Skip to main content

Sampadkiya in 3 OCT. 2011



प्रकाशदिशा


अनेक व्यक्ती व संस्था आपापल्या परीने काम करत असतात. त्यांच्या आधारावरच समाज उभा असतो भावी काळासाठी काही मूल्येही जोपासली जात असतात. अशी कोणी व्यक्ती, संस्था, प्रसंग यावरती भाष्य करण्यासाठी आजवर या स्थलाचा वापर फार पिचत् केला गेला असेल, त्याउलट एखाद्या विचाराचा किंवा कृतीचा अथवा प्रसंगाचा मागोवा घेऊन त्यामागील तत्त्वविचारांचा परामर्श घेण्याची प्रथा सांभाळली गेली होती. प्रस्तुत अंकात तसा अपवाद करावा असे वाटले याचे कारण एक व्यक्ती किंवा तिने उभा केलेला पैसा अर्पण करण्याचा सोहळा एवढेच निमित्त नाही तर त्यामागील अंत:करणाची बैठक आणि सर्व समाजापुढे नव्या बीजाची पेरणी करण्याची असोशी ही त्यामध्ये महत्त्वाची वाटते

आजच्या काळात सामाजिक कामे होत नाहीत असे कोणी म्हणणार नाही. गांधीजींनी ज्या काळी महाराष्ट्नला कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले त्या काळात सामाजिक कार्याला किंवा ते करणाऱ्या कार्यकर्त्याला खूप चांगले दिवस होते अशातला भाग नाही. देशासाठी, धर्मासाठी अथवा समाजरूपी देवासाठी प्रपंचावर निखारे ठेवून आयुष्य झोकून देणारे अनेकजण असतात. अशा संस्थांचा प्रतिपाळ करणे हेही समाजाचेच कर्तव्य असते. सरकार तो करू शकत नाही. समाजाचा योगक्षेम समाजानेच चालविला पाहिजे. असा प्रतिपाळ करणे शक्य होतेच असे नाही, परंतु अशा किमान व्यक्ती व संस्थांना उमेद यावी, जोम यावा यासाठी आपल्या पैशाचा विनियोग करण्याची `सेवा २०११' या प्रकल्पाची आत्यंतिक मनीषा ही आवर्जून दखल घेण्यासारखी आहे.

या निमित्ताने होणाऱ्या उपक्रमांचा बडीवार कोणाला दिसू शकेल. तो निर्माण करणे, सांभाळणे आणि त्याकडे आकर्षित होणाऱ्यांना पुन्हा प्रेरणा मिळावी यासाठी तो प्रचलित करणे यालाही खूपसे कौशल्य लागते.मूळ संकल्पना, त्यासाठी संघटन, नियोजन व कार्यसिद्धी या सर्व टप्प्यांवर व्यवस्थापनाचेही परिणाम लक्षात घेण्यासारखे आहेत. भव्य मांडव सजवणे आणि जेवणावळी घालणे हे तर घरच्या कार्यातही सहज शक्य असते परंतु झगमगाटापेक्षा उपयुक्ततेला महत्त्व देऊन एक वेगळा संस्कार सर्व संबंधितांवर करण्याचा आग्रह हा या प्रकल्पात अनोखा भासतो. सामाजिक काम म्हटले की त्यात भोंगळपणा आला हा पूर्वग्रह पूर्णत: नाहीसा करण्याइतका काटेकोरपणा या सर्व उपक्रमांमध्ये राबविला जात आहे. नीटसपणा, शिस्त, उपयुक्तता, साध्य, संपर्क, प्रचार आणि या सर्वांमध्ये एक सहजता, मोकळेपणा आणि खेळकरपणा हेही टिकवून ठेवण्याचा सर्व संबंधितांचा प्रयत्न उघड दिसून येतो.

हा सर्व माहोल इतरांसाठी आदर्शवत् आहे असे म्हणणे अस्थानी किंवा अतिरंजित वाटेल. परंतु अशा प्रकारे सामाजिक कार्यातून एक नवा उन्मेष प्रगट झाला तर आजच्या काळात अत्यावश्यक असलेली ती एक महत्त्वाची बाजू उपेक्षित राहणार नाही आणि सध्याच्या जीवनातील विषण्ण उसासे बाहेर पडत असतात, त्यांनाही आळा बसेल. त्यातून नवे वारे वाहात राहिल्यास जो बदल व्हावा असे वाटते, तो घडण्याची आशा नक्कीच उंचावेल.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...