Skip to main content

9 Jan 2017

धर्म राष्ट्नीयत्वाशी निगडीत
नागपूर येथे राष्ट्नीय स्वयंसेवक संघाच्या आवारात कसलेसे धर्मसंमेलन भरले होते, त्याकडे अेरवी त्याच्याशी असंबध्द कुणाचे लक्षही गेले नसते. तिथे कुणा शंकराचार्यानी म्हणे `हिंदूनी दहा अपत्ये जन्माला घालावीत' असे म्हटले; आणि दुसऱ्या कोणा धर्माचार्यानी `अेका हाती जपमाला आणि दुसऱ्या हाती भाला घ्यावा' असा संदेश दिला. ज्यांना या धर्मावर दुगाण्या झाडण्याचा अेक आनंद हवा असतो, त्यांना हे अेक निमित्त मिळाले. हिंदू धर्म त्याच्या  मार्गाने हजारो वर्षे चालत राहिलेलाच आहे. त्याचे श्रेय अशा धर्माचार्यांचे नाही, आणि त्याचे जे काही नुकसान झाले असेल त्याला त्याचे टीकाकारही कारण नाहीत. कारण तो खरा मानवाचाच धर्म आहे. मानवी वृत्तींचा धर्म आहे. त्या वृत्ती जेवढ्या चिरंतन असतात, तितकाच तो धर्म चिरंतन टिकून राहणार आहे.

तरीही अशा काही निमित्ताने सामाजिक तेढ निर्माण होते, त्याची काळजी करावी लागते. वास्तविक ते जे कोणी धर्माचार्य बोलले, त्यांचा तो विचार असेल; तो काही कोणी शिरोधार्य मानत नसतात. त्यांनीही काही सामाजिक स्थितीचा अनुभव घेतलेला असतो, त्यांतून त्यांचे मत त्यांनी व्यक्त केले. ते तर कुणीही करू शकतो. पण अेरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा  संकोच झाला म्हणून गळे काढणारी मंडळी त्या कोणा धर्माचार्यांना ते स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत.. ते तर लगेच साऱ्या हिंदूंना बूर्झ्वा ठरवून ठोकायला सुरू करतात. हे त्यांचे विखारीपण साऱ्या समाजाला त्रासदायक ठरते, म्हणून तरी त्या आचार्यांनी स्वत:ला आवर घालायला हवा होता. आपल्या मतांच्या जाहीर प्रकटीकरणांतून कुणा माकडांच्या हाती कोलीत मिळाले तर साऱ्या समष्टीला धग लागते, हे ध्यानात घ्यायला नको का?

हिंदुत्व हेच राष्ट्नीयत्व अशी अेक व्याख्या रूढ केली जात आहे; ती खरी असेल तर मग प्रत्येकाने दहा अपत्ये जन्माला घातल्यावर त्या राष्ट्नीयत्वाचे काय होआील? राष्ट्न्धर्माचे काय? जेव्हा कधी `अष्टपुत्रां'चे महत्व होते तेव्हाचा आपल्या राष्ट्नचा विस्तार, त्या काळातील साधनसंपत्ती, युध्दे-जास्तीचा मृत्यूदर यांमुळे त्या काळाची गरज...वगैरे सारा संदर्भ त्या कामनेला होता. स्वातंत्र्यानंतर आपल्याला अन्नमंत्री नेमावा लागत असे आणि त्याचे काम जगात मिळेल तिथून धान्य गोळा करण्याचे असे. त्या वेळी लोकसंख्या ४०कोटि होती, त्याच्या तिप्पट आज झाली, सारी साधनसंपदा अपुरी ठरू लागली. तरीही जर आपल्या धर्मातील लोकसंख्या आितरांपेक्षा अपुरी ठरण्याचा धोका म्हणून जन्मदर वाढविण्याचा अुपाय सुचत असेल तर त्या धर्मवेत्त्यांची कीव करावी लागेल.

आजकालचे प्रश्न सोडविण्याची अशी अेक नवी घातक पध्दती बरेचजण सुचवितात. कित्येक समाजगटांसाठी अस्थानी आरक्षण देण्यानेे आितरांना जीवघेणा त्रास होतो. म्हणून त्या सवलतींचाच फेरविचार करावा, असे म्हणण्याअैवजी आपल्यालाही तसे आरक्षण मिळावे अशी मागणी सुरू होते. आिस्लाम धर्मीयांना धर्मयात्रेसाठी अनुदान मिळते, म्हणून ते काशीयात्रेसाठी आम्हालाही मिळावे अशी मागणी होते. मुळात जे चुकीचे होत आहे ते कमी होण्यासाठी प्रयत्न करायला हवा, त्याअैवजी तीच चूक आम्हालाही करण्याचा अधिकार  द्यावा हे कसे चालेल? त्यांनी चोरी केली तर चालते, म्हणून आम्ही वाटमारी करण्याचा हक्क मागावा काय? उलट त्यांची चोरी रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

राष्ट्ीयत्वाच्या संदर्भात धर्माला आपल्या देशात सर्वोच्च स्थान नाही, ते तसे कुणी दिलेले नाही. जे धर्म तसे देत असतील, त्यांचे आिथली राज्यसत्ता काहीही मानत - जुमानत नाही. म्हणून आिथे कोणी कितीही तोंडच्या वाफा दवडल्या तरी भाले घेअून फिरण्याचा अधिकार लाभणार नाही, तो लाभकारीही ठरणार नाही. हल्लीच्या पुढाऱ्यंानाही अुगीच तलवारी वगैरे देण्याचा अेक व्यासपीठी शोभेचा थाट असतो, त्याचा अुपयोग  प्रत्यक्षात न करता, त्या पुढाऱ्याच्या दर्शनी कपाटात ठेवण्यापुरताच होत असतो. तसे तर नवऱ्या मुलाच्याही मागे त्याचा करवला हाती तलवार धरून अुभारण्याची प्रथा आहे. धर्माचार्यांना तसेच भाले मिरविण्याची अपेक्षा असेल तर त्यांना तेवढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही. शिख संप्रदायाच्या गुरुद्वारातही हाती तेग मिरविणारे धर्मप्रमुख असतात. त्यांनी त्या शस्त्राचा प्रत्यक्ष सरसहा अुपयोग करायचा नसतो, तर ते त्यांच्या गतकाळातील पराक्रमाचे प्रतीक म्हणून त्याची शान असते. अमृतसरच्या गुरुद्वारातून त्या शस्त्रांचा वापर भिंड्नवाल्याच्या मनमानीचा होअू लागल्यावर तिथे लष्करी कारवाआी करावी लागली. हा राष्ट्न्धर्म आहे. तोच कोणताही धर्म आहे. तिथेच राष्ट्नीयता आहे. हिंदुत्व त्यापेक्षा वेगळे नाही. वाघांची संख्या घटत चालली म्हणून वाघांचे संवर्धन करावे लागते, तसा काही प्रकार कोण्या धर्माच्या बाबतीत नसावा.

हिंदू धर्मानेही ज्यांना अेवढ्या अुच्चीचे पद दिले आहे, त्या आचार्यांचेही मत तितके अुथळ असेल असे नाही. आचार्यांना आचाऱ्यांच्या पंक्तीत नेअून बसविण्याचा अगोचर पुरोगामीपणा करणेही चुकीचे ठरेल. या महान मानव-धर्माला  समजून न घेता दूषणे देण्याचा प्रकार पूर्वापार चालत आलेलाच आहे. तशी काही संदर्भहीन विधाने मुद्दाम प्रसृत करण्याचेही हे अुद्योग असतील. परंतु ते जर तसेच आणि तितकेच खरे असतील असे मानले तरीही त्यावरून साऱ्या धर्माची आणि ते मनोभावे आचरण करणाऱ्यांची सालपटे काढण्याचाही कोणी प्रयत्न करू नये, त्यांतून विखार वाढतो. तो सामाजिक विद्वेष हिंदू धर्माला तर कदापि मान्य होण्याजोगा नाही.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...