Skip to main content

24 Oct. 2016

SAMPADAKIY
निसर्गाने भारताला  अुत्तम हवा, विपुल पाणी व कसदार भूमी दिलेली आहे. जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांमध्ये माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशी नैसर्गिक संपन्नता कमी असल्यामुळे परस्पर लढाया आणि मारामाऱ्या यांनी जगाचा आितिहास घडला आहे. त्याअुलट भारतीय अुपखंडात मात्र प्रचंड ज्ञानाचा महासागर तयार झाला होता, असे आता अुघड होअू लागले आहे. ज्या काळात युरोपीय देशंात लोक रानटी राहणीमानाचे होते, त्यावेळी भारताचे लोक हिमालयाच्या चोटीवर अुभे राहून `कृण्वन्तो विश्वमार्यम्' (सारे जग सुप्रतिष्ठित करू) अशी अुद्घोषणा करत होते.

अशा संपन्न वातावरणात राहात असताना स्वाभाविकच माणसाचा अुपजत अुत्सवी भाव सतत प्रकट होत असतो. भारत हा अुत्सवप्रिय देश आहे, असे म्हटले जाते. आपल्याकडे अेखाद्याचा वाढदिवस साजरा होतो. हल्ली तर त्याचे महाप्रस्थ माजले आहे; शेंबड्या पोरांचाही वाढदिवस चौकात शुभेच्छांचे फलक झळकल्याशिवाय साजरे होत नाहीत. पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला बैलगाड्यांच्या शर्यती होण्यात कुणाला औचित्यभंग वाटत नाही. मोठ्या व्यक्तीची पुण्यतिथीही आपल्याकडे दु:खद श्रध्दांजलीअैवजी  ती अुत्सव म्हणून `साजरी' होते.

पण त्यात आश्चर्य नाही. सिंधू संस्कृतीचे आपण वारस आहोत असे मानले तर तिथे तशीच मजेशीर प्रथा होती, आजही सिंधी लोक ती आचरतात.हजरत कलंदर शाहबाज हा अफगाणिस्तानातून भारताच्या वाटेवर असताना सेवहान येथे होता. १२-१३व्या शतकातील ही घटना आहे. त्याचे प्रार्थनास्थळ म्हणजे पूर्वीचे शिवमंदीर होते. त्या नगरीतील सर्वांना मलंग बनविण्यात आले. हा कलंदर म्हणजे धर्मांतराचा `पराक्रम' करणारा आहे. पण आज सिंधी लोक `दमादम मस्त कलंदर' हे अुडत्या चालीचे अुत्सवगीत काही संतकवन असल्याचा समज करून कोणत्याही अुत्सवात दणक्यात म्हणत असतात. आपल्याला निमित्त काहीही चालते, त्याचा अुत्सवच केला जातो. हल्लीच्या भाषेत कोणत्याही प्रसंगाचा `आिव्हेंट' केला जातो.

गणपती ही तर साक्षात ज्ञान कला क्रीडा यांची देवता आहे. त्या देवतेचा अुत्सव माणसाच्या अुत्सवप्रियतेसाठीच बेतला असावा. लोकमान्यानी तो घराबाहेर आणण्यापूर्वी तो घरोघरी साजरा होतच असे. त्या कारणाने संगीत व ज्ञानवर्धनाचे काही कार्यक्रम होत असत. लोकमान्यांनी तो सार्वजनिक करण्यामागे वेगळा अुद्देश होता हे तर जगजाहीर आहे. तसे करण्याने लोकांच्या अुत्साहाला अुधाण येआील, आणि तो हाताबाहेर जाआील; असे भाकीत त्याच वेळी न्यायमूर्ती रानड्यांनी केले होते.पण टिळकांचा तो मूळ अुद्देश पूर्ण झाल्यावर तो अुत्सव अधिक भव्य प्रमाणात वाढत चालला आहे. अलीकडे त्यावरती खूप आक्षेप घेतले जातात, टीका होते, वादही होतात. पण त्यांचा परिणाम न होता गणपतीचा अुत्सव मोठा मोठा होत चालला आहे. त्यातून अनेक प्रश्न तर पुढे आलेच आहेत. प्रदूषण, पर्यावरण, तरुणाआीचे बहकणे, असांस्कृतिक वाटणाऱ्या प्रथा बोकाळणे अशा समस्यांनी गणपतीसारख्या ज्ञानदेवता ग्रस्त झालेल्या आहेत. तथापि तो अुत्सव अेके काळी काही अुच्चभ्रू वर्गांपुरता मर्यादित होता, तो समाजाच्या सगळया थरांत पसरत गेलेला आहे हेही खरे आहे. सहजच असा अेक विचार येतो की, या अुत्सवाला यापुढची दिशा कोणती असेल ? आणखी पन्नास वर्षांनी हा अुत्सव कोणते स्वरूप धारण करेल ? त्यातून जनसामान्यांचे काही मंगल होआील का ?  -की त्यातून अस्वस्थताच वाढेल ?

गणपती हेे आपल्या अुत्सवप्रियतेचे केवळ अेक अुदाहरण आहे. परंतु दिवाळी- दसरा, होळी, हेही सण मागे नाहीत. गावोगावच्या यात्रा जत्रा हे आता देवदर्शनापुरत्या मर्यादित नाहीत, त्यांचे अुत्सव कधीच झाले आहेत. दत्तगुरूसारख्या विरक्त यतीच्या जयंतीनिमित्तानेही गावोगावी अुत्सव होत असतात. या निमित्ताने वास्तविक फार मोठी अुलाढाल -अुलाघाल होेअू लागली आहे.  तिचे सामाजिक वा धार्मिक क्षेत्रातील परिणाम काय होतात, हा अेक मुद्दा असतो, पण त्यापेक्षा परिणामकारक विचार आर्थिक क्षेत्रातला असतो.

अलीकडच्या जागतिकीकरणात औद्योगिकीकरणास महत्व आले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्नीय राजकारणाचे परिणाम देशोदेशी त्वरित होत असतात. आज माहिती तंत्राच्या क्षेत्रात जगभर मोठी अुलाढाल होत असते, पण आितरांच्या तुलनेत आपण त्या बाबतीत तसे मागेच आहोत. जगभरात कुठे युध्द, कुठे तेलसंकट, कुठे बँक घोटाळे अशा कारणांनी मंदी येत असते. त्या त्या देशांपुढे बिकट प्रश्न तयार होतात. भारतात त्या जागतिक मंदीचेही तितके गंभीर परिणाम जाणवत नाहीत . त्याला अेक महत्वाचे कारण आपली धार्मिक मानसिकता हे आहे. धार्मिक अुत्सवांच्या निमित्ताने अेवढी प्रचंड आर्थिक अुलाढाल होते की, त्यापुढे असली औद्योगिक मंदी फारसा प्रभाव आपल्यावर पाडू शकत नाही. यंदा आपल्याकडे मोटर वाहन, खनिजे, आिंजिनियरिंग अशा क्षेत्रांत मंदी जाणवते आहे. पण त्यामुळे कालचे नवरात्र कमी अुत्साहात नव्हते, तुळजापूर कोल्हापुरात कमी गर्दी नव्हती. त्या योगे होणारी सामाजिक अुलाढाल आर्थिक क्षेत्राला सावरून घेअू शकते अशी आपली समाजरचनाच आहेे. म्हणजे गणपतीसारखे अुत्सव आहेत म्हणून आपल्याकडे जीवघेण्या मंदीचा विचार करण्याचेही कारण नसते.आपण त्यामुळे श्रीमंत राष्ट्न् कदाचित  न  होअू, पण टिकून राहू; आणि त्या अुपासनेच्या कारणानेच समाधानीही राहू असे म्हणता येआील.

माणूस आजच्या परिभाषेत प्रगत होत जाआील तसतसा अुत्सव साजरा करण्यातही फरक पडत जाणार हे अुघड आहे. मोजक्या ज्ञानवंतांपेक्षा त्यातील मर्म जसे विशाल समुदायाला अुमगत जाआील तसे त्यांच्या परीने तो अुपासना करणार. गणपतीची मिरवणूक पूर्वी निघत होती, तशीच ती आज निघेल, अशी शक्यताच नाही. पूर्वी महिला वर्ग घराच्या बाहेत पडत नव्हता, त्या जागी आता तरुण पोरी फेटे बांधून ढोल बडवत असतात. ही गोष्ट साधक की बाधक याची कोणी चर्चा करीत नाही... करूही नये. पण काही काळाने आपल्या राहणीत, पेहेरावात बदल होतील  तेही अुत्सवांत येणारच ! पगडी धोतर या वेषात आज कोणी गणपती आणतो काय ? काही काळाने जीनची पँट घालून मुलींनी गणपती आणला तर आश्चर्य नाही; आणि आक्षेपार्ह नाही. कुणी आक्षेप घेतलाच तर तो टिकणार नाही. कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या देवळात पूर्वी कासोट्याची लुगडी आणि नथी-अंबाडे दिसायचे, आता जीन आणि बॉबकट दिसू लागले आहेत. गाभाऱ्यात महिला प्रवेशाचा विषय होता, त्यास फार काळ नाही झाला!

तात्पर्य असे की, गणपतीचा किंवा आितर कोणत्याही प्रसंगाचा अुत्सव असला तरी तो अुत्सवाच्या अुत्साहाने साजरा होत जाणार. प्रसंग  `साजिरा'  करण्याची माणसाची चिरंतन हौस असते. ती स्थळ काळ स्थिती प्रमाणे बदलत जाते. पण ती नाहीशी होत नाही. गणपतीचा अुत्सव वास्तविक ज्ञानाचा अुत्सव असायला हवा, सकल कलांचा अुत्सव असायला हवा.तिथे कलकलाट होण्याने काही लोकांना खटकते. पण कलेचे प्रकटीकरण हेही प्रत्येकाच्या मगदुरानुसार होत असते. त्याचा आस्वादही त्या त्या समाजाच्या क्षमतेप्रमाणे बदलत जात असतो, त्यात चांगले वाआीट मानण्याचे कारण नाही. काहींना भीमसेन किंवा कुमारांचे गाणे आवडेल तर काहींना रेड्याची टक्कर रिझवते. जे कोणी गणपतीपुढे कला सादर करणार आहेत, ते त्यांच्या कुवतीने चांगलेच सादर करत असतात.

परंतु त्यातील गाभा समजून घेण्यासाठी त्या क्षेत्राचा अभ्यास करून त्याची जाण वाढवावी लागते. तसे पाहिले तर गणपतीची मूर्ती ही कुणाला कधी अमूर्ताचे रूपक म्हणून भावलेली असेल. अेरवी अशी वक्रोदर तुंदिलतनू देवता नृत्य करते, यातील संकल्पना आजच्या विज्ञाननिष्ठ माणसाला कशी पटावी? पण त्या निमित्ताने विज्ञानवादीही त्यात सहभागी होत असतो हा त्या अुत्सवी वातावरणाचा परिणाम किंवा विजय आहे.

त्यामुळे पाच पन्नास वर्षांनंतरच्या गणेशेात्सवाची कल्पना करायची झाली तर ती विज्ञानाच्या साधनांशी निगडीतच करावी लागेल. अुत्सवाच्या निमित्ताने सगुणभक्तीपासून निर्गुणाच्या जाणीवेपर्यंत मजल मारायची असते, ती खरी धार्मिक प्रगती आहे.काही वर्षांपूर्वी ते काम अवघडच होते, यापुढे ते सोपे होत जाआील, तशी आिच्छा आणि ओढ मात्र हवी ! त्या शेाधात आजचे संकेत आणि साधने, धार्मिक गटबाजी यांपासून मुक्त व्हायला हवे. आज तरी आपण त्या साधनांत आणि बाह्य अुपचारांतच अडकलो आहोत. त्यांवर भौतिक बदलांचा प्रभाव राहणार. निरांजनांअैवजी विजेची चकमक येणार.  ज्यांना पात्रता किंवा क्षमता नाही त्यांनी सगुण मूर्तींचे अुत्सव करत राहण्याला दुसरी वाट नाही. ती  वाट ठरवून देता येणार नाही. त्या त्या काळात अुत्सवांचे जे स्वरूप असेल ते मान्य करतच जावे लागेल.

ज्यांना त्यांतील गाभा समजलेला असतो, अशा ज्ञानवंतांनीही सगुणभक्तीच्या अुत्सवांत सहभागी व्हायला हवे. तीच धर्ममार्गावरची तात्पुरती पायरी आहे. कोणत्याही काळातील अुत्सव हे त्या काळातील समाजाची गरज म्हणून वाढत जात असतात, ती गरज थांबत नाही. मुख्यत: ते अुत्सव भौतिक बदलांवर अवलंबून असतात, कारण ते धर्माचे साधन आहेत. मूर्तीची अुपासना म्हणजे ढोल बडविणे ही समजूत काढण्याचा प्रयत्न जाणत्या लाोकांनी करीत राहायला हवा, पण त्यावरची श्रध्दा मात्र अुखडून देता कामा नये. काही काळानंतर ढोलांच्या जागी दुसरे काही वाद्य येआील. मंत्रपुष्प तोंडाने म्हणण्यापेक्षा त्याची ध्वनीफीत लावतात, तसे बदल होतील; पण मूळ संस्कृतीचा गाभा जपत राहिले पाहिजे. ते काम स्वत:ला जाणत्या समजणाऱ्या लोकांचे आहे. ते करत राहावे लागेल. दिवाळी हा तर उत्सवांचा उत्सव, प्रत्येकाला प्रेरकच ठरावा. ज्ञानवंतांसाठी प्रदीप प्रज्वलित करण्यासाठी, कर्मवंतांसाठी शक्तीसामर्थ्य निर्माण करण्यासाठी; आणि सामान्यांसाठी खाणे व फटाके फोडण्यासाठी! अमंगल तर असणारच; त्यातून पावित्र्याकडे जाण्याचा मार्ग उजळता यायला हवा.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन