Skip to main content

Posts

Showing posts with the label sampadkiya of 25 april2011

sampadkiya of 25 april2011

गाभारा देवीचा राहो कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात यापुढे महिलांनाही प्रवेश राहील. यासाठी वास्तविक आंदोलन करावे लागावे हेच कालविसंगत आहे. परंतु शासन-प्रशासन क्षेत्रातील राजकीय मंडळींच्याच हाती प्रश्न गेल्यावर धडकमोर्चा, डांबरफासो, हल्लाबोल याशिवाय गत्यंतर नाही. दुसरे हेही खरे की, आंदोलनाचा नारा घुमेपर्यंत हा असा काही प्रश्न आहे असेही  फार कुणाच्या गावी नव्हते. कोल्हापूरचे शाहू छत्रपती-फुले-आंबेडकर यांचा त्रिकाल जप करून स्वत:भोवतीच फट्कारी सोंगाचे पुरोगामित्त्व घुमवणारे पक्ष व संघटनांऐवजी अंबाईच्या गाभाऱ्यात घुसखोरी करणारे भाजप आणि मनसे हे तथाकथित जातीयवादी पक्ष, आणि पुष्कळशा `ब्राह्मण्यवादी' महिला हे पुढे होते. पुजारी, देवस्थान मंडळ, जिल्हाधिकारी हेही सर्व `ब्राह्मण्यवादी' असून त्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन फार न चिघळता योग्य बदल अनुसरला. एकंदरीत जी गोष्ट झाली ती स्वागतार्ह आहे. पंढरपूरच्या सार्वजनिक मंदिरप्रवेशासाठी (पुन्हा `ब्राह्मण्य'च) साने गुरूजींनी उपोषण केले त्याला पाचसात दशके उलटली. त्या काळात मंदिरप्रवेश करीत असलेला अस्पृश्य कसा ओळखू येई असा एक प्रश्न...