Skip to main content

Posts

Showing posts with the label MAZA COLUMN - 13 June 2011

Maza Column of 13 June

सुख वाढण्याची कला  ऊस तोड करण्यासाठी उत्तर कर्नाटक किंवा बीड-लातूर कडून कित्येक शेतमजूर पश्चिम महाराष्ट्नत येत असतात. त्यांनी दरवाढीसाठी आखडून धरले. संप-संघटना वगैरे नेतेगिरी झाली, साखर कारखाने खोळंबले. अशा वेळी काही गावातले शेतकरी सरसावले, त्यांनी आपापसात एकी केली. ऊसतोड करण्यासाठी टोळया तयार केल्या, एकमेकांच्या रानातला ऊस तोडायला सुरुवात केली. शेतकरीच होते, सवय मोडली होती पण फार अवघड गेले नाही. काम मार्गी लागले. ही कथा असेल आठ-दहा वर्षांपूर्वीची.  अशा कितीतरी अडचणींचे पाढे वाचण्याची सवय लावून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची ती कथा आठवून पाहण्याजोगी असते. नुकत्याच झालेल्या एका लग्नसमारंभातील पंगत चर्चेत होती. पंगतीचं वाढप अगदीच (बे)सुमार दर्जाचं असतं हा सगळीकडे अनुभव असतो. कुणीतरी आेंगळ किंवा अत्याधुनिक नटरंगी पोरं लग्ना-मुंजीसारख्या भारदस्त प्रसंगात पंगत वाढायला हल्ली येतात. त्या पोरांचे एकूण अवतार पाहिल्यावर पपन्नाची प्रसन्नता जाऊन मळमळ वाढते. वाढपशास्त्राशी तर त्यांचा काही मेळ नसतो. त्यामुळं तुपाच्या पाचसहा थेंबांचीच धार निम्मी आमटीच्या वाटीत आणि बाकीची मिठात जाते. भाताची शितं ट...