Skip to main content

16 Jan 2017

स्थानिक पातळीवरची लोकशाही
महाराष्ट्नतल्या २५जिल्हा परिषदा, २८३पंचायत समित्या, आणि १०महानगरपालिका आितक्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होअू घातल्या आहेत. अेका परीने या निमित्ताने सारे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आपल्याकडे लोकशाही राज्यपध्दतीचा अर्थ केवळ निवडणुका, आितकाच घेतला जातो. त्या दृष्टीने पाहता ही सारी घालमेल लोकशाहीची मोठी प्रक्रिया ठरते.

आपल्या देशाला ६७वर्षांपूर्वी लोकशाही राज्यव्यवस्था मिळाली. ती कोणी  `दिलेली' नाही, तर ती `आम्ही भारतीय लोकां'नी स्वीकारली आहे. या सार्वभौम देशाची घटना तयार करून ती `आपण लोकां'नी  स्वत:प्रति अर्पण केलेली आहे. त्यामुळे ही सारी प्रक्रिया कोणा राजकीय पक्षासाठी, नेत्यांच्या नेतेगिरीसाठी, किंवा झुंडपुंडगुंडांच्या अरेरावीसाठी नाही; तर ती `आपण लोकां'च्या सुखासमाधानाने राहण्यासाठी असते. प्रत्येक माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात, त्याच्या हाताला काम मिळावे, आपल्या विकासाच्या कल्पना आपल्याकडूनच राबविल्या जाव्यात यासाठी केलेली ती रचना आहे. ती रचना लोकशाही पद्धतीने चालायची असली तरी, प्रत्यक्षात प्रत्येकाला कारभारात भाग घेणे शक्य नसते म्हणून प्रातिनिधिक रीतीने कारभार चालविला जातो, पण तो `आपणच आपल्यासाठी' चालवितो. हे लक्षात घेतले तर या निवडणुकांचे महत्व प्रत्येकासाठी आहे.

प्रत्यक्षात अनुभव असा की, आजवर तसा मोठा काळ खर्ची पडूनही  परिणाम व्हावा तसा झालेला नाही. आखलेल्या योजनांना म्हणावेसे यश आलेले नाही. अुलट समस्या वाढल्या आहेत. सत्तेवर येणारी माणसे बदलली, पक्ष बदलले, प्रशासनातील अधिकारी बदलले... पण आिच्छित गोष्टी अद्यापि दूर राहिल्याचीच आपली सर्वांची भावना आहे; ती खरीही आहे. लोकशाहीच्या सर्वंकष अंमलबजावणीसाठी  पंचायत राज्य व्यवस्था २ऑक्टो.१९५९ला  अंमलात आली;  पण त्याचाही प्रभाव पडेना. त्याचे कारण असे की लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग जितका अपेक्षित असतो, तितका तो मिळेना. कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकणाऱ्या लोकांकडे गावपातळीपासून सगळी सत्तासूत्रे सोपवून देऊन लोक अलिप्त राहू लागले. त्यामुळे मतांच्या पेढ्या तयार होअू लागल्या. अनुदान, मोफत योजना, माफी, भरपाआी असल्या दुर्बळ लाभांनाच महत्व आले. सरकारकडे हात पसरण्याची प्रवृत्ती वाढली, आणि पर्यायाने `प्रतिनिधीं'ना  दलालांचे स्वरूप येअू लागले. आपल्या सामुदायिक साधन-संपत्तीचा अुपयोग करून सर्वांगिण विकास साधावा, स्वयंपूर्ण व्हावे, त्यासाठी सर्वांनी मिळून झटावे असले विचार कुणी सांगेनासे झाले. त्याअुलट सारे काही आपल्यासाठी सरकारच करेल, अशी भावना तयार करून; आमचे सरकारच ते सर्व करेल अशी भूल देण्याचे प्रस्थ वाढले. निवडणुका आल्या आणि गेल्या, लोक सरकारकडे आशाळभूतपणे पाहात राहिले. आपण काही न करताच आपल्याला असे लाभ देतो म्हणणारे झुंडपुंड आपण निवडून देत राहिलो. त्यावर आणखी अेक अुपाय म्हणून ७३वी घटनादुरुस्ती  करण्यात आली. २३डिसेंबर १९९२ला ती अंमलात आली. घटनात्मक दृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायती राज्यव्यवस्था बळकट झाली. ग्रामसभेलाही अधिकार आले. `लोकां'ना सक्षम करण्याचा हा प्रयोग होता. म्हणूनच या स्थानिक निवडणुकाही फार महत्वाच्या मानल्या गेल्या पाहिजेत.

निवडून येणाऱ्या प्रतिनिधी-सदस्यांनी,  आपल्याला मत देणाऱ्यांचेच केवळ नव्हे तर सर्व नागरिकांचे आपण प्रतिनिधित्व करतो आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ जिल्हा परिषदेत नव्हे तर अगदी गाव पातळीवरच काय, पण पतसंस्था किंवा शाळा कॉलेजातही  राजकीय पक्ष अुतरतात, अुतरेनात का; पण ते त्या त्या पातळीवर दुही माजवून समाज विघटित करण्यास हातभार लावतात, हे  निवडणुकांतून अपेक्षित नाही. राजकीय पक्षांच्या कवचांतून ठराविक `दर्जा'ची माणसे निवडणूक अुद्योगात अुतरतात, हे सामान्य माणसांच्या जीवनासही घातक आहे, हे त्या सामान्य माणसानेच आता लक्षात घ्यायला हवे. स्वच्छता, शाळा, सांडपाणी, वीजवापर या गोष्टी फार गंभीर तंत्राच्या नाहीत, पण त्याही आपण गंभीर बनविल्या आहेत. कोणताही  सामुदायिक कार्यक्रम आपण, तो कसा नसावा याचेच अुदाहरण बनवले आहे. निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी  काम करवून घेण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी आपले नेतृत्व वापरले पाहिजे. त्यासाठी पक्षांपक्षांमध्ये भांडत राहण्याअैवजी  मानवी संबंध दृढ करण्याची दृष्टी हवी. लोक आणि `त्यांच'े प्रशासन यांच्यातील दुवा बनून काम करणे अपेक्षित आहे. गावात कुठेही नियम मोडून फिरलो तरी मला कोणी रोखणार नाही; हा नेतृत्वाचा निकष बनला आहे, तो मोडलाच पाहिजे.  आितरांना स्वच्छंद  मुक्त  वावरण्यासाठी स्वत:वर बंधने घालून घेणे म्हणजे स्वातंत्र्य; आणि स्वत:च्या स्वैराचारासाठी आितरांवर नियमांची बंधने लादणे म्हणजे पारतंत्र्य असते. त्या दृष्टीने पाहिल्यास आपण कोठे आहोत?

वर्चस्व गाजवणे म्हणजे प्रतिनिधित्व नव्हे. सरकारी योजनांचे लाभार्थी आजवर कोणकोण झाले आहेत, यांची यादी  जाहीर  केल्यास त्या बाबतीत आपण हरल्याचे दिसेल. सरकारी कामांचीही अेक पध्दती असते, ती समजून घेण्यासाठी अभ्यास लागतो. तो करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तज्ज्ञ लोकांशी चर्चा करावी लागते. त्यांची नीट मांडणी करावी लागते, पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी केवळ आणि केवळ संसदीय पध्दती आचरावी लागते. रस्ता रोको किंवा खुर्च्या फेको असले प्रकार  `लोकांच्या' शासन पध्दतीत बसत नाहीत, ते गैरप्रकार अद्यापि आपल्या बोकांडी बसलेत. या निवडणुकींच्या प्रचारांतून लोकांनी अुमेदवारांकडून त्यांची कामाची पध्दती आणि त्यांचे नियोजन -केवळ आश्वासने नव्हेत - समजून घ्यायला हवे. कोणत्याही घटनात्मक कामाला कायद्याचा आधार असतेा,  सरकारी निर्णय होण्यासाठी आंदोलन मोर्चे हे करावे लागत नाही, ती चुकीची पध्दत आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावर सांसदीय रीतीचाच अवलंब करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, चर्चा करावी लागते, दीर्घकाळचे लोकहित विचारात घ्यावे लागते. अुगीच `..विजय असो',`...झालाच पाहिजे', `..यांचे हात बळकट करा' ... असल्या घोषणांनी लोकशाहीचे विडंबन चालू आहे. आपल्या क्षेत्रातील निवडणुकींच्या निमित्ताने मतदारांनीच योग्य बोध घेअून देशकार्य साधिले पाहिजे. लोकशाही हा केवळ सत्ता चालविण्याचा नियमबध्द मार्ग नाही, तर तो व्रतस्थ जीवनमार्ग आहे.

अंत्यसंस्कार आणि पर्यावरण
सजीवाचे शरीर अचेतन झाले म्हणजे त्यावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक असते. व्यावहारिक भाषेत आपण पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे असे म्हणतो पण ते विज्ञानाच्या भाषेत, प्रेताची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे असेच म्हणण्यासारखे आहे.
आपल्या कुटुंबातील किंवा समाजातील प्रिय व्यक्ती अचेतन झाली म्हणजे ती घटना व्यक्त करण्यासारखी किंवा त्या व्यक्तीचा निर्देश करण्यासाठी, मराठीत अनेक भावनात्मक शब्द आहेत. हे शब्द, खरे म्हणजे शाब्दिक अंत्यसंस्कारच आहेत. ते शब्द असे-
मृत, मृतात्मा, प्रेत, पार्थिव, कलेवर, अचेतन देह/शरीर, वारणे, मरणे. मृत होणे, खपणे, संपणे, निधन पावणे, देहांत होणे, निर्जीव होणे, चेतनाहीन होणे, कैलासवासी होणे, यमसदनी जाणे, वैकुंठवासी होणे, िख्र्तास्वासी होणे, पैगंबरवासी होणे, अल्लाला प्रिय होणे, देवाला आवडणे, परलोकवासी होणे, लांबच्या प्रवासाला जाणे, पैलतीरी जाणे, अनंतात विलीन होणे, कालवश होणे, प्राणज्योत मालवणे, प्राणज्योत विझणे, निजधामास जाणे, धारातीर्थी पडणे वगैरे वगैरे.
सजीवांच्या शरीरातील चेतना नाहीशी झाली म्हणजे निसर्गच त्याची विल्हेवाट लावायला सुरुवात करतो. पेशी विघटन पावू लागतात त्यात जीवाणूंची वाढ होऊ लागते आणि शरीर कुजायला लागते. प्रेतात निर्माण झालेल्या काही विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंमुळे आणि काही सेंद्रीय जीवरसायनांमुळे प्रेताला दुर्गंधी सुटते. प्रेताचे अस्तित्व जाहीर करण्याची निसर्गाची ही योजना असावी.
अंत्यसंस्काराची निसर्गाची रीत
बहुतेक मांसाहारी प्राणी खाण्यासाठी दुसऱ्या जिवंत प्राण्यांना जीवे मारतात. मांजर किंवा साप, मेलेेले उंदीर किंवा बेडूक खात नाहीत. त्यांना कुजलेले मांस चालत नाही, ते जिवंत उंदीर किंवा जिवंत बेडूकच गिळतात.
मेलेल्या प्राण्यांचे शरीर हे इतर काही प्राण्यांचे अन्न असते. सूक्ष्म जीवाणूंमुळे मांस पेशींचे विघटन होऊ लागते आणि त्या कुजायला किंवा सडायला लागतात. त्यांना दुर्गंधी सुटते. हे कुजललले मांसदेखील गिधाडे, कावळे वगैरे पक्षी, काही जंगली प्राणी, विशिष्ट प्रकारच्या अळया आणि किडे यांचे अन्न असते.
कुजलेले मांस, निसर्गातील दुसऱ्या प्राण्याचे अन्न असणे ही निसर्गाचीच योजना असावी. ही दुर्गंधी सुटणे म्हणजे कुजलेले मांस ज्यांचे अन्न आहे अशा प्राण्यांसाठी, कलेवराचे अस्तित्व जाहीर होणे असेच आहे. सजीवांच्या कलेवरांची विल्हेवाट लावण्याची निसर्गाची ही पद्धत असावी.
पृथ्वीवर वनस्पती आणि सजीवांची उत्पत्ती झाल्यापासून, गेल्या ३० कोटि वर्षांत अगणित वनस्पती निर्माण झाल्या आणि नष्ट झाल्या. अगणित सजीव निर्माण झाले आणि नाश पावले. परंतु निसर्गाने, वाळलेल्या वनस्पती आणि सजीवांची कलेवरे यांची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावून, त्यांच्या वस्तूद्रव्याचा पुनर्वापर केला. निर्जीव शरीर कुजते, परंतु कुजलेले मांस खाऊनही उपजीविका करणारे प्राणी निसर्गाने निर्माण केले आहेत.
म्हणूनच त्यांच्यामुळे मानवाला अमूल्य विज्ञानीय माहिती मिळते. त्या निसर्गाच्याच पद्धतीचे आपण अनुकरण करून सजीवांच्या पार्थिवांची विल्हेवाट लावली पाहिजे. मानवी वस्ती वाढल्यामुळे, निर्जीव वनस्पती, प्राणी आणि माणसे यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक झाले आहे. कुजण्याच्या क्रियेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि जंतुसंसर्ग टाळायला हवा.
अंत्यसंस्काराचे दोन मुख्य प्रकार आहेत. `दहन' म्हणजे जाळणे आणि `दफन' म्हणजे पुरणे. नद्या आणि समुद्रातही प्रेते टाकून अंत्यसंस्कार केले जातात, पण हे प्रमाण खूपच कमी आहे. पारशी लोक `शांतता विहिरीत' गिधाडांना खाण्यासाठी प्रेते ठेवतात. ममीकरण हीदेखील अंत्यसंस्काराची एक पद्धत आहे. इतिहासकाळात ही पद्धत राजेमहाराजे यांच्या अंत्यसंस्कारासाठी इजिप्त आणि इतर काही देशात रूढ होती. आता ती कालबाह्य झालेली आहे. पश्चिमात्य देशात तर जिवंतपणीच स्वत:च्या दफनाची जागा विकत घेऊन ठेवतात. वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा अवयव रोपणासाठी देहदान करणे, हाही अंत्यसंस्कारच समजावा.
आज अंत्यसंस्काराच्या प्रमुख पद्धती बऱ्याच खर्चिक झाल्या आहेत आणि त्यांचे नाही म्हटले तरी, थोडे व्यापारीकरणही झाले आहे.
अंत्यसंस्काराचे साहित्य विकण्याचा काही लोकांचा व्यवसाय आहे. इतर वस्तूंइतका या साहित्याचा खप नसल्यामुळे नफ्याचे प्रमाण बरेच अधिक ठेवावे लागते. शवपेटीका तयार करून विकण्याचा काही व्यक्तींचा व्यवसाय आहे. अंत्यसंस्काराची जागा म्हणजेच स्मशाने, आणि अंत्यसंस्काराच्या इतर सुविधा पुरविण्याची जबाबदारी सध्यातरी, नगरपालिकांची आणि ग्रामपंचायतींची आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक दु:खित, भावनावश मन:स्थितीत असल्यामुळे, अंत्यसंस्कारासाठी वाटेल तेवढा खर्च करण्यासाठी तयार असतात.
विज्ञानीय दृष्टिकोणातून उत्क्रांत झालेली आणि शास्त्रीय पद्धतींवर आधारित अशी आणि सर्व धर्मातील रूढींना सामावून घेईल अशी एकमेव अंत्यसंस्कार पद्धती सर्वांनी स्वीकारल्यास, वर्तमानकाळातील बऱ्याचशा सामाजिक समस्या सुटतील, असे वाटते.
मृतदेह स्मशानापर्यंत नेण्यासाठी, सर्व धर्मातील पारंपरिक रूढी अशी आहे की, सर्व नातलग आणि ओळखीच्या संबंधित व्यक्ती मोठ्या संख्येने, मृत व्यक्तीच्या घरी जमतात आणि अगदी जवळच्या, रक्ताच्या नातेवाईकांचे सांत्वन करतात. नंतर पारंपरिक पद्धतीने, अंत्ययात्रा काढून मृतदेहाला स्मशानात घेऊन जातात. तेथेही पारंपरिक पद्धतीचे धार्मिक विधी करून अंत्यसंस्कार करतात. बरेचवेळा, मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक परगावी असले तर त्यांच्या येण्याची वाट बघत, इतर व्यक्ती ताटकळत बसतात. त्यामुळे वेळेचा खूप अपव्यय होतो.
सध्याच्या वेगवान जीवनशैलीत, नातलगांच्या किंवा ओळखीच्या माणसांच्या अंत्यसंस्काराला वेळ देणे शक्य होत नाही. म्हणूनच कमीतकमी व्यक्तींच्या उपस्थितीत, कमीतकमी वेळात, सुटसुटीतपणे आणि कमी खर्चात अंत्यसंस्कार करण्याची पद्धती शोधून काढणे आणि रूढ करणे आवश्यक आहे.
राहण्याच्या जागेपासून दूरच्या गावी किंवा परदेशात मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी देह मूळच्या गावी आणला जातो, असा अनुभव आहे. विशेषत: सुप्रसिद्ध व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, उच्चाधिकारी किंवा राजकारणी यांचा अचेतन देह मूळच्या गावी हमखास आणला जातो. पश्चिमात्य आणि इतर देशात देखील हीच समस्या निर्माण झाली आहे. अमेरिकेत तर मृतदेहांना, एका गावाहून दुसऱ्या गावी नेण्याचा व्यवसायच आहे.
मृतदेह हाताळण्यात रोगजंतूंच्या संसर्गाचा फार मोठा धोका असतो. आपल्या पूर्वजांना केवळ अनुभवाने, हा धोका लक्षात आला आणि त्यानुसार अंत्यसंस्काराच्या पद्धती उत्क्रांत झाल्या. रोगजंतूंचा नाश करण्यासाठी, दहनपद्धती रूढ झाली असावी असेही वाटते. सुतक पाळणे आणि प्रेतयात्रेबरोबर स्मशानात गेलेल्या व्यक्तींनी, स्नान केल्याशिवाय आणि बरोबर असलेल्या सर्व वस्तू आणि कपडे धुतल्याशिवाय, इतर व्यवहार करू नयेत असा प्रघात आहे. परंपरागत रूढी किती विज्ञानाधिष्ठित आहेत, याचा प्रत्यय येथे येतो.
मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून बरीच धार्मिक क्रियाकर्मे आणि विधी केले जातात. क्रियाकर्मे करणे हेही काही व्यक्तींचे चरितार्थाचे साधन आहे. क्रियाकर्मे करून मानसिक समाधान प्राप्त करून देतात आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्या चरितार्थासाठी धनप्राप्ती होते.
मृत व्यक्तीच्या अतृप्त इच्छा, त्याच्या आत्म्याला चिरशांती, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती, भूतपिशाच्च योनी, ८४ लाख योनी, मोक्ष, पुनर्जन्म, पापपुण्य वगैरे संकल्पनांचा पगडा आपल्या समाजावर इतका घट्ट बसला आहे की, पैसा खर्च झाला आणि वेळ खर्ची पडला तरी चालेल पण मानसिक समाधान मिळविण्यासाठी तेवढे मोल ते देतात.
-

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन