Skip to main content

lekh on Rajasthan Tour


रॉयल राजस्थान ऑन व्हील्स
- विनायक आपटे

यावर्षी मार्च मधील आठ दिवस पत्नीने आणि मी एखाद्या संस्थानिकासारखे काढले. मोजकेच दिवस का असेनात पण एक स्वप्न पुरे झाल्याचे समाधान वाटले. आजपर्यंत आम्ही पर्यटनाचा खूप आनंद लुटला.  कुठं पर्यटन करावं अशा विचारात असताना `रॉयल राजस्थान ऑन व्हील्स' बद्दल कुणीतरी सुचविलं. राजस्थान टुरिस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन (आरटीडीसी) ची इंटरनेटवरून माहिती घेतली. प्रकर्षानं जाणवलं की ही ट्नीप खर्चाची आहे, पण ठरविले की या प्रवासाचा अनुभव आणि आनंद लुटायचाच.
राजस्थान हे भारतातील अविश्वसनीय, विशिष्ट ढंगाचे आणि संपन्न राज्य आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला सांस्कृतिक समाज, प्रगतीच्या दिशेने निघालेली शहरे आणि खेडी, राजवाडे आणि किल्ले, मानवनिर्मित तलाव आणि प्रचंड वाळू असे हे राज्य. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना राजस्थानने मोहीत केले आहे.  प्रवाशांना महाराजासारखे वाटावे या उद्देशाने आरटीडीसीने `रॉयल राजस्थान ऑन व्हील्स' ही योजना अंमलात आणली. निसर्गसौंदर्य, विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम, चवदार अन्न आणि मैत्रीचा हात पुढे करण्याची स्थानिक लोकांची इच्छा यामुळे राजस्थानला वारंवार भेट द्यावी असं वाटतं.
ब्रिटीश सरकारने १८७० च्या दरम्यान राजस्थानला ट्न्ेनची ओळख करून दिली. राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या संस्थानिकांनी आपलीही ट्न्ेन असावी असा ब्रिटिश सरकारकडे आग्रह करून स्वत:च्या प्रवासासाठी १८८० च्या दरम्यान सर्व सुखसोयींनी युक्त अशा रेल्वे डब्यांनी प्रवासाला सुरुवात केली. हे रेल्वे डबे म्हणजे राजमहालांची प्रतिकृतीच. अमाप धन असल्यामुळे खर्चाची पर्वा न करता या संस्थानिकांनी उपभोग घेतला.
१९८१ मध्ये आरटीडीसी, भारतातील इतर राज्ये आणि भारतीय रेल्वे एकत्र येऊन धूळ खात असलेल्या या राजेशाही रेल्वेडब्यांना नवीन रूप देऊन रेल्वेमार्गावर आणायचे ठरविले. उद्देश असा की आंतरदेशीय प्रवाशांना सुखमय, आलिशान रेल्वेमार्गे भारतदर्शन व्हावे. रॉयल राजस्थान ऑन व्हील्स ही ट्न्ेन यापैकीच. इतरांमध्ये सर्वोत्तम. या ट्न्ेनमध्ये एकूण तेरा कोचेस असून प्रत्येकाला राजस्थानमधील प्रसिद्ध महालांची नावे दिली आहेत. उदा.हवामहाल, सूर्यमहाल, मोतीमहाल, लालगढ महाल वगैरे. प्रत्येक कोचला दोन भव्य खिडक्या असल्यामुळे चालत्या गाडीतून बाहेरील दृश्ये पाहताना खूप मजा वाटायची. रॉयल राजस्थान ऑन व्हील्स ट्न्ेनमध्ये शिशमहाल आणि स्वर्णमहाल हे दोन डबे असून येथे ब्रेकफास्ट आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था आहे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी पाच तारांकित हॉटेलात केली. दोन्ही महालामध्ये  उत्कृष्ट दर्जाची शराब मिळण्यासाठी बार आहेत. एका कंपार्टमेंटमध्ये स्पा आणि लायब्ररी असून इंटरनेट, मासिके आणि ताजी वर्तमानपत्रे उपलब्ध असतात. आठ दिवस आणि सात रात्रींचा सुखकर प्रवास एमआरडीसी ने अतिशय काळजीपूर्वक आणि हुशारीने आखला आहे.
रॉयल राजस्थान ऑन  व्हील्स ही गाडी दिल्लीतील सफदरजंगमधून जोधपूर, उदयपूर, चितोडगड, सवाई माधोपूर आणि जयपूर या पूर्वीच्या संस्थानिकांच्या राज्यांना भेट देऊन पाचव्या दिवशी मध्यप्रदेशातील खजुराहोला येते. सहाव्या दिवशी उत्तर प्रदेशातील वाराणसी (किंवा काशी, बनारस) आणि नंतर दौऱ्याच्या सातव्या दिवशी पहाटेला आग्रा आणि आठव्या दिवशी सकाळी पुन्हा सफदरजंग या स्टेशनात येऊन आमचा सुखमय, राजेशाही थाटाचा दौरा संपला.
पहिल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आम्ही सर्व प्रवासी सफदरजंग स्टेशनवर जमलो. पुष्पगुच्छ, हार घालून आणि गंध लावून दोन युवतींनी आमचे स्वागत केले. शेजारी सनई-तबला संगीत चालू होते. खात्री पटली की आमची ही सफर खरोखरच एखाद्या संस्थानिकासारखीच होणार! सर्वांचा परिचय आणि मार्गदर्शकांच्या सूचनांनंतर आम्ही आपापल्या डब्यात गेलो. प्रत्येक डब्यासाठी पारंपारिक रजपूत वेशात दोन कर्मचारी तैनात होते. उत्कृष्ट फेर्नचर, पलंग, झुंबर, स्वतंत्र टॉयलेट, छान कारपेट, एसीयुक्त असा हा छोटा महाल होता. ५-३० वाजता आमची ट्न्ेन जोधपूरला निघाली. रात्री शिशमहालमध्ये जेवण आणि चालत्या गाडीत आलिशान पलंगावर झोप घेण्यात काही औरच मजा असते. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.
सकाळी स्वर्णमहालमध्ये न्याहारी झाली. आठ वाजता जोधपूर स्टेशनवर आलो. प्लॅटफॉर्मवर हातात रायफल असलेले पाच-सहा सुरक्षा अधिकारी दिसले. गाईडने खुलासा केला की प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि बाहेरील लोक प्लॅटफॉर्मवर येऊ नयेत म्हणून  पुढील प्रत्येक स्टेशनवरसुद्धा ही काळजी घेतली जाईल. स्टेशनबाहेरील एसी बसमधून आमची जोधपूर सफर सुरू झाली. जोधपूर हे राजस्थानमधील दुसऱ्या नंबरचे शहर. सनसिटी म्हणूनही ओळखले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जोधपूर राजपुतानामधील (आत्ताचे राजस्थान) सर्वात मोठे संस्थान होते. भारत-पाकिस्तान विभाजन झाले त्यावेळी बराचसा भाग पाकिस्तानमध्ये गेला. जोधपूर संस्थानाचा निर्माता राव जोध याने १४५९ मध्ये पांघेतीया डोंगरावर एक प्रचंड किल्ला - मेहरणगड - बांधला. या किल्ल्यावरून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावरील म्युझियम बघण्याजोगे आहे. जोध घराण्यातील पुढील संस्थानिकांनी या किल्ल्यावर मोतीमहाल, झांकी महाल, फूलमहाल, रंगमहाल, उमेड भवन (सध्याचे ताज हॉटेल) अशा अनेक वास्तू बांधल्या. चामुंडा, मुरली मनोहर आणि आनंदघन ही मंदिरेही येथे आहेत. जसवंतसिंग यांची सतरा वर्षांची कारकीर्द (१८७८ ते १८९५) जोधपूर घराण्यातील सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते. संध्याकाळी ५ वाजता आमची ट्न्ेन उदयपूरच्या मार्गाला लागली.
दुसरे दिवशी सकाळी ७ वाजता आम्ही उदयपूरला पोहोचलो. न्याहारीनंतर आम्ही उदयपूर शहर, महाराजांचा महाल आणि बोट सफर करण्यासाठी निघालो. उदयपूर शहर सिसोडिया वंशातील उदयसिंग या व्यक्तीने प्रस्थापित केले. काही नैसर्गिक पण पुष्कळसे मानवनिर्मित तलाव असल्याने या शहराला `लेक सिटी' म्हणून ओळखले जाते. प्रचंड महाल, मंदिरे आणि सुंदर बागा यांची विपुलता आहे. रजपुत आणि मोगल वास्तुशास्त्र यांचे मिश्रण सिटी पॅलेसमध्ये प्रकर्षाने जाणवते. सिटी पॅलेस सर्वात मोठा असल्याने प्रत्येक विभाग पहायला खूप वेळ लागतो. सहेलियोंकी बारी किंवा मेडन गार्डन, लेक पॅलेस, जाग मंदिर ही ठिकाणे अतिशय प्रेक्षणीय आहेत. उदयपूर संगमरवरी वस्तू व कपड्यांवरील पेंटींगसाठी प्रसिद्ध आहे. महाराणा जगतसिंगने १६५ १ मध्ये बांधलेले जगदीश मंदिर फार सुंदर असून त्यांची बांधणी इंडो-आर्यन वास्तुशास्त्रावर आधारित आहे.
संध्याकाळी ५ वाजता आमची राजेशाही सफर चितोडगडला पोहोचली. सात मैल लांब आणि सातशे एकर जमिनीवर चितोडगड पसरलेला आहे. शूर सिसोडिया महाराजांनी  मोगलांशी युद्ध करण्यात आयुष्य घालविले. युद्धामुळे पडझड झालेल्या किल्ल्यावर विजयस्तंभ, कीर्ती स्तंभ, कालिकामाता मंदिर, कुंभश्याम मंदिर आणि ज्या ठिकाणी भगवान कृष्णाची भजने गाण्यात मीराबाईने आयुष्य काढले ते मंदिरही आहे. एका तलावाशेजारी पडझड स्थितीतील सौंदर्यवती पद्मिनीचा महाल आहे. किल्ल्यावर काळोखाचे राज्य पसल्यानंतर चितोडगडाची पूर्वेतिहासाची झलक म्हणून प्रकाश आणि आवाज माध्यमामार्फत एक छानदार शो दाखविला जातो.
चौथ्या दिवशी सकाळी आमची गाडी सवाई माधोपूर स्टेशनवर आली. बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांमधून आम्ही रणथंभोर नॅशनल पार्क येथे पोहोचलो. हा पार्क १३३४ स्प्े.किलोमीटर्सवर पसरलेला असून बेंगाल वाघाशिवाय, जंगली मांजरे, कोल्हे, लेपर्ड, सांबर, मुंगूस, नीलगाय इ. जनावरे आणि अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. धोक, आंबा आणि पिंपळाची झाडेही भरपूर प्रमाणात आहेत. पार्कमध्ये काही ठिकाणी शिकार क्रॅम्पस् असून राजे-महाराजे या ठिकाणी लवाजम्यासह शिकार करण्यासाठी मुक्काम करीत. १९७३ साली वाघ आणि इतर जनावरे यांचे संरक्षणासाठी कायदा करण्यात आला. रणथंभोर नॅशनल पार्क हे त्यापैकीच एक.
सकाळी ११-३० ला आम्ही जयपूर स्टेशनवर आलो. महाराजा सवाई जयसिंगने १७२७ साली जयपूरची स्थापना केली. शहराच्या आखणीबद्दल आजही देशातील उत्तम शहर म्हणून जयपूर प्रसिद्ध आहे. उंच पहाडावर प्रचंड अंबर किल्ला-महाल आहे. किल्ल्यावरून खालील शहराचे विहंगम दृश्य दिसते. घरे हलक्या गुलाबी रंगाची. १८७६ साली प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनानिमित्त संपूर्ण शहर गुलाबी रंगाने रंगविले होते म्हणून या शहराला अजूनही पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. अंबर किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजा-महाराणीप्रमाणे हत्तीवर बसून किल्ल्यात जाण्यासाठी खास वेगळी जागा आहे. सजविलेल्या हत्तीवरून किल्ल्यावर जाण्यात काही औरच मजा! जसे आगऱ्याचे ताजमहालशी नाते तसेच जयपूरचे हवामहलशी. हवामहाल पाच मजली असून राजपूत आणि मोगल वास्तुशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. रामनिवास बागेतील अल्बर्टहाल म्युझियम पाहण्यासारखे आहे.
रात्री १०-१५ ला जयपूरहून निघून सकाळी १० वाजता आम्ही खजुराहो येथे पोहोचलो. चांडेला राजपूत राजांनी खजुराहोला सन ९५० ते १०५० या शंभर वर्षांत शिव, विष्णू आणि जैन मंदिरे बांधली. ११ व्या शतकात चांडेला या भागातून इतर ठिकाणी निघून गेले. त्यामुळे ही देवळे अज्ञातवासात राहिली. सन १८३८ मध्ये बर्ट या इंग्लिश गृहस्थाला खजुराहो देवळांचा शोध लागला. ही देवळे जंगली भागात असल्यामुळे मोगलांपासून सुरक्षित राहिली. आता तर खजुराहोतील ऐतिहासिक वास्तू णछएडउज च्या देखरेखीखाली असल्यामुळे त्यांची चांगली काळजी घेतली जाते.
खजुराहोहून रात्री आठ वाजता निघून सकाळी आठ वाजता आम्ही वाराणसीला पोहोचलो. वाराणसी किंवा बनारस हे खूप जुने शहर म्हणून ओळखले जाते. पुरातन काळी कास्य जातीचे लोक इथे राहात. त्यांच्या शहरालाम काशी असेही म्हटले जाते. मार्क ट्वेन याने लिहिले आहे,,'Banaras is older than history, older than tradition, older even than legend and looks twice as old as all of them put together  ही सत्य परिस्थिती आहे. तुलसीमानस, भारतमाता, हरेश्वर, ब्रह्मेश्वर अशी अनेक देवतांची मंदिरे येथे आहेत. काशी विश्वनाथ आणि ग्यानवापी मसजिद तर एकदम शेजारीशेजारी आहेत. गंगेच्या एका बाजूला शंभरपेक्षा जास्त घाट असून मणिकर्णिका, दशाश्वमेध, असी, कबीर, पंचगंगा, वरूणासंगम हे घाट विशेष. आमच्यासाठी खास बोटीची व्यवस्था होती. भाविक लोक नदीत स्नान करीत होते, काही घाटांवर दहनविधी चालू होते. असे चित्र जगात कुठेही दिसणार नाही. मी व माझ्या पत्नीने दीप-फुलांची परडी नदीत सोडून आमच्या आई-वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
बोटीची सफर संपल्यानंतर दशाश्वमेध घाटावर गेलो. रात्रीची आरती मंत्रमुग्ध करणारी वाटली. नंतर वाराणशीनजीक असलेल्या सारनाथक्षेत्री गेलो. गौतमबुद्धाचे पहिले उपदेशपर प्रवचन येथेच झाले. जैनांचे सातवे तीर्थंकर सुपार्श्वनाथ आणि तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा जन्म याच क्षेत्री झाला. त्यामुळे वाराणसी किंवा बनारसला पुण्यक्षेत्र मानले जाते.
आमचा पुढचा टप्पा होता जगप्रसिद्ध ताजमहाल! प्रथम आम्ही यमुना किनाऱ्यावरील आग्रा फोर्ट पहायला गेलो. अकबर ते औरंगजेबपर्यंत सर्वांनी किल्ल्यात खासमहाल, नगिना मसजिद, जोधाबाई पॅलेस आणि इतर अनेक वास्तू बांधल्या. ज्याने ताजमहाल बांधला त्या शहाजहानला याच किल्ल्यातून एका विशिष्ट भागातून ताजमहालाचे दर्शन होत असे - एक कैदी म्हणून! दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही ताजमहाल येथे पोहोचलो. शहाजहानने २ हजार मजुरांच्या मदतीने १६३०-१६५२ या बावीस वर्षांच्या मुदतीत ताजमहाल बांधला. पर्शियन उस्तास ईसा हा ताजमहालचा वास्तुशास्त्रज्ञ. बांधकामासाठी खास दगड चायना, अफगाणिस्तान, श्रीलंका, इराक, इजिप्त या देशांतून आयात केला. भिंतीवर कुराणातील वाक्ये लिहिली आहेत. ताजमहालाकडे जाणारा मुख्य रस्ता, सुंदर बाग, कारंजे, मसजिद आणि नगारखाना यामुळे ताजमहालाची शोभा उठून दिसते. प्रत्येक हिंदूने मोक्षप्राप्तीसाठी काशीला जावे तसेच प्रत्येक भारतीयाने एकदा तरी ताजमहाल पहावाच असे मला वाटते!
आगऱ्याची सफर संपली आणि रात्री ९ वाजता आमची गाडी आग्रा स्टेशनवरून निघून दुसरे दिवशी सकाळी ५ वाजता दिल्लीतील सफदरजंग येथे आली. स्वर्णमहालमध्ये न्याहरी झाली आणि रॉयल राजस्थान ऑन व्हील्सच्या कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन आमचा निरोप घेतला.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रॉयल राजस्थान ऑन व्हील्सचा प्रवास फार खर्चाचा आहे. आमच्या गाडीमध्ये एकूण प्रवासी १७, पण डबे मात्र २०. थोडक्यात म्हणजे महाराजा आणि महाराणी थोड्या पण इतर लवाजमा प्रचंड. प्रवाशांच्या संख्येप्रमाणे डब्यांची संख्या ठरविली जाते. १७ प्रवाशांपैकी सात गोरे प्रवासी (अमेरिका, जर्मनी आणि स्कॉटलंड देशांतील) आणि इतर भारतीय वंशाचेच पण इतर देशांत स्थायिक झालेले. रॉयल राजस्थान ऑन व्हील्सचा उद्देशच असा की परदेशी पैसा भारतात आणावा, उत्तम प्रकारे सेवा करता करता प्रवाशांना महान भारताची ओळख करून द्यावी. सफरीचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी वेळात खूप ऐतिहासिक ठिकाणे दाखविणे आणि तीही रॉयल पद्धतीने. सर्व कार्यक्रम वेळेवर आणि शिस्तबद्ध. कर्मचाऱ्यांची वागणूक अतिशय नम्रतेची. रॉयल राजस्थान ऑन व्हील्सवरील एका आठवड्याची सफर आमच्या हृदयात सदैव राहील.

- Vinayak Apte
614E - 405S
Layton UT 84041    U. S. A
E-mail : aptevin@gmail.com


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन