निकल टर्म समजून घेण्यासाठी जटिल इंजिनिअरिंग ड्नइंगचा कसून अभ्यास केला. टेक्निकलची आवड असणारे पती डॉ.सतीश भिडे यांचीही खूप मदत होती. याच काळात ईस्टर्न फ्रीवे, सहारा एलिव्हेटेड रोड हे त्यांच्या कार्यकाळात झाले.
आज मेट्ने रेल कॉर्पोरेशन (एमआरसी)मध्ये त्या मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर आहेत. धावणाऱ्या मुंबईचा वेग आणखी वाढवणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प.. मुंबई मेट्ने-३! ३३.३ किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर... कुलाबा ते आरे कॉलनी. प्रकल्प मोठा, अडचणी तितक्याच आव्हानात्मक! जमीन अधिग्रहण, पर्यावरण खात्याकडून संमती, रहिवाशांचे स्थलांतर; पुनर्वसन, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांमध्ये ते सगळं बसवणं... रोजचा दिवस नवं काहीतरी घेऊन येतो. प्रयत्न प्रामाणिक असतील तर उत्तरंही मिळतात. लोकांना चांगले इन्फ्रास्ट्न्क्चर हवं असतं पण त्यासाठी सुरुवातीला होणारा त्रास नको असतो. अडचणी आल्या तरी त्या सोडविण्यासाठी डोक्यात विचारचक्र सुरू हवं. २०२१ मध्ये शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सर्वच करताहेत. त्यांची भूमिका मात्र `मी एक माध्यम आहे' एवढीच. शासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना इथं देशासाठी, भारतीयांसाठी काम केल्याची भावना असते. वैयक्तिक पुरस्कारासाठी नाही...
प्रकल्प आला की त्यावर सोशल मिडीयामुळे उलटसुलट चर्चांना ऊत येतो. प्रत्येकजण मत मांडायला  उत्सुक असतो. मेट्नेबद्दलही हे होताना पाहिलं... कोणीही प्रत्यक्ष चर्चेसाठी, समजून घेण्यासाठी पुढे येत नाही... त्यांनी यावं. प्रकल्प आणि शासकीय यंत्रणा लोकाभिमुख झाल्या की अंमलबजावणी सोपी होईल. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून बघणाऱ्या, मराठीतलं -किंबहुना जगभरातलं साहित्य वाचणाऱ्या... चित्रपट बघून रसग्रहण करणाऱ्या, तत्कालीन मुदद्यांपेक्षा दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या गोष्टींवर बोलणं पसंत करणाऱ्या; स्वत:चं मत ठामपणे मांडणाऱ्या, या कर्तव्यकठोर अधिकारी!
मुलांना घडवताना सजग, सासरी-माहेरी भक्कम आधार म्हणून उभ्या. या प्रवासात त्यांच्या सासूबाई, पती, मुलं-जान्हवी-मल्हार, आणि आईचं मोठं योगदान आहे, तसंच आप्तेष्टांचंही. स्कंददेवता अशीच तर असावी... अष्टभुजा... अष्टावधानी!
-(श्रद्धा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीवरून)

लवचिक हवं
आपले दात वयोमानाप्रमाणे लवकर पडतात, पण जीभ शेवटपर्यंत टिकून असते. असे का व्हावे? वास्तविक जीभ तर जन्मापासून असते, दात बऱ्याच वर्षांनंतर येतात. जिभेचा वापर दातांपेक्षा जास्तच असतो. तरीही दात लवकरच पडतात. जिभेला  काही होत नाही. कारण जीभ मअू असते, लवचिक असते... ती टिकते. दात कठीण-कठोर असतात, ते पडतात.
***

अेकदा अेका महंताला भेटायला त्याचा स्नेही आला होता. बोलता सांगता मित्र म्हणाला, `अरे त्या बाबुरावाबद्दल भलतं अैकलं. काय सांगू तुला?..'
महंतानं काही अैकण्याआधीच त्या मित्राला थांबवलं. विचारलं, `तू मला त्या बाबुरावाबद्दल सांगणार, ती गोष्ट नक्की खरी आहे का?'
`माहीत नाही, कारण मघाशीच मी ते अैकलं.'
`बरं, पण जी गोष्ट मला तू सांगणार, ती त्या बाबुरावाच्या चांगुलपणाबद्दल आहे काय?'
`नाही रे, मी सांगू म्हणतो ते तर त्या बाबुरावाच्या वाआीटपणाचं आहे.'
`मग मला सांग, जे तू मला त्याच्याबाबत सांगणार आहेस ते माझ्या अुपयोगाचं, फायद्याचं तरी आहे का?'
`तसं काही म्हणता येणार नाही; पण मी आपलं तुला म्हणून सांगणार होतो. '
`मग मला माफ कर मित्रा. जी गोष्ट खरी असेल असं नाही, जी त्या बाबुरावच्या काही चांगुलपणाची नाही, जी माझ्या काही अुपयोगाचीही नाही, ती अैकून मी काय करू? अुगीच तुझा आणि माझाही वेळ कशाला बाद करायचा?'

संस्कृत -अध्ययन नव्हे, संस्कार!
शाळा नुकतीच सुरू झाली होती. वर्ग ८वी चा. नव्यानेच संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढून, ही भाषा किती साधी, सरळ आणि सोपी आहे ही मानसिकता तयार करण्याच्या प्रयत्नात होतो. नवनवीन शंकांचे अंकुर त्या बालमनात फुटत होते आणि मीसुद्धा त्यांना व्यवस्थित खत-पाणी पुरवत पुढे जात होतो. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मी नियमित अभ्यासक्रम सुरू करणार, इतक्यात मागच्या बाकावरून विशेष जिज्ञासूवृत्ती जागी झाली. ``सर, संस्कृत शिकून काय उपयोग? मला ना शिक्षक व्हायचंय, ना कुठे पूजा सांगायचीय! मग मी संस्कृत का शिकावं?''
चिमुकल्या डोळयांत एक वेगळीच उत्सुकता होती. प्रश्न रास्त होता. एके काळी ज्ञानभाषा असणारी संस्कृत आज शैक्षणिक अभ्यासक्रमात  वैकल्पिक(ऑप्शनल) झाली आहे. सद्यस्थितीत त्याची कारणमीमांसा करण्यापेक्षा त्याच्या यक्षप्रश्नाचं उत्तर देणं अधिक महत्वाचं होतं.
मी वर्गाला प्रश्न केला, `तुमचा आवडता शास्त्रज्ञ कोण?' स्वाभाविकच `आईनस्टाईन, न्यूटन, ग्राहम बेल, थॉमस एडिसन' अशी नावे समोर आली. पुढचा प्रश्न केला, `तुम्हाला माहिती आहे का, की या सगळयांना संस्कृत बोलता येत होतं?' यावर उत्तर तेच होतं, जे आपल्यापैकी  बऱ्याच जणांच्या मनात तत्काळ आलं असेल! `सर थापा नका मारू'. पण (दुर्दैवाने) ही गोष्ट खरी आहे.
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एकदा भारतीय शास्त्रज्ञ डॉ.गुप्ता यांच्याशी संस्कृतमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ.गुप्ता यांनी त्यांची क्षमा मागून, त्या संदर्भात आपली असमर्थता प्रकट केली. तेव्हा स्वत: आईनस्टाईन आश्चर्यचकित झाले व म्हणाले, `तुम्ही मूळ भारतातून आलात, ते तर हिंदू तत्वज्ञानाचे माहेरघर. आणि तरीही तुम्ही तुमची मूळ भाषा शिकायला असमर्थ आहात! चला माझ्यासोबत, माझं ग्रंथालय पहा. तिथं संस्कृतमधली अभिजात संपदा माझ्या संग्रहात आहे.'('र्धेी हरळश्र षीेा खपवळर ुहळलह ळी ींहश हेाश ेष कळपर्वी हिळश्रेीेहिू, ूशीं र्ूेी हर्रींश पेीं रलश्रश ींे श्रशरीप र्ूेीी ोींहशी श्ररपर्सीरसश. उेाश रश्रेपस, ीशश ाू श्रळरलीरीू ुहळलह ींीशर्रीीीश लश्ररीीळली षीेा डरपीज्ञीळींरा')
सद्य परिस्थिती ही केवळ संस्कृत शिक्षकालाच नव्हे तर प्रत्येक भारतीयालाच अंतर्मुख विचार करायला लावणारी आहे. भाषिक वाद, वर्णद्वेष, धार्मिकतेचे आणि आरक्षणाचे मुद्दे थोडे बाजूला ठेवून जातीभेदांची कुंपणे ओलांडून संस्कृतकडे एक ज्ञानभाषा म्हणून आपण कधी पाहणार? अमेरिकेने वेदांना  थेीश्रव कशीळींरसश' म्हणून घोषित करावं, जर्मन आणि रशियाने पहिलीपासून संस्कृत शिकवावं, `पंचतंत्राचा' अभ्यास अमेरिकेतील एम.बी.ए.साठी सक्तीचा असावा, अन आपण मात्र हा विषय `वैकल्पिक विषय' म्हणून बाजूला टाकावा?
दि. १६ जुलै १९४५, वेळ पहाटे ५:३०. अमेरिकेने अलामागार्डो भूदलाच्या बिकिनी बेटावरील हवाई तळावर उंच मनोऱ्यावर पहिला अणुस्फोट केला; याचे किमयागार होते डॉ.रॉबर्ट ओपेनहायमर! या स्फोटाचे वर्णन करताना उत्स्फूर्तपणे त्यांना भगवद्गीतेतील श्लोक स्फुरला.
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्यु्रगपदुत्थिता ।
यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ।।
जरी आकाशात एकाच वेळी हजारो सूर्यांचा उदय झाला तरी त्या सर्वांचा प्रकाश एकत्र येऊनसुद्धा त्या भगवंताच्या विराटरूपाच्या प्रकाशाची बरोबरी होऊ शकणार नाही. (सदर प्रसंगाची चित्रफित यूट्यूबवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी जरूर पहावी.) या प्रसंगी हेच शब्द का स्फुरावेत? यापुढची घटना अधिक विचार करायला लावणारी आहे. या स्फोटानंतर विज्ञान परिषदेच्या निमित्ताने हेे शास्त्रज्ञ पुण्यात आले होते. भगवद्गीतेने प्रेरित झाल्याने त्यांनी येथील धार्मिक स्थळांना भेटी देण्याची इच्छा व्यक्त केली. आळंदी जवळ असल्याने त्यांना तेथे नेण्यात आले. देवस्थानाजवळ जाताच डॉ.ओपेनहायमर लहान मुलासारखे धावत सुटले आणि थेट जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीस घट्ट मिठी मारली व ढसाढसा रडू लागले. त्यांनी सांगितले, `या ठिकाणी इतकी ऊर्जा आहे की माझा `अणुबॉम्ब' यासमोर काजव्यासारखा आहे.'
दोन्हीही प्रसंगांचा विचार करता धार्मिक ग्रंथांवर टीका करणाऱ्यांनी कधी तरी आपलं वय, त्यामानाने आपलं (अ)ज्ञान, आध्यात्मिक परंपरेबद्दल बिनबुडाचे पोकळ आणि केवळ स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी तयार केलेले विचार, समोर उभी असणारी अखंड अव्याहत प्रवाही असणारी आध्यात्मिक परंपरा यांची गोळाबेरीज करून पाहावी. `ब्रह्मसत्य जगन्मिथ्या' हे सांगताना आपले आचार्य कोणत्या स्तरापर्यंत पोहोचले असतील? आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत तेव्हाच कळते, जेव्हा ती दुसरा कुणीतरी घेतो! आपल्या अडगळीत किती आणि काय किंमतीचे साहित्य पडले आहे, याची शुद्ध आम्हाला नसते.
आज कित्येक परकीय लोकांचा भारताकडे ओढा वाढलाय, तो भारतीय भाषा आणि भारतीय तत्वज्ञान शिकण्यासाठी. म्हातारपणी हे सगळं वाचणं म्हणजे वस्तू वापरून झाल्यावर युझर मॅन्युअल वाचण्यासारखं आहे. गीतेने जगाला वेड लावलं. पंटम थेअरीसारख्या शाखांचा शोध हा गीतेतून लागला असं एडविन श्रोडिंगर सांगतो. हे लोक तर परधर्मीय होते. त्यांनी जर धार्मिकता मानली असती तर इतके संशोधन करू शकले नसते.
डॉ.अब्दुल कलाम, डॉ.माशेलकर यांसारखी माणसे कधी या वादांत भाग घेताना दिसत नाहीत; ते त्यांना आपल्यापेक्षा कमी कळतं म्हणून का? स्वत: अब्दुल कलाम वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांचे वाचन केल्याचे सांगतात. एखादा नियम, तत्व अथवा ग्रंथ समजावणाऱ्याने नीट समजावले नाही, किंवा समजून घेणाऱ्याने ते अर्थपूर्ण समजून घेतले नाही, तर पुढे होणाऱ्या चुकीच्या समजुतींसाठी तुम्ही धर्मग्रंथातील तत्वांना आणि ते लिहिणाऱ्या ऋषीमुनींना जबाबदार धरू शकत नाही. सद्यस्थितीत मानवी विचारांच्या मर्यादा व संकुचितपणामुळे या गोष्टी घडतात. अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात, `शास्त्रज्ञ एवढ्याच गोष्टी शोधून काढतात की ज्या आधीच `त्या' महान शास्त्रज्ञाने (मास्टर सायंटिस्ट्) बनवून ठेवल्या आहेत. मी विज्ञानाच्या जितका जास्त जास्त अभ्यास करतो, तसतसा माझा देवावर जास्त जास्त विश्वास बसतो. डिलळशपींळीीं लरप ेपश्रू वळीर्लेींशी ींहश ींहळपसी ुहळलह हरी लशशप रश्रीशरवू लीशरींशव लू ींहश ारीींशी ीलळशपींळीीं 'ऋजऊ'. ढहश ोीश ख र्ीींीवू ीलळशपलश ींहश ोीश ख  लशश्रळर्शींश ळप 'ऋजऊ'.ेर् हा संस्कृतीचा ओघ संस्कृतमुळं उमगेल हे त्या आठवीच्या मुलांना कोण कसं सांगणार?
- संकलन - वासुदेव दिवेकर, सांगली
                                                                        फोन-९४०३५७११४८

उपाधींचा आवाजवी वापर
स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही नावामागे (व पुढेही) काहीतरी उपाधी लावण्याची रीत, हौस व रूढी आहे. बोलताना त्या व्यक्तीबद्दल आदर (असला तर) दाखविण्यासाठी तशा उपाधी सहसा वापरत नाहीत; परंतु लिहिताना मात्र त्याबाबतीत कुणी हयगय करीत नाही. त्या उपाधींचे अवडंबर  इतके वाढले की, आता त्याचे ओझे वाटू लागले, याविषयी `अंतर्नाद'मध्ये -२०१२च्या अंकात एक पत्र प्रसिद्ध झाले होते, ते देत आहे. भानू काळे यांची त्यावर प्रतिक्रियाही शेवटी आहे.
आपल्याकडे सर्वत्र डॉ.आंबेडकर, डॉ.कदम, लो.टिळक, अॅड.विक्रम असे उल्लेख होत असतात. बराचसा मजकूर-लेख वगैरे असेल तर तसा उपाधींचा उल्लेख एकदा करणे ठीक असते. सारखे सारखे `डॉ.' लिहिण्याची आवश्यकता नाही. अशा उल्लेखाने वाचकांची व जनतेची दिशाभूल होत राहते की, आंबेडकरांचे मोठेपण त्या उपाधीत दडलेले आहे! अर्थात ते खरे नाही, `भारतरत्न' या उपाधीतही नेहरूंचे, सी.व्ही.रामन यांचे वा आंबेडकरांचे मोठेपण नाही, गांधीजींचे `महात्मा'मध्ये नाही. उपाधींत मोठेपण असते हे म्हणणे उघडच पोरकटपणाचे होईल. या सर्वांचे मोठेपण यांच्या जीवनभरच्या कार्यात, लेखनात, विचारांत आहे. सारखे सारखे ही व इतर उपाधी उपयोजण्यामुळे महत्वाच्या गोेष्टींचा विसर पडत चालला आहे, म्हणून हा आक्षेप! कोणत्याही उपाधी उपयोजू नयेत. आंबेडकरांच्या नावाला उपाधी लावायच्या, परंतु त्यांचे विचार मात्र विसरून जायचे हा आजचा खाक्या आहे!
हा आक्षेप एकूणच अनेक बाबींसंबंधात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्नत वृत्तपत्रे, लेख, स्फुटे, पुस्तके, रस्त्यावरील फलक, घोषणापत्रके, वृत्तपत्रांतील अधिकृत-अनधिकृत जाहिराती, या सर्व मराठी लेखनात उपाधींचे उपयोजन अवाजवी वाढले आहे. त्यामागे हीच चुकीची भावना आहे, की व्यक्तींचे महत्व उपाधींत असते. `डॉ. प्रा., पद्मश्री-पद्मभूषण, भाविसे, भाप्रसे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, बाई, ताई, दीदी, दादा, राव जी, साहेब, माननीय, विश्वभूषण, जगद्गुरू' या उपाधींचा सुळसुळाट झाला आहे, सर्व उपाधींना मासळीबाजाराचे स्वरूप आले आहे. त्या सारख्या उपयोजून काय लाभ होतो? व्यक्तीचे माहात्म्य वाढते? व्यक्तीचा खरा गौरव होतो? नवीन माहिती मिळते? व्यक्तीविषयी वाचकांचा आदर वाढतो? उलट व्यक्तीची महत्ता या क्षुल्लक संज्ञांमध्ये अडकून, वाचकांच्या व श्रोत्यांच्या पुढे ती येतच नाही. आली तरी तिला महत्व दिले जात नाही. भारतीय शासकीय सेवा, स्थलसेना, नौसेना, वायुसेना यांतील निवृत्त अधिकारी त्यांच्या उपाधी आवर्जून लावतात, त्यापुढे कंसात `निवृत्त' असे उल्लेख करतात. उदाहरणार्थ `मेजर (निवृत्त)'. ज्या लेखनात एखादी व्यक्ती अमक्या सेवेमध्ये वा सेनेमध्ये होती हे असंबद्ध असेल (म्हणजे मंत्रालय, शासकीय व आपापसांतील पत्रव्यवहार, इत्यादी सोडून) तेथे हा आक्षेप घ्यायला पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याने मासिकात लेख, कथा वा कविता लिहिली, तर त्या अधिकाऱ्याचे पद काय आहे वा होते हे असंबद्ध आहे. ब्रिटन-युरोप-अमेरिकेत नको तेथे पदे लिहिण्याची पद्धत नाही. प्राध्यापक, डॉक्टर, वकील, भाप्रसे इत्यादींनीसुद्धा उपाधीचा आग्रह (हट्ट?) धरू नये. उलट विरोध करावा. `टाईम' या प्रमाण साप्ताहिकात, उदाहरणार्थ, ओबामांचा उल्लेख प्रथमत: एकदाच `प्रेसिडेंट ओबामा' असा असतो, कधी तोही नसतो; त्यापुढे केवळ `ओबामा' असा. भारतात हीच पद्धत अवलंबायला पाहिजे.
भारतामध्ये मृत व्यक्तींना उपाधी प्रदान करण्याचे अनिष्ट युग चालू झाले. सरदार पटेल, मौलाना आझाद, लाल बहादुर शास्त्री, कामराज, सुभाषचंद्र बोस, आंबेडकर, विनोबा भावे, राजीव गांधी, गोपीनाथ बार्डोलाय यांना मरणोत्तर काही वर्षांनी `भारतरत्न' उपाधी दिली गेली. आता मागणी आहे, की फुले पतिपत्नी, ध्यानचंद व इतर काही व्यक्तींनाही ती द्यावी. हेही पूर्णत: अयोग्य आहे. तसे करायचे असेल तर गौतम बुद्धापासून आर्यभट, वराहमिहिर, भास्कराचार्य, शंकराचार्य, कालीदास, राणा प्रताप, तुलसीदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी, पहिला बाजीराव, टागोर, लाला लजपतराय, टिळक, गांधीजी यांच्यापर्यंत शेकडोंना ती द्यायला पाहिजे! याला अंतच नाही. उपाधी, पुरस्कार, पारितोषिक इत्यादी अशा प्रकारे सवंग झाले, की त्यांचे महत्व लयाला जाते.
सर्वांत प्रतिष्ठेचा विश्वव्यापी नोबेल पुरस्कार मृत व्यक्तींना द्यायचा नाही, अशी तरतूद आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्यूपत्रातच करून   ठेवली आहे. सातव्या एडवर्डने १९०५मध्ये चालू केलेला ब्रिटनचा ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च पुरस्कारसुद्धा मृत व्यक्तींना द्यायचा नसतो. इतकेच नाही तर कोणत्याही एका काली केवळ २४ व्यक्ती `ओ एम' असू शकतात. त्यांतील एखादी व्यक्ती मृत्यू पावली तरच आणखी एका व्यक्तीला निवडले जाते. यातील उद्देश हा, की सवंगपणा उत्पन्न होऊ नये. त्यामुळे असेही म्हटले जाते, की `ओ एम' हा पुरस्कार नोबेल पुरस्कारापेक्षाही उच्च आहे. असा शहाणपणा भारतीयांच्यात, मराठी लोकांच्यात उत्पन्न होणे कठीण दिसते.
कोठूनतरी, कोणीतरी, केव्हा तरी या अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यात आरंभ केला पाहिजे. पत्रलेखक, इतर लेखक-कवी-समीक्षक, मुद्रित साहित्यातील कोणाचीही नावे, अशा सर्व ठिकाणी सर्व उपाधी गाळाव्या. माध्यमांनी अनुकरणीय उदाहरण घालून द्यावे.
-अरविंद पारसनीस, एफ १७/१८ चैत्रबन रेसिडेन्सी, १२७/२ आैंध, पुणे ०६

माझी स्वच्छता मोहीम
                                        -स.वा.तिरशिंगे
आपल्या प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेची मोहीम काढली आहे, हे मला ठाअूक होतं. त्यांनी पाच वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून तसं जाहीर केलं होतं. पण मी ते अैकून सोडून दिलं होतं. आपल्याशी त्या मोहिमेचा काही संबंधच नव्हता. ते आणि त्यांचे मंत्रीमंडळ पाहून घेतील. कधीतरी गावाकडं जाताना कुठल्याही खेड्याच्या वेशीबाहेर `हागणदारीमुक्त निर्मल ग्राम' असे बोर्ड दिसू लागले. -म्हणजे ते गाव `मुक्त-हागणदारी'चे आहे, हे रस्त्याकडं स्वस्थचित्त तंद्रीत बसलेल्या मंडळींकडून कळायचं. त्यांचाही नाआिलाज. ते तरी शरीर-स्वच्छता मोहीम कुठं करणार ना!
साऱ्या वातावरणात हल्ली स्वच्छतेचे मंत्र दुमदुमत असतात, ते अैकून मलाही या मोहिमेत भाग घेण्याची अुबळ आली. सकाळी अुठता अुठता मला माझं अस्वच्छ घर खायला अुठलं. अनायासे दिवाळी जवळच आलेली. चार पाहुणे यायची शक्यता होती. म्हणून म्हटलं आपणही प्रधानमंत्र्याना सबका साथ द्यावा. अुठलो, चहापाणी झालं, पेपर वाचून झाला, पायरीवर थोडा वेळ विश्रांती झाली. जांभया देअूनही कंटाळा आला. मग मात्र `आता कामाला लागू'... म्हणत मी स्वच्छतेच्या  मोहिमेला भिडलो. सुरुवात कुठून करावी याचा  निर्णय करण्यात काही वेळ गेला, आणि मी पायताणाला हात घातला.
दाराशी फडताळ होतं, त्यातून सारी पायताणं गदागद बाहेर ओढून काढली. कान तुटकी, पट्टे तुटकी, टाचा निखळलेली अशी सारी रास पडली. शिवाय काही भरजरी मोजडी होती.  विविध रंगी मोजे दहाबारा निघाले. शक्य तेवढ्या जोड्या जुळवा करून मी हिला हाक मारली.यातल्या कोणत्या चपला ठेवायच्या असं विचारलं. त्यात नातवंडांच्या बारशाला आलेले कापसाचे बूट होते. आमच्या घरगड्याचे नालबंद रप्पेटबाज डब्बल-टाची अेकच पायताण होते. माहेरहून हिनं पहिल्यांदाच आणलेलं नाजूक कलागतीचं चप्पल होतं. नातवंडं तर आता मोठी झालीत, म्हणून मी त्यांची बाल-पायताणं बाजूला काढली. `अहो, त्यांच्या बालपणीची आठवण आहे ती, असूदेत.' असं म्हणून ती परत  कपाटात गेली. लग्नापासूनची पादत्राणं `हल्ली अशी मिळतात तरी का?'- म्हणून ती ठेवायचं ठरलं. माझे  झिजलेले जप्पलजोड मात्र दूर ढकलले गेले. त्यातले काही अंगठाविहीन होते. खाली काढलेल्या अठ्ठावीस जोड्यांपैकी माझे अेकूणात पाच नग (जोड्या नव्हे) वगळता, बाकी सारा सरंजाम पुन्हा कपाटात रचला गेला.
आता औषधांचं कपाट काढलं. त्यात भरमसाठ गोळयांच्या अर्धवट खाल्लेल्या कचकडी पट्ट्या होत्या. काही बाटल्यांतलं औषध थोडं प्यालेलं, काही तशाच काठोकाठ भरलेेल्या होत्या. साऱ्यांची मुदत संपलेली असावी, कारण ती तर कुठं दिसतच नव्हती. पण किंमत छापील असेल आणि ती बरीच महाग असेल तर `कशाला टाकायची?' म्हणून ती बाटली परत जाग्यावर गेली.  मलमांच्या ट्यूबा बऱ्याच सापडल्या. टाचेचं मलम, कंबरेचं मलम, जिभेचं, दातांचं, नुसतंच कसलं तरी... अशा पाचपन्नास ट्यूबा होत्या. `अेकदा आपल्या डॉक्टरला  दाखवून पाहू.. ' असं ठरवून त्या साऱ्या ट्यूबा पुन्हा कपाटात गेल्या. ज्या बाटल्यांत अगदीच थोडं औषध शिल्लक होतं त्या बाटल्या, भंगार बाटलीवाल्याला देअू म्हणून राखीव ठेवल्या.
बाकीचं सामान आटोपल्यावर देवघराकडं वळलो. तिथं कितीतरी पुड्या, अंगारे, अर्धवट जळलेल्या उदबत्त्या-धूपकांड्या, गंधगोळया, झिजकी चंदनखोडं असा मालमसाला होता. ओटीचे  तांदूळ गहू अशा पुरचुंड्या होत्या, त्या मुंग्यांनी अर्धवट खाल्लेल्या दाण्यांच्या राहिलेल्या. काही महाराजांच्या फोटोंना मागच्या बाजूला कसर लागलेली होती. ती काढू गेलो तर पाठचा सारा पुठ्ठा निखळला आणि त्याची काच खाली पडून तिचं खळ्ळ खट्याक् झालं. नारळ खुडखुड वाजत होते, ते फोडले तर काळेकुट्ट गंुंड बाहेर आले. `हे देवाचे नारळ फोडलेत कशाला?' -  असा हिनं ओरडा केल्यावर मी हात आखडता घेतला. ज्या पुड्या पुरचुंड्या होत्या त्या प्रत्येकीचा आितिहास हिला पाठ होता. `ही पुडी नरसोबावाडीची, ही गोंदवल्याची, हा अंगारा औदुंबरचा, ही ओटी आपल्या पहिल्या ज्येष्ठातली...' अेकूणात त्या साऱ्या ब्रह्मांडाची परत देवघरात प्राणप्रतिष्ठा झाली. हा धर्मिक श्रद्धेचा भाग  असल्यानं या धर्मनिरपेक्ष राज्यात ती दुखवता येणारी नाही.
आता कपडे! माझ्या लहानपणीच्या जरीच्या कुंचीपासून नातवंडांच्या शाळेतल्या नेकटायपर्यंत कायकाय म्हणून ठेवावं, काय काय टाकायचं? माझे वडील म्हणायचे, सगळयात कमी गरज कपड्यांची. दोन धोतरं पुरतात; अेक  दांडीला अन् अेक **ला!! आिथं तर बरेच कपडे असे होते की, ते कुठं घालायचे आणि ते स्त्रीचे की पुरुषाचे ते  मला कळत नव्हतं. माझी कुंची पाहून मला आआीची आठवण झाली, आणि भरल्या डोळयांनी मी सारे कपडे पुन्हा आत भरले.
माळयावर डोकावलो, तिथलं बरंच सामान `कधीतरी लागतं' म्हणून ठेवलेलं. पत्र्याचे डबे, चाळणी, बंद कंम्प्यूटर, बिनदांड्याची कुदळ यातलं काय टाकणार? नीट दुरुस्त करून ठेवू कधीतरी, असं म्हणून ते पुन्हा जागेला भरलं. अंगणात विटा-वाळू विस्कटून पडली होती, ते तर भलतं महाग असतं. त्यातल्या  कशाचाही अुपयोग तूर्त नसला तरी आितक्या मोला महागाआीच्या वस्तू टाकायच्या कशा? शेवटी मी थकलो. जवळजवळ चार तास स्वच्छता मोहीम राबविल्यामुळं मी फारच अस्वच्छ झालो होतो. सुटीची सकाळ बरबाद झाली. कुकरची शिटी आतून  वाजली आणि मी भानावर आलो. गेल्या आठवड्याभरात साठलेली आंघोळ करण्यावरच  मी माझ्यापुरती माझी स्वच्छता मोहीम आटोपली आणि गांधीजींच्या फोटोला नमस्कार करून जेवायला बसलो.
                                           -अशोक तेलंग, सांगली     फोन- ९८६०६७५५७५

कप आणि कॉफी
एका शिक्षणसंस्थेतून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी विविध क्षेत्रातील मोठमोठ्या पदांवर काम करीत होते. ते एक दिवस ठरवून आपल्या संस्थेत आले. आपल्या शाळेला - आपल्या वर्गाला भेट देऊन ते सगळेजण त्यावेळच्या आपल्या प्राध्यापकांस भेटायला त्यांच्या घरी गेले. नमस्कार झाले, गुच्छ दिला. सभोवार सारे बसले. प्राध्यापक आता झुकलेले. त्यांनी मोठ्या थर्मासमधून कॉफी आणवली, घरातून कप आणले ते मात्र सगळे वेगवेगळे. एक काचेचा, एक चिनी मातीचा, एक प्लॅस्टिकचा. एखादा ऐटदार महागडा तर एखादा चिरका, कानतुटका. काही अगदी साधे-स्वस्तातले. सगळया कपात कॉफी ओतली गेली. गप्पांच्या ओघात सगळयांची पदं, मोठेमोठे हुद्दे, अधिकार सांगण्यात आले. ``या नोकरी धंद्यात खूप मोठे झालो, पण ताण-तणाव-धावपळ-काळजी खूप वाढली; स्पर्धा असते....'' यावर सगळयांचं एकमत होतं.
प्राध्यापक म्हणाले, ``पोरांनो, तुमच्या लक्षात आलंय का? कॉफीसाठी तुम्ही उचलून घेतलेत ते कप क्रमानं भारी भारी घेतलेत. साधे कप तिथेच राहिले. तुम्हाला सर्वोत्तम ते हवंय, पण त्याचा हेतू काय हे कळलेलं नाही. इथं ताण-तणाव सुरू होतात. तुम्हाला खरं तर कॉफी हवी होती, कप नव्हे. तरीही तुम्ही एकेकानं आधी चांगले कप उचलले. दुसऱ्याच्या हातातील कपाकडं जराशा असूयेनं पाहिलं.
``आयुष्य `जगणं' हे त्या कॉफीसारखं आहे. तुमचे व्यवसाय, पैसा, पद, प्रतिष्ठा हे कप आहेत, जीवन धारण करण्यासाठी! कपांच्या मागे लागू नका, कॉफीला प्राधान्य द्या. ताण वाटणार नाही, - आनंदात राहाल.''

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन