Skip to main content

23 jan 2017

न्यायमागणीलाही पायऱ्या असतात.
साधारण मनुष्याला न्यायालयाची पायरी चढण्याची भीती असते. आिंग्ररजाच्या काळात न्यायदेवतेच्या तराजूचा काटा त्या सत्तेच्या बाजूने झुकणारा होता, तरीही त्यास कायद्याचे राज्य म्हणण्याची अेक रीत होती, कारण ती आिंग्रजानेच पाडली होती. तरीही सामान्य जनता न्यायालयाच्या झेंगटात अडकवून घेण्यास फारशी राजी नसे. आज त्या समजुतीत बराच बदल झालेला आहे. साधारणत: कोणतेही सामुदायिक काम स्वत:च्या फायद्यासाठी किंवा प्रतिष्ठेपायी प्रशासकीय अडथळयात लांबवायचे असेल तर न्यायालयात सोडून देण्यात येते. त्यामुळे खटल्यांची संख्या भरमसाठ वाढते. न्यायाधीशांच्या संख्येपासून  तेथील टेबलखुर्च्यांपर्यंत सगळयाची कमतरता आहे, आपले सरन्यायाधीशही त्यासाठी टिपे गाळतात. तथापि अकारण न्यायाचा डोलारा निर्माण करण्याने ही लोकांवर अन्याय होत असतो. त्याअैवजी न्यायप्रक्रियेच्या प्रत्येक पायरीनेच चढत गेले तर न्यायालयांवरचा तांत्रिक व्यवस्थेचा ताण कमी होअून सामाजिक न्यायही प्रस्थापित होअू शकेल.

आपल्या कुटुंबातील साधीसाधी प्रकरणे वडीलधाऱ्यांकडे मांडली पाहिजेत आणि ती त्यांनी सोडविलीही पाहिजेत. त्याविषयी आजकालच्या कौटुंबिक संमेलनांतही अुच्चार होत नाही. मग परिस्थिती पार टोकाला गेली तर न्यायालयात जावे लागते. तिकडेही अेका अलिप्तपणे पाहात राहण्याची रीत आहे. सार्वजनिक व्यवहारांतही अशा टप्प्या टप्प्यांची पध्दत अनुसरली तर फायदेशीर ठरते. गावातला रस्ता नादुरुस्त झाला तर नागरिक म्हणून त्याबद्दल न्याय मागण्याची सोय आहेच, पण त्याआधी गावातल्या रस्त्यांसंबंधीच्या व्यवस्थांकडे दाद मागावी लागेल, वरच्या वरच्या स्तरांवर तक्रारी व पाठपुरावा करावा लागेल. शेवटचा अुपाय म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे जरूर आहे. पण अूठसूट कोर्टबाजीचा स्टंट लोकाकर्षणासाठी करू नये. आजकाल जनहित याचिकांचे शब्दश: पेव फुटले आहे, त्याआधी बरेच नियम व कायदे वापरून व्यवस्थांवर अंकुश ठेवता येतो.

त्याकरिता लोकशाहीला आवश्यक असणारा संवाद-समन्वय अनुसरावा लागतो.  आधीच्या पायऱ्या टाळून कोर्टात जाण्यानेही अनेक प्रश्न निर्माण होअू लागले आहेत, आणि त्या प्रश्नांच्या गुंत्यात लोकहित रखडते आहे, याचे भान त्या याचिका करणाऱ्यांनाही असले पाहिजे. कोर्टात खटला घालणे म्हणजे फारतर आपल्या कामगिरीचा बभ्रा होअून चांगली प्रसिध्दी होते, प्रश्न पिचतच सुटतात. सामान्य लोक त्या नादाला लागत नाहीत पण नेतृत्व करणाऱ्यांना तोच नाद लागतो. असे वाटते. याशिवाय कोण्या न्यायालयाने दिलेल्या निकालाने यांचे समाधानही  होत नाही. निकाल जर विरोधी गेला तर न्यायावरच टीका सुरू होते, हे तर फार गंभीर आहे. न्यायासनांवर अयोग्यतेचा आक्षेप असेल तर त्या बाजूला वळावेच कशाला? काही वेळेला न्यायालये देतात तो निर्णय अन्यायी असू शकतेा, पण तो मान्य करून हल्लीच्या भाषेत `जनतेच्या न्यायालया'त जाअून काम करण्यास त्यांना कोणी अडवत नाही. या बाबतीत माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू हेही अपवाद नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्यांनी तर सर्वोच्च न्यायालयाच्या अेका निकालावर आपल्या फेसबुक पोस्टवर टीका केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयीन बेअदबीचा खटला घातला, आणि त्यांना माफी मागावी लागली. देशाच्या न्यायाधीशांवर न्यायासनाच्या बेअदबीची नोटीस जारी करावी लागावी हे आितिहासात पहिलेच प्रकरण असेल.

हाच प्रकार पूर्वी मेधा पाटकर, अरुंधती राय या `सामाजिक' नेत्यांबाबत घडला आहे. अण्णा हजारे यांनीही तोच मार्ग धरला. अलीकडे शरद पवार - अजित पवार यांच्यासह आितर नेत्यांनी सहकारी कारखानदारीची वाट लावली म्हणून अण्णानी जनहित याचिका दाखल केली. अण्णांचा आरेाप खरा की खोटा याचा निर्णय लोकांनी केलेला आहेच. पण  कोर्टात जाअून भांडण्याने काय साधेल? आरोपीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यांनाही न्यायव्यवस्था ठाअूक आहे. अण्णांची याचिका कोर्टाने दाखल करून घेतली नाही. कोर्टाने म्हटले की, न्यायालयात येण्याआधी कायद्याने आखून दिलेली प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे. त्यातील पहिला टप्पा तक्रार दाखल करण्याचा आहे. पोलिस किंवा कोणत्याच यंत्रणेकडे तक्रार न करता अेकदम याचिका दाखल केली आहे. त्यामुळे `तशी तक्रार आधी दाखल करण्यात येआील' असे अण्णांकडून कोर्टाला सांगावे लागले.

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनाही अुच्च न्यायालयाने तेच सांगून परत पाठविले. बनावट कागदपत्रांच्या आधारे तंत्रनिकेतने सुरू करणाऱ्या ३४६ संस्थांविरोधात कारवाआी करण्याची मागणी त्यांनी जनहित याचिकेत केली होती. त्यांचा तो आरोप खरा असेलही, पण त्याविरुध्द दाद मागण्यासाठी प्रारंभिक पायऱ्या आहेत. त्यांनी आधी पोलीसांत तक्रार केली का; ते आमदार आहेत तर विधानसभेत प्रश्न विचारला का; असे प्रश्न विचारत न्यायालयाने त्यांना आधी त्यांची ती कर्तव्ये पार पाडावीत आणि नंतर दुसऱ्याकडून कायदापालन करण्याची अपेक्षा करावी असे सांगितले. `जनहित याचिका दाखल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यात आधी पोलीस तक्रार करणे आवश्यक असते. ती प्रक्रिया डावलून थेट जनहित याचिका कशी केली जाअू शकते?' असा सवाल यासंदर्भात न्यायालयाने केला आहे.

मुंबआीच्या अुपनगरी गाड्यांमध्ये असलेल्या अपंगांसाठीच्या डब्यांतून रेल्वे कर्मचारी प्रवास करतात, याबाबत नितिन गायकवाड या जागरूक प्रवाशाने अपंग आयोगाकडे मागणी केली होती, त्यानुसार योग्य सुविधा देण्यात आल्या पण त्यांचा फायदा रेल्वेचेच लोक घेत असल्याची तक्रार होती. रेल्वेचे पोलीस अशा कर्मचाऱ्यांनंतर केवळ समज वा तंबी देअून सोडून देतात हेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. अपंग आयोगाने रेल्वे प्रशासनास ज्या सूचना केल्या होत्या, त्यांची अंमलबजावणी तीन वर्षांतही केली गेली नाही;  त्याविरुध्द गायकवाड यानी अुच्च न्यायालयात दाद मागितली. रेल्वे प्रशासनास आक्षेपाची कबुली द्यावी लागली.

न्यायमूर्ती काटजू, अण्णा हजारे, संजय केळकर किंवा प्रशांतभूषण वगैरे नेहमीचे कलाकार या कोणी सामान्य असामी नव्हेत. आपल्याकडे कायदे नियमांचे पालन केले जात नाही, कारण त्या शस्त्रांचा अुपयोग कसा करायचा हे नागरिकांना माहीत नाही. ते आपल्या कामांतून शिकविण्याची जबाबदारी या मोठ्या माणसांचीच आहे. घरातला अुंदीर माण्यासाठी बंदुकीचा अुपयोग करण्याने शेजारी गलका होआील, पण बंदूक सर्वाना अुपलब्ध नसते. आणि बंदुकीचा वापर जिथे करायचा असतो, ते गैर प्रकार चालूच राहतात. त्याअैवजी  सामान्य गुन्ह्यांच्या विरोधी लढण्याचे प्रशिक्षण आणि तसे नैतिक बळ अशा प्रतिष्ठितांनी आपल्या अुदाहरणांतून मिळवून द्यायला हवे. स्टंटगिरीतून ते मिळत नाही, तर त्यांच्या केवळ अक्षमता अुघड्या पडतात.

माणूस काम का करतो?
वडिलांना रोज कामाला जाताना पाहणाऱ्या एका लहानग्या मुलानं त्यांना विचारलं, ``बाबा, तुम्ही कामाला का जाता?''
प्रश्न अगदी साधा, सरळ. पण एका मूलभूत मुद्याला हात घालणारा. ``माणूस काम का करतो?''
सर्वप्रथम कारण म्हणजे मोबदला किंवा पगार. त्यावर संसार चालणार, व्यवस्थित जगण्यासाठी पैसे कमवणं जरूरच आहे.
दुसरे कारण म्हणजे कामात मन गुंतले, तरच माणूस समाधानी असतो. नाहीतर आयुष्य कंटाळवाणं होईल. ``काम तीन गोष्टींपासून आपला बचाव करतं-कंटाळा, व्यसनं आणि उपासमार.'' ``रिकामं मन, सैतानाचं घर''.
काम नेहमी कष्टाचं असतं. कधी शारीरिक तर कधी मानसिक कष्टाचं.
काम करण्यामुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळते, शिस्त लागते. कामाचं बंधन असल्यामुळे वेळेवर उठण्यापासून झोपेपर्यंत आपण वेळापत्रकाला धरून आयुष्य जगतो. कामाचा ध्यास असल्यामुळे कामे सुरळीत होतात. निवृत्त झाल्यावर दिशाहीन वाटू लागतं. नवीन काम शोधावं लागतं.
आपण काम करतो, तोवर आपण तरुण व उत्साही असतो. काम थांबवलं तर म्हातारपण लवकर जवळ येतं.


दोन बायका फजीती अैका

मी १९७२च्या जानेवारीत छापखाना सुरू केला. त्याआधी मी दुसरा कोणताही छापखाना पाहिलाही नव्हता; म्हणजे त्या धंद्याची माहिती वगैरे असण्याचा प्रश्नच नाही. पुण्याला जाअून ट्न्ेडल मशीन वगैरे खरेदी करण्यासाठी रमेश हुपरीकर नावाच्या अेका अनुभवी कामगाराची मदत मला झाली. मशीनचे पेटारे येअून पडले, घरामागच्या छपरात सारी जुळणी करून मशीन जोडले. लाकडी  केसीसच्या घरांमध्येे टाआीप भरून घ्यावा लागायचा. मशीनसोबत केवळ १२पॉआिंटचा अेकच टाआीप आलेला होता, बाकीच्या प्रकारांतील टाआीप नंतर येणार होते.

धंदा सुरू करण्यात जी भीती, धाकधुक, काळजी, दबाव वगैरे असते ते सगळे मनात घेअून आम्ही संध्याकाळची सुटी केली. तीन्हीसांजा होत आल्या, आणि डॉक्टर आठवले आमच्या घरी आले. त्यांना मी प्रेस सुरू करीत असल्याचे कळले होते, आणि त्यांच्या कन्येच्या लग्नाच्या पत्रिका त्यांना छापून हव्या होत्या. आधी त्यानी सांगलीहून `चांगल्यातल्या' पत्रिका आणल्या होत्या, पण कमी पडल्यामुळे त्यांना अेका रात्रीत १०० पत्रिका छापून पाहिजे होत्या. आली पंचाआीत. माझ्या सोबत माझा अेक भाअू आनंद लेले होता. आम्ही दोघांनी  अवसान आणले, आणि पत्रिकेचा मजकूर जोडायला घेतला. अुलटी अक्षरे निरखून पाहात अेकेक शब्द जोडत होतो, त्याला कंपोजिंग म्हणायचे. बऱ्याच वेळाने सारी पत्रिका जोडून झाली, ती मशीनला लावून कमी स्पीडवर ती अेकेक करत छापली, आणि रात्री साधारण दीड दोनला आमचे काम संपले. डॉक्टर मजकूर सकाळी आले, त्यांचे काम कसे का असेना, त्यांच्या वेळेत झाल्यामुळे ते खूश!

कोणताही अनुभव आणि माहिती नसताना आम्ही ती खटपट यशस्वी केली होती. पण `खास' संवादशैलीने त्याबद्दल माझे वडील आणि काका म्हणाले, ``हो. ते ठीकच झाले, कारण ते सारे काम अुलटेच करायचे असते ना; ते तुम्हाला जमणारच!'' हे असले प्रोत्साहन!! ...त्या काळात लग्नपत्रिकांची छपाआी हा अेक मोठाच व्यवसाय होता. आमच्या छोट्या गावातल्या या प्रेसमध्ये आम्ही अेका दिवसाला २५-३० लग्नांच्या निमंत्रणपत्रिका छापू लागलो. दूरदूरच्या गावांतून लोक येत. आमची त्या बाबतीत `माष्टरी' झाली. आमचे वळण बसले.

जवळच्या अेका गावातले गबरू पाटील अेकदा आले. त्यांच्या पोराचं लग्न होतं. चांगल्या भारीपैकी तीन हजार पत्रिका छापायच्या होत्या. सारा माहौल खुशीचा आणि तालेवारीचा होता. स्वत:च्या जीपगाडीतून स्वारी आलेली. शिस्तीनं पत्रिकांची निवड झाली, मजकूर ठरला. साऱ्या गणगोताची नावं `अपले नम्ब्र' म्हणून त्यांनी  नमूद केली, ती आम्ही लिहून घेतली. पाटील अैटीत निघून गेले. पुढच्या दोन तीन दिवसांत त्यांचे काम तयार झाले. तीन हजार पत्रिकांचे गट्ठे तयार ठेवले. ते न्यायला पाटील आणखी तीनचार `जवान पोरां'सह जीप घेअून आले. च्यापानी झाल्यावर, रिवाजापरमानं जरा कमी जास्त करून पैसे दिले, आणि सारे गट्ठे जीपमध्ये भरून पाटील वाटेला लागले.

दुसऱ्या दिवशी ते सारे गट्ठे घेअून हे पाटील परत दारात आले, ते जरा चडफडत. `च्या मारी त्येंच्या...' हे सगळं अैकवत त्यांचा घोळ त्यांनी सांगितला. त्यांना दोन बायका होत्या; अेक अधिकृत आणि दुसरी अर्थातच....! पत्रिकेत जी  नावं  घातली होती, त्यात त्या `दुसरी'चं नाव साहजिकच नव्हतं. पण त्यामुळं ती रागावली, चिडली, खवळली म्हणे. `आता त्यावर काहीतरी युक्ती सांगा...'  म्हणून पाटील परत आले होते. त्यांच्या `अेक नंबरच्या खाली थोडी जागा (स्पेस) होती, तेवढ्यात ते नाव बसतं करून घेअूया असा मार्ग काढला, आणि पाटील तो गट्ठा ठेवून गेले. त्यावेळी मशीनला कागद लावताना हातानं लावावा लागे. पण आमच्या कामगारानं कौशल्यानं त्या बाआीसाहेबांचं नाव तेवढ्या दाटीनं छापून दिलं. पाटील दुसऱ्या दिवशी आले, आणि तेवढ्या दुरुस्ती कामावर खूश होअून काम घेअून गेले.

पुढच्या दिवशी ते लटांबर पुन्हा आमच्या दारी हजर! `सगळा घोळ त्यच्यायला...' म्हणत साऱ्या पत्रिकांचा ढीग आमच्यापुढं टाकला. त्या `दुसरी'चं नाव स्वत:बरोबर छापल्यामुळं आता पहिली संतापली होती. आता त्यावर काही युक्ती काढा... मग सगळया गोतावळयाची नावं वेगळया रीतीनं छापायचा सल्ला आम्ही त्या `बिचाऱ्या'ला दिला. `सौ.व श्री.अमुकराव पाटील' असं लिहूया, म्हणजे कुणा बायकांचं नाव घालायलाच नको. ``है शाब्बास.. आयला बामनं डोकीबाज...!'' असं म्हणत पाटलानी मान डोलावली, आणि पुन्हा नव्या तीन हजार पत्रिका छापायच्या ठरल्या. आम्ही अर्थातच हे दुप्पट काम आनंदानं स्वीकारलं आणि दोन दिवसांत ते देण्याचा वायदा केला.

हसून निरोप घेताना पाटील म्हणाले, ``तुमाला चानस घावला राव. तिप्पट धंदा झाला.''  आम्ही काय करणार? आधी  घोळ तर त्यांनीच करून ठेवलेला होता, पण त्यांच्या त्या रंगेलपणामुळं  नकळत आम्हाला जास्तीचा धंदा मिळाला हे खरंच की!!

माझा रोमांचक(थ्रिलिंग) क्रॅम्प
सोलापूरच्या सुयश गुरुकुल येथे मी पाचवीत आहे. त्या शाळेत नेहमी काहीतरी वेगळे सुरू असते. गेल्या महिन्यात माझी शाळा नेहमीसारखी मस्त सुरू होती. पण मधेच एक स्पीड ब्रेकर आला. तो म्हणजे परीक्षा. अभ्यास आणि जास्तीत जास्त मार्क पाडण्याची तयारी चालू होती. तीन दिवसात चार विषयांची परीक्षा झाली, आणि त्याचवेळी आम्हाला एक नोटीस मिळाली आमचा एन् सी सी प्रकारचा क्रॅम्प होणार असल्याची. सहावी ते नववीच्या मुलांना आठ दिवस, तर आम्हा पाचवीच्या मुलांना ३ दिवस क्रॅम्प होता. मला क्रॅम्प ही `गूड न्यूज' पण होती आणि `बॅड न्यूजपण! आई बाबांना सोडून तीन दिवस राहावं लागणार होतं.....
क्रॅम्पमध्ये जाण्याचा दिवस जवळ आला तसे माझे प्रश्न चालू झाले.. मी राहू शकेन का? आई - बाबा शिवाय झोप येईल का?.. बाबा सांगत होते सारखं, ``अरे मजा असते, तुला आवडेल;'' पण मला काही पटत नव्हतं. शेवटी बाबानी नेहमीप्रमाणे मला समजावलं. थोडं पटलं, पण मनात थोडी भीती घेऊन मी बॅग भरली. सतरंजी, पांघरूण, ताट वाटी, कपडे हे सगळं! ठरल्याप्रमाणे मला शाळेत क्रॅम्पसाठी सोडले.
तिथे बॅग ठेवून मित्रांबरोबर जेवण केले. त्यानंतर आमची खोली आम्हाला दाखविली. थोडी विश्रांती मित्रांशी गप्पा झाल्या. मग चार वाजता चहा - ब्रेड नाश्ता झाला.
मग आम्ही तयार होऊन ग्राऊंडवर गेलो. तिकडे वेगळीच मज्जा होती. आम्हाला घोडे सवारी मिळणार होती. मी खूप खूश झालो. मी घोड्यावरून एक चक्कर मारून आलो. संध्याकाळ कधी झाली कळलीच नाही. आम्ही हातपाय धुवून आलो. जेवण झाले. मग आम्हाला `दंगल' हा कुस्ती खेळाडूचा सिनेमा दाखवला. मला तो खूप आवडला. रात्री आम्हाला दूध आणि राजगिऱ्याचा लाडू दिला. ते खाऊन आम्ही खोलीत अंथरूण घातलं आणि झोपलो. दमल्यामुळे झोप तर लागली, पण थंडी अशी काय वाजली, काय सांगू....
पहाटे चार वाजताच जाग आली. आम्हाला उठवायला शिपाईकाका आले होतो, थंडीमुळं बाहेर नको वाटल्याने सगळयांनी त्यांच्यावर राग काढला. आवराआवर करून आम्ही तयार झालो. मग वेळ होती ध्यान करण्याची. ध्यान करून आम्ही लांब पळायला गेलो. तिकडे जाऊन एका मंदिरात थांबलो. पुढे कुठं कुठं जायचंय, काय काय करायचं ते सांगितलं गेलं. त्यानुसार हॉर्स रायडींग, रायफलींग, रोप क्लायंबिंग इ. सगळं केलं. खूपच मज्जा आली. मला सगळंच नवीन होतं. परत शाळेत आलो, नाश्ता केला, मग आमच्या खोल्यामध्ये लपाछपी खेळलो. त्यानंतर मला सरप्राईज मिळालं, तेे होतं स्नेक शो. (सापांचे खेळ) त्यामध्ये आम्हाला नाग, कुकरू आणि इतरही बरेच साप दाखविले आणि त्यांची माहिती दिली. बहुतेक साप माणसाला उगीच चावत नाहीत, तर ते उपयोगी असतात ही गंमतच.
जेवण आणि विश्रांती घेऊन पुन्हा आम्ही ग्राऊंडवर आलो. तिकडे आम्हाला पुन्हा हॉर्सरायडिंग करायचे होते. आमच्या सरांनी सोलापुरातील सगळयात चांगले घोडे आणवले होते. त्यातल्या फास्टेस्ट घोड्यावर बसायचा मला चान्स मिळाला. थोड्या सरावानंतर मला एकट्याला राईड करायला मिळाली. मला खूपच भारी वाटलं. संध्याकाळचं जेवण करून एकत्र क्रॅम्पफायरचा (शेकोटी) कार्यक्रम होता. गाणी, टाळया असं सगळं धमाल चालू होतं. त्यातचं झिंगाट गाणं लावलं आणि मुलं जी काय नाचली.... भयानकच..... ते सगळं आठवूणच रात्री झोपी गेलो.
सकाळी पुन्हा चार वाजता उठून आवराआवर केली. आज घरी परत जायचं होतं, म्हणून मग सामान आवरून ठेवलं. ध्यान आणि नाश्ता करून ग्राऊंडवर आलो. आज परेड होणार होती. सहावी ते नववी जी मुलं आठ दिवस राहिली होती, त्यांना ही परेड शिकवली होती. मला ती परेड पाहताना मस्त वाटत होतं. मी पण जागेवरच परेड करत होतो. त्यानंतर समारोप कार्यक्रम होता. सोलापुरच्या पोलिस अधीक्षक चौगुले बाई आल्या होत्या. त्यांना पाहून मला माझ्या गुलूआत्याची (यशोधरा गोडबोले-आपटे) आठवण झाली. ती पण अशीच पोलिस ऑफीसर आहे. सगळयांनी आमचे कौतुक केले. क्रॅम्प संपला. आई बाबा न्यायला आले होतेच. त्यांना पाहून आनंद झाला. त्यांच्याबरोबर घरी आलो.
`झोप तरी कशी लागेल क्रॅम्पमध्ये' अशी भीती घेऊन मी गेलेलो, `पुढच्या वर्षी आठ दिवस राहायला मिळणार' या आनंदात परत आलो. माझा क्रॅम्प म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या वयातील मस्त दिवस, मी अनुभवले.
            -Anurag Aditya Apte, Solapur
           



शक्ती वाढविण्यासाठी सराव हवाच
कौशल देशात विक्रमगुप्त राजा राज्य करीत होता. जनता सुखासमाधानाने राहात होती.देशाचे कोष संपत्तीने भरलेले होते. शेजारी महाकुंडल नावाचे राज्य होते. तेथील राजा विचित्रसेनाची नजर कौशल देशाच्या संपत्तीवर होतीच. त्याने अचानक कौशल देशावर आक्रमण केले. विक्रमगुप्ताने आपले सैन्य जमा केले व तो विचित्रसेनाशी लढण्यासाठी सीमेवर गेला. दोन्ही सैन्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. विक्रमगुप्ताला शत्रूच्या सैनिकांनी मारलेले चार बाण लागल्याने तो बेशुद्ध  झाला. त्याच्या सेनापतीने त्याला रथात घालून पिछाडीला आणले.  महाकुंडलच्या सैन्याचीही बरीच हानी झाल्याने त्यांनी माघार घेतली.
    विक्रमगुप्त राजाला त्याच्या महालात आणले गेले. योग्य औषधोपचारांनी तो शुद्धीत आला. काही दिवसांनी हिंडूफिरूही लागला. आपण युद्धात बाण लागून बेशुद्ध झालो ही गोष्ट त्याला खटकत राहिली. त्याने राजगुरू संघमित्र यांना आग्रह केला की, `असे काहीतरी करा ज्यामुळे मला युद्धात जखमा होणार नाहीत व माझ्यावर अशी लाजीरवाणी वेळ येणार नाही.' राजगुरूंनी त्याला एका शक्तीमंत्राचा जप करण्यास सांगितले. काही औषधे, व्यायामही करायला सांगितले. युद्धाचा विविध प्रकारचा कठोर सराव करायला भाग पाडले.
काही महिन्यांनंतर महाकुंडलच्या सेनेने परत हल्ला केला. यावेळी त्यांचे सैन्य संख्येने जास्त होते. विक्रमगुप्ताचे सैन्यही यावेळी तयारीत होते. घनघोर लढाई झाली. विक्रमगुप्त स्वत: आघाडीवर राहून युद्ध करत होता. यावेळी त्याला विश्वास होता की शक्तीमंत्राच्या प्रभावाने त्याला जखमा होणार नाहीत. पण काही वेळातच महाकंुडलच्या एका सैनिकाने सोडलेला बाण त्याच्या पायात घुसला. विक्रमगुप्ताने तो बाण काढून तेथे आपला शेला बांधला व परत त्वेषाने लढाईला सुरुवात केली. युद्धाचे पारडे कधी इथे तर कधी तिथे झुकत होते. विक्रमगुप्ताला अनेक जखमा झाल्या पण त्याचा आवेश कमी झाला नाही. त्याचा पराक्रम पाहून त्याच्या सैनिकांनीही शौर्याची पराकाष्ठा केली. अखेर महाकुंडलच्या सैन्याचा पराभव झाला.
जखमी झालेला विजयी विक्रमगुप्त राजधानीत परत आला. राजगुरू त्याला भेटायला आले तेव्हा त्याने विचारले, ``गुरूजी, मी तुमच्याकडे अशी मागणी केली होती की मला युद्धात जखमा होणार नाहीत अशी काहीतरी योजना करा. पण प्रत्यक्षात मी गेल्या वेळपेक्षा जास्त जखमी झालो आहे. नक्की काय गडबड झाली?''
राजगुरू म्हणाले, ``हे राजा, तुला हेच शिकायचे आहे. गेल्या वेळी अवघे चार बाण लागून तू बेशुद्ध झाला होतास. यावेळी तीस-चाळीस जखमा होऊनही तू युद्ध करत राहिलास. शत्रूला पराभूत केलंस. युद्ध करणे हे राजा म्हणून तुझे कर्तव्य आहे. तो तुझा धर्म आहे. युद्धामध्ये जखमा होणारच. तुला बाण लागणं कुणीच थांबवू शकत नाही. पण तुझी जखमा सहन करण्याची ताकद वाढवू शकतो, ती योजना मी केली. तूही त्यानुसार मेहनत घेतलीस आणि तू विजयी झाला आहेस.''
कुटुंब, व्यवसाय, समाज पातळीवर वेगवेगळी लहानमोठी अप्रत्यक्ष अशी शारीरिक, मानसिक युद्धे लढावी लागतात. आपण अशी अपेक्षा करू शकत नाही की जखमा न होणारे आपले आयुष्य खूप सुरळीत असेल; कोणतेही त्रास नसतील! आपण आपल्यातली शक्ती एवढी वाढवली पाहिजे की जे समोर येईल त्याला समर्थपणे तोंड देता यावे.
-रोहित महादेव साने (`माधवबाग'चे आरोग्य संस्कार) 


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन