Skip to main content

Posts

Showing posts with the label 12 Sept. 2011

Maza Cloumn

दया आणि षौक प्राणी छळ-प्रतिबंधक कायदा १९६० मध्ये आला. त्यानंतर सर्कशींवर गंडांतर आले. हत्तीला स्टुलावर बसविण्यात किंवा आसूडाच्या भीतीखाली सिंहाने शेळीच्या ताटामध्ये जेवण्यात त्या प्राण्यांचा छळ होतो असे कायद्याला वाटते. वास्तविक त्याच निकषावर माकडाला सुंदर कपडे घालून रिंगमास्तरच्या खांद्यावर मिरविणे याला सन्मान समजले पाहिजे; परंतु कायद्याला तेही मान्य होत नाही. अस्वल, माकड, वाघ, सिंह यांचे खेळ दाखवायला बंदी आहे. मनेका गांधींपासून कित्येक जीवनदयावादी प्राणीमित्र काही वर्षांपूर्वी बराच दंगा करीत असत. हल्ली तो फारसा ऐकू येत नाही. सर्कशीतल्या प्राण्यांना ऐतखाऊपणाची सवय लागते इतके ते माणसाच्या वृत्तीचे बनतात, त्यालाही `प्राण्यांचा छळ' मानता येईल. काहीजण कुत्र्यांचे इतके लाड करतात की, आपल्याला हेवा वाटावा. माझ्या पाहण्यात एक बाई आहेत, त्या तव्यावरची गरमागरम पोळी तूप लावून तुकडे करून त्यांच्या कुत्र्याला भरवतात. त्या कुत्र्याचा आकार असा की, रेडकूसुद्धा खाऊ शकेल. झिपरी केसाळ कुत्री अंथरुणात घेऊन बसणारे प्राणी तुमच्याही पाहण्यात असतील. याउलट आमच्या शेजारी दोन गावठी कुत्री बाळगणारे एकजण...