Skip to main content

Posts

Showing posts with the label Lekh on Baya Karve

Lekh on Baya Karve in 5 March 2012 (Mahila Din Vishesh)

लग्न पाहिलं (पुन्हा) करून स्त्री शिक्षणाची गंगा अविरत व्हावी म्हणून ज्यांनी भगिरथ प्रयत्न केले त्या महर्षी अण्णासाहेब ऊर्फ धोंडो केशव कर्वे यांची द्वितीय पत्नी म्हणजे सौ.आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. स्वत:चा संसार सावरत, अनेकांचे संसार त्यांनी मार्गी लावले. सौ.आनंदीबाई कर्वे यांनीही समाजाची अवहेलना सोसत समाजसेवा केली. सौ.आनंदीबाइंर्चा जन्म १८६५ सालचा. देवरुखच्या पावसकर जोशांपैकी बाळकृष्ण केशव जोशी यांचे सातवे अपत्य म्हणजे गोदूबाई. लहानपणीच गोवर आला. तान्ह्या गोदाला दूध देण्याची आवश्यकता होती म्हणून बाळकृष्ण पंतांनी म्हैस आणली; पण तिच्या खाण्याचा खर्च भागवावा तर दूध, तूप विकण्याचे पाप ब्राह्मणांनी करायचे नाही असा दंडक होता; तरीही  बाळकृष्णबुवांनी गुपचूपपणे तूप विकून खर्च भागवला. गोदा व पाठची कृष्णा या दोघींना देवी आल्या. आजारातून कृष्णा जगली नाही; गोदा मात्र वाचली. तिची प्रतिकारशक्ती चांगली होती म्हणूनच पुढे तिला काही कर्तृत्त्व दाखवता आले. गोदा अंगापिंडाने तशी थोराडच होती. वयाच्या आठव्या वर्षीच अचानक तिचे लग्न झाले. घरात लग्नाचा विषय कुणाच्या मनातही नव्हता. पण लग्न झालेली तिची ...