सेंद्रीय शेती शेतातील विविध पिकांवर तरतरी आणि त्यांचे सकस उत्पादन असे दृश्य पिचतच दिसते. शिवाय त्या ठिकाणी गायींचे खिल्लार, फळबागांवर धूर पसरविणारे अग्निहोत्र, दूध-दुभत्यांचे असंख्य प्रकार आणि वनस्पतींचा औषधी वापर हे सर्व पाहिल्यानंतर कुठल्यातरी ऋषी काळातील कृषीची कल्पना करता येते. श्री. जयंत वामन बर्वे यांच्या विटे (जि.सांगली) यांच्या शेतावर तसे प्रयोग प्रत्यक्ष पाहता येतात. हा सर्व शेती व्यवहार आता प्रयोग अवस्थेतून कायमच्या यशस्वी व्यवसायामध्ये स्थिर झाला आहे. पाण्याची कमतरता असूनही एकरी एेंशी टन ऊस नदीकाठच्या बागायतीलाही दुर्मिळ झाला आहे. लगडलेले आंबे किंवा फुलारलेली डाळींबाची झुडपे कोणत्याही किडीची माशी अंगावर बसू देत नाहीत. या सर्वांच्या मुळाशी निसर्गाने दिलेली विविधता आपल्या सामर्थ्याचा ओलावा टिकवून ठेवते आहे. श्री.बर्वे यांचे हे सेंद्रिय शेतीचे तंत्र आता सर्वदूर शेतकऱ्यांच्या सहजपणी आटोक्यात येत आहे. अर्थातच विदेशी रासायनिक खते आणि नाकारलेली कीडनाशके यांच्या वेढ्यात सरकारी यंत्रणा गुंतलेली असल्यामुळे त्यांचाच प्रचार अधिक होत असतो. मात्र खरा शेतकरी तशा फसव्या हरितक्रांतीपासून आता...