Skip to main content

8June2015

महाराष्ट्न्भूषणचं राजकारण
- डॉ.सागर देशपांडे, पुणे
`आपल्या स्वत:जवळ विचार करण्याची क्षमता असेल, तरच मतस्वातंत्र्याच्या हक्काला काहीतरी अर्थ असतो.' - एरिक फ्रॉम
प्रा.नरहर कुरुंदकर यांच्या गाजलेल्या `जागर' या पुस्तकाच्या पानावर त्यांनी हे अवतरण दिलं आहे. सांप्रत काळी महाराष्ट्न् देशी ऐन वर्तमानकाळातही इतिहासातले पुरावे मागण्याचा, देण्याचा, मानण्याचा, ते पुरावे खोटे ठरविण्याचा वैचारिक(?) उद्योग फारच बरकतीत आला आहे. अवतरणातील शब्द न् शब्द महत्त्वाचा असला तरी त्याचा अर्थ आणि आशय बाजूला ठेवून या अवतरणाला आधी पुरावा द्या असं कुणी (पुरावा न देताच बोलणाऱ्यांनी) म्हणू नये. या अवतरणातील सर्व शब्द आणि त्यांच्यामागील आशयाची पुरेपूर खात्री पटावी असंच वातावरण जणू या महाराष्ट्नत निर्माण होतंय!
३० एप्रिल रोजी सायंकाळी महाराष्ट्नचे  सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे यांनी पुण्यात `महाराष्ट्न्भूषण' सन्मान जाहीर करण्याबाबत एक पत्रकार परिषद बोलावली मात्र `या सन्मानाची घोषणा स्वत: मुख्यमंत्रीच करतील' असे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्नतील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि प्रतिभावंत लेखक, शिवचरित्राचे भाष्यकार असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यंदाचा `महाराष्ट्न् भूषण' सन्मान जाहीर करावयाचा होता. परंतु या निर्णयाची घोषणेआधीच कुणकुण लागलेल्या काही मंडळींनी या निर्णयाविरोधात निदर्शने सुरू केल्यामुळे सांस्कृतिक मंत्र्यांना या घोषणेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे देण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याच रात्री मुंबईतून या सन्मानाची अपेक्षित घोषणा केली आणि बाबासाहेबांबरोबरच ज्या निवड समितीने एकमताने त्यांचे नाव निश्चित केले त्या विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केले.
९३ वर्षे उलटलेली आणि आयुष्यातली ७५ पेक्षा अधिक वर्षे `शिवचरित्र'-इतिहास या एकाच विषयासाठी सर्वार्थाने देणारी आदरणीय व्यक्ती म्हणून, बाबासाहेबांची निवड जाहीर होताच चोहो बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या असामान्य योगदानाची माहिती आणि महती शिवचरित्राच्या रूपाने तीन-चार पिढ्यांमध्ये ज्यांनी पेरली, रुजवली अशा शिवशाहिरांना (उशिरा का होईना) महाराष्ट्न् शासनाने हा सन्मान जाहीर केल्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या मनात आनंद दाटून आला. कर्तृत्वाची परंपरा आधी घालून देणाऱ्या आणि सर्वार्थानं पुढं नेणाऱ्या शिवशाहिरांचे नाव येताच यापूर्वीच्या `महाराष्ट्न्भूषण' सन्मानप्राप्त मान्यवरांनाही खूप आनंद झाला. फडणवीस सरकारने आपल्या कारकीर्दीतील हा पहिलाच सन्मान शिवशाहीरांना जाहीर करून त्यांच्याबद्दलचा आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली.
त्याचवेळी काही `ठराविक' मंडळींना राज्यसरकारच्या अधिकृत समितीचा हा एकमुखी निर्णय रुचला नाही. त्यांनी नाराजी व्यक्त करण्याचे सनदशीर मार्ग सोडून मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि शिवशाहिरांवर व्यक्तिगत चिखलफेक सुरू केली. जिल्हावार निषेधाच्या आंदोलनांचे नियोजन झाले, त्याला उत्स्फूर्ततेची भर देण्याचाही प्रयत्न झाला. त्यातूनच पुन्हा लेनच्या पुस्तकावरून महाराष्ट्नत (मूळ प्रश्न बाजूला ठेवून) उठवण्यात आलेल्या राजकारणाच्या आणि त्या आधारे जातीय समीकरणाच्या बेरजा-वजाबाक्या करून साधावयाच्या अनेक गोष्टींचा दुसरा भाग सुरू व्हावा यासाठीच चालना देण्याचा प्रयत्न झाला. १९५७ साली बाबासाहेबांनी छापून प्रसिद्ध केलेल्या `राजा शिवछत्रपती' या महाग्रंथावर आक्षेप घेण्याचे प्रकार याच परिस्थितीतून पुढे आले. मूळ वाक्यांची आपल्या (विकृत)मनोवृत्तीनुसार आणि सोयीनुसार मोडतोड करून मूळ लेखनपुष्टीसाठी दिलेले संदर्भ, तळटीपा, अन्य संदर्भ साधने यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत, पुरेसा अभ्यास न करताच या सर्व परिस्थितीला जातीय राजकारणाचे वळण देण्याचा प्रयत्न सुरू झाला. `जाणत्या' राजकारण्यांनी मागे राहून, हे वातावरण धगधगत ठेवून त्यावर आपल्या राजकीय पोळया भाजण्यातच आपली बुद्धी अन् शक्ती खर्च केली की काय? त्यातूनच महाराष्ट्नची गेल्या काही वर्षांची राजकीय वाटचाल झाली! पण जाती-पातींच्या आडून सत्तेचे राजकारण खेळणाऱ्यांचे प्रयोग गेल्या वर्षभरातील निवडणुकींत जनतेनेही रद्द करायला लावले. सत्ताबदल झाले. बदललेल्या परिस्थितीचा आणि सत्तासमीकरणांचा काही झालं तरी आपल्यालाच लाभ झाला पाहिजे, या मूळ भूमिकेतून एरवी धर्मांध-जातीय-ब्राह्मणी अशी टीका ज्यांच्यावर केली जाते त्या भाजपाला न मागताच पाठिंबा मिळू लागला. काहीजणांना आपण केलेल्या गैरव्यवहारांच्या, भ्रष्टाचाराच्या फायली  तूर्तास बाजूला ठेवल्या जातील असा दिलासा मिळू लागला.
अर्थात् तरीही मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्यासंबंधी शेरेबाजी करण्याची संधी त्यांच्याच पक्षातले आणि विरोधकांमधलेही म्होरके सोडत नव्हते. दुर्दैवाने आता `महाराष्ट्न्भूषण' सन्मानाचा वाद उपस्थित करण्याची, तो वाढत राहावा आणि त्या आधारे तरी पराभवानंतरच्या जखमांवर चोळले जाणारे मीठ बाजूला करून खपली धरण्याची वाट पाहणाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थी, संकुचित, विकासविरोधी मतलबी राजकारणासाठी पुन्हा महाराष्ट्नच्या समाजमनाला असलेली जातीयवादाची जुनी जखम भळभळतीच राहावी असे प्रयत्न सुरू केले.
असे राजकारण करणाऱ्यांना काही काळानंतर का असेना, महाराष्ट्नतील सुबुद्ध, सर्वसामान्य जनता  ठोकरून देते या वास्तवाची जाणीव तरी या म्होरक्यांना आता व्हायला नको का? पण द्वेषावरच आधारित जीवनप्रवासाला लागलेल्या मंडळींना आणि अविवेकी बोलणाऱ्यांना हे कोण समजावून सांगणार?
या संदर्भात प्रसिद्ध लेखक आणि महात्मा फुले यांच्या चरित्र खंडांचे संपादक प्रा.हरी नरके म्हणतात की, `समितीने एकमताने लोकशाही पद्धतीने घेतलेला निर्णय मानायचा की नाही? निर्णयाचे सर्वाधिकार बाहेरील व्यक्ती किंवा संघटनांना द्यायचे काय? त्यांनी ज्यांना आपल्या संघटनांचे ...भूषण पुरस्कार दिलेले आहेत त्यांनीच बाबासाहेबांचे नाव `महाराष्ट्न् भूषण'साठी सुचवले असेल आणि त्याला अनुमोदनही बहुजन सदस्यानेच दिलेले असेल, तरीही बाहेर गदारोळ केला जात असेल तर पडद्यामागील आणि उघडपणे चाललेले राजकारण व संगनमत लोकांसमोर कोण मांडणार?'
`बाबासाहेब पुरंदरे यांनी गेल्या ७० वर्षांत शिवचरित्र घरोघरी पोचवले, लोकप्रिय केले हे त्यांचे कार्य अमान्य करता येईल का?' असा प्रश्न नरके यांनी उपस्थित केला आहे. (प्रा.नरके यांची समतोल, वस्तुनिष्ठ आणि विवेकी भूमिका तपशीलातून वाचण्याजोगी असून ती हींींि://हरीळपरीज्ञश.लश्रेसीिेीं.ळप / २०१५ / ०५ /लश्रेस-िेीीं.हींाश्र येथे उपलब्ध आहे.)
सातारच्या राजमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातील स्नुषा सुमित्राराजे भोसले या मन:पूर्वक बाबासाहेबांच्या पाठीशी होत्या. माजी राष्ट्नध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्यासह समाजातल्या विविध क्षेत्रांतील मंडळींनी बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे. पुण्यातील डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाने श्री.शरद पवार यांच्या हस्ते इतिहासाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डी.लिट.हा सन्मान देऊन बाबासाहेबांचा गौरव केला आहे. १९५७ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या `राजा शिवछत्रपती' या महाग्रंथास महाराष्ट्न् शासनाने वाङ्मय पुरस्कार देऊन गौरवले होते आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या ग्रंथाच्या शासनातर्फे काही प्रतीही खरेदी केल्या होत्या. पंतप्रधान पं.नेहरू यांनी पोर्तुगीज सरकार विरोधातील खटल्यासाठी `गोवा युनिट' नावाची संशोधकांची जी समिती नेमली होती, त्यातही बाबासाहेबांनी काम केले असून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्न्पती झैलसिंग यांच्या रायगड भेटीच्या वेळी त्यांना माहिती देण्यासाठी महाराष्ट्न् शासनाने बाबासाहेबांनाच निमंत्रित केले होते.
इतिहास संशोधन आणि प्रतिभाशाली लेखन हा समतोल साधून जगभरातील शिवभक्तांपर्यंत शिवचरित्र खऱ्या अर्थाने पोचवणाऱ्या शिवशाहिरांबद्दल, त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल गदारोळ उठवायचा प्रयत्न करून तात्कालिक राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपण समाजाला कोणत्या दिशेने नेत आहोत याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. मतदारांनी अशांपैकी काहींना पाच वर्षे त्यासाठीच सुट्टी दिली आहे.
- डॉ.सागर देशपांडे, पुणे (मोबा.नं.९८५०८८५९३६)


उपजला भावो । तुझ्या कृपे सिद्धी जावो । ।
यंदाच्या ९ जुलैपासून देहू आणि आळंदीच्या मुख्य दिंड्या पंढरपूरच्या वारीस निघतील व त्यापुढच्या पंधरवड्यात सारा महाराष्ट्न् ढवळून निघेल. आजवरच्या रीती-पद्धती-समजुतीप्रमाणे ही ढवळणूक भक्तीमय असण्यात अयोग्य मानण्याजोगे काही नव्हते; किंवा योग्यायोग्यतेचा काही वाद-विचार करण्याजोगी परिस्थितीच नव्हती. आजच्या संदर्भात मात्र त्या, आणि त्यासारख्या सर्वच प्रथा-परंपरांचा पुनर्विचार,-किमान जाणत्या लोकांनी करायला हवा.

पंढरीचा विठुराया, त्याचे भक्तहृदयांतील स्थान, श्रद्धा, ज्ञानोबा-तुकोबांची शिकवण, महिमा इत्यादी सर्व भावनिक गोष्टी आहेत. या कारणाने इतकी माणसे एकत्र येतात-राहतात-चालतात, भेद बराचसा टाळतात, वेगळा अनुभव घेतात इत्यादी सर्व सामाजिक बाबी आहेत. पायी चालत राहण्यातून देश पाहावा-पर्यावरण पाहावे-निसर्ग अभ्यासावा-आजच्या भाषेतील ट्न्ेिंकग साधावे इत्यादी सर्व वैज्ञानिक कल्पनाही आहेत. शिवाय तुळशीवृंदावन माथी घेऊन धावण्याच्या स्पर्धा, वारकऱ्यांच्या फुगड्या, घोड्याचे रिंगण, भजन-कीर्तन इत्यादी विनोदनही आहे. व्यसनमुक्ती, स्वयंशिस्त, अप्रिय बोलण्याचा अभाव इत्यादी मूल्येही त्या दरम्यान सांभाळली जातात. पंढरीच्या वारीचा हा किंवा याहून काही वेगळा महिमा गेली कित्येक शतके ऐकला-ऐकवला जात आहे. तो नाकारता येणार नाही.

तथापि हा सकल महिमा असाच गात राहण्यातून नव्या समस्या, नवे दुष्परिणाम, आणि स्थिती यांच्याशी फारकत निर्माण होत असेल तर आधीचे सर्व पैलू क्षीण वाटू लागावेत, इतकी या भावरम्य भक्तीमार्गाची वाट आजच्या संदर्भात चुकल्यासारखी वाटते. जेव्हा कधी शेकडो वर्षांपूर्वी, संत-महंतांनी या भूमीत आणि सामान्यांच्या अंत:करणात पंढरीची वारी रुजविली, त्यावेळच्या सगळया परिस्थितीत आज आमूलाग्र बदल झाला आहे. ज्ञानोबा-तुकोबा यांच्या कालखंडातच तीन-चार शतकांचे अंतर आहे; पण त्या अवधीत एकंदर समाजस्थितीत फार फरक पडला नव्हता. कारण बदलांचा वेग खूपच कमी होता. ज्ञानेश्वरकालीन रामदेवराव यादव आणि तुकारामकालीन छत्रपती शिवाजी यांच्या राजवटींत मूलाचरणाचा फरक होता, पण समाजस्थिती, साधने, समजुती, संस्कृती, शिक्षण, उद्योग, लोकसंख्या अशा बाबतींत खूप अंतर पडले नव्हते. त्यावेळचा वारकरी अंगभूत बाराबंदी-मुंडासेवाला  होता, आज तो मुद्दाम साधेपणाच्या आवरणासाठी लेंगा-टोपी घालतो, एरवी तो पॅन्टशर्टातच असतो. बदल केवळ एवढ्याचपुरता नाही. आज चारचाकी वाहने, मोबाईल फोन, क्रॅमेरे, नकली पाण्याच्या बाटल्या, खाद्याची प्लॅस्टिक पाकिटे अशा अनेक बाबतीत बदल आहे. मुळातच शे-पाचशे संख्येची भव्य दिंडी आता शंभर पटींनी वाढली आहे. या बदलांतून उद्भवलेले प्रश्न बिकट रूप धारण करू लागले आहेत. म्हणून या प्रकाराचा फेरविचार करण्याची जबाबदारी ज्ञानोबा-तुकोबाच्या अनुयायी भक्तांनी घ्यायला हवी. केवळ `सातशे वर्षांची परंपरा', `भावना-भक्तीचा आविष्कार', `वारीची अनन्यता' इत्यादी शब्दबंबाळातून स्वत: बाहेर यावेच पण जनसामान्य वारकऱ्यालाही नव्या सामाजिकतेच्या सद्मार्गावर न्यावे.

या बाबतीत ज्यांनी वारीच्या संदर्भात विरोधी कोर्टकज्जे केले, याचिका दाखल केल्या, त्यांना पाखंडी म्हणून झोडपण्यातून मूळ प्रश्न सुटणार नाही. कोर्टाचा आदेश घटनेला धरून स्पष्ट झालाच आहे. ज्यावेळी सातशे वर्षांच्या परंपरेचा उल्लेख झाला त्यावेळी कोर्टाने हेही बजावले की, `या देशातले व्यवहार सातशे वर्षांच्या परंपरेने नव्हे, तर पासष्ट वर्षांच्या घटनेप्रमाणे चालतात.' याचा अर्थ असा की, स्वच्छता-पर्यावरण-वाहतूक-पाणीपुरवठा-प्रशासन, प्रदूषण वगैरे सर्व बाबतीत आजचे कायदे-नियम पाळले जायला हवेत.

ते पाळले जायचे असतील तर वारीच्या आजच्या स्वरूपात खूप बदल करायला हवेत. आताच त्या छोट्या गावातील सामान्य व्यवस्थेला आठ-नऊ लाख संख्येचा बोजा असह्य होत असतो. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पाणी नसतेच, पण कीर्तनरंगासाठी वाळवंटही शिल्लक नाही कारण ते आधीच बांधकामासाठी उपसले आहे. धरणात साठवलेले पाणी आधी सोडले तर ते नदीत वाहते, तेवढ्यावरती जी गरज भागू शकते ती भागते.

साधा व्यवहार व शारीर धर्म पाहायचा तर, सामान्यत: एका व्यक्तीला १० मिनिटांप्रमाणे ८ लाख लोकांसाठी (दिवसभरात एकदाच वापरायचे म्हटले तरीही) १० हजार शौचालये हवीत. ही फक्त पंढरपुराची गरज; शिवाय दिंडीच्या चारी दिशांच्या वाटेवरती, वारी पुढे गेल्यानंतर जे ब्रह्मांड माजते त्याची जबाबदारी कोण कशी घेणार? त्याशिवाय वाहतूक-संरक्षण-प्रदूषण यासंबंधीचे प्रश्नही उग्र बनतात.

हा एकट्या पंढरपूर-वारीचा प्रश्न नाही. उद्या नाशिकचा महाकुंभमेळा येणार. एरवी वर्षभर आपल्या सगळया यात्रा-जत्रा चालू आहेत. त्या सगळयांतून आपल्या उराशी ज्या श्रद्धा जपल्या आहेत, त्यांचे मोल किती चुकवावे लागते हा विचार करायलाच हवा. श्रद्धेला-भक्तीला-भावनेला मोल नसते.... वगैरे बोलायला ठीक आहे, पण उद्या देव न करो, पण या गलिच्छपणातून रोगराई साथ पसरली तर त्याविरुद्ध इथल्या व्यवस्थेलाच झगडावे लागेल. वारीत स्वयंशिस्त असते हे मान्य करूनही दर्शनरांगेसाठी कठडे-कुंपणे-बंदोबस्त हे सर्व आवश्यक ठरते. ते वारकरी करत नाहीत, तर मंदिर समिती नावाच्या सरकारला करावे लागते. कुंभमेळयासाठी केंद्रिय अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. लोकांची गरज म्हणून या व्यवस्था करणे हे जरी सरकारचे कामच असले तरी पंढरपुरात १०हजार शौचालये बांधण्यासाठी, सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर वास्तव काय केल्याचे दिसते? संतांनी अध्यात्म आणि पारलौकिक जीवनाकडे समाजाला वळविले, त्यामुळे राजकीय आक्रमणे रोखण्याची प्रेरणा संपली... या आशयाचा आक्षेप पुष्कळदा घेतला जातो. त्यात फारसे तथ्य नाही, पण आजच्या संप्रदायात त्या संत-महंतांच्या पात्रतेचे कोणी नाहीत हे तर खरेच; पण कालानुरूप समाजभान ठेवून श्रद्धा-भक्तीच्या मार्गी चालण्याची शिकवण द्यायला नको का?

एक स्वतंत्र पैलू या यात्रा-जत्रा-उत्सवांच्या बाबतीत विचारात घेण्यासारखा आहे. तो असा की, या `धार्मिक'तेच्या निमित्ताने भारतात खूप मोठी आर्थिक उलाढाल होत असते. एखाद्या गल्लीतील गणपती मंडळाचा खर्चही लाखावारी होतो. वैष्णोदेवी-काशीयात्रा यांच्यासाठी माणसे खिसा मोकळा करीत असतात. याचा सुपरिणाम आपल्या देशाच्या आर्थिक संबंधात होत असतो. विदेशातील उद्योगचक्रे कोणत्याही जागतिक कारणाने थंडावली तर तिथे मंदीची लाट येते. भारतात शेतीवर संकट येते, उद्योग तर युरोप-जपानपेक्षा फार कमीच; तरीही मंदीचे मोठे दुष्परिणाम नाहीत. याची अन्य कारणे असतील, तसे `धर्म'कारणही आहे. दुष्काळ असला किंवा धोबी-चर्मकाराला धंदा नसला तरी `देवाच्या कामाला' टाळता येत नाही. या विचारसरणीमुळे पडत्या उत्पादनशास्त्रात असूनही आपण तरून जातो. `ठेविले अनंते तैसेची राहावे' ही शिकवण फाटके कपडे व अनवाणी पायानेही यात्रा घडविते. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सकल आर्थिक उलाढालीवर होतोच. वारकऱ्यांना जेवण देण्यासाठी वाटेवरच्या गावांतून येणाऱ्या भाकरी, सकल राष्ट्नीय उत्पादनात मोजल्या जात नाहीत; पण त्या समुदायाची तितकी गरज भागते. त्याकरिता अप्रत्यक्ष पैसा-वेळ-श्रम खर्च होतोच. पण हा पैलू उगीच वाईटातून चांगले शोधण्याचा प्रकार म्हणायचा. ज्या प्रमाणांत हानी होते किंवा अव्यवस्था माजते त्या मानाने हा लाभ एकंदरीत महागात पडतो. दारू किंवा तंबाखू धंद्यावर लक्षावधी माणसांना रोजगार मिळतो; असे म्हणून त्याचे समर्थन चालत नाही.

तरीही, कोर्टाचा आदेश म्हणून या शासकीय कायद्याने वारी किंवा यात्रा रोखणेही चूक ठरेल. असा काहीतरी अध्यादेश काढून नवा वाद निर्माण करण्याचे कारण नाही. परंतु सरकार वा अन्य व्यवस्थांनी आपल्या मर्यादाही स्पष्ट जाहीर कराव्यात. नदीपात्रात शौचाला बसण्यात लोकांना चूक वाटत नसेल तर, किती लोकांसाठी उद्या कॉलऱ्याची `व्यवस्था' होऊ शकेल हे सरकारने आधीच जाहीर करावे.

- आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या उत्सवांचा `इव्हेंट' बनविणे टाळावे. शक्यतर कायद्याने ते बंद करावे. टीव्हीवर दृष्ये, मंत्र्याहस्ते पूजा, कुंभमेळयातील नंग्या साधूंचे माहात्म्य यांना आवर घालावा. विठ्ठलापेक्षा या इव्हेंटगिरीची ओढ असणारे `भाविक' तरी त्यामुळे कमी होतील. परस्परांना `चला जत्रेला' म्हणण्यातूनही पुष्कळजण प्रेरित होतात. त्यातून देव, भक्ती, श्रद्धा हे साधत नाही तर केवळ `जत्रा' साधते. ती जत्रा किती मोठी करत न्यायची हा विचार करावाच लागेल. कुटुंबनियोजन सक्तीने करता येत नसले, तरी लोकसंख्येचे संकट टाळण्याचे काही उपाय करणे भागच असते!

मुखात चहाऐवजी साखर
सुप्रसिद्ध चहा व्यापारी आणि दामोदर शिवराम आणि कंपनी या महाराष्ट्न्व्यापी पेढीचे कऱ्हाड शाखा प्रमुख श्री.अरविंद एस.गद्रे यांच्याशी `आपले जग'चा संवाद...
` आमचे गद्रे घराणे मूळचे कोकणातील देवरुखचे. आमच्या घराण्याचे मूळ पुुरुष श्री.हरी पांडुरंग गद्रे. आमच्या गद्रे घराण्याचा,-स्थायी भाव म्हणू या, तो हा की प्रारंभापासूनच आम्ही मंडळी व्यवसाय व्यापारात रमणारी. नोकरीकडे कोणाचाच कल नव्हता व अजूनही तिसऱ्या चौथ्या पिढीत नोकरीकडे ओढा नाही. आमचे मूळ पुुरुष हरी पांडुरंग गद्रे अत्यंत कष्टाळू. साधी राहणी, नेहरू शर्ट-धोतर-टोपी त्यामुळे ते गुजराथीच वाटत. त्याचा फायदा असा झाला की गांधी वधाच्या जाळपोळीतून आम्ही सहीसलामत वाचलो. देवरुखनंतर आम्ही संगमेश्वर येथे उद्योग विस्तार केला. प्रारंभी कपड्याचा व्यापार केला, त्यानंतर चहा व्यवसायात आलो. पुढे कोकणातून आम्ही १९५० साली देशावर आलो आणि कोल्हापूर हे व्यवसायाचे मुख्य केंद्र निवडले. कोल्हापुरात चहा व्यवसाय हा प्रमुख धंदा असला तरी विक्रमनगर भागात गद्रे आईल इंजिनची निर्मिती केली. ज्या काळात केरोसीन व अन्य पेट्नेलजन्य पदार्थांची टंचाई होती व युद्ध काळात निर्बंध व रेशनिंग लागले, त्या काळात आम्ही त्या क्षेत्रांत पण शिरलो. हातकणंगले रेल्वे स्टेशनजवळ आमचा तेलाचा मोठा डेपो होता व तेथून जिल्हाभर वितरण यंत्रणा होती. सध्या हातकणंगले-तमदलगे वाटेवर कित्येक एकर जागेवर आमच्या कंपनीचा चहा प्रक्रिया कारखाना असून दररोज सुमारे २० टन चहा पावडरवर प्रक्रिया केली जाते.
टाटा टी किंवा ब्रूक बॉन्ड, लिप्टन अशा बड्या कंपन्यांशी सामना करताना स्पर्धेचा त्रास आम्हाला फारसा झाला नाही. मालाचा उत्कृष्ट दर्जा, योग्य भाव, नेटके पॅकींग, अचूक वजन ही नीतिमूल्ये आम्ही पिढ्यान् पिढ्या जपली. ग्राहकांच्या मनांत विश्वास निर्माण केला. गद्रे चहा म्हणजे तो दर्जेदारच असणार अशी ग्राहकांची आम्ही श्रद्धा मिळविली. त्याचा फायदा आम्हाला नेहमीच झाला.
आसाम, कलकत्ता वगैरे चहा उत्पादक क्षेत्रात आम्ही आमची ऑफीसेस उघडली. मधल्या वेगवेगळया एजन्सीजचे अनावश्यक बर्डन कमी करून आम्ही थेट खरेदी करू लागलो. रास्त दरात ग्राहकांना चहा पुरविणे शक्य झाले. त्याचबरोबर चांगला दर्जेदार माल थेट आसामच्या चहा मळयांतून आमच्या प्रक्रिया केंद्राकडे येऊ लागला. आम्ही भारतातील आज तिसऱ्या क्रमांकाचे चहा उत्पादक आहोत व त्याचा आम्हाला अभिमान आहे.
पूर्वीपासून चहा कंपन्या पॅकींगमधून चहा पुरवठा करीत असत. आम्ही सर्वप्रथम लूज चहा विक्री सुरू केली. किरकोळ व सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने ही योजना फार सोयीची ठरली व ती लोकप्रिय झाली.
मी धंद्यात आल्यावर प्रारंभी हातकणंगले येथील रॉकेल डेपोचे व्यवस्थापन पाहात होतो. आमच्या घरात कुटुंबप्रमुखांनी घेतलेला निर्णय बिनतक्रार मान्य करायचा, अशी शिस्त आहे. १९६६ मध्ये कऱ्हाड येथे स्वतंत्र ऑफीस व विक्री केंद्र करण्याचा निर्णय झाला. मला कऱ्हाड केंद्राची जबाबदारी देण्यात आली आणि मी आनंदाने तेव्हापासून येथे दाखल झालो.
आमचे कुटुंब खूप मोठे आहे. सगळे गुण्यागोविंदाने नांदतात. तेच आमच्या यशाचे रहस्य आहे. नव्या पिढीतील मुले उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांचे शिक्षणाचे विषय पण भिन्न आहेत. `व्यवसायातच या' अशी कोणावर सक्ती करीत नाही. ज्याचे त्याने निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य आहे. आज माझा एक मुलगा मेरिटवर डॉक्टर झाला आहे. स्वाभाविकच तो वैद्यकीय व्यवसायत आहे पण आमच्या घराची एकंदरीत ओढ ही स्वत:च्या नावारूपाला आलेल्या व्यापारधंद्याकडे आहे.
मी १९६६ साली येथील सूत्रे घेतली. मला मूलमंत्र सांगण्यात आला होता की, तोंडात (चहाऐवजी) साखर ठेवून वागायला हवे. वस्तुत: माझा स्वत:चा स्वभाव काहीसा तापट; पण धंद्यासाठी मी त्यामध्ये बदल केला. प्रारंभीच्या रॉकेल धंद्यात, त्या काळची सुमारे ६५-७० हजाराची, वसूल होणे कठीण अशी,- उधारी होती-माझ्यापुढे ते एक आव्हान होते. पण कुशलतेने मी बहुतेक सर्व रक्कम टप्प्याटप्प्याने वसूल केली.
मराठी तरुणांना मी सांगेन की, त्यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतंत्र उद्योग-व्यवसायात यावे. कुठल्याही व्यवसायात जोखीम असते, कष्ट करावे लागतात पण मराठी माणूस बुद्धिमान आहे, कर्तबगार आहे. कष्टाची तयारी ठेवली तर ते निश्चितच अन्य प्रांतीय लोकांच्या तुलनेत खूप भरारी मारू शकतील.'
७५च्या उंबरठ्यावरील अरविंदराव गद्रे यांना `बाबा' या घरगुती नावाने ओळखतात. पण त्यांची सडपातळ प्रकृती व उत्साह वार्धक्य दाखवत नाही.
(शब्दांकन-मोहन जी.आळतेकर)

सोन्यासारखं सोनखत
कै.मुकुंद ऊर्फ श्रीपाद अच्युत दाभोळकर हे साताऱ्याचे थोर सुपुत्र, प्रज्ञावंत वनस्पतीशास्त्रज्ञ. त्यांच्यासंबंधी ऐकलेली ही एक हकिकत.
दिल्लीमध्ये शेतीशास्त्रज्ञांची एक आंतरराष्ट्नीय परिषद होती. परिषदेसाठी कै.दाभोळकरांना आमंत्रण होते. काही कारणास्तव कै.दाभोळकर परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी एका व्यक्तीमार्फत परिषद सदस्यांकरिता जम्बो आकाराची काही अननस फळे धाडली होती. फळांच्या करंडीसोबत एक बंद लखोटा व सोबत एक पत्र होते. पत्रात सदस्यांना विनंती होती की, आधी त्यांनी फळांचा आस्वाद घ्यावा व नंतरच बंद लखोटा उघडून त्यातील पत्र वाचावे.
त्यांच्या विनंतीनुसार सदस्यांनी फळांचा आस्वाद घेतला. फळे मधुमधुर होती. सदस्यांनी मिटक्या मारत फळे चाखली. नंतर लखोटा उघडण्यात आला. लखोट्यातील पत्रात लिहिले होते, `अननस रोपे लावली आणि माझा वय वर्षे तीनचा मुलगा याच्या मलमूत्रावर वाढवली होती. आपण त्यांचा आस्वाद घेतलात, धन्यवाद.'
कै.दाभोलकर महाराष्ट्नतील द्राक्षक्रांतीचे जनक होते. त्यांचे संशोधन पथदर्शक होते. त्यांची व्याख्याने बंदिस्त सभागृहात तिकीटे लावून होत. साक्षर-निरक्षर शेतकरी मोठ्या संख्येने व्याख्यानाला येत.
- म. वि. कोल्हटकर, सातारा फोन : (०२१६२) २३२५०४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन