Skip to main content

Posts

16 Sept.2013 - Apale Jag

अजून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद कशाला? - अरुण गोडबोले एके काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्न् - विशेषत: पश्चिम महाराष्ट्न् आणि मराठवाडा - खूपच विघटित झाला होता. महाराष्ट्नच्या प्रगतीला आणि एकात्मतेला बाधा आणणाऱ्या त्या काळापासून आता आपण खूप पुढे आलो आहोत. वादाचे जुने कंगोरे काळाच्या ऐरणीवर घासून ठोकून खूपसे झिजलेले आहेत. धार्मिकतेचा पाया, आता पुरेसा ठिसूळ झालेला आहे. तरीही राजकीय स्वार्थाकरिता तो वाद पुन्हा धुमसत राहावा असे प्रयत्न राजकीय वा तथाकथित नेते अधूनमधून का होईना, पण जाणीवपूर्वक करताना दिसतात, त्याचा खेद वाटतो. वि.द.घाटे यांचे `दिवस असे होते' हे आत्मचरित्र वाचनात आले. शिक्षण क्षेत्रातील विचारवंत, प्रतिभावंत साहित्यिक म्हणून ते गणमान्य होते. त्यांनी त्यांच्या तरुणपणी मराठा समाज संघटित होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी या वादांवर आपल्या आत्मचरित्रांत दोन स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत. महात्मा फुले यांना मानाचा मुजरा करून घाटे यांनी त्यांच्या कामगिरीचे `अलौकिक' असे वर्णन केले आहे, `फुल्यांची चळवळ ब्राह्मणांच्या विरोधात नव्हती, तर जातीसंस्थेच्या विर...

2 sept..2013 - Apale jag

न्यायव्यवस्थेची अन्याय्य वेदना दिल्लीची भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि त्या जवळपास पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. बातम्या आणि चित्रफिती लोकांनी सादर करून त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यावर न्यायालयाने वारंवार निर्देश देऊनही दिल्ली महापालिका दखल घेत नव्हती. पाण्यामुळे मोठी वित्तहानी झाली. काही उपाययोजनाच न करण्याबद्दल अधिकाऱ्यांना न्यायालयाने खडसावले की, `इथे काही न्यायालयीन व्यवस्था शिल्लक आहे म्हणून तुम्ही येथवर आलात, अन्यथा लोकांच्या रोषापुढे तुमची खैर नव्हती. न्यायालयाचा आदेश गंभीरपणे घ्या, आणि काम करा. तुम्ही तुमचे काम गंभीरपणे केले नाही तर लोक तुम्हाला चोपतील.' `कायदा आणि सुव्यवस्था' या नावाची एक भोंगळगिरी सध्या आपल्या देशात नांदत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. सामान्य नागरीकसुद्धा बेकायदा-अनैतिक भ्रष्ट वागतो, पण पुष्कळदा त्याचा तो नाइलाज असतो हे खरेच आहे. सामान्य माणसाला समोरच्या अरेराव बेफिकीर चुकार माणसाची मानगूट पकडून मुस्कटात द्यावी असे जितक्या वेळा वाटते, तितक्या प्रत्येक वेळी तो तसे वागत नाही. ही सामुदायिक वर्तणुकीची किमान सभ्यता सांभाळली ज...

Lekh on V.M.Dhapre, Karad

अश्वत्थव्रती आण्णा - विवेक ढापरे, कराड (मोबा.७५८८२२११४४) लोकसंस्कृतीमध्ये `अश्वत्थाचा पट' नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानाचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुखसमृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रति अविचल निष्ठा असणाऱ्या विश्वनाथ माधव ऊर्फ अण्णा ढापरे यांनी गेल्या ७९ वर्षांत हे व्रत कधी केलं असेल अशी शक्यताच नाही. पण त्यांनी ऐकलेली पिंपळपानाची सळसळ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती कथानकं रेखाटती ठरली व सदैव इतरांसाठी स्वत:चं आयुष्य वेचणारी ठरली. माझे वडील विश्वनाथ ढापरे यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील ब्रिटीशकालीन बांधकाम खात्यात नोकरी करीत होते. स्थावर मालमत्ता भरपूर, पण सारीच कुळांच्या आणि साहजिकच त्या अनुषंगाने कोर्टकचेऱ्यांच्या तावडीत अडकलेली. त्यामुळे भाडोत्री घरात राहूनच आजोबांनी सहा मुलांचा प्रपंच केला.विलिंग्डन कॉलेज सांगली मधून माझे वडील बीएस्सी झाले. त्यानंतर अने...

Apale Jag 26Aug.2013

ज्ञानरचनावाद-सार्वत्रिक चळवळीची गरज - प्रशांत देशपांडे सचिव, तुळजाभवानी शिक्षण मंडळ, इस्लांपूर (जि.सांगली) फोन : ९८२२२४१९१३ माणसाच्या आयुष्यातील समस्या सोडविता याव्यात हा तर शिक्षणाचा मूळ उद्देश असतो. परंतु गेल्या काही वर्षांत शिक्षण हीच एक समस्या आहे, असे म्हणण्याची पाळी सर्व संबंधी घटकांवर आली आहे. आयुष्य सुसंस्कृत, संपन्न तरीही जिज्ञासू करण्यासाठी शिक्षणाने दिशा द्यायला हवी. तसे `आनंददायी शिक्षण' ही संकल्पना मुलांच्या वाट्याला गेल्या पाच-पन्नास वर्षांत आलेलीच नाही. उलट, शासन-पालक-शिक्षक यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत तर `घोका आणि ओका' पद्धतीची शिक्षणव्यवस्था आपल्याकडे रुळून गेली. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात चांगले जगता येईल इतकीही क्षमता त्यामधून प्राप्त झालेली नाही. निव्वळ परीक्षार्थी मुले, वेतनार्थी शिक्षक आणि उदासीन पालक अशी एक साखळी तयार झाली. ही स्थिती सर्वच घटकांना अमान्य होती. पुष्कळ वर्षांच्या कटू अनुभवातून आणि अनेक विचारवंतांच्या मंथनातून शिक्षणविषयक नवा प्रयोग अलीकडे सुरू झाला आहे. सहामाही किंवा वार्षिक परीक्षांतील स्मरणआधारी गुणांकना...

Lekh

अशानं महासत्ता होईल? - संदीप वासलेकर (स्ट्न्ॅटेजिक ग्रुप) केवळ पाच वर्षांपूर्वी जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्नध्यक्ष म्हणून प्रथम निवडून आले, तेव्हा सौरऊर्जा उत्पादन करण्याचा खर्च एका वॅटसाठी ६ डॉलर होता, तो आता २ डॉलरपर्यंत खाली आला आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांना सध्या सौरऊर्जा  प्रतिकिलोवॅट तासाला ४० सेंट या दरानं मिळते. २०५० पर्यंत ६ सेंटपर्यंत हा दर कमी होईल, त्यावेळी अमेरिकेतील ३३% ऊर्जा ही सौरऊर्जा असेल. केवळ पाच वर्षांत अमेरिकेला सौरऊर्जा स्वत: उत्पादित करण्यात जे प्रचंड यश मिळालं, त्यामागं आहेत स्टीफन च्यू. चिनी वंशाचे एक अमेरिकी नागरिक. याच पाच वर्षांत अमेरिकेनं दुसऱ्या काही क्षेत्रांत प्रचंड बाजी मारली आहे. त्यातला एक उपक्रम काही विशिष्ट प्रकारचे जंतू निर्माण करतो. ते जंतू एखाद्या झिजलेल्या अथवा तुटलेल्या धातूच्या वस्तूवर पसरवले तर ती वस्तू काही काळात पुन्हा नवी होते. दुसऱ्या एका प्रकारचे जंतू रासायनिक रोबोटमध्ये मिश्रित केले तर तो रोबोट स्वत:हून लहान होतो व एका कापडाच्या अथवा भिंतीच्या छिद्रातून पलीकडं जातो. दुसऱ्या बाजूला गेल्यावर पुन्हा पूर्ववत्...

Sampadkiya in 5Aug.2013

प्रसार  आणि  फैलाव आजकाल साऱ्या पृथ्वीतलावर सगळे अनैतिक, वाईट, दुराचारी असे गलिच्छ ते घडते आहे असा एक लाडका समज कवटाळून बसण्याची रीत आहे. जे काही चुकीचे, त्याबद्दल त्रागा करावा; आणि त्याचा आपल्याला कसा-किती त्रास होतो हे एकमेकांसमोर कण्हत-कुंथत सांगावे, असे करून माणसाचे आयुष्य आनंदात जात असावे. परंतु जगात सर्वत्र सर्वकाळी केवळ भ्रष्टाचार दुराचार मातलेला असतो असे नाही. वाईट जे घडते ते स्वत: आपण केलेले नसते हे कदाचित खरेही असेल, पण जे काही चांगले घडले पाहिजे असे आपल्याला वाटते त्यासाठी तरी स्वत: काय करतो, हा प्रश्न पूर्णत: निरुत्तर करणारा असतो. सभोवताली फक्त आणि फक्त चांगले असू शकत नाही, कारण ते पुरेसे नाही. त्याला वाईटाची जोड असावीच लागते. आपल्या घराशेजारून झुळझुळत वाहणारा निर्झर असावा हे छानच, परंतु त्याइतकीच सांडपाण्याच्या गटारीची आवश्यकता असते.समारंभात अत्तराचे फवारे उधळले जातात, तशी खरकटे फेकण्याची सोय असावी लागते. प्रश्न असा असतो की त्या दोन्हींचा उपयोग व उपभोग आपण कसा करतो. `आजकाल कोणतेही वृत्तपत्र खून-मारामाऱ्या-आणि फॅशन शो एवढ्याने भरलेले असते' हे एक सहज फेकलेले विध...

Advertisement of books

महर्षी वाल्मीकी रचित मूळ संस्कृत महाकाव्यांचे इंग्रजी रूपांतर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले. त्याचा मराठी रसाळ ओघवता अनुवाद श्रीरामायण  (श्री.वि.रा.जोगळेकर) गुरु.शंकर अभ्यंकर यांच्या प्रस्तावनेसह, प्राचीन स्थानसूची, आकर्षक नकाशा व चित्रे असलेला संग्राह्य ग्रंथ पृष्ठ संख्या ३५०, छापील किंमत फक्त रु.२००/- खास सवलत : केवळ १२०/- रुपयात रजि.पोस्टाने पाठविण्यात येईल. मनिऑर्डर/चेक `वि.रा.जोगळेकर' नावावर पाठवावा. पत्ता : श्री गणेश चॅरिटेबल ट्न्स्ट, `राम-सीता' ८१०, जोगळेकर वाडा, पोस्टाजवळ, तासगाव (जि.सांगली) भ्रमणध्वनी : श्री.जयंत जोगळेकर - ९४२१२७२२२२   `आपले जग'मध्ये प्रकाशित झालेल्या काही संपादकीय लेखांचा संग्रह अग्रलेखांची भूमिका - डॉ. दीपक टिळक प्रस्तावना - श्री.सुधीर मोघे परिचयलेख - श्री.भानू काळे वाचन व्यासंग वा भेट देण्यास चांगले पुस्तक पृष्ठसंख्या २२४, छापील किंमत रु. २००/- सवलतीत फक्त रु.१०० + रजि.बुकपोस्ट खर्च रु.२०/- मनिऑर्डर/चेक `आपले जग' नावावर पाठवावा. पत्ता : वाल्मिकी, किर्लोस्करवाडी (जि.सांगली) ४१६३०८ फोन (०२३४६) २२२०५८, २२३५५८ ...