Skip to main content

29 august 2016

`मातृवंदना'  
    कासेगाव (ता.वाळवा) येथील काशिलिंग आडके हा तरुण सध्या प्रो कबड्डी च्या सामन्यांतून गाजतो आहे. त्या स्पर्धांतील  `दिल्ली दबंग' या संघाचा तो कप्तान आहे. त्याचे वडील कुस्तीगीर होते, त्यांचे लवकर निधन झाले. परंतु त्यांच्या माघारी काशिलिंगच्या आआीने गाडा सावरला. मुलगा शाळेत फारसा रमत नव्हता, पण खेळात तो पुढे असायचा. त्याचा कल ध्यानात घेअून या माअूलीने त्याला `खेळात मोठा हो' म्हणून सर्वतोपरी पाठिंबा दिला. ही आआी शेतामळयात मोलमजूरीची कामे करून पोराला योग्य संधी देत होती. त्या खेळाचे प्रशिक्षण आणि सराव करण्यास वाव देत होती. आज त्या लेकाने कष्टांचे चीज केले आहे.
     सांगलीचे चौगुले कुटुंब आपल्या तीन्ही मुलांचे कौशल्य पाहून आज समाधानाने हसते आहे. श्री.चौगुले हे स्पर्धा परीक्षांच्या वर्गांना शिकवतात. ते स्वत: खेळाडू होते. त्यांचा मुलगा अजिंक्य हा पहिलीपासून शाळेच्या बाबतीत फार दमवायचा. कशीतरी त्याची ढकलगाडी तिसरीपर्यंत गेली पण तिथेच अडली. शाळेचे नाव काढले की तो भोकाड काढायचा, दूर जायचा, आजारी पडायचा. आआी वडील हताश झाले.  तो मैदानातून मात्र हलायचाच नाही. मध्यरात्रीपर्यंत ग्राअुंडवर हुंदडायचा. त्याला अेकदा स्केटिंगचे बूट आणले, तर ते कौशल्य त्याने पट्कन् आत्मसात केले याचे सर्वांना फार आश्चर्य वाटले. शेवटी त्याच्या आआीने त्याची शाळा संपवून त्याच्या आवडीच्या क्रिकेटवर अक्षरश: `सोडले'. तिथे त्याची चमक दिसू लागली. तो १४ वर्षांखाली, १६वर्षांखाली असे सामने गाजवू लागला. आता तो रणजी सामन्यांत दाखल होण्यासाठी दारे ठोठावतोय. मोठ्या खेळाडूंसोबत सराव करतो, अुत्तम आिंग्रजी बोलतो. त्याच्याप्रमाणेच निनाद आणि सुधा ही त्याची भावंडे शाळेअैवजी आितरत्र चमकत आहेत. निनाद  `पूना क्लब' या १६ वर्षांखालच्या टीमचा कप्तान आहे; तर सुधा पेटी तबला अुत्तम वाजवते, आणि कथ्थक व ओडिसी नृत्यात प्रवीण आहे. मुलांच्या या कामगिरीचे श्रेय श्री.चौगुले हे त्यांच्या पत्नी संगीता यांना नि:संकोच देतात, तेव्हा त्यांना आनंदाश्रू आवरत नाहीत.
     डाअून सिंड्नेम (गतिमंदत्व) असलेल्या गौरीला मनापासून स्वीकारून तिच्यातील कलांना विशेष वाव देणाऱ्या स्नेहल गाडगीळ या `स्पेशल मदर' आहेत. गौरी गाडगीळ ही  `यलो' चित्रपटामुळे सगळीकडे परिचित आहे.  तो चित्रपट तिच्याच जीवनावर बेतलेला आहे, तिला त्यासाठी राष्ट्नीय पारितोषिक मिळाले आहे. दहावीपर्यंत ती त्या प्रकारच्या शाळेत शिकली, पण त्याच काळात ती पोहणे आणि भरतनाट्यम् शिकली. पोहण्यात तिने राष्ट्नीय स्तरावर बक्षिसे मिळवली; आणि त्यापुढे चीन तैवान अस्ट्न्ेिलॉया येथील स्पर्धांतही ती चमकली. तिने काही सागरी जलतरण स्पर्धांत भाग घेतला आहे. भरतनाट्यम् मध्ये ती विशारद आहे.तिला राष्ट्न्पतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. या साऱ्यात तिला घडविण्याचे श्रेय सर्वस्वी तिच्या आआीचे आहे. अेका समयी परमेश्वराने दिलेले ओझे वाटावे अशी ही गौरी आता आआीच्या मते परमेश्वराने दिलेली मोठी भेट आहे !
     आपल्या मुलांना या प्रकारे घडविणाऱ्या या तीन प्रतिनिधी मातांचा तो कौतुक सोहळा होता. आजच्या शिक्षणातून गुणवत्तेअैेवजी केवळ गुण पाहिले जातात. पण आपल्या मुलांच्यातील कौशल्यांचा विकास करणाऱ्या या कौसल्या मातांनी मुलांना खरे घडविले आहे. पालकांच्या अपेक्षा नाहक वाढत चालल्या आहेत. त्यांच्या भव्यदिव्य कल्पनांचे आणि गैरसमजुतींचे ओझे मुलांना वागवावे लागत आहे.  शिक्षणातून मूल्ये नाहीशी झाल्यासारखे  भासते. शर्यतच अशी की, ती जिंकली तरी अेका प्रशस्तीपत्राच्या सुरनळीखेरीज हाती काही राहूच नये. छोट्या शाळेत चमचा-गोटी अशी अेक शर्यत होती. तोंडात चमचा पकडायचा, त्यात खेळातली गोटी ठेवायची, आणि ती गोटी न पाडता पळायचे. पुष्कळांच्या तोंडातील चमच्यातून ती गोटी वाटेतच पडायची. आजच्या शिक्षणाचा तोच प्रकार आहे. मूल्यांची गोटी वाटेतच पडून जाते, आणि अेका पदवीचा मोकळा चमचा तोंडात धरून मुले रेषा ओलांडतात. त्यांना शर्यत जिंकल्याचा भास होतो.त्या साऱ्या पृष्ठभूमीवरती मुलांचे शिक्षण वेगळया नजरेने पाहण्याचा प्रयोग त्या मातांनी यशस्वी केला आहे. मुलांचा कल व आीश्वरदत्त कौशल्य लक्षात घेअून त्यांना, पुस्तकी पठडीतले शिक्षण देण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा योग्य त्या दिशेने पुढे जाण्यास प्रोत्साहन द्यायला हवे; असा बहुमोलाचा संदेश या कार्यक्रमातून दिला गेला.
     या निमित्ताने श्री विवेक घळसासी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी या प्रयोगांचे कौतुक तर केलेच, परंतु  आआी  या विषयावर फार अुद्बोधक विवेचन आपल्या हृदयस्पर्शी वाणीतून केले. `मुले आपली आहेत, आणि तीच आपल्या अपेक्षांचा आविष्कार करणार आहेत ही समजूत काढून टाकायला हवी. अध्यात्म असे सांगते की, सृष्टीकर्त्याच्या आज्ञेने कोणीतरी आत्मा देह धारण करण्यासाठी अेक गर्भाशय शोधत असतो. ते त्याला लाभले की आपल्याला अपत्यलाभ होतो. त्याच्या संगोपनाची जबाबदारी पालकांच्यावर आहे, पण त्यास आपल्या फायद्यासाठी वापर करण्याचा अधिकार पालकांना नसतो. जगातल्या कोणत्याही वयाची स्त्री ही मातृस्वरूपात पाहायला शिकले पाहिजे'
      शिक्षण क्षेत्रात काही बदल घडवून आणण्याच्या अुद्देशाने काम करणाऱ्या टी बी लुल्ला फाअुंडेशनच्या या  नव्या संकल्पनेला मोठीच दाद मिळाली.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...