Skip to main content

25 Nonember 2019

स्वामीनिष्ठ सेवेची ती कथा
कोकणभूमी निसर्ग संपत्तीने समृद्ध असली तरी गेल्या तीनचारशे वर्षांत तिथे दारिद्र्य आणि खडतर जीवन यांस तोंड द्यावे लागत होते. त्यास कंटाळून आपले नशीब काढण्यासाठी महत्वाकांक्षी लोक स्थलांतर करीत. १८व्या शतकात अनेक ब्राह्मण कुटुंबे देशावर आली, आणि पुणे मुंबआी, सातारा वाआी, सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी स्थायिक झाली. रत्नागिरीजवळच्या सोमेश्वर येथील रघुनाथ केळकर हे अशांपैकी अेक. ते वाआीला आले. त्यांचा मुलगा बाळकृष्ण हुशार होता. अैन अुगवत्या वयात त्याच्या हुशारीची ख्याती, सातारचे (शेवटचे) छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कानी पडली. त्यांनी बाळकोबास बोलावून घेतले. त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांत लवकरच तो सामील झाला. हिंदुस्थानात ब्रिटिश अंमल स्थिरावला होता. संस्थाने खालसा करून त्यांची खाजगी मालमत्ता, थोडाबहुत तनखा, आणि अगदी मोजके सैन्य पदरी ठेवण्याची मुभा होती.
१८५७ सालचा स्वातंत्र्यसंग्राम आितिहासात गाजला; परंतु त्याआधीही ब्रिटिश राजवटीविरुद्ध अुठाव करण्याची कारस्थाने चालू झालेलीच होती. सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी बाळकोबा केळकरामार्फत अुत्तरेच्या होळकर-गायकवाड-शिंदे, नागपूरकर भोसले, दक्षिणेचे पटवर्धन-निजाम-म्हैसूरकर आित्यादी राज्यप्रमुखांशी संधान बांधले. बाळकोबानी वेषांतर करून त्या साऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. अुठाव केव्हा-कसा-कुठे करायचा याबद्दलची जुळवाजुळव केली होती.
तशी तयारी चालू असतानाच तिकडे आिंग्रजाच्या गोटातील खबर समजायलाच हवी म्हणून बाळकोबांनी महाराजांच्या परवानगीने आपला माणूस आिंग्रज अधिकारी कर्नल ओव्हान्स याच्याकडे पाठविला. `काही महत्वाचे बोलणे करायचे आहे, तर मी आपल्या भेटीस यावे काय?' असा निरोप त्यांनी पाठविला. त्याप्रमाणे ओव्हान्सची भेट घेतली, त्यास सांगितले की, `महाराजांना राजद्रोही कटात गोवता येआील असा पुरावा माझ्याकडे आहे.' साहेबाचा विश्वास बसला नाही.  पुढे पाहूया, असे म्हणून बाळकोबास वाटेला लावले आणि बाळकोबावर नजर ठेवण्याची व्यवस्था केली.
आिंग्रजाचा मनसुबा कळणे महत्वाचे होते. म्हणून बाळकोबाने दुसरी अेक खेळी केली. महाराजांच्याच माहितीचे तीनचारशे लोक गोळा केले, व महाराजांविरुद्ध बंडाचा कट रचून बराच धुमाकूळ घातला. कर्नल ओव्हान्सला आता वाटू लागले की, बाळकोबा निश्चितच महाराजांविरुद्ध आहे. यानंतर आिंग्रजांच्या गोटात बाळकोबाचा वावर वाढला. तेथील बातम्या सावधगिरीने तो महाराजांना कळवू लागला. बाळकोबा त्याच्या कटाबद्दल तर काहीच बोलत नाही म्हणून साहेब बेचैन झाला होता. त्यास विचारल्यावर तो म्हणाला की, मी आपल्या भेटीस चोरून लपून येतो हे महाराजांना समजलेले असावे; माझ्या पाळतीवर महाराजांची माणसे असल्याचा मला संशय आहे.
हे सारे कारस्थान बाळकोबाचा मावसभाअू -आडनाव खरे, याला माहीत होते. तो पैशाच्या आशेने फितुर झाला व त्याने ओव्हान्सला खबर दिली. ओव्हान्सने बाळकोबाला अटक करून वाठार रस्त्यावरच्या पांढऱ्या किल्ल्यात कैदेत टाकले. बाळकोबाच्या बायको-मुलासही आपल्या बंगल्याच्या आअूट हाअूसमध्ये नजरकैदेत ठेवले. कैदेत बाळकोबाचा अनन्वीत छळ सुरू झाला. आितर संस्थानिकांकडून महाराजांना अुठावासाठी मिळू शकणाऱ्या मदतीसंबंधीची कागदपत्रे बाळकोबाकडे होती, छळाला कंटाळून ती बाळकोबाकडून आिंग्रजांना मिळाली असती तर महाराजांनाच आिंग्रजांनी अघोरी शासन केले असते, म्हणून महाराज चिंताग्रस्त होते.
महाराजांकडे संडास सफाआी करणारा मेहतर किल्ल्यात त्याच कामासाठी जात असे. तो फार विश्वासू होता. महाराजांचा व बाळकोबांचा निरोप तो परस्परांस पोचवीत असे. मेहतर संडास साफ करण्यासाठी गेला असता त्याने महाराजांचा निरोप दिला, `मनसुबा काय आहे?' संडासापाशी पडलेल्या अेका पिंपळपानावर बाळकोबाने कोळशाने लिहिले, `ब्रह्मबीज आहे, निष्काळजी असा.' त्या मेहतराने मुंडाशात पान लपवून दुसऱ्या दिवशी महाराजांस ते दिले. हा निरोप वाचून महाराजांस हायसे झाले, त्यांचा जीव भांड्यात पडला.
या वेळी जर बाळकोबा फितुर झाला असता तर त्यास कदाचित ८-१० गावांची जहागीर मिळाली असती; परंतु महाराज आणि त्यांच्याबरोबर कटात सामील होणाऱ्या अन्य संस्थानिकांची काय स्थिती झाली असती? या बाळकोबा केळकराने आिमान राखले. झडत्या झाल्या, कुटुंबाकडचेही जडजवाहिर जप्त करून त्यास तुरुंगात टाकले. बाळकोबाची पत्नी  लक्ष्मीबाआी हिला आिव्हान्ससाहेबाच्या बायकोने विश्वासात घेतले. केळकर दांपत्याची सर्व मुले गोरीपान, देखणी होती. त्यांना ती आिंग्रज बाआी जवळ घेअून खाअू देआी, त्यांचं कौतुक करीत असे. आमिष दाखवून लक्ष्मीबाआीकडून काही सुगावा लागतो का, याचा ती धूर्त बाआी प्रयत्न करीत असे. पण ते प्रयत्न निष्फळ झाले. पण मग ते कागदपत्र होते तरी कुठे, -ज्या कागदपत्रांवर महाराजांचे भवितव्य अवलंबून होते?
ते कागदपत्र बाळकोबांनी आपल्याजवळ ठेवलेले नव्हते; -तर सांगली जिल्ह्यात विट्याच्याजवळ श्री रेवणसिद्धाचा डोंगर आहे, त्या मूळस्थानीचा पुजारी जंगम होता, त्याच्याकडे ते ठेवायला दिलेे होते. तोही पूर्णत: विश्वासू. कागदपत्र आिथे आहेत, हे केवळ लक्ष्मीबाआीस व त्या जंगमास माहीत होते. `मी स्वत: येआीन त्याचवेळी ते मजकडे द्यावेत, मी मयत झाल्यास माझ्या बायकोच्या ते स्वाधीन करावेत' असे बाळकोबानी जंगमास बजावून ठेवले होते.
बाळकोबा व त्यांच्या कुटुंबास कैदेत ठेवून काही निष्पन्न झाले नाही. कैदेत असतानाच बाळकोबाचा अंत झाला. त्याच्या कुटुंबियांस आिंग्रजांनी, जप्त केलेलेे जवाहीर व दागिने परत देअून मुक्त केले. महाराजांना हा वृत्तांत कळल्यावर त्यांना अत्यंत दु:ख झाले. `पुढे कुठे राहणार?' अशी त्यांनी आपुलकीने लक्ष्मीबाआीकडे विचारणा केली. लक्ष्मीबाआीने सांगितले की, `वाआीला आमच्या घरी जाअू, किंवा दु:ख परिहारार्थ काही दिवस रेवणसिद्धाच्या डोंगरावर जाअून राहू.' त्याप्रमाणे लक्ष्मीबाआी आपल्या मुलांना बरोबर घेअून श्रीं च्या डोंगरावर मंदिराच्या अेका ओवरीत राहू लागल्या. आपल्या मागचा ससेमिरा संपला असे त्यांना वाटत होते. थोडी मन:शांती मिळत होती.
आिकडे आिव्हान्स मात्र अस्वस्थ होता. संशयातील महत्वाचे कागदपत्र गेले कुठे याचा तपास करायचाच होता. बाळकोबाची बायको वाआीला आपल्या घरी न राहता त्या डोंगरावर कशासाठी वास्तव्य करेल? त्या अर्थी बहुधा तिच्याचकडे कागदपत्र असावेत असा त्याने अचूक तर्क केला. पुजारी जंगमाने ते कागदपत्र लक्ष्मीबाआीकडे दिलेले होते. ते तिने जपून ठेवले होते. काही दिवसांतच आिंग्रजाच्या आदेशाप्रमाणे घोडेस्वारांचा अेक रिसाला पहाटे पहाटेस आला, आणि त्यांनी डोंगराला वेढा घालून नाकेबंदी केली.
या दरम्यान अेक अघटित घडले. लक्ष्मीबाआीना पहाटेचे स्वप्न पडले. कुणीतरी त्याना बजावत होते, `बाआी, आता त्या कागदपत्रांचा अुपयोग नाही, त्यांचा ताबडतोब नाश कर...' लक्ष्मीबाआी जाग्या झाल्या. त्यांच्या छातीत धस्स झाले. हा स्वप्नदृष्टांत झाला, त्या अर्थी तीच देवाची आिच्छा! बाआींनी चूल पेटविली आणि अेक अेक करत सारे कागद जाळले. तोंडाने स्तोत्र म्हणत त्या कागदांची राख शेणात कालवली आणि त्या पोतेरे घालू लागल्या. रामप्रहर झाल्यावर रिसाल्यातील अेक जमादार तिथे आलाच. ओवरीजवळ येअून तो म्हणाला, बाआी आिथली झडती घ्यायची आहे. त्यासाठी साहेबमजकुरानं माणसं पाठविलीत. झडती होआीतोवर कुणी बाहेर जायचं नाही. तो जमादार आिथल्या रीतीधर्माचा, आिथल्या मातीचा. त्याने बाआीना शेणकाल्यात राख मिसळत असल्याचे पाहिले होते. तरीपण त्याने स्वातंत्र्य व स्वराज्य भोगलेले होते. आंग्लाआीच्या त्या प्रारंभकाळी त्याच्यातले आिमान शिल्लक असावे.  महाराजांबद्दल त्यास आदर होता, आणि बाळकोबाविषयी आपुलकी होती. त्याच्या डोळयांत आनंदाश्रू आले. नतमस्तक होअून तो बाआीच्या पाया पडला. `माअूली तू धन्य आहेस. महाराजांचा तू आज जीव वाचवलास. ती सारीच राख शेणकाल्यात मिसळ आणि पोतेरे घालायचे चालू ठेव' बाआीला हे सांगायला का हवे होते? राजकारणी पुरुषाची ती वीरांगना!
चारसहा शिपायांसह अेक अधिकारी आला. त्याने त्या स्त्रीला व मुलांना बाहेर काढले व झडती घेतली. काही सापडणे शक्य नव्हतेच. ते सारे परत गेले.
या आणि अशा कितीतरी सोनेरी पानांची नोंद आितिहासात झाली की नाही? सातारच्या छत्रपतींकडच्या काही जुन्या कागदपत्रांत काही संदर्भ असू शकतील. तूर्त तरी हासुद्धा आितिहास मूकच आहे. मी या बाळकोबांचा पणतू, आज मी वयाची नव्वदी पार केली आहे.
                         -श्रीकृष्ण माधव केळकर,तारा टॉवर्स, कोथरुड, पुणे ३८                                                        फोन : ८४४ ६९० ५५१७

अभिनंदन
श्री नंदकुमार मराठे यांची निवड अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघाच्या अुपाध्यक्षपदावर झाली. कोल्हापूर येथे त्या संस्थेची बैठक नुकतीच झाली, त्यावेळी अध्यक्ष श्री. माधव घुले (डोंबिवली) यांच्यासह सतीश खरे -कल्याण, मनोज केळकर -मुंबआी, राजन पटवर्धन -रत्नागिरी, अशोक बोडस -(कराड), मिलिंद दाते -(पंढरपूर), वासुदेव दिवेकर -(सांगली), विजय आठवले -(पुणे) आित्यादी पदाधिकारी; शिवाय महाराष्ट्न् - गोवे - कर्नाटक या प्रांतांतील प्रतिनिधी अुपस्थित होते.
कोल्हापूरचे मराठे हे महालक्ष्मी भक्त मंडळाची धर्मशाळा, ब्राह्मणसभा करवीर चे मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन  संघ, करवीर नगर वाचन मंदिर आित्यादी संस्थांत सक्रीय असतात. त्या साऱ्या कामांचा गौरव करून त्या सभेने त्यांची निवड अुपाध्यक्षपदी केली.
संपर्क : २२५७ अे वॉर्ड, फ्लॅट १०१ जीवबानाना जाधव अपार्टमेंट,
बाबूजमाल मागे, कोल्हापूर ४१६ ०१२
फोन ०२३१-२५४१८२३, ९९६०६३६०४०

चुका सांगा म्हणता, तर-
                         -राम नेने
महाराष्ट्नत सरकार स्थापन होअू शकले नाही, त्यात कोण चूक कोण बरोबर हे ज्याचे तो ठरवेल, परंतु निकाल लागल्यावर भा.ज.प.चे माजी मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील  यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी असे म्हटले होते की, `जनतेला आवाहन आहे की आधीच्या कार्यकाळात आमची काय चूक झाली ते आम्हाला दाखवावे'. त्या पक्षाविषयी मला काही राग-प्रेम असण्याचे कारण नाही. परंतु अेक त्रयस्थ अनुभवी सामान्य मतदार म्हणून माझी मते मी जाहीरपणे मांडतो आहे; त्यात टीका करण्याचा  हेतू नाही, -तर कोणत्याही राजकीय पक्षाला त्यातून योग्य तो बोध घेता येआील. पाटीलसाहेबांची सत्ता पार्टी आणि त्याचे पदसिद्ध नेते यांनी काही मोठ्या चुका केलेल्या आहेत. दोनशेहून जास्त संख्येने त्यांचे आमदार येण्याचे अुद्दिष्ट ते गाठू शकले नाहीत, त्याला त्या चुकाच कारणीभूत आहेत.
२०१४मध्ये भाजपाचे सरकार आले, त्यात या दादांचा किंवा त्यांच्यासारख्या भाजपा नेत्यांचा काहीही भाग नव्हता.त्या आधीची १५ वर्षे कांॅग्रेस सत्तेवर होती, त्यांचे काम मुळीच चांगले नव्हते. शेतकऱ्यांचे जे प्रश्ण आज ते आक्रस्ताळेपणी मांडतात तेच त्यंाच्या काळात होते. त्या सगळयाला लोक कंटाळले होते, त्यांत बदल हवा होता म्हणून प्रजेने त्यांच्या व   शिवसेनेच्या पक्षाला मते  दिली. त्याच वेळी मोदींची प्रचंड लाट होती, त्याचाही फायदा यांना झाला आितकेच.
यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या पाच वर्षांत मराठी माणसांना सरकारी नोकरीत घेअून पोटाला लावण्याचा विशेष कोणताही प्रयत्न केलेला नाही. सैन्य पोटावरच चालते याचे यांना भान नाही. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना मी त्यांना पत्र लिहून `लाखाचे पोशिंदे व्हा, रेल्वेत मराठी मुलांची भरती करा' असे पत्र लिहिले होते. त्यांनी तसे काही केले नाही, पण स्वत:च बाहेर गेले. अजुनी जिथे रेल्वेचा मोठा पसारा आहे, त्या मुंबआी-ठाण्यात लाखो मराठी मुले बेकार आहेत. पूर्वीचे काँग्रेसवाले त्यांच्या ओळखी-वशिल्यातल्यांना कुठेतरी नोकऱ्या देत असत. त्यांची माणसे मोठी अधिकारी बनली, ती खाल्ल्या मिठाला जागतात. प्रशासनात अुच्चस्थानीही नेहमी याचा अनुभव येतो.
भाजप हा पूर्वीचा जनसंघ. शामाप्रसाद, वाजपेयी, दीनदयाल, ही माणसे जनसंघाला मिळाली. संघाच्या कित्येकांनी राबराबून जनसंघ मोठा केला, संघाच्या प्रचारकांनी प्रयत्न केले. बऱ्याच मराठी कुटुंबांनी त्यांना आधार दिला, त्यांच्यासाठी त्याग केला. काहींची मुले सत्याग्रहात भाग घेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांनी संसाराची काळजी केली नाही. त्या कार्यकर्त्यांच्या मुलाबाळांना कोणती मदत केली गेली? संघामध्ये अशी पद्धत नाही असे अैकविले जाआील.  परंतु काँग्रेसच्या लोकांनी १९४२ सालापासून जी आंदोलने केली त्यांना काहीना काही फायदा करून दिला गेला. प्रवासाचे पास दिले, काहीतरी पदव्या दिल्या... भाजप सत्तेवर आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. जुन्या कार्यकर्त्यांनी सेवाभाव दाखविला असला तरी त्यांच्याही काही अपेक्षा असतील. निदान त्यांना डावलून नव्या आयारामांना सन्मानिले  जात असताना मनांतून कसे वाटेल?
श्री.मधुकरराव चौधरी आणि श्रीमती प्रतिभा पाटील शिक्षणमंत्री असताना दसऱ्याला घनपाठी ब्राह्मणांचा सत्कार केला जात असे. विनोद तावडे यांना मी पत्र लिहून तसे सुचविले होते. कदाचित ते धर्मनिरपेक्षतेशी अडखळले असतील. ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यानेही अडचण झाली काय? अशा चांगल्या प्रथा त्या विद्वानांचे आणि त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या सामान्य जनांचेही आशीर्वाद मिळवून देत असतात, हे भाजप वाल्यांना कळले नाही.
गेल्या निवडणुकीनंतर शिवसेना अुशीरा मंत्रीमंडळात आली. परंतु तो पक्ष सरकारला नीट काम करू देत नव्हता. त्यांचे मुखपत्र व काही बोलघेवडे नेते भाजपला अुघडअुघड शिव्याशाप देत होते, त्यांचा प्रतिकार यांनी केलाच नाही; कारण सत्ता सोडायची नव्हती. हा कटू अनुभव असूनही पुन्हा शिवसेनेशी सोयरीक करण्यातून लोकांत प्रतिकूल संदेश गेलाच. कालच्या निवडणुकीत शिवसेनेशी केलेली युती केवढ्याला पडली याचा त्यांना अनुभव आला. सामान्य मतदारांनी व संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी हे कधीचेच ओळखले असेल, ते यांना समजायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांनी कालपर्यंतच्या विरोधकांना किती कुरवाळावे हे लोकांना आवडलेले नाही. मोदींची लाट आणि त्यांची कर्तबगारी यांसाठी कालच्या निवडणुकीत लोकांनी युतीला मतदान केले. शिवसेनेला ते कळले नाही, आणि त्यांची सोबत करण्याची भाजपला वेळ आली.
२०१८चा  दुष्काळ आणि २०१९ची अतिवृष्टी हा तर निसर्गाचाच कोप होता. असा नैसर्गिक कोप राजकर्त्यांच्या विरोधात जातोच. महाराष्ट्नत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना मूळ कारण १९५६चा कूळकायदा हे आहे. शेतीला जमीनमालकांकडून भांडवल मिळत असे ते त्या कायद्यामुळे बंद झाले. शेती करणारा अडाणी समजला जाअू लागला, कारण त्यातल्या त्यात शिकलेल्या शेतीतल्या लोकांना त्या वेळच्या सरकारने नोकऱ्या दिल्या. त्यामुळे शेती घाट्यात गेली. ते अपयश आधीच्या जमीन धोरणांचे असूनही भाजपचा कोणी नेता ते वास्तव मांडू शकला नाही. कारण तसा कोणी तडफदार वक्ता नेता यांच्याकडे नव्हता. प्रमोद महाजन, रामभाअू  म्हाळगी, राम कापसे अशी विद्वान आक्रमक संसदपटू माणसे नव्हती, नाहीत.
भाजपचे मंत्री व नेते कुणाच्याही पत्रांना कधी योग्य अुत्तरे देत नाहीत. समाजात कितीतरी अनुभवी, प्रामाणिक, व निरपेक्ष  माणसे असतात; ती सरकारला काहीतरी चांगले सुचवितात. त्यांच्याशी चर्चा-मसलत करण्याअैवजी भाजप चे नेते त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात हा कित्येकांचा अनुभव असेल. यांचे नेते लोकांत मिसळतच नाहीत. सभासमारंभ व अुद्घाटने म्हणजे लोकसंपर्क नव्हे हे यांना कोण सांगणार? आर आर पाटील लोकांत किती मिसळत. पतंगराव कदम यांनी कितीतरी संस्था शाळा काढल्या, दवाखाने अुभारले. त्यांचे वारसही सहज निवडून येतात, आितके त्यांना लोक का मानतात? भाजपचे नेते कुठे फिरत नाहीत, त्यांची मदार संघाच्या प्रचारकांवरच असावी.
परवाच्या निवडणुकीत पुरेसे यश मिळाले नाही याची तात्कालिक कारणे आहेतच. दोन महिन्यांपूर्वी पूर आला, लोकांचे हाल झाले. मुख्यमंत्री काही तास आले, फिरून गेले. या पार्श्वभूमीवर किल्लारी भूकंपावेळी शरद पवारांचे काम आठवा. भूकंपानंतर काही तासात पवार तिथे पोचले होते, त्यांनी सारी यंत्रणा स्वत: लक्ष घालून कामाला लावली. तीन दिवस ते तिथे थांबून लोकांना धीर देत होते. हा फरक लोकांच्या लक्षात येतो.  देशावर असा कोप  होतो तेव्हा लोकांच्या  भावना अनावर होतात. सरकार पापी, असा समज आपोआप होतो, माध्यमेही त्यात भर घालतात. हे लक्षात घेअून धोरणे राबवायला हवीत. त्या संकटात  संघाच्या लोकांनी काम केले पण सरकारने केले नाही, असे लोक कसे म्हणतात?
निवडणुका जवळ येत चालल्या तशी बाहेरची माणसे भाजपात येअू  लागली. त्यास काही मर्यादा हव्या होत्या. भ्रष्ट माणसे पक्षात घेतली, याचाच अर्थ यांना स्वत:च्या यशाची खात्री नव्हती. विरोधी पक्षातली कोणीही आत घेण्याने मूळची  नामवंत माणसे फार दुखावली. हे आयाराम मंत्री होणार, तर मग आजवर पूर्वीच्यांनी खस्ता यांसाठी खाल्ल्या का? ही तर फार मोठी चूक ठरली. त्यांना विरोध करता आला नाही तरी भाजपचे बरेच मतदार मतदानापासून दूर राहिले हे खरे. आपल्या लोकांना तिकीट नाकारतांना त्यांना विश्वासातही घेतले नाही, त्यातून कोथरूडला न शेभणारा प्रसंग चंद्रकांतदादांवरच आला. विद्यमान आमदार कुलकर्णी बाआींनीच आरोप केला की `खंजीर खुपसला'. अशा गोष्टींचा परिणाम  मतदारांवर होत असतो, हे यांच्या लक्षात येत नाही. आरे कॉलनीत वृक्षतोड झाली; निवडणुकीच्या तोंडावर ही आंदोलने टाळता आली असती, त्याने मोक्याच्या वेळी जनतेची नाराजी आली; कारण हे राजकारणी मुरलेले नाहीत. आीडी चा पवारांवरील छापा त्याच स्वरूपाचा होता. पवार धूर्त  भेटले, यांची शोभा झाली.
कोकणात पराभव झाला त्यास अर्धवट केलेला महामार्ग हेही कारण आहे. त्यात पहिला बळी अनंत गीतेंचा गेला. आधीचे रस्ते अुखडून धूळ व खड्डे करून कामे बंद पडली आहेत, असे कितीतरी रस्ते मतदारांचा राग वाढवून गेले. राजकारणात देवाणघेवाण करतात, धूर्तपणा करतात, लोकांची कामेही करतात, तितकाच संपर्कही करतात. फडणवीस हे त्या बाबतीत कसून काहीतरी प्रयत्न तरी करतात, पण चंद्रकांतदादा वा त्यांचे  कोणी सहकारी मतदारांच्या मनांत ठसत नाहीत. पुष्कळ चांगलेही केले असेल परंतु त्यांनीच आमच्या चुका सांगाव्यात असे पत्रकार परिषदेत म्हटले, म्हणून माझे मत मांडले आहे. बरेच जण त्याच्याशी सहमत होतील असे वाटते. यातून खूप शिकता येआील असाही अुद्देश आहे.
      -डॉ.राम नेने, उन्नतनगर २, गोरेगाव (मुंबई १०४)
फोन : ०२२-२८७३२९९०

कराडची जनकल्याण पतसंस्था
                    -विवेक ढापरे
सहकाराच्या मूळ तत्वज्ञानाची खरी ओळख महाराष्ट्नने करून दिली आहे. देशाच्या आर्थिक क्षेत्रात अलीकडे पुष्कळ बदल होत चालले आहेत, परंतु त्याचबरोबर काही अनुचित व्यवहारही अर्थव्यवस्थेला मारक ठरत असल्याचे दिसते.  चुकीचे व्यवहार म्हटले की आजवर केवळ सहकारी क्षेत्राकडे बोट दाखविले जात असे, परंतु खाजगी बड्या अुद्योगांनीही मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे केल्याचे अुघडकीला येत असते. या पार्श्वभूमीवर सहकाराला अुठाव येण्याची खरे तर गरज आहे; परंतु सहकाराचे नाव कुचेष्टेनेच अुच्चारण्याची पद्धत पडली आहे. वास्तविक ज्या संस्था आणि अुद्योग सहकारी तत्वावर अुत्तम चालू आहेत अशांची अुदाहरणे लोकांसमोर आली पाहिजेत. भारतातील लोकसंस्कृतीत सहकार रुजलेला असतो, त्याला अुत्तम व्यवस्थापनाची जोड दिली तर सहकारी संस्था शक्तिमान बनतील, लोकोपयोगी आणि लोकाभिमुख ठरतील. महाराष्ट्नत अशा ज्या पतसंस्था नावारूपाला आलेल्या आहेत, त्यात कराडच्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचा अुल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल.
कराडच्या नागरी जीवनात समरस होअून आपली यशोध्वजा दूरवर फडकविणाऱ्या, आणि सामाजिक कार्यासाठी सतत पुढे असणाऱ्या जनकल्याण पतसंस्थेने नुकतेच पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केले. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या  निमित्ताने अेक सोहळा कराडमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी प्रा.अनिरुद्ध देशपांडे यांचे भाषण झाले, त्यांनीही या पतसंस्थेच्या कार्याच्या अनुरोधाने सहकाराच्या या वैशिष्ट्याकडे लक्ष वेधले. `देशाच्या अर्थव्यवस्थेला जी बाधा झाल्याचे आज दिसते, त्यासाठी केवळ सरकारला जबाबदार धरता येणार नाही, तर विविध आर्थिक संस्था आणि नागरिकांनी आपापल्या जबाबदारीचा गांभिर्याने विचार करायला हवा' असे ते म्हणाले.
पुण्याच्या शिक्षण विकास केंद्राचे  प्रमुख, आणि रामभाअू म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक श्री.देशपांडे पुढे म्हणाले की,
`सहकाराचे मूळ तत्व जोपासण्याचे काम जनकल्याण पतसंस्था आपल्या व्यवहारातून करीत आहे. परस्परांना सहकार्य करून स्वावलंबी होण्याची चळवळ म्हणजे सहकार. ज्यांच्याजवळ देण्याजोगं काही आहे, त्यांच्याकडून ते घेअून, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना ते द्यायचं, आणि त्यातून सामाजिक अुद्धार साधायचा असे सहकाराचे साधे तत्वज्ञान आहे. आपले साध्य जितके श्रेष्ठ असते तितकेच साधनही श्रेष्ठ असायला हवे. सामाजिक नीतिमत्ता आणि व्यक्तिगत सचोटी यांच्या आधारावर सामुदायिक कल्याणाचा विचार व्हायला हवा; परंतु `विना सहकार  नही अुद्धार' हे आदर्श बोधवाक्य आज कुचेष्टेने अुच्चारले जाते. सहकार हा संस्कार आहे, तो प्रभावीपणे राबविण्याचे काम आग्रहपूर्वक करावे लागेल.
अर्थाचा प्रभाव वाआीट, तसा अभावही वाआीटच. अर्थाचा प्रभाव माणसाला अुन्मत्त बनवितो, आणि अर्थाचा अभाव त्याला दुर्बल हीन ठरवतो. साऱ्या जगाची संपत्ती केवळ ९ टक्के लोकांच्या हाती अेकवटलेली आहे. भारताच्या अेकूण संपत्तीचा ६५ टक्के भाग फक्त अेक टक्के लोकांच्या हाती आहे. त्यामुळे  आपल्यालाा अर्थकारणाची चिंता लागून राहिलेली असते. सामान्य माणसाला समर्थपणे अुभे करण्यासाठी सहकार हेच साधन आहे. भारतातला  अगदी कोलमडून पडलेला माणूसही बचत करण्याच्या संस्कारातून आपली घडी पुन्हा बसवू शकतो. २००८ साली अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडली, त्यामुळे साऱ्या जगाने बचत करण्याचा वेग गमावला. पण त्यावेळी भारतात मात्र आर्थिक बचत दर २४ टक्के आितका राहिला होता; आणि विशेष म्हणजे त्याचा केंद्रबिंदू सहकार हाच राहिला.
भारतात महिलांच्या क्रियाशीलतेकडे आर्थिक दृष्ट्या पाहिले जात नाही. महिलांचे प्रमाण निम्मे तर असतेच, त्यातल्या १५ टक्के महिलांना   रोजगार अुपलब्ध करून दिला तर आपली सकल राष्ट्नीय अुत्पन्नवाढ १५ टक्के झालेली दिसेल. जीडीपी वाढविण्यासाठी मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे, तेच आपले साधन आहे,त्याकडे लक्ष द्यायला हवे.  मद्याच्या करात वाढ करून जीडीपी चा दर वाढविला जातो, हे अुद्दिष्ट असू शकत नाही. कसेही करून जीडीपी वाढलाच पाहिजे असे वाटत राहण्यामुळे साध्य आणि साधन यांच्यातील वाढ मर्यादितच राहिली.
आपल्याकडे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ मानलेले आहेत. खऱ्या सुखाचे मूळ धर्मात आहे, पण धर्माचे मूळ अर्थकारणामध्ये आहे. धनंजयराव गाडगीळ या थोर सहकारमहर्षीने म्हटले की, सहकाराची चळवळ अयशस्वी झाल्याचे दिसते, परंतु ती यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजेत, तेच टिकाअू आणि हितकर आहे.'
कराडच्या जनकल्याण पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे आहेत. त्यांनी माहिती दिली की, संस्था भक्कम आर्थिक पायावर अुभी असून स्वत:चे भांडवल आणि सुरक्षित गुंतवणूक या आधारांवर जोमदार वाटचाल करीत आहे. नियमित कर्जदारांना सूट(रिबेट) म्हणून साडेसहा कोटि रुपये वाटणारी ही महाराष्ट्नतली अेकमेव संस्था आहे. संस्थेने आजवर सामाजिक कार्यासाठी अडीच कोटि रुपयांची मदत केलेेली आहे.
रौप्यमहोत्सवाच्या प्रारंभ सोहळयात, गेल्या चोवीस वर्षांतील अनेक स्मरणीय प्रसंग, स्थित्यंतरे, प्रगतीचे टप्पे, आधुनिक तंत्रज्ञान यांचा परामर्श घेण्यात आला. ज्या मान्यवरांची अुपस्थिती होती, त्यांत संसद सदस्य श्रीनिवास पाटील, कराड अर्बन बँकेचे  कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, विक्रम पावसकर, मिलिंद पेंढारकर, शिरिष गोडबोले, प्रकाश सप्रे, अविनाश गरगटे, अनंत जोशी अशांसह अनेकानेक प्रतिष्ठित मान्यवरांचा समावेश होता, त्यावरून संस्थेची समाजमान्यता अधोरेखित होत होती. या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील काही अुपक्रमांसह, पुढील वाटचालीतून सहकाराचे सामर्थ्य आणि  लोककल्याण प्रत्ययाला येआील असा भरंवसा साऱ्या हितचिंतकांतून व्यक्त होत असतो.

सहवेदना
प्रा.मोहन हरी आपटे
गेली पन्नास वर्षे आपल्या लेखणी-वाणीने विज्ञानाची साधना आणि त्याचा प्रसार करण्यासाठी अखंड झटणारे मोहनराव आपटे वयाच्या ८२व्या वर्षी कालवश झाले. हे आपटे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले, शालीय शिक्षणासाठी साताऱ्यात होते. नंतर काही काळ ते रा स्व संघाचे प्रचारक होते. मुंबआीत प्राध्यापकी करतानाही त्यांचा सतत प्रवास आणि व्याख्यानदौरे चालू असत. विज्ञानाची कोणतीही अुपशाखा, आितिहास वा भूगोल-खगोल, तसेच संगणक-तंत्रज्ञान यांतील कोणत्याही विषयाचे मर्म ते कोणत्याही श्र्रोतृगटाला सहजतेने समजून देत. सुस्पष्ट आणि भारदस्त वाणी, पैलवानी थाटाची शरीरयष्टी, आणि अचूक अद्ययावत् ज्ञान यांमुळे त्यांचे ज्ञानयज्ञ प्रभावी ठरत. `मला अुत्तर हवंय' या शीर्षकाने त्यांनी विज्ञानांतील विविध संकल्पना आणि शेाध लेखनातून मांडले, ते विद्यार्थ्यांना फार अुपयोगी ठरले. खगोलशास्त्रावरील १९ आणि गणितावरील १५ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.
लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी यांना मुंबआीत विलेपार्ल्याच्या घरी भेटायला मी गेलो होतो, तेव्हा त्यांनी पलीकडच्या गल्लीतले मोहनरावांचे घर दाखविले. मी गेलो तेव्हा मोहनराव पुस्तकांनी ठेचून भरलेल्या त्यांच्या घरात पायजमा आणि गंजीफ्रॉक अशा विशिष्ट मध्यमवर्गी साध्या राहणीत भेटले. त्यानंतर त्यांच्याशी ज्या भेटी झाल्या त्यावेळी जिव्हाळा जाणवत राहिला. गुहागरला आपटे मंडळींचे संमेलन झाले, त्या रात्री सागराकाठच्या वाळवंटात मोहनरावांनी लेजर टॉर्च (पॉआिंटर)ने आकाशदर्शन घडविले, तो भाग्यक्षण विसरता येणार नाही. सांगली-कराड अशा भागात आलेे की त्यांची भेट घडत असे. आश्चर्य असे की त्यांचे महानपण माझ्यासारख्याशी बोलतानाही कणमात्र जाणवत नसे.
किरकोळ अपघातात त्यांना अलीकडे अधूपण आले होते. आयुष्यभरात खुर्चीचा मोह नाकारणारे मोहन आपटे अंतकाळात चाकाच्या खुर्चीवरच वावरले, हे समजून घेणे तसे कठीण होते. आपल्या व्रतासाठी ते अविवाहित राहिले. अेक तपस्वी ज्ञानसाधक गेला, त्याला श्रद्धांजली.

कागवाडकर पटवर्धन
                          -वसंत आपटे
दक्षिण महाराष्ट्नत पटवर्धनांची काही संस्थाने व जहागिऱ्या होत्या. मिरज हे त्याचे मूळ. नंतर सांगली, बुधगाव, तासगाव, कुरुंदवाड अशी पटवर्धन मंडळी पांगली. त्याच्या काही अुपशाखा फुटल्या. त्यांपैकी कागवाड हे अथणी तालुक्यातील अेक मोठेसे गाव. सतीश पटवर्धन हे तेथील कॉलेजात प्राध्यापक होते, त्यांचा गावात वट होता. `आपले जग'शी त्यांचा बराच पत्रव्यवहार असे, पण प्रत्यक्षात भेट नव्हती. त्यांच्या माघारी नुकतीच या गावाची वारी घडली. `विनायक बंगल्या'त आज त्यांच्या पत्नी जयश्रीबाआी, मुलगा जगदीश आणि सूनबाआी वगैरे असतात.
हे तेथील मानाचे जमीनदार घराणे. पूर्वीचे दिवस पालटले, परंतु `हाथी मराभी तो नौ लाख का' हे खरेच. गावात या घराचा वट आहे. जुन्या वाड्याच्या जागी कोकणी भासावे असे गजाननाचे देअूळ आहे. ते अलीकडे सुधारून घेतले पण त्याची कुसर रेखीव लक्षवेधी आणि लक्षमोली आहे. मागच्या बाजूचे शमीचे पुरातन झाड आपल्या आठवणींत गुंतल्याचेे भासले. पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात बरीचशी मुस्लीम वसती आहे. ते सारे श्रद्धाळू लोक, आजही त्यांच्या  काही धार्मिक सोहळयात या पटवर्धनांसाठी दुवा मागतात. तिथे या घराचा मान असतो.
गावातल्या संस्था-मंडळे यांच्याशी या घराचा निकट संबंध असतो. दोन किलोमीटर अंतरावर या घराण्याची मोठी जमीन आहे. तिला नवबाग म्हणून ओळखतात. त्या शेतीवर भली प्रचंड विहीर आहे, तिला एके वेळी नअू मोटा चालत. आता १० अश्वशक्तीचे तीन मोटरपंप आहेत. या ठिकाणच्या १२० अेकर जमिनीत आता भाग पडले आहेत. गणेशवाडी रस्त्यालगत ब्रह्मानंद मठ आहे. गोंदवलेकर स्वामींचे ब्रह्मानंद हे निकटवर्ती शिष्य होते. स्वाभाविकच हे स्थान प्रति-गोंदवले म्हणता येआील. तिथे गेलो तेव्हा महाराजांच्या निर्वाणोत्सवाचा सप्ताहप्रारंभ होता.
कर्नाटकातील जालीहाळ गावचे अनंतभट्ट गाडगोळी हे पुढे ब्रह्मानंद महाराज म्हणून ख्याती पावले. वेदान्त आणि वैराग्य यांमुळे त्यांचे तप:सामर्थ्य गुरूंच्या प्रत्ययास येत असे. त्यांचा देहान्त कागवाड येथेच झाला. कागवाडच्या श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांना काही मानसिक त्रास होता. त्यांच्या मातुश्रींना दृष्टांत झाला की त्यांनी गोंदवलेकरांची भेट घ्यायला हवी. महाराज त्यावेळी अयोध्येला होते,तिथे त्यांनी अप्पासाहेबांना अनुग्रह दिला. ब्रह्मानंद महाराज हे गोंदवलेकरांचे परम भक्त होते. गोंदवलेकरांनी सांगितल्यावरून ब्रह्मानंद हे कागवाडला नवबाग येथे राहायला आले. पटवर्धनांचा तो मळा पुन्हा फुलू लागला. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर त्यांना तिथेच देवाज्ञा झाली. त्यांचा देह जवळच नदीत अर्पण करण्यात आला. २३ गुंठे जमीन पटवर्धनांनी समाधीमंदिरासाठी दिली आहे. तिथे आता श्रद्धाळूंची आराधना व नित्यअुपासना चालते.
आणि गणेशवाडी
कागवाड कर्नाटकाच्या बाजूला आहे, तर तिथून जेमतेम चारपाच किमी अंतरावरचे गणेशवाडी हे खेडेगाव कुरुंदवाडकर पटवर्धन घराण्याकडील, ते महाराष्ट्नत आहे. गायन कलेतून आणि कीर्तनसेवेतून ख्याती पावलेले काणे यांचे घराणे या गणेशवाडीचे. गावाला अेक अभिजात संस्कृती असल्याचे मानले जाते. कृष्णा नदीच्या काठावरच, त्याचा प्रत्यय देणारे ग्रंथालय होते ते परवाच्या महापुरात सापडले. तिथे गेल्यावर तळमजल्यावरच्या रिकाम्या कपाटांची कळा आणि वरच्या माळयावर पसरून पडलेली भिजकी पुस्तके पाहून जीव कळवळतो. या ग्रंथालयाच्या कामकाजात कागवाडची पटवर्धन मंडळी सहभागी असतात. ग्रंथालयाचे कार्यकर्ते माहिती देताना अेकीकडे हळवे होत होते, तर दुसरीकडे पुन्हा अुभे राहण्याची अुमेद बोलत होते.
१९१६ साली गणेशवाडीतील सुधारणेच्छुक तरुणांनी शिक्षण-व्यायाम-सेवा असे अुद्देश समोर ठेवून विद्यार्थी सहायक मंडळाची स्थापना केली. त्याचे नामकरण नंतर लोकसेवा संघ असे झाले. त्या संस्थेच्या वतीने वाचनालय आणि व्यायामशाळा यांसाठी स्वतंत्र इमारती झाल्या. अेवढ्याशा छोट्या गावातील ग्रंथालय समृद्ध झाले. काल परवापर्यंत या ग्रंथालयात दुर्मीळ पुस्तकांसह २१हजार संख्या होती. निरक्षर लोकांसाठी सामूहिक ग्रंथवाचन प्रदीर्घ काळ चालविण्यात येत असे; -स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल त्या काळात बोलायचेच नाही, त्यांच्यासाठी  आिंदिराबाआी मराठे या आपल्या घरी महिला वाचन मंडळ चालवीत. ग्रंथालयातील वाचन मंडळ रामचंद्र बेळगावे हे चालवीत. त्याशिवाय वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, प्रवचने, भजन-कीर्तने, बौद्धिक स्पर्धा, आरोग्य शिबिरे वेळोवेळी आयोजित  केली जात. नोव्हें.१९१७मध्ये लोकमान्य टिळकांनी या गावी भेट दिली, त्या मुहूर्तावर गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले. अर्थातच लोकशिक्षणाला प्राधान्य असे.
गेल्या ऑगस्ट अखेरीच्या महापुराचे पाणी आपली नेहमीची मर्यादा सोडून वाढले, आणि ते ग्रंथालयात घुसले. धावपळ करून पंधरा हजार पुस्तके वाचविली, पण सहा हजार पुस्तकांनी सचैल कृष्णास्नान केले. तीन अभ्यासिकांचे फार नुकसान झाले, वाचनकक्षातील काही फेर्नचर वाहून गेले. स्वाभाविकच आता संस्था मदतीसाठी हाक देत आहे. पुस्तकांची स्थिती पाहिल्यावर क्षणभर सुन्न वाटते. ग्रंथालयाची ही स्थिती पाहताना कागवाडच्या जयश्रीताआी पटवर्धन बरोबर होत्या. त्यांनी रु.१०हजाराचा चेक सुपूर्द केला. `आपले जग'च्या संग्रहातील सुमारे १०० पुस्तके तिथे देण्यात आली.
                         संपर्क : आप्पासाहेब गावडे (अध्यक्ष)
                            गणेशवाडी (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर)

मोेठा आमदार लागून गेला
आपल्याकडे आमदार आणि खासदार, किंवा कोणताही लोकप्रतिनिधी हा कुणी तालेवार सरंजामदार असल्याचा समज करून दिला -आणि घेतलाही जातो. प्रधानमंत्र्यांनी प्रथमच लाल किल्ल्यावरून जाहीर केले की, मी जनतेचा प्रधान सेवक आहे. आमदार खासदारांना ही प्रतिष्ठा त्यांच्या कामांतून वा सेवेतून मिळत असते असे नव्हे, तर ती जनतेच्या सत्तेविषयीच्या मानसिक दराऱ्यातून मिळत असते. त्यामुळेच कोणी अलबत्या-गलबत्याने फुकाचा टेंभा मिरवला तरी त्याला `तू काय स्वत:ला आमदार समजतोस काय?' या शब्दांत दरडावले जाते. आमदार आणि खासदार यांचे पद गेले तरी काहींना माजी आमदार - माजी खासदार असे बिरुद मिरविण्यात गौरव वाटतो.
हे शब्द आपल्या भाषेत आले कुठून? त्याचा संदर्भ मोंगलांच्या काळाशी जोडलेला असावा. मोंगल बादशहा शाहजहान याने १६२७ मध्ये राजदरबारात `दीवान-आी-आम', आणि `दीवान-आी-खास' अशी दोन सभागृहे सुरू केली. दीवान म्हणजे कारभाऱ्यांच्या बैठकीची चर्चेची जागा. दीवानखाना हा शब्द त्यावरून आला. जनतेचे प्रश्ण ऐकून त्यावर चर्चा करणारे दरबारी मानकरी खास असत, किंवा सामान्य -आम असत. तो मान असलेले लोक, मऱ्हाटनगरीत आमदार किंवा खासदार बनले असणार.
आिंग्रजांच्या काळात प्रांतिक सरकारे (असेंब्ली) अस्तित्वात  आली. १९३५ साली मुंबआी प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यांना विधानमंडळ म्हटले जात असे.  जुना मोंगलशाही पगडा असल्यामुळे, तेथे निवडून गेलेल्या सभासदांना आमदार व खासदार म्हटले जाअू लागले असेल. विशेष म्हणजे आजच्या काळात, आमदार किंवा खासदार फक्त महाराष्ट्नतच म्हटले जाते; अन्य कुठल्या राज्यांत नाही. हिंदी पट्ट्यात `विधायक' आणि `सांसद' म्हणतात. लोकसभेत किंवा राज्यसभेत जाणाऱ्याला घटनेनुसार संसद सदस्य (मेंबर ऑफ पार्लमेंट- अेमपी) असेच म्हणतात. राज्यात विधानसभेत जाणाऱ्याला `विधानसभा सदस्य'(मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली -अेमअेलअे) म्हणतात; आणि विधान-परिषदवाल्यास `विधान परिषद सदस्य' (मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल -अेमअेलसी) म्हणतात.
नगरपालिका स्थापन झाल्यावर तेथील सदस्यांना पूर्वी `मेहेरबान' म्हटले जाआी. आिंग्रजांनी त्याचे `सिटी फादर्स' केले. त्यावरून `नगरपिते' असे मराठीकरण झाले. त्या शब्दात सेवकत्वाच्या अैवजी पालकत्व दिसते, शिवाय आचार्य अत्रे यांनी त्यांच्या शैलीने `आम्हाला आितके बाप नकोत' अशी त्यांची टिंगल केली; त्यामुळे तो शब्द बदलून त्याचे नगरसेवक झाले. या साऱ्या मानमरातबी भाषेतून लोकशाही सुशोभित होते की विद्रूप होते, हा विचार करण्याजोगा प्रश्ण आहेच!

 संपादकीय
अनुभवातील सरकार
कोणतेही सरकार सामान्य लोकांच्या दृष्टीने चांगले कधी ठरते? तर त्याने आधी पोटोबा आणि मग विठोबा ही दोन्ही दैवते सांभाळली तर. आधी त्याच्या पोटापाण्याचे प्रश्ण मार्गी लागायला हवेत. सुखी आयुष्यक्रमाच्या किमान गरजा सहजी भागल्या पाहिजेत, आणि त्यानंतर त्याच्या श्रद्धा अस्मिता यांचाही सन्मान राहिला पाहिजे. या निकषांवर पाहू जाता भारतातल्या सर्वसाधारण कोणत्याही सरकारांचे मोजमाप केलेे तर पार निराशा होण्याजोगी स्थिती आहे. त्याची कारणे  अनेक असतील, -भले आिथली प्रजाही त्यास कारण असेल; परंतु राज्य म्हणून ते चांगले चाललेे आहे असे म्हणणे कुणाच्याही बाबतीत आणि गेल्या सत्तर वर्षांत कधीही कठीणच. आजची महाराष्ट्नतली स्थिती तर भलतीच झाली. कोणताही राजकीय पक्ष स्थापन का करतात? -तर सत्तेसाठी. त्यामुळे कोणत्याही प्रयत्नांनी सत्ता काबीज करणे आणि त्यासाठी सारी मुत्सद्देगिरी पणास लावणे यात तसे चूक काही म्हणता येणार नाही. परंतु गेल्या महिन्यात महाराष्ट्नत जे काही चालले, विशेषत: शिवसेनेने जे `करून दाखवले' ते मात्र अजबच म्हणायचे!!

मुद्दा  तो नाही. परंतु सामान्य जनांस पोटाचे आणि दैनंदिन जीवनाचे जे कोडे पडले आहे, ते कसे कधी सुटणार याची मात्र चिंताच करण्यासारखी आहे. पोट भरणे ही पहिली गरज आणि पोटात जाणारे अन्न सकस शुद्ध असण्याची पुढली गरज. प्रत्यक्ष मुंबआीच्या मंत्रालयाशी जी बीभत्स बुभुक्षित गर्दी घोंघावते आहे ती पाहिल्यावर सरकारी कारभाराचे मोजमाप करता येआील. तिथली रहदारी, अन्नसेवनाचे नियम, विक्रेत्यांचे कायदे, सुव्यवस्था कशाचाही पत्ता नसतांना साऱ्या मुलुखांतून गोळा झालेली माणसे आपापल्या प्रश्णांची भेंडोळी काखोटीत घेअून दीनवाणी फिरताना कुणाला दिसत नसेल? मंत्रालयाच्या पायथ्याची ही कथा, मग कुठल्या गावाशहरात किंवा शेतावाटेला काय लक्ष असणार?

तलाठी, ग्रामसेवक हे तिथल्या खेडूत जनांच्या दृष्टीने मुख्यमंत्री असतात. ते म्हणतील तो कायदा-नियम. ते करतील तोच कारभार आणि ते करतील तोच धर्म. शहरात रोजगार बरा मिळतो, पण तिथल्या व्यवस्था ज्या आणि जशा असतील त्या चालवून घेण्याला आिलाजच नाही. कोणीतरी रहदारीबद्दल काहीतरी कायदा करतो, त्याची अंमलबजावणी करण्याची काही यंत्रणाच नसते. मग कुठल्यातरी पांढऱ्या पोलीसाच्या मनात येआील तो नियम आणि तो सांगेल ती शिक्षा. सिग्नल तोडला तर अेरवी सर्रास खपतो; पण कधीतरी पोलीसाने हटकलेे तर तो म्हणेल तितका दंड करणार. मात्र तो सिग्नल सतत चालू ठेवण्याची त्याची किंवा कुणाचीही जबाबदारी नाही. रस्ते नवे करण्याची टूम निघाली, पैसे मंजूर झाले, जुना रस्ता अुखडला, आणि काम बंद पडले!! कुठल्याही रस्त्याची हीच आणि कधीचीच कथा. कोणताही अर्ज दिला तर त्याचे निराकरण नाही. कोर्ट असो, कचेरी असो, स्मशान असो, तिथे गर्दीला कोणी धनीच नाही. सरकारकडून कोणतीही नोटीस मिळाली तर `११ वाजता हजर राहण्याची' ताकीद असते पण जिथे हजर राहायचे तिथे संबंधित प्रशासन म्हणून कोणी दखलही घेणार नाही. तिथे पिण्याचे पाणी नाही, स्वच्छ मुतारीची सोय नाही, लोक लोंबकळत अुभे असल्याचे दृष्य बदललेच नाही. `सरकार तुमच्या दारी' अशी घेाषणा झाली तरी ते सरकार कुणाच्याही रूपाने दारी आले तर आनंद होण्यापेक्षा काहीतरी बालंट आले असा समज होतो, हा अनुभव जनता घेत जगते आहे.

ही सामान्य जीवनाची पोटकहाणी आहे, ती संपल्यावर मग धर्म अस्मिता श्रद्धा यांनाही स्थान असते, त्याबाबतीतही सरकारची जबाबदारी बेजबाबदारच राहिली आहे. कधीतरी पांडुरंगाची महापूजा बांधायची, किंवा डोक्यावर रुमाल टाकून दुवा करायची राजकीय प्रथा म्हणजे ढोंग असते. राजकीय दृष्टीने त्यांची गरज असेलही, पण त्यांतून लोकांना आपल्या श्रद्धा जपणारे सरकार असे काही वाटत नाही. अुलट जाती-धर्मांस तद्दन राजकारणी जात्यात भरडून आपली बुडे स्थिर करण्याच्या त्या खेळया कोणासही ओळखू येतात.

नव्या राजकीय घेाळानंतर कोणतेही सरकार महाराष्ट्नत आले तरी ते काय साधेल याची जनतेला कल्पना आहे. कुणीतरी फटाके अुडवेल, कुणीतरी मनगटे चावतील. कुणी छत्रपती होतील, कुणी सभात्याग किंवा सभाभंगाची तयारी करतील. असल्या राज्याची आणि राज्यकर्त्यांची क्षिती बाळगावी तरी कशी? लोकांनी असल्या लोकशाहीचीच सवय करून घेण्याशिवाय तूर्त पर्याय तरी काय?


बिस्किटाची खारी : वेदश्री
संजय जाधव दिग्दर्शित `खारी बिस्किट' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.  वेदश्री खाडिलकर हिने या चित्रपटात छोट्या मुलीची प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाला व वेदश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे.
वेदश्री ही डोंबिवली येथील विद्यानिकेतन शाळेत पहिल्या इयत्तेत शिकते. गाणे, नाच, अभिनय हे गुण तिच्यात दिसून येत होते. आम्ही तिला `वेध अॅक्टिंग अक्रॅडमी'च्या उन्हाळी शिबिरात घातले. तिची आवड व अभिनय-कला बघून तिथेच प्राथमिक कोर्ससाठी प्रवेश घेतला. हा कोर्स दर रविवारी असतो.
ऑगस्ट २०१८मध्ये या चित्रपटाच्या चाचणी(ऑडीशन)विषयी कळले. या ऑडीशन ३-४ महिने सुरू होत्या. `खारी' या भूमिकेसाठी वेदश्रीची निवड झाली. सुरुवातीला ३-४ महिने गोरेगाव(मुंबई)ला संजय जाधव यांच्या स्टुडिओमध्ये कार्यशाळा चालू होती. वेदश्री रोज सकाळी शाळेत जायची. दीड वाजता घरी आल्यावर लगेच आईबरोबर डोंबिवली ते गोरेगाव असा प्रवास. जेवण व गृहपाठ लोकलमध्ये. घरी येईपर्यंत रात्रीचे दहा वाजायचे. तिचे वय तसे लहान. वेदश्रीला नेहमी तिची आईच शूटिंगला घेऊन जायची. इतक्या लहान मुलीला क्रॅमेऱ्यासमोर उभे करताना काही अडचणी आल्या.
खारी ही एका अंध मुलीची भूमिका आहे. त्यामुळे लेन्स लावून काम करायचे होते. लेन्स लावणे व काढणे हे एक अवघड काम तिची आई करायची. लेन्स लावल्यावर तिच्या डोळयासमोर पूर्ण काळोख असायचा. अशा स्थितीत नवीन ठिकाणी (लोकेशन)वर वेगवेगळया लोकांच्या बरोबर काम करण्याचे आव्हान वेदश्रीने स्वखुशीने स्वीकारले आणि लीलया पार पाडले. वेदश्रीला अक्षरओळख असली तरी अजून पूर्ण वाचता येत नाही. त्यामुळे सर्व संवाद वाचून दाखवून पाठ करून घ्यावे लागले. आधी घेतलेल्या कार्यशाळेचा उपयोग सर्वांशी एकत्व भावना (ढशरा र्ींीपपळपस) संवाद (ऊळरश्रेस) पाठांतर, प्रसंगानुरूप अभिनय यासाठी खूप झाला.
वर्षभर ऑडीशन, वर्कशॉप, शूटिंग आणि प्रमोशन यांमुळे अनेक वेळा तिची शाळा व अभ्यास बुडत होता. पण विद्यानिकेतन शाळेचे पंडित सर व सर्व शिक्षकांनी खूप सहकार्य केले, वरद हा तिचा मोठा भाऊ सातवीत आहे. त्याला प्रत्येक बाबतीत त्याची आई लागते, पण गेले वर्षभर त्याने ते जाणवू दिले नाही. माझे आई-बाबा पूर्णपणे घर सांभाळत, माझे आई-बाबा कधी आमच्या गावी कराडला गेले तर, दीप्तीचे आई-बाबा इथे यायचे.
चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव आणि संपूर्ण टीम अखंड १३-१४ तास कार्यरत असायचे. या इंडस्ट्नीत मोठे नाव असतानासुद्धा, संजय सर स्वत: भर उन्हात उभे राहून, अभिनय करून घ्यायचे- मुलांचे मुड ते सांभाळत. कधीकधी स्वत: शूटिंग करायचे.
वेदश्री आणि आमचाही हा तसा पहिलाच अनुभव. आपण तसे फिल्म इंडस्ट्नीजपासून लांबच असतो. पण वेदश्रीची इच्छा, संजय सरांचं नाव व आप्तेष्टांचा पाठिंबा यांमुळे आम्ही ऑडीशनला जायचे ठरवले आणि वेदश्रीला चिकाटी व कलागुणांमुळे ही आव्हानात्मक भूमिका मिळवली. गेले वर्षभर वेदश्रीने खूप मेहनत घेतली, तेव्हा  हे दिवस आले.

  -Shridhar Khadilkar- Dombivali
                फोन- ९६३७ ६८५० ४१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन