Skip to main content

29 June 2015

अशी कामगिरीच द्या  
अतिरेकी कारवाया ही भारताला पोखरणारी कीड बनली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान-श्रीलंका-म्यार्र्र्त्त्ीकीं%ॅडीण्-ईर्र्त्र्गीणीं%ॅडीण्-िंॅर्द्धु्ंकी-मॅर्द्गी (ब्रह्मदेश) ही शेजारी राष्ट्न्े अतिरेक्यांना फूस लावणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आपल्या देशातल्या महत्त्वाच्या बातम्या काढण्यासाठी हेरगिरी करणे हे उद्योग करतच असतात. एका अर्थी तो राजकारणाचा भागही असतो. परन्तु नक्शलवादी-माओवादी - खलिस्तानवादी - द्राविडीस्तानवादी-बोडो-उल्फा या सर्व संघटनांनी गेल्या काही वर्षांत भारतात उच्छाद मांडला आहे. सरकार आणि जनतेला तो असह्य होत आहे. अतिरेकी पकडले जाण्याने हा प्रश्न लवकर संपू शकत नाही. मुंबईवर बेछूट हल्ला करणाऱ्यांपैकी एक अजमल कसाब सापडला, पण त्याला त्वरित मारून टाकण्याऐवजी त्याच्याकडून अनेक प्रकारांनी माहिती वदवून घेणे हे जास्त उपयोगी असते. म्हणून त्याच्याच संरक्षणाची व्यवस्था करून, मोठा खर्च करून त्यास जिवंत सांभाळावे लागते. राजकारण म्हणून हे सर्व ठीक आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत.

त्या राजकीय मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत. भारताच्या ईशान्य सीमेवर आसामसह जी सात राज्ये आहेत त्यातील मणीपूरच्या सीमेवर चांदेल जिल्ह्यात अतिरेक्यांनी ४ जून रोजी अचानक हल्ला केला. भारतीय लष्कराच्या गस्ती पथकातील १८ जवान शहीद झाले. आपल्या बाजूने कितीही काळजी घेतली तरी असा प्रसंग येऊ शकतो. आजवर अनेकदा हे प्रसंग आलेही आहेत. मुद्दा असा आहे की, या प्रसंगानंतर आपल्या देशातून त्याची प्रतिक्रिया काय झाली. अथवा आपण त्यास प्रत्युत्तर काय दिले! आजवरचा अनुभव वेगळा होता. अशा हल्ल्याचा निषेध, कुणी फारसे दुखावू नये अशा शब्दात करणे, फार तर `असा भ्याड हल्ला खपवून घेणार नाही' असे म्हणणे, व मानवी हक्क आयोग, लवाद, वगैरे ठिकाणी आपली बाजू रखडत मांडणे असे अतिरेकी अहिंसक प्रकार चालत आले आहेत. नुकतीच मणीपूर सीमेवर आपल्या लष्कराने जी सणसणीत चपराक लगावली, तीच भाषा अतिरेक्यांना व त्यांच्या पोशिंद्यांना समजेल.

मणीपूर बंडखोरांनी आपल्या तुकडीवर हल्ला करून १८ जवान मारले; व बंडखोर अतिरेकी, म्यानमार (ब्रह्मदेश)मध्ये पळून गेले. हे वृत्त येताच गृहमंत्री, संरक्षणमंत्री, राष्ट्नीय सुरक्षा सल्लागार व लष्करप्रमुख यांची बैठक झाली. यावेळी महत्त्वाचा निर्णय म्हणजे नुसता खलिता व निषेध हे न करता बंडखोरांना धडा शिकवायचा यावर एकमत झाले. वृत्तसंस्थेने दिलेल्या तपशिलाप्रमाणे अजिबात वेळ न दवडता, दुसऱ्याच दिवशी बंडखोरांवर हल्ला चढवावा अशी एक सूचना या बैठकीत प्रारंभीच आली. पण एवढ्या कमी कालावधीत असा हल्ला चढवणे अवघड होते. लष्कर प्रमुख दलबीरसिंग यांनी तसे लक्षात आणून दिले. लष्करी भाषेत ज्याला `हॉट पर्स्यूट'(पाठलाग करून प्रतिहल्ला) म्हणतात तो करायचा तर साधारणत: पहिल्या ७२ तासांतच तो केला जातो. तेव्हा जास्त उशीर करूनही चालणार नव्हते. त्यावर बराचसा खल होऊन अखेर हा प्रतिहल्ला सोमवारी करावा असे ठरले. लष्कराच्या विशेष पथकाकडे या हल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात येणार होतीच. मात्र त्याबरोबरच त्यात सुखोई आणि मिग-२६ लढाऊ विमानांचाही वापर करावा अशी सूचनाही आली होती. परंतु हवाई हल्ल्यात निरपराधांचे प्राण जाण्याची शक्यता जास्त असल्याने हा पर्याय बाजूला ठेवण्यात आला आणि जमिनीवरूनच हल्ला करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आदेश जन.सुहाग यांना देण्यात आले.

हल्ला करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणे आवश्यक होते. अखेर त्यांना या हल्ल्याच्या सर्व बाजूंची, क्रिया-प्रतिक्रियांची माहिती देऊन त्यांची मंजुरी घेतल्याशिवाय असे पाऊल उचलता येणे शक्यच नव्हते. मात्र त्यावेळी ते नेमके बांग्लादेशाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे ते परत येईपर्यंत वाट पाहावी असे ठरले. रविवारी रात्री ते बांग्लादेशहून परतल्यानंतर त्यांची परवानगी घेण्यात आली.

दरम्यानच्या काळात लष्करप्रमुख मणिपूरला पोचलेसुद्धा. सोमवारी रात्री (ता.८) म्यानमारमध्ये बऱ्याच आतील भागात लष्कराचे विशेष पथक हवाईमार्गे पाठविण्यात आले. बंडखोरांच्या तळापासून काही अंतरावर त्यांना उतरविण्यात आले होते. रात्री ते तेथेच दबा धरून बसले आणि पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी हल्ल्यास प्रारंभ केला.

अधिकृत वृत्तानुसार या हल्ल्यात भारतीय जवानांनी ३८ बंडखोरांना कंठस्नान घातले असून, सातजण जखमी झाले आहेत. बदला घेण्यासाठी एनएससीएन-के या संघटनेचे दहशतवादी भारतात शिरले असल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण ईशान्य भारतात सुरक्षाविषयक अतिदक्षतेचा इशारा(हाय अलर्ट) जारी करण्यात आला. सैन्याच्या कारवाईबाबत सरकारने `समाधान' व्यक्त केले असून, ९ जूनची कारवाई यशस्वी झाल्यामुळे भविष्यातही गरज भासल्यास असेच हल्ले करण्याचा सरकार आदेश देऊ शकते.

या घटनेमुळे पाकिस्तानमधील आजी-माजी राज्यकर्त्यांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात चडफडाट आणि थोडी घबराटही असावी. याचा अर्थ उघडच आहे. जो चोरून खातो, त्याच्या घशात खवखवते, अशी आपल्याकडे म्हणच आहे. ही खवखव थांबायची असेल त्या त्या देशांनी चोरट्या अतिरेकी हालचाली थांबवाव्यात. यापुढच्या काळात हीच पद्धत रूढ केली तर भारताच्या बलाढ्य लष्कराच्या मानाने कोण कुठले अतिरेकी! - कधीच गारद होतील. लष्कराला थोडी `संधी'च द्यायला हवी!


भाऊबीज
चिकू, आंबे मोहोरानी लगडलेल्या झाडात लपलेलं पत्र्याचं घर; भिंतीही पत्र्याच्या. दाराशी कुत्रा, गोठ्यात म्हैस! प्रशस्त अंगण. सुहास्यवदनाची गृहलक्ष्मी `कोण आलं' म्हणून डोकावून पाहू लागली. आमचे दादा झपाझप पावलं टाकत या घरात आले. ठिगळ लावलेलं धोतर व ओशाळलेले.
``आज बऱ्याच दिवसांनी आलास.'' ताक घुसळणारे हात थबकले. ताईनं दादांना विचारलं. संवाद सुरू झाला.
``मला तर या आण्णाचं नवलचं वाटतंय''
``हो ना! मलाही आश्चर्य वाटलं.''
``नाहीतर काय? फार वर्षांनी आज पहिल्यांदा आण्णा बरा उदार झाला!''
``हो! तर काय?''
``भाऊबीज, तीही शंभर रुपये? गंमतच आहे.''
``अगं, आण्णा म्हणाले माझ्या चुलत बहिणी असल्या तरी काय झालं? त्यांना आज भाऊबीज देणार आहे. तू पलूसला जातो आहेसच! जाताजाता किर्लोस्करवाडीला कृष्णाताईला ही भाऊबीज देऊन जा. ओवाळलं तर माझ्यातर्फे ओवाळून घे. ही ओवाळणी दे.''

जानेवारी १९५७ चा काळ. तिथल्या जांभळीच्या गर्द सावलीत मी एस.एस.सी. (११वी)चा अभ्यास करत होतो. दादा एवढं काय बोलतात हे ऐकावं म्हणून मी पलीकडच्या खोलीत गेलो. भावाबहिणीचा संवाद सुरू होता.
``ही घे त्याची भाऊबीज.''
``चहा तरी घे आधी...''
``नको मी चलतो-''
``थांब दादा, तुझ्या डोळयात पाणी?''
``छे! छे! कचरा गेला असेल.''
``तू कितीही लपवलंस तरी चेहरा बोलतोय तुझा! कसल्या अडचणीत आहेस?''
``काय सांगू तुला? मी असला दरिद्री नारायण! मुलीचं बाळंतपण, फाटका तुटका संसार, मुलगा मॅटि्न्क परीक्षेला बसणार!''
``तू म्हणूनच टिकलास बाबा! नाहीतर एखादा राख फासून घरातून निघून गेला असता. बरं मग काय अडचण आहे?''
``याची परीक्षा आहे मार्चमध्ये; फॉर्म फी भरायची आहे. सांगलीला परीक्षेला जावं लागेल.''
``मग किती लागणार आहेत?''
``दीडशे तरी लागतील.''
``हत्तेच्या एवढंच ना? मग ही भाऊबीजच ठेवून घे.''
``नको नको, गोपाळराव काय म्हणतील? या कर्मदरिद्र्याची नजर बहिणीच्या ओवाळणीवर...?''
``थांब दादा, तुझ्या मुलाची परीक्षा महत्त्वाची आहे. मला तू हे पैसे नंतर परत कर. कोणी काही म्हणणार नाहीत.''
``ताई....'' दादांचा कंठ दाटून आला होता.
``माझी शपथ आहे तुला. ठेव हे पैसे.'' भरल्या डोळयांनी दादांनी निरोप घेतला.

मी आत्याबाइंर्च्या उदार स्वभावाने भारून गेलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी आणखी पन्नास रुपये दिले. हायस्कूल लांब पडते म्हणून मी त्यांच्या घरातच आश्रय घेतला होता. त्यांनी वेळेवर मदत केली म्हणून मी १९५७ साली एस.एस.सी.(११वी) पास झालो. पुढे एम.ए.बी.एड्.पर्यंत मजल मारली, माध्यमिक शिक्षक म्हणून बऱ्यापैकी पेन्शन घेऊन सध्या मी सुखात आहे. स्वत:चे घर झाले, बँकेत बऱ्यापैकी शिल्लक आहे. १९५७ साली आत्याने मदत केली नसती तर?

या संवादातले भाऊबहीण म्हणजे माझे वडील-दादा, व आत्याबाई म्हणजे वसंत आपटे यांच्या मातोश्री ताई आपटे होत.
ठसठशीत कुंकू, तिरकी मान करण्याची लकब, नऊवारी पातळ, मानेवर रुळणारा आंबाडा, कृश गोरी मूर्ती. म्हशीची धार काढण्यापासून सारी कामं करणारी सुहास्य वदना ताईआत्या. आमच्या कुटुंबाचे सद्भाग्यच! ११वीचे महत्त्वाचे वर्ष होते. शाळा तीन मैलावर होती, म्हणून आत्यांनी मला चार महिने ठेवून घेतले होते. मनाची श्रीमंती दाखवणारी आत्या. मी जेव्हा `आपले जग'ला भेटतो, तेव्हा ती नजरेसमोर येते.
- भा. र. लेले,
दत्त कॉलनी (पूर्व), मालगाव रस्ता, मिरज
मोबा.९४०३६२७५९१

बालपणीच्या आठवणी...
आम्ही गोंयकर
१९५५ पूर्वीच्या गोव्यात पोर्तुगीज राजवट होती. गोव्याला `इंडी%%या पोर्तुगे%झ' असं म्हणत; उर्वरित भारताला `ब्रिटीश इंडिया' म्हणत. माझं आजोळ महाराष्ट्न् हद्दीत वेंगुर्ल्याला. आई माहेरी गेली तर `इंग्रजीत गेले होते' असं म्हणायची. घरातील किंवा वाड्यावरील म्हाताऱ्या बायका बोलायच्या, त्याचा त्यावेळी अर्थही कळत नव्हता. आता सांगितला तर दीड फूट उडतील! ``अगो, अण्णाच्या मेजाचा खण म्हणजे भावीणीचा कासोटा. कुणीही येऊन हात घालावा.'', ``अगो, त्याच्या दद ला कोण लोणी लावणार? त्याचा करांदा आता झालाय जू%न! कातरलेल्या अंगठ्यावर मूत म्हटलं तरीसुद्धा मुतायचा नाही. तो ना? खायला सगळया आधी, निजायला सगळया मधी, आणि कामाला कधी-मधी. त्याच्या ना तीन बहिणी आहेत नजो, नकळो आणि हावना.'' (नजो=मला बरं वाटत नाही, नकळो=मला माहीत नाही, हांवना=मी नाही जा, हे कोकणी शब्द आहेत.)
``अगो, इतके दिवस जीवाचं नाव ददद ठेवून खूप काम केलं, आता होत नाही. खायला काळ आणि धरणीला भार!''
त्यावेळी पोर्तुगीज कायद्याप्रमाणे सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शाळेत प्रवेश नाही. मग भोलीभटाच्या शाळेत `अप्री' (पूर्व प्राथमिक शाळा) असे. पाटी-पेन्सिल घेऊन रडत, शेंबूड पुसत शाळेत जायचं. पाटीभर मोठ्ठी `श्री' काढायची. मग श्री गणेशाय नम:, $ नम: सिद्धं, अआइई, बाराखड्या, पाढे असं शिकायचं. पहिली ते सातवी मराठी माध्यमाची शाळा. आपटे मास्तर जवळ बोलवून मांडीला चिमटा काढत; केळकर मास्तर हातावर उभी पट्टी मारत, ठाकूर मास्तरही पट्टीनं मारत. हेडमास्तर सहावी व सातवीला एकदम शिकवत. एक हॉल, चार बाकांच्या रांगा. दोन रांगा सहावीच्या, दोन रांगा सातवीच्या, त्यात एक मुलांची एक मुलींची. इयत्ता सातवीच्या परीक्षेला व्ह.फा. (व्हर्नाक्युलर फायनल) म्हणत. या परीक्षेला बसण्याची सोय गोव्यात नव्हती. १९५१ पासून भारत सरकारनं गोव्याची आर्थिक नाकेबंदी केली होती. वाटा बंद होत्या. त्यावेळी मास्तर, डॉक्टर व मुलं-मुली असे व्हिसा काढून कारवारला जायचो व परीक्षा देऊन यायचो.
प्राथमिक शाळेतले एक मास्तर सांगायचे, ``अरे, मर्त्याचा मांडावर (दुकानावर) जा आणि १ आण्याच्या विड्या घेऊन ये; एक मी ओढायला मागितली आहे म्हणून सांग.'' दुकानदार मास्तरांना म्हणून एक विडी जास्त द्यायचा. मास्तर विडी शाळेत ओढत नसत, बाहेर ओढायचे. मग `याच्यासारखा ना? अवगुणी मुलगा त्रिभुवनात शोधून सापडायचा नाही' असं म्हणत.
एकदा सोलदाराने (सोल्जरने = शिपायाने) एका मुलाची वही उघडून पाहिली. मुलाने मागच्या पानावर `जयहिंद' लिहिलं होतं. त्याला कर्तेलावर (पोलीस स्टेशनवर) नेऊन पालमुत्रीने (रबरी काठीने) बेदम मारला. एक रात्र कोठडीत ठेवला व सकाळी सज्जड दम देऊन सोडला. गो.नी.दांडेकर यांची आई शिवाय पं.महादेवशास्त्री जोशी यांची पत्नी सुधाताई जोशी यांनी म्हापशाच्या चौकात सत्याग्रह केला. त्यांना गोऱ्या पोर्तुगीज शिपायानं मारत पोलीस स्टेशनवर नेलं व तुरुंगात टाकलं. आम्ही त्यावेळी लहान. पोलीस स्टेशनवरून जायलासुद्धा भीती वाटायची. आझेंत मोंतेर नावाचा एक गोवेकरच पोलीस इन्स्पेक्टर होता. त्याचा फार दरारा होता. रात्री-अपरात्री खेड्यापाड्यात जीप घेऊन हिंडायचा. कुणालाही संशयाने उचलून नेऊन-मारून तुरुंगात टाकायचा. माझे काका धारगळला भूमीगत स्वातंत्र्यसैनिक होते. जीपचा आवाज आला की कांबळ पांघरून रानात पळून जायचे. आम्ही मुलं घाबरून पांघरूणात गप्प झोपायचो.
क्रिकेटचं वेड नव्हतं. जास्त फुटबॉल व काही प्रमाणात व्हॉलीबॉल खेळत. म्हापशात `युवक संघ' होता. त्यांच्याबरोबर पोर्तुगीज सैनिकांच्या संघाशी सामने होत. ते हरले तर आम्हाला आनंद साजरा करायला परवानगी नव्हती. गोऱ्या सैनिकांना `पाखले' म्हणत व काळया सैनिकांना (आफ्रीका-मोझांबीकचे निग्रो) `खाप्री' म्हणत. त्यांना गुलामाप्रमाणे वागवत. बिच्चारे! कधीकधी रडतानाही दिसायचे. रात्रीच्या वेळी बंदूक घेऊन दोन `खाप्री' गस्त घालत.
- अशोक आपटे, म्हापसा (गोवा)  फोन : (०८३२) २२५३७१८

आठवांचे साठव
व्यासपीठाशी खेळ
हल्ली पुष्कळ ठिकाणी मी बोलतो, बोलावंही लागतं. एखादं भाषण करण्यासाठी कुणी बोलावतं, भाषण झाल्यावर संयोजक, श्रोते यांच्यातील कुणीकुणी छान छान म्हणतात. त्यापूर्वी औपचारिक परिचय करून देताना, मला `उत्तम वक्ता' वगैरे म्हणून जरा चढविणं हा औपचारिक भाग, हेही मी जाणून असतो; पण त्या प्रतिष्ठित चौथऱ्यावर बसल्यामुळं त्या स्तुतीवर तितकंच औपचारिक मंदस्मित करावं लागतं. आता भाषणांची सवय झाली आहे.
त्यामागं माझ्या शाळेतील `बालसभा' चुकविण्याची तपश्चर्या असावी. बारा-पंधरा वयाच्या मुलांना सभाधीटपणा यावा म्हणून आमच्या शाळेत बालसभेचा तास असायचा. त्यात अध्यक्ष, सूत्रचालक, वक्ते वगैरे सगळी मुलंमुली असत. मला तो धीटपणा शाळेत तर नाहीच, पण पुढंही वीसेक वर्षं आलेला नव्हता. बाकीच्या अभ्यासात मी चांगला नंबरात होतो, चांगलं खेळायचो; पण सभा-नाटक वगैरे म्हटलं की मला श्रोत्या-प्रेक्षकांत बसण्याचीसुद्धा भीती वाटायची. बालसभा सक्तीचीच होती, म्हणून मग मी आणि माझे काही सोबती आपापल्या दप्तराचं बोचकं मांडीवर घेऊन सभागृहाच्या मध्यावरच्या किंवा शेवटच्या दाराशी बसत असू. संधी पाहून पळून जायला ते बरं पडायचं. हे सभाशास्त्र माझ्या बाबतीत इतकं छळवादी होतं.
पुढच्या तरुणाईत तर तसा प्रसंग येण्याचा प्रश्नच नव्हता. मी व्यवसाय सुरू केला तो मंगलोरी कौलं, खिळेमोळे असला! सभाबैठका राहोच पण तेव्हा लक्ष्मीपूजनाला नटूनथटून सगळयांसमोर बसायचं मी टाळत असे. कुटुंबातल्या कार्यक्रमातही कधी गाणं म्हण, उभा राहून गोष्ट सांग एवढंही मला जमत नसे. मागं बसून टवाळगप्पा करण्यात माहीर होतो. आता हेही सांगायला हरकत नाही की, त्यावेळच्या शालान्त-म्हणजे ११वी च्या परीक्षेत मला संस्कृत-गणित विषयांची आणि शाळेत पहिला आल्याची बक्षिसं `लागली'; परंतु पुढच्या स्नेहसंमेलनात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ती बक्षिसं घेण्यासाठी मी त्या कार्यक्रमाला गेलोच नाही. यात बुजरेपणाचा भाग खूपच जास्त होता; शिवाय असं आपण `आपलं' म्हणून काही शहाणपण दाखवणं मला मनापासून नको असायचं; आजही नको असतं. त्यामुळं कधीतरी शिष्ठ, अहंमन्य, तुसड अशी शेलकी विशेषणं येऊन चिकटतात; काय करणार?
यथावकाश प्रेस सुरू केला, पत्रकारिता सुरू झाली आणि १९८१ला इकडच्या तीनचार जिल्ह्यांतही त्यावेळी नसलेलं ऑफसेट छपाईचं यंत्र मी पहिल्यांदा आणलं. महाराष्ट्न् सरकारनं त्यावेळी लघुउद्योगांस प्रोत्साहन म्हणून २५ टक्के अनुदान जाहीर केलेलं होतं. पण नेहमीप्रमाणं आर्थिक टंचाई म्हणून ते वेळेवर न देता आमची पार दमछाक झाल्यावर दोनतीन वर्षांनी ते देऊ केलं. त्याचा खास समारंभ सांगलीच्या जिल्हा परिषद सभागृहात रचला. मला चेक मिळणार असल्यामुळं मी गेलो. पण श्रोत्यांत न बसता पत्रकार कक्षात ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा परिषदेचे प्रसिद्धी अधिकारी श्री.गजानन हुद्दार यांच्याजवळ गप्पाटप्पात बसलो होतो. संयोजक पश्चिम महाराष्ट्न् विकास मंडळाचा एक अधिकारी तिथं येऊन हुद्दारांना विचारू लागला, `अनुदानाचा चेक घेणाऱ्या उद्योजकांच्या वतीनं मनोगत व्यक्त करेल असा तुमच्या माहितीत कुणी आहे का?' पट्कन हुद्दार माझ्याकडं निर्देश करत म्हणाले, ``एवढंच होय?-मग हा लेकाचा बोलेल की-!'' त्या अधिकाऱ्यानं ``हो का? अरे वा!'' असं म्हणेपर्यंत माझ्या छातीत ७२० ठोके झाले होते. ``ओ% छ्या छ्या! आपल्याला जमणार नाही. मी आपला बाहेर जातो, चेक नंतर पोस्टानं पाठवा.'' असं करूण स्वरात म्हणेपर्यंत हुद्दारांकडून माझं नाव-गाव विचारून-लिहून तो अधिकारी गेलासुद्धा. तोवर माझ्याच बाकावर दुसऱ्या बाजूला आणखी एकजण येऊन खेटून बसले आणि मी मधे अडकलो, उठता येईना. तोवर समोर कार्यक्रम सुरू झाला. प्रास्तविक-पाहुण्यांची ओळख या कशातही माझं लक्ष नव्हतं. एका कानात गुरुवर्य हुद्दार काहीतरी मुद्दे सांगत होते. आणि माझं नाव पुकारलं गेलं.
उठलो, डायसवर गेलो. इकडं खुर्च्यांवर महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, औद्योगिक वसाहत फेडरेशनचे चारुकाका शहा, जिल्हाधिकारी लीना मेहेंदळे अशी बुजुर्ग मंडळी आणि समोर जानेमाने उद्योजक भरलेले सभागृह! गल्लीतल्या क्रिकेटचं फळकूट हाती न धरलेला मी, एकदम वानखेडेवर पॅडहेल्मेट घालून पीचवर उभा होतो. त्या वातावरणाचा परिणाम असेल, पण मला दिलेल्या दहा मिनिटांत मी एकदोन हशे-टाळी घेत छान बॅटिंग केलं (असावं). अनुदानपद्धत, त्यास विलंब, कार्यालयीन रीत याबाबत जरा सुनावलंसुद्धा. नाना धामणीकर प्रेस फोटोग्राफर होते. त्यांचं कौशल्य असं की, त्यानी काढलेल्या फोटोत मी आयुष्यात पहिलं भाषण करतोय असं जाणवू दिलं नाही. नंतर चारूकाकांनी माझ्या मुद्द्यांचा संदर्भ देत भाषण केलं.
कार्यक्रमानंतर स्नेहभोजन होतं. बरेच लोक अभिनंदन-शाबासकी देत होते. आवर्जून बोलत होते. मी फुगलोच फुगलो. नंतर हळूहळू असे प्रसंग वरचेवर येऊ लागले. सामाजिक उचापतींमुळं प्रवासही घडू लागले. पूर्वसंचितामुळं थोरामोठ्यांसमोर वावरता आलं. सवय पडली. पुढं काही वेळा तर कुठल्यातरी व्याख्यानमालेत एखादं `पुष्प' गुंफण्यापर्यंत पुंडावा केला. आता हल्ली पुष्कळ दिवसात वेदिकेवर बोलण्याची वेळच आली नाही तर, जीभ शिवशिवते की काय असा भास होतो. उगाच खोटं कशाला सांगू?- पण अजूनी तिथं वर उभं राहताना छातीत ७२० ठोके पडू लागतात हे मान्य!!
- वसंत आपटे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८

हृदयशल्यक्रियेसाठी मदतीचे आवाहन
माझा मुलगा चि.तन्मय, वय-साडे सहा वर्षे, याच्यावर हृदयाची शल्यक्रिया करणे आवश्यक आहे. ह्या शल्यक्रियेस किमान ४.५० लाख इतका खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च करण्याइतकी माझी आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे मी सर्वांकडे आर्थिक मदतीसाठी आवाहन करत आहे.
शल्यक्रिया १४ मे २०१५ रोजी आहे. मदतीचा चेक खझऊ/जझऊ छे.२६११८० साठी `दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल' या नावाने पाठवावा ही विनंंती आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा त्या आशयाचा दाखला माझ्याकडे आहे.
पत्ता : यादवेंद्र चिंतामणी आपटे, गट नं.१५२, प्लॉट नं.१५१, फ्लॅट नं.९, आलोकनगर
 सातारा परिसर, औरंगाबाद - ४३१००५
 मोबा.८००७३३२७४८, 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन