Skip to main content

Balbhim Parivar


बलभीम परिवार
सांगलीतील कृष्णा नदीकडेची बलभीम व्यायामशाळा ही ९५ वर्षे पूर्ण करीत असून तिच्या स्थापनेत व वाटचालीत कै.दत्त आणि कै.विनायक नारायण आपटे या बंधूंचा सिंहाचा वाटा होता. त्या मोठ्या गोतावळयाचा या व्यायामसंस्थेशी पिढ्यांनी संबंध आहे.
हनुमानजयंतीस (२५/०४/१३) खास कार्यक्रम तेथे आयोजित केला होता. नव्या आधुनिक व्यायामसाधनांचे उद्घाटन, तेथील आमदार पै.संभाजी पवार यांच्या हस्ते आणि क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या नामवंतांचा सत्कार होईल. गेली साठ वर्षे संस्थेच्या कार्यात व्यतीत केलेले व काही काळ अध्यक्षपदी असणारे श्री.अरविंद विनायक आपटे यांचा ७५ वर्षपूर्ती सत्कार  होत आहे. याशिवाय मल्लखांब, दोरी मल्लखांब व अन्य प्रात्यक्षिके, हनुमान जन्मकाळ, मंत्रजागर व तीर्थप्रसाद इ. कार्यक्रम होत आहेत.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री.शरद दत्त आपटे हे आहेत.(फोन - ९८९०३८४४००)
- बलभीम व्यायाम शाळा, ८३२, गावभाग, सांगली ४१६४१६

Comments