Skip to main content

Posts

Showing posts with the label A.J.

sampadakiya of 16 may 2011

सत्ताकारण चालेल; आवश्यक नाही `राजा कालस्य कारणम्' असे म्हणतात. आपल्या सभोवतीची सगळी घडी विस्कटून गेली आहे हे तर आपण पाहतोच आहोत. त्या अराजकाला राज्यकर्ते, आणि निर्नायकीला आजचे नायकच कारणीभूत आहेत हे बव्हंशी खरे आहे. परंतु  ही स्थिती ज्यांना कळते, त्याची कारणे ज्यांना कळतात, त्यावरचे उपायही ज्यांना सुचतात असे प्रजानन, ते उपाय का सुरू करत नाहीत असा प्रश्न आहे. तशी काही कृती करणे आटोक्याबाहेर असेल तर त्यांस `उपाय' म्हणत नाहीत. उदाहरणार्थ `अमेरिकेचा नक्शा उतरवायचा असेल तर आपली फौज व्हाईट हाऊसमध्ये घुसवावी...' याला उपाय म्हणत नाहीत. जे आपल्यास करण्याजोगे आहे तेच उपाय पुढे आले पाहिजेत. राजकीय परिस्थिती सुधारली पाहिजे याबद्दल वाद नाही, पण ती सुधारण्यासाठी आपण त्यात घुसले पाहिजे का? स्वत:चा पक्ष काढावा, निवडणुका लढवाव्यात याची गरज आहे का; आणि `उपाय' म्हणून तसे केल्यास ते किती `उपायकारक' होईल असा विचार केला पाहिजे. राजकारणावर सध्या सर्वांचा भर असतो. कोणत्याही क्षेत्रात राजकारण आहे. लागेबांधे-हितसंबंध असले तरच काही करता येते, लाचखोरी बोकाळली आहे आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे...