Skip to main content

Posts

Showing posts with the label sampadkiya of 18july2011

sampadkiya of 18july2011

हट्टाग्रहात सत्य हवे महाराष्ट्नत `अंधश्रद्धा' निर्मूलनासाठी भोंदूगिरी-विरुद्ध कायदा करावा यासाठी एकीकडे आंदोलन होत आहे, त्यास पाठिंबा असल्याचे सरकार भासवते. आपल्या पुरोगामित्त्वाचा टेंभा मिरवत राज्याचा मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा बांधून `वेळेवर पाऊस पाड, जनतेला सुखी ठेव' असे साकडे घालतो हीच तर भोंदूगिरी झाली. वास्तविक पाऊस पडत नाही त्या संकटाशी सामना करणारे सरकार गरजेचे आहे. पण `कर्म करोनी म्हणती साधू' असे लोकच सर्वत्र बोकाळले आहेत. त्यामुळे भोंदू अंधश्रद्धेविरुद्ध कायदा कसा होणार, आणि त्याचा कसचा उपयोग होणार, याबाबत सच्च्या पुरोगामींनी तरी विचार करायला हवा. सत्य श्री साईबाबांचे निधन झाल्यावर त्यांच्या संपत्तीविषयी चमत्कार कथा प्रसृत होत आहेत. हातातून उदी, गुलाल निघणे किंवा बंद मुठीतून घड्याळ-अंगठी येणे असले मंतरखेळ छोट्या बालकांना अचंबित करतात. ज्यांची बालबुद्धीच आहे असे पब्लिक असल्या चमत्कृत अध्यात्मास भुलले. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून सगळया बड्या लोकांसही भुरळ पडल्याचे दिसले त्यात सत्यत्त्व किती आणि साईत्त्व किती असा प्रश्न आहे. नास्तिकांनी साई भक्तांच्या झालेल्य...