Skip to main content

26 Dec 2017

चीड नको सामंजस्य हवे.
कोणत्याही महत्वाच्या घटनेबाबतीत अनुकूल-प्रतिकूल मते असतातच, ती असलीही पाहिजेत. लोकशाही जीवनपध्दतीत अशा दोन्ही मतांचा आदर केलाच पाहिजे. पण ती दोन्ही बाजूंची मते कोणत्या अनुभवांतून, कोणत्या मन:स्थितीत, व कोणत्या अधिकारात व्यक्त होतात यालाही महत्व असायला हवे. सध्या मोदीप्रणित नोटाबंदी आणि क्रॅशलेस व्यवहारांचे वातावरण सर्व सानथोरांना चर्चा करायला चांगले आहे. पण त्यातही  अुपरोक्त निकष लावले गेले तर पुष्कळशी  मते अस्थानी आणि अपात्र ठरतील. घरातल्या अंथरुणावर पाय पसरून टी व्ही ची मॅच पाहणारे बरेचजण, विराट कोहलीचा फटका  चुकीचा ठरवून त्याने रन्आअूट होण्यात कशी घाआी केली याचे समीक्षण करीत असतात. त्यांची ती समीक्षा किती गांभिर्याने घ्यायची हे ज्याचे त्याला कळतेच. पण जेव्हा ही समीक्षा वृत्तपत्रांतून जाहीर होते, किंवा दूरदर्शनच्या माध्यमांतून चडफडते -किंवा स्तुतिसुमने अुधळते, -तेव्हा त्यांचा काही परिणाम होत असतो. म्हणून त्यांत तारतम्य ठेवणे हे निदानपक्षी जाणत्या महानुभावांकडून अपेक्षित आहे.

सध्या त्याच्याअुलट स्थिती दिसते. त्यात सर्वोच्च पातळी काँग्रेसचे अुपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गाठली आहे. हा पक्ष सर्वार्थाने महान गणला जातो. त्या पक्षाचे वय, त्याचे योगदान, त्या पक्षातील महान नेते, त्यांचे विचारधन, आणि अेकूण भारतीय मनांवर त्याचा प्रभाव या सर्वांगांनी तो पक्ष मोठा आहे. त्याने बहुतांश कालावधीत या देशावर अधिराज्य गाजविले आहे. अशा स्थितीत त्या पक्षाचे नेतृत्व जे आणि जसे सध्या व्यक्त होते, त्यामुळे ज्येष्ठ जाणत्यांना वेदना झाल्याशिवाय राहणार नाहीत. नव्या पिढीतील शिक्षित पोरे टोरे त्या व्यक्तिमत्वांबद्दल काही पाचकळली तर  त्यातली गंमतचेष्टा विसरून जाता येआील; पण  त्यांचे भाषण, देहबोली, कर्कशपणा यांत कुठे पोक्तपणा शोधायचा हा प्रश्न पडत असेल तर ती फार वेदनादायी  गोष्ट ठरते. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या सध्या थोड्या दूर राहिलेल्या दिसतात, आणि पक्षात राहुल गांधींचे स्थान सध्या तरी सर्वांत मोठे आहे. त्या पदावरून असे घडणे हे काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यांसही किती रुचत असेल याची शंका आहे.

त्यांच्या पक्षाचे ते पाहून घेतील, पण आपल्या समाजातील पांढरपेशी वर्गातील प्रैाढांचीही मोठी पंचाआीत झाल्याचे दिसून येते. अेक तर हा वर्ग स्वत:ला सडेतोड बुध्दीचा समजतो, त्याने गेली पाच पन्नास वर्षांच्या अनुभवांची शिदोरी बाळगलेली आहे, आणि बाहेरच्या जगाचे व्यवहारही त्या वर्गास चांगल्या प्रकारे पारखता येतात. परंतु गेल्या काही वर्षांतील तंत्रांचा वेग इितका वाढला आहे की, हा वर्ग चालू जगात अडाणी ठरू लागला आहे. त्या वर्गाला मोबाआील बँकिंग - क्रॅशलेस देवघेव - आी मार्केटिंग - बुकिंग अॅप... अशा संज्ञा कळणेही कठीण पडते आहे. तो वर्ग अजूनी आपली पेन्शन घेण्यासाठी महिन्यातून अेकदा बँकेच्या रांगेत अुभे राहून घरी आल्यावर ती मोजून घेण्याच्या जमान्यात आहे. त्यांची नातवंडे नव्या तंत्रंाशी सहजी खेळतात. आता यापुढे तीच नवी तंत्रे सर्वत्र प्रचलित होणार हे अुघड आहे. त्यांस वेडेचार ठरविणे सोपे, पण तेच करणाऱ्या जगात राहावे लागणार आहे, हे मान्य करावे लागेल.

तो विचार केला तर ही सारी आजपर्यंतची जाणकार पिढी, यापुढे निरक्षर ठरू शकते. त्यांच्या कर्त्या काळात खेडोपाडी अशी कित्येक जनता होती की, ज्यांना मिळालेले पत्र वाचून घेण्यासाठी  शाळामास्तरकडे जावे लागत असे. आता क्रॅशलेसचा व्यवहार आपल्यासाठी करून घेण्यास तोच पर्याय आहे. मोदींची नोटबंदी किंवा नव्या योजनेत काही गफलत असू शकते, ती समजणेही तसे सोपे नाही. नव्या नोटा छापून आल्यावर त्या परस्पर काही धनदांडगटांकडे  रवाना करण्यात मोठ्या बँकांचेच अधिकारी सामील होतील अशी कुणी कल्पना केली नसेल. नव्या युगाची ती नवी देणगी आहे. शाळामास्तर किंवा बँकेचे साहेब ही आजवर विश्वासार्हतेची मानके होती. आता हे बदल अंगवळणी पडले पाहिजेत. तरीही या नव्या चालचालणुकीत काही चुका संभवत असतील तर त्यासाठी अभ्यास करून त्या मांडायला हव्यात. अुगीच चडफडाट करत राहिले तर मग त्याचे साम्य काँग्रेसच्या अुपाध्यक्षांशी राहील.

नोटबंदीसंबंधाने अेक बाब ध्यानात येण्याजोगी आहे, ती अशी की - शाळा कॉलेजातल्या पोरांना आणि खेड्यांतल्या बाजारकरूंनाही त्या घटनेचा काहीही त्रास झाल्याचे जाणवत नाही. पुष्कळांचे तर असेही मत आहे की, जरी आज थोडा त्रास झाला तरी असे कठोर काही पाअूल अुचलण्याची गरजच होती. -तर काहींचे म्हणणे असे की, या निर्णयात काही चूक झालेली असेलही पण तो अेक प्रयोग आहे, तो चुकू शकला तरी त्यामागील विचार, क्षमता आणि गरज मुळीच कमी लेखू नये. पण पुष्कळांच्या बाबतीत असे असावे की प्रत्यक्षात त्या घटनेशी काही संबंधच येत नसताना, त्याबाबत  `ठोकून देतो अैसा जे...'या रूपाच्या प्रतिक्रिया प्रकट होत आहेत.

नोटाबंदी असो किंवा नव्या विनिमयाच्या पध्दती असोत, त्या ज्यांना सहजसोप्या वाटतील ते त्या अनुसरणारच आहेत. ज्यांना ते जमणार नाही त्यांनी दुसऱ्यांचा आधार व मदत घेतली पाहिजे. आणि तेही ज्यांना कठीण वाटेल त्यांनी या व्यवहारांच्या पल्याड आत्मचिंतनात मग्न राहणे भाग पडणार आहे. जग थांबणार नाही, आपण कुठे थांबायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न! आपला `राहुल गांधी' होअू नये अेवढी काळजी मात्र योग्य ठरेल. अेका महान परंपरेच्या पक्षाला मानणाऱ्या असंख्य भारतीयांना होणाऱ्या त्या वेदना आपल्या परिवारातल्या जनांना कुणी देअू नयेत, हे योग्य ठरेल.

देवाचं अस्तित्व 
       आईच्या पोटात दोन बाळं होती. दोन मुली जुळया, पोटात मस्त वाढत होत्या. तो गर्भाशय हेच त्यांचं जग; दोघींची एकमेकीस सोबत. दोघी जाग्या असल्या की गप्पा मारायच्या. पुन्हा झोपायच्या. गंमत म्हणजे प्रत्येकीचे विचार स्वतंत्र होते. एक होती आस्तिक अन् एक होती नास्तिक. आपण त्यांना सीता व गीता म्हणू.
एकदा गीता म्हणाली, ``काय ग?, नऊ महिन्यांनी इथून बाहेर पडावं लागतं म्हणे? आपलं आयुष्य संपतं का मग? तुला भीती नाही वाटत त्या प्रसूतीची?''
``छे छे'' सीता म्हणाली, ``मला वाटतं प्रसूतीनंतर एक आयुष्य असतं, आणि आपण जर इथं गर्भकोशात छान राहिलो, तर याहून सुंदर असं काहीतरी नंतर आपल्याला मिळेल!''
`` काहीतरीच काय बोलतेस! इथून बाहेर पडलं की आयुष्य संपणार. दुसरं आयुष्य वगैरे सर्व थापा आहेत'' गीता म्हणाली.
``मला नाही माहीत'' सीता म्हणाली, ``पण असं म्हणतात की तिथं खूप उजेड असतो. आपल्याला पाय हलवून दूरवर चालता येतं. आता नसलेल्या संवेदना अनुभवता येतात. तोंडानं बोलता येतं. स्वर्गच म्हणतात त्याला!''
  गीता म्हणाली,``हट् गं! चालणार म्हणे. मूर्खपणाच आहे. ही नाळ आपल्याला  आिथं शक्ती पुरवत असते; ती तर अेवढीशीच आहे. -तिला सेाडून कसं काय कोणी दूर जाअू शकेल?''
``माहीत नाही... पण मला वाटतं, या जगापलीकडे काहीतरी आहे. आिथल्यापेक्षा वेगळं! कदाचित तिथं आपल्याला या नाळेची गरजच नसेल.'' सीता.
गीता म्हणाली, ``अशक्य! अगं, तिथं जीवन आहे असं गृहीत धरलं तर तिथून कुणी परत कसं आलंच नाही? प्रसूती हाच तर या आयुष्याचा शेवट आहे. त्यानंतर फक्त अंधकार, शांतता, दुसरं काही नाही...''
``ते काही मला माहीत नाही'', सीता म्हणाली,``पण मला मनांतून असं वाटतंय की,तिथं आपल्याला आआी भेटेल, आणि ती आपली काळजी घेआील''
``आआी? तू आआीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतेस?'', गीता म्हणते,``कमाल आहे तुझी. आआी जर असती, तर ती आता कुठे आहे दाखव ना?''
``अगं आआी असतेच. ती आपल्या अवती भंवतीच असते. तीच तर आपल्याला जीवन देते. आपण आआीच्या अस्तित्वाचा, तिचाच तर अेक भाग आहोत. तिच्यावाचून आपण नसतो, आणि आपलं हे जगही नसतं.''
``मला नाही पटत'' गीता म्हणते, ''ती दिसत का नाही? म्हणजे ती नाही. असती तर दिसलीच असती''
``सीता म्हणाली, ``ती दिसत नसली तरी  तिचं अस्तित्व जाणवतं ना मला! अनेकदा मी शांत पडून असते आणि लक्ष देअून  अैकते, तेव्हा मला तिच्या अस्तित्वाची जाणीव होते.  कधी कधी तर मला तिचा आवाज दूरवरूून अैकू येतेेा. असं वाटतं की, ती माझ्याशीच बोलते आहे.''
``हो हो,'' गीता हसून म्हणाली, ``प्रसूतीनंतर तुला आआी भेटेल बरं, भेटेल! - आणि कदाचित तूही अेक दिवस आआी होशील.  झोप आता!''
मृत्यूनंतरचं जग आणि देवाचं अस्तित्व यांवर याहून सुंदर भाष्य मी  नाही वाचलं. म्हणून हे तुमच्यासाठी -
(डॉ.वेन डायर यांच्या लघुकथेचा स्वैर अनुवाद)
-डॉ.घन:श्याम वैद्य, घटप्रभा (जि.बेळगाव)
फोन नं. ०८३३२- २८७१०३२, २८६२६६    ए-चरळश्र-ज्ञहळ.१९३५%सारळश्र.लेा

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन