Skip to main content

Pustak Parichay


जुन्यातले सोने
वैदिक संस्कृतीचे पैलू
लेखक  -चिंतामणी गणेश काशीकर
(टिळक महाराष्ट्न् विद्यापीठ सुवर्णमहोत्सव ग्रंथ ७)
(पुणे -३०, १९७२, किंमत रु.८/-)

या पुस्तकात वेदकाळ, चारही वेदांबद्दल विस्तृत माहिती, वेदकालीन देवता, तऱ्हेतऱ्हेचे यज्ञयाग व ते कसे करावेत त्याची पद्धती, लागणारे साहित्य वगैरेची खूप विस्तृत व वाचनीय माहिती अधिकारवाणीने दिली आहे. त्यावेळचा समाज, त्याची मानसिकता, तत्कालीन चालीरिती, त्यांचे ज्ञान, विश्वाचे कोडे उकलण्याबाबत त्यांची तळमळ हे सारे विषय या ग्रंथात आले आहेत.
तसेच आजही आपल्याला देवप्रिय `सोमरस' याबद्दल कुतुहल आहे. ती माहिती थोडक्यात पुढे देत आहे.
सोमरसासाठी सोमवनस्पती `मूनवत' या पर्वतावरून आणली जात असे. `मूनवत' हे हिमालयातील एखादे पर्वत शिखर असावे. पश्चिमेकडील कुरुपंचाल हा देश संस्कृतीचे माहेर होता. कुरुक्षेत्रापासून उत्तर प्रदेशातील बरेलीपर्यंतच्या भागाला `कुरुपंचाल' म्हणत. याआधीची आर्यांची वस्ती सप्तसिंधू व पंजाब येथे होती. त्याही आधी अफगाणीस्तान हा प्रदेश होता. `मूनवत' पर्वताचा उल्लेख वेदांत येतो. शर्यणावत् नावाचे एक सरोवर कुरुक्षेत्राच्या पश्चिमेस होते व तो परिसर सोम वनस्पतीसाठी प्रसिद्ध होता. अफगाणिस्तानातील स्वात व कुर्रम यांच्या पूर्वेकडे गंगा-यमुना पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या नद्यांची नावे वेदांत येतात. अफगाणीस्तानातील एका नदीचे नाव `सरस्वती' आहे. पुढे आर्य भारतात आल्यावर त्यांनी इथल्या एका नदीला `सरस्वती' हे नाव आठवण म्हणून दिले असावे.
`सोम' ही कुठली वनस्पती आहे हे आज सांगता येत  नाही. पण ती एक झुडूप वनस्पती आहे. त्याला `अंशू' म्हणजे कांड्या असत. तिला पाने व फुले नसत. (ही शेरे निवडुंग तर नव्हे? श्री.वैद्य खडीवाले यांनी ही शंका वर्तवली आहे.) सोमाच्या कांड्या लाकडी फळयांवर कुटून जो रस येई त्यात पाणी मिसळल्यावर तो पिंगट पिवळा दिसे. सोमरसपानाने उत्साह येत असे. तो सुरा म्हणजे मद्य नव्हता. तो एक पौष्टिक, उत्साहवर्धक पेयरस होता. सोमवल्ली टवटवीत राहावी म्हणून त्यावर गरम पाणी शिंपडतात. तसेच एका पद्धतीत या कांड्या वरवंट्याने ठेचतात आणि त्यावर गरम पाणी ओततात. पाणी मिसळलेला रस एका माठात साठवतात. दुसऱ्या माठावर लोकरीचे गाळणे घेऊन त्यात तो रस गाळतात. यज्ञाला सोमरसाच्या आहुति देऊन झाल्यावर उरलेल्या सोमरसाचे सेवन करतात.
हे पुस्तक वाचताना काही शब्दांचे अर्थ सापडले तेही पुढे देत आहे.
पस्त्या - प्रापंचिक स्त्री, बाजिन - नासक्या दुधातले पाणी, अकृष्टपच्य - मुद्दाम न पेरता उगवलेले धान्य, कृष्टपच्य - मुद्दाम पेरून उगवलेले धान्य, कृष्टि - जमीन नांगरणारा (शेतकरी),विभीतकवृक्ष - बेहड्याचे झाड, केदार - बागायती खालील जमीन, कुल्या - पाण्याचा पाट, यवांगु - कांजी/पेज, कार्ष्णायस/कृष्णायस - लोखंड
करंभ हा पूषन् देवतेचा भक्ष पदार्थ आहे. यव म्हणजे सातू. ते भाजून त्याचे पीठ दह्यात कालवले म्हणजे त्यास करंभ म्हणतात. पूषन् ही देवता गोरक्षणाशी निगडीत आहे.
अशा विषयांची विस्तृत माहिती या ग्रंथात दिली आहे. जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे.
-चंद्रकांंत वेलणकर, मालाड (प.), मुंबई मोबा. ९८७००३२९९१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...