Skip to main content

14 Nov. 2016

मराठ्यांचा राज्यविस्तार
मोगलांच्या कराल दाढेतून सुटका होणे हे छ. थोरले शाहू महाराज यांच्या दृष्टीने क्रांतीचे द्योतक होते. त्यांनी उत्साही, कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून, स्वराज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया घडली. शाहू महाराज परिपूर्ण किंवा निर्दोष होते असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी मराठा राज्यातील कर्तबगार सरदारांच्या व पेशव्यांच्या मदतीने भारत वर्षात अटकपासून कटकपावेतो दरारा निर्माण केला. अटक सध्या पाकिस्तानात आहे. कटक ओरीसामध्ये आहे. मराठा इतिहास अबोल आहे. आपलाच पराक्रम आपण अभिमानाने सांगत नाही हे दुर्दैव वाटते.
भारतवर्षात भरून राहिलेला हा मराठी पराक्रम काळाच्या ओघांत विस्मृतीत गेला. तो इंग्रजांनी दाबून टाकला. पानिपतच्या संग्रामाला २५५ वर्षे पूर्ण झाली, पण त्या निमित्ताने मराठी पराक्रम भारतातच नव्हे तर इतरही खंडात पोहोचला.
मराठी अंमल हिंदुस्थानात कोठे कोठे होता? गुजराथ, म.प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओरिसा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, येथील अनेक दुर्गांवर कधी ना कधी मराठ्यांचा कब्जा होता. गढा-मंडल्यांचे, म्हणजे गोंडांचे राज्य, पेशव्यांनी म्हणजेच मराठी फौजेने जिंकून घेतले होते. १७२८-२९ मध्ये बाजीराव पेशव्याने या भागावर कब्जा केला होता. तेथेच त्याला छत्रसाल बुंदेलाचे पत्र मिळाले. वरील प्रदेश गोंडांचा होता. तेथील चौथाईच्या वसुलीचे हक्क रघुजी भोसल्यांकडे सुपुर्द करण्यात आले होते. १७४१ च्या सुमारास नानासाहेब पेशवा सागरहून आपल्या विजय आणि अभियानासाठी निघाला असता, दुर्गासिंहकडून त्याने देवीचा प्रदेश जिंकला व त्यावर आबाजी कवडे यास देखभालीसाठी ठेवले. १८ नोव्हेंबर १७४२ ला मराठा फौजेने मंडाल्याचा दुर्ग जिंकला. ओछी येथे छावणी करून दमोर, सागर, ललीतपूर खिचीवाडा येथे आपला अंमल सुरू केला. गोंडांच्या प्रदेशात पेशव्यांचा कब्जा झाला पण रघुजीच्या फौजा पार ओरिसा बंगालपर्यंत गेल्या.
छ. भोसले शाहू महाराजांनंतरही, त्यांच्या विशाल महाराष्ट्नच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठे शांत बसले नाहीत. १७५३ मध्ये मराठे वसुलीसाठी उत्तरेस निघाले व सुरजमल जाटाच्या कुंभेरीला त्यांनी वेढा घातला. कुंभेरी जाटांनी लढविलाही. त्यात मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव कामास आला. मराठी लोकांनी महाराष्ट्नबाहेर जाऊन उत्तम शहरे वसवल्याची जी काही उदाहरणे आहेत. त्यात सागर हे आघाडीवर आहे. माळवा, गुजराथ-महाकोशल येथे मराठी व्यक्तींनी आपल्या कुशल नीतीची उदाहरणे देऊन उत्तम राज्य केले. प्रजेसाठी कल्याणकारी कामे केली. इ.स. १७३५ मध्ये बाजीराव पेशवा यांच्या प्रोत्साहनाने अनेक राज्यकर्ती घराणी उदयाला आली. त्यात गोविंदपंत बुंदेेले, यांचे नाव पुढे आहे. होळकर, पवार, शिंदे या बरोबर कोकणातील नेवरे गावचे खेर घराणे उदयास आले.
मराठ्यांची सांघिक भावना हीच खऱ्या अर्थाने मराठा राज्याच्या विस्ताराला कारणीभूत झाली होती. त्या दरम्यान अब्दालीचा पुत्र तैमूरशहा हा सिंधू नदी ओलांडून अटक पेशावर करीत खैबर खिंडीपर्यंत आला व पुढे तो काबुलला येऊन पोहोचला. त्यावेळी रघुनाथराव पेशवे इतिहासाचे थोडे बहुत माहितगार असावेत. काबूल कंदहारचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार असावा. अटक नदी सिंधूला मिळते. त्या दोन नद्यांच्या दुआबात अटक गाव वसले आहे, तेथे अटकेचा किल्ला आहे. त्या दरम्यान मराठ्यांनी अटकेवर जाण्याचे मोठे प्रयत्न चालविले होते. शेवटी त्या प्रयत्नांना यश आले व १७५८ च्या ऑगस्टच्या महिन्यात मराठी फौजांनी सिंधू नदी ओलांडून अटक गाठले आणि मराठी सेनेचा भगवा झेंडा अटकेच्या किल्ल्यावर फडकू लागला. शिवप्रभूंचे स्वप्न साकार झाले. त्यातून सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मराठी हुकमत पसरली. अटकेपार झेंडे लावण्याच्या बातम्या महाराष्ट्नत पोहोचल्या. मराठी दौलत शहारून गेली. कुठे महाराष्ट्न् आणि कुठे अटक? त्यावेळी अहमदशहाचा पुतण्या पुण्याला आला होता. त्याला हाताशी धरून काबूल कंधारचे राज्य करावे असा मराठी फौजेचा मनसुबा होता.
राजकारणात भावनेपेक्षा निर्दय भांडणालाच रक्ताचा भडक रंग चढवावा लागतो. पेशावर सध्या पाकिस्तानात आहे. पाकिस्तानातील मराठ्यांचे अस्तित्व हे पाकिस्तानाने पार पुसून टाकले. अफगाणिस्तानातून पुढे मुसलमानांची अनेक आक्रमणे झाली. नंतर अहमदशहा अब्दालीच्या ताब्यात हा प्रदेश आला. मराठी फौजांनी सन १७५८ मध्ये आपला अमल येथे बसवला. त्यानंतर मराठ्यांच्या ताब्यात पार खैबर खिंडीपर्यंतचा प्रदेश होता. ही गोष्ट सामान्य नाही. पेशावरला ब्राम्हणी समाजाचे वाल्मीकी मंदिर आहे; शिवाय एक विष्णू मंदिरही आहे.
अजमीर-जोधपूर मार्गावर अजमीरपासून पश्चिमेला तीस मैलावर मेडता आहे. लुनी नदी तेथूनच वाहते. तिच्या पलीकडे उंचवट्यावर मेडता किल्ला आहे. सभोवार मोकळे मैदान आहे. जोधपूरचा बिजेसिंग हा मराठी फौजेच्या विजयामुळे मराठ्यांविरुद्ध पेटून उठला होता. त्याने शेजारच्या गावातून १४ ते ६० वर्षांचे पुरुष आणून मराठ्यांविरुद्ध संग्रामासाठी तयार ठेवले होते.
८ ऑगस्ट १७९० रोजी मराठी फौजेने लुनी नदी ओलांडली व त्यांच्या फौजा मेडत्यावर चालून आल्या. मराठ्यांनी राजपुतांना हैराण करायला सुरुवात केली. मराठ्यांचा जोश पाहून राठोड केशरीयासाठी तयार झाले. मराठ्यांनी रजपुतांवर तोफांचा भडिमार केला. त्यात रजपूत सेनापती गंगाराम भंडारी जिवंतपणे मराठी फौजेच्या हाती लागला. मैदानात प्रेतांचा नुसता खच पडला. शत्रूकडील कित्येक जखमी लोकांवर मराठ्यांनी औषधोपचार केले. आपाजीरामाने पुण्याला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे.
मराठे गुजराथमध्ये शिरले. पावागड १७६६ मध्ये मराठ्यांनी जिंकून घेतला होता. १७२९ मध्ये पेशवा चिमाजी आप्पा हा माळव्यातून उदाजी पवाराबरोबर गुजराथेत आला आणि त्याने केवळ आठवड्याच्या आत पावागड आपल्या ताब्यात आणला. त्यानंतर मराठ्यांनी शिकस्त केली. १७६६ मध्ये मराठी फौजा कर्नाटकांत शिरल्या व त्यांनी आपल्या पराक्रमाने चेतराय दुर्ग, मडकाशिरे, दोड्डाबाळापूर चिकबाळापूर देवनहळळी ही सारी स्थाने आपल्या ताब्यात घेतली.  `हरहर महादेव'च्या गर्जना कर्नाटकांत घुमू लागल्या.
छ.शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:स पणास लावण्यापासून मराठ्यांनी साऱ्या हिंदुस्थानात केलेली घोडदौड ही त्यांच्या स्वाभिमान व स्वराज्याच्या वृद्धीसाठी केलेली फार मोठी निष्ठा होती. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्म व स्वराज्याचा लावलेला इवलासा वेलू गगनाला नेऊन पोहोचविला. मराठ्यांनी सतराव्या शतकात सर्वत्र पराक्रमाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. याचे बरेचसे वर्णन युद्धभूमीवरून पुण्यापर्यंत पत्रांतून पाठविली गेलीत. परंतु ती अजूनही दप्तरांत पडून आहेत. गडकोटापेक्षा छातीच्या कोटाचे महत्व जास्त नव्हे काय? शिवरायानंतरही मराठ्यांनी प्रचंड शत्रूंशी झुंज देत साऱ्या देशात आपल्या पराक्रमाचा ठसा उमटविला. मराठी सैन्याची पराक्रमी गाथा ही त्याकाळच्या संघभावनेची द्योतक ठरते.
-राम सैंदाणे (`भारत इतिहास संशोधन मंडळ पत्रिके'तून)

दिवाळी संपली; दिवाळयाची काळजी: 
चालू वर्षी  पावसाने खैर केली. तो चांगला पडला, सर्वत्र पडला, वेळेत पडला... आणि वेळेत गेलासुध्दा! पुष्कळ ठिकाणी दिवाळीतही पावसाची रिपरिप चालू राहण्याचा अनुभव पुष्कळदा येत राहिला होता, गेल्या दिवाळीत अपवादासाठी थोडा अुकाडा आणि पिचत कुठे आवश्यकच असणारा शिडकाव्याचा पाअूस होता. अेरवी साऱ्या ठिकाणची दिवाळी, हवामानाच्या दृष्टीने चांगली गेली. नोव्हेंबरच्या प्रारंभापासून थंडी झाक मारू लागली आहे, सुगीचा काळ बरा आहे, आणि धरणे विहिरी बऱ्यापैकी पाणी साठवून आहेत. काळजी  करण्यासारखी स्थिती तूर्त नाही; आणि हीच वेळ आहे पुढच्या काळाबद्दल काळजी घेण्याची. आपण पाण्याची भीषणता आपल्याच कर्माने वाढविली आहे, त्याचे चटके गेल्या अुन्हाळयात जाणवले, ते आजच विसरून जाण्यासारखे नाहीत. रेेल्वेने पाणी वाहतूक करण्याचा व्याप करावा लागला, आणि त्याला राजकीय विरोधही यथासांग करून झाला. निसर्गानेच तो सारा खेळ पाहून दया दाखवली असावी, त्याने चालू वर्षी तरी आपली सुटका केली आहे. आपले अपराध माफ करून आपल्यास येत्या काळात संधी दिली आहे. म्हणूनच या संधीचा अुपयोग करायचा निर्णय आपल्याला सर्वांशाने करायला हवा. ते आपण करू शकू की नाही याचा भरवसा नसल्यामुळे दिवाळयाची काळजी वाटते आहे.

पाणी हवा या गोष्टी आपल्यास निसर्गाने फुकट दिल्या आहेत, भरपूर दिल्या आहेत; म्हणूनच त्या कशाही वापरल्या तरी फुकटच मिळाल्या पाहिजेत अशी अेक धारणा होअून बसली आहे. झऱ्याचे झुळझुळते पाणी आेंजळीने प्यायचेच असेल तर ती धारणा आजही बरोबर मानायला कुणाची हरकत नाही. पण नदी-ओढ्याचे पाणी पंपाने खेचून गावातल्या सार्वजनिक नळावरून भरायला तरी तयारी, आता कुणाची आहे काय? घराच्या अंगणातच नव्हे, घराच्या मोरीतच नव्हे, तर आता अगदी शौचमुखावर पाण्याची पिचकारी मारण्याची सोय करावी लागते, तर त्यास आधुनिकता म्हणतात. त्याच रीतीने आपल्या अैटबाज गाड्या चकाचक ठेवायला लागतात, अन्यथा आपली पोझीशन डॅम होते. खेड्यांतून म्हशी धुण्याला पाण्याचे कालवे किंवा सिंचनाचे नळ सर्रास वापरतात. ही तशी सारी  आधुनिकता आहे. हे करायला हरकत कुणाची असणार? पण त्यासाठी शुध्द पाणी पुरवायचे तर  खूप खर्च येतो, तो कोण देणार ? ज्यांना पिण्याचे शुध्द पाणी विकत घेण्याचे मॉडर्न लाड पुरवायचे असतात त्यांच्यासाठी २०रुपये लिटरचा भाव आहे, तो त्यांना यथेच्छ खाअू द्यावा. पण आितरांनी असे पाणी वापरण्यासाठी काही खर्च करावा, काही त्रास घ्यावा, काही तोशिष लागू द्यावी यात काही गैर नाही, ते बंधनकारक केलेच पाहिजे. पाणी शेतीला असो, प्यायला असो, कारखान्याला असो, बागेला असो,... ते पुरेपूर किंमत देअून विकत घेतले पाहिजे. ज्यांना वाहत्या नदीतून खांद्यावरून घागरी भरून न्यायचे असेल त्यांनी अेकवेळ निसर्गाची देणगी म्हणून ती फुकट अपेक्षा केली तर समजू शकते. परंतु अुसाला दर वाढवून मिळावा, आणि पाणी फुकट मिळावे या दोन्ही मागण्या अेकाच वेळी  करणे अजब वाटते. शिक्षकांचे पगार वाढवा, आणि शिक्षण मोफत करा हे कसे जमणार ? शिकणे हा हक्क मूलभूत मानायचा तर शिकवण्याचे कर्तव्यही मूलभूतच ठरते.

हवेची गोष्ट तशीच आहे. आपण वाटेल तशा  गाड्या अुडवणार, फटाके अुडवणार, कचरा फेकणार, आणि आपल्याला हवा निसर्गाने दिली म्हणून ती फुकट मिळावी, हे कसे होणार? थंड हवेच्या किंवा पर्यटनाच्या जागी  गाड्या आणि भेळेचे गाडे हवेत, वातानुकूल निवास  हवेत तर मग शुध्द मोकळया हवेसाठी  खूप पैसे द्यावेच लागणार आहेत. हिमालयाच्या यात्रेला पायी चालण्याआितकेच सामान नेले तर तिथली हवा निसर्गाकडे फुकट मागता येआील. पण तिथे जर आधुनिक सुखसोयींचा आग्रह असेल तर चांगल्या हवेसाठी  आपापल्या गावातही पैसे मोजणे भागच पडणार आहे. या बाबतीत सरकारही काही करू शकत नाही. आपल्याला आधुनिकता हवी आहे तर प्रत्येक प्रक्रियेसाठी भरपूर पैसे दिले पाहिजेत. आिथे ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांच्यासाठी चांगल्या हवा पाण्याची वेगळी काही सोय करणे, अेवढे फार तर सरकारने करावे, पण कुणाकडे पैसे नाहीत याची पडताळणी फार अवघड नाही, ती करावी. नळाने शुध्द पाणी घरात हवे असेल, तर ते किमान दहा रुपये लिटर लोक घेतच आहेत. सरकारी दर फुकट समान कशाला ?

फुकट मिळाले तर त्याची किंमत राहात नाही असे आपण अेरवीही म्हणतो. निसर्गाने चांगली हवा व पाणी फुकट दिले, त्याचीही आपल्याला किंमत राहिली नाही. त्यामुळेच भीषण प्रश्न निर्माण झाले आहेत. चांगल्याची किंमत जास्त असते हा बाजाराचा नियम आहे, तो हवा-पाण्यालाही लागू करावाच लागेल. अनुदान आणि माफी यांसारख्या सवलती द्यायच्या त्या कधी? त्यांतून काही नवे चांगले हितकर निर्माण होणार असेल तर !  ज्यांतून नाश, अहित आणि नुकसानच होणार आहे, त्यासाठी काही सोयी सवलती देणे हास्यास्पद आहे.

म्हणूनच काही व्यवहार्य अुपाय करायला हवेत. तर  पुढच्या संकटासाठी काही काळजी घेतल्याजोगे ठरेल, ते आवश्यकच आहे. गेल्या सालच्या दुष्काळाच्या निवारणासाठी म्हणून रा प म बसच्या प्रत्येक तिकिटावर अेक रुपया अधिभार आकारला जाअू लागला, तो रद्द न करता २रुपये करायला काही हरकत नाही. ती तरतूद लोकांना पटण्यासारखी आहे. साधारणत: प्रत्येक प्रवासी वाहन आठवड्यातून अेकदा धुतले जाते. त्यासाठी लागणारे पाणी  २चाकीसाठी २०लिटर आणि ४चाकींसाठी १०० लिटर कल्पून किमान १रुपाया दराने पैसे वसूल करावेत. आठवड्याला १००रु.म्हणजे वर्षाला ५हजार, व दोन चाकीला १हजार रु. आर टी ओ कडे भरून घ्यावेत. विद्यार्थिनींना  बस प्रवास मोफत आहे. त्याबदली त्यांच्यावर किमान दोन झाडांचे संगोपन सोपवावे. त्यांनी आपल्या कोणत्याही पाण्यात बचत करून तेवढे सहज शक्य केले पाहिजे. प्रत्येक घराला पाच झाडांचे अुद्दिष्ट द्यावे. ज्यांना जागा नसेल त्यांनी रस्त्याकडेला किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी झाडे वाढविली पाहिजेत. आपल्या मुलांच्या शाळेत, किंवा माळावरती झाडांना पाणी  नेअून घातले तरच पाणी सवलतीत मिळण्याचा हक्क प्रस्थापित होआील. कल्याणकारी राज्य म्हणजे आपल्याला फुकट पोसणारे सरकार असा अर्थ काढून आपण सरकारला नव्हे, तर निसर्गाला व पर्यायाने आपल्यालाच संकटात घालतो आहोत. आज पाण्याची काहीशी अुपलब्धता आहे, तोवरच या अुपायांवर  गंभीर विचार करायला हवा.

हवेच्या शुध्दतेवर तसेच काहीतरी शोधले पाहिजे. कचरा साफ करण्यासाठी सरकारने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा वापर करून घ्यावा. जे ज्येष्ठ नागरिक रस्ते, वा बसस्थानके  स्वच्छ करण्यासाठी  काम करतील, त्यांनाच प्रवासभाड्यात सवलत द्यावी. जे विकलांग किंवा अक्षम आहेत त्यांना काहीतरी सवलती देणे शोभते. अनावश्यक सवलतींमुळे नासाडी होते. वीस पंचवीसच्या संख्येने ज्येष्ठांना तशी कामे करणेही कठीण नाही, मग ते सवलत मिळण्याचे हक्कदार ठरतात. आपल्या नातवंडांना शुुध्द हवा मिळावी यासाठी त्यांनी स्वच्छतेचे काम केले पाहिजे. तसेच आितरांनीही  ते काम स्वीकारले तर हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न कमी होआील. दिवाळीत ज्या घरातील मुले फटाके अुडवणार नाहीत, त्या घरातील आजोबांना श्रवणयंत्रांवर अनुदान देण्यास हरकत नाही.

सारांश असा की, आपल्या अुपलब्ध सामग्रीचा व नैसर्गिक स्रोतांचा वापर आपल्याला यापुढे फुकट करता येणार नाही. कारण ते स्रोत आपण नैसर्गिक स्थितीत न वापरता त्यावर मोठा खर्च करीत आहोत. चांगल्यासाठी अनुदान व सवलती देण्यास पैसे लागतातच, पण आपण ते वाआीट निर्माण करण्यासाठी खर्च करतो आहोत. आज सुदैवाने मिळालेले पाणी पुरवून वापरले जावे यासाठी काही कडक अुपाय सरकारने व आपण प्रजेनेही केले पाहिजेत. अन्यथा दुष्काळ आणि मस्ती यांचे दुष्टचक्र फिरतच राहील. काळजी करण्याजोगी स्थिती नाही तोवरच काळजी घेण्याची सुरुवात केली पाहिजे.

आम्हाला नकोच आहे, पण...
       मी अेक लहान व्यवसायिक. म.गांधींच्या ११ व्रतांचा माझ्यावर पगडा होता. अपरिग्रह म्हणजे आवश्यक तितकीच प्राप्ती असावी, मी ते तत्व पाळले. वयाच्या ६०व्या वर्षी स्वेच्छेने माझा व्यवसाय बंद केला. मी  काटकसर करून २०लाखाची बचत केली होती, त्यावर मिळणारे व्याज मला म्हातारपणासाठी पुरेसे वाटले. घर स्वत:चे होतेच. गेल्या दहा पंधरा वर्षांत मला दरमहा १५-१६ हजार मिळत होते, आता व्याजदर कमी झाले त्यामुळे दरमहा  ३हजार कमी मिळतात; अुलट महागाआीमुळे गरज मात्र वाढली आहे.
मी मध्यमवर्गी व्यवसायिक म्हणून निवृत्त झालेलो आहे, पण शेतकऱ्यांची स्थिती आणखीच बिकट असणार. अुत्पादनाची खात्री नाही, दराची हमी नाही. ग्रामीण भागात लग्न जमवताना दहा वीस अेकराच्या शेतकऱ्यापेक्षा शासकीय चपराश्याला प्राधान्य देतात, ते का? याचे अुत्तर या स्थितीने दिले. सरकारी व निमसरकारी वर्गाचे पगार वाढत आहेत. तिथे निवृत्त झालेल्यांचेही वेतन नियमांनुसार वाढत आहे. साधारण १५-२० वर्षांपूर्वी जे नोकर निवृत्त झाले, त्यांना आज त्यांच्या शेवटच्या पगाराहून जास्त निवृत्तीवेतन मिळत आहे. अंगात ताप असतांनाही जो काम करतो तो व्यवसायिक असतो, आणि कामाच्या वेळी जो ताप आल्याचा दाखला देअू शकतो तो सरकारी नोकर असतो, असे म्हटले जाते. आज तर अशी स्थिती अैकतो की, सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा निवृत्तांची संख्या अधिक आहे. त्यांच्या मागण्या पाहून सरकार आता निवृत्तीवेतन योजना बंद करू पाहात आहे.
आमच्यासारख्या स्वयंकष्टकऱ्यांना निवृत्तीवेतन नाही, अुलट आमच्या कष्टाने केलेल्या तरतुदीत घट येत आहे. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत नको आहे. मिळेल त्या अुत्पन्नांत आम्ही आमचा चरितार्थ चालवू. परिस्थितीत झालेला बदल सहन करू. पण शासनाला विनंती अेवढीच की, या पगारदार वर्गाचे व निवृत्तीवेतन धारकांचे लाड करू नयेत. यापुढे वेतनवाढ मिळणार नाही, देणार नाही असे ठोसपणे सांगावे. समाजात समानता असावी याची काळजी हवी, तसेच त्यात काही नैतिकताही असली पाहिजे. ज्यांना हे फायदे आज मिळतात, त्यांच्याबद्दल हा मत्सर नव्हे, पण त्यात काही न्याय्य व्यवहारही नाही हे स्पष्ट सांगितले पाहिजे.
-सर्वोत्तम पु. केळकर,
२०-हिमालय विश्व,वर्धा,


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन