मार्केटिंग पद्धती सकाळी लवकर फिरायला बाहेर पडून बोळकांडीतून मोठ्या रस्त्याला लागलं तर तिठ्ठ्यावर चतकोर भाकरी-लिंबू-मिरची वगैरे कुणी त्रस्त समंधानं ठेवलेलं दिसतं. अमावास्या लक्षात येते. पुढचा मैलभर रस्ता विरळ होत गावातून बाहेर पडतो, तिथवरच्या प्रत्येक दहावीस पावलांवर ही आरास दिसते. झुंजुमुंजू दिसू लागल्यामुळं रस्त्याची माणसं ही बला चुकवीत पाय टाकत असतात. पूर्वी पिचत् कुठंतरी केव्हातरी हा उतारा दिसायचा. हल्ली त्याचंही प्रमाण खूप वाढलं आहे. सध्या सगळयाच गोष्टींना मार्केट चांगलं आहे म्हणतात; त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोरात आहे, शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढूनच देवदर्शन करणारी हट्टी आंदोलनंही जोरात आहेत, आणि ही उतारे-मंतराची दृष्टही खूप फोफावली आहे. महामार्गावर गाडी टोलनाक्यावर थांबली, तशी आरडाओरड करत वस्तूविके घोंघावत येतात. त्यात शनिवार-अमावास्या असेल तर मिरची-लिंबू माळा लोंबत पुढे आणणारी पोरं खूप असतात. महामार्ग वाढले, कार-वाहनं वाढली, तसं हे लिंबू-मिरचीवालेही वाढले. एकदा कोल्हापूर-पुणे महामार्गावरच्या टोलनाक्याशी रांगेत थांबलो तर तीन-चारजण तसल्या माळा घेऊन भोवती आ...