Skip to main content

17 Oct. 2016

धर्म वरचढ नव्हेच.
अेके काळी महाराष्ट्नचे वर्णन करताना  `धर्म राजकारण समवेत चालती' असे केले गेले होते. अलीकडच्या काळात, सर्वधर्मांसाठी समभाव प्रशासनात बाणवायचा असेल तर हिदूवाल्यांचा तिटकारा करायचा, अशी अेक पुरोगामी फॅशन आली आहे. अेखाद्या हिंदूप्रेमी  राजकीय सत्ताधाऱ्याने त्यांस अनुकूल असा काही निर्णय चुकून घेतलाच तर त्यांचे राजकीय आणि सामाजिक विरोधक असा काही गदारोळ अुठवून देतात की या देशात सांप्रत केवळ ंहिंदूराष्ट्न्च काय ते अवतरले असून आितर धर्मीयांचा आता खातमाच होणार असा कुणाचा समज व्हावा ! अर्थातच त्यांना वाचविण्यासाठी या विरोधकांना जिवाची बाजी लावावी लागणार असेही त्यांना वाटू लागते.

पंढरीची पूजा शासनाच्या वतीने करण्याचा प्रघात आहे, त्यात कुणा काँग्रेसवाल्याला आजवर प्रशासनाचा धर्म दिसला नाही. मुस्लीम धर्मीयांच्या आिफ्तार पाटर््याना हजेरी लावण्यात प्रशासन आडवे येत नाही. आितकेच काय सध्या कित्येक शासकीय कार्यालयांच्या आवारांत देवळे नि देवस्थाने दिसू लागली आहेत. दत्त, हनुमान ही त्यांत लाडकी दैवते आहेत. यांतील काही देव नवसाला पावणारे असल्याचेही सांगितले जाते आणि त्यांच्या दर्शनाला बाहेरच्या लोकांची खूप गर्दी लोटत असते. त्यामुळे ती ती देवळे कार्यालयीन वेळेनंतरही अुघडी ठेवावी लागतात. जयंती मयंतीचे अुत्सव तिथे होतात. आता काही कालानंतर कोण्या भक्ताने शासकीय कार्यालयाच्या आवारात पीर स्थापन केला तर ती बाब कायदेभंग होणार, की धार्मिक होणार, -की सर्वधर्म समभावाची होणार?  

भारतीय जनता पक्षाचे राज्य केंद्रात आणि राज्यात आल्यापासून त्यांच्यासंबंधी असलेल्या लोकांपैकी कोणी अवाक्षर अुच्चारले की त्यावर गदारोळ अुसळून द्यायचा हा अेक नवाच प्रयोग सध्या सर्वत्र सुरू असावा. त्यात विरोधी पक्षांचा वाटा सर्वाधिक असावा हे तर ठीकच आहे, पण सारी प्रसार माध्यमे आणि तथाकथित विचारवंत आिरेसरीने तुटून पडतात. त्यात धार्मिक समानता, धर्र्मनिरपेक्षता, पुरोगामीत्व अशा काही मंगल तत्वांचे अनुसरण नाही. कोणतीही कृत्ये किंवा विधाने करताना कितीही काळजी घेतली तरी त्यांना मतलबी कोलाहल करण्याजोगे खाद्य मिळतेच. मागचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे सत्यसाआीबाबांचे भक्त होते. हे बाबा खरे की खोटे याचा निर्णय करण्याचा ज्याला त्याला अधिकार आहेच, तसा तो `अंधश्रध्दा' वाल्यांस आहे; आणि विलासरावांनाही होताच होता. पण त्यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांची पूजा बांधली की कायदेभंग कसे होतो ? तो शासकीय बंगला असला तरी मुख्यमंत्र्याला खाजगी वापरायलाच तर दिलेला असतो.

त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यानी नाणीजच्या कोणा महाराजाना भेट दिली, त्यांच्या कार्यक्रमात गेले म्हणून टीका होत आहे. मुख्यमंत्री असेही म्हणाले की `राजसत्ता चुकीचे  वागू लागली तर तिच्यावर धर्मसत्तेचा अंकुश पाहिजे.' याचा अनेकांनी विपर्यास करून; अुद्यापासून राज्यपालांच्याही डोक्यावर नरेंद्र महाराजांचे आसन स्थापित होणार असल्याचा आकांत चालविला आहे. कोणत्याही काळात आणि कोणत्याही प्रदेशात, भारतखंडात तरी धर्मसत्तेचा अंमल चालत असल्याचा आितिहास नाही. शिवछत्रपतींनी `हे श्रींचे राज्य' असल्याची ग्वाही दिली. त्याचा अर्थ ते राज्यशासन केवळ हिंदू धर्मीय कर्मकांडाला स्थान देणारेच होते असा कोणी काढलेला नाही. ते देवाधर्माचे राज्य होते. युरोपात ज्या प्रकारे धर्मसत्ता अरेराव झाली तशी या देशात झाली नाही. काही आक्रमकांनी येथे राजसत्ता काबीज केली, त्या काळात त्यांनी धर्माच्या प्रसारासाठी प्रचारकांना मोकाट सोडले व  त्यांना सत्तेचे पाठबळ दिले. पण कोणा धर्मगुरूच्या हाती राजसत्ता कधीच नव्हती.

 प्रश्न राहिला अंकुशाचा. आजच्या राज्यकर्त्यंावर राज्यघटनेचा अंकुश नाही, तर त्या घटनेप्रमाणेच राज्यकारभार चालला पाहिजे. राज्यकर्तेच मुळी घटनेला बांधील आहेत, राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवणारी बाहेरची काही यंत्रणा म्हणजे राज्यघटना नव्हे. अशा कोणत्याही राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असायला हरकत काय ? धर्मसत्ता म्हणजेही कोण्या देवळाचे किंवा बुवा बापूचे नव्हे; तर धर्माने वागणाऱ्या पुरुषोत्तमाचे, मातृदेवतेेचे, अशा कोणा जगद्वंद्य व्यक्तीचे स्थान; जे निर्विवादपणे राजसत्ेतच्या वर असते. मुख्यमंत्र्यानी ते स्थान नाणीजच्या महाराजांना दिले, असा समज कुणी कशापायी करून घ्यावा? त्या महाराजांनी स्वत:ला धर्माचार्य म्हणविले तरी समस्त हिंदुजातांची तशी कुठे समजूत आहे? श्रीकृष्णालाही भगवान  न  मानणारे कित्येक हिंदू आहेत, तिथे धर्मप्रमुखाचे सत्तास्थान हेे महाराज कसे होअू शकतील? ते भान मुख्यमंत्र्याना  नक्कीच असणार. राज्यघटनेचे भान त्यांच्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थ्याला आणि अनुभवी राज्यकर्त्याला, अुटपटांग टीकाकारांपेक्षा नक्कीच जास्त असेल.

स्वातंत्र्याच्या अुंबरठ्यावरच्या काळात ते स्थान गांधीजींनी मिळविले होते. काही राज्यकर्त्यांनी पुढच्या काळात ते स्थान विनोबांना दिले होते. गांधीजी किंवा विनोबा हे कोणी धर्ममार्तंड नव्हते. तर समाजातील सत्शक्तीचे प्रतीक होते. त्यांना राज्यकर्त्यांनी दिलेल्या सन्मानामुळे त्यांच्यावर राजकीय संत म्हणून टीका झालीच. पण मुद्दा आहे तो त्यांच्या राजसत्तेवरील अंकुशाचा. हा  अंकुश त्यांच्या धर्माधारित वागण्याचा आणि विशाल विचारांचा होता. तो कर्मकांडी धर्माचा आणि राजकारणी बुवाबाजीचा नव्हता. अशा सत्शक्तीचा अंकुश राजसत्तेवर असण्यात गैर काही नाही. ते घटनाबाह्य तरी का म्हणावे? अुलट आज राजकीय व सामाजिक बेमुर्वतखोरी माजण्याचे अेक महत्वाचे कारण हे आहे की, आज त्यावर सज्जन शक्तीचा वचक नाही, धाक नाही, अंकुश नाही. त्यालाही कारण असे की अशा शक्तीचे अस्तित्व कमी झाले आहे; आणि जे काही शिल्लक आहे ते निष्क्रीय आहे. गोरक्षण करण्यास गांधीजी अथवा सावरकर यांनी महत्व दिले कारण ते भारताच्या कृषीधारणेस अुपयुक्त आणि पूज्य होते. त्या धर्मश्रध्द नेत्यांनी गोमांस भक्षण करण्याच्या संशयावरून कुठे हाणामाऱ्या केलेेल्या नाहीत. म्हणून अशा गांधी सावरकरप्रणित धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवर असला पाहिजेच.जनता पक्षाच्या राजवटीत ते स्थान पुष्कळ अंशाने जयप्रकाशंाकडे होते. आजच्या काळातील कोणा हायफाय महाराजांना, साधू मलंगांना, किंवा मौलाना बापूंना त्या त्या धर्माचे लोकही धर्मसत्ता मानत नाहीत.त्यांना त्या त्या धर्माचे वाचाळ प्रतिनिधित्व राजकारणी लोक देतात, आणि दुही दुफळी माजविण्यासाठी त्यांचा वापर करून घेतात.

मुख्यमंत्र्यांचे विधान त्या अर्थी राजकारणी नसेल असे मानण्याचेही कारण नाही. नरेंद्र महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचा भगतगण खूप मोठ्या संख्येचा आहे. त्यांच्या काही कार्यक्रमासाठी गेल्यानंतर धर्मसत्तेचा अंकुश असण्याची गरज सांगण्याने तो वर्ग सुखावतो, हा राजकीय स्तुतीपठणाचा तद्दन राजकीय प्रकार आहे, त्यात गंभीर काही नाही. कुणाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर त्याचे मोठेपण सांगावे यात व्यवहार आहे. ते सगळे खरे मानायचे नसते. मराठा समाजाची संख्या मोर्चात अेकवटू लागल्यावर त्यांच्याबद्दल धन्योद्गार काढण्याची जी स्पर्धा सुरू आहे, तसेच कुठलीही गर्दी पाहिल्यावर राजकीय पुढाऱ्यांचे होत असते. याचा अर्थ त्यांनी लगेच कुठल्या तरी महाराजांना राष्ट्न्पतींच्या किंवा सर्वोच्च न्यायमूर्तींच्या वरचे स्थान देअून, त्याच्या पादुका अशेाकस्तंभावर विराजमान करण्याचा डाव रचला आहे; असले काही नाही. तसा समज करून घेअून अुगीच भुआी धोपटणाऱ्यांचे पुरोगामी माध्यम-लालित्य गरजेचे नाही. घटनेचे स्थान केवळ त्याच त्या अंधश्रध्द विचारवंतांना माहीत आहे, असा त्यांचा गोड गैरसमज असला तर असू द्या. पण मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राज्यपाल वगैरे सामान्य लोकांनाही त्यातले थोडे कळते, असे मान्य करण्याचा कनवाळूपणा दाखवावा.


पाकिस्तानातील मराठे
बलुचिस्तानसंबंधी काही नवीन माहिती मला कळली, शहानिशा चिकित्सा संशोधन करावे. तेथील १.३१ कोटि लोकसंख्येपैकी २० लाख मराठी वंशाचे आहेत. १९४७ सालापासून येथे स्वातंत्र्यासाठी ४ उठाव झाले. त्यांचे नेतृत्व ह्या मराठी वंशीयांकडे होते. पानिपतच्या तिसऱ्या संग्रामात जे मराठी सैनिक युद्धबंदी झाले, त्यांतील काहींना बलुचिस्तानात आणले गेले, त्यांची सध्याची नावे अशी: पेशवानी मराठा, बुगती मराठा, काल्पार मराठा, नोयानी मराठा, शाम्बनी मराठा, मोसानी मराठा, शाऊ मराठा इत्यादी. मराठा नाव असलेल्या तीस जाती तेथे आहेत. आजही ते आपल्या आईला `आई' म्हणतात. `अम्मीजान' नाही. शिवाजी महाराज आणि पेशवे ह्यांच्याविषयी त्यांना आदर अभिमान आहे. `हर हर महादेव' अशा प्रकारच्या घोषणा ऐकतात तेव्हा ते उभे राहून ह्या घोषणांना प्रतिसाद देतात.
ज्ञात्यांनी ह्यावर आधी प्रकाश टाकावा ही विनंती ! प्रतिभाताई रानडे यंाच्या `अफगाण डायरी'त तेथील १७६१ च्या मराठी माणसांच्या वंशजांसंबंधी वर्णन आहे.
भारतीय पंचागाची अमेरिकेत तारीफ :
      मे २०१६ मध्ये वॉशिंग्टन येथे खगोलशास्त्र वैज्ञानिकांची जागतिक परिषद झाली. त्यात गत ३० वर्षांच्या आकाशग्रह-तारका, भूपृष्ठावर होणारे नैसर्गिक परिणाम, विशेषत: दैनंदिन  मानवी जीवनावर परिणाम व एकूणच जीव-सृष्टीवरील बदल यावर चर्चा झाली. चेन्नईच्या हिंदू दैनिकात याविषयी माहिती आली होती. आपले क्रॅलेंडर यांच्या मांडणीवरूनही अनेकांनी मते दिली. या सर्वात आजही हिंदू पंचागाची मान्यता कायम असल्याचे आढळले. ते अधिक शास्त्रशुद्ध असल्याचे म्हटले गेले. पृथ्वीचा सूर्याभोवती, चंद्राचा पृथ्वीभोवती व पृथ्वीचा स्वत:भोवती असे एकेक वेढे पूर्ण होण्यास लागणारे कालखंड हे एक नैसर्गिक तथ्य आहे. या कालखंडाचे भागाकार केले असता जर नि:शेष भाग जात असता आणि पूर्णांकात उत्तरे येत असती तर ते आपले मोठेच भाग्य ठरले असते; पण नैसर्गिक तथ्ये ही सत्य आहेत. ती माणसाची सोय पाहात नाहीत. वर्ष ही एक सौर घटना असते, महिना ही एक चांद्र घटना असते आणि दिवस ही मेदिनीय (पृथ्वीविषयक) घटना असते. क्रॅलेंडर किंवा पंचागात या सर्वाचा विचार अटळ असतो. ३० जून २०१५ च्या रात्री १२ वाजता एक लीप इयर गाळणे या अॅडजेस्टमेंटवरून गेग्रेरियन काम-विभाजन बसते करण्यात आले.
     आपल्याकडे मात्र चक्क १ महिना अधिक म्हणून घेतला जातो. तथ्यांशी निगडीत जे जे विधी वा आन्हिके आहेत त्यांचे वैज्ञानिक समर्थन ऋतुचक्रातील नैसर्गिक बदलांनी केले जाते. काही वेळा एकेका लिपीचा लोप आणि वृद्धी चालूच असते. परंतु हे सर्व शास्त्रीय असल्याचे मानणारा विज्ञाननिष्ठांचा मोठा वर्ग जगात आहे. आपल्या ऋषीमुनींनी पौराणिक काळापासून आखून दिलेला हा दैनंदिन जीवन प्रवाह शाश्वत असल्याच्या मतास जगातील परिषदेचा पाठिंबा आहे.


पन्नाशी झाली
अुद्याच्या दिवाळी पाडव्याला बरोब्बर पन्नास वर्षे होतात. माझ्या व्यवसायाची सुरुवात १९६६च्या दिवाळीत झाली. त्याचे अुद्घाटन वगैरे काही करण्याअेवढा तो प्रसंग महत्वाचा वाटला नाही, आणि नव्हताही ! कॉलेजात मला चांगली गती होती, अभ्यास चांगला होता; पण भविष्याचा विचार करता खर्च आणि करीयर यांचा मेळ मला तरी घालता येत नव्हता. चांगले जगण्यासाठी फार पैसा लागत नाही याची खात्री येत चालली होती. कॉलेजातले सारे मित्रही त्याच निर्णयाशी येअून थांबत होते, पण घरच्यांचा धाक म्हणा किंवा परिस्थिती शरण म्हणा, `हे शिक्षण बास' म्हणायचे चातुर्य कुणाअंगी आलेले नव्हते. मला तशी संधी आली, आणि मी कॉलेजच्या खोलीमधली गादी गुंडाळली.

किर्लोस्करवाडी जवळच्या वसाहती वाढत होत्या, तिथं घरं अुभी राहात होती. त्यांच्यासाठी मंगलोरी कौलांचा खप चांगला होता. सांगली भागातील रतिलाल विट्ठलदास गोसालिया हे मोठे व्यापारी होते. गुजरातच्या भावनगरहून रस्सीलोटा घेअून ते या भागात आले, आणि व्यापारधंद्यात त्यांनी नाव कमावले. त्यांच्याकडे या मंगलोरी कौलांच्या अेजन्सीज् होत्या. पूर्वी दक्षिण मध्य रेल्वेची मीटरगेज लाआीन होती, त्यालगतच्या काही स्टेशनांवर त्यांच्या मालाचे डेपो होते. रायबाग, शेडबाळ,माधवनगर,भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, अशी त्यांची अेजन्सी अेकेका व्यापारी माणसाकडे असायची. त्यातल्या किर्लोस्करवाडीच्या जागी ते नव्या माणसाच्या शेाधात होते. आिथल्या अेका गृहस्थाने त्यांंच्याकडे प्रयत्न चालविले होते, त्यावर निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी माझ्या वडिलांची ओळख त्याच्याकडे मागितली. तेवढा परिचय देणारी अेक चिठी माझ्या वडिलांनी त्यास दिली. शेठजींनी माझ्या वडिलांना बोलावून घेतले.वडील नंतर अेकदा सांगलीला गेले,त्यांच्यासोबत सहज म्हणून मी गेलो होतो.

भेटीत शेठजी म्हणाले की, तुम्ही या माणसाचा परिचय असल्याचे म्हटले आहे, पण अुद्या तिथं काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी....? आम्ही त्या झेंगटात कशाला अडकू? वडिलांनी ती जामिनकी अर्थातच नाकारली. शेठजीनी पुढचा प्रस्ताव ठेवला, तर मग तुम्हीच का हा डेपो चालवत नाही?' वडिलांचं वय तो प्रस्ताव स्वीकारण्याचं नव्हतं. मी हळूच माझंं घोडं दामटलं. काम काय काय, जबाबदारी काय, सगळं समजून घेतलं आणि त्यांना होकार देअूनच घरी परत आलो. त्यांनी बाकी काही अटी तर घातल्याच नाहीत. माझ्या वडिलांबद्दल या भागात असलेली शुध्द प्रतिमा हे माझं भांडवल होतं.

अेकाच आठवड्यानी दिवाळीच्या पाडव्याला गुजराती व्यापाऱ्यांचं नवं वर्ष सुरू व्हायचं. त्यापासून हा डेपो मी ताब्यात घेतला. दिवाळीच्या सुटीला आलेला मी संभ्रमित कॉलेजकुमार, अेका आठवड्यातच `मंगलोरी कौलांचा व्यापारी' म्हणून दाखल झालो. मला १७वं वर्ष संपलं होतं. पाडव्याला पूजन वगैरे केलं. काही दिवस गिऱ्हाआिकाची वाट पाहात बसण्यात गेले. कौलाच्या त्या वखारीच्या खोपट ऑफीसात असलेलं अेक फडताळ आणि बैठे डेस्क चारदा आिकडून तिकडं ठेवून झालं. आठदहा दिवसांनी पहिलं गिऱ्हाआीक झालं. राणी छाप कालिकत कौले ७००विक्री झाली. तीन बैलगाड्यांत ती भरून नेली, त्या शेतकऱ्याचं नाव विष्णू गुंडा थोरात, नागठाणे. मला त्यातून ८.४०रु. कमिशन मिळाले. ही माझी धंद्यातली पहिली कमाआी !

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन