Skip to main content

12 sept. 2016

वास्तव सांगण्याचा सामाजिक धोका
अुद्दाम आणि अुर्मट वृत्तीच्या कोणा गुन्हेगाराला कसलेही भय नाही अशी परिस्थिती आपल्याकडे आली आहे. सरळ सज्जनपणे शांतपणे राहू म्हणणाऱ्याला प्रत्येक बाबतीत अन्याय सहन करावा लागतो आहे. अुद्दाम लोकांंची अरेरावी सहन करावी लागत आहे. राक्षस राज्यांत राहण्याचा अनुभव येत आहे. ही स्थिती, म्हटली तर ज्याच्या त्याच्या कर्मानेच येते हे खरेच आहे. गेल्या चार पाच दशकांतील पिढ्यांची सामुदायिक अुदासीनता आता अशा टोकाला गेली आहे की, यापुढे सर्वोच्च मानली जाणारी न्यायालयेही हतबलच ठरतील अशी शक्यता वाटू लागली आहे.

आपल्या देशातील पदपथ आणि रस्ते यांवर होणाऱ्या अतिक्रमणांच्या आणि अन्य समस्यांच्या विरोधात कोणी दखल घेत नाही, आणि कोणा प्रशासकाचे काही चालत नाही हे पाहून अेका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.  न्यायालयाने  याचिकाकर्त्याच्या विनंतीचा प्रतिवाद केल्यावर त्या संस्थेने कळवळून असे म्हटले की, `हे न्यायालय या प्रश्नाबाबत काही कारवाआी करणार नाही, किंवा कुठलेही निर्देश देणार नाही,  तर मग ते कोण देआील?' याचिका आधी अुच्च न्यायालयात द्यावी असा  तांत्रिक मुद्दा सुचविल्यावर याचिकाकर्ती संस्था म्हणते की, `आम्ही किती अुच्च न्यायालयांमध्ये जायचे? हे न्यायालय सर्वोच्च आहे,  म्हणून आम्ही आिथे आलो आहोत. आिथे हे प्रकरण अैकायला हवे. देशात कायद्याचे राज्य आहेच कुठे? आम्ही फार आशेने येथे आलो आहोत. यापेक्षा वेगळया कोणाकडे आम्ही न्याय मागावा?' हा प्रश्न सच्च्या नागरिकाला हृदयद्रावक वाटेल, पण त्यास न्यायालयाने दिलेले अुत्तर अधिक हतबल करणारे आहे. न्यायालय म्हणते की, ``आमच्या निर्देशावरून प्रत्येक गोष्ट होआील असे तुम्हास वाटते काय? देशात भ्रष्टाचार होअू नये असा आदेश आम्ही दिला की देशातील संपूर्ण भ्रष्टाचार नाहीसा होआील असे तुम्हाला वाटते काय? देशात  रामराज्य स्थापन व्हावेे असा आदेश आम्ही द्यावा काय? असे तर घडू शकत नाही. आम्हाला अनेक गोष्टी व्हाव्यात असे वाटत असले तरी त्या आम्ही करू शकत नाही. आमची क्षमता मर्यादित आहे. ''

रस्ते आणि पदपथ येथील कमालीची बेशिस्त याबाबत प्रशासन काहीच करत नाही, त्याशिवाय देशातल्या अनेक गैरगोष्टी नाहीशा होअून समाजात सलोखा व शांती नांदावी, यासाठी न्यायालयाने आपली असमर्थता किंवा मर्यादा सांगून टाकल्या तरी त्यापुढे जाअून याचकालाच  मार्ग सांगितला की, `तुम्हीच याबाबत लोकांना शिक्षित करू शकता...!' ही सारी कथा समजून घेतल्यावर फार गंभीर प्रश्न मनात अुमटू लागतात.

रोजच्या  व्यवहारात सामान्य सुजाण माणसाला न्यायसंस्थेच्या शक्तीचा कौल आपल्या बाजूचा असल्याचा अेेक फार मोठा आधार असतो. त्या आधाराने साधी सरळ माणसे अन्यायाशी झगडण्याचे बळ मनात गोळा करत असतात. ती थकतात, निराश होतात, संपतातसुध्दा; पण कधीतरी न्यायालयाचा निर्णय चांगल्याच्या, योग्य त्याच्याच  - म्हणजे आपल्या बाजूचा होणार अशी त्यांची श्रध्दा असते. न्याय मिळण्याची माणसाला खात्री असते, म्हणून तो बहुतांशी अन्यायच सोसत राहिलेला असतो. पण त्याच्या आधाराची न्यायालयीन काठी निघून गेल्यावर तो पार कोसळून पडणार हे अुघड आहे. न्यायालयाच्या त्या प्रतिपादनाने यापुढे अराजक वाढून ठेवले आहेे की काय अशी भीती आहे; आणि त्यास नुकतेच घडलेले दहीहंडी प्रकरण साक्षीला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून दहीहंडीचे तुफान घोंघावत राहिले, आणि त्याबद्दल कुणावर काही कारवाआी होअू शकत नाही हे अनुभवल्यावर त्या भीतीचा थरकाप वाढत जाणेही स्वाभाविक आहेे. आजकालची न्यायव्यवस्था समाधानकारक आहे असे नाही, व त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत हे मान्य करूनही त्यावरती भरोसा ठेवून आपले व्यवहार चालू ठेवणे भाग असते; कारण आिथे कधीतरी न्याय मिळणार हे  - सामान्य लोकांनी नाही तरी, -किमान न्यायसंस्थेने तरी मानलेले आहे. आता तसे त्या संस्थेलाही वाटत नाही की काय असा संशय येतो. सामाजिक संस्थांनी लोकांचे प्रबोधन - शिक्षण करण्याचे महत्व आहेच, ते करत राहण्याला पर्याय नाही. परंतु न्यायालयाने सुराज्य निर्माण करण्याचे सारे अुत्तरदायित्व आपल्यावरून काढून ते दुसऱ्याकडे द्यावे हे गंभीर नाही काय?

ज्यांना कोणत्याही क्षेत्रात बळजोरी करायचीच असेल त्यांना या प्रतिपादनामुळे मोठाच चेव येणार आहे. `तुला कुठल्या कोर्टात जायचे ते जा' - ही बेमुर्वतखोरांची धमकी असे, तरीही ती धमकी मानली जात नव्हती, तर त्याही ठिकाणी `न्याय माझ्याच बाजूचा होणार, असा धाक असल्याचा समज होता.... आता त्या म्हणण्याला वेगळा अर्थ चिकटेल. तो असा की, कोणी बेकायदा मनमानी वागले तरी न्यायालय  करून काय करेल; त्याच्या मर्यादा त्यांनीच अुघड्या केल्या आहेत.यापुढे कोण काय करणार आहे ! आपल्या दैनंदिन जीवनात याच रीतीचा पाझर सुरू झाला तर काय घडू शकेल ?

खेळात अेक पंच नेमलेला असतो. अेक खेळाडू बाद आहे की नाही याचा निर्णय वादग्रस्त होतो, त्यावेळी कोणी धटिंगणाने स्वत: बाद नाही असे घोषित केले तर? दाद कुठे मागायची? पंचाची मर्यादा तर कळली, तो करून काय करणार? शाळा-कॉलेेजात गुंंडगिरीने ती मर्यादा जोखली तर कुणाचा धाक राहील? साध्या साध्या गोष्टीत रस्त्यावर स्वत: चुकीचे वागून, कोणीही पोलीसाला बदडतो असे दिसू लागलेच आहेे. त्या गुन्ह्याला कोण न्यायालयात नेआील? त्याचा अुपयोग तरी काय? कारण त्यांनीच तर आपल्या मर्यादा सांगून टाकल्या आहेत. त्यांच्याकडे जाण्यापेक्षा लोकांचे शिक्षण करण्याचा सल्ला आता लोकांनी मानला पाहिजे.

शिवाजीराजांच्या न्यायकथा अैकिवात आहेत, पण तितके मागे जाण्यापेक्षा आिंग्रजाचे राज्य दीडशे वर्र्षे झाले त्याच्या कथा फार जुन्या नाहीत. बेचाळीसचे आंदोलन आठवणारे आजही काही जण आपल्यात आहेत. त्या काळातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गाड्या पाडल्या, खजिने लुटले हे तर फारच मोठे कृत्य होते; परंतु मोर्चा काढला, वंदे मातरम् म्हटले अेवढ्यानेही गोळीबार झाले आहेत. आिंग्रजाच्या बाजूने विचार केला तर ते कठोर प्रशासन होते; त्यास आजही  `कायद्याचे राज्य'  असे ठोसपणे म्हटले जाते. आजच्या लोकशाहीला लोकभावनांचा आदर करावा लागतो हे जेवढे खरे, तितकेच हेही खरे की कोणा अेकालाही झुंडीच्या वागण्याचा अन्याय्य अुपद्रव होता कामा नये. कायदा त्यासाठी असतो, तो पाळला गेलाच पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. न्यायपालिका त्याचसाठी निर्माण केलेली आहे.  लोकशिक्षण करण्याचे काम संस्थांचे व कृतिशील सज्जनांचे आहेच, पण त्यांच्यामागे न्यायासनाची दंडशक्ती भक्कम अुभी असली पाहिजे. त्यंानीच जर  `काय करणार हो%, आम्हाला मर्यादा आहेत, आम्ही रामराज्य कोठून आणणार...?' असे म्हणून हात झटकले तर या अुच्चारणाचा योग्य तो अर्थ समाजातल्या अघोरी शक्ती घेतल्यावाचून कशा राहतील?

या समाजात अधिकांश माणसे चांगली आहेत, म्हणून समाज टिकून आहे, चालला आहे. जे थोडे प्रमाण वाआीटांचे असते, ते वाढत जाण्याचे अेक कारण न्यायालयीन हतबलता हेही आहे. ते सत्य असले तरी त्याच व्यासपीठावरून  अुघड अुच्चारायला नको होते. देव नाही हे खरेे असले तरी, आणि सोन्याच्या देवाचीही चोरी होत असली तरी त्याचे अस्तित्व मानावे लागते. अशक्त बुध्दीच्या दुर्जनांसाठी तो अेक धाक असतो. तो धाक अुध्वस्त करण्याने सत्य सांगण्याच्या पुण्यापेक्षा वास्तवाच्या कडू पापाने  सारे वातावरण बिघडेल.  न्यायदानासाठी होता होआील ते प्रयत्न करीत राहून या समाजात न्याय असल्याची श्रध्दा जागविली पाहिजे. तिथे हतबलता कामाची नाही. ती हतबलता सर्वोच्च स्थानावरून प्रगट झाली म्हणून ती तळातल्या सामान्य मनाला जास्त धोक्याची वाटते.

यांतून इतिहास बनतो.
     नव्वदी ओलांडून गेलेल्या एका तरुण आजींनी त्यांच्या काही आठवणी लिहिल्या. या वयात त्यांच्या स्मरणशक्तीचे, चित्ताकर्षक अनुभव-प्रसंगाचे व लेखन शैलीचे सानंद आश्चर्य करायला हवे. पण त्यांनी असे म्हटले की, ``हे लेखन स्वान्तसुखाय केले आहे. ते लेखन वैयक्तिक स्वरूपाचे, व्यक्तिकेन्द्रित असून त्यात भावभावनांचा ओलावा अनुभव असल्याने बहुधा सुरस वाटतात.'' पण त्यांनी म्हटले की, ते प्रसिद्ध करू नये.
     त्यांना दिलेल्या पत्रोत्तरात `आपले जग' चे मत नमूद केले की, ``आपल्या माहेरच्या व सासरच्या व्यक्तींचे चित्रण आपण सराआीत हाताने केले असून ते हृृद्य अुतरले आहे. अशा प्रकारचे लेखन प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने केलेेच पाहिजे असे नेहमीच वाटते. ते केवळ  लेखापुरते स्मरणरंजन नसते, तर ते त्या त्या काळाचे चित्रण असते. सामाजिक दस्तावेज  -डॉक्युमेंट - असे त्याचे स्वरूप असते, त्याचा अुपयोेग पुढच्या अनंत काळासाठी होणार असतो, त्याचा  `आितिहास' बनतो. बहुतेकांना असे वाटते की, या माझ्या लिहिण्याचा उपयोग काय? कोण वाचणार ते? माझ्या व्यक्तिगत जीवनाशी आितर वाचकांना काय घेणे असणार? .... पण या प्रकारच्या नोंदींचे महत्व सामाजिक विकासाचे टप्पे समजण्यासाठी होत असतो. आपल्या माघारी कदाचित दोन पाचशे वर्षांनी त्याचा कोणी उपयोग करू शकतो. हे मोल कसे ठरवायचे?
      ``सुदैवाने आपल्यास लिहिण्याचा `हात' आहे, स्मृती अुत्तम आहे, आणि मुख्य म्हणजे तसे सामाजिक भान आहे. आपल्या प्रकृतीमानास झेपेल - जमेल   तसतसे  लेखन आपण अवश्य करावे असे वाटते. आपल्या निवृत्तीची मन:स्थिती समजू शकतो, परंतु  या कार्याचे महत्व आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. त्यास `आत्मचरित्र'  वगैरे थोर नाव देण्याचे कारण नाही. पण स्वत :च्या  सर्व क्षमता लक्षात घेअून हे काम कोणीही करू शकतो, हे सुचवायचे आहे.''
     आपल्या कुलवृत्तांतां करिता योग्य ती माहिती देण्यातील अनास्था सर्वांना ठाऊक असेल. इतिहास जाणायचा असेल तर त्यास नेमके आधार मिळावे लागतात; अन्यथा दंतकथा, आख्यायिका, भाकडकथा उरतात. आज आपण आपले नेमके स्मरण किंवा वर्तमान लिहून ते सर्वांसाठी खुले ठेवले तर भावी पिढ्यांना त्याचा उपयोग `इतिहास' म्हणून होईल. इतिहासाबाबतीत पु. ल. देशपांडे म्हणतात, ``आपल्या पूर्वजांचा आणि इतिहासाचा आपण फार अभिमान बाळगतो असा आपला स्वत:विषयी फार मोठा गैरसमज आहे. पण पूर्वजांच्या जीवन-वृत्तांन्ताविषयी आणि कर्तृत्वाविषयी आपल्याइतकी बेफिकीरी इतरत्र पिचतच आढळेल. आम्हाला आमच्या तानसेन आणि बैजूबावऱ्याविषयी फार मोठा अभिमान आहे. पण त्यांच्यासंबंधीच्या दंतकथाखेरीज आमच्या हाती त्यांच्या चरित्राची कसलीही साधने नाहीत. दुर्दैवाने इतिहासाची चांगली साधनेच नसल्यामुळे इतिहास हा भाकडकथासंग्रह होऊन बसतो. तानसेनाची गायकी कशी होती यापेक्षा तो मल्हार गायल्याबरोबर पाऊस पडत असे, ही कथाच अधिक लोकप्रिय. मृत व्यक्तिंना देवत्व द्यायची आम्हांला फार घाई, आणि देवत्व द्यायचे तर चमत्कार हवा. म्हणून आम्ही कविकल्पनांचे वास्तवीकरण केले. तानांचा पाऊस पाडलेल्या तानसेनाने पाण्याचा पाऊस पाडला असे करून टाकले.''
यासाठी व्यक्तिगत आठवणींचे महत्व आहे,
      त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात, आणि शक्यतर आपापली कृतीही सुरू करावी.
-आपले जग

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन